आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!!
येक वर्सात लै नवी लोकं भेटली... नवं मित्र जालं... लै ठिकानी फिरुनशान आलू... लै फोटू काडलं... येकीकडं बायका-पोरास्न सोडून आल्याचं दुख होतं पन नव्या ठिकानी जाऊन आल्याचा आनंद पन व्हता...! ज्या गोर्या लोकास्नी लांबूनच बगत व्हतॊ त्यांच्याच देशात नव्हं... घरात त्यांच्याबरुबर राहन्याचा अनुबव परिस घेतला. भाहेरचा अनुभव येगळा तर कामाच्या ठिकानचा येगळा... ही गोरी लोकं आपल्या बापाची सख्खं नसत्यात येवडच बोललं जातं जगभर... पन तुमच्या जीवाची अन कष्टाची येकझाक्ट किंमत करनं पन ह्यांच्याकडनंच शिकावं...! तु कामाला शाना तर आमी तुझ्याशी शाने... येवड्या साध्या नियमात... सगळ्यांना येकाच पारड्यात तोलनारे...! सायबापासून ते साफसफाई कामगारापर्यंत सर्वांनाच मानुसकीचा अधिकार देनारे... हापिसात असलं की मान मोडून काम करनारे... अन सुट्टीला सायबाच्या बापाला न इचारनारे...! कामाच्या येळी काम... अन चैनीच्या येळी चैन...! कामात चैन अन सुट्टीला बैल असली गत न्हाई...! येरबाळीच कामाला सुरवात करनार अन दिस मावळ्ळा की लगोलग जेवन करुन झोपून जानार...!!
रस्त्यावर सगळे नियम पन पाळतात. समोरुन गाडी आली तर तेला आदी जा म्हनत्यात. आधी जानारा कशी जिरवली म्हनुन जात न्हाई तर हात दाखवून... धन्यवाद दिवून जातुया. चालनारा तर लांबून दिसला की मागंच गाडी थांबवत्यात. गाड्या हिरवा दिवा लागल्यादिकून फुडं जात न्हाईत... पिवळ्याला जोर वाढवत न्हाईत... कमी करत्यात...! गुड मार्निंग म्हनायला ओळख लागत न्हाई... की हसून बोलायला पाळख लागत न्हाई...! बायका-पोरी छोटं कापडं घालत्यात म्हनुन संस्कार न्हाईत म्हनावं तर तसल्या कापडांत रात्रिच्या दोन वाजता येकली बाई सुखरुप एकटी घरी येतीया... मग ह्यो पोरा-बाप्यांचा चांगुलपना म्हनावा का...!?
विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया... बेशिकली हि आपली भाशा नव्हं हे ते लोक लगीचच समजून घेत्यात... आपनच कार-कुर करत बसतुया...! इतक्या दिवसात डोस्क्यात असलेली बरीच खुळं ह्या मागच्या एका वर्साच्या अनुभवात पार धुतली गेली...! अनुभवाचं आनखी एक गठूडं टकुर्यावर बसल्यागत झालया...! आपल्या गावाला... लोकान्ला... घराला... मागं सोडून आल्याचं दुख कायम असतया पन भाईर पडल्यावर येनार्या अनुभवातुन मनाची होत जानारी मशागत फुडचं आयुष्य समॄद्ध करत जानार येवडं नक्की...!!!
घाटी फ्लेमिंगो
प्रतिक्रिया
10 May 2016 - 2:47 pm | प्रीत-मोहर
मिपावर स्वागत फ्लेमिंगो :)
भाषेचा लहेजा आवडला . परदेसातले अजुन अनुभव वाचायला आवडतील :)
लिहत रहा.
10 May 2016 - 2:52 pm | टवाळ कार्टा
कधी असे इथे बघायला मिळणार
11 May 2016 - 8:27 pm | सायकलस्वार
'असे' म्हणजे काय? छोटी कापडं घातलेल्या बायका-पोरी?
12 May 2016 - 4:34 pm | टवाळ कार्टा
याला म्हणतात सिलेक्टिव्ह रिडिंग :)
10 May 2016 - 3:51 pm | पिलीयन रायडर
खुपच आवडलं आणि पटलं सुद्धा!
शैली एक नंबर आहे तुमची. लिहीत रहा!
10 May 2016 - 4:13 pm | एस
छान मनोगत. मिपावर स्वागत.
10 May 2016 - 4:31 pm | विशाखा राऊत
मस्त लिहिलेय
10 May 2016 - 4:31 pm | मराठी कथालेखक
कोणता देश ?
11 May 2016 - 11:19 am | घाटी फ्लेमिंगो
गोलाच्या खाल्ल्या अंगाला... हे हितंच.. अंटार्टिकाच्या वरच्या गल्लीत... उजव्या साईटला...!!
11 May 2016 - 2:50 pm | मराठी कथालेखक
काही कळालं नाही.
ऑस्ट्रेलिया का ?
बाकी फक्त मलाच हा प्रश्न कसा पडला याचंहि आश्चर्य !!
11 May 2016 - 7:35 pm | घाटी फ्लेमिंगो
वळखलं की तुमी...!!
10 May 2016 - 4:55 pm | mugdhagode
छान. छान
10 May 2016 - 5:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर स्वागत ! भारी एंट्री झाली !!
गावरान भाषेत मस्तं शैलीत लिहिलेलं मनोगत खूप आवडलं. लिहित रहा. या प्रस्तावनेनंतर तुमचे एकेक अनुभव तुमच्या शैलीत वाचायला आवडतील.
विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया...
टाळ्या ! जरा इंग्रजीत बोलता आलं की हवेत तरंगणारे नेहमीच डोक्यात जातात. :)
11 May 2016 - 12:07 am | पद्मावति
खूप छान लिहिलंय. ही हटके लेखनशैली खूप आवडली.
11 May 2016 - 12:46 am | रेवती
छान लिहिलय.
11 May 2016 - 1:48 am | बोका-ए-आझम
दुसरं - लेख मस्त आहे. मिपावर स्वागत.
11 May 2016 - 4:42 am | खटपट्या
अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो साहेब. जरा नाव बदलून ते घाटी काडून टाका बरे.
11 May 2016 - 11:16 am | घाटी फ्लेमिंगो
घाटावरचे घाटीच की ओ...!! ;)
11 May 2016 - 7:41 am | मुक्त विहारि
अजून लिहा...
11 May 2016 - 8:42 am | नाखु
मिपावर जोरदार ईंन्ट्री....
अजून येऊंदे.
गावकुसात्ला नाखु
11 May 2016 - 11:13 am | घाटी फ्लेमिंगो
तुमच्या प्रतिक्रिया बघून अं.ह.झा. असाच प्रेम असून्द्या...!!
11 May 2016 - 10:27 pm | एस
अं. ह. झा. हे लघुरूप मिपावर बर्याच दिवसांनी वापरले गेल्याचे पाहून अं. ह. झा. :-)
11 May 2016 - 11:13 am | स्वीट टॉकर
दमदार सुरवात केली आहेत! मिपावर स्वागत!
11 May 2016 - 1:53 pm | ए ए वाघमारे
सुंदर!
11 May 2016 - 1:57 pm | तर्राट जोकर
आवड्यास... और आन्दो!!!
11 May 2016 - 2:01 pm | मधुरा देशपांडे
आवडलं.
11 May 2016 - 2:37 pm | उल्का
झ्याक वाटलं. आन्खी लिवा की.
हे बरुबर लिवलया की चुकलया म्हनायचं माझं?
चुकलं आसल तर सांगा बर्र का.
:)
11 May 2016 - 7:38 pm | घाटी फ्लेमिंगो
बरुबरै उल्कातै..!!
11 May 2016 - 10:17 pm | उल्का
:) :)
11 May 2016 - 4:04 pm | क्रेझी
मस्त लेख :) परदेश वास्तव्याबद्दलचं अनुभव कथन इतक्या रसाळ भाषेत वाचायला छान वाटलं :) पुढचे भाग ह्याच शैलीत पण जरा लवकर टाका.
11 May 2016 - 4:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
भाषा आवडली.मिपावर स्वागत
11 May 2016 - 4:51 pm | सविता००१
मस्त लिखाण. मिपावर स्वागत
11 May 2016 - 5:08 pm | आतिवास
सुरेख लिहिलंय, आवडलं. आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.
11 May 2016 - 8:03 pm | ईश्वरसर्वसाक्षी
मस्त लिहिलय
तुम्हि दिलेल्या शिर्षका वरुन एक आठवल. शाळेत बहुधा दहाविला एक धडा होता लेखक नाहि आठवत पण शिर्षक होत "गडया आपुला गाव बरा"
11 May 2016 - 8:05 pm | घाटी फ्लेमिंगो
त्यालाच अनुसरून आहे शीर्षक
11 May 2016 - 9:07 pm | वाचक
ह्यांच्या पुस्तकातला उतारा होता धडा म्हणून
11 May 2016 - 8:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास लिहिलयं. मिपावर स्वागत.
11 May 2016 - 10:05 pm | बॅटमॅन
फ्लेमिंग्या, येकच लंबर बे.
11 May 2016 - 10:56 pm | खटपट्या
क्षणभर वाटलं की माईच आल्या तुमच्या अंगात... :)
12 May 2016 - 5:19 am | फारएन्ड
मस्त! आवडले. अजून लिहा.
12 May 2016 - 2:21 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
खुप छान
15 May 2016 - 7:45 pm | पैसा
आवडलं.
15 May 2016 - 8:11 pm | एक एकटा एकटाच
छान लिहिलय
15 May 2016 - 8:28 pm | रंगासेठ
छान लिहिलयं!
15 May 2016 - 10:06 pm | उगा काहितरीच
मस्त...
16 May 2016 - 12:21 pm | पक्षी
आव्लड
18 May 2016 - 7:37 pm | विवेकपटाईत
वाचताना मजा आली. बळीराजाच्या पाताळात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी आहेच.
27 May 2016 - 12:13 pm | घाटी फ्लेमिंगो
पाताळात...!!
18 May 2016 - 7:40 pm | अंतरा आनंद
छान आहे.
19 May 2016 - 11:06 pm | गतीशील
सगळे फ्लेमिंगो परदेशातून इथे येतात, तुमचा फ्लेमिंगो मात्र इथून परदेशात गेलाय..
बाकी भाषा शैली एकदम हटके..पण प्रतिसाद देताना पण त्याच शैली मध्ये दिले तर ते जर अतिपरिचयात अवज्ञा होईल..आपण सुज्ञ आहात..
20 May 2016 - 3:06 am | जुइ
आवडले. तुमचे परदेशातले आणखीन अनुभव लिहा.
20 May 2016 - 8:22 am | देशपांडे विनायक
हेच सगळ लिहावेसे वाटत होते आणि आहे पण
अस लिहिता येत नाही म्हणून लिहिले नाही
मी पण साडेचार महिने ऑस्ट्रेलियात राहून आलो . असेच अनुभवांचे गाठोडे बाळगून आहे
धन्यवाद
27 May 2016 - 12:14 pm | घाटी फ्लेमिंगो
काढा लिहून जमल तसं...!!
20 May 2016 - 4:55 pm | सूड
झ्याक लिवलंय, लिवा आनि कायबाय!!
27 May 2016 - 12:37 pm | Anand More
ह्यो मनुक्ष वळखीचा वाटून ऱ्हायलाय जनु … मला वळखून दाखव अशी सुपारी देणारा त्यो ह्योच की… मिपावर स्वागत लाल पायाच्या पक्षा
27 May 2016 - 12:47 pm | घाटी फ्लेमिंगो
श्री गुरु निवॄत्ती वचन प्रेमळ |
तोषला तात्काळ ज्ञानदेव ||
27 May 2016 - 12:55 pm | Anand More
तुझिये निढळी कोटी चंद्रप्रकाश
ज्ञानदेव माझा फ्लेमिंगो भासे ।।