दिवा तेवतसे अंधारात... (देवद्वार छंद) [माझं इथलं पहिलंच पोस्ट :) ]

आचरट कार्टा's picture
आचरट कार्टा in जे न देखे रवी...
24 Jan 2009 - 6:18 pm

नमस्कार मंडळी.
मी कालच पहिल्यांदा या कट्ट्यावरची मिसळ खाल्ली, आणि प्रेमातच पडलो राव!
अजुन सगळ्या सिस्टिमची नीट ओळख व्ह्यायची आहे, जमेल हळूहळू...

छंदबद्ध रचना करायचीही आवड आहे, म्हटलं तुम्हा जाणकार लोकांच्या नजरेखालून जाऊदेत. [:)]

अंधार आजचा
राहतो गर्भार
उघडते दार
पहाटेचे ||१||

अंधाराची वाट
अशी उजळते
आणिक गळते
भीती चिंता ||२||

क्षणात फुलतो
मनात प्राजक्त
मन हे आसक्त
जगण्याला ||३||

एका आशेपोटी
होती चमत्कार
शरण हे जग
श्रद्धावंता ||४||

आत्मविश्वासाचा
उदय होतसे
दिवा तेवतसे
अंधारात ||५||

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

24 Jan 2009 - 6:39 pm | बहुगुणी

मी 'जाणकार' नाही, पण आवडली. फक्त एकच छोटासा बदल केला असता:
अंधाराची वाट
अशी उजळते
आणिक ळते
भीती चिंता ||२||

आचरट कार्टा's picture

24 Jan 2009 - 8:12 pm | आचरट कार्टा

सूचनेबद्दल मनःपूर्वक आभार.
पण मला वाटतं पळणं थोडं Active आहे. गळणं Passive. मला तसं गळणं अपेक्षित आहे. आत्मविश्वास आला म्हणजे ते आपोआप होतं. पळण थोडं प्रयत्नपूर्वक वाटतं, असं माझं मत. :)
चूक भूल देणे घेणे...

संदीप चित्रे's picture

24 Jan 2009 - 11:47 pm | संदीप चित्रे

>> राहतो गर्भार
>> उघडते दार

हे तर खूपच आवडले :)