मिपाकरहो नमस्कार,
मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं.
प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली.
आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत. त्यातील पहिला क्रमांक अर्थातच त्या विषयाच्या विडंबन स्पर्धेचा विजेता आहे.
प्रेम :
प्रथम क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - लव्ह करणे तुजवरती
द्वितीय क्रमांक - बहुगुणी - जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
तृतीय क्रमांक - नीलमोहर - प्रेम कर हरणीसारखं
---------------------------------------------------
राजकारण :
प्रथम क्रमांक - सर्वसाक्षी - मताचे श्लोक
द्वितीय क्रमांक - आनंद मोरे - परत ये रे मल्ल्या
तृतीय क्रमांक - बहुगुणी - देता मते कुणाला
---------------------------------------------------
फजिती :
प्रथम क्रमांक - स्वामी संकेतानंद - ओल्ड मंक येता येता
द्वितीय क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - चांगली खोली दिलीस देवा
तृतीय क्रमांक - बहुगुणी - हनुवटी रुतुनी आहे
---------------------------------------------------
वरील स्पर्धक व विजेत्या विडंबनांव्यतिरिक्त आलेली इतर सर्वच विडंबनं एकापेक्षा एक सरस होती, आणि ती आपण सगळ्यांनीही बघितलीतच. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल.
बाकी काही म्हणा, रंगांचं कसं असतं, की एकटाच एकटा रंग तितका खुलून दिसत नाही. पण रंग जेंव्हा एकमेकात मिसळतात ना, तेंव्हा खरी धमाल येते. मिपाचं सार नेमकं हेच आहे. मिसळा आणि उधळा; मग एकच धुरळा !
चांगभलं !
इतर प्रवेशिका खालीलप्रमाणे
-------------------------------------------------------
प्रेम
जिथे सागरा धरणी मिळते - प्रमोद देर्देकर
काय करू देवा? - संदीप चांदणे
राजकारण
ठकतंत्रांचे देणे - बाजीगर
मीडिया बटकिणी - राजेश घासकडवी
तुणतुणे - संदीप चांदणे
छद्मबंध - स्वामी संकेतानंद
णवणाग स्ट्रोट्र - ज्ञानोबाचे पैजार
माल्या तुला शोधू कुठ - मंदार भालेराव
नेते ते करीती - मनमोहन रोहिदास रोगे
कुठे शोधिसी मल्ल्या आता - दमामि
फजिती
येशील येशील येशील दोस्ता - संदीप चांदणे
चणा - नीलमोहर
सोच नाही तेथे… - दमामि
प्रतिक्रिया
28 Mar 2016 - 4:06 pm | मृत्युन्जय
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणी स्पर्धकांचे देखील.
28 Mar 2016 - 4:13 pm | अभ्या..
तीन भागात बहुगुणींचा लंबर. दोन भागात पैजार माऊली. भारी भारी.
उर्वरित सर्व विजेत्यांचे मीनंदन.
28 Mar 2016 - 4:15 pm | पैसा
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! सर्वांनाच विनंती की आपआपल्या विडंबन कवितांचे स्वतंत्र धागे टाका म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र आस्वाद घेतायेईल.
28 Mar 2016 - 4:17 pm | खेडूत
अरे वा!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! सहभागी कवींचे कौतुक.
विडंबन करणे महाकठीण काम.
तीनही प्रकारांत नंबर काढल्याबद्दल बहुगुणी यांचे विशेष अभिनंदन!
दोन प्रकारांत निवड झाल्याबद्दल पैजार बुवांचे खास अभिनंदन..
28 Mar 2016 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा
+++ १११
29 Mar 2016 - 10:43 am | सस्नेह
विडंबन महाकठीण काम. त्यातून नंबरात यायचे म्हणजे खाऊ नव्हे.
तस्मात सर्व स्पर्धकांना कॉम्प्लिमेंट्स आणि विजेत्यांचे अभिनंदन !
28 Mar 2016 - 4:17 pm | एस
मी न केलेल्या विडंबनाला न मिळालेल्या पारितोषिकाबद्दल स्वतःचे नभिनंदन नरून नेतो. ;-)
झक्कास झाली स्पर्धा. विडंबने दर्जेदार आणि खळखळून हसविणारी होती. क्या बात है! सर्वांचे अभिनंदन आणि जोरदार टाळ्या.
28 Mar 2016 - 4:21 pm | भाऊंचे भाऊ
हम्म.. माहिती बद्दल धन्यवाद. आता अस्वाद घ्यावा म्हणतो.
सर्वांचे अभिनंदन.
28 Mar 2016 - 4:22 pm | नाखु
जोरदार अभिनंदन आणि सर्वांना टाळ्या.
नाखु विडंबन वाला
28 Mar 2016 - 4:23 pm | मित्रहो
विजेत्या्चे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
28 Mar 2016 - 4:23 pm | प्रचेतस
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
स्पर्धा सुरेखच झाली.
इतर विडंबंकांची विडंबनेसुद्धा छानच होती. त्यांची नावे जाहिर करण्यास हरकत नसावी.
28 Mar 2016 - 4:54 pm | वेल्लाभट
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि विजेत्यांचे विशेष कौतुक !
28 Mar 2016 - 5:14 pm | चांदणे संदीप
पैजारबुवा.... ___/\___
बहुगुणी सर(आप भी?!!) ___/\___
नीलमोहर - प्रेम कर प्रेम कर हरणीसारखं... हम्म... लक्षात आलेलं लगेच! ;)
स्वामीजी.... गुड वन!
आनंद मोरे.... मल्ल्या रडतोय बघा वाचून! :)
सर्वांचे अभिनंदन आणि मिपाचे आभार!
मजा आली....अजून नव्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!
Sandy
28 Mar 2016 - 5:19 pm | प्राची अश्विनी
विजेत्यांचे अभिनंदन!
मजा आली वाचताना!
28 Mar 2016 - 5:28 pm | किचेन
अभिनंदन!
28 Mar 2016 - 5:48 pm | अजया
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
बहुगुणींचं त्रिवार अभिनंदन!
28 Mar 2016 - 5:53 pm | Anand More
बहुगुणी.... नाव सार्थ केलेत... मनःपूर्वक अभिनंदन
28 Mar 2016 - 6:03 pm | जव्हेरगंज
चांगली खोली दिलीस देवा
यावर एक गाणं झालंच पाहिजे !!
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
28 Mar 2016 - 6:03 pm | बोका-ए-आझम
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
28 Mar 2016 - 6:07 pm | बोका-ए-आझम
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
28 Mar 2016 - 8:03 pm | स्वामी संकेतानंद
धन्यवाद मंडळी!! इतर सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही हार्दिक अभिनंदन!
28 Mar 2016 - 8:07 pm | आदूबाळ
अभिनंदन!
28 Mar 2016 - 8:53 pm | बहुगुणी
आता मिपावरील हौशी गायक-गायिकांनी सर्वच विडंबने मूळ सुरावटीत गाऊन प्रकाशित करावीत म्हणजे आणखी धमाल येईल!
28 Mar 2016 - 10:41 pm | रातराणी
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! मज्जा आली!
28 Mar 2016 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व विजेत्यांचे सर्व सहभागी मिपाकरांचेही अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
28 Mar 2016 - 11:25 pm | नीलमोहर
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन.
28 Mar 2016 - 11:29 pm | जुइ
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!!
28 Mar 2016 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !
29 Mar 2016 - 6:58 am | संजय पाटिल
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन
29 Mar 2016 - 7:50 am | यशोधरा
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! मजा आली विडंबने वाचायला :)
29 Mar 2016 - 2:18 pm | दमामि
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!!!
29 Mar 2016 - 5:24 pm | सुमीत भातखंडे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मस्त झाली स्पर्धा.