नमस्कार मंडळी,
आपणा सर्वांना ६७व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला मतदानाद्वारे दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
तृतीय क्रमांक मिळाला आहे anandphadke यांच्या 'पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता' या छायाचित्राला.
द्वितीय क्रमांक मिळाला आहे, श्रीरंग_जोशी यांच्या 'वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता' या छायाचित्राला.
अन प्रथम क्रमांक मिळाला आहे समर्पक यांच्या 'वळणवाट' या छायाचित्राला.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
प्रतिक्रिया
1 May 2016 - 10:59 am | साहित्य संपादक
इडली डोसा - झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल
चांदणे संदीप - खंडाळ्याच्या घाटासाठी
मोहन - तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
जुइ - विमानातून दिसलेला महामार्ग
राजेंद्र मेहेंदळे - कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो
अमलताश - ही वाट दूर जाते
डॉ सुहास म्हात्रे -दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
अजिंक्य विश्वास - झेड ब्रिजच्या रस्त्यावर
उल्का - ही वाट खोल जाते...
जव्हेरगंज - सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट
वेल्लाभट - 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
रोहन अजय संसारे - माझ्या गावातला एक रस्ता
राजकुमार१२३४५६ - हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता
1 May 2016 - 11:08 am | कपिलमुनी
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन
1 May 2016 - 11:11 am | वेल्लाभट
विजेते व स्पर्धकांचे अभिनंदन
आयोजकांचे आभार
1 May 2016 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन !
1 May 2016 - 11:47 am | एस
या स्पर्धेत फारच छान छायाचित्रे पहायला मिळाली. सर्वांचेच अभिनंदन आणि आभार!
1 May 2016 - 12:22 pm | इशा१२३
विजेत्यांचे अभिनंदन! सुंदर छायाचित्र पहायला मिळाली.
1 May 2016 - 12:22 pm | इशा१२३
विजेत्यांचे अभिनंदन! सुंदर छायाचित्र पहायला मिळाली.
1 May 2016 - 12:37 pm | मोहन
विजेत्यांचे अभिनंदन व आयोजकांचे आभार
1 May 2016 - 1:17 pm | स्पा
कचकुन फोटो आहेत एक सो एक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
1 May 2016 - 2:12 pm | उल्का
विजेत्यांचे अभिनंदन!
आयोजकांचे, स्पर्धकांचे व मतदारांचे आभार!
1 May 2016 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व सहभागी कलाकारांचेही अभिनंदन, आपल्या सर्वांच्या सहभागामुळे सुंदर सुंदर छायाचित्र बघायला मिळतात.
-दिलीप बिरुटे
1 May 2016 - 6:38 pm | असंका
सर्व स्पर्धकांचे आभार आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
धन्यवाद!
1 May 2016 - 8:08 pm | पैसा
सगळीच चित्रे सुंदर होती! सर्वांचेच अभिनंदन! विजेत्यांचे खास अभिनंदन!
1 May 2016 - 8:20 pm | रेवती
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन.
1 May 2016 - 8:53 pm | चांदणे संदीप
अगदी योग्य छायाचित्रे निवडून आलेली आहेत!
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
या वेळी आगळीच धमाल उडवून दिलेली स्पर्धेबाहेरील छायाचित्रांनी. माझी प्रवेशिका देताना धाकधूक जरा जास्तच होती, वाटलं डिपॉझीटही जप्त होतंय का काय! पण ३ का ४ मतं मिळून डिपॉझिट वाचल्याचा आनंद आहे. ;)
Sandy
1 May 2016 - 8:59 pm | अजया
विजेत्यांचे अभिनंदन!
2 May 2016 - 8:23 am | श्रीरंग_जोशी
माझ्या छायाचित्राला मते व अभिप्राय देणार्यांचे तसेच अभिनंदनाच्या शुभेच्छा देणार्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या प्रोत्साहनामुळे नवनवीन प्रयोग करायला अन छायाचित्रणाशी संबंधीत गोष्टी शिकत राहायला स्फूर्ती मिळते.
प्रथम व तृतीय क्रमांक मिळवणार्या अनुक्रमे समर्पक व आनंद फडके यांचेही अभिनंदन.
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रवेशिका व अवांतर छायाचित्रे या दोन्ही प्रकारांमधून अनेक उत्कृष्ट चित्रांचा आस्वाद घेता आला त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
थोडंसं या छायाचित्राबाबत
मिनेसोटातला वसंत ऋतू हा एकदम नेत्रसुखद असतो. बर्फाची चादर जाऊन महिन्या दीड महिन्यात सगळीकडे हिरवाई पसरते अन विविध रंगी फुलांनी झाडे बहरू लागतात. गेल्या वर्षी याच महिन्यात एका रस्त्याने जाताना हे ठिकाण दिसले. तेव्हा घाईत होतो म्हणून दुसर्या दिवशी ठरवून तिथे फोटो काढायला गेलो. तिथे पोचताच प्रवेशद्वाराच्या कमानीशेजारी (केवळ कमानच होती, द्वार नव्हतेच) Trespassers not allowed ही पाटी दिसली. ती जागा कुणाची तरी खाजगी मालमत्ता आहे हे कळले. मग प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच एक-दीड मिनिटांत काही फोटो काढले अन त्यापैकीच हा एक. दुर्दैवाने तेव्हा आभाळ भरून आले होते. त्यामुळे मागाहून फोटोचा ब्राइटनेस वाढवावा लागला. पॉइंट ब्लँक यांच्या सूचनेनुसार यापुढे असे फोटो काढताना लो अँगल शॉट घेऊन पाहीन.
2 May 2016 - 9:57 am | प्रीत-मोहर
सुंदर फोटो होते सगळे त्यामुळे सगळ्याच स्पर्धकांचे धन्यवाद. आणि विजेत्यांचे अभिनंदन
2 May 2016 - 9:59 am | नाखु
आणि मिपा "वाट"चाल अशीच हमरस्त्यांबरोबर पायवाटा , रानवाटाही,जंगलवाटासकट पादाक्रांत करो हीच शुभेच्छा!!!!
वाटाड्या मिपावारकरी नाखु
2 May 2016 - 10:05 pm | समर्पक
आयोजकांस धन्यवाद! प्रोत्साहन, अभिप्राय, सूचना व शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
3 May 2016 - 9:50 pm | anandphadke
या स्पर्धेसाठी प्रोत्साहन, शुभेच्छा व सूचना देणाऱ्या मिपाकर मंडळींचे मनापासून आभार :)