तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 8:41 pm

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

जीवनमान

प्रतिक्रिया

भोळा भाबडा's picture

26 Jun 2016 - 3:44 pm | भोळा भाबडा

चापूनचोपून अनुमोदन

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2016 - 12:53 pm | प्रसाद गोडबोले

धनंजय माने , आपण नक्की कोणाचा डु आयडी आहात हे कन्फर्म झाले की सविस्तर प्रतिसाद देईन ( तुर्तास डोळ्यासमोर दोन लोकं आहेत , जरा कन्फ्युजन आहे )

सर्वसामान्यांना जे पचेल रुचेल आणि किमान रूढ़ पायवाट न सोडता जे करता येईल ते करणं हेच सांगितलं गेलं पाहिजे.

हे तुमचे मत आहे , मी तुमच्या मताचा आदर करतो पण तुम्ही तुमच्या मताची माझ्याव्र किंव्वा कोणावर सक्ती करु शकत नाही !
माझे मत तुम्हाला अमान्य आहे तर तुम्ही ते फाट्यावर मारायला खुषाल मोकळे आहात , माझे मत मान्य करा असे मी कधीही म्हणालेलो नाहीये ! ज्याला त्याला ज्याचे त्याचे मत मांडायचा अधिकार आहे ,आणि ज्याला जे योग्य वाटते त्याने त्याचा सत्सद्विवेक बुध्दीने स्विकार करावा , जे अयोग्य वाटते त्याचा त्याग करावा हे प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे :)

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 1:04 pm | धनंजय माने

मिपा बंद पडेल ओ अशानं. ;)
प्रगो म्हणतो त्याला फाट्यावर मारा, प्यारे म्हणतो त्याकडे दुर्लक्ष करा, या रेसिपी मध्ये अंडें घालू नका, केजरीवाल कड़े दुर्लक्ष करा, ब्रेक्सिट झालं, होऊ दे की....
असं असेल तर संवाद संपलाच की.
आणि मुख्यत्वे पब्लिक फोरम वर मत मांडताना लेखक आणि लिखाण वेगळं करायचं असं मान्य आहेच पण लिखाण चुकीचं असेल तर? त्यावरहि आक्षेप घ्यायचा नाही असं म्हणत असला तर रहायलं.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2016 - 1:49 pm | प्रसाद गोडबोले

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !

द्रुपाल मधील घोळ वगळता मिपा बंद पडत नसते , त्याची क्ल्जी क्रु न्ये =))

बाकी लेखनावर आक्षेप घ्यायला हरकत नाही , ट.चा. ह्यांनी तसा आक्षेप घेतला आणि मी त्यांना विकिपेडीयावरील ग्राफ सह दाखवुन दिले की अल्कोहोल आणि निकोटिनपेक्षा कॅनिबस कैकपटीने सौम्य आहे !
अजुनही लेखनावर चर्चा करायची असल्यास करु पण "लेखकाने गांजा पिवुन प्रतिसाद लिहिले आहेत" वगैरे हे असले वैयक्तिक शेरेबाजी कशाला ? जे लोकं स्कोर सेटलिंग करण्यासाठी व्यक्तिगत टिप्पण्णी करतात त्यांच्या कंपुत किमान आपण तरी सामील नसाल अशी अपेक्षा आहे !

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

27 Jun 2016 - 1:52 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

कुणीही एकमेकांची चेष्टामस्करी करू नये.चर्चा कशा गंभीर झाल्या पाहिजेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 3:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

ठीक आहे प्रगो,

माझी मोठीच चूक झाली अन जरासा पाय घसरला खरा, पण मी आपली मनःपूर्वक माफी मागतो आता जाहीर,

आपण मोठ्यामनाने माझा अपराध पोटात घालून मला माफ कराल ही अपेक्षा

-(क्षमायाचक) बाप्या :)

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 3:11 pm | धनंजय माने

बापू तबियत तो ठीक बा? ई का करत रही?
उ साबरमती वाला बापू मिला का तोहार?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही हमहु सोचत बा के सायद हमर बंदुकवा मिसफायर हो गईस भाईबा!. खिलाफत तो अभी भी हम करत ब मुद्दई का, पर सायद ब्यक्तिगत टिप्पणी हमे नाही करना चाहिये था, विषय संबंध मे हम आपके ही साथ है, पर हम ब्यक्तिगत हमले तबतक ना करेंगे जबतक कौनु हमपे हमले ना करत बा,

तंबाखू ची एक चिमूट म्हणजे गांजाच्या 10 चिमटी असू दे गांजा कितीही माईल्ड असू दे आम्ही त्याच्या अन एकंदरीत व्यसनाच्या सक्त विरोधात आहोत हा मुद्दा अन त्या संबंधात आमचा पाठिंबा माणेंसी अजूनही आहे, जमेल तसे त्याचे वैज्ञानिक विवेचन करायचा प्रयत्न राहीलच

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 7:48 pm | धनंजय माने

Once again Grand Salute soldier!

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2016 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले

:)

आपला प्रांजळपणा आवडला सोन्याबापु !
असु दे , चालायचेच , चुका होतच असतात , मी नाही लक्षात ठेवत सारे , जास्त मनाला लावुन घेवु नका :)

गामा पैलवान's picture

27 Jun 2016 - 5:39 pm | गामा पैलवान

इस्कू बोल्ते दिल्दारी!
दोघांचेही अभिनंदन.
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jun 2016 - 4:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपण चार पारमार्थिक पुस्तके वाचली म्हणून आपण खुशाल कोणाला काहीही बोलावे असा त्याचा अर्थ होत नाही, बोलण्यात तोल जात असल्यास स्वमतांध कोण आहे हे सुस्पष्ट होतेच म्हणा, तसेही आम्ही स्वमतांधतेच्या बिगारीत असलोही एकवेळ तरी इथे त्याची पीएचडी पार केलेले पुष्कळ नमुने आहेत, तुम्ही त्यातले असाल असे आम्हालाही वाटले नव्हतेच, असो! , स्वमतांधतेला इलाज नसतो(च) , फक्त आत्मुगुर्जी इथे काहीतरी लिहितात तेव्हा अग्री टू डीसग्रीचा मोठेपणा दाखवण्याजागी 'स्व'मते 'अंधपणे' गुरुजींच्या मागे लावणारे इतरांशी स्वमतांध वृत्तीवर बोलत आहेत ह्याचे अंमळ आश्चर्य वाटले खासे, असो,

तुमच्याशी बोलण्यात रसही नाही अन अर्थही नाही तस्मात आवरा आता, बाकी गांजा नामे मूर्खपणाची मानेंनी यथोचित लक्तरे टांगली आहेतच त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!! वैयक्तिक आयुष्यात खुशाल फुका की गांजा फक्त त्याची जाहिरात कश्याला करा?? वाईट ते वाईटच ! मग तो गांजा असो वा तंबाखू ,(तंबाखूच्या) व्यसनातून बाहेर पडून झाल्यावर आलेले हे बोल आहेत महाराज, त्यामुळे हे गांजा समर्थन वगैरे बालीशपणा आवरा आता.

(कोपरापासून) नमस्कार

बाप्या

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 4:30 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

v

पक्षी's picture

27 Jun 2016 - 10:40 am | पक्षी

विष ते विषचं, सौम्य काय आणि जहाल काय.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2016 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले

गांजा पिऊन तरी लिहिलं असेल

असा उल्लेख तुम्ही किमान २-३ दा केल्यावर तुमच्या स्वमतांधतेला अधोरेखित करणे अत्यंत महत्वाचे वाटते म्हणुन प्रतिसादाने ते उघड केले आहे !

तुमच्याशी बोलण्यात रसही नाही अन अर्थही नाही तस्मात आवरा आता

,

रस तुम्हाला नाहीये ,तेव्हा तुम्हीच आवरा ! तुम्हाला कोणी सक्ती केलेली नाहीये की माझ्या प्रतिसादावर येवुन उपप्रतिसाद द्यायला!

हां तर स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते तेव्हा अशाच दारु मुक्तीवर काम करणार्‍या अशाच एका स्वमतांध बाई ची भेट झाल्याच्या उल्लेख स्वामीजींनी केलेला आहे ! कर्मयोग पुस्तकातील तो उल्लेख कॉपीपेस्ट करु शकले असतो पण तो कॉपीराईट्चा भंग होईल म्हणुन केले नाहीये !
पुस्तक ह्या इथे आहे http://prakashan.vivekanandakendra.org/books/hindi/karmayoga निवांत वाचा !
अशा कोणत्याही प्रकारच्या स्वमतांधते पासुन आपण लांबच राहिले पाहिजे असे स्पष्ट स्वामीजींनी सांगितले आहे !

आणि महत्वाच म्हणजे = मी माझं मत मांडले होते , मिपा मुक्त व्यासपीठ आहे , चर्चा करायची असल्यास संविधानिक मार्गाने करता आली असती , ट.चा. ने संविधानिक मार्गाने चर्चा सुरु केल्यावर मी त्यांना संविधानिक मार्गानेच उत्तर ही दिलेले आहे.
प्रतिसाद सोडुन प्रतिसाद लिहिणार्‍याविषयी , लेखन सोडुन लेखका विषयी प्रतिक्रिया द्यायची घाण सवय इथल्या काही लोकांना आहे , त्यांना तसेच उत्तर द्यावे लागेल !

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 12:58 pm | धनंजय माने

गांजा पिऊन लिहिले किंवा नाही यातून लिखाणाची जबाबदारी नक्की कुणावर टाकावी याबाबत निर्णय करता आला असता.
गांजाचा परिणाम म्हणून असं लिहिलं असं समर्थन तरी करता आलं असतं. आता मॅटर सरळ आणि तितकंच गंभीर आहे.

मुळात आध्यात्मिक साधनेचं टोक जे 'सोsहं चा अनुभव' घेणं आहे हे आहे याबाबत तुमचं दुमत नसेल.
हा अनुभव आला असं कधी म्हणता येईल ते एकदा सांगा म्हणजे मग पुढची चर्चा करता येईल.

हे वरचं सगळं अवांतर वाटू शकतं. पण 'माझ्या' मनाला वाटतं की मला तंबाखू खायची आहे, सिगारेट ओढायची आहे तेव्हा मनाला 'वेगळेपणाने' सांगता आलं पाहिजे की हे मना तुला इच्छा आहे तरी हे माझ्या भल्याचं नाही त्यामुळे मी त्या दिशेनं पाऊल उचलणार नाही. तुला काय उड्या मारायच्यात त्या मार.

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2016 - 9:17 pm | चौथा कोनाडा

छान व्हिडो !

मेडीटेशन ने व्यसनमुक्ती होते/होइल
ओशोबाबानी सामाजिक कार्य म्हणुन व्य्सनमुक्ती साठी असे मेडिटेशन चे कॅंप केले होते का?
इतर कोणी बाबा/बाप्पु/ताई/आक्का/अम्मा/भगवान /म्हाराज/भैय्या यांनी व्यसनमुक्ती साठी मेडिटेशनची शास्त्रोक्त थेरपी केलीय का ? ( या संदर्भात डोणजे येथील मामांचे नाव ऐकले होतें )

बरेचसे बुवा बाप्पु लोकांना आप्ल्याच व्यसनी लावतात.

It’s Easy to Quit Smoking. I’ve Done It a Thousand Times

कापूसकोन्ड्या's picture

25 Jun 2016 - 3:44 pm | कापूसकोन्ड्या

मार्क ट्वेन

विजुभाऊ's picture

24 Jun 2016 - 6:35 pm | विजुभाऊ

व्यनी करा. सिगारेट नक्की सोडवून देवु शकतो.

अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट सोड" असे सांगणे होते आणि जर एखाद्याला खरंच सिगरेट सोडायची इच्छा असेल तर "मला सोडायची आहे पण जमत नाही" असे उत्तर मिळते. या वेळी हळूच व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव डोक्यात सोडून द्यायचा.

मला पुण्यातले मुक्तांगण हे एकच व्यसनमुक्तीकेंद्र माहिती आहे.

व्यसनमुक्ती केंद्र ऐकल्याबरोब्बर नकारात्मक प्रतिक्रिया येतात. "अरे मी इतकापण व्यसनाच्या आहारी गेलो नाहीये!" "मी माझी मी सिगरेट सोडतो पण तिकडे नाही जाणार" "बघू.." अशी उत्तरे मिळतात. मात्र अशावेळी आपणच चिकाटीने मुक्तांगणमध्ये जाण्याचा आग्रह धरावा.

व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाणे म्हणजे "तेथे अ‍ॅडमीट होणे" असा एक समज असतो. मात्र ओपीडी द्वारेही उपचार होतात. आठवड्यातले ठरावीक दिवस ओपीडी सुरू असते. अधिक माहिती मुक्तांगणच्या वेबसाईटवर मिळेल.

मी शक्यतो प्रत्येक व्हिजीटला मित्रासोबत थांबायचा प्रयत्न करतो.(शनिवारी सकाळी १० ते १ च्या दरम्यानची वेळ मला सोयीची असते!)

प्रत्येक व्हिजीटला पुढीलप्रकारे मानसिक व शारिरीक तपासणी होते,

१) जनरल कौन्सीलींग
२) मेडीकल कौन्सीलींग
३) हेल्थ चेकप व त्यानुसार औषधे

जनरल कौन्सीलींगमध्ये व्यसनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या वाईट गोष्टी व त्याचे दुष्परिणाम सांगून व्यसनाचे नक्की कारण काय असावे हे पाहिले जाते व आणखी माहिती उदा. सिगरेट ओढण्याच्या नक्की वेळा, किती सिगरेट्स वगैरेही केसपेपरवर नोंदले जाते.

मेडीकल कौन्सीलींगमध्ये सिगरेटमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे दैनंदिन त्रास (पित्त, बीपी, अपचन वगैरे) हे ही सांगीतले जातात.

हेल्थ चेकपमध्ये वजन, बीपी वगैरे तपासले जाते व त्यानुसार औषधे, टॉनीक्स आणि त्यांचे प्रमाण ठरवले जाते. (औषधांमध्ये निकोगम नावाचे एक निकोटीयुक्त च्युईंगम दिले जाते - गरज असल्यास)

औषधांद्वारे प्रामुख्याने पुढील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

१) भरपूर आहार, पुरेशी झोप व शरीराचे योग्य वेळापत्रक
२) निकोटीन सेवन हा शरीराचा एक भाग झाल्याने ठरावीक वेळानंतर शरिराकडून निकोटीनची मागणी होते. या गरजेसाठी निकोगम दिले जाते. अनेकदा हेही टाळा असा सल्ला मिळतो.
३) व्यसन थांबवल्यानंतर / कमी केल्यानंतर शरीराची निकोटीनची मागणी व पुरवठा अचानक गडबडल्याने शारिरीक त्रास होतात. टॉनीक्स व औषधांद्वारे यावर उपचार केले जातात.
४) हळू हळू संपूर्णपणे व्यसन सोडण्यावर भर दिला जातो.

प्लीज नोट - वरील माहिती संपूर्णपणे निरीक्षणातून, डॉक्टर व कौन्सलर्सना 'सहज' विचारलेल्या माहितीतून मिळाली आहे.
या संपूर्ण उपचारपद्धतीमध्ये स्वत: व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे - जर एखाद्याला व्यसन सोडायचेच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही.
मुक्तांगणची एका व्हिजीटची फी ५० रू आहे.

***********************************************

मुक्तांगणद्वारे ५ मित्रांचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला.

दोन मित्र संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले (एक जण खैनी व एक जण सिगरेट् + दारू)
एक मित्र सात आठ महिने व्यसनमुक्त राहून ऑफीस व कौटुंबीक कारणाने पुन्हा सिगरेट ओढू लागला.
एक जण पुन्हा आहे त्याच प्रमाणात सिगरेट ओढत आहे.
एका मित्रासोबत दोन वर्षांपूर्वी पहिली व्हिजीट झाली - त्याने सिगरेटचे प्रमाण दिवसा १० / १२ वरून २ / ३ पर्यंत कमी केले होते - नंतर माझा संपर्क राहिला नाही.

***********************************************

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jun 2016 - 4:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

च्यायला खरेच इस्कु बोलते मैत्री!!!, तुमची मदत /भेट घ्यायला परत एकदा विडा मळायला लागू नये! अन लागलाच तर तो सार्थ असेल!

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jun 2016 - 9:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त हो!

अजया's picture

24 Jun 2016 - 7:14 pm | अजया

_/\_
हा खरा मित्र.

सुबोध खरे's picture

24 Jun 2016 - 8:14 pm | सुबोध खरे

+ १००

एस's picture

24 Jun 2016 - 10:22 pm | एस

+१०००

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2016 - 8:54 pm | चौथा कोनाडा

+ १०,०००

नाखु's picture

27 Jun 2016 - 11:22 am | नाखु

मोदका

अभिनंदन आणि
तुझी सायकल भारी, फिरणं भारी आणि अस्ली दोस्ती तर भारी (च्या मारी हे सगळंच लै भारी)

(आ)भारी नाखु

अजया, डॉक्टरसाहेब, स्वॅप्सराव, चौथा कोनाडा, नाखुकाका आणि बापुसाब..

भारी वगैरे काही नाही हो. मी संपूर्ण प्रोसेसची माहिती काढली आणि थोडासा वेळ दिला इतकेच.

बेकार तरुण's picture

28 Jun 2016 - 8:17 am | बेकार तरुण

खूपच भारी मोदक साहेब, एक जोरदार नमस्कार तुम्हाला
अहो दुसर्‍याचा नुसता विचार करायला इथे कोणी वेळ काढत नसतो
तुम्ही फक्त वेळच काढला नाही तर कोणाच भविष्य सावरायचा मनापासुन प्रयत्नहि केला.
बाकी स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणी कोणासाठी काही करत नाही, म्हणुन तुमचा विचार आणि काम, दोन्ही अत्यंत कौतुकास्पद !

हॉस्टेलला असताना सिगारेट, तंबाखू, खैनी/छिट्टा/मटरेल, पान, गुटखा, गांजा (चिलिम व सिगारेट), कफ सिरप, इ. सगळे प्रकार नशेची चव घेण्यासाठी पाच-सहावेळा केलेले आहेत पण कुठल्याच गोष्टीचं व्यसन लागलं नाही. हे सगळे प्रकार शेवटच्या वर्षाला केले होते कारण माहीत होतं कि पुन्हा आयुष्यात ह्या गोष्टी कधीच करायला मिळणार नाहीत किंवा करणार देखील नव्हतो.

डिप्लोमानंतर आम्हाला इंजिनिअरींच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळाला. पहीले सेमिस्टर संपल्यानंतर सगळ्या डिप्लोमावाल्यांची मस्त गट्टी जमली होती. एका रुममध्ये २ जण, एक मुंबईचा (निर्व्यसनी) व दुसरा वर्धाचा (तंबाखू व सिगारेट). वर्ध्याचा मुंबईवाल्याच्या मागे लागलेला कि त्याने मिशी ऊडवावी पण तो ऐकत नव्हता. शेवटी कंटाळून म्हणाला कि मिशी काढतो पण तु सिगारेट सोड. त्याला वाटलं कि हा चेन स्मोकर काय सिगारेट सोडणार आपल्यासाठी. पण नाही, त्याने खिशात असलेल्या २ सिगारेट आमच्यासमोर तोडून फेकून दिल्या व रेजर हातात घेवून रुममेटची मिशी बिनपाण्याने उडवली. त्यादिवसापासून मुंबईवाल्याने ना मिशी वाढवली व वर्धावाल्याने ना सिगारेट ओढली...ते इंजिनिअरींग संपेपर्यंत व आज पर्यंत.

फारच मस्त किस्सा! ही ही ही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Jun 2016 - 12:52 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

आयुष्य एकदाच मिळतं(पुनर्जन्मावर विश्वास नाही) त्यामुळे हवी तेवढी चैन करावी,थोडसं तब्येतीकडे ध्यान देवून योग्य प्रमाणात व्यसन केलं तरी काय हरकत नसावी.

बोका-ए-आझम's picture

25 Jun 2016 - 1:02 pm | बोका-ए-आझम

की योग्य प्रमाण ही गोष्टच राहात नाही.

जी गोष्ट प्रमाणात रहात नाही त्यालाच व्यसन म्हणतात.

अभ्या..'s picture

25 Jun 2016 - 3:15 pm | अभ्या..

मोदका, ते प्रमाण पण जरा सापेक्षच नैका? कुणी ठरवायचं. मीन्स निकोटीन, अल्कोहोलीक बाबतीत डॉकटरलोक्स तर म्हण्तात करायचच कशाला? त्याउलट बरेच डॉक्टर्स अगदी रेग्युलरली ड्रिंक्स, स्मोकींग करताना आढळतात. काही म्हणतात ठोडेसे अल्कोहोल डायजेशनला हेल्पिंग. पण व्यक्ती न परिस्थितीसापेक्ष ही प्रमाणे पण बदलतात. तंबाखू खाणारे कित्येक ९०-१०० चे म्हातारे पाहण्यात आहेत. गुटख्याने मेलेले १८-१९ ची पोरे पण माहीतेत.
बादवे मला कॉलेजात स्मोकिंगची भयानक सवय लागलेली. परवडत नसताना अगदी १२-१५ व्हायच्या दिवसात. पण हे व्यसन जेमतेम महिनाभर टिकले. कशी त्या बाबतीत तिडीक बसली माहीत नाही. पण सुटली ती सुटलीच.
त्यानंतर तंबाखूची सवय लागली पण व्यसन म्हणून नाही. मधल्या अपघातानंतर अचानक दातांची खालची बाजू दुखायची. तंबाखू तेंव्हा वाढली. परत ती सुध्दा बंद झाली. नंतर पानाचे व्यसन लागले. हे काहीतरी करीत रहायचे व्यसन मात्र माझे मलाच घातक वाटते. असो. इथल्या उदाहरणाने अन सल्ल्याने मार्ग काढेनच.

मोदक's picture

27 Jun 2016 - 2:59 pm | मोदक

प्रमाण सापेक्ष नाहीच.

एकच प्रमाण म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी माझे मन / मेंदू तयार नाहीये (किंवा ती गोष्ट टाळायची आहे असे मेंदूला पटले आहे) पण शरीर ती गोष्ट करायला भाग पाडत आहे. ती गोष्ट म्हणजे व्यसन.

ओशो म्हणतात त्याप्रमाणे दारू पण वाईट नाही आणि जपमाळ पण वाईट नाही.. वाईट आहे ती आदत.

..आणि व्यक्तीसापेक्ष प्रमाणाबद्दल, तंबाखु खाणारे ९०/१०० चे म्हातारे बघण्यात असले तरी कदचित त्यांच्या पन्नाशीमध्ये अशाच कारणाने गेलेला त्यांचा एखादा मित्र असेलही आणि नसला तरीही परिस्थितीही व्यक्तीसापेक्ष बदलू शकते त्यामुळे निव्वळ आपल्या स्वतःसाठी आपल्या शरिराचे नुकसान करणारी कोणतीही गोष्ट किंवा आपला स्वत:वर ताबा राहणार नाही अशी कोणतीही गोष्ट असेल तर "ते आपल्यासाठी बनलेले नाही" इतक्या सोप्या शब्दात स्वत:चीच समजुत घालावी आणि लांब रहावे.

आत्ताच्या पानाच्या व्यसनाबद्दल एक जरूर सुचवेन.. त्यात तुला "किक" देणारी कोणती गोष्ट आहे याचा शोध लाव आणि नेमकी तीच गोष्ट पानातून हद्दपार करून टाक.
कलकता/साध्या पत्तीचा तिखटपणा आवडतो, चुन्याने तोंड शेकणारे गरम गरम फिलींग येते ते आवडते, पानातली सुपारी आवडते का आत्ता जे पान खातोस त्यातही किवाम्/किमाम वगैरे निकोटीनचे भाऊबंद असतात ते शोध, फक्त तेच खाऊ नको बाकीचे सगळे बिन्धास्त खा.
उलट मी तर सुचवेन की पान+वेलची+ज्येष्ठमध पावडर+गुंजपाला (हरा पत्ता) असे एखादे तुला आवडणारे मिश्रण तू स्वत: शोध आणि तसे पान खा. (शक्यतो चुना, कात, किवाम आणि सुपारी टाळून..)

अप्पा जोगळेकर's picture

28 Jun 2016 - 11:29 am | अप्पा जोगळेकर

कच प्रमाण म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी माझे मन / मेंदू तयार नाहीये (किंवा ती गोष्ट टाळायची आहे असे मेंदूला पटले आहे) पण शरीर ती गोष्ट करायला भाग पाडत आहे. ती गोष्ट म्हणजे व्यसन.
यात थोडे अ‍ॅड करुन असे म्हणेन की आपण व्यसन करत आहोत याची जाणीवच नसते. निव्वळ सवयीने करतो.
यामध्ये दारु, सिगरेट पासून खाद्य पदार्थ, दूरदर्शन, सेलफोन, फेसबुक, मिपा यापैकी सगळ्याच गोष्टींचा समावेश करता येईल.
उदाहरणार्थ - बैठे काम करणार्‍या बहुतांश लोकांना २ वेळा जेवण्याची गरजच नसते. यांपैकी अनेक जणांनी एक जेवण बंद केले तरी काही फरक पडणार नाही. किंबहुना शारीरक्रिया सुधारतील. पण निव्वळ सवय आहे किंवा प्रथा आहे म्हणून अकारण दोन वेळा जेवण आणि शिवाय दोन वेळा न्याहारी करुन ढेरी वाढवल्या जाते.

बाकी - व्यसनमुक्ती उपक्रम आवडला. शुभेच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jun 2016 - 12:09 pm | प्रकाश घाटपांडे

बैठे काम करणार्‍या बहुतांश लोकांना २ वेळा जेवण्याची गरजच नसते. यांपैकी अनेक जणांनी एक जेवण बंद केले तरी काही फरक पडणार नाही. किंबहुना शारीरक्रिया सुधारतील. पण निव्वळ सवय आहे किंवा प्रथा आहे म्हणून अकारण दोन वेळा जेवण आणि शिवाय दोन वेळा न्याहारी करुन ढेरी वाढवल्या जाते.

मला हे एका डॉक्टरानी सांगितले होते पण ते आयबीएस या त्रासा संदर्भात आहार कसा ठेवावा याबद्दल.

भोळा भाबडा's picture

26 Jun 2016 - 3:37 pm | भोळा भाबडा

तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

तंबाखू(वाळवलेली) आणि सिगरेट हे निर्जिव मादक पदार्थ असल्याने ते विळखा घालू शकत नाहीत,तस्मात प्रश्न चुकीचा आहे.

शाम भागवत's picture

26 Jun 2016 - 5:06 pm | शाम भागवत

गोंदवलेकर महाराज म्हणतात,"व्यसनाला घट्ट धरायचे व व्यसन सुटत नाही असे म्हणावयाचे, याला काय बरे अर्थ आहे? एखाद्याने खांबाला घट्ट मिठी मारायची व खांब मला सोडत नाही अशी तक्रार करायची यासारखेच आहे हे."

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2016 - 2:09 am | डॉ सुहास म्हात्रे

+१,००,०००

लाखाचा मुद्दा !!!

ना तंबाखू / सिगरेट घरी येऊन मला विकत घे म्हणून गळ घालतात, ना त्यांचे विक्रेते घरोघरी जाऊन त्यांचे फुकट वाटप करत फिरतात. (बहुदा, मित्रही काही रोज फुकट सिगरेट-तंबाखू घे म्हणुन गळ घालत नसतात.)

स्वतः दुकानावर जावून, पैसे देऊन एखादी गोष्ट विकत घ्यायची आणि "ती मला सोडतच नाही" असा कांगावा करायचा म्हणजे... स्वतः गटारात उडी मारायची आणि मग "गटाराने माझे अंग घाण केले" असे म्हणण्यासारखे आहे ?!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2016 - 2:16 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यामुळे...

"मला व्यसनाने ग्रासले/धरले/वेढले आहे" ही पळवाट सोडून "मीच व्यसन करत आहे आणि मीच ते सोडू शकतो" ही वस्तुस्थिती जाणून घेणे, ही व्यसन सोडण्याची पहिली पायरी आहे.

मेघना मन्दार's picture

26 Jun 2016 - 9:15 pm | मेघना मन्दार

जे लोक चांगले सल्ले देऊ शकत नाहीत त्यांनी किमान वाईट सल्ले तरी देऊ नका ओ !! व्यसनांमुळे एक अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिलेला आहे. तुम्हाला तुमच्या व्यसनावर मात करण्यासाठी शुभेच्छा !!

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 10:12 am | सुबोध खरे

तंबाखू आणि व्यसन या गोष्टीचे दोन भाग आहेत.
१) गैरसमज/ समर्थन --
तंबाखूने फायदा होतो किंवा नुकसान होत नाही. व्यसन थोड्या प्रमाणात केले तर चालते. हा झालेला किंवा स्वतःहून करून/ करवून घेतलेला गैरसमज आहे. जितके प्रचंड संशोधन तंबाखूच्या दुष्परिणामांवर झालेले आहे त्यातून एक गोष्ट नक्की सिद्ध झालेली आहे की तंबाखूचे दुष्परिणाम हे त्याच्या फायद्यापेक्षा किती तरी हजार पट जास्त आहेत.
९० वर्षाची १०० माणसे घेतलीत तर त्यातील ९५ माणसे तंबाखू न घेणारी असतात.
२० वर्षाची १०० तंबाखूचे सेवन करणारी माणसे घेतली तर त्यातील फार तर १-२ माणसे ८० पेक्षा जास्त जगतील.
आणि त्यांच्याच सारखी वय, वंश, वजन आणि आरोग्याने असणारी तंबाखू न घेणारी १०० माणसे पाहिलीत तर त्यातील २८-३० माणसे वयाच्या ८० नंतर जिवंत असतील.
हेच प्रमाण वयाच्या "साठी"ला १० आणि ६५ असे असेल म्हणजेच काय तर तंबाखूमुळे "अकाली मृत्यूचे" प्रमाण भयावह जास्त आहे. आणि यातील बहुसंख्य माणसे उत्पादक आणि उपयुक्त वयात रोगाला बळी पडतात.
तेंव्हा तंबाखूच्या व्यसनाचे समर्थन करणारे अत्यंत चुकीची गोष्ट करत असतात.मग तो काही डॉक्टरांचा दाखला असो किंवा तंबाखू सेवन करणारी अतिवृद्ध माणसे असोत

२) ज्यां व्यक्तींचा मनोनिग्रह कमी असतो अशा व्यक्ती तंबाखूच्या व्यसनाधीन होतात आणि ज्यांचा मनोनिग्रह उत्तमी असतो अशा व्यक्ती व्यसनाधीन होण्याचे प्रमाण कमी आहे आणि या व्यक्ती ठरवल्यास पटकन व्यसन सोडू शकतात.
दुर्दैवाने ज्यांचा मनोनिग्रह कमी असतो अशा व्यक्ती मनोविकारालाही जास्त प्रमाणात बळी पडतात. यामुळेच तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना नैराश्य किंवा उन्माद( स्किझो फ्रेनिया) असे विकार जास्त प्रमाणात आढळतात आणि अशा व्यक्तीना तंबाखू थांबवल्यावर नैराश्याचे झटके येण्याचे प्रमाण पण जास्त आहे.
याचा अर्थ असा आहे की ज्यांनी तंबाखूचे व्यसन सोडले आहे अशा व्यक्तींनी ज्यांना व्यसन सोडणे कठीण जाते अशा व्यक्तींना "हिणवू नये"
एखाद्या व्यक्तीचा मनोनिग्रह कमी असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष नाही तर ही मानसिक ठेवणं आहे हे गृहीत धरून आपण त्या व्यक्तीस हिणवण्याऐवजी आधार देणे आवश्यक आहे. म्हणूनच मी श्री मोदक यांच्या प्रयत्नाचे खुल्या मनाने कौतुक करावे असे म्हणेन.कारण त्यांचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.
हा मनोनिग्रह वाढवणे हे काम कोणी सद्गुरुंच्या पायाशी जाऊन करतात तर कोणी मनोविकार तज्ञांच्या साहाय्याने करतात तर कोणी ध्यान धारणा किंवा विपश्यना करून करतात. ज्याला जसे जमेल तसे आणि त्या उपायाने त्याने ते करावे. यामुळेच श्री गजानन महाराजांच्या पायाशी जाऊन (ते स्वतः चिलीम ओढत असतानाही) एखाद्याचे व्यसन सुटू शकते या विरोधाभास असला तरीही ते सत्य आहे.
क्रमशः

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 10:22 am | कैलासवासी सोन्याबापु

वैयक्तिक आभार मानतो डॉक्टर साहेब आपले, u have put it well as usual, मला व्यसन होते, ती माझी चूकच होती, ती मानायला मला लाज नाही, मी ती दुरुस्त केली आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो, माझ्या वैयक्तिक श्रद्धा जिथे होत्या (शेगाव निवासी समर्थ सत्गुरू श्री गजानन महाराज) तिथे मी ते व्यसन सोडले कारण मला तो मार्ग सुचला अन रुचला अन पटला, बाकी कोणास कुठलेही व्यसन सोडायचे असल्यास शुभेच्छा.

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 12:28 pm | सुबोध खरे

व्यसन सोडवायचे असेल तर --
काही लोकांचा अहं मोठा असतो अशा माणसाला जर कुणी आव्हान दिले की तुझ्याच्याने व्यसन सुटणारच नाही अशी व्यक्ती अहं जपण्यासाठी व्यसन सोडू शकते. परंतु ज्याचा मनोनिग्रह तेवढा नाही अशी व्यक्ती सुद्धा हे आव्हान घेते परंतु तिला ते झेपत नाही आणि त्यातून ती अधिकच नैराश्याच्या आहारी जाऊ शकते. तेंव्हा असा अहं दुखावणे याने उपायही होऊ शकतो तसा अपायसुद्धा होऊ शकतो.
ज्याला व्यसन सोडायचे आहे त्याने सर्वप्रथम स्वतः शी प्रामाणिक निश्चय करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला व्यसन नक्की का सोडायचे आहे याची वैचारिक बैठक पक्की असणे आवश्यक आहे. अन्यथा बायको म्हणते म्हणून, खर्च परवडत नाही अशी लंगडी कारणे असतील तर हा निश्चय फार काळ टिकत नाही. व्यसनाचे दुष्परिणाम बहुसंख्य तंबाखूच्या सेवकांना माहीत असतातच. परंत आपल्याला असे काही होणार नाही हा खोटा आशावादही असतो. तेंव्हा "त्या"साठी तंबाखू सोडायचा आहे हे कारण बऱ्याच लोकांना निश्चय करण्यासाठी अपुरे पडते. बऱ्याच लोकांना आपल्याला व्यसन आहे हेच मुळी मान्य नसते.
हॅ त्यात काय आहे असे क्षुद्रीकरण(trivialization) करू नये. आत्मपरीक्षण करावे आनि आपल्या विचारसरणी मध्ये काय विसंगत आहे ते प्रथम शोधावे.
उगाच कोणासमोर वल्गना मारणे आणि त्यात अपयश येणे हे फार माणसांबाबत होते.
वर बापूसाहेबांनी लिहिले आहे की व्यसन ही चूक होती आणि ती कबूल करायला मला लाज वाटत नव्हती. आपली चूक होते आहे हे मान्य करणे ही आपल्या प्रश्नाला सामोरे जाण्याची पाहिली पायरी आहे. त्यांचा मार्ग( अध्यात्माचा) प्रत्येकाला पटेल अथवा नाही. याचा अर्थ त्यांनी चोखाळलेला मार्ग तुम्ही घेतलाच पाहिजे असे नाही. तुम्हाला जो पटेल तो मार्ग स्वीकारावा हे उत्तम.
आपली पत्नी किंवा जवळचा मित्र यांना प्रथम विश्वासात घ्यावे आणि आपल्याला व्यसन सोडायचे आहे हे प्रामाणिक कथन करावे. उगाच चहा पिता पिता "गफ्फा" मारायच्या असतील उपयोग नाही. त्यांच्याशी तुम्हाला जो सर्वात चांगला उपाय वाटतो आहे तो गंभीरपणे चर्चा करून ठरवावा. आणि एकदा निर्णय घेतला की मग धर सोड पणा कामाचा नाही. व्यसनमुक्ती केंद्राचा आधार जरूर घ्यावा.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

27 Jun 2016 - 2:51 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मार्कस ,धनंजय माने कृपया वाद टाळावेत.व्यसन सोडण्यासाठी हा धागा मार्गदर्शक ठरु शकतो ,जर ईथले प्रतिसाद संतुलीत असतील तर, त्यामुळे प्लीजच

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 2:54 pm | धनंजय माने

व्यसन सोडण्याचा सोपा उपाय म्हणजे मनाचे ऐकू नये.

बाकी आम्ही खरड वही मध्ये चर्चा आधीच सुरु केलि आहे. धन्यवाद.

दिग्विजय भोसले's picture

27 Jun 2016 - 3:02 pm | दिग्विजय भोसले

छान चर्चा

जेपी's picture

27 Jun 2016 - 9:05 pm | जेपी

शतका निमीत्त सर्वांना एक -एक कप भांग देऊन सत्कार करण्यात येत आहे.

-बम भम भोले.!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 9:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

नेमके वरतीच डॉक्टरसाहेब काहीतरी जीव लावून सांगत होते राव, चार दोन वेळा पब्लिक हसलं म्हणून उठसुठ कुठल्याही धाग्यावर अस्थानी व्यंग बरे दिसत नाही जेपी भाऊ, किमान धागा विषय तरी पहा राव!

लहानतोंडी मोठा घास माफी, पण जे वाटले ते लिहिले स्पष्ट :)

जेपी's picture

27 Jun 2016 - 9:28 pm | जेपी

ओके.
नो प्राब्लेमो..

चौकटराजा's picture

27 Jun 2016 - 9:36 pm | चौकटराजा

खरे साहेबानी एक वाक्य लाख मोलाचं टाकलं आहे ते मनोनिग्रहा विषयी आहे. खरे तर मन हाच माणसाचा मोठा शत्रू व मित्र आहे. व्यसन लागणे हा प्रथम मानसिक आजार असून नंतर तो शारिरीक परिणाम दाखवू लागतो. खूप खादाडीची सवय असणे हे हे एक व्यसन आहे. उन्हाळात रोज आमरस हाणणे हे ही व्यसनच. मला अलिकडे दुपारीही अर्धा कप चहा प्यायचे व्यसन लागू पहात आहे. ते मला थांबवले पाहिजे असे जो पर्यंत निग्रहाने मला वाटत नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही.लहानपणापासून मी चहा कॉफी काही घेत नव्हतो पण आता सकाळी आपोपाप एक कप कॉफी तयार करून प्राशन करतो. आता हे दुपारच्या चहाचे प्रकरण. हे असे वाढत जाते. मधुमेह असल्याने भुकेचे "व्यसन" मी बर्यापैकी ताब्यात ठेवून आहे. कोणतीही गोष्ट असो एखाद्या स्त्रीचा चेहरा, गीत, निसर्गातील एखादी जागा, पेय, खाद्यपदार्थ याचा जितका पुनरपि पुनः
सहवास आपल्याला घडतो तितके व्यसन तीव्र होत जाते. अतिपरिचयात अवज्ञा ह्या उक्तीची व्याप्ती फार कमी आहे आपल्या जीवनात.

नाखु's picture

28 Jun 2016 - 9:06 am | नाखु

काकाश्री माझा एक व्यसनासंबधी शंका प्रशन आहे उत्तर तुम्ही किंवा तज्ञ व्यक्तीनी द्यावे.

माझे एक सुहृद आहेत त्यांना भेटल्यावर अगदी चार पाच जणांशी वार्तालाप करीत असतील तरी (आपलाच) भ्रमणध्वनी अद्ययावत अवस्था बघण्याची सवय आहे. (अभावितपणे कधी बघतात ते त्यांचे त्यांनाही कळत नाही) याला सवय म्हणावी की व्यसन. व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी काय करावे.
ता.क.ते (सध्या) अविवाहीत असल्याने बायकोने भ्रमणध्वनी फेकुन देण्याची शक्यता आपसूक टळली आहे.

सल्ला द्यावा
आपलाच नम्र बालक नाखु

व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी काय करावे.

लै सोपे आहे.. तुमचे अविवाहित सुहृद म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने लै लहान आहेत. पुढच्या वेळी सरळ मोबाईल काढून घ्या आणि तुमच्या खिशात ठेवा आणि कट्टा संपला की परत जाताना हातात ठेवा.

..बाकी चौरा काकाच असे करत असतील तर त्यांना फोटोशॉप, ओपी, त्यांच्या घरातले इंटेरियर किंवा बाग अशा एखाद्या विषयावर छेडा. ते रंगात येवून बोलायला लागतील आणि मोबाईलचा विसर पडेल. :)

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 2:15 pm | धनंजय माने

वयाने लहान असले तरी आकाराने दांडगे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....

चौकटराजा's picture

29 Jun 2016 - 9:40 pm | चौकटराजा

आमचा एका मित्राला भाजे लेण्याचे व्यसन लागले आहे. ते नसेल तर कार्ला चालेल. तेही नसेल तर बेडसे चालेल. पण वेरूळची ( पहिल्या धारेची ) या चालीवर एक फिक्स मिळाली तर सोनेपे सुहागा ! काय करणार आता म्हने कंपनीला पटवत्यात की मराठवाड्यात एक युनिट काढा म्हूनशान !

शाम भागवत's picture

30 Jun 2016 - 9:57 am | शाम भागवत

काही जणांना मिपाचे व्यसन लागले आहे म्हणे. अपडेट पाहिले नाही तर बेचैनी येते. दर अर्ध्यातासाने मिपाची ही तल्लफ येते. मुख्य म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात यावर उपचारही नाहीयेत. हम्म.
:))

संदीप डांगे's picture

29 Jun 2016 - 2:41 am | संदीप डांगे

१. चार आण्याचं काळीज असल्यास...
२. क्षक्ष असो वा जपमाळ, आदत बुरी....
३. खांब मला सोडतच नाही....

हे तीन विशेष आवडले.

अनुभवामृतः रोज ४० सिगरेट्स प्यायचो, एका झटक्यात सोडले धुम्रपान. व्हिस्कीचा अक्खा खंबा रिचवायचो. लक्षात येताच मद्यपान सोडले.

आता: कधी-मधी सहा महिन्यातून एखादेवेळेस ३०+६० वोडका आणि कधीतरी एखादी 'गरम'. ह्यापेक्षा जास्त झाल्यास 'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jun 2016 - 4:45 am | कैलासवासी सोन्याबापु

'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे.

ज्जे ब्बात!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2016 - 6:19 am | डॉ सुहास म्हात्रे

'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे.

जेव्हा तुम्ही सिगरेट/तंबाखू/दारू ची मजा घेणे बंद होते आणि सिगरेट/तंबाखू/दारू (आणि इतर लोक) तुमची मजा घेऊ लागतात तेव्हा बाजू पलटली हे नक्की होते.

संदीप डांगे's picture

30 Jun 2016 - 1:18 am | संदीप डांगे

शंभर टक्के!!!

मराठी कथालेखक's picture

29 Jun 2016 - 2:47 pm | मराठी कथालेखक

मला पुर्वी सिगरेटचे व्यसन होते. व्यक्तिगत आयुष्यातली काही निराशा, काही ताणतणाव यामुळे सिगरेटची सवय लागली. दिवसाला पाच-सहा तरी व्हायच्याच. पुढे ३-४ वर्षांनी अ‍ॅसिडिटीचा त्रास बळावला. अ‍ॅसिडिटी सहन होईना तसे एका होमिओपथी डॉक्टरकडे उपचार सुरु केले (ही माझी मैत्रीणच होती) तिने सिगरेट कमी करायचा सल्ला दिला. तशातच माझ्या जाम आवडीच्या उद्योगाला लागलो (म्हणजे पार्ट टाईम शिक्षण.. ), पुढे व्यक्तिगत आयुष्यातही स्थिरावलो, बिनकामाची भावूकता मागे पडली.
हे होवूनही पाच वर्ष झाले. पण तरी अजूनही कधीतरी जाम तल्लफ येते मग मी 'गुडाम गरम' हीच सिगरेट ओढतो ते ही क्वचित. म्हणजे अनेकदा महिनो महिने ओढत नाही. मग मध्येच कधी ओढावी वाटली तरी दिवसाला एक इतकेच प्रमाण. गुडाम गरम मध्ये निकोटीन अत्यंत कमी असते शिवाय सवय जडत नाही.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

29 Jun 2016 - 6:12 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गुडाम गरम मध्ये निकोटीन अत्यंत कमी असते शिवाय सवय जडत
नाही.>>>>>> हा शोध आपल्याला कुठे लागला ते सांगाल का,गुडाम गरम ,क्लासिक माईल्ड्स या जरी हाय एंड सिगरेट असल्या तरी त्यातून तितकेच निकोटीन जाते जितके ,चारमिनार सारख्या फिल्टर नसलेल्या सिगरेटीने

मराठी कथालेखक's picture

30 Jun 2016 - 2:54 pm | मराठी कथालेखक

हा शोध आपल्याला कुठे लागला ते सांगाल का

टपरीवर ..पुर्वी गोल्ड फ्लेक ओढायचो, आता (क्वचित कधी) गुडाम गरम ओढतो. गुडाम गरम मध्ये ओव्याची चव जास्त जाणवते, तंबाखूची चव फारशी जाणवत नाही
बाकी पुरावे, आकडेवारी शोधली नाही.

सचु कुळकर्णी's picture

30 Jun 2016 - 5:01 pm | सचु कुळकर्णी

ओवा कि लवंग ?
जो मित्र हि सिगरेट ओढतो तो म्हणतो कि ह्यात लवंग असते म्हणुन.