आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.
जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.
मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.
हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का?
अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65)
महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.
ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.
(यजुर्वेद: ३१/११)
या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे.
ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे.
अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.
(तैत्तिरीय उपनिषद ३/४)
त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच.
क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.
वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे.
आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.
हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
प्रतिक्रिया
27 Mar 2016 - 11:33 am | अभ्या..
हेहेहेहेहेहेहे
खतरनाक.
महालोल
27 Mar 2016 - 4:52 pm | माहितगार
@ hmangeshrao पटाईतांनी दिलेली स्टोरी दोनच वाक्याची असलीतरी नीट वाचल्यास गोंधळ होणार नाही किंवा कसे
27 Mar 2016 - 4:58 pm | माहितगार
:) पटाईतजी हि गोष्ट अजून दोनदा वाचावी, एवढ्याच गोष्टीचा विचार केल्यास दुर्योधन राजा होण्यास ठिक आहे आहे आणि युधिष्ठीर साधू होण्यास ठिक आहे. राजाचे कामच न्याय देणे असते. त्याच प्रमाणे समाज शास्त्रज्ञांचे आणि समीक्षकांचे टिकाकारांचे कामच समिक्षा आणि टिका करणे असते, त्यांनी (टिकाकारांनी) त्यांच्या टिकेच्या धर्माला अनुसरुन असूनही टिका न करणे योग्य नाही, अगदी गुणकर्म विभागशः वाला नियम लावला तर मनुस्मृतीवर टिकाकारांनी टिका केलीच पाहीजे कारण ते त्यांच्या आयुष्याचे इतिकर्तव्यही असेल. काय म्हणताय ?
26 Mar 2016 - 1:22 pm | प्रदीप साळुंखे
क्षत्रियाचा जन्म बाहूतून.
वैश्याचा जन्म जंघेतून झाला.
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला
हे भारतापुरतच मर्यादित आहे ना?
भारतीयांचा परमेश्वर वेगळा,आणि बाहेरच्यांचा वेगळा?मज्जाच हाय कि!
:
:
सबका मालिक एक|
26 Mar 2016 - 1:42 pm | मितभाषी
आजही मनुस्म्रूती चे गोडवे गाणारे माणसं (? ) आहेत म्हणायच.
यातून मनोव्रूत्ती दिसून येते. आज सर्वच समाज सुशिक्षित झाल्यामूळे त्यांना गंडवणे अवघड झाले आहे.
भारतीय समाज जातीयवादी शक्तींना कधीच थारा देत नाहीत. मोदीकडे पाहूण ह्यावेळेस संधी दिली आहे. जातीयवाद्यांनी असाच उच्छाद मांडला तर पुढच्या पंचवार्षिक ला जनता यांना घरी बसवेल.
26 Mar 2016 - 2:40 pm | सत्याचे प्रयोग
मनुस्मृती खरच कालबाह्य झाली म्हणतात मग मनुस्मृतीवर शासनाने बंदी घालूनही पुनःप्रकाशन करायचा उद्देश काय असेल बरं?
26 Mar 2016 - 7:07 pm | माहितगार
@ सत्याचे प्रयोग, १) कृ. संदर्भ नमुद कराल काय.
२) आणि मनुस्मृतीवर टिका लेखन अधिक आहे का समर्थन विषयक ? मला वाटते टिकात्मक लेखन अधिक असावे. टिकालेखन झाले आहे आणि टिका लेखनाबाबत समाजात सजगता आहे तरी सुद्धा मनुस्मृतीच्या प्रकाशनाची आपण भिती बाळगता का.
26 Mar 2016 - 9:27 pm | सत्याचे प्रयोग
आपणास मनुस्मृतीवर बंदी असलेचा जी. आर. अपेक्षित आहे की सध्या बाजारात मनुस्मृती मिळतेय याचा संदर्भ
26 Mar 2016 - 5:43 pm | हेमंत लाटकर
हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे. इतके प्राचीन पुस्तके हल्लीची मुले वाचतात तरी का? अभ्यास करता करता तंगून जातात. ही सगळी काॅग्रेसची खेळी आहे. पक्षाला वाचविण्यासाठी मरमर चालली आहे.
26 Mar 2016 - 5:58 pm | तर्राट जोकर
हजारो वर्षांपूर्वीची जात आजही पाळली जाते. प्रत्यक्ष जीवनात ज्या गोष्टी आहेत त्याची पाळेमुळे खणुन काढण्याला का विरोध आहे?
26 Mar 2016 - 8:09 pm | उगा काहितरीच
कोण करत आहे विरोध ?
26 Mar 2016 - 8:20 pm | तर्राट जोकर
लाटकर साहेब.
26 Mar 2016 - 7:19 pm | तर्राट जोकर
मेरे सवाल का कोई जवाब नही आया अबतक...????
27 Mar 2016 - 2:00 pm | काळा पहाड
पाळेमुळे खणून काढणे म्हणजे नक्की काय करणार? लोकांच्या खाजगी जीवनात एका मर्यादेपलिकडे जाता येत नाही. सरकार जे प्रयत्न करतं ते प्रबोधनात्मक असतात. पण जातीचं वलय आणि त्याचे आर्थिक फायदे पहाता लोक असे प्रयत्न फाट्यावरच मारत असणार. शिवाय प्रत्येक जातीला स्वतःची जात सर्वश्रेष्ठ वाटते. जरी ते तथाकथित रित्या निम्न जातीत जन्माला आले असले तरी.
त्याचं काय?
जात एकाच प्रकारे जावू शकत होती की जातीचे सर्व उल्लेख सार्वजनिक जीवनातून नाहीसे करणे. तसं होतंय का? आरक्षण, निवडणुका, जात पंचायती वगैरे मुळे जात संस्था उलट जास्त उल्लेखनीय, अ-लवचिक आणि प्रखर झाली आहे. तेव्हा मुदलातल्या घोळामुळे व्याजावर परिणाम झाला आहे.
27 Mar 2016 - 2:21 pm | तर्राट जोकर
तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त पद्धतीने जातबदल करणे शक्य आहे का? सगळे जे जातीपातीवरुन ओरडतात त्या सगळ्यांना एकजात ब्राह्मण करुन टाका काही शुद्धीकरण, बदलीकरण विधी असतील तर. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आसेतु हिमाचल सग्ळे हिंदु एकाच जातीचे. सग्ळेच ब्राह्मण. बाबासाहेबांनी धर्मांतर केले. आता जात्यांतर होऊ देत.
27 Mar 2016 - 4:54 pm | काळा पहाड
एक आधार कार्ड वाटायचं तर हजार भानगडी झाल्या. इथे किती घोळ होतील! तेव्हा हा प्रकार अव्यावहारिक आहे. शिवाय लोकांची मानसिकता एका पिढीत बदलली जाणं शक्य नाही. यासाठी प्रबोधन आणि शिक्षण हेच फक्त उपयुक्त आहे. दुरदैवाने, शिक्षण घेवून सुद्धा मानसिकता बदलेल असं नाही. सुशिक्शित लोक आपल्या मानसिकतेच्या टोळ्या तयार करतात. अनेक बाईक्स वर आणि कार्स वर सध्या ||मराठा|| असे बोर्ड दिसतायत. जणू की ती काही एक शूरवीर असल्याची पावतीच आहे. अजून मी ब्राम्हण, माळी, महार असे बोर्ड बघितले नाहीत पण ते दिवसही फार दूर नसावेत. शिवाय ब्राम्हणांचं तरी सुद्धा ठीक आहे. पण ब्राम्हण झालेले मराठा आणि ब्राम्हण झालेले महार किती एकत्र बसू शकतील याबद्दल मला शंका आहे. प्रत्यक जातीची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत. सगळे लोक एकदम शाकाहारी होतील? नसल्यास तसं करण्याला काय अर्थ आहे?
27 Mar 2016 - 5:30 pm | तर्राट जोकर
ते गाड्यांवर नावं लावणे तर बुद्धीहिन चळवळ आहे नुसती. ;-)
प्रत्येक जातीचीच काय प्रत्येक घराण्याची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत तरी ती शंभर, दोनशे, हजार कुटुंबे एकाच जातीचे नाव लावतात. एकाच कुटुंबाच्या वेगवेगळ्या शाखांमधेही हे वैविध्य दिसून येतं तरी आम्ही शाहण्णव कुळी, तमके मराठा, अमके ब्राह्मण असे बिरुदं लोक चिकटवतांना दिसतात. तरी ही लोक एकत्र बसू शकतात. अर्थात तुम्ही म्हणताय तीच रीअॅलिटी आहे. पण मुक्तकल्पनारंजनातुन काही हाती लागेल काय हाही विचार आहे.
26 Mar 2016 - 8:05 pm | हेमंत लाटकर
जगाच्या अंतापर्यंत जातीचे व धर्माचे अस्तित्व राहणार!
27 Mar 2016 - 10:24 am | हकु
सध्या देशाच्या कुठल्या भागात मनुस्मृती प्रमाण मानून कायदा चालवला जातो?
27 Mar 2016 - 10:31 am | भाऊंचे भाऊ
जसे कधीकाळी इंग्रज राज्य करीत होते तसं.... फक्त एकच प्रॉब्लम आहे इंग्रजांचे कायदे कानून मानवनिर्मित तर मनुस्मृती 100% तशी म्हणता येत नाही अन प्रश्न हां येतो की त्याचे प्रेरक निर्माते आजही अस्तित्वात आहेत की कधीच न्हवते यावर तुम्ही काय विश्वास ठेवता
27 Mar 2016 - 10:36 am | हकु
बरं. मग त्याचे प्रेरक निर्माते आज अस्तित्वात आहेत असं वाटतंय का?
जर हो, तर ते कोण ?
ते अजूनही मनुस्मृती नुसार वागण्यासाठी सांगत आहेत का?
मग जाळपोळ करून विरोध नक्की कोणाला?
27 Mar 2016 - 10:42 am | भाऊंचे भाऊ
पण आजही कोणी नाझिवाद प्रमाण मानत असेल जोपासत असेल तर केला जाणारा विरोध मेलेल्या हिटलरला नक्कीच नसावा नाहिका ?
27 Mar 2016 - 10:36 am | अनुप ढेरे
वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा. पूर्ण कायदा नाही पण वारस कायदे बनवताना मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे.
27 Mar 2016 - 1:57 pm | हकु
बॅटमॅन यांचा हा मुद्दा जर इथे लक्षात घेतला तर मग मला सांगा की हा हिंदू धर्माशास्त्रावरील काही भाग ग्राह्य धरण्यास संमती कोणी दिली ?
घटनाकारांनी का?
जर तसे असेल तर मग मनुस्मृतीस विरोध हा घटनाकारांना केलेला विरोध म्हणायला हवा ना?
27 Mar 2016 - 4:14 pm | हेमंत लाटकर
Indian law म्हणजे British law चे झेराॅक्स आहे.