ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ५ : ब्रह्मदेश लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
मंडलेहून चालू झालेला ब्रह्मदेश प्रवास इरावतीच्या काठाने दक्षिणेकडे ग्रामीण भागातून बगानमार्गे आता अंतिम टप्प्यात आला. बगानहून रंगून रात्रभराचा प्रवास आहे, बस व रेल्वे दोन्ही मार्ग उपलब्ध असले तरी बस अधिक आरामदायक व वेगवान माध्यम.
रंगून किंवा यांगॉन ब्रह्मदेशातले सध्याचे सर्वात मोठे व महत्वाचे शहर. दशकभरापूर्वीपर्यंत देशाची राजधानी; २००६ मध्ये ती नेयपीटाव येथे हलविण्यात आली. तसे तुलनेत आधुनिक शहर. ब्रिटीश काळात मुंबई कलकत्त्याप्रमाणे याही शहराचा नियोजित विकास झाला व त्या काळातील अनेक इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत. काही भागात तर अगदी मुंबईत असल्यासारखेच वाटते. स्थानिक बमार व मॉन तसेच पश्चिम भारतीय, चीनी, थाई अशा अनेकविध रंगांत रंगलेले महानगर म्हणजे रंगून!
देशाच्या दक्षिण मध्य भागात इरावतीच्या मुखाजवळ वसलेल्या या शहराचे महत्व वाढले ते उपयुक्त व संरक्षित बंदर म्हणून. ब्रिटीश काळात अधिक विस्तार झाला, पण त्याआधी जवळील बागो (जुने नाव हंसवती), मंडले व अमरापूर यांना अधिक महत्व होते. तसा स्थानिक इतिहास बुद्ध काळापर्यंत मागे जातो, विशेषतः येथील धर्मस्थळांचा इतिहास समृद्ध आहे. श्वेडगॉन हे देशातील सर्वात महत्वाचे धार्मिक स्थान हा रंगून चा केंद्रबिंदू. पूर्वोद्धृत चार बुद्धांच्या जीवनाशी निगडीत काही वस्तू (रेलीक्स) येथे जतन करण्यात आल्या आहेत त्यामुळे या स्थानाला बौद्ध धर्मात अतिशय महत्व आहे. त्याविषयी अधिक लेखन चित्रांसमवेत… विपश्यना अध्यात्मपद्धतीचे आधुनिक प्रवर्तक सत्यनारायण गोएंका यांनी रंगून येथेच त्यांच्या कार्याची सुरुवात केली व पुढे भारतात व नंतर जगभर कार्यविस्तार केला.
द्रविडभाषिक अनेक दक्षिण भारतीय मूळाचे लोक रंगून मध्ये राहतात. कालिकेचे एक सुंदर मंदिरही जुन्या भागात आहे. एके काळी रंगूनची अर्धी अधिक जनता परप्रांतीय, विशेष करून पश्चिम व दक्षिण भारतीय होती. साठच्या दशकात सैन्यसत्ता आल्यानंतर बरेच लोक विस्थापित झाले तर काही करण्यात आले. आज काही भागात व काही वर्गात या लोकांचे प्राबल्य आहे.
देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून रंगून चे महत्व आहे. उत्कृष्ठ प्रतीचा चहा, सागवानी लाकूड व त्यावरील कोरीवकाम तसेच उच्च प्रतीच्या माणिक, जेड व अन्य रत्नांसाठी ब्रह्मदेश प्रसिद्ध आहे. बहुतांश उत्पादन स्त्रोत व खाणी या उत्तर व पूर्व भागात असल्या तरी बाजारपेठ रंगून मध्ये आहे. येथील रत्नसंग्रहालय जरूर भेट देण्यासारखे आहे, खरेदीसाठीही विश्वसनीय आहे.
पुढील भागात ब्राह्मी लोकजीवनाची धावती ओळख!
* या भागात एका छोट्या 'रत्नजडीत' विभागासाठी देवस्थानाच्या आंतरजालावरील चित्रांचा वापर करण्यात आला आहे.
रंगून शहर, ठळक उठुन दिसणारा श्वेदगॉन स्तूप
कालिका देवी मंदिर
सुले पॅगोडा : एक महत्वाचा चौक, महत्वाची राजकीय निदर्शने याच चौकात होतात
सुले पॅगोडा : सामान्य जनजीवन
रंगून महापालिका भवन
रंगून स्वातंत्र्य स्मारक
रंगून स्वातंत्र्य स्मारक
रंगून न्यायपालिका
ब्रह्मदेशाच्या राजमुद्रेवरील सिंह
श्वेडगॉन पॅगोडा : पूर्व द्वार प्रथम दर्शन
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप हा छोट्या टेकडीवजा उंचवट्यावर असून चारही दिशेने असे प्रशस्त जिने बांधण्यात आले आहेत
रचना : मुख्य स्तूप हा छोट्या ६४ स्तूपांनी वेढलेला आहे. त्याही बाहेर चार दिशांना चार स्तूप आहेत. एकंदर रचना ही मंडल यंत्रा प्रमाणे आहे.
रचना : स्तूपाचे तीन मुख्य भाग. एकूण उंची ९९ मीटर
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग, डाव्या बाजूस बोधीवृक्ष
प्रदक्षिणा मार्ग
दैनंदिन पूजा परंपरा : प्रत्येक वारासाठी एक अशा मूर्ती येथे स्थापन केलेल्या आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या मूर्तीवर अभिषेक करण्याची पद्धत आहे. (सोनटक्क्याच्या फुलांचे हार… अहाहा काय दरवळ!)
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : भित्तिचित्र
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : रात्रीचे दृश्य
श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील छत्र, ध्वज व शिखा
श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णध्वज ५ फुट लांबीचा आहे. त्यावरील अत्यंत नाजूक व मनोहारी रत्नजडीत नक्षी
श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णशिखा एकूण १४१ किलो सोने, ४५०० हिरे व अन्य मौल्यवान रत्ने जडवून बनवलेली आहे. मध्यभागातील सर्वात मोठा हिरा ७६ कराट वजनाचा आहे
सुंदर कांडॉग्यी सरोवर
कांडॉग्यी सरोवर व पुरातन राजप्रासाद
राजनौका प्रतिकृती
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
22 Mar 2016 - 6:38 pm | राघवेंद्र
पु. भा. प्र.!!!
22 Mar 2016 - 7:25 pm | रवीराज
वा फारच छान.सुन्दर फोटो.
23 Mar 2016 - 8:37 am | अजया
सुंदर आहे रंगून पण.
वाचताना "मेरे पिया गये रंगून वहाँसे किया है टेलीफुन" गाणं डोक्यात वाजायला लागलं!
23 Mar 2016 - 8:48 am | बोका-ए-आझम
नेहमीप्रमाणेच फोटो अप्रतिम. लेखन मात्र त्रोटक वाटले. पण पुढच्या लोकजीवनाबद्दल असलेल्या लेखात तुम्ही ही कसर भरून काढाल ही अपेक्षा आहे.
25 Mar 2016 - 8:25 pm | सुधीर कांदळकर
आणि अद्भुत. मजा आली.
पुभाप्र
5 Apr 2016 - 7:48 pm | पैसा
अचाट सुंदर आहे हे सगळं!
5 Apr 2016 - 8:01 pm | जुइ
फोटो आवडले!
6 Apr 2016 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे
खूप सुंदर ! ब्रम्हदेश सफरींच्या यादीत वर सरकला आहे :) पुभाप्र.
6 Apr 2016 - 2:24 am | स्रुजा
क्या बात हे.. फार च सुंदर देश आहे. तुमचे फोटो पण सुरेख.
7 Apr 2016 - 12:21 am | विलासराव
अलभ्य लाभ.
गोयंका गुरुजींचे गुरूजी श्री उ बा खिन. त्यांच्या कडून १४ वर्ष विपश्यना शिकुन विपशयनेचे आचार्य झाले.त्यांचीच इच्छा होती की ही भारताची पुरातन विद्या भारतात जायला हवी. ते स्वतः येऊ इच्छीत होते पण जमले नाही. मग गोयंका गुरुजी आले.विपश्यना भारतात प्रस्थापीत होऊन जगभर प्रसार पावली.
गोराईला ग्लोबल विपश्यना पॅगोडा उभा राहिला. जो या श्वेडगॉन पॅगोडाची प्रतिकृती आहे. घुमटाचा व्यास जगातील सर्वात मोठा आहे. ८००० लोक एका वेळेस बसून साधना करू शकतात. पण आपल्या गुरुंबद्दल आदर म्हणून गोराइच्या पॅगोडाची उंची ५ फुट की ५ मीटर कमी ठेवण्यात आली.
मलाही केवळ याच पॅगोडामधे आणि तेथील विपश्यना केंद्रामधे ध्यान करण्यासाठी जायची खुप प्रबळ इच्छा आहे. त्याचे फोटो शेयर केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
9 Jun 2016 - 5:17 pm | उल्का
छतावरिल कोरिव काम, नक्षी केवळ अप्रतिम आहे.
सरोवरची वाट तर सुन्दरच.
फोटो लाजवाब!