एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने .
ठरलेल्या वेळात म्हणजे दुपारी ४.२० ला मी जंगली महाराज मंदिरात पोहोचलो. सुरुवातीला मी जंगली महाराज आणि पाताळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व नम्दिमण्डपाजवळ बसलो. लगेचच मागेच बसलेल्या प्रसाद को यांनी मला
फोन केला आणि आम्ही गप्पांना सुरुवात केली. पाककृती वाचता वाचता ते कसे
आपल्या उत्कृष्ठ मिपा कडे वळले याबद्दल सांगितले. मिपावरील अनेक पाक कृतींची त्यांनी मुक्तकण्ठे प्रशंसा केली . खरेच मीही अशीच एक पाककृती वाचून मिपाचा वाचक झालो आणि नंतर रीतसर सभासद झालो हे मी नमूद केले. मग थोड्याच वेळात वसंत चव्हाण आले आणि त्यांनीही मिपावरील रावण पिठले ह्या पाककृतीबद्दल भरभरून सांगितले. खरेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि या अन्नानेच आपल्याला मिपा ची ओळख करून दिली आहे याबाबत सर्वांचे एकमत झाले. मग अभिजित खांबे आले आणि गप्पांना रंग आला.
यानंतर स्वीट टोकर आणि सौ स्वीट टोकर आले मग गप्पाच गप्पा . आम्हाला वल्ली यांची प्रतीक्षा होती आणि ते थोड्याच वेळात आले वल्लिं नी मग आम्हाला पाताळेश्वर मंदिराबद्दल माहिती सांगितली मीही तीन चार वर्षांनी या मंदिरात गेलो होतो आणि खूप छान वाटले. मंदिराबाहेर एक शिलालेख आहे त्यावर काय लिहिले आहे याबद्दल माहिती नाही तसेच नंदी मंडप अलीकडच्या काळात बनवला असून त्याठीकाणी संगीत मंडप असण्याची शक्यता आहे ही माहिती मिळाली . त्यानंतर काही प्रकाशचित्रे घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. थंडगार वाळा सरबत घेऊन आम्ही संभाजी उद्यानाकडे प्रस्थान केले.वल्ली यांना जरुरी काम असलेने त्यांनी आमचा निरोप घेतला.
लवकरच अंबरनाथ कट्टा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
नंतर संभाजी उद्यानात तर गप्पांची मेजवानीच झाली. सौ स्वीट टोकर यांनी कसे त्यांनी जगाची सफर करण्याची इच्छा असलेने मर्चंट नेव्हीतील साथीदार निवडला याबद्दल सांगितले. स्वीट टोकर यांनीही मर्चंट नेव्ही एक सुंदर जग आहे याबद्दल सांगितले. आपण त्यांची लेखमाला वाचतो अहोतच.
मग निघोज येथील रांजन खळगे, दिवेआगर , निळ्कंठेश्वर या ठिकाणांची चर्चा झाली. अभिजित खांबे आणि प्रसाद को यांनी दिवेआगर येथे बीचवर कशा मोटारी फसतात आणि त्या काढून देण्याचे काम हा व्यवसाय झाला आहे याबद्दल सांगितले. वसंत चव्हाण यांनीही निलकंठेश्वर या प्रेक्षणीय स्थानाबद्द्दल माहिती दिली. प्रसाद को यांनी दापोलीजवळ कोळ्थरे या निसर्गरम्य ठिकाणाबद्दल सांगितले.
सौ स्वीट टोकर यांनी कट्ट्यावर एक सुंदर कविता रचून सांगितली. ती मिपा करता लिहिण्याची मी त्यांना विनंती करतो.
मग आम्ही अल्पोपाहाराकरता समोरील शिवसागर येथे गेलो. तेथे तवा इडली ,
कांचीपुरम इडली , पालक डोसा व थंड कोफी या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घॆतला.
सौ स्वीट टोकर यांनी टिश्शू कागदापासून एक सुंदर ओरिगामी फुल बनवले.
एकंदरी तच या स्नेह संमेलनात खूप मजा आली. आम्ही नाखू यांना खूप मिस केले. सर्वांनी एकमेकांचा आनंदाने निरोप घेतला आणि भेटीगाठी चालूच ठेवण्याबद्दल ठरले.
सौ स्वीट टोकर यांचे विशेष आभार कारण नुकताच महिला दिन साजरा झाला व
त्यांनी महिलांची प्रतिनिधी म्हणुन या कट्ट्याला हजेरी ला.ली
कट्ट्याला आलेल्या सर्वांनी भरभरून मिपावर लेखन करावे अशी मी विनंती केली.
हा आहे संक्षिप्त वृत्तांत. लवकरच प्रकाशचित्रे डकवण्यात येतील.
डावीकडून : अभिजित खांबे, वसंत चव्हाण, वल्ली, मी, प्रसाद को
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रतिक्रिया
20 Mar 2016 - 9:56 pm | पैसा
नवे नवे सदस्य उत्साहाने मिपावर येत आहेत आणि कट्टे करत आहेत हे वाचून खूप छान वाटलं! असेच अजून मोठे कट्टे होऊ द्यात. मिपावर पुणेकरांची संख्या वाढत आहे तर!! =))
20 Mar 2016 - 9:56 pm | सतिश गावडे
वृत्तांतावरून देशपांडॅ काका आले नव्हते असे वाटते. मात्र शिर्षकात पुणॅ लिहून तुम्ही त्यांची आठवण करून दिलीत. ;)
21 Mar 2016 - 10:04 am | देशपांडे विनायक
आठवण काढलीत म्हणून आनंद झाला
पण तुम्ही म्हणताय ते शीर्षक कुठे दिसेल ?
21 Mar 2016 - 11:19 am | सतिश गावडे
>>पण तुम्ही म्हणताय ते शीर्षक कुठे दिसेल ?
ते दुरुस्त केलं गेलंय. :)
21 Mar 2016 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे पहा...
पुणे कट्टा व्रुत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणॅ :)
20 Mar 2016 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, फोटो नसल्यामुळे कट्टा वृत्तांत वाचला नाही.
-दिलीप बिरुटे
20 Mar 2016 - 10:12 pm | जव्हेरगंज
ग्रेट !!!
मस्त कट्टा. मस्त वृत्तांत !!!
लवकर म्हणजे आजच्या कट्ट्या आजच वृत्तांत देऊन तुम्ही छान काम केले आहे!!!
फूटू लवकर टाका !
20 Mar 2016 - 10:26 pm | प्रचेतस
मस्त वृत्तांत. जरुरी कामांमुळे जास्त वेळ थांबता नाही आले तरी नवीन सदस्यांना भेटून आनंद वाटला.
ठीक ५ वाजता पाताळेश्वरास पोहोचलो. सर्व मंडळी आलेलीच होती. नंदीमंडपाच्या कट्ट्यावर बसून चर्चा चालली होती. ह्यावेळी प्रथमच पाताळेश्वर लेणीच्या आतमध्ये गेलो नाही. :)
जरा गप्पा मारून निघालो.
येथे एक दुरुस्ती.
मंडप पूर्वीचाच असून नंदी अलीकडच्या काळात ( शिवकाळात/पेशवेकाळात) स्थापित करण्यात आला असावा. पूर्वी हा वाद्यमंडप म्हणून कोरण्यात आला असावा.
20 Mar 2016 - 10:31 pm | चांदणे संदीप
छान वृत्तांत!
वर जव्हेरभाऊ म्हणतात त्याप्रमाणे आजच्या आज वृत्तांत लिहून तुम्ही आम्हाला जास्त ताटकळत ठेवले नाहीत याबद्दल आभार!
फोटोंच्या प्रतीक्षेत! :)
Sandy
20 Mar 2016 - 11:02 pm | एस
वा! छोटेखानी पण फारच सुरेख कट्टा! वृत्तांत आवडला. फोटोही लवकर येऊद्यात.
21 Mar 2016 - 12:23 am | उगा काहितरीच
काही कामामूळे मिसला कट्टा ! पण आता फोटो वगैरे येऊ द्या .दूधाची तहान ताकावर :-(
21 Mar 2016 - 12:29 am | बोका-ए-आझम
मस्तच झालेला दिसतोय कट्टा! फोटो कुठायत?
21 Mar 2016 - 12:32 am | सूड
फोटॉ?
21 Mar 2016 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं झालेला दिसतोय कट्टा. इच्छा असूनही अचानक आलेल्या महत्वाच्या कामामुळे येऊ शकलो नाही.
फोटो न टाकल्यास मिपाकट्याच्या वर्णनात फाऊल समजला जातो :) लवकर टाका फोटो.
21 Mar 2016 - 8:16 am | नाखु
संपुर्ण प्रतिसादास सहमती
कट्ट्याचा पंखा नाखु
21 Mar 2016 - 9:27 am | अत्रुप्त आत्मा
नाखून काकांस आमचा बी प्लस वण!
प्रति सादक नाखून चा पंखा- आत्मु! ;)
21 Mar 2016 - 8:28 am | कंजूस
पुणेकर मिपाकरांना पेठेतच गाठण्याचं माझं स्वप्न आहे
पिंचिंकरांना त्यांच्या पिंचिंतच गाठणार.
21 Mar 2016 - 8:37 am | अजया
छान झालेला दिसतो कट्टा.
फोटु आणि कवितेच्या प्रतिक्षेत.
21 Mar 2016 - 8:38 am | श्रीरंग_जोशी
या कट्ट्यात सहभागी झालेल्या बहुतेकांचा हा पहिलाच मिपा कट्टा होता असे दिसते.
यशस्वी कट्ट्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व लगेच वृत्तांत प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
कट्ट्याच्या फोटोंच्या प्रतिक्षेत.
21 Mar 2016 - 8:41 am | मदनबाण
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram
21 Mar 2016 - 10:07 am | प्रसाद को
http://s19.postimg.org/r23m8fg8j/100_2562_mipa.jpg
21 Mar 2016 - 10:14 am | प्रसाद को
नमस्कार
खुप वेळाने छायाचित्र आप्लॉद केलय
आता जमेल्स दिसतय.
http://s19.postimg.org/ua83lh2ib/100_2563_mipa.jpg
http://s19.postimg.org/f2s414ann/100_2564_mipa.jpg
http://s19.postimg.org/lo9femfw3/100_2566_mipa.jpg
http://s19.postimg.org/tuwtsggkz/100_2565_mipa.jpg
[url=http://postimg.org/image/ciwh70n3j/][img]http://s19.postimg.org/ciwh70n3...
[url=http://postimg.org/image/6w049jkkv/][img]http://s19.postimg.org/6w049jkk...
[url=http://postimg.org/image/ffji7asxb/][img]http://s19.postimg.org/ffji7asx...
[url=http://postimg.org/image/hga1s4p2n/][img]http://s19.postimg.org/hga1s4p2...
[url=http://postimg.org/image/4nqj5y2un/][img]http://s19.postimg.org/4nqj5y2u...
[url=http://postimg.org/image/80u6ex71r/][img]http://s19.postimg.org/80u6ex71...
[url=http://postimg.org/image/q674sz6jz/][img]http://s19.postimg.org/q674sz6j...
[url=http://postimg.org/image/sz0cd06wf/][img]http://s19.postimg.org/sz0cd06w...
[url=http://postimg.org/image/xencw08of/][img]http://s19.postimg.org/xencw08o...
[url=http://postimg.org/image/9l43r24tr/][img]http://s19.postimg.org/9l43r24t...
21 Mar 2016 - 12:08 pm | जव्हेरगंज
21 Mar 2016 - 12:15 pm | जव्हेरगंज
21 Mar 2016 - 10:14 am | यशोधरा
अभिनंदन!
पुण्यातले कट्टे रॉक!!!
21 Mar 2016 - 10:42 am | सूड
अगदी!! नायतर त्या सोकॉल्ड मध्यवर्ती ठिकाणातले कट्टे? सगळेच कसे गुळमुळीत नि मिळमिळीत !! ;) =))
21 Mar 2016 - 10:46 am | कंजूस
हाणला हातोडा!!
काढला सूड!
21 Mar 2016 - 3:51 pm | टवाळ कार्टा
तू कधी आलायस रे डोंबोली कट्ट्यांना...
21 Mar 2016 - 4:07 pm | सूड
गायनॅकोलॉजिस्ट व्हायला स्वतः प्रेग्नंट व्हावं लागत नाही टक्या!!
21 Mar 2016 - 4:20 pm | टवाळ कार्टा
कट्टा करणे आणि प्रेग्नंट होणे/करणे एकच का रे?
21 Mar 2016 - 4:47 pm | सूड
तुझं चालू दे, मला कामं आहेत आज.
21 Mar 2016 - 10:44 am | कंजूस
फोटो स्पष्ट छान. [URL]वाल्या लिंक रिपेअर करून फोटो दिसतात.शेवटचे थंबनेल आहेत.
21 Mar 2016 - 10:49 am | भाऊंचे भाऊ
नवे नवे सदस्य उत्साहाने मिपावर येत आहेत आणि काय वाट्टेल ते करत आहेत हे वाचून खूप छान वाटलच नाहीं यापेक्षा अजून मोठे कट्टे होऊ द्यात. मिपावर सामान्य कट्टेरांची संख्या वाढत आहे तर!! =))
21 Mar 2016 - 11:38 am | नाखु
दिसण्यासाठी काय करावे ब्रे!!!
आत्मुदा उपाय सुचवा (बिनख्रर्चीक)
21 Mar 2016 - 11:53 am | चौथा कोनाडा
भारी मिपाकट्टा !
छोटेखानी सुरेख वृत्तांत आवडला. फोटोही मस्तच !
पण फोटो इथे एम्बेड करा ना राव, वृतांताला चारचंद्र लागतील.
अश्या तरहे शांतिप्रिय आयोजित मिपाकट्टा संपन्न झाला.
शांतिप्रिय यांचे अभिनंदन ! आणखी चिकाटी दाखवली तर मिपाचे कट्टाप्पा मुवि यांच्या पंगतीत जाउन बसण्याचा संधी आहे.
शांप्रि, आगे बढो, मिपा तुम्हारे साथ हैं !
21 Mar 2016 - 11:58 am | शान्तिप्रिय
धन्यवाद सर्वांना.
21 Mar 2016 - 12:33 pm | अत्रन्गि पाउस
कोण कोण आहे त्यंची ओळख करून द्या कि ...
21 Mar 2016 - 12:49 pm | शान्तिप्रिय
फोटो क्र १
डावीकडून
अभिजित खांबे
वसन्त चव्हाण
वल्ली
मी
प्रसाद को
बाकी
श्री व सौ स्वीट टॉकर
21 Mar 2016 - 12:59 pm | अभ्या..
चव्हाण साहेबांचे नाव, पर्सनॅलिटी, फिजिक आणि बॉक्स मिशा फुल्ल इन्स्पेक्टर टाइप हैत. ;)
26 Mar 2016 - 2:58 pm | चौथा कोनाडा
करेक्ट ! त्याना घेवुन "एक शुन्य शुन्य " नाय तर "लक्ष" सिरियल काडली तर आमी हैच तयार (कुठल्यातरी) हवालदाराची भुमिका करायला :-))))
21 Mar 2016 - 1:02 pm | शान्तिप्रिय
नको दंड नको शिक्षा.
हेल्मेट वापरणे हिच सुरक्षा.
संभाजी बागेत
अल्पोपाहार
21 Mar 2016 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
शान्तिप्रिय,
तुमची चित्रे मूळ लेखात टाकली आहेत.
पहिल्या चार चित्रांचे दुवे (लिंक्स) बरोबर होते, त्यामुळे ती चित्रे पूर्ण स्पष्टतेसह (रिझोल्युशन) दिसत आहेत. इतर दुवे चित्रांच्या थंबनेल्सचे आहेत त्यामुळे ती तेवढी स्पष्ट दिसत नाहीत. मूळ चित्रांचे दुवे दिल्यास तीही स्पष्टपणे दिसू शकतील.
चित्रे स्क्रीनवर पूर्ण आकारात दिसत असताना (थंबनेल्स नाही) त्यांच्यावर राईट क्लिक करून साठवलेल्या दुव्यानेच चित्रे इतर ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट दिसू शकतात.
मिपावर चित्रे अशी टाका...
१. टेक्स्ट्बॉक्सच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या "insert/edit image (alt M)" या बटनावर क्लिक करा.
२. Insert URL मधे दुवा/लिंक/URL पेस्ट करा.
३. Width/Height अशी टाका...
...३.अ) आडवी (लँडस्केप) चित्रे : Width = ६०० ते ८००.
...३.आ) उभी (पोर्ट्रेट) चित्रे : Width = ३०० ते ४५०.
...३.इ) Width ठरविताना चित्राचा मूळ आकार, मूळ रिझोल्युशन आणि मिपा पेजवरील त्याचे स्थान लक्षात घेतल्यास ते अधिक चांगले दिसेल.
...३.ई) Height ची जागा नेहमीच रिकामी ठेवा, मिपा योग्य ती Height वापरून चित्राची प्रमाणबद्धता राखेल.
४. Alternative text = चित्राला तुम्ही दिलेले नाव लिहा किंवा (एकदा स्पेसबार दाबून) फक्त एक स्पेस टाका.
५. OK बटण दाबा.
६. टेक्स्टबॉक्सखालील "पूर्वपरिक्षण" बटण दाबून तुमची चित्रे कशी दिसतील ते पहा. चित्र/त्रे पसंत नसल्यास १ ते ५ पायर्या वापरून आवश्यक ते बदल करा.
७. समाधान झाल्यावर टेक्स्टबॉक्स खालील "प्रकाशित करा" हे बटण दाबा... आता तुमचा चित्रांवरचा ताबा संपला ! :)
८. नंतर काही बदल हवा असल्यास संपादक मंडळ अथवा साहित्य संपादक मंडळ यांना विनंती करा.
21 Mar 2016 - 11:31 pm | सतिश गावडे
वाह... मोजमापांसाठी धन्यवाद काका.
बरेच दिवस चित्रांची लांबी आणि उंची मी ट्रायल आणि एररने ठरवत होतो. आता नेमके प्रमाण कळले. :)
21 Mar 2016 - 11:46 pm | साहित्य संपादक
मिपावर फोटो प्रकाशित करण्याच्या तपशीलवार सूचनांसाठी धन्यवाद.
क्र. ८ ला एक पूरवणी -
फोटोज धाग्यात प्रकाशित केले असल्यास अन काही बदल हवा असल्यास साहित्य संपादकांना विनंती करावी. परंतु ते फोटोज प्रतिसादात प्रकाशित केले असल्यास अन काही बदल हवा असल्यास संपादकांना विनंती करावी.
साहित्य संपादकांना प्रतिसादांमध्ये बदल करता येत नाहीत.
21 Mar 2016 - 1:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही इथे टाकलेल्या फोटोंना बहुतेक "पब्लिक अॅक्सेस" नाही... तेवढी सुधारणा केल्यास ते दिसू लागतील.
21 Mar 2016 - 2:10 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद सुहास म्हात्रे साहेब. दुरुस्ती करतो.
21 Mar 2016 - 3:22 pm | सविता००१
छान झालेला दिसतोय कट्टा.
पुणे रॉक्स
21 Mar 2016 - 4:23 pm | रेवती
कट्टा वृत्तांत व फोटू आवडले.
21 Mar 2016 - 6:53 pm | Vasant Chavan
खुप छान झाला कट्टा.सरान्चे आभार .छान माहिती मिळाली.
21 Mar 2016 - 8:14 pm | शान्तिप्रिय
:):)
हे मनोरंजक आहे. ===> पुणे कट्टा व्रुत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणॅ :)
आता एकदा तरी पुणॅ असेहि प्रत्येक पुण्याच्या लेखनात लिहावे म्हणतो.
21 Mar 2016 - 11:07 pm | जुइ
छान झाला कट्टा!
21 Mar 2016 - 11:10 pm | सूड
फोटो एकही दिसत नाहीये.
21 Mar 2016 - 11:33 pm | सतिश गावडे
तुमची पत्रिका दाखवून घ्या. कदाचित तुमच्या राशीला गणेशा आला असेल. ;)
22 Mar 2016 - 7:20 am | कंजूस
फोटोंचे स्क्रीनशॅाट्स ( कमी पिक्सेलचे येतात ) पुन्हा दुसय्रा सायटीवर ( tinypic dot com ) अपलोड करून टाकलेत
१)
२)
22 Mar 2016 - 8:19 am | नाखु
धन्यवाद "पापी" होण्यापासून वाचवले. वरील दोन्ही छायाचित्रे दिसली (आणि दोन माणसे अगोदर भेटलेली वाटली) कोणती ते त्या दोघांवर सोडून दिले आहे.
खादाडीचे छायाचित्रे न दिसल्याने अज्ञानात सुख का कय म्हणतात ते आहे.
कट्टायनी नाखु
22 Mar 2016 - 2:28 pm | टवाळ कार्टा
पहिल्या फोटोत सगळ्यात उजवीकडचे मला "कमलाकर सातपुते" का वाटत आहेत???
22 Mar 2016 - 2:29 pm | सूड
दिसले ब्वा एकदाचे!! धन्यवाद.
22 Mar 2016 - 10:45 am | अभिजीत अवलिया
हो नाखू काका. आपण अगोदर भेटलेलो आहोत.
(अभिजित खांबे मिपावरचा अभिजित अवलिया)
26 Mar 2016 - 11:56 am | स्वीट टॉकर
शांतिप्रिय यांनी हिनी कट्ट्याच्या शेवटी म्हटलेली कविता टाकण्याची सूचना केली होती. ती टाकतो
आभार
आभार आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात,
त्याहूनही आभार निमंत्रणाशिवाय आमच्या आयुष्यात आलात,
आलाच आहात तर जाऊ नका. कायमचेच रहा.
कसे? तर
काळोख्या किर्र रात्री चांदण्यांची सोबत होऊन रहा,
गारठवणार्या सकाळी सोनेरी किरणांची ऊब होऊन रहा,
टळटळीत माध्यान्हीला वटवृक्षाची शीतल सावली होऊन रहा,
आमच्या आनंदात आनंदत रहा,
आमच्या दु:खात गहिवरत रहा.
तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही,
तुम्ही फक्त बरोबर रहा, आम्ही दुसरे काही मागणार नाही.
ऋणांच्या, अनुबंधांच्या पडलेल्या गाठी अशाच घट्ट राहू द्यात
हीच कृतज्ञ प्रार्थना, हीच कृतज्ञ प्रार्थना ||
26 Mar 2016 - 2:54 pm | चौथा कोनाडा
सुरेख शब्द , सुंदर कविता !
26 Mar 2016 - 12:11 pm | शान्तिप्रिय
धयवाद
सुंदर कविता!
26 Mar 2016 - 12:11 pm | शान्तिप्रिय
धयवाद
सुंदर कविता!
26 Mar 2016 - 2:53 pm | चौथा कोनाडा
प्रचि दिसलेल्या सर्वांचे अभिनंदन |||||
:-))))
12 Apr 2016 - 9:57 pm | शान्तिप्रिय
मागच्या महिन्यातील पुणे कट्ट्याचे आणखी काही फोटो.
पाहा दिसतात का.
हेल्मेट्सकट पुणेकर (मी) अहो आश्चर्यं ????
खादाडी
12 Apr 2016 - 11:18 pm | पैसा
फोटो मस्त आहेत एकदम! आणि कविता आवडली. त्यानाही मिपाकर करून घ्या ना!
13 Apr 2016 - 1:00 am | खटपट्या
+१
13 Apr 2016 - 9:01 am | अजय देशपांडे
स्वीट टोकर छान कविता
मनापासून आवडली असेच कट्टे होऊ द्यात
सोलापूर चे कोणी आहे का इकडे
13 Apr 2016 - 4:20 pm | शान्तिप्रिय
सोलापुर चे अभ्या आहेत.
करा एक सोलापुर कट्टा तोही आमच्यासारखा एका धाग्यात
होउन जाऊद्यात!
15 Apr 2016 - 1:05 am | अभ्या..
भावकीत काय कट्टा करायचा? ;)
जरा पाव्हने रावळे यावेत तवा मज्जा येती.
15 Apr 2016 - 8:34 am | नाखु
भावकीत है का पाव्हने रावळे तेच कळनां झालयं खरं!
वळखीतला नाखु