ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली व माझा ग्लास भरुन दिला....
क्रमशः
मागील भाग :
पुढे चालू :
मी तिला विचारलं हा पुजा प्रकार रोजच चालतो का ? ति मानेनच हो म्हणाली.. व माझा अर्धा भरलेला ग्लास तीने परत फुल केला. ती काही उत्तर देणार नाही हे लक्ष्यात आले होते... पण मनाची उलाघाल काही कमी झाली नाही मी तर तीला विचारलं..." बार मध्ये अशी पुजा ? जरा विचित्र नाही वाटत> ?" ह्या वेळी ती माझ्या कडे बघून हसली व म्हणाली " पहली बार ही आए हो क्या ? पुजा तो हर बार में होती होगी, यह भी तो धंदा है... धंदा चालु करणे के पहलें जरा भगवान को याद किया तो क्या हुवा ?" मी ह्म्म्म म्हणालो व पुन्हा एक प्रश्न विचारला " पण हे देवाला चालतं का ? नाही ज्या हातानी तुम्ही दारु पाजता त्याच हाताने देवाला.. पुजा घालता ? " ती ने जर विचित्र नजरेनेच पाहीले व तीला माझ्या प्रश्नातील खोच समजली असावी... ती म्हणाली " उसी ने नसीब में लिखा है, जो लडका है ना... पुजा कर रहा था.. विनोद.. बहुत अच्छा गाता है... आपने अभी सुना ना.. पर कोई उसे फिल्म में गाने का मोका नही देगा.. पता है क्युं ... उस के नसीब में बार में ही गाना लिखा है | " मी मानडोलावली व पुन्हा विचारलं " तुम यहा क्या काम करते हो ? " ती उत्तरली व म्हणाली " सर्विस." तोच एक जवळ-जवळ ८० वर्षाचा म्हातारा आपल्या हातातील छडी टेकत माझ्या समोरच्या टेबलावर येऊन बसला व ती मला नजरेनेच बघ म्हणाली व त्याच्या जवळ गेली... त्याने काही ऑर्डर दिली.. ती त्याचा पॅग घेऊन आली... त्या म्हाताराच्या खांद्यावर हात ठेऊन ती तेथेच उभी राहीली... म्हातारा तीचा हात हातात घेऊन आपला पॅग पित बसला.. पाच मिनिटामध्येच तो आपले बिल व टिप देऊन लगालगा बाहेर निघून गेला... बिल तीने कॅशियर पाशी जमा केलं व जी आंन्टी होती तीच्या हातात टिप दिली.. आंन्टीने ती १००-१५० ची टिप कॅशियर कडुन सुट्टे करुन घेतले (दहा दहाच्या नोटा) व सर्व लेडीज मध्ये बरोबर वाटले.. व शेवटचे दहा रुपये... साईला वाहिले !
ती परत माझ्या टेबला जवळ आली व म्हणाली "देखा ! यह है पहली कमाई दिन की" मी तिला विचारलं " अजब आहे सगळं, पण तुला हे आवडतं करायला" ती म्हणाली " ह्म्म हो, कारण शॉर्ट मध्ये जास्त पैसा मिळतो, देखो ना अभी ५.३० हुवा है... ११.०० बजे तक फुल धंदा होता है... पगार छोड के पाच-सातसों हात में एक्ट्रा मिलता है... बदले में क्या सिर्फ दारु तो पिलानी है |" मी धन्य आहेस ह्या नजरेने तीला बघत पुन्हा आपला ग्लास उचलला... तीचा फोन आला म्हणून ती बाहेर निघून गेली.. !
मी बील मागवले व टिप ठेऊन बाहेर पडलो... डोक्यातून बारचा विचार जातच नव्हता..असे नाही की कधी बार मधे गेलो नाही पण हा अनुभव नवीन होता..... खुदा की कायनात के हजार रंग... ! त्या बार मध्येच कानावर पडलेले गाणे गुणगुणत मी पुन्हा निताच्या ऑफिस मध्ये आलो... साडेसात वाजलेच होते... थोड्या वेळात गाडी पण आलीच व मी आपल्या सिट वर जाऊन बसलो... !
सकाळी सहाच्या आसपास कोल्हापुरला गाडि पोहचली तेव्हा जाग आली आपली बॅग उचलत मी बाहेर येण्यासाठी निघालो तोच एक आंन्टी किंचाळली... मी दचकुन मागे बघितले तर ती आंन्टी माझ्याकडेच बघून दात खात होती.. मी चुकुन तीच्या पन्नास किलोच्या पायावर माझा छोटासा पाय दिला होता.. मी स्वारी स्वारी म्हणत कसा कसा जिव वाचवून गाडीतून खाली आलो व सरळ सैयाद्री वर जाउन रुम बुक करन्यासाठी वळलो तोच एक पोलिस वाला माझ्याकडे आला व म्हणाला" साहेब, बोलवत आहेत.." व समोर उभ्या असलेल्या पोलिस गाडी कडे बोट दाखवलं ! च्यामयला सकाळ सकाळी काय लचांड असा विचार करत साहेबापाशी पोहचलो तो म्हणाला " बॅग में क्या है ? " शक्यतो माझा अवतार बघून त्याला वेगळीच शंका आली असावी... मी म्हणालो " साहेब मी इथलाच आहे मराठी येतं, बाकी बॅगेत काहीच नाही कपडे आहेत्...बघनार असाल तर उघडतो" असे म्हणत मी आपल्या जॉकेटचे बाहे वर केले व बॅग उघडली... तो म्हणाला " राहु दे राहु दे, उत्तर भारतीय दिसताय ? " मी नवल वाटल्याचे चेह-यावर दाखवत म्हणालो " हो, दिल्लीचा तुम्हाला कसं कळालं" तो जरा गर्वातच म्हणाला " तु जो हातात लाल दोरा बांधला आहेस त्या त्यावरुन... मी पण बांधला आहे बघ.. हरिद्वारला गेलो होतो तेव्हा" मी हसलो व ठीक ठिक म्हणालो व त्यांना जाण्याची परवानगी मागितली " साहेब जाऊ का ? रुम वर जाउन आंघोळ करायची आहे व महालक्ष्मीला पण जाणे आहे" तो मानेनेच ठिक म्हणाला व मी आपली बँग सांभाळत हॉटेल मध्ये पोहचलो !
*******
दुस-या दिवशी घरी पोहचलो व झोपलं ( काय काय केलं १५ दिवस हे लिहणे योग्य वाटत नाही... उगाच क्रमशः का वाढवा :? हा उच्च विचार करुन मी सरळ जानेवारीच्या १७ तारखेवर येतो.
*******
१७ला धडपडत मी पुण्यात पोहचलो.. धडपड ह्यासाठी की मी चुकुन कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये बसलो होतो :) दुपारी आमच्या परम मित्र निलकांतला फोन करुन नेहमी प्रमाणे विसरलेला त्याचा पत्ता घेतला व त्याच्या घराकडे कुच केली. व्यवस्थीत डब्बल रिक्षा भाडे देऊन मी त्याच्या घरी पोहचलो पण निलकांत घरी पोहचलाच नव्हता त्यामुळे टाईम पास साठी त्याचा लॅपटॉप उघडून बसलो दहा मिनिटात येतोच असे सांगणारा मित्र बरोबर अडीच तासाने पोहचला :) त्यानंतर आम्ही एका गुप्त मिटींग साठी एका गुप्त जागी गेलो ( गुप्त ह्यासाठी की मला नाव आठवत नाही आहे आता :( )
पुर्ण मिटिंग संपु पर्यंत फायर ब्रीगेडला बोलवावे लागेल एवढा धुर आम्ही सोडला, तेव्हा बाकी समाजमनाची काळजी घेत आम्ही बाहेर आलो ( आम्ही म्हणजे बाकीचांनी नावे गुप्त ठेवावी की नाही ह्याची कल्पना दिली नाही आहे त्यामुळे मी धम्याचं, आद्याचं व इनो'बाचे नाव घेत नाही आहे) मी व निलकांत मंडळी बाहेर आलो तो छोटे खानी कट्टा संपवला. फोटो प्रयोजन झाले नाही समक्ष्व.
दुस-या दिवशी सकाळी निलकांत द्वारे देवाचा (प्रभु) नंबर भेटला व फालतु काही न बोलता ठाणेला येणे एवढाच आदेश देऊन देव गायब झाले ;) दोन तासात सांगा ही गुप्त सुचना आमच्या कानावर आलीच होती, निलकांतला तयार करुन ( बिझी असतो बेचारा, नेहमी काही ना काही तरीच काम करत असतो) येतो म्हणुन आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jan 2009 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
>>( गुप्त ह्यासाठी की मला नाव आठवत नाही आहे आता )
== ते गुप्त ठिकाण 'रॉयल पाल्म्स' तर न्हवते ना ? ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
22 Jan 2009 - 8:42 pm | धमाल मुलगा
प्यारेडाईज नहीं गये हों क्या?
कैसि बातां करतां तुमी? क्या रे, प्यारेडाईज के 'एक डब्बल चाय, एक बनमस्का, एक शिग्रेटा' जानी दोस्तोंकु साथ लेके बैठ के गप्पा मारते मारते खानेका+पिने+ओढने का नशा 'रॉयल पाल्म्स' से कम होतां क्या?????
राजे,
आपण धन्य आहात, आपल्याला भेटलेलो आम्ही धन्य आहोत...तो मुंबईचा बार धन्य आहे, तिथे काम करणारे धन्य आहेत...आणि सगळॅच धन्य आहेत.
*सांगायचं की नाही हे माहिती नाही असं म्हणुन नावं घेऊन ह्यांची नावं सांगत नाही बरं का! असं म्हणायची ही कल्पना भारी आहे की :)
22 Jan 2009 - 10:38 pm | संदीप चित्रे
म्हणजे गरवारे कॉलेजच्या बाहेरचं का रे?
आमचा कट्टा होता तो कॉलेजमधला :)
23 Jan 2009 - 11:44 am | धमाल मुलगा
बरोब्बर संदीपदादा :)
पॅरेडाईज कॅफे म्हणजे तेच ते..ऐतिहासिक ठिकाण जिथे वर्षांनुवर्षे गरवारेची गँग पडीक असते....
पुरुषोत्तम/फिरोदियासाठी करायच्या एकांकिकांच्या चर्चेपासुन ते लेखनापर्यंत आणि पुढे लाईट्स-साऊंड्पासून दिग्दर्शनापर्यंत....
एखाद्या टेबलावर बुध्दीबळाचा पट मांडून खेळणारे दोघं आणि आजुबाजुला पाच पन्नास धुराडी अव्याहत धूर सोडून वातावरण गहन करत बसलेले असं दृश्य दिसणारं ते हेच पॅरेडाईज :)
23 Jan 2009 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
>>क्या रे, प्यारेडाईज के 'एक डब्बल चाय, एक बनमस्का, एक शिग्रेटा' जानी दोस्तोंकु साथ लेके बैठ के गप्पा मारते मारते खानेका+पिने+ओढने का नशा 'रॉयल पाल्म्स' से कम होतां क्या?????
= = थोडक्यात 'भागवले' म्हणा की मग ;)
चला आता पुणेरी लोकांचा कंजुषपणा ह्यावर लेख लिहायला एक अजुन लेखक तय्यार झाला !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
23 Jan 2009 - 11:54 am | धमाल मुलगा
ती फक्त काकडाअरती होती.
महापुजा नंतर साडेनवाच्या पुढे बांधली ;)
23 Jan 2009 - 11:55 am | दशानन
=))
द्रव्यरसाने उदरामध्ये अभिषेक घातला गेला !
23 Jan 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार
>>महापुजा नंतर साडेनवाच्या पुढे बांधली
== आम्हाला फोने केला असता तर बोटांना महारोग झाला असता का मेल्या ?
>>द्रव्यरसाने उदरामध्ये अभिषेक घातला गेला !
=- का द्राक्षरसाने ?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
22 Jan 2009 - 3:02 pm | अवलिया
छान आहे रे... पटकन पुढचा भाग येवु दे
कारण शॉर्ट मध्ये जास्त पैसा मिळतो - रफार नीट दिल्याबद्दल धन्यवाद.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 3:20 pm | दशानन
लिहतो आहे यार... !
भांडणातून वेळ मिळत नाही आहे.. :)
22 Jan 2009 - 3:24 pm | अवलिया
च्यायला... माझ्याशी नाही भांडत कधी असा...
कट चा अन शिग्रेट माझ्याच पैशाने पितो अन भांडत पण नाही...
छे दोस्त नको असा कुणालाही...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 3:21 pm | मैत्र
नाना प्रभू सर मोड(mode) मध्ये :)
22 Jan 2009 - 3:32 pm | सुनील
कारण शॉर्ट मध्ये जास्त पैसा मिळतो
=)) =)) =))
मस्त. लवकर येऊ दे गुप्त ठाणे कट्ट्याच्या वृत्तांत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 3:35 pm | अवलिया
ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली
म्हणजे नक्की कुठे?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 3:45 pm | दशानन
डाव्या साईडला !
22 Jan 2009 - 3:47 pm | सुनील
वामांगी रखुमाई!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 3:50 pm | अवलिया
डावीच का?
प्रभुजींचा सल्ला का? डावी चांगली असे म्हणत होते मागे.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 5:51 pm | विनायक प्रभू
जागा?
22 Jan 2009 - 6:46 pm | लिखाळ
अरे वा .. छानच..
तुमच्या गुप बैठकीला कोणकोण होते ते समजलेच नाही ;)
पुढच्या भागाच्या आणि बाहुबली हॉस्टेलच्या प्रतिक्षेत...
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
22 Jan 2009 - 6:59 pm | शितल
दिल्ली हुन आता फक्त मुंबई, कोल्हापुर - पुणे एवढाच प्रवास झाला आहे, अजुन परत दिल्ली गाठायची आहे.
लवकर लवकर लिहा. :)
22 Jan 2009 - 8:16 pm | दशानन
असं नाही करायचं हं !
तु ठाणे विसरलीस की ;)
काही तास आम्ही काय बस मध्ये टिपी नाही केली काय... मी ठाणेला गेलो होतो.... कुठली तरी.... लु....वाडी होती.
22 Jan 2009 - 8:17 pm | सुनील
आयला लुइसवाडी? कुठलं हाटेल रे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 8:19 pm | विनायक प्रभू
अवो हाटेलात नाय, माझ्या घरी. तुमचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. व्यंनि. करा.
22 Jan 2009 - 8:21 pm | छोटा डॉन
ठाण्यात लुईसवाडी ???
हरे राम, काय दिवस आले आहेत ...!
कलीयुग कलीयुग म्हणतात ते हेच बहुतेक ...!
आता फक्त सदाशिव पेठेत "मोनिका ल्युवेन्स्की चौक/गल्ली/आळी" पहायचे बाकी राहिले आहे.
असो.
------
छोटा डॉन
22 Jan 2009 - 8:26 pm | दशानन
ए डान्या भाउ !
आजचा डाव माफ कर यार.. लई हसलो आहे.. पोट दुखत आहे माझं
=))
23 Jan 2009 - 12:09 am | पिवळा डांबिस
ठाण्यात लुईसवाडी ???
हरे राम, काय दिवस आले आहेत ...!
का? आमच्या ठाण्यात काय फक्त वर्तकनगर आणि नौपाडाच असावेत काय? लुईसवाडी असू नये?:)
-यल्लो फर्नांडिस
बाकी प्रवासवर्णन चांगले चालले आहे! रमेश मंत्र्यांनी पुलंचे कपडे घालून मीना प्रभूंचा चश्मा चढवल्यागत वाटते आहे!!!:)
पुलेशु!
अवांतरः हे 'जैनाचं कार्टं' हे पूर्वीचंच जैनाचं कार्टं आहे काय? असेल तर वेलकम ब्याक!!! नसेल तर 'उगीच कशाला रे उंटाच्या बुडख्याचा मुका घेतोय?'!!!!:)
22 Jan 2009 - 8:24 pm | विनायक प्रभू
टा-र्या चा फोन नीट चालत नव्हता. मी लुईसवाडी म्हणत होतो. त्याला च्यामारी रुईस वाडी ऐकु येत होते. शेवटी एल. फॉर लंडन म्हणुन सांगावे लागले. जोराने हसला तो डोंगर. लंडन पण अर्धवट ऍकले की काय?
22 Jan 2009 - 8:28 pm | दशानन
=))
त्या विषयावर अजुन पण हसतो आहे मी !!!!!
23 Jan 2009 - 12:12 am | पिवळा डांबिस
जोराने हसला तो डोंगर.
अहो तो खुद्कन हसला असता तर तुम्हाला फोनवर कसं ऐकू आलं असतं? नाही म्हणजे त्याला खुद्कन हसताही येतं अशी अफवा आहे हो!!
:)
22 Jan 2009 - 8:31 pm | विनायक प्रभू
तसे नाही. त्याला न शब्द येत नाही. तो न चा ण काढतो
22 Jan 2009 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगोदर वाटलं ते होष्टेलचे भाग पुन्हा नव्याने टाकले की काय :)
पण त्या लेखनामधे बार, वगैरे, इत्यादी, असे काही नव्हते.
पहिला आणि हा भाग वाचला तेव्हा स्टोरी थोडी-थोडी कळली.
बहूतेक, छोटेखानी कट्ट्याच्या वेळेस आपले फोना-फोनीचा कार्यक्रम झाला वाटतं
येऊ दे पुढील भाग लवकर !!!
22 Jan 2009 - 9:08 pm | अनामिक
पुर्ण मिटिंग संपु पर्यंत फायर ब्रीगेडला बोलवावे लागेल एवढा धुर आम्ही सोडला, तेव्हा बाकी समाजमनाची काळजी घेत आम्ही बाहेर आलो
बाकी तुम्ही धुर सोडत असतानाही समाजाचीच काळजी घेत होता... त्यांना धुर सोडायला न देता त्यांचा वाटचा धुर स्वतः सोडणे हे पण एक पुण्यकर्म आहे!
लेख मस्तं जमलाय... आता दिल्ली पर्यंत किती भागात जाताय काय माहीत... पुढचा भाग लवकर येऊ द्या.
अनामिक
22 Jan 2009 - 11:44 pm | प्राजु
हे थोडक्यात एका कट्ट्याचे वर्णन आहे तर!.. मग नमनाला घडाभर दारू म्हणून त्या बारमधले प्रसंग लिहिले.
मस्तच.
त्यानंतर तुम्ही ठाण्याला पोचलात आणि मग तात्या, रामदास, प्रभू देवा यांच्यासोबत काय केलंत ते कधी सांगणार?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jan 2009 - 7:45 am | रामदास
आणि तुम्ही पळून जायचं असं न होता यावेळी तुम्ही मास्तरांकडे चालत गेलात हे नविनच.अर्थात मास्तर बदलला.
ता.क. हा मास्तर पण मारतो बरं का.फक्त आवाज येत नाही.
23 Jan 2009 - 11:46 am | धमाल मुलगा
>>ता.क. हा मास्तर पण मारतो बरं का.फक्त आवाज येत नाही.
=))
=))
=))
सुटलेत सगळे!!!!!
सह्ही! बर्याच दिवसांनी जुनं मिपा परत सापडल्यासारखं वाटलं :)
असेच हसत खेळत राहुयात रे सगळे!!!!
23 Jan 2009 - 9:36 am | विसोबा खेचर
व काही तासातच ठाण्याला पोहचलो.
पुढची ष्टोरी येऊ द्या! :)