✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

व
विवेकपटाईत यांनी
Fri, 03/25/2016 - 11:01  ·  लेख
लेख
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही. मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65) महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला. ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः. ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत. (यजुर्वेद: ३१/११) या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्. विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्. (तैत्तिरीय उपनिषद ३/४) त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात. वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
27205 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

मनुस्मृती चांगला की वाईट ,

मराठी कथालेखक
Fri, 03/25/2016 - 19:02 नवीन
मनुस्मृती चांगला की वाईट , योग्य की अयोग्य या वादात पडण्यात काही मतलब नाही. आजच्या जीवनात आपली राज्यघटना हाच आपला धर्म आहे, मनुस्मृतीत लिहले आहे ते म्हणून अमूक कृती केली पण ती जर कायद्याच्या चौकटीत बसणारी नसेल तर न्यायालय शिक्षा करणारच ना ? ही राज्यघटना शास्त्रशुद्ध पध्दतीने , एका समितीने (म्हणजे अनेकांचा विचार त्यात आला) बनवलेली आहे, आणि सर्वात महत्वाची ती बहुतकरुन (मूळ ढाचा सोडल्यास) परिवर्तनीय आहे. त्यामुळे समाजसुधारकांनी घटनेचा अभ्यास करण्यात वेळ व उर्जा व्यतीत करावी हे अधिक योग्य, पुढे जावून घटनेतील त्रुटी (काही असल्यास) दूर करण्यासाठी प्रयत्न करावे (जनजागृती, लोकप्रतिनिधींशी चर्चा ई)
  • Log in or register to post comments

मनुस्मृती नामक एक ग्रंथ आहे

निनाद मुक्काम …
Fri, 03/25/2016 - 19:04 नवीन
मनुस्मृती नामक एक ग्रंथ आहे ह्याची अमुल्य माहिती नवीन पिढीला मिळावी ह्या उद्दात हेतूने तो जाळण्याची क्रिया अधून मधून काही समाजसेवक करत असतात. भाजपने आंबेडकरांना आपल्या आदरणीय व्यक्तींमध्ये समाविष्ट केले त्यांची जयंती साजरी करणे गरजेचे केले म्हणून आता भविष्यात मनुस्मृती रोहित हे शब्द कानावर पडत राहतील.
  • Log in or register to post comments

1)संजय सोनावणी यांच मनुस्मृती

चेक आणि मेट
Fri, 03/25/2016 - 21:03 नवीन
1)संजय सोनावणी यांच मनुस्मृती बद्दलचं मत 2)संजय सोनावणी यांच मनुस्मृती बद्दलचं मत
  • Log in or register to post comments

छान छान

खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 03/25/2016 - 23:14 नवीन
छान छान पण संजय सोनावणींचा एक वेगळाच मतप्रवाह असतो ब्वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

मनुस्मृतीबद्दल चर्चा झालेलीच

बॅटमॅन
Fri, 03/25/2016 - 22:27 नवीन
मनुस्मृतीबद्दल चर्चा झालेलीच आहे तरी काही मुद्दे मांडतो. १. मनुस्मृती, मिताक्षरा, इ. हिंदू धर्मशास्त्रावरच्या ग्रंथांमधील काही भाग आज भारताच्या सिव्हिल लॉ चा भाग आहे. २. मनुस्मृती बहुतांश लोकांनी पाहिलेलीही नसते. तेव्हा बहुसंख्यांना मनुवादी मनुवादी करत झोडपण्याअगोदर १४०० वर्षांपूर्वीच्या दुसर्‍या एका पोथीबद्दल बोलायची हिंमत आहे का, याचा इच्यार करावा. त्या पोथीचे समर्थक तर आजदेखील त्याप्रमाणेच आचरण करावे वगैरे बोंबलत असतात. ३. मनुस्मृतीतील त्याज्य भागाला 'गुणकर्मविभागशः' चे मधाचे बोट लावून त्याला उदात्त दाखवण्याची काहीएक गरज नाही.
  • Log in or register to post comments

गुणकर्मविभागशः निवळ्ळ थाप आहे

खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 03/25/2016 - 23:31 नवीन
गुणकर्मविभागशः निवळ्ळ थाप आहे. क्षत्रिय विश्वामित्र जेव्हा तपाने(कर्माने) ब्राह्मण्यत्व प्राप्त करू इच्छित होते,तेव्हा का व कोणी अडथळे आणले? आणि राजर्षी ही पदवी दिली पण ब्रह्मर्षी दिली नाही. आणि ते दुसरी सृष्टी निर्माण करू इच्छित होते म्हणून तपभंग केला हीसुद्धा थापच वाटते. नंतर अथक प्रयत्नांनी ते ब्रह्मर्षी झाले. गुणकर्मविभागशः म्हणायचं आणि कर्म करून जर कोणी वर येत असेल,तर अडथळे आणायचे हा निवळ्ळ दुतोंडीपणा आहे.
  • Log in or register to post comments

क्षत्रियाचे ब्राह्मण झालेले

बॅटमॅन
Sat, 03/26/2016 - 01:44 नवीन
क्षत्रियाचे ब्राह्मण झालेले अजून एक उदाहरण आहे बॉ. त्या केसमध्ये मात्र अडथळा आल्याचे माहिती नाही. राजा हरित नामक क्षत्रियाला अंगिरस ऋषींच्या ट्रेनिंगखाली ब्राह्मण करण्यात आले. त्यापासूनच हरितस गोत्र सुरू झाले. अंगिरस, अंबरीष आणि युवनाश्व हे तीन प्रवर या गोत्रात सांगितले जातात. https://en.wikipedia.org/wiki/Harita या गोत्राच्या ब्राह्मणांचे पूर्वज हे क्षत्रिय आहेत असे लिंगपुराणात सांगितले आहे. तेव्हा विश्वामित्राची केस वेगळी आहे. रायव्हलरीचा अँगल असणार त्याला, नैतर उगा द्यायचा म्हणून त्रास दिला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

ज्ञानेश्वरांबाबतही

ए ए वाघमारे
Sat, 03/26/2016 - 12:44 नवीन
असलंच काही संत ज्ञानेश्वरांबाबतही ऐकून आहे. आज काही ब्राह्मणद्वेष्ट्या लोकांकडून ज्ञानेश्वर ब्राह्मण होते म्हणून टीका होते.पण याबाबतीत प्रा.राम शेवाळकरांच्या एका व्याख्यानात असे ऐकल्याचे स्मरते की- तत्कालीन(आणि बहुधा आजही)हिंदू/वैदिक जातीत जन्मलेले मूल जन्मत: शूद्रच असते.नंतर उपनयन संस्कारानंतर त्याला ब्राह्मण्यत्व प्राप्त होते,ज्याला 'द्विज' किंवा दुसरा जन्म होणे असे म्हणतात.(संन्याश्याची मुले म्हणून नाकारल्या गेलेल्या)या उपनयन संस्काराच्या हक्कासाठी पैठणच्या धर्मपीठाशी कुलकर्णी बंधूंचा वाद झाला मग ते रेड्यामुखी वेद वगैरे..पण तो अधिकार अखेरपर्यंत न मिळाल्याने ज्ञानेश्वर हे धर्मशास्त्रीय दृष्ट्या शूद्रच राहिले. त्यामुळे त्यांचे अलौकिक कार्य हे ब्राह्मण म्हणून नसून शूद्र म्हणून होते असे मानावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जे काही असेल संतमंडळी एकीकडे

माहितगार
Sat, 03/26/2016 - 13:59 नवीन
जे काही असेल संतमंडळी एकीकडे विषमतेस नाकारताना काही सुधारणा करतानाही दिसतात यात संत एकनाथांचे उदाहरण घेता येते, पण त्याच वेळी काही जुन्या गोष्टींबाबत खासकरुन वर्णाश्रमधर्मा बाबत त्यांना पुरोगामी भूमिका घेण्या बाबत तेवढे यश मिळाले नसावे. ज्ञानेश्वरीतील उल्लेखांबद्दलचे आक्षेप यशवंत मनोहरांच्या या पुस्तिकेत दिसतात. मराठी विकिपीडियातील लेखातून साहित्यातील अस्पृश्यता आणि मराठी भाषेतील पारायण ग्रंथातील अस्पृश्यतेच्या उल्लेखांची दखल अंशतः घेतली असल्याचे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

हि थाप नाही. १८८० मधील

साहना
Sat, 03/26/2016 - 02:48 नवीन
हि थाप नाही. १८८० मधील ब्रिटीश सरकारचे सेन्सस रिपोर्ट पहा जास्त मागे जायची गरज नाही. जातीवार भेदाभेद असल्या तरी जाती प्रत्यक्षांत अतिशय fluid होत्या हे ह्या सेन्सस मधून मधून साबित झाले आणि ब्रिटीश लोकांनी म्हणून जातीवर सेन्सस बंद केले. दर सेन्सस मध्ये अनेक नवीन जाती उत्पन्न व्हायच्या तर काही जाती नामशेष व्हायच्या कारण जसे जसे एखाद्या जातीचे लोक श्रीमंत व्हायचे किंवा स्थलांतर करायचे तसे त्यांची जात सुद्धा ते बदलत असत. "नाभिक" लोक ह्या प्रमाणे सोयीस्कर रित्या "नायिक ब्राह्मण" झाले. अर्थांत ह्याला विरोध इथे तिथे होत असेलच पण तरी सुद्धा लोक जाती वर्ण बदलून घ्यायचे. हजारो वर्षांचा छळ असे आज काळ दलित इत्यादींच्या बाबती म्हटले जाते. छळ हा खरा असला तरी तो त्याच लोकांचा हजारो वर्षां पासून होत होता हि गोष्ट मात्र खोटी आहे. छळ करणारे आणि छळ होणारे लोक नेहमी बदलत गेले. आज कोणी ब्राह्मण सरकारी हपिसांत गेला काय किंवा दलित गेला काय, अपमानित झाल्याशिवाय परत येत नाही. सरकरी बडगा धारण करणारे आजचे छळ करते आहेत. आमच्या घराण्याचा ७०० वर्षां पासूनचा इतिहास उपलब्ध आहे. आमच्या पूर्वजांची वसाहत कुणी तरी उध्वस्त केली आणि हाती शस्त्र घेवून त्यांना mercenary प्रमाणे फिरावे लागले. शेवटी एका द्वैत वादी स्वमिजींशी त्यांची भेट झाली. त्यांचे अनेक शिष्य मुस्लिम शासकांनी मारले होते आणि स्वामीजी स्वतः सुरक्षा शोधत होते. आमच्या पूर्वजांनी त्यांना सुरक्षा दिली आणि बदल्यांत स्वामीजींनी त्यांच्या साठी गांव वसवण्याची तयारी दाखवली. हळू हळू वेदिक ज्ञान ह्या रक्षकांना देवून शेवटी हे लोक क्षत्रियाचे ब्राह्मण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

आपली संस्कृती कमालीची फ्लेग्जी अन व्यापक हाए

भाऊंचे भाऊ
Sat, 03/26/2016 - 08:03 नवीन
मनुक्शाला त्याच जन्मात त्याचा वर्ण दर दोन वर्षांनी चेंज करत राहायचीही सोय उपलब्ध होती का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

शंकराचार्यांनी अश्या बर्‍याच

आनन्दा
Sat, 03/26/2016 - 12:53 नवीन
शंकराचार्यांनी अश्या बर्‍याच जाती ब्लँकेट ब्राह्मण करून घेतळ्याचे वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

हिन्दू धर्मातील प्राचीन

हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 10:01 नवीन
हिन्दू धर्मातील प्राचीन ग्रंथातील चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त वाईट गोष्टीकडे लक्ष देऊन ते जाळणे म्हणजे बाम्हण बाम्हणेतर वाद पसरवणे. अशा गोष्टीचा वापर राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी करून घेतात. बर्याच वाईट प्रथा बंद करण्यामध्ये, जातपात न पाळणे, अस्पृषता न पाळणे, शिवरायांच्या स्वराज्यासाठी हातभार तसेच प्राणाची आहुती देणार्यामध्ये बाम्हणांचा सहभाग होता. हे सर्व विसरून फक्त भांडण लावत बसायचे. सध्याचे खरे प्रश्न दुष्काळ, बेकारी, दहशदवाद या गोष्टींवर चर्चा करून मार्ग काढण्याची जास्त गरज आहे.
  • Log in or register to post comments

हिन्दू धर्मातील प्राचीन

खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 03/26/2016 - 10:08 नवीन
हिन्दू धर्मातील प्राचीन ग्रंथातील वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त चांगल्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे बाम्हण बाम्हणेतर वाद पसरवणे. अशा गोष्टीचा वापर राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी करून घेतात. बर्याच वाईट प्रथा बंद करण्यामध्ये, जातपात न पाळणे, अस्पृषता न पाळणे, शिवरायांच्या स्वराज्यासाठी हातभार तसेच प्राणाची आहुती देणार्यामध्ये बहुजनांचा सहभाग होता. हे सर्व विसरून फक्त भांडण लावत बसायचे. सध्याचे खरे प्रश्न दुष्काळ, बेकारी, दहशदवाद या गोष्टींवर चर्चा करून मार्ग काढण्याची जास्त गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

...

hmangeshrao
Sat, 03/26/2016 - 11:04 नवीन
दोन आयडी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

पूर्ण प्रतिसाद वाचा दोघांचा

खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 03/26/2016 - 12:26 नवीन
पूर्ण प्रतिसाद वाचा दोघांचा काही शब्द बदललेले दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 12:57 नवीन
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
  • Log in or register to post comments

हो

अर्धवटराव
Sat, 03/26/2016 - 13:00 नवीन
पण आज मलाच ते नकोय. त्यात काहि तथ्यहि नाहि, फायदा तर मुळीच नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्ही होकारार्‍थी उत्तर दिले

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 14:48 नवीन
तुम्ही होकारार्‍थी उत्तर दिले आहे. ते नेमके कसे आणि कोठे होते त्याबद्दल सांगु शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आळंदी, तिरुपती, इस्कॉन..

अर्धवटराव
Sun, 03/27/2016 - 02:05 नवीन
इथे आध्यात्म, पौरोहित्य, शेंडी-जानव्याची औपचारीकता वगैरे सहीत कलियुगी ब्राह्मण्य मिळु शकतं. जात, लिंगभेद वगैरे भेदभाव न करता वेदविद्या शिकवणारे काहि आचार्य आहेत, त्यांच्याकडुन संथा मिळु शकते व पुढे अ‍ॅफीडेव्हीट फाईल करुन रीतसर अडणाव बदलुन ब्राह्मण्/पुरोहीत म्हणुन वावरता येतं. सनातन धर्मात वर्ण ट्रान्झीशनची नेमकी काय/कशी व्यवस्था होती माहित नाहि, पण ति होती एव्हढं नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अर्धवटराव. मी पौरोहित्य

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 03:24 नवीन
अर्धवटराव. मी पौरोहित्य करण्याच्या पात्रतेबद्दल विचारत नाही. अ‍ॅफिडेविट फाईल करुन आडनाव बदलेल. पण जात बदलत नाही. तुम्ही पुरोहित भटजी ब्राह्मण इत्यादी कसे व्हायचे ते सांगत आहात, तसे करुन तो व्यवसाय करण्याची पात्रता येईल फारतर. असे जातनिरपेक्ष पुरोहित तयार करण्याचे उल्लेखनिय काम गेली अनेक वर्ष गायत्री परिवार करत आहे. जसे कधीकाळी पौरोहित्य करनार्‍या खापरपणजोबाचा खापरपणतु भले भारतीय लष्करात सैनिक असेल तरी तो ब्राह्मणच. त्याचा मुलगाही ब्राह्मणच, क्षत्रिय नाही होत. किंवा त्याने उद्या कपडे शिवायचे दुकान टाकले तरी तो शिंपी नाही होत. माळ्याचा डिप्लोमा करुन सरकारी नोकरीत बागेचा माळी म्हणून जॉइन झाला तरी तो ब्राह्मणच राहतो. त्याचे सगळे जीवंत नातेवाईकांत आता कोणीही पौरोहित्य करत नाही तरी ते सगळे ब्राह्मणच. आज अनेक कुटूंबे त्यांच्या सर्व जीवंत पिढ्या ओरिजिनल काम करतच नाहीत तरी त्या त्याच जातीच्या म्हणवल्या जातात. हेच सगळ्या जातींसोबत घडते. मग मनुस्मृती म्हणते की व्यवसाय किंवा गुणांनुसार जात ठरते ते कसे? किंवा मनुस्मृती कालबाह्य झाली म्हणजे नक्की काय झाले आहे? मग ही आजची कंपार्टमेंट अवस्था कोठून आली? गोंधळ झालाय सगळा. माझा प्रश्न खरंच गंभिर आहे. जाणकारांनी कृपया उत्तर द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

गोंधळ झालाय सगळा.

अर्धवटराव
Sun, 03/27/2016 - 06:35 नवीन
आता माझा पण गोंधळ झाला आहे. तुमचा नेमका प्रश्न मला कळला नाहि. शूद्र, फॉर दॅट मॅटर इतर कुठल्याही जातीत जन्म घेतला तर ब्राह्मण जातीत कसं परिवर्तन करायचं असच म्हणताहात ना? त्याचच उत्तर दिलय कि. थोडं इलॅबोरेट करायचं म्हटलं तर.. १) व्यवसाय निमीत्त करुन जात बदलायची झाल्यास (सो कॉल्ड) ब्रह्मकर्म करुन जात बदलता येते २) अ‍ॅक्च्युअल शारीरीक पुनर्जन्म (जवळपास) अशक्य आहे, त्यामुळे द्वीज संस्कार घेऊन व्हर्च्युअल पुनर्जन्माद्वारे जात बदलता येते ३) वरीलपैकी कुठल्याही प्रकाराने समाजमान्य जातबदल होऊ शकतो (१००% समाजमान्यता मिळणार नाहि... अगदी देशस्थ, सारस्वत, द्विवेदी, शर्मा, मैथीली वगैरे समाजगटांना ब्राह्मण म्हणावं कि नाहि याबद्दल ब्रह्ममिपाजगात धाग्यांचे काश्मीर झालेले आहेत) ४) सरकार दरबारी प्रमाणपत्रावर जात कशी बदलतात माहित नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आज हा बदल सोपा आहे.. पण जर

आनन्दा
Sat, 03/26/2016 - 13:06 नवीन
आज हा बदल सोपा आहे.. पण जर एखाद्या ब्राह्मणाला शूद्र व्हायचे म्हटले तर ते अजिबात शक्य नाही. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अर्धवटराव व आनन्दा,

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 13:11 नवीन
अर्धवटराव व आनन्दा, ते मी उदाहरण म्हणून दिले आहे. आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

वर साहना यांनी उदाहरण दिलेले

आनन्दा
Sun, 03/27/2016 - 00:03 नवीन
वर साहना यांनी उदाहरण दिलेले आहे.. जर तुम्ही आत्तापासून तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून सांगायला सुरुवात केलीत तर कदाचित पुढच्या २५ वर्षात तुम्ही पूर्ण ब्राह्मण बनून जाल.. पण अन्यथा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे - भारतीय कायदा जात बदलायची सवलत देत नाही. तेव्हा जात ही जन्मानेच ठरते. (किमान कायद्याच्या दृष्टीने). पण हा कायदा मुख्यत्वे आरक्षणाचा अपलाभ घेतला जाऊ नये यासाठी आहे. त्यामुळे ब्राह्मणेतरांनी मी ब्राह्मण आहे असे ठोकून दिले तरी कोणीही पुरावा मागणार नाही. मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असे ठोकून दिले तरी दिसण्या

मितभाषी
Sun, 03/27/2016 - 00:40 नवीन
असे ठोकून दिले तरी दिसण्या बोलण्यावरून टोमणे ऐकावे लागतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

असं नसतं दादा. तुम्हाला

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 01:00 नवीन
असं नसतं दादा. तुम्हाला मुद्दा कळला नाही काय? माझा प्रश्न फार महत्त्वाचा आणि गंभीर आहे. वर साहना यांनी जे उदाहरण दिलंय ते फार जुनं आहे. तेव्हा तसं व्हायला काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती कारणीभूत होती. आता ते शक्य नाही. भारतीय कायद्याचं सोडा. असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय? जातीबाहेर काढण्याचे खूप कार्यक्रम चालत असतात भारतात. जन्माने जात ठरते ते कोण्या कायद्याने नाही. ते तसे आहे म्हणून कायदा बनलाय. जन्माने जात ठरणे स्वतंत्र भारताचे इन्वेन्शन नाही. अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का? मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही. >> बरोबर आहे. पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाही. म्हणूनच म्हटले तुम्हाला हे कळणे शक्य आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अमूक एका विधीने कोण्या

काळा पहाड
Sun, 03/27/2016 - 01:09 नवीन
अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का?
मला वाटतं, नाही. अर्थातच, कुठलाही मराठा शुद्राला, ब्राहमणाला जातीत घेवू शकत नाही. शुद्रांबाबतही तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असं कोणाला कोणीही आपल्या

आनन्दा
Sun, 03/27/2016 - 12:04 नवीन
असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय?
हे सामान्यपणे बरोबर आहे. सामान्यपणे जात रोटीबेटी व्यवहारांनी ठरत असे. त्यातले रोटी व्यवहार आता कालबाह्य झालेत. बेटी व्यवहार अजूनही आहेत. बाकी तुमच्या माहितीसाठी - ब्राह्मण जात पाळणारे अजूनही जर मुलगा ब्राह्मण पण मांसाहारी असेल तर आपली मुलगी देत नाहीत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - तुम्ही जर ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलेत, तर तुम्ही नाही, पण तुमची मुले नक्कीच ब्राह्मण बनू शकतात.
पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाही
हे थोडे स्पष्ट केलेत तर बरे होईल. कदाचित तुम्हाला मंदिर पूजेबद्दल म्हणायचे असेल - त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत अधिकारात जे असेल त्यात मी व्यक्तीची जात पाहण्यापेक्षा त्याचा अधिकारच बघेन. असो - इति लेखनसीमा, नाहीतर विषय दुसरीकडे जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बाकी अवांतर - तुम्ही माणसात

आनन्दा
Sun, 03/27/2016 - 12:11 नवीन
बाकी अवांतर - तुम्ही माणसात आलात हे पाहून जरा बरे वाटले. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

माणसांमधे माणसांसारखेच वागावे

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 13:14 नवीन
माणसांमधे माणसांसारखेच वागावे एवढी शुद्ध आहे अजुन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

लाभ-हेतुविषयक विशीष्ट मर्यादा सोडल्यास स्वातंत्र्य असावे

माहितगार
Sun, 03/27/2016 - 16:33 नवीन
आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.
तजो, कुणी जात बदलून मागेल का हा प्रश्न बाजूला ठेऊ; भारतीय राज्य घटनेच्या आर्टीकल १९ मधील पुढील बाबी एकत्र ठेऊन पहा, All citizens shall have the right (a) to freedom of speech and expression; (मी स्वतःला काय म्हणवून घ्यायचे जाहीर करायचे याचे तत्वतः स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे (डॉक्टर नसताना स्वतःला हेतु पुरस्सर तसे भासवणे इत्यादी गोष्टींना हे स्वातंत्र्य कदाचित लागू होणार नाही पण मी स्वतःला शूद्र, ब्राह्मण, क्षत्रीय अथवा अजून कुणा अमुक जातीचे म्हणून घेतले तर त्यावर बंधन घालणे शक्य नसावे, माझे करीअर सेल्स आणि बिझनेस डेव्हलेप्मेंटचे आहे क्वचित कुणि जातीचा उल्लेख केला तर मी स्वतःला गंमतीने वैश्य म्हणून सांगतो आणि माझ्या असे सांगण्यावर कायद्याचे सहसा बंधन येणार नाही) (g) to practise any profession, or to carry on any occupation, trade or business भारतीय जाती बर्‍याच प्रमाणावर ऑप्क्युपेशन रिलेटेड होत्या मी समजा स्वतःला सुतार जाहीर केले मे बी मी फक्त पेंसील छिलण्यापलिकडे कोणतेही सुतारकाम करत नाही तरीही भारतीय घटना मला सुतार म्हणवून घेण्याचे स्वातंत्र्य देते. शिवाय मला धर्म विषयक Which includes freedom of conscience and free profession, practice, and propagation of religion, अशा स्वरुपाचे स्वातंत्र्य आहे मी माझ्या एकट्याने स्वतःला अमुक जातीचा जाहीर केले आणि ती जात हा माझा conscience आहे म्हटले की संपले. हं विशीष्ट गोष्टींचा जसे की आरक्षणादी अथवा स्वतःला डॉक्टर नसाता डॉक्टर दाखवणे अशा हेतुपुरस्सर फायदा घेण्याचा मी प्रयत्न केल्यास तसे मला न करता येण्या इतपत मर्यादा असू शकतात. चुभूदेघे रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

राज्यघटनेनुसार दिलेले आपले

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 17:00 नवीन
राज्यघटनेनुसार दिलेले आपले उत्तर योग्य आहे. तसेच काहीसे उत्तर अर्धवटराव यांनीही दिले. अर्थात ही कायद्याची एक बाजू झाली व तसेही कायदा जातपात मानत नाही (आरक्षणाच्या संदर्भात सोडून) तर समाज मानतो. शहरी व प्रगत भागातला नाही मानत पण इतर भागात हे प्रमाण कट्टर आहे. दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ओके धार्मीक बाजूने म्हणताय ना

माहितगार
Sun, 03/27/2016 - 17:06 नवीन
ओके धार्मीक बाजूने म्हणताय ना ? टेक्नीकली हिंदू धर्मात कुणिही स्वतःला इश्वर म्हणूनही जाहीर करु शकते आणि माझ्यात आलेल्या इश्वराने माझी जात बदलली कोणाची आहे का मजाल ? बर तेही नाही तर तुमचे गुरु -गुरु कुणाला करायचे याचेही सातंत्र्य आहे- तुम्हाला हवीती उपाधी देण्यास स्वतंत्र असतात, तिसरा मार्ग ब्राह्मणांच्या स्थायी इश्वर आहे असा नियम वापरात आणला तर कोणत्याही ब्राह्मण माझ्यातल्या इश्वराने समोरच्या व्यक्तीची अथवा अख्य्ख्या समुदायाची जात बदलली अथवा धर्मात घेतले म्हटले तर हिंदू धर्माकडे यावर काही रास्त प्रतिवाद कितपत उपलब्ध असेल याची शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

दुसरी बाजू अशी की जसे खाली

भाऊंचे भाऊ
Sun, 03/27/2016 - 17:38 नवीन
दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु आहे. माझ्या मोघम अल्पमतीनुसार आडनावही न बदलता निव्वळ अफ़ेडेविटवर व 5 नवीन जातबंधुच्या ना हरकत व स्वीकृति प्रमानपत्रावर आपल्या जातीची कायदेशीर नोंद बदलणे बेकायदेशीर ठरू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा

श्रीगुरुजी
Sun, 03/27/2016 - 16:06 नवीन
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
बदल करण्याचे दोन मार्ग आहेत. एखाद्या ब्राह्मण कुटुंबात दत्तक जाणे हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग फक्त स्त्रियांसाठी आहे. एखाद्या अब्राह्मण स्त्रीने ब्राह्मण पती केला तर विवाहपश्चात ती ब्राह्मण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा

माहितगार
Sun, 03/27/2016 - 16:48 नवीन
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
जिथपर्यंत भारतीय घटना आणि कायद्यांचा प्रश्न आहे, मी सरकार पुरस्कृत विशीष्ट फायदे घेण्यासाठी म्हणून करत नसेन तर मी स्वतःला काय जाहीर करावे याच्याशी कायद्याला काहीही देणे घेणे नाही. मी स्वतःला अगदी ब्राह्मण घोषीत करु शकतो, अगदी कॉपीराईटेड ज्ञान सुद्धा (जो पर्यंत चार्जेस भरण्यास तयार आहे) ते सक्तीने उपलब्ध करवून घेऊ शकतो (संदर्भ कॉपीराईट कायदा), जे कॉपीराईट फ्री आहे त्यांच्या संबंधात तर प्रश्नच येत नाही उघड उघडपणे वापरु शकतो, मला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटना देते मी स्वतःला इर्रिस्पेक्टीव्ह ऑफ माय पार्श्वभूमी पुरोहीत जाहीर करुन पौराहीत्याचा व्यवसाय करु शकतो मला भारतात पौराहीत्य करायचे आहे का क्लिनींग एजन्सी चालवायची आहे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. एवढेच नाही मी इतरांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य झाल्याची प्रमाणपत्रे फुकटातही आणि पैसे घेऊनही वाटू शकेन. भारतीय घटना स्वतःला इश्वर, प्रेषित, संत, गुरु जाहीर करण्याचे स्वातंत्र्य देतेच, पण दुर्दैवाने असे काही केल्यास कायदा हातात घेऊन अगदी दर दोन मिनीटाला घटनेची तुम्हाला आठवण देणारी मंडळी दुसर्‍या क्षणाला पलटून तुमच्या जिवावरही उठू शकतात हे भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सावट उठण्यास अद्याप लांबची मजल आहे हे निश्चित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

प्रतिसादा बाबत धन्यवाद.

विवेकपटाईत
Sat, 03/26/2016 - 13:20 नवीन
प्रतिसादा बाबत धन्यवाद. आपले जुने ग्रंथ आपला ठेवा आहेत. प्रत्येकाच्या दृष्टीने काही चांगले आणी काही वाईट त्यात सर्वकाही असेल. बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला एक चांगला मनुष्य आणि युधिष्ठिरला एक वाईट माणूस शोधायला पाठवले. दोघेही रिकाम्या हाताने परत आले. एवढेच.
  • Log in or register to post comments

आँ

hmangeshrao
Sun, 03/27/2016 - 06:25 नवीन
दोघानी एकमेकाना आणलं असतं तर कोडं सुटलं असतं. महाभारतही घडलं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो...... :D

नाना स्कॉच
Sun, 03/27/2016 - 07:40 नवीन
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो...... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

हेहेहेहेहेहेहे खतरनाक. महालोल

अभ्या..
Sun, 03/27/2016 - 11:33 नवीन
हेहेहेहेहेहेहे खतरनाक. महालोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

@ hmangeshrao पटाईतांनी

माहितगार
Sun, 03/27/2016 - 16:52 नवीन
@ hmangeshrao पटाईतांनी दिलेली स्टोरी दोनच वाक्याची असलीतरी नीट वाचल्यास गोंधळ होणार नाही किंवा कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

काय म्हणताय ?

माहितगार
Sun, 03/27/2016 - 16:58 नवीन
बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला एक चांगला मनुष्य आणि युधिष्ठिरला एक वाईट माणूस शोधायला पाठवले. दोघेही रिकाम्या हाताने परत आले. एवढेच.
:) पटाईतजी हि गोष्ट अजून दोनदा वाचावी, एवढ्याच गोष्टीचा विचार केल्यास दुर्योधन राजा होण्यास ठिक आहे आहे आणि युधिष्ठीर साधू होण्यास ठिक आहे. राजाचे कामच न्याय देणे असते. त्याच प्रमाणे समाज शास्त्रज्ञांचे आणि समीक्षकांचे टिकाकारांचे कामच समिक्षा आणि टिका करणे असते, त्यांनी (टिकाकारांनी) त्यांच्या टिकेच्या धर्माला अनुसरुन असूनही टिका न करणे योग्य नाही, अगदी गुणकर्म विभागशः वाला नियम लावला तर मनुस्मृतीवर टिकाकारांनी टिका केलीच पाहीजे कारण ते त्यांच्या आयुष्याचे इतिकर्तव्यही असेल. काय म्हणताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

क्षत्रियाचा जन्म बाहूतून.

प्रदीप साळुंखे
Sat, 03/26/2016 - 13:22 नवीन
क्षत्रियाचा जन्म बाहूतून. वैश्याचा जन्म जंघेतून झाला. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला हे भारतापुरतच मर्यादित आहे ना? भारतीयांचा परमेश्वर वेगळा,आणि बाहेरच्यांचा वेगळा?मज्जाच हाय कि! : : सबका मालिक एक|
  • Log in or register to post comments

आजही मनुस्म्रूती चे गोडवे

मितभाषी
Sat, 03/26/2016 - 13:42 नवीन
आजही मनुस्म्रूती चे गोडवे गाणारे माणसं (? ) आहेत म्हणायच. यातून मनोव्रूत्ती दिसून येते. आज सर्वच समाज सुशिक्षित झाल्यामूळे त्यांना गंडवणे अवघड झाले आहे. भारतीय समाज जातीयवादी शक्तींना कधीच थारा देत नाहीत. मोदीकडे पाहूण ह्यावेळेस संधी दिली आहे. जातीयवाद्यांनी असाच उच्छाद मांडला तर पुढच्या पंचवार्षिक ला जनता यांना घरी बसवेल.
  • Log in or register to post comments

मनुस्मृती खरच कालबाह्य आहे का?

सत्याचे प्रयोग
Sat, 03/26/2016 - 14:40 नवीन
मनुस्मृती खरच कालबाह्य झाली म्हणतात मग मनुस्मृतीवर शासनाने बंदी घालूनही पुनःप्रकाशन करायचा उद्देश काय असेल बरं?
  • Log in or register to post comments

संदर्भ हवा

माहितगार
Sat, 03/26/2016 - 19:07 नवीन
मनुस्मृतीवर शासनाने बंदी घालूनही..
@ सत्याचे प्रयोग, १) कृ. संदर्भ नमुद कराल काय. २) आणि मनुस्मृतीवर टिका लेखन अधिक आहे का समर्थन विषयक ? मला वाटते टिकात्मक लेखन अधिक असावे. टिकालेखन झाले आहे आणि टिका लेखनाबाबत समाजात सजगता आहे तरी सुद्धा मनुस्मृतीच्या प्रकाशनाची आपण भिती बाळगता का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

मनुस्मृती वर बंदी

सत्याचे प्रयोग
Sat, 03/26/2016 - 21:27 नवीन
आपणास मनुस्मृतीवर बंदी असलेचा जी. आर. अपेक्षित आहे की सध्या बाजारात मनुस्मृती मिळतेय याचा संदर्भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी

हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 17:43 नवीन
हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे. इतके प्राचीन पुस्तके हल्लीची मुले वाचतात तरी का? अभ्यास करता करता तंगून जातात. ही सगळी काॅग्रेसची खेळी आहे. पक्षाला वाचविण्यासाठी मरमर चालली आहे.
  • Log in or register to post comments

हजारो वर्षांपूर्वीची जात आजही

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 17:58 नवीन
हजारो वर्षांपूर्वीची जात आजही पाळली जाते. प्रत्यक्ष जीवनात ज्या गोष्टी आहेत त्याची पाळेमुळे खणुन काढण्याला का विरोध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा