माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत
१. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ?
ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 Apr 2016 - 3:16 pm | चांदणे संदीप
खर्च कमी करण्यासाठी, व्यवस्थित डिजाईन आणि प्लानिंग करा...
डिजाईन = किती स्टील, कॉन्क्रीट (आणि आणखीही बर्याच गोष्टी) लागणार याचा जवळपास अंदाज काढून पुढील अवास्तव खर्च कमी करता येईल. आपल्याकडे बर्यापैकी मिस्त्री लोकांचा अन्दाजपंचे खेळ असतो. त्यांच्या फक्त ऐकीव माहितीवर आणि अनुभवावर, त्यांना वाट्टेल तसे मटेरियल ते वापरत असतात, म्हणूनच चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून डिजाईन करून घेतलेले अति उत्तम!
प्लानिंग = योग्य वेळी, योग्य वस्तू, योग्य ठिकाणावरून मिळवता आली व ठरल्यावेळेत कामे झाल्यासही खर्च आटोक्यात राहू शकेल.
वरची व्होल एंड ऑल माझी वैयक्तिक मते आहेत, टेक्निकली अगदी १००% करेक्ट असतीलच अशी सांगितलेली नाहीत.
मिसिंग प्यारेभाऊ, कॉलिंग एक एक एकटाच!
Sandy
26 Apr 2016 - 3:37 pm | प्रसाद१९७१
माझ्या माहेतीप्रमाणे रुपये २००० पर स्के फुट उणे अधिक १०%
26 Apr 2016 - 5:09 pm | सस्नेह
अगदी साधे मटेरीअल वापरले तर १५०० प्रती स्क्वे. फूट इतका येऊ शकतो असे आत्ताच एका सिव्हील इंजिनीअरने सांगितले.
26 Apr 2016 - 4:57 pm | पैसा
बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर खर्च अवलंबून. गेल्या वर्षी आम्ही शेतघर प्रकारात एक १८*१४ ची खोली त्यात संडास बाथरूम बांधली. किचन ओटा, भांड्यासाठी कडाप्पा स्टँड हेही केले. शेतात मिनिमम खर्च करून बांधल्यामुळे वर सिमेंटचे पत्रे आहेत. दारे खिडक्या सिमेंटच्याच रेडीमेड घेतल्या. प्लॅस्टर, रंग काही नाही. कारण लाल चिर्यांचेच घर हवे होते. साधारण दर्जाचे प्लंबिंग. फक्त शेण आणून सारवायचा ताप नको म्हणून जमिनीला साध्या टाईल्स वापरल्या. हे सगळे सव्वा दोन लाखात झाले. त्यात संडास बाथरूमचाच खर्च जास्त असावा. बांधकाम कंत्राट देऊन करून घेतले. त्यामुळेही खर्च वाढला. चिर्यांच्या अॅव्हरेज बांधकामाचा कमीत कमी खर्च ८०० रुपये प्रति चौरस फूट असे ऐकले आहे. यात जमिनीची किंमत धरलेली नाही. टाईल्स, प्लंबिंग, भिंतीना प्लॅस्टर, रंगकाम, छत कसले ठरवाल त्याप्रमाणे खर्च वाढत जाईल. आर सी सी चा खर्च अजून जास्त असणार.
3 May 2016 - 9:47 pm | कानडाऊ योगेशु
सारखे कटाप्पा कटाप्पाच आजकाल ऐकल्यामुळे आधी माहीती असलेला हा शब्द एकदम चुकीचाच वाटला.
26 Apr 2016 - 5:03 pm | पथिक
मालक सिंग हा प्रसिद्ध आर्कीटेक्ट पर्यावरणपूरक बांधकाम करतो. अगदी सिमेंट व भाजक्या विटा न वापरताही बांधतो. किंमत पण कमी. असं काम करून देणारे ईतर लोकही असतील.
26 Apr 2016 - 6:02 pm | मार्मिक गोडसे
१००० स्क्वे.फू. कार्पेट की बिल्टअप ?
घर मजल्याचे बांधणार की खालीच बांधणार ? मजल्याचे असल्यास फूटींग, कॉलम साइज,व स्लॅबच्या जाडीत बचत होते, एक जिना वाढला तरी फार खर्च वाढत नाही.
स्टील,सिमेंट,वाळू,वीटा इ.बांधकामाचे मटेरिअल जवळपास उपलब्ध आहे का ? वाहतूक खर्च कमी होऊ शकतो.
तालुक्याच्या जागी असल्याने लेबर कॉस्ट कमी होउ शकते.
बांधकामाला पाणी भरपुर लागते, टँकर महाग पडतो. बोअरची खात्री नसते. पाण्याची सोय आहे का?
सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने स्टील, सिमेंट व विटांचे भाव बरेच कमी झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घराचा प्लॅन मंजूर करून घ्या व एखाद्या चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून स्टीलचे एस्टिमेट काढून घ्या. मटेरिअल स्टोअर करायला बंदीस्त जागा असेल तर स्टील,वाळू व वीटा घेऊन ठेवा. पावसाळ्यात वाळू व वीटा(भाजलेल्या) मिळत नाही किंवा महाग मिळतात. स्टीलला ब्रशने सिमेंटचे पाणी लावल्यास पावसाळ्यात स्टील गंजत नाही.
वॉचमन व बांधकामाला पाणी मारण्याच्या कामाला एकच माणूस ठेवा. स्टोअररूममध्ये त्याची रहाण्याची सोय केली तर उत्तम.
सिमेंट ब्लॉकच्या वीटा वेगवेगळ्या लांबी,रूंदी व जाडीत मिळतात. त्या जास्त लांबी व रूंदीच्या वीटा वापरल्यास मॉर्टर बरेच कमी लागते, सिंमेंटच्या वीटांच्या सुबक आकारामूळे बांधकाम ओळंब्यात होते, त्यामूळे प्लॅस्टरला मटेरिअल कमी लागते.
हा खर्च वांधकामाला वापरायच्या मटेरिअलवर अवलंबून आहे,जसे स्टील किंवा सिमेंट ब्रँडेड कंपन्यांचे महाग असते. हेच ओट्याचा व जिन्याचा दगड, फरशा,प्लंबिंगचे सामान,खिडक्यांच्या फ्रेम, काचा व ईलेक्ट्रिकचे सामान इत्यादींच्या बाबतीतही लागू होते. तालुक्याच्या ठिकाणी १२०० ते १६००/स्क्वे.फू. इतका खर्च येऊ शकतो.
घराचा प्लॅन येथे दिल्यास मार्गदर्शन करण्यास सोपे जाईल.
26 Apr 2016 - 6:06 pm | वैभव जाधव
१५ लाखात काम होऊन जाईल!
सामोसे के साथ हरी चटनी खाना नही भुलना!
किरपा आ जायेगी.
26 Apr 2016 - 6:48 pm | चंद्रनील मुल्हेरकर
सर्व मार्गदर्शकांचे आभार ,सूचना लक्षात ठेवल्या आहेत.
27 Apr 2016 - 11:34 am | पथिक
माझ्या एका मित्राने त्याच्या घरात टाईल्स ऐवजी शहाबादी फारशी लावली. फार सुंदर दिसते आणि पायांनाही छान वाटते. तसेच काही भिंती, बाथरूम तो बांबूच्या बनवून लेपून घेत आहे.
27 Apr 2016 - 12:07 pm | चांदणे संदीप
याच्याबद्दल अधिक विचारून सांगाल का?
जसे की...
... मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे?
... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही.
... लिंपण्यासाठी काय वापरत आहे?
... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल?
... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे?
... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल?
... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल?
फ़ोटो वगैरे मिळाला तर बढियाच होईल!
धन्यवाद,
Sandy
27 Apr 2016 - 12:17 pm | पथिक
विचारुन सान्ग्तो.
3 May 2016 - 12:05 pm | पथिक
माझ्या मित्राने तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत:
.. मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे?
The wall is equally strong as our brink walls. Any furniture you want to hang on the wall has to be planned first, you cannot hammer nails or screw. Wall shape can be as you want so we create niches, shelves etc in wall itself.
... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही.
Currently this is within a flat so we have a RCC slab above. But I am building a farmhouse where we have manglore tiled roof above in bamboo framing ofcourse.
... लिंपण्यासाठी काय वापरत आहे?
Mud plaster (mixture of mud, cowdung, jaggery, hay, rice husk, hydrated lime)
... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल?
Pure load bearing mud wall can go upto 2ft thick. This wall is a partition wall not load bearing. Besides it is mudcrete (wattle and daub) so thickness will be less than 6 inches.
... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे?
Timber framing for structure, doors windows and bamboo wattle is planned together. There are videos on youtube showing how its done.. I learnt partly from youtube :)
... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल?
Me aajun kharcha kadhla niahiye. But it will cost more than a normal brickwall in city. On a fram house where local bamboo, timber, mud etc is available it will be much cheaper.
... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल?
Takes more time.. almost twice. Mud mortor has to be soaked for a week before using. Main problem is there are no trained labour and normal labour are happy to do brick wall as they think its easier. Best part is mud plaster etc can be done by owners (family and friends). Its safe and fun!
3 May 2016 - 8:40 pm | चांदणे संदीप
तुमच्या मित्राला खूप खूप धन्यवाद सांगा या उत्तरांसाठी.
लाकडाच्या (घराच्या)कामासाठी आपल्याकडे चांगले कामगार व पद्धती नाहीयेत हेच दिसून येते यावरून. मला स्वत:ला तर लाकडांच्या घरासाठी काम करायला खूप आवडते! (अर्थात, फक्त प्लॅनिंग करायला, Drawing काढायला वगैरे!)
असो, तुमच्या मित्राला शुभेच्छा!
Sandy
27 Apr 2016 - 6:33 pm | नमकिन
RCF Rapidwall तंत्राने बांधकाम करा, फायदा आहे.
27 Apr 2016 - 7:33 pm | मार्मिक गोडसे
महाराष्ट्रात RCF Rapidwall प्रकारचे काम करणार्या एजंसीचा पत्ता देऊ शकाल का ? प्रत्यक्ष काम कसे करतात ते बघता येईल. मागे COFFOR तंत्रानी केलेले बांधकाम बघितले होते. स्थानिक ठेकेदारांना ह्या प्रकारच्या बांधकामाचा अनुभव नसल्याने कंपनीने ट्रेन केलेल्या ठेकेदारांकडून हे काम करून घ्यावे लागते, त्यामुळे पारंपारीक बांधकामांपेक्षा हे बांधकाम महाग पडते. वेळ मात्र बराच वाचतो.
27 Apr 2016 - 8:18 pm | चांदणे संदीप
क्रेक्ट है जी!
असल्या तंत्रज्ञानाला स्वीकारायला अजूनही लोक तयार नाहीयेत. मागे एकदा नाशिकला गेलो होतो एका NGO ला भेटायला. त्यावेळेला ते लोक एक लाखाच्या आसपास खर्च असणारी एकमजली, वन रूम किचन टाईप घरे बांधून देणारे तंत्रज्ञान शोधत होते. ते तसे मिळालेही त्यांना. पण पुढे ते फक्त अंगणवाडीच्या इमारती(?) सरकारी छोटी मोठी कार्यालये आणि आदिवासींसाठी/गरीबांसाठी डोंगरात घरे, अशीच कामे करीत आहेत. याला खूप वर्षे उलटून गेली. इथे(पुण्यात वगैरे) कुणालाही ते तंत्रज्ञान माहीत नाही!
RCC सोडून इतर प्रकारच्या बांधकामांना कधी पाहणार आहोत आपण काय माहीत. नाही म्हणायला Precast आलंय पुण्या-मुंबईत. पण पुन्हा, ते फक्त मोठ्या कामांसाठीच वापरले जातेय. जसे की, पूल, पार्किंगच्या इमारती किंवा फार मोठ्या स्केलवर वसवलेले गृहप्रकल्प!
असो, धागाकर्ते तुम्ही या सगळ्यात लक्ष न घालता RCC नेच बांधा. सिम्पल एंड स्ट्रेट! :)
धन्यवाद,
Sandy
4 May 2016 - 7:08 pm | नमकिन
प्रियदर्शनी इमारत येथे संपर्क साधावा, हे तंत्र वापरुन नक्की फायदा होतो.
5 May 2016 - 10:07 pm | अनंत छंदी
एकूणच खर्च कमी करण्यासाठी लॉरी बेकर या नामांकिस्तूविशारदाची पुस्तके वाचावीत. ते आता हयात नाहीत पण त्यांनी स्थापन केलेली संस्था कॉस्टफोर्ड केरळात काम करते त्यांनी अनेक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. नेटवर सर्च करून पहा.
6 May 2016 - 9:35 am | पथिक
मालक सिंग यांचाच विद्यार्थी आहे.
9 May 2016 - 7:46 am | mugdhagode
कॉस्मो होम्स काय आहे ? सारखी जाहिरात असते.
http://thecosmohomes.in/floor-plans/
9 May 2016 - 7:55 am | mugdhagode
अशी घरे टिकाउ असतात का ? दर काय असतो ? कोणते मटेरियल वापरतात ?
http://thecosmohomes.in/contact-us/
9 May 2016 - 2:06 pm | mugdhagode
https://www.youtube.com/watch?v=rLwBrSJa1nk
9 May 2016 - 6:12 pm | मुक्त विहारि
लिंक बद्दल मनापासून धन्यवाद....
9 May 2016 - 6:27 pm | मुक्त विहारि
"डोम" (इग्लू बांधतात तशी) हा एक उत्तम पर्याय आहे.
सर्कशीचा तंबू पण "डोम"च्या आकारातच असतो.
कमीत-कमी खर्चात (जास्तीत जास्त ७० ते ८० हजारात) ३-४ माणसे सहज राहू शकतील असे घर तयार होते.
अर्थात ह्या घराला वेगळे स्वयंपाकघर, किंवा वेगळी बेड-रूम असे नसते.
पण डोमचे वरील छत षटकोनी आकाराचे असल्याने, त्याचा आधार घेवून ४ वेगळ्या रूम पण बांधता येतात.
साधारण पणे ४-५ लाखांत एक डोम आणि त्याचाच आधार घेऊन ४ रूम्स बांधता येतील.
डोमचे साहित्य मात्र जुने अँटिनाचे पाइप्स आधाराला, आणि जूने फ्लेक्सची कापडे (छत बांधायला) उपयोगी पडतात.ह्यामुळे खर्च अजून कमी होईल.
नीट डागडूजी केली तर डोम साधारणपणे २५-३० वर्षे तरी टिकायला हरकत नसावी.
घर कसेही बांधा पण घरातील प्रत्येक मजल्याची उंची मात्र किमान १५-१६ फूट तरी ठेवा.हवा खेळती राहते.
9 May 2016 - 11:19 pm | मार्मिक गोडसे
जमिनींचे भाव व आर्थिक बजेटमुळे जागेचा पुरेपूर वापर करण्याकडेच प्रत्येकाचा कल असतो. RCC च्या तुलनेत लोड बेअरींगच्या घराचा देखभाल खर्च कमी असतो व घराचे आयुष्यही जास्त असते, परंतू जाड्या भिंतींमुळे प्रत्यक्ष वापरायला जागा कमी मिळते व पुढेमागे कधी घराचे नूतनीकरण करावयाचे झाल्यास ह्या भिंतींना हात लावता येत नाही.
कमी खर्चाच्या व कमी देखभालीच्या तंत्राने बांधलेली घरे फक्त निवारा म्हणून ठिक वाटतात, परंतू सुरक्षिततेच्य (घरफोडी) व दुरुस्तीच्या दृष्टीने कुचकामी ठरतात.
प्रीकास्ट व COFFOR तंत्रानी एकदा बांधकाम केल्यास त्यात पुन्हा कधीच बदल करता येत नाहीत. COFFOR मध्ये जेव्हा पहिला स्लॅब पुर्ण होतो त्याच वेळेला स्लॅबखालील भिंतीही बांधल्या जातात. ह्या भिंतीमधून पाण्याचे पाईप,गॅसचे पाईप,ईलेक्ट्रिक, टेलिफोन, व टिव्हीच्या वायर्स ई. अगोदरच टाकल्या जातात, त्यात नंतर बदल करता येत नसल्यामुळे काळजीपुर्वक नियोजन करावे लागते.
त्यामुळे मला तरी RCC बांधकाम हा पर्याय योग्य वाटतो. ह्या बांधकामात Filler slab roofs हे तंत्रज्ञान वापरल्यास प्रत्येक स्लॅबमागे बांधकाम साहित्यात ५-१५ % इतकी बचत होते. बांधकामाच्या मजबुतीत कोणताही बदल न होता, स्लॅबच्या सुंदरतेत भर टाकणारे हे तंत्रज्ञान घरातील उष्णतेचे नियंत्रण करते.
एका स्ट्रक्चरल इंजिनिअरशी ह्या तंत्रज्ञानावर चर्चा केली आहे. लवकरच मी हा प्रयोग दोन मजली इमारतीच्या पार्किंग स्लॅबवर करून बघणार आहे.
10 May 2016 - 9:44 am | mugdhagode
तसेही एकदा बांधले की फार बदल करायचे नाहीतच. त्यामुळे प्रीकास्टही चालेल. पण याची मजबूती व लिकेज प्र्रुफ याबाबत माहिती हवी आहे.
खेड्यातही स्वतःची जागा असेल तर असे घर बांधता येईल.
10 May 2016 - 9:55 am | mugdhagode
http://www.indiamart.com/rmsinfrasolutions/
http://dir.indiamart.com/mumbai/prefabricated-houses.html
11 May 2016 - 10:11 pm | लिओ
नविन घर बांधकामास शुभेच्छा.
आपल्या परिसरातील जुन्या घराला भेटी द्या. तुम्हाला परिसरातील स्थानिक बांधकामाचे मटेरिअलबद्दल माहिती मिळेल. स्थानिक बांधकामाचे मटेरिअल अथवा जवळ उपलब्ध असलेले मटेरिअल बांधकामाचा खर्च कमी करेल. ( संगमरवरी दगड राजस्थान परिसरात मिळतो राजस्थानमध्ये स्वस्त तर महाराष्ट्रा महागच मिळेल)
उन्हाळ्यात घर गार व हिवाळ्यात घर उबदार राहण्यास काय उपाय योजना करता येतील याबद्द्ल आर्किटेक्ट बरोबर चर्चा करा.
एक विनन्ती
रेन वॉटर हारवेस्ट बद्दल जरुर विचार करा.