हुरडा पार्टी!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
20 Jan 2009 - 10:36 pm

jamkhed trip 004
एका मित्राच्या निमंत्रणावरून शनिवार-रविवारी जामखेडला (जि. नगर) त्याच्या शेतात गेलो होतो. गेल्या गेल्या आधी गुरांबरोबर उधळलो.

jamkhed trip 008
पोरांनी बैलगाडीत मुक्काम ठोकला.

jamkhed trip 011
मग आम्ही झाडाखाली पथारी पसरून मस्तपैकी भाकरी-भाजी हाणली!

jamkhed trip 025
मी झाडाबिडावर चढून पूर्वजांशी सलगी साधण्याचा प्रयत्न केला.

jamkhed trip 040
मग आम्ही मस्त द्राक्षाच्या बागेत उधळलो. पण हाय रे कर्मा! द्राक्षं अजून तयार झालेली नव्हती!!

jamkhed trip 054
शेतातून एक फेरफटका मारल्यावर जेवणही जिरलं.

jamkhed trip 092
तोपर्यंत इकडे हुरडा पार्टीची तयारी झाली होती.

jamkhed trip 086
शेतातच लावलेल्या भट्टीवर भाजलेली ज्वारीची कोवळी कणसं. त्यातले दाणे म्हणजे हुरडा. सोबत गूळ आणि शेंगदाण्याची चटणी!!

jamkhed trip 029
पोरांनी शेतात जाम दंगा केला.

jamkhed trip 107
हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकला आणि आम्हाला घराचे वेध लागले. त्या रात्री जामखेडमध्येच राहून, दुसर्‍या दिवशी थोडा बाजारहाट करून संध्याकाळी पुण्यात परतलो.

मुक्तकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Jan 2009 - 10:43 pm | प्राजु

छान आहेत फोटो..
शेवट्चा मावळत्या दिनकराचा फोटो खूप छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सचिन's picture

20 Jan 2009 - 10:45 pm | सचिन

आम्हाला का नाही बोलावलंत ?
मी नगरला काही वर्षे होतो....तेव्हा "रानवारा" मधे जात असू.
त्या सर्व गोष्टींची आठवण झाली.
इथे दिल्लीत कुठला हुरडा मिळायला ?
तुमच्या शेवटून तिसर्‍या फोटोतला थोडासा आम्हीही खाल्ला.....!!
मज्जा आली.
धन्यवाद...!!!

शितल's picture

20 Jan 2009 - 10:51 pm | शितल

मस्तच.
फोटो पाहुन खुप छान वाटले :)

अवलिया's picture

20 Jan 2009 - 10:52 pm | अवलिया

मस्तच .... :)

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

अनामिक's picture

20 Jan 2009 - 11:48 pm | अनामिक

हुरडा पार्टी जाम मिसतोय राव!

अनामिक

विसोबा खेचर's picture

20 Jan 2009 - 11:48 pm | विसोबा खेचर

वारलो, संपलो, खपलो..!

शेवटचा फोटू अक्षरश: जीवघेणा!

हुरडा पार्टीला सलाम...!

तात्या.

घाटावरचे भट's picture

21 Jan 2009 - 1:15 am | घाटावरचे भट

>>हुरडा पार्टीला सलाम...!

=)) तात्या, ष्ट्यांडर्ड प्रतिक्रिया की काय घाईघाईत????

वाहीदा's picture

21 Jan 2009 - 5:34 pm | वाहीदा

हुरडा पार्टी असले तर काय मज्जा येईल !
~ वाहीदा

चतुरंग's picture

21 Jan 2009 - 12:37 am | चतुरंग

अभिजित तुमच्या लेखामुळे आणि चित्रांमुळे अनेक आठवणी जागल्या. धन्यवाद!
रानवार्‍यात आणि हिरवाईत बागडताना बच्चेकंपनी आनंदात दिसते आहे :)
नगरचा गूळभेंडी (ही ज्वारीच्या बियाण्याची जात आहे) हुरडा खाऊन साजरे केलेल्या कित्येक पार्ट्या आठवल्या. डिसेंबर जानेवारी महिन्यातला हा हमखास ठरलेला कार्यक्रम असे. धगधगत्या आगटीवर भाजलेली कोवळी कणसे, सोबत चटणी, दहीसाखर (ती खायला कसणाचेच काढलेले तुरे), गूळ आणि प्यायला चरवीभरुन उसाचा रस अशा सगळ्या सरंजामात गप्पांच्या फडात आणि चेष्टामस्करीत रंगलेल्या वातावरणात मनाने एक फेरफटका मारून आलो! :)

चतुरंग

आपला अभिजित's picture

21 Jan 2009 - 6:01 pm | आपला अभिजित

आम्ही खाल्ला, तोही गूळभेंडी हुरडाच होता, हे आत्ता लक्षात आले.

काहीतरी `गूळभेंडी' होते, हे कानावर आले होते. आत्ता तुमची प्रतिक्रिया वाचून त्याचा अर्थ कळला. :SS

शंकरराव's picture

21 Jan 2009 - 12:45 am | शंकरराव

मजा आली,फोटो मस्तच

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2009 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार

>>मी झाडाबिडावर चढून पूर्वजांशी सलगी साधण्याचा प्रयत्न केला.
== हे फार छान केले आपल्या पुर्वजांशी आपली नाळ कायम जोडलेली राहायला हवी ! ;)

हुरडा पार्टि एकदम टकाटक झालेली दिसत आहे ;) पार्टी आणी फोटु दोन्ही आवडले.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

दिपक's picture

21 Jan 2009 - 12:36 pm | दिपक

हुरडा पार्टी जोरात. फोटोही झकास आहेत. :)

शेवटचा फोटु मात्र खासच. एखाद्या खुप आनंद देणार्‍या प्रवासाचा शेवट झाल्यावर एका प्रकारची उदासिनता येते. तो दिवस आत्ताच परत सुरु व्हावा असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2009 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर

खास गावरान पार्टीची छायाचित्रे झकास आहेत. हेवा वाटला सर्वकाही पाहून. अजून सविस्तर फोटोग्राफी करायला हवी होती असे वाटले.
'गोडी अपूर्णतेची लाविल वेड तेंव्हा
हुरड्यातल्या दाण्यांनो उमलू नकाच केंव्हा.....'

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आपला अभिजित's picture

21 Jan 2009 - 5:40 pm | आपला अभिजित

अजून सविस्तर फोटोग्राफी करायला हवी होती असे वाटले.

अजून सविस्तर??
???? :S

काय काय अपेक्षित होतं तुम्हाला पेठकरसाहेब?? :D

इथे मिपा करांना जळवणं, एवढाच माफक उद्देश होता हे फोटो टाकण्यामागे. तो साध्य झाल्याचं दिसतंय. आणखी फोटो इथे पाहू शकता तुम्ही.

सहज's picture

21 Jan 2009 - 1:26 pm | सहज

हुरडा पार्टी बघायला मजा आली.

दशानन's picture

21 Jan 2009 - 1:28 pm | दशानन

मज्जाच मज्जा आहे बॉ !

छोटा डॉन's picture

21 Jan 2009 - 8:34 pm | छोटा डॉन

एकदम मस्त "चित्रमय सफर" घडवलीत "हुरडा पार्टीची", मजा आली वाचुन व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

लहानपणी सिजनमध्ये मामाच्या गावात गेल्यावर कुणी मामाचा मित्र हमखास सकाळीच "पोरांनु, सांच्याला हुरडा खायाला शेतात जायचं आहे" अशी काडी टाकुन जायचा. बरं हे "सांच्याला हुरडा" प्रकरण एकदम "हाय टी" सारखे असते, इथे नुसता हुरडा अभिप्रेत नसतो तर त्याबरोबर दुपारचे खास रानातले जेवणही गॄहीत धरले जाते.
मग आई, मामी व घरातल्या व नात्यातल्या हजर असणार्‍या इतर स्त्रिया ह्या खास "हुरडा पार्टीच्या" तयारीला लागायच्या. दुपारी आपलं पोटाला आधार म्हणुन " थालपीटं, मेथीचे धपाटे, वांग्याची भाजी, मटकी उसळ, (जमलंच तर ) पिठलं , दही, भजी" असा खास रानातल्या जेवणासाठी योग्य बेत असायचा ...
रानात गेल्यावर मनोसोक्त विहरीतल्या पाण्यात खेळुन कडकडुन भुक लागल्यावर मग तिथलाच रानमेवा जसे की ऊस, ढाळा ( ओला हरबरा बहुतेक ), शेंगा, गाजरं वगैरे तुडुंब खायची, जर अजुन इच्छा असली तर उगाच आपलं नावाल चार घास खायचे व पुन्हा हुंदडायला जायचे. मोठ्ठी माणसं तोवर तिथेच एखाद्या मोठ्ठ्या झाडाची सावली बघुन जर आराम करत गप्पा मारत ...

मग साधारणता सुर्य जरा पश्चिमेला झुकला की रानातला गडी "आकटी ( हुरडा भाजायची भट्टी ) " पेटवायला घेत व त्याबरोबरच बाकीचे कोवळ्या हुरड्याच्या पेंड्याच्या पेंड्या आणुन टाकत. मग आम्हाला धरुन आणुन हुरडा खायला बसवले जाई, लहानपणी हे काम फार त्रासाचे वाटे. मस्त बोंबलत हिंडायचे सोडुन हुरडा खाण्यात इंटरेस्ट होता कुणाला ?
मोठ्ठी माणसं मात्र एकदम तब्येतीत बसली असत, तोवर इकडुन "शेंगादाणे-लसणाची चटणी, मीठ, गुळ, भाजलेले शेंगदाणे,जवसाची चटणी" असा हुरड्याबरोबर अविभाज्य असणारा "चकणा" समोर येई , त्याला चिवडुस्तोवर खरपुस भाजलेला "हुरडा" पुढ्यात येई व कार्यक्रम सुरु होई.
कधीकधी जास्त गरम हुरडा तोंडात टाकल्यावर कोणीतरी "आं, पोळलंऽऽऽ" असा सुर काढत, लगेच त्यावर शेतातले गडी आमच्या मामाला " काय राव, तुमचं शेरातलं पाव्हनं लैच कवळं हैती की वो " असा अभिप्राय देई व मामाही हसुन ते कबुल करी ...
आमचा उत्साह पहिल्या १५-२० मिनीटातच संपे पण मोठ्ठी मंडळी मात्र आरामात , तब्येतीत चांगले १-२ तास तरी कार्यक्रम पुढे चालवत ...
हुरड्यावर पाणी प्यायचे नसते म्हणुन "सुमधुर ताक" पिउन हा कार्यक्रम संपे व सुर्य मावळतीला आला की आम्ही घराकडे परतु ...
असो.

अवांतर :
अभिजीतरावांनी जर "वर्णन" लिहले असते तर जास्त मज्जा आली असती.

अतिअवांतर :
अंदाजे ३ वर्षापुर्वी "द. मा. मिरासदार" यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकाच्या शेतात झालेल्या "हुरडा पार्टीची" अजुन आठवण आहे.
तो लुसलुशीत गरमा गरम हुरडा व त्याबरोबरीला "दमां"नी सगळ्यांच्या घेतलेल्या मिश्कील फिरक्या असा मस्त बेत जमुन आला होता.
फोटोही आहेत, आत्ता इथे सापडले तर नक्की टाकेन ...!

------
( आठवणीत हरवलेला ) छोटा डॉन

आणि द.मां.बरोबर हुरडा पार्टी? मस्तच! लवकर टाक फोटू आणि छोटेखानी लेखही येऊदेत झटपट!

चतुरंग

छोटा डॉन's picture

21 Jan 2009 - 8:44 pm | छोटा डॉन

रंगाशेठ, अहो ती "३ वर्षापुर्वीची" गोष्ट आहे, तेव्हा माझ्याकडे डीजीटल कॅमेरा किंवा लॅपटॉप ह्या गोष्टी नव्हत्या.
फोटो हे सध्या कॅमेर्‍यानेच काढले आहेत व त्याच्या प्रिंट्स घेतल्या होत्या ...!

माझ्या जुन्या फोटोम्पैकी बरेच मी स्कॅन करुन इथे आणले आहेत. बाकीचे सर्व घरीच आहेत "हार्ड कॉपी" वर.
आता सुदैवाने ते जर स्कॅन केलेले असतील व इथे असतील तर "उद्याच" नक्की टाकेन, अन्यथा घरुन मागवणे, स्कॅन करणे व टाकणे ह्यात खुप वेळ जाईल व ते येवढे सजह शक्यही नाही ...
बघतो मी काय होते ते, उद्या सांगतो ...!

हां, लेख मात्र जरुर शक्य आहे. पाहतो लवकरच. :)

------
छोटा डॉन