आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.
जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.
मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.
हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का?
अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65)
महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.
ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.
(यजुर्वेद: ३१/११)
या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे.
ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे.
अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.
(तैत्तिरीय उपनिषद ३/४)
त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच.
क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.
वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे.
आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.
हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
प्रतिक्रिया
25 Mar 2016 - 11:19 am | प्रचेतस
मनुस्मृतीबाबत माझं काहीसं तुमच्यासारखंच मत होतं. पण जेव्हा कुरुंदकरांचं मनुस्मृती वाचलं तेव्हा त्यातले उघडेनागडे सत्य कळून आले व मनुस्मृतीबाबत माझं मत अत्यंत प्रतिकूल बनलं.
25 Mar 2016 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा
सम्पूर्ण सहमत!
ज्याला ज्याला मनुस्मृती हा काय प्र'ताप आहे,हे खरच समजून घ्यायचं असेल त्याने त्याने कुरुंदकर लिखित सदर पुस्तक अभ्यासलच पाहिजे.
@मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. >>> पण ते कर्म काय असावे!? ,हे मात्र मनुस्मृतीतील टनाटनी मतांनुसारच ठरते. एक दोन उदा.अपवादात्मक असली तरी! कारण तस तर पाकिस्तातही हिंदू मंदिरे आणि थोडे हिंदू शिल्लक ठेवलेले आहेत. (अजून!)
25 Mar 2016 - 12:02 pm | प्रकाश घाटपांडे
मनुस्मृती ही एक चांगली पंचिंग बॆग आहे.मनुवादी मनुवादी असे म्हणून पंच करताना चांगला व्यायाम होतो. हे खेळणे काढून घेतले तर नवीन पर्याय काय?
तळागाळात काम करणारे एक राजकीय नेते पानसरेंना आदरांजली देण्याच्या कार्यक्रमात असे म्हणाले होते की रस्त्यावर जाणार्या येणार्या सर्वसान्मान्य माणसांना विचारा बर तुला मनुस्मृती माहित आहे का? आणि आज तू जे व्यवहारात वागतो ते मनुस्मृतीत सांगितले आहे म्हणून वागतोस का? हे नेते कॉंग्रेसचे होते. त्या अगोदर बी जी कोळसे पाटील बोलले होते व त्यात मनुवादी मनुवादी असे म्हणून इतरांना झोडपत होते. त्याला हा टोला होता.
खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे.
25 Mar 2016 - 12:19 pm | नाना स्कॉच
खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे.
+1234567890
25 Mar 2016 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. काय शोषण केलं, काय अन्याय केला, कशी विषमता होती हे सर्व चिड येण्यासारखा असलं तरी त्याचाही आता कंटाळा यायला लागला आहे.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2016 - 12:14 pm | एस
ह्या थर्डक्लास पोथीच्या ××××....
25 Mar 2016 - 12:27 pm | गॅरी शोमन
मी मुळ लेखकाच्या मताशी सहमत आहे की " जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. "
हिंदु तत्वज्ञान वेद, पुराणे , श्रूती आणि स्मृती यातुन येते. जसे जे वेदोक्त नाही परंतु कुणाचे तरी एखाद्या श्लोकावरचे इंटरप्रिटेशन आहे जे स्मृती सदरात मोडते. पुढे हे सर्व विचार मनुच्या काळात संपादीत झाले असतील म्हणुन मनुस्मृती झाली असेल.
देवदत्त पटनाईक हे उडीया भाषेत लेखन करतात. मराठीतही बोलतात. मध्यंतर बहुदा ग्रेट भेट मध्ये ते म्हणाले की हे सर्व पौराणीक लेखन ही प्रश्नपत्रिका मानुन आपण उत्तरे शोधावीत.
अनेक गोष्टी हिंदुंना पवित्र अश्या ग्रंथात प्रतिपादीत आहेत म्हणुन काय सर्वच गोष्टींचे व्यवहारात पालन हिंदु करतील असे नाही.
उदा. रामायणात राम एकपत्नीव्रताचे पालन कर्ता होते. हा आदर्श मानुन सर्वच हिंदु धर्मपालन म्हणुन ते करतील असे नाही. ( आता कायद्याने बंदी आली आहे हा भाग सोडला तरी )
महाभारतात बहु पतित्व होते जे परत अपवादाने सुध्दा कोणत्याही कथेत दिसत नाही कारण ते अव्यवहार्य किंवा त्यावेळेस अपरिहार्य असेल.
याच धर्तीवर राजनखान यांनी एका दिवाळी अंकात अश्या प्रकारची कथा लिहली आहे. ज्यात पंचायत अपवादात्मक म्हणुन दोन पुरुषांना एका स्त्री बरोबर संसाराची अनुमती देते.
सबब, जे व्यवहार्य नाही ते घेतले जात नाही. ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. आता फक्त विरोध दर्शविण्यासाठी चर्चीली जाते.
'चातुर्वर्ण्यमयासृष्टं गुणकर्म विभागशः'. अर्थात गुण-कर्मों के अनुसार चारों वर्ण मेरे द्वारा ही बनाये गये हैं। स्पष्ट है कि वर्ण जन्म पर आधारित नहीं था। हे वचन गीतेत आहे. यावरुनही असा वर्ण बदलाचे स्वातंत्र्य होते असा अर्थ प्रकट होतो. यावर मुळ घागा लेखकाने उदाहरणे दिली आहेत ज्यात वर्ण बदल संभव झाला आहे हे अधोरेखीत होते.
चाणाक्याने ज्याला गादीवर बसवले आणि पुढे त्याचा महांमंत्री म्हणुन कार्य केले तो राजा सुध्दा क्षत्रीय नव्हता.
सबब, आज तर कायद्याने जातीय उल्लेखाला मान्यता नसताना असे वाद निर्माण करणे म्हणजे केवळ समाजात भ्रम निर्माण करायचा असे सुत्र आहे. जातीभेदामुळे जर स्वातंत्र्यपुर्व काळात समाजाची अधोगती झाली असे मान्य केले तर असे वाद आता ही तेच करत आहेत असेच म्हणावे लागेल.
25 Mar 2016 - 12:43 pm | DEADPOOL
+११२२२२२२२११३३
25 Mar 2016 - 1:08 pm | अत्रे
एवढे ऐकून घेणारे आणि चर्चा करणारे तरुण मिळाले, ही खूपच चांगली गोष्ट आहे!
25 Mar 2016 - 1:11 pm | सतिश गावडे
नुकतेच डॉ. इंदुभूषण बडे संपादीत "मनुस्मृति" वाचायला सुरुवात केली आहे. त्यातील प्रस्तावनेनुसार मनु हा ब्राम्हण नसून राजा होता. आणि मनुस्मृति ही तत्कालीन धर्मशास्त्र होते.
पहील्या अध्यायात सृष्टीची निर्मिती कशी झाली याचे विवेचन आहे. जे आपल्या आकलनापलिकडचे आहे ते प्रिहिस्टोरीक माणूस कल्पना करुन कसे समजून घेण्याचा प्रयत्न करत असे याचा उत्तम नमुना म्हणजे ही मनुस्मृतिच्या पहील्या अध्यायातील विश्वनिर्मितीची कथा.
जर वर्णव्यवस्था गुण आणि कर्मावर आधारीत होती तर माशी कधी आणि कुठे शिंकली ज्यामुळे गुणकर्माधारीत वर्णव्यवस्था जन्माधारीत झाली? या जन्माधारीत वर्णव्यवस्थेला कर्मविपाकाच्या सिद्धांताचे बळ देऊन तिला बळकट कुणी केली?
25 Mar 2016 - 1:20 pm | प्रचेतस
कुरुंदकरांच्या मनुसमृतीत ह्याची सगळी उत्तरे मिळतील. मला आठवते त्याप्रमाणे आपणाकडे देखील हे पुस्तक आहे.
25 Mar 2016 - 1:31 pm | सतिश गावडे
होय. आठवले. मी तसेच ठेऊन दिले आहे घेतल्यानंतर. आता मनुस्मृति वाचून झाली की वाचेन ते.
27 Mar 2016 - 10:51 am | बोका-ए-आझम
कुरुंदकर विद्वान होतेच पण त्यांचं प्रत्येकच म्हणणं बरोबर असेल किंवा त्यांच्या पुस्तकात सगळ्याची उत्तरं मिळतील असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे? शेवटी तेही माणूसच होते. त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं सर्व काही शंभर टक्के factual तर असू शकत नाही. शिवाय कुरुंदकर मार्क्सवादी होते.हा ideological bias कुठेतरी मनुस्मृतीवर लिहिताना आला असणारच. त्यामुळे त्यांनी लिहिलंय, मान्य. चांगलं लिहिलंय, हेही मान्य पण त्यातून सगळ्याची उत्तरं मिळतील असं नाही.
27 Mar 2016 - 10:58 am | DEADPOOL
बोकाशेठ +१११११११११११११
27 Mar 2016 - 11:09 am | भाऊंचे भाऊ
श्रीकृष्ण होतेच पण त्यांचं प्रत्येकच म्हणणं बरोबर असेल किंवा गीतेत सगळ्याची उत्तरं मिळतील असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे? शेवटी तेही माणूसच जन्मात होते. त्यांच्या
पुस्तकात लिहिलेलं सर्व काही शंभर टक्के factual तर असू शकत
नाही. शिवाय ते हिंदू होते.हा ideological
bias कुठेतरी गीता सांगाताना आला असणारच. त्यामुळे
त्यांनी लिहिलंय, मान्य. चांगलं लिहिलंय, हेही मान्य पण
त्यातून सगळ्याची उत्तरं मिळतील असं नाही. म्हनुनच गीता सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही इतकच काय हां आयडी ओलोजिकल बियास त्या हिन्दू ब्रम्हवाणिलाही लागू होतो ज्यातून मस्म्रू आकाराला आली
27 Mar 2016 - 12:22 pm | प्रचेतस
कुरुंदकर डाव्या विचारांचे होतेच यात वाद नाही शिवाय त्यांचं सगळं बरोबर असेल असंही नाही मात्र ते एक बुद्धीवादी विचारवंत होते ह्यात कसलाच संशय नाही. डावे किंवा मार्क्सवादी इस्लामविषयी बोलताना बिचकतात किंवा त्यांचा टिकात्मक भर हा प्रामुख्याने हिंदू धर्मावर असतो मात्र कुरुंदकरांनी इस्लामवरही तितक्याच निर्भिडतेने आपली मते मांडली आहेत.
मात्र तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचाच. ह्यात अगदी १००% नाही पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील असे ठामपणे म्हणावेसे वाटते.
27 Mar 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम
जरुर वाचेन. सांगितल्याबद्दल धन्यवाद!
25 Mar 2016 - 1:19 pm | चेक आणि मेट
मनुस्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत,पण ठराविक वाईट गोष्टींमुळे त्या पूर्ण ग्रंथाला काहीच किंमत राहत नाही.
मनुस्मृती म्हणजे संविधान नव्हे,जाळणार्यांना जाळू देत.
त्यामुळे मनुस्मृतीचे उदात्तीकरण व्यर्थ आहे.
25 Mar 2016 - 1:37 pm | जयंत कुलकर्णी
// मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का?
अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आल/////
हेच हिंदू धर्माचे वैशिषठ्य असावे बहुदा.... कालबाह्य्य गोष्टींना (किंबहुना ज्याने काही अडत नाही अशा) येथे फाट्यावर मारले जाते.... हा धर्म फार म्हणजे फारच डायनॅमिक असावा...
25 Mar 2016 - 1:37 pm | सतिश गावडे
>>मनुस्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत,पण ठराविक वाईट गोष्टींमुळे त्या पूर्ण ग्रंथाला काहीच किंमत राहत नाही.
थोडेसे अवांतर*: हिटलरचे उदात्तीकरण करणारी पुस्तके पाहीली की मलाही हेच वाटते. त्याचे देशप्रेम कितीही उदात्त असले तरीही त्याने माणुसकीला कालीमा फासला या अपराधापुढे त्याचे हे देशप्रेम कवडीमोलाचे आहे.
*खरं तर हा मुद्दा अवांतर नाही. हिटलरचा वंशाचा अभिमान हे वर्णप्रेमाचेच एक रुप आहे.
25 Mar 2016 - 1:40 pm | नाना स्कॉच
सहमत
25 Mar 2016 - 1:42 pm | नाना स्कॉच
भल्यामोठ्या ग्रंथातुन 2 चार सोइस्कर दाखले काढून त्यावर रचलेला धागा! असो
25 Mar 2016 - 1:53 pm | उगा काहितरीच
लेखकाचे बरेच मुद्दे पटण्याजोगे आहेत. वाचूनच न पहाता उगाच टीका करावी हे बरोबर नाहीच. पण माझ्या मते मनुस्मृती हा ग्रंथ आजच्या काळात जवळजवळ आऊटडेटेड झालाय. त्यात सांगितल्याप्रमाणे वागणे , शिक्षा देणे , सामाजिक व्यवहार करणे हे आजच्या काळाला सुसंगत असेलच असे नाही. त्यामुळे विनाकारण त्या ग्रंथाची जाळपोळ करणे वा त्या ग्रंथाचा उदोउदो करणे दोन्हीही गोष्टी व्यर्थ आहेत. हं याचा अर्थ असा नाही हा ग्रंथ टाकाऊच आहे. त्याकाळातील जीवन , समाज वगैरे गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकासाठी कदाचित उपयुक्त असेलही तो ग्रंथ .
25 Mar 2016 - 2:03 pm | सतिश गावडे
सहमत आहे.
आजच्या घडीला मनुस्मृतीचे उदात्तीकरण किंवा तिची प्रत जाळणे या दोन्ही बाबी खुळचटपणा ठरेल. मात्र जरी हा ग्रंथ कालबाह्य झाला असला तरीही समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हा एक उत्तम दस्तऐवज ठरेल.
25 Mar 2016 - 2:40 pm | मितभाषी
मनुस्म्रूती जाळणे हे प्रतिकात्मक आहे. भटी
गाॅडबंगालीला दिलेले आव्हान आहे.
बाकी मनुस्म्रूती व संविधान यांची तुलना पाहून वारल्या गेलो आहे.
25 Mar 2016 - 4:55 pm | भाऊंचे भाऊ
त्यापूर्वी चुकांची शिक्षा राजाची मर्जी ठरवत असे अथवा मेल्यानंतर स्वर्ग अथवा नरक भोग.... आणि या दोन्ही बाबी शिक्षेची ठोस खात्री देत नाहीत त्यापेक्षा एखादे पुस्तक जे लिखित स्वरूपात अमुक चुकीला अमुक शिक्षा ते सुध्दा याच जन्मी अन याच देहिअसे सुस्पष्टपणे सांगते तेंव्हा ती जगातली पहिली राज्यघटना ठरायला काय अडचण आहे ?
अर्थात म्हणून मनुस्मृती ही तिरस्करणीय नाही असे मी चुकुनही ठरवणार नाही. जे चुक अन त्याज्य ते चुक अन त्याज्यच यात मात्र दुमत। नाही.
27 Mar 2016 - 2:25 pm | सतिश गावडे
मनुस्मृती अन्यायकारक होती हा मुद्दा बाजूला ठेवला तर तो ग्रंथ तत्कालिन "घटना" होती.
बाबासाहेबांनी ज्या काळात मनुस्मृती जाळली त्या काळी त्या प्रतिकात्मक दहनाला अर्थ होता. कारण तेव्हा अन्यायकारक नियम असणारी मनुस्मृती ही "घटना" म्हणून वापरली जात होती.
आज स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात असताना आणि देश या संविधानानुसार चालत असताना मनुस्मृती जाळण्याला काहीच अर्थ नाही. आजच्या घडीला मनुस्मृती हा एक कालबाह्य संस्कृत श्लोकसंग्रह आहे.
25 Mar 2016 - 2:06 pm | माहितगार
मनुस्मृतीचे कॉपीराईट फ्री असलेले मराठी अनुवाद आंजावर उपलब्ध आहेत का ?
25 Mar 2016 - 5:01 pm | विवेकपटाईत
आजच्या आपल्या संविधानावर आधारित न्याय व्यवस्थेत हि आपण काही स्त्रियांना न्याय देऊ शकत नाही. (वोट बँक मजबुरी ही). असो. हे २१व्या शताब्दीत शिकलेल्या लोकांना जमत नाही. विचार करा ५०० वर्ष आधीची परिस्थिती काय असेल. सनातन धर्माच्या धुर विरोधी, आर्यसमाज प्रवर्तक स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुद्धा सत्यार्थ प्रकाश मध्ये मनुस्मृतीतील काही चांगल्या बाबींना मान्यता दिली आहे. बाकी आपण भाजी-पाला बाजारातून आणतो, तो हि स्वच्छ करून धुऊन, शिजवून खातो. बाकी जुन्या ग्रंथांच्या बाबतीत दुसर्याच्या चष्म्यातून नव्हे तर स्वत:च्या डोळ्यांनी आणि डोक्यानी विचार करून आपले विचार ठरविले पाहिजे.
जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत. JNU वाले त्या वर चूप राहतात. हाच ढोंगी पणा. आदर करायचा आहे तर सर्व ग्रंथांचा करा,. एकाचाच विरोध का. हाही प्रश्न आहेच.
25 Mar 2016 - 5:05 pm | भाऊंचे भाऊ
कितीही देखणी असली तर ढग काळाच असतो तर त्याला काळाच म्हननार ना ?
25 Mar 2016 - 5:09 pm | भाऊंचे भाऊ
कारण कर्म विचारांवर अन विचार भोवतालची परिस्थिति अन पाजलेल्या उपदेश डोसानवर अवलंबून असतात परिणमी यातली एकही गोष्ट मनुक्षाचा वरन ठरवायला पुरेसी नाही
25 Mar 2016 - 5:37 pm | माहितगार
पटाईतजी,
१) एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही. एकांगी टिकांचा मी समर्थक नाही पण तुम्हालाही दुसर्या ग्रंथांवर अभ्यासपुर्ण टिका करण्यास कुणी आडवलेले नाही. (जिथपर्यंत माझ्या वाचनात आले विद्यार्थ्यांनी आख्ख्या ग्रंथाला जाळलेले नाही तर केवळ आक्षेप असलेल्या पृष्ठांना जाळलेले असावे चुभूदेघे)
२) विषमता आणि अंधश्रद्धांमधील अघोरी भाग या नि:संशय नाकारल्या गेल्या पाहीजेत. दुसर्यांकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही इट इज टाईम टू चेंज. उदाहरणार्थ हि पोप फ्रांसीस मधील बदलाची ताजी बातमी पहा. (कदाचित दिखाऊ असेल पण बदलाचा संदेश देण्याची तयारी आहे.) अलिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस संघ कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी गेली संघ कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत करुन स्वतःच्या कार्यालयावर भगव्या सोबत तिरंगा लावून काँग्रेस सोबत ध्वज वंदनात सहभाग घेतला. तुम्ही म्हणताय तसे तुम्ही खरेच मनुस्मृतीचा अभ्यास केला असेल तर त्यातील विषमतेचाही किमान निषेध करण्यास मागे पुढे पहाण्याचे काय कारण आहे ? एकदा चुकले ते चुकले म्हणून मग त्यात हे चांगले सुद्धा आहे म्हणून सांगा आणि मनाचा मोठेपणा दाखवा ना जरा. भारतात आ.ह. साळुंखे अद्याप शंकराचार्यांशी शास्त्रार्थाच्या संधीची वाट पहात आहेत. शंकराचार्यांच्या पुढील पिढीत आ.ह.साळूंखे सारखे ब्राह्मणेतर शंकराचार्यपदावर पोहोचतील तेव्हा भारतातील जातीयवाद संपण्याची खरी सुरवात झालेली असेल. बरेच काही सकारात्मक बदल झाले आहेत पण समानतेची मंजील अभी बाकी है.
27 Mar 2016 - 1:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
अधिक वाचावयास आवडेल:
जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत.
काही संदर्भ\लेख आदींचे दुवे दिल्यास आभारी.
धन्यवाद.
27 Mar 2016 - 1:38 pm | आनन्दा
जेएनयु वाल्यांच्या पोथ्या तपासा म्हणजे मिळतील.
27 Mar 2016 - 1:46 pm | नाना स्कॉच
हरकत नाही,
अगोदर, जनेवि अन न्याय विषयक साहित्य ह्याचा अर्थाअर्थी संबंध काय ते जरा उलगडुन सांगू शकाल का आनंदा भाऊ?
27 Mar 2016 - 6:02 pm | आनन्दा
मी उघडपणे नाव घेऊ इच्छित नाही, पण दगडाने ठेचून मारणे, सार्वजनिक ठिकाणी सुळावर चढवणे, किंवा इन्क्विझिशन, किंवा एखाद्याला देशद्रोही ठरवून त्याला सैबेरियात पाठवणे वगैरे शिक्षा सांगणारे ग्रन्थ, असे मला इन जनरल म्हणायचे आहे. जनेवि मध्ये आजपर्यंत अश्या ग्रंथांचे दहन झाल्याचे ऐकण्यात नाही, तेव्हा ते त्यांना न्याय ग्रंथ म्हणून मान्य असावेत असे वाटते.
अवांतर - मनुस्मृतीमध्ये अश्या प्रकारच्या शिक्षा नाहीतच असे नाही, किंबहुना यापेक्षा भयंकर शिक्षा आहेत (उदा. कानात उकळते तेल ओतणे वगैरे) पण म्हणूनच ती आजच्या काळाच्या कसोटीवर टिकत नाही. पण या आधारावर मनुस्मृती जाळणारे याच आधारावर समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतील काय? (करत असतील तर मी माझे शब्द मागे घेतो)
25 Mar 2016 - 5:16 pm | माहितगार
माझा यशवंत मनोहरांचा दुवा देणारा एक प्रतिसाद प्रकाशित झाला नाही का उडाला, काय झाले ?
प्रश्नांकीत झालेला माहितगार
25 Mar 2016 - 5:40 pm | पैसा
उडाला नाय. फांदीवर बसलाच नाय.
26 Mar 2016 - 1:47 pm | माहितगार
धन्यवाद. यशवंत मनोहरांच्या पुस्तिकेचा हा ऑनलाईन उपलब्ध दुवा केवळ संदर्भासाठी म्हणून देण्याचा प्रयत्न कालच्या एका प्रतिसादाच्या वेळी केला समहाऊ प्रकाशित होऊ शकला नव्हता. मे बी आंतरजाल जोडणीतली गडबड असेल.
25 Mar 2016 - 6:38 pm | hmangeshrao
मनुस्मृती पूर्ण वाचल्याखेरीज त्यावर टीका करु नये.
...
इस्लाम , औरंगजेब यावर टीका करणारे संबंधित समग्र वांगमय वाचून टीका करतात की काय ?
.....
लिहायचे तेही अगम्य कोड ल्यांग्वेजात .
ती भाषाच मुळात इतराना शिकु द्यायची नाही.
थोडंफार समजुन अनुभवुन विरोध करणार्याला बोलायचं की तू मूळ पुस्तक समग्र वाचले आहेस का ?
त्याने हो म्हणुन ठासुन सांगितलेच तर बोलायचे की तू वाचलेस ते प्रक्षिप्त आहे . ओरिजिनल नाही.
....
25 Mar 2016 - 7:54 pm | DEADPOOL
औरंगजेब यावर टीका करणारे संबंधित समग्र
वांगमय वाचून टीका करतात की काय ?>>>>>>>> नवा अवतार चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आला असेलच!
25 Mar 2016 - 8:39 pm | hmangeshrao
उदाहरण म्हणुन ते लिहिले होते .
त्या नावानी मिर्च्या झोंबत असतील तर गांधी नेहरु / रेखा अमिताभ / मोदी हेडली / हिटलर साने गुरुजी / मंगळ व कृष्णविवर / भुमिती व युक्लिड ...... अषी कोणतीही एक दोन किंवा जास्त नावे त्या वाक्यात टाकू शकता .
25 Mar 2016 - 8:10 pm | अत्रुप्त आत्मा
@त्याने हो म्हणुन ठासुन सांगितलेच तर बोलायचे की तू वाचलेस ते प्रक्षिप्त आहे . ओरिजिनल नाही. >> अगदी असाच अनुभव मला कुराणा'बाबत तीन चारदा आलेला आहे. एकदा माझ्या एका क्लाएंटकडे आलेल्या मौलवीकडून. दुसऱ्यांदा माझ्या भावाच्या मित्राकडून. तिस्यरंदा पूना कॉलेजात एक इस्लामविषयक भाषण देणाय्रा एका वकत्याकडून.
25 Mar 2016 - 8:13 pm | तर्राट जोकर
मोगाखान, तुम्ही लिहा ना शुद्ध मराठीत इथे मिपावर. सग्ळ्यांना वाचता येईल आणी समजेल. कुराण हो.
25 Mar 2016 - 8:48 pm | hmangeshrao
कल बेगम ने शिरा नैवेद्य दिखाया ... गुरुवार दत्तगुरु को.
बाकी छे दिन खुदा के !
शिरा और शीरखुर्मा चखने को तुमको गीता कुरान की जरुरत लगती है क्या ?
25 Mar 2016 - 9:05 pm | तर्राट जोकर
गीता कुरान की जरुरत शिरा और शिरखुर्मा के लिये नही, लडने झगडने के लिये लगती है.
25 Mar 2016 - 9:20 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
hmangeshrao,
अगर सच्चा मुस्सलमान बनना चाहते हो,तो पहले खतना करके आवो,
अगर किया है तो रहने दो,हम सबूत नही पूछेंगे|
सलाम आलेकुम
|
|
|
गोल मुंडी टोपी गुंडी
26 Mar 2016 - 11:04 am | सुबोध खरे
साहेब
तुम्ही त्या मोगा खान च्या नादाला कशाला लागतांय?
ते भारतात राहून पूर्वेकडे तोंड करून नमाज पढतात
आणी पश्चिमे कडे तोंड करून सकाळी सूर्याची पूजा करतात.
सोडून द्या झालं
26 Mar 2016 - 12:49 pm | आनन्दा
१ लंबर.. जाम हसलो
27 Mar 2016 - 12:46 am | काळा पहाड
हसून हसून बेजार झालो
25 Mar 2016 - 7:02 pm | मराठी कथालेखक
मनुस्मृती चांगला की वाईट , योग्य की अयोग्य या वादात पडण्यात काही मतलब नाही.
आजच्या जीवनात आपली राज्यघटना हाच आपला धर्म आहे, मनुस्मृतीत लिहले आहे ते म्हणून अमूक कृती केली पण ती जर कायद्याच्या चौकटीत बसणारी नसेल तर न्यायालय शिक्षा करणारच ना ?
ही राज्यघटना शास्त्रशुद्ध पध्दतीने , एका समितीने (म्हणजे अनेकांचा विचार त्यात आला) बनवलेली आहे, आणि सर्वात महत्वाची ती बहुतकरुन (मूळ ढाचा सोडल्यास) परिवर्तनीय आहे. त्यामुळे समाजसुधारकांनी घटनेचा अभ्यास करण्यात वेळ व उर्जा व्यतीत करावी हे अधिक योग्य, पुढे जावून घटनेतील त्रुटी (काही असल्यास) दूर करण्यासाठी प्रयत्न करावे (जनजागृती, लोकप्रतिनिधींशी चर्चा ई)
25 Mar 2016 - 7:04 pm | निनाद मुक्काम प...
मनुस्मृती नामक एक ग्रंथ आहे ह्याची अमुल्य माहिती नवीन पिढीला मिळावी ह्या उद्दात हेतूने तो जाळण्याची क्रिया अधून मधून काही समाजसेवक करत असतात.
भाजपने आंबेडकरांना आपल्या आदरणीय व्यक्तींमध्ये समाविष्ट केले त्यांची जयंती साजरी करणे गरजेचे केले म्हणून आता भविष्यात मनुस्मृती रोहित हे शब्द कानावर पडत राहतील.
25 Mar 2016 - 9:03 pm | चेक आणि मेट
1)संजय सोनावणी यांच मनुस्मृती बद्दलचं मत
2)संजय सोनावणी यांच मनुस्मृती बद्दलचं मत
25 Mar 2016 - 11:14 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
छान छान
पण संजय सोनावणींचा एक वेगळाच मतप्रवाह असतो ब्वा.
25 Mar 2016 - 10:27 pm | बॅटमॅन
मनुस्मृतीबद्दल चर्चा झालेलीच आहे तरी काही मुद्दे मांडतो.
१. मनुस्मृती, मिताक्षरा, इ. हिंदू धर्मशास्त्रावरच्या ग्रंथांमधील काही भाग आज भारताच्या सिव्हिल लॉ चा भाग आहे.
२. मनुस्मृती बहुतांश लोकांनी पाहिलेलीही नसते. तेव्हा बहुसंख्यांना मनुवादी मनुवादी करत झोडपण्याअगोदर १४०० वर्षांपूर्वीच्या दुसर्या एका पोथीबद्दल बोलायची हिंमत आहे का, याचा इच्यार करावा. त्या पोथीचे समर्थक तर आजदेखील त्याप्रमाणेच आचरण करावे वगैरे बोंबलत असतात.
३. मनुस्मृतीतील त्याज्य भागाला 'गुणकर्मविभागशः' चे मधाचे बोट लावून त्याला उदात्त दाखवण्याची काहीएक गरज नाही.
25 Mar 2016 - 11:31 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
गुणकर्मविभागशः निवळ्ळ थाप आहे.
क्षत्रिय विश्वामित्र जेव्हा तपाने(कर्माने) ब्राह्मण्यत्व प्राप्त करू इच्छित होते,तेव्हा का व कोणी अडथळे आणले? आणि राजर्षी ही पदवी दिली पण ब्रह्मर्षी दिली नाही.
आणि ते दुसरी सृष्टी निर्माण करू इच्छित होते म्हणून तपभंग केला हीसुद्धा थापच वाटते.
नंतर अथक प्रयत्नांनी ते ब्रह्मर्षी झाले.
गुणकर्मविभागशः म्हणायचं आणि कर्म करून जर कोणी वर येत असेल,तर अडथळे आणायचे हा निवळ्ळ दुतोंडीपणा आहे.
26 Mar 2016 - 1:44 am | बॅटमॅन
क्षत्रियाचे ब्राह्मण झालेले अजून एक उदाहरण आहे बॉ. त्या केसमध्ये मात्र अडथळा आल्याचे माहिती नाही. राजा हरित नामक क्षत्रियाला अंगिरस ऋषींच्या ट्रेनिंगखाली ब्राह्मण करण्यात आले. त्यापासूनच हरितस गोत्र सुरू झाले. अंगिरस, अंबरीष आणि युवनाश्व हे तीन प्रवर या गोत्रात सांगितले जातात.
https://en.wikipedia.org/wiki/Harita
या गोत्राच्या ब्राह्मणांचे पूर्वज हे क्षत्रिय आहेत असे लिंगपुराणात सांगितले आहे.
तेव्हा विश्वामित्राची केस वेगळी आहे. रायव्हलरीचा अँगल असणार त्याला, नैतर उगा द्यायचा म्हणून त्रास दिला नसता.
26 Mar 2016 - 12:44 pm | ए ए वाघमारे
असलंच काही संत ज्ञानेश्वरांबाबतही ऐकून आहे.
आज काही ब्राह्मणद्वेष्ट्या लोकांकडून ज्ञानेश्वर ब्राह्मण होते म्हणून टीका होते.पण याबाबतीत प्रा.राम शेवाळकरांच्या एका व्याख्यानात असे ऐकल्याचे स्मरते की- तत्कालीन(आणि बहुधा आजही)हिंदू/वैदिक जातीत जन्मलेले मूल जन्मत: शूद्रच असते.नंतर उपनयन संस्कारानंतर त्याला ब्राह्मण्यत्व प्राप्त होते,ज्याला 'द्विज' किंवा दुसरा जन्म होणे असे म्हणतात.(संन्याश्याची मुले म्हणून नाकारल्या गेलेल्या)या उपनयन संस्काराच्या हक्कासाठी पैठणच्या धर्मपीठाशी कुलकर्णी बंधूंचा वाद झाला मग ते रेड्यामुखी वेद वगैरे..पण तो अधिकार अखेरपर्यंत न मिळाल्याने ज्ञानेश्वर हे धर्मशास्त्रीय दृष्ट्या शूद्रच राहिले.
त्यामुळे त्यांचे अलौकिक कार्य हे ब्राह्मण म्हणून नसून शूद्र म्हणून होते असे मानावे का?
26 Mar 2016 - 1:59 pm | माहितगार
जे काही असेल संतमंडळी एकीकडे विषमतेस नाकारताना काही सुधारणा करतानाही दिसतात यात संत एकनाथांचे उदाहरण घेता येते, पण त्याच वेळी काही जुन्या गोष्टींबाबत खासकरुन वर्णाश्रमधर्मा बाबत त्यांना पुरोगामी भूमिका घेण्या बाबत तेवढे यश मिळाले नसावे. ज्ञानेश्वरीतील उल्लेखांबद्दलचे आक्षेप यशवंत मनोहरांच्या या पुस्तिकेत दिसतात. मराठी विकिपीडियातील लेखातून साहित्यातील अस्पृश्यता आणि मराठी भाषेतील पारायण ग्रंथातील अस्पृश्यतेच्या उल्लेखांची दखल अंशतः घेतली असल्याचे दिसते.
26 Mar 2016 - 2:48 am | साहना
हि थाप नाही. १८८० मधील ब्रिटीश सरकारचे सेन्सस रिपोर्ट पहा जास्त मागे जायची गरज नाही. जातीवार भेदाभेद असल्या तरी जाती प्रत्यक्षांत अतिशय fluid होत्या हे ह्या सेन्सस मधून मधून साबित झाले आणि ब्रिटीश लोकांनी म्हणून जातीवर सेन्सस बंद केले. दर सेन्सस मध्ये अनेक नवीन जाती उत्पन्न व्हायच्या तर काही जाती नामशेष व्हायच्या कारण जसे जसे एखाद्या जातीचे लोक श्रीमंत व्हायचे किंवा स्थलांतर करायचे तसे त्यांची जात सुद्धा ते बदलत असत. "नाभिक" लोक ह्या प्रमाणे सोयीस्कर रित्या "नायिक ब्राह्मण" झाले. अर्थांत ह्याला विरोध इथे तिथे होत असेलच पण तरी सुद्धा लोक जाती वर्ण बदलून घ्यायचे.
हजारो वर्षांचा छळ असे आज काळ दलित इत्यादींच्या बाबती म्हटले जाते. छळ हा खरा असला तरी तो त्याच लोकांचा हजारो वर्षां पासून होत होता हि गोष्ट मात्र खोटी आहे. छळ करणारे आणि छळ होणारे लोक नेहमी बदलत गेले. आज कोणी ब्राह्मण सरकारी हपिसांत गेला काय किंवा दलित गेला काय, अपमानित झाल्याशिवाय परत येत नाही. सरकरी बडगा धारण करणारे आजचे छळ करते आहेत.
आमच्या घराण्याचा ७०० वर्षां पासूनचा इतिहास उपलब्ध आहे. आमच्या पूर्वजांची वसाहत कुणी तरी उध्वस्त केली आणि हाती शस्त्र घेवून त्यांना mercenary प्रमाणे फिरावे लागले. शेवटी एका द्वैत वादी स्वमिजींशी त्यांची भेट झाली. त्यांचे अनेक शिष्य मुस्लिम शासकांनी मारले होते आणि स्वामीजी स्वतः सुरक्षा शोधत होते. आमच्या पूर्वजांनी त्यांना सुरक्षा दिली आणि बदल्यांत स्वामीजींनी त्यांच्या साठी गांव वसवण्याची तयारी दाखवली. हळू हळू वेदिक ज्ञान ह्या रक्षकांना देवून शेवटी हे लोक क्षत्रियाचे ब्राह्मण झाले.
26 Mar 2016 - 8:03 am | भाऊंचे भाऊ
मनुक्शाला त्याच जन्मात त्याचा वर्ण दर दोन वर्षांनी चेंज करत राहायचीही सोय उपलब्ध होती का हो ?
26 Mar 2016 - 12:53 pm | आनन्दा
शंकराचार्यांनी अश्या बर्याच जाती ब्लँकेट ब्राह्मण करून घेतळ्याचे वाचले होते.
26 Mar 2016 - 10:01 am | हेमंत लाटकर
हिन्दू धर्मातील प्राचीन ग्रंथातील चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त वाईट गोष्टीकडे लक्ष देऊन ते जाळणे म्हणजे बाम्हण बाम्हणेतर वाद पसरवणे. अशा गोष्टीचा वापर राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी करून घेतात.
बर्याच वाईट प्रथा बंद करण्यामध्ये, जातपात न पाळणे, अस्पृषता न पाळणे, शिवरायांच्या स्वराज्यासाठी हातभार तसेच प्राणाची आहुती देणार्यामध्ये बाम्हणांचा सहभाग होता. हे सर्व विसरून फक्त भांडण लावत बसायचे.
सध्याचे खरे प्रश्न दुष्काळ, बेकारी, दहशदवाद या गोष्टींवर चर्चा करून मार्ग काढण्याची जास्त गरज आहे.
26 Mar 2016 - 10:08 am | खालीमुंडी पाताळधुंडी
हिन्दू धर्मातील प्राचीन ग्रंथातील वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त चांगल्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे बाम्हण बाम्हणेतर वाद पसरवणे. अशा गोष्टीचा वापर राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी करून घेतात.
बर्याच वाईट प्रथा बंद करण्यामध्ये, जातपात न पाळणे, अस्पृषता न पाळणे, शिवरायांच्या स्वराज्यासाठी हातभार तसेच प्राणाची आहुती देणार्यामध्ये बहुजनांचा सहभाग होता. हे सर्व विसरून फक्त भांडण लावत बसायचे.
सध्याचे खरे प्रश्न दुष्काळ, बेकारी, दहशदवाद या गोष्टींवर चर्चा करून मार्ग काढण्याची जास्त गरज आहे.
26 Mar 2016 - 11:04 am | hmangeshrao
दोन आयडी ?
26 Mar 2016 - 12:26 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
पूर्ण प्रतिसाद वाचा दोघांचा काही शब्द बदललेले दिसतील.
26 Mar 2016 - 12:57 pm | तर्राट जोकर
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
26 Mar 2016 - 1:00 pm | अर्धवटराव
पण आज मलाच ते नकोय. त्यात काहि तथ्यहि नाहि, फायदा तर मुळीच नाहि.
26 Mar 2016 - 2:48 pm | तर्राट जोकर
तुम्ही होकारार्थी उत्तर दिले आहे. ते नेमके कसे आणि कोठे होते त्याबद्दल सांगु शकाल काय?
27 Mar 2016 - 2:05 am | अर्धवटराव
इथे आध्यात्म, पौरोहित्य, शेंडी-जानव्याची औपचारीकता वगैरे सहीत कलियुगी ब्राह्मण्य मिळु शकतं. जात, लिंगभेद वगैरे भेदभाव न करता वेदविद्या शिकवणारे काहि आचार्य आहेत, त्यांच्याकडुन संथा मिळु शकते व पुढे अॅफीडेव्हीट फाईल करुन रीतसर अडणाव बदलुन ब्राह्मण्/पुरोहीत म्हणुन वावरता येतं.
सनातन धर्मात वर्ण ट्रान्झीशनची नेमकी काय/कशी व्यवस्था होती माहित नाहि, पण ति होती एव्हढं नक्की.
27 Mar 2016 - 3:24 am | तर्राट जोकर
अर्धवटराव. मी पौरोहित्य करण्याच्या पात्रतेबद्दल विचारत नाही. अॅफिडेविट फाईल करुन आडनाव बदलेल. पण जात बदलत नाही. तुम्ही पुरोहित भटजी ब्राह्मण इत्यादी कसे व्हायचे ते सांगत आहात, तसे करुन तो व्यवसाय करण्याची पात्रता येईल फारतर. असे जातनिरपेक्ष पुरोहित तयार करण्याचे उल्लेखनिय काम गेली अनेक वर्ष गायत्री परिवार करत आहे.
जसे कधीकाळी पौरोहित्य करनार्या खापरपणजोबाचा खापरपणतु भले भारतीय लष्करात सैनिक असेल तरी तो ब्राह्मणच. त्याचा मुलगाही ब्राह्मणच, क्षत्रिय नाही होत. किंवा त्याने उद्या कपडे शिवायचे दुकान टाकले तरी तो शिंपी नाही होत. माळ्याचा डिप्लोमा करुन सरकारी नोकरीत बागेचा माळी म्हणून जॉइन झाला तरी तो ब्राह्मणच राहतो. त्याचे सगळे जीवंत नातेवाईकांत आता कोणीही पौरोहित्य करत नाही तरी ते सगळे ब्राह्मणच. आज अनेक कुटूंबे त्यांच्या सर्व जीवंत पिढ्या ओरिजिनल काम करतच नाहीत तरी त्या त्याच जातीच्या म्हणवल्या जातात. हेच सगळ्या जातींसोबत घडते. मग मनुस्मृती म्हणते की व्यवसाय किंवा गुणांनुसार जात ठरते ते कसे? किंवा मनुस्मृती कालबाह्य झाली म्हणजे नक्की काय झाले आहे? मग ही आजची कंपार्टमेंट अवस्था कोठून आली? गोंधळ झालाय सगळा.
माझा प्रश्न खरंच गंभिर आहे. जाणकारांनी कृपया उत्तर द्यावे.
27 Mar 2016 - 6:35 am | अर्धवटराव
आता माझा पण गोंधळ झाला आहे. तुमचा नेमका प्रश्न मला कळला नाहि. शूद्र, फॉर दॅट मॅटर इतर कुठल्याही जातीत जन्म घेतला तर ब्राह्मण जातीत कसं परिवर्तन करायचं असच म्हणताहात ना? त्याचच उत्तर दिलय कि. थोडं इलॅबोरेट करायचं म्हटलं तर..
१) व्यवसाय निमीत्त करुन जात बदलायची झाल्यास (सो कॉल्ड) ब्रह्मकर्म करुन जात बदलता येते
२) अॅक्च्युअल शारीरीक पुनर्जन्म (जवळपास) अशक्य आहे, त्यामुळे द्वीज संस्कार घेऊन व्हर्च्युअल पुनर्जन्माद्वारे जात बदलता येते
३) वरीलपैकी कुठल्याही प्रकाराने समाजमान्य जातबदल होऊ शकतो (१००% समाजमान्यता मिळणार नाहि... अगदी देशस्थ, सारस्वत, द्विवेदी, शर्मा, मैथीली वगैरे समाजगटांना ब्राह्मण म्हणावं कि नाहि याबद्दल ब्रह्ममिपाजगात धाग्यांचे काश्मीर झालेले आहेत)
४) सरकार दरबारी प्रमाणपत्रावर जात कशी बदलतात माहित नाहि
26 Mar 2016 - 1:06 pm | आनन्दा
आज हा बदल सोपा आहे.. पण जर एखाद्या ब्राह्मणाला शूद्र व्हायचे म्हटले तर ते अजिबात शक्य नाही.
ह. घ्या.
26 Mar 2016 - 1:11 pm | तर्राट जोकर
अर्धवटराव व आनन्दा,
ते मी उदाहरण म्हणून दिले आहे. आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.
27 Mar 2016 - 12:03 am | आनन्दा
वर साहना यांनी उदाहरण दिलेले आहे.. जर तुम्ही आत्तापासून तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून सांगायला सुरुवात केलीत तर कदाचित पुढच्या २५ वर्षात तुम्ही पूर्ण ब्राह्मण बनून जाल..
पण अन्यथा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे - भारतीय कायदा जात बदलायची सवलत देत नाही. तेव्हा जात ही जन्मानेच ठरते. (किमान कायद्याच्या दृष्टीने). पण हा कायदा मुख्यत्वे आरक्षणाचा अपलाभ घेतला जाऊ नये यासाठी आहे. त्यामुळे ब्राह्मणेतरांनी मी ब्राह्मण आहे असे ठोकून दिले तरी कोणीही पुरावा मागणार नाही. मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही.
27 Mar 2016 - 12:40 am | मितभाषी
असे ठोकून दिले तरी दिसण्या बोलण्यावरून टोमणे ऐकावे लागतीलच.
27 Mar 2016 - 1:00 am | तर्राट जोकर
असं नसतं दादा. तुम्हाला मुद्दा कळला नाही काय? माझा प्रश्न फार महत्त्वाचा आणि गंभीर आहे.
वर साहना यांनी जे उदाहरण दिलंय ते फार जुनं आहे. तेव्हा तसं व्हायला काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती कारणीभूत होती. आता ते शक्य नाही. भारतीय कायद्याचं सोडा. असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय? जातीबाहेर काढण्याचे खूप कार्यक्रम चालत असतात भारतात. जन्माने जात ठरते ते कोण्या कायद्याने नाही. ते तसे आहे म्हणून कायदा बनलाय. जन्माने जात ठरणे स्वतंत्र भारताचे इन्वेन्शन नाही.
अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का?
मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही.
>> बरोबर आहे. पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाही. म्हणूनच म्हटले तुम्हाला हे कळणे शक्य आहे काय?
27 Mar 2016 - 1:09 am | काळा पहाड
मला वाटतं, नाही. अर्थातच, कुठलाही मराठा शुद्राला, ब्राहमणाला जातीत घेवू शकत नाही. शुद्रांबाबतही तेच.
27 Mar 2016 - 12:04 pm | आनन्दा
हे सामान्यपणे बरोबर आहे. सामान्यपणे जात रोटीबेटी व्यवहारांनी ठरत असे. त्यातले रोटी व्यवहार आता कालबाह्य झालेत. बेटी व्यवहार अजूनही आहेत. बाकी तुमच्या माहितीसाठी - ब्राह्मण जात पाळणारे अजूनही जर मुलगा ब्राह्मण पण मांसाहारी असेल तर आपली मुलगी देत नाहीत.
आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - तुम्ही जर ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलेत, तर तुम्ही नाही, पण तुमची मुले नक्कीच ब्राह्मण बनू शकतात.
हे थोडे स्पष्ट केलेत तर बरे होईल. कदाचित तुम्हाला मंदिर पूजेबद्दल म्हणायचे असेल - त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत अधिकारात जे असेल त्यात मी व्यक्तीची जात पाहण्यापेक्षा त्याचा अधिकारच बघेन. असो - इति लेखनसीमा, नाहीतर विषय दुसरीकडे जाईल.
27 Mar 2016 - 12:11 pm | आनन्दा
बाकी अवांतर - तुम्ही माणसात आलात हे पाहून जरा बरे वाटले.
ह. घ्या.
27 Mar 2016 - 1:14 pm | तर्राट जोकर
माणसांमधे माणसांसारखेच वागावे एवढी शुद्ध आहे अजुन =))
27 Mar 2016 - 4:33 pm | माहितगार
तजो,
कुणी जात बदलून मागेल का हा प्रश्न बाजूला ठेऊ; भारतीय राज्य घटनेच्या आर्टीकल १९ मधील पुढील बाबी एकत्र ठेऊन पहा,
All citizens shall have the right
(a) to freedom of speech and expression; (मी स्वतःला काय म्हणवून घ्यायचे जाहीर करायचे याचे तत्वतः स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे (डॉक्टर नसताना स्वतःला हेतु पुरस्सर तसे भासवणे इत्यादी गोष्टींना हे स्वातंत्र्य कदाचित लागू होणार नाही पण मी स्वतःला शूद्र, ब्राह्मण, क्षत्रीय अथवा अजून कुणा अमुक जातीचे म्हणून घेतले तर त्यावर बंधन घालणे शक्य नसावे, माझे करीअर सेल्स आणि बिझनेस डेव्हलेप्मेंटचे आहे क्वचित कुणि जातीचा उल्लेख केला तर मी स्वतःला गंमतीने वैश्य म्हणून सांगतो आणि माझ्या असे सांगण्यावर कायद्याचे सहसा बंधन येणार नाही)
(g) to practise any profession, or to carry on any occupation, trade or business
भारतीय जाती बर्याच प्रमाणावर ऑप्क्युपेशन रिलेटेड होत्या मी समजा स्वतःला सुतार जाहीर केले मे बी मी फक्त पेंसील छिलण्यापलिकडे कोणतेही सुतारकाम करत नाही तरीही भारतीय घटना मला सुतार म्हणवून घेण्याचे स्वातंत्र्य देते.
शिवाय मला धर्म विषयक Which includes freedom of conscience and free profession, practice, and propagation of religion, अशा स्वरुपाचे स्वातंत्र्य आहे मी माझ्या एकट्याने स्वतःला अमुक जातीचा जाहीर केले आणि ती जात हा माझा conscience आहे म्हटले की संपले.
हं विशीष्ट गोष्टींचा जसे की आरक्षणादी अथवा स्वतःला डॉक्टर नसाता डॉक्टर दाखवणे अशा हेतुपुरस्सर फायदा घेण्याचा मी प्रयत्न केल्यास तसे मला न करता येण्या इतपत मर्यादा असू शकतात.
चुभूदेघे
रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे
27 Mar 2016 - 5:00 pm | तर्राट जोकर
राज्यघटनेनुसार दिलेले आपले उत्तर योग्य आहे. तसेच काहीसे उत्तर अर्धवटराव यांनीही दिले. अर्थात ही कायद्याची एक बाजू झाली व तसेही कायदा जातपात मानत नाही (आरक्षणाच्या संदर्भात सोडून) तर समाज मानतो. शहरी व प्रगत भागातला नाही मानत पण इतर भागात हे प्रमाण कट्टर आहे.
दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु आहे.
27 Mar 2016 - 5:06 pm | माहितगार
ओके धार्मीक बाजूने म्हणताय ना ? टेक्नीकली हिंदू धर्मात कुणिही स्वतःला इश्वर म्हणूनही जाहीर करु शकते आणि माझ्यात आलेल्या इश्वराने माझी जात बदलली कोणाची आहे का मजाल ? बर तेही नाही तर तुमचे गुरु -गुरु कुणाला करायचे याचेही सातंत्र्य आहे- तुम्हाला हवीती उपाधी देण्यास स्वतंत्र असतात, तिसरा मार्ग ब्राह्मणांच्या स्थायी इश्वर आहे असा नियम वापरात आणला तर कोणत्याही ब्राह्मण माझ्यातल्या इश्वराने समोरच्या व्यक्तीची अथवा अख्य्ख्या समुदायाची जात बदलली अथवा धर्मात घेतले म्हटले तर हिंदू धर्माकडे यावर काही रास्त प्रतिवाद कितपत उपलब्ध असेल याची शंका वाटते.
27 Mar 2016 - 5:38 pm | भाऊंचे भाऊ
दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन
पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित
व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या
समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह
व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु
आहे.
माझ्या मोघम अल्पमतीनुसार आडनावही न बदलता निव्वळ अफ़ेडेविटवर व 5 नवीन जातबंधुच्या ना हरकत व स्वीकृति प्रमानपत्रावर आपल्या जातीची कायदेशीर नोंद बदलणे बेकायदेशीर ठरू नये
27 Mar 2016 - 4:06 pm | श्रीगुरुजी
बदल करण्याचे दोन मार्ग आहेत. एखाद्या ब्राह्मण कुटुंबात दत्तक जाणे हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग फक्त स्त्रियांसाठी आहे. एखाद्या अब्राह्मण स्त्रीने ब्राह्मण पती केला तर विवाहपश्चात ती ब्राह्मण होते.
27 Mar 2016 - 4:48 pm | माहितगार
जिथपर्यंत भारतीय घटना आणि कायद्यांचा प्रश्न आहे, मी सरकार पुरस्कृत विशीष्ट फायदे घेण्यासाठी म्हणून करत नसेन तर मी स्वतःला काय जाहीर करावे याच्याशी कायद्याला काहीही देणे घेणे नाही. मी स्वतःला अगदी ब्राह्मण घोषीत करु शकतो, अगदी कॉपीराईटेड ज्ञान सुद्धा (जो पर्यंत चार्जेस भरण्यास तयार आहे) ते सक्तीने उपलब्ध करवून घेऊ शकतो (संदर्भ कॉपीराईट कायदा), जे कॉपीराईट फ्री आहे त्यांच्या संबंधात तर प्रश्नच येत नाही उघड उघडपणे वापरु शकतो, मला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटना देते मी स्वतःला इर्रिस्पेक्टीव्ह ऑफ माय पार्श्वभूमी पुरोहीत जाहीर करुन पौराहीत्याचा व्यवसाय करु शकतो मला भारतात पौराहीत्य करायचे आहे का क्लिनींग एजन्सी चालवायची आहे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. एवढेच नाही मी इतरांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य झाल्याची प्रमाणपत्रे फुकटातही आणि पैसे घेऊनही वाटू शकेन.
भारतीय घटना स्वतःला इश्वर, प्रेषित, संत, गुरु जाहीर करण्याचे स्वातंत्र्य देतेच, पण दुर्दैवाने असे काही केल्यास कायदा हातात घेऊन अगदी दर दोन मिनीटाला घटनेची तुम्हाला आठवण देणारी मंडळी दुसर्या क्षणाला पलटून तुमच्या जिवावरही उठू शकतात हे भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सावट उठण्यास अद्याप लांबची मजल आहे हे निश्चित
26 Mar 2016 - 1:20 pm | विवेकपटाईत
प्रतिसादा बाबत धन्यवाद. आपले जुने ग्रंथ आपला ठेवा आहेत. प्रत्येकाच्या दृष्टीने काही चांगले आणी काही वाईट त्यात सर्वकाही असेल. बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला एक चांगला मनुष्य आणि युधिष्ठिरला एक वाईट माणूस शोधायला पाठवले. दोघेही रिकाम्या हाताने परत आले. एवढेच.
27 Mar 2016 - 6:25 am | hmangeshrao
दोघानी एकमेकाना आणलं असतं तर कोडं सुटलं असतं.
महाभारतही घडलं नसतं.
27 Mar 2016 - 7:40 am | नाना स्कॉच
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो...... :D