'One for the road' असलेल्या या जगात कायम 'जेके मालवणकर' सारखं जगण्याची प्रेरणा देऊन माझ्या 'पार्टनर' असलेल्या 'सखी' शी कायम प्रामाणिक राहण्याची शिकवण देणारा 'दोस्त' म्हणजे व.पु.
तुला माहितीये गेल्या वर्ष भरात कित्येक जणांनी 'रंग मनाचे' दाखवलेत.
या दुनियेच्या 'भूलभुलैया' मध्ये 'माझं माझ्यापाशी' काहीच राहिलेलं नसताना मनात प्रेरणेचा 'हुंकार' भरून या 'तप्तपदी' वर चालण्याचं बळ तूच दिलंस.
तुझ्या प्रत्येक शब्दांत एक जादू भरलेली आहे, जी जगण्याची अखंड प्रेरणा देत राहते.
पण मी मात्र केवळ जन्मदिवसाच्या शुभेच्छांशिवाय तुला काय देवू शकतो शब्दसम्राटा ????
कदाचित काहीच नाही.
आज माझ्या या चिरतरुण दोस्ताचा ८४ वा वाढदिवस.
तेव्हा हॅप्पी बर्थडे व.पु. असाच चिरतरुण रहा.
प्रतिक्रिया
25 Mar 2016 - 9:55 am | कोंबडी प्रेमी
मोजक्या प्रमाणात वाचले तर बरे वाटले सुरुवातीला ...
पुढे पुढे उगीच अत्यंत फालतू मुद्दे मोठ्या तत्त्वज्ञा सारखी सूत्रे टाकून मांडायची खोड जडली होती
काही कथाकथनात्मक गोष्टींमध्ये व्यभिचाराचे अनावश्यक समर्थन ...
कलाकार वेगळा , त्याची मनोवस्था वेगळी त्याच्या भावनिक गरजा वेगळ्या आणि म्हणून त्याचे वागणे समर्थनीय ...कसेही असले तरी ..असा काहीसा सूर ....(जाता जाता मी हि कलाकार हे सुचवणे)
दया डोंग्रेन्ब्रोब्र केलेला गजरा ...अक्षता ह्या शब्दावरून केले अत्यंत सुमार दर्जाचे विनोद ....
अत्यंत डोक्यात गेले होते तेव्हाही ...आताहि ...
वास्तविक तप्तपदी वगैरे काही काही लिखाण जबरदस्त ...पण आत्मस्तुती आणि अतिरेक ह्या गोष्टींमुळे नकोसे झाले ...
26 Mar 2016 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा
@पुढे पुढे उगीच अत्यंत फालतू मुद्दे मोठ्या तत्त्वज्ञा सारखी सूत्रे टाकून मांडायची खोड जडली होती
काही कथाकथनात्मक गोष्टींमध्ये व्यभिचाराचे अनावश्यक समर्थन ... >> +++१११ आहो त्यांच्या सुरवातीच्या कथाकथनाच्या क्यासेटीत तर लाफ्टर वरतून मिक्स केलेले आहेत. जस्ट टुकार!
25 Mar 2016 - 10:29 am | कापूसकोन्ड्या
ऐक सखे वाचा
25 Mar 2016 - 12:49 pm | सतिश गावडे
आयुष्याच्या एका टप्प्यावरुन मागे वळून पाहताना वपुंच्या लेखनशैलीतील काही गोष्टी खटकतात. मात्र आयुष्यातील बरंच अंतर चालल्यानंतर आलेला हा टप्पा आहे.
मात्र अडनिडया वयात जेव्हा हा प्रवास चालू झाला तेव्हा मनाचे पदर उलगडून दाखवणारा वपु हा एकमेव कथालेखक होता. नात्यांच्या गुंतागुंतींची पहिली ओळख वपुनीच करुन दिली होती.
आज पार्टनर चाळतो तेव्हा श्रीचे कुटुंब "dysfunctional family", श्रीची आई narcissist आणि श्री "scapegoat" आहे असे वाटते. मात्र पार्टनर जेव्हा पहिल्यांदा वाचली होती तेव्हा तीने मनाचा ठाव घेतला होता.
कथा,कादंबरी प्रकारातील वाचन बंद झालं असलं तरी मनात वपुंचं स्थान अढळ आहे. आजही कातरवेळी वपूर्झामधील उतारे वाचावेसे वाटतात.
25 Mar 2016 - 11:52 am | अन्नू
:)
25 Mar 2016 - 12:08 pm | स्पा
गावडे काकांशी सहमत
25 Mar 2016 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्याशी सहमत . सामान्य माणसांचे अनुभव किंवा दुस-या शब्दात आपलं जगणं ते लिहित आहेत असं नेहमी वाटलं. म्हणजे ओळी ओळी वर थांबून आपण आप्ल्याकड़े आणि आपल्याच आरशातील प्रतिमेकड़े पाहात राहावं असं... एकेकाळी मी ब्वा वेडा व्हायचो वपू वाचतांना.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2016 - 12:32 pm | प्रचेतस
गावडेसरांशी सहमत किंवा असहमत नाही मात्र आमच्या अडनिड्या वयात आमच्या मनाचा कोपरा सुशि, अनिल गुजरांछे जेम हॅडली चेसचे अनुवाद, अर्नाळकर ख्रिस्तीबै, सिडने शेल्डन आदिंनी व्यापून टाकला होता. वपुंचे पाल्हाळिक लेखन तेव्हाही कधीच आवडले नाही आणि अत्ताही नाही.
25 Mar 2016 - 12:36 pm | स्पा
ख्याक
25 Mar 2016 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल" - वपु
-दिलीप बिरुटे
25 Mar 2016 - 12:41 pm | प्रचेतस
हे ४/५ पानांत एकदा दोनदा आलं तर ठिक असतं पण अशी वाक्ये तर ४/५ ओळींआड यायला लागली की इरिटेट होतं.
25 Mar 2016 - 1:21 pm | महासंग्राम
तुमचं म्हणण पटल, पण पुनरावृत्ती कोणाला चुकली आहे, कदचित या मुळेच 'बरसात चांदण्यांची' सारखं सुंदर पुस्तक लिहूनही सुशी अजूनही फक्त रहस्यकथा लेखक म्हणूनच गणले जातात
25 Mar 2016 - 1:25 pm | प्रचेतस
'बरसात चांदण्यांची' चं नाव काढून तुम्ही अगदी दिलाचा ठोकाच चुकवलात राव.
गंधाली, चंद्रवदन, किशोर, मावशी, डॉक्टर अहाहाहा.... नॉस्टेल्जिक झालो राव.
25 Mar 2016 - 1:31 pm | अभ्या..
सुशीच्या काही कॅरेक्टर्सची नावे मात्र एक पिढी पुढची असायची. म्हातारे श्रेयस, गंधाली दिसायचेत अजून. ;)
25 Mar 2016 - 1:35 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
25 Mar 2016 - 2:20 pm | महासंग्राम
अभ्या भौ अगदी अगदी सहमत, कधी कधी अजूनही मंडईत गेलो कि उगाच कुठे दिग्या भेटतो का पाहत असतो
25 Mar 2016 - 2:20 pm | महासंग्राम
अभ्या भौ अगदी अगदी सहमत, कधी कधी अजूनही मंडईत गेलो कि उगाच कुठे दिग्या भेटतो का पाहत असतो
25 Mar 2016 - 3:14 pm | अन्नू
सुशि तर आमचे एकदम फ्यावरेट रायटर आहेत.. :))
अजुनही आमची नजर वरळीजवळ कुठे अमर मंजिल दिसतेय का हे शोधत असते!... ;)
25 Mar 2016 - 1:41 pm | चौथा कोनाडा
सगासाहेबांशी तंतोतंत सहमत.
वपुंचे महात्म्य पुलंसारख्या दिग्गजांच्या प्रचंड प्रभावाmमुळे काहीसे झाकोळले गेले. वपुंच्या निधना नंतर साहित्य जगताने त्यांच्या कडे जरा दुर्लक्षच केले हे खटकले होते.
आजही त्यांची वाक्ये सुविचाराप्रमाणे फिरतात व तरुण पिढीला अत्यंत आवडतात या वरुन त्यांचेही श्रेष्टत्व लक्षात यावे.
वपु, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेचछा !
25 Mar 2016 - 2:42 pm | अत्रन्गि पाउस
पुलंची आणि वपुंची तुलना होऊ शकत नाही ते दोघेही वेगवेगळ्या प्रतलांवर वावरत होते.
आपापल्या काळातील मध्यमवर्ग चितारण्याचा प्रयत्न दोघांचाही, परंतु पुलंचा क्लास, भाषाप्रभुत्व, बहुविध जीवनानुभव, असाधारण निरीक्षण शक्ती, अत्यंत सूक्ष्म विनोद बुद्धी, आयुष्याला भिडण्याची असोशी हि वपुंच्या काय कुणाच्याच तुलनेची नव्हती.
स्पष्ट सांगायचे तर 'साहित्य' म्हणण्यासारखे वपुंनी काय लिहिले हा संशोधनाचा विषय असू शकतो (जो पु लं बाबत नाही)
दुसरे म्हणजे त्यांची फिरणारी वाक्ये हि बरेच वेळा त्यांची नाहीतच .
तरीही मुंबईचा जावई (ची कथा) अप्रतिम आणि आणखीन काही प्लेझर बॉक्स, ऐक सखे, तप्तपदी, पार्टनर वगैरे मध्ये किंचित सबस्टन्स होता
25 Mar 2016 - 2:48 pm | महासंग्राम
पुलंची आणि वपुंची तुलना होऊ शकत नाही हे सत्यच आहे. दोन्हीही आपल्या परीने प्रचंड मोठे लेखक आहेत.
अस जर का तुम्ही म्हणत असाल तर हाय रे कंबख्त तुने पीही नाही असंच म्हणावं लागेल.
25 Mar 2016 - 3:05 pm | चौथा कोनाडा
पुल अन वपुंची तुलना कशी हो ऊ शकेल ?
(मी तुलना केलीच नव्हती, fफक्त से म्हटले होते की पुलंच्याpप्रभावामुळे ( जो वादातीत आहे ) वपु जरा बाजुला पडल्या सारखे झाले होते.
वपु चे महात्म्य मान्य करायला काय अडचण आहे हे च समजत नाही. काही विषय निघाला की लगेच "ह्यांच्या पेक्षा ते भारी " म्हणुन ट्वेंटी ट्वेंटी खेळायला सुरुवात.
मग आमच्या बाकीच्या आवडत्या लेखकांबद्द्ल, उदाहरणार्थ व बा बोधे, कमलेश वालावलकर (एकमेव "बाकी शुन्य" फेम) खिजगणतीतही घेतले जाणार नाहीत !
वपु, जब मराठी भाषेचे तक चंद्र सुर्य राहतील, तब तक तुम्हारा नाम रहेगा ||
25 Mar 2016 - 3:08 pm | अभ्या..
अरे वा. प्रा. व. बा. बोध्यांचे चाहते मिपावर हैत का? आनंद वाटला. त्यांची पुस्तके ऑनलाइन सापडणारच नाहीत. कुनाकडे काही माहीती असल्यास दुवा द्यावा, दुवा घ्यावा.
25 Mar 2016 - 4:59 pm | चौथा कोनाडा
हायेत की ! मिपा म्हंजे विविधरंगी अतरंगी वाचकांचीjजत्राच हाय नव्हं जनू ! .
प्रा. व बा. बोधे यांच्या कथा कादंबरया वाचून तीस वर्षे झाली .
नुकतीच वाचायला सुरुवात केली होती तेंव्हा गावातील आजुबाजुcची माणसे, कष्टकरी यांचे काही उदाहरणे जवळुन पहात असतानाच बोधे यांच्या साहित्याशी ओळख झाली. त्यांचे मग बरयाच कथा कादंबरया वाचल्या. आवडल्या मुळे आमच्या शेलेब्रेटी लेखकांच्या यादीतjजाउन बसले.
आता परत वाचायचे आहेत बोधे.
अंजा वर त्यांचे साहित्य (मलातरी) सापडले नाही.
ठ्या न्क्यु अभ्यादा, जुन्या स्मृतीना उजाळा दिल्या बद्दल.
25 Mar 2016 - 12:37 pm | स्पा
आम्ही केवळ धारप आणि मतकरीच वाचायचो
25 Mar 2016 - 12:40 pm | प्रचेतस
हो.
माननीय संपादक. वरील माझ्या प्रतिसादात धारप आणि मतकरी ही नावे पण अॅड करा ब्वॉ. ते तर अजूनही आवडतात. त्यामानाने गोनीदा आणि श्री.ना., दळवी, कर्णिक ह्यांच्या लेखणीचा तसा उशिरानेच प्रवेश झाला मात्र अजूनही ह्यांचे गारूड आहे.
25 Mar 2016 - 2:00 pm | palambar
वपु ते वपुच , त्यांची भाषा अगदि वेगळी होती. मुंबईतल्या मध्यमवर्गाचे प्रतिनिधीत्व
अगदी यथार्थ पणे केले
26 Mar 2016 - 2:29 pm | सिरुसेरि
ग.रा. डाळिंबे यांचेही लेखन वाचनीय असते ("केतकी पिवळी पडली" चे लेखक.) .
26 Mar 2016 - 2:35 pm | अभ्या..
ते कुडचेडकर ना?
26 Mar 2016 - 4:54 pm | अत्रन्गि पाउस
केतकी पिवळी पडली : स त कुडचेडकर
परिस्थिती हा अश्रूंचा मोठा कारखाना आहे : प्राद्न्य चे वाळिंबे सर
26 Mar 2016 - 4:56 pm | अभ्या..
थ्यान्कू सखारामा
26 Mar 2016 - 5:11 pm | अत्रन्गि पाउस
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे ...
26 Mar 2016 - 6:14 pm | भाऊंचे भाऊ
एज लोंग एज यु आर अम्याचोर
26 Mar 2016 - 10:05 pm | चौथा कोनाडा
वाक्य आवडले.
अम्याचोर ला प्रभावित करण्या साठी काही कमी प्रतिभा लागत नाही. !!!!
कश्या करता प्रत्येक वेळी तुलना ?
खुल्या दिलाने श्रेय देण्याकरता दिलदारी असावी लागते.