कैफात चूक झाली, डोळे भरून आले.
"सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले.
टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरून आले.
निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले.
वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा.
मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले.
विझला इथे सुडाचा वणवा मनातला पण
झाली चिते हवाली, डोळे भरून आले.
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले.
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 11:07 am | राघव
टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरुन आले.
निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरुन आले.
हे विशेष भिडलेत.
अन् हा शेवटचा म्हणजे..
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
अगदी टोचतो :(
मुमुक्षु
19 Jan 2009 - 11:09 am | अवलिया
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
:(
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Jan 2009 - 3:55 pm | अनिल हटेला
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
क्या बात है !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Jan 2009 - 3:59 pm | केवळ_विशेष
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
क्या बात है !!
20 Jan 2009 - 4:01 pm | दशानन
जबरा!
20 Jan 2009 - 5:22 pm | झेल्या
तुमच्याकडून 'चूक' नकळत होऊन गेली की मुद्दामहून 'चूक' केलीत? (ह. घ्या)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
20 Jan 2009 - 11:51 pm | विसोबा खेचर
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
क्या केहेने..!
तात्या.
20 Jan 2009 - 11:56 pm | प्राजु
अतिशय करूण!
हे वाचतानाच माझे डोळे भरून आले. खूपच सुरेख गझल.
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले.
जबरदस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jan 2009 - 12:12 am | संदीप चित्रे
>> वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा.
मृत्युच एक वाली, डोळे भरुन आले.
क्या बात है...
एकदम उच्च गझल आहे ही,,, खूपच आवडली अभिजीत.