संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
आत लाव्हा घुसळतो
वरुन सारे ठीक ना !
फावले त्यांचे कसे ?
भेकडांचे पीक ना !
काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !
भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !
कान का किटले असे ?
तेच ते बौद्धीक ना !
रांग नाही दर्शना,
हरपला लौकीक ना !
जिंकल्या दैवासही
दाद द्याया शीक ना !
जीवना माझ्यापरी,
हो जरा "सोशीक" ना !
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
22 Jan 2009 - 12:25 pm | झेल्या
वेदनांचे अप्रतिम शब्दांकन..!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
22 Jan 2009 - 12:29 pm | अनिल हटेला
सुंदर !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Jan 2009 - 5:00 am | बेसनलाडू
बाकी ठिकाणी आणखी स्पष्टता हवी,असे वाटते; मगच कल्पना पोचतील. छोट्या बहरात गझल लिहिताना सुस्पष्टता ही मुख्य खोच ओळखायला नि सांभाळायला हवी असे वाटते.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
23 Jan 2009 - 8:24 am | संदीप चित्रे
प्रयत्न आवडला पण....
23 Jan 2009 - 10:36 pm | बाकरवडी
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
24 Jan 2009 - 12:11 am | प्राजु
इतकी छोटी गझल..! एकदम आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jan 2009 - 1:40 am | मदनबाण
भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !
सॉलिड...
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.