मनाच्या कुपीतले या सदरातला हा चवथा लेख .........
क्षण
कोणी एक नवा जीव जेंव्हा भूतलावर अवतरतो. तो क्षण त्याचा.........
बऱ्याच प्रयत्नानंतर जेंव्हा एक कोवळा जीव टाहो फोडतो. तो क्षण त्याचा. ..................
8-9 महिन्यानंतर चिमुकल्याचे चालणे, ते पहिले पाऊल पडण्याचा क्षण त्याचा. .............
3 ऱ्या वर्षी जेंव्हा ते बाळ शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतं. तो क्षण त्याचा. .............
तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा.............
जेंव्हा एखादा मुलगा पहिले बक्षीस घ्यायला दुडूदुडू धावत जातो. तो क्षण त्याचा.... ...........
मैदानावर जेंव्हा पहिल्यांदा तो पडतो ...... तो खरचटण्याचा क्षण त्याचा..........
जेंव्हा त्याला मिसरूड फूटून तो कॉलेजात पहिले पाऊल टाकतो... तो क्षण त्याचा ..............
तो पहिल्यांदा कार्यालयाची पायरी चढतो........ तो क्षण त्याचा. ..............
दोघातून जेंव्हा तिसरा जीव निर्माण होतो .......... तो क्षण त्याचा. ..........
जेंव्हा पहिले प्रमोशन मिळते........... तो क्षण त्याचा..........
जेंव्हा मुलगा आपल्या यशाने डोळे दीपवती ......... तो क्षण त्याचा...........
नोकरीतून रिकामे होताना शेवटची पायरी उतरलेला क्षण ...... तो क्षण त्याचाच. ..........
जेंव्हा मुलगा स्वत: फॉरेन ट्रीपसाठी सोडायला एअरपोर्टवर येतो ....... तो क्षण त्याचा........
एखादा पट्टीचा वक्ता जेंव्हा पहिलीत वर्गासमोर गोष्ट सांगायला तोंड उघडतो ......... तो क्षण त्याचा......
एखाद्या कवीला जेंव्हा पहिला शब्द सुचतो ........ तो क्षण त्याचा. .........
एखाद्या लेखकाच्या डोक्यात जेंव्हा वीज चमकावी तशी कल्पना येते .......... तो क्षण त्याचा.........
कलाकार स्टेजवर असताना अचानक एक उत्तम वाक्य तोंडातून निसटते ...... तो क्षण त्याचा .........
समाधी लावणारा एखादा स्वर जेंव्हा कंठातून फूटतो ......... तो क्षण त्याचाच..........
एका आंतरराष्टीय करारावर जेंव्हा अशी सही होते .तो क्षण त्याचा ............
एखादा सामना, एखादे युध्द जेंव्हा विजयाने समाप्त होते
त्या शेवटच्या ललकारिचा तो क्षण त्याचा..........
आणि हो ...........
जेंव्हा आपण अखिल जगाला बाय बाय म्हणतो तो क्षण त्याचा.....
तुम्ही माना अगर मानू नका .तो कोण हे व्यक्तीनुसार बदलेलही पण हे क्षण त्याचेच .............
विनायक पाचलग
vinayakpachalag@in.com
vinayakpachalag.blogspot.com
www.marathilegends.tk
अवांतर- हे अश प्रकारचे लिखाण करायची कल्पना मला शिरिश कणेकर यांचा एक लेख वाचुन सुचली त्या लेखाचा दुवा मिळाला की टाकतो.
बाकी प्रजासताक दीनाच्या आपल्या सर्वाना मनापासुन शुभेच्छा निदान यावर्शीदेखील फक्त झेंडा फडकवण्यापुरता हा दीन राहणार नाही हीच माफक अपेक्षा
बाकी या दीनाच्या निमित्याने सर्व स्वातंत्र्य्वीराना सादर प्रणाम
याच मुहुर्तावर हे एक छान संकेतस्थळ पाहा.धन्यवाद..
******
प्रतिक्रिया
21 Jan 2009 - 9:47 pm | लिखाळ
आपले प्रजासत्ताक (त्या पेक्षा केंद्र सरकार म्हणूया) दीन आहे असे मुंबई प्रसंगावरुन वाटणे साहजिक आहे. या वर्षी हा दिन आपल्याला दीन न बनवो या शुभेच्छा चांगल्याच.
-- लिखाळ.
22 Jan 2009 - 1:46 am | योगी९००
तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा.............
रेप ओढतो..? म्हणजे काय? आणि पहिले अक्षर 'ग'...? अ आ किंवा श्री कोठे गेले..? बहुधा पहिली 'ग' ची बाधा असे म्हणायचे असेल तुम्हाला...
आणि पहिला मि.पा. वर लेख लिहीतो ..... तो क्षण त्याचा..........
पहिले प्रेम..पहिले हे आणि पहिले ते...तसे बरेच पहिले क्षण सुटलेत यातून..
खादाडमाऊ
22 Jan 2009 - 12:46 am | पक्या
ते पहिले क्षण त्या त्या व्यक्तीचेच असणार...आणखी कुणाचे असू शकतात?
लेखनाचा उद्देश नीट समजला नाही.
22 Jan 2009 - 1:54 am | धनंजय
पुढील लेखनासाठी शुभेच्छा, विनायक.
22 Jan 2009 - 2:56 pm | अवलिया
हेच म्हणतो.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 12:54 pm | दिपक
मनाच्या कुपीतले वाचत आहोत.
पु.ले.शु.