रौशनी.. ५

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
21 Jan 2008 - 8:13 pm

रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५

'साली दुनिया गेली बाझवत!' असा विचार करून आज मी तिच्यासोबत व्हिस्की पिणार होतो, तिच्या हातची बिर्याणी खाणार होतो आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!

मी पुन्हा एकदा रौशनीची माडी चढत होतो. पुन्हा तसंच त्या चाळीतून दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या रांडांमधून वाट काढत चोरट्यासारखा रौशनीच्या खोलीकडे चाललो होतो. रौशनीची खोली मात्र नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि प्रसन्न, आणि तीच ती समोर कोचावर बसलेली प्रसन्न रौशनी!

हसतमुखाने तिने पुन्हा माझं स्वागत केलं. नाहीतरी मी आज ठरवलेलंच होतं, आज साला हिच्याकडे बैठकच मारायची. नाहीतरी हिने मला दहा वेळा आग्रहाने जेवायला बोलावलंच आहे ते आज हिच्याकडून जेवूनच जायचं! साला काय होईल ते होईल!

रौशनीने स्वत:हून माझा पेग भरला, माझ्या ग्लासात सोडा ओतला, सोबत खारे काजू ठेवले! आतल्या खोलीतून बिर्याणीचा घमघमाट सुटला होता. फॉकलंड रोडच्या आमच्या जाफरभाईकडच्या बिर्याणीसारखाच! :)

"शरमाना नही तात्या, आज आप हमारे मेहमान है!"

आपण तर साला रौशनीच्या जवळजवळ प्रेमातच पडल्यात जमा होतो!

"और सुनाओ तात्या. कसं चाललं आहे? आमच्या कृष्णाचं कुठे काही जमतंय का?"

रौशनीने आता माझ्याशी दिलखुलास बोलायला सुरवात केली. वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखी!

आमचं जुजबी बोलणं झालं. कृष्णाच्या कामाचं मी पाहतो आहे, पण अजून कुठे काही जमत नाहीये. एकदोन लोकांशी त्याच्या नौकरीबद्दल बोलून ठेवलं आहे, बघू!' अशी तिला थाप मारली!

रौशनीने आपलाही पेग भरला होता.

मी पुन्हा 'एखाद पेग मारून, थोडं जेवून तिथून चालू पडावं' या विचाराप्रत आलो होतो. पण रौशनी मात्र आता गप्पा मारायच्या मूडमध्ये दिसत होती!

"आपको पता है तात्या?, अमिता कृष्णाकरता लहानपणी 'धीरे से आजा री अखियन मे' ही लोरी फार छान गायची! मीच शिकवलं होतं अमिताला थोडंफार गायला. मैने बचपनमे थोडाबहुत गाना सिखा था!"

'लेकर सुहाने सपनो की कलिया
आके बसा दे पलको की गलिया
पलको की छोटीसी गलियन मे
निंदिया आजा री आ जा'

क्या बात है! रौशनीने या चार ओळी इतक्या सुंदर गुणगुणून दाखवल्या! कालपरवा आतमध्ये माझ्याकडे पाहात खिदळत, बाहेर घुटमळत असलेल्या रांडांना 'मादरचोद' ही कचकचीत शिवी देणारी हीच का ती रौशनी?? मनुष्य आणि मनुष्यस्वभाव हे इतकं अजब रसायन असू शकतं?

"तात्या, मी मुळची ग्वाल्हेरची. चांगल्या खात्यापित्या घरातली. संस्कार, परंपरा मानणारं घर होतं माझं! आमचा थोडाफार जमीनजुमला होता, घर माणसांनी, सोन्याचांदीनी भरलेलं होतं. कोई भी चीज की हमे कमी नही थी! आम्ही त्या काळातले मोठे सराफ होतो ग्वाल्हेरातले. बडे खानदानी लोग थे हम! मेरे पिताजी और उनके सब भाई और उनके परिवारवाले, हम सब साथ मै रेहेते थे. आजही ते घर ग्वाल्हेरात आहे, मतलब...असेल!"

रौशनी बोलत होती, मी ऐकत होतो!

"माझे वडील म्हणजे ग्वल्हेरातली एकदम जबरदस्त आसामी! त्यांना गाण्याची अतिशय आवड! गावातच असलेल्या एका गायनमास्तरांकडे मी गाणं शिकत होते. मलाही देवदयेने ती कला थोडीफार आत्मसात होऊ लागली. तात्या, आप ख्यालगायकी जानते है? कभी सुनी है आपने?"

रौशनी हा प्रश्न ज्याचे मानसगुरू साक्षात भीमसेनजी आहेत अश्या माणसला विचारत होती! :)

"हां, जानता हू थोडीबहुत! ये कोने मे रखा हुआ तानपुरा आपका है? कभी वक्त मिला तो जरूर सुनेंगे आपका गाना! क्या सुनाएगी आप? ग्वलियर, आग्रा, जयपूर, या किराना? वैसे तो आप ग्वालियरमे पलीबढी है, ग्वालियर का ख्याल गाती हो? आपके गुरुजी किनके शागीर्द थे?"

माझे एकदम एवढे प्रश्न ऐकून रौशनी अंमळ चकीतच झाली!

"बहोत अच्छे! आपने तो बडे बुजूर्गोका गाना काफी सुना हुवा लगता है. मी आपल्याला काय ऐकवणार तात्या? फिर भी कभी फुरसद मिलेगी तो जरूर गाऊंगी आपके लिये. और कुछ नही, लेकिन लोग समझेंगे की रौशनीने आजकल कोठा शुरू किया है!" :)

असं म्हणून रौशनी मिश्कील हसली! खरंच प्रत्येक माणसाला स्वत:ला किती एक्स्प्रेस करावंसं वाटतं! रौशनी भरभरून बोलत होती. फोरासरोडच्या त्या माहोल मध्ये, या पद्धतीचा संवाद खरंच कित्येक वर्षात तिने कधी कुणाशी साधलेला दिसत नव्हता! तहानलेल्याला पाणी मिळवं अश्या समधानी मुद्रेने ती माझ्याशी आपुलकीने बोलत होती, गप्पा मारत होती! रंडीबाजारातील मावश्यांनाही मन असतं, तीही माणसंच असतात, हे मला कुठेतरी जाणवत होतं!

रौशनीकडे बसलो असताना मध्येच एकदम मी भानावर यायचो. माझा माहोल, माझा पांढरपेशी सुसंस्कृत समाज मध्येच मला, मी कुठे बसलो आहे, का बसलो आहे, हे प्रश्न विचारायचा, त्यांची जाणीव करून द्यायचा! पण मी आज रौशनीला बोलू देणार होतो, तिचं सगळं म्हणणं ऐकून घेणार होतो. आणि मी का भीड बाळगू माझ्या सुसंस्कृत पांढरपेशी समाजाची? माझ्यासमोर बसलेली बयाही माझी लेखी सुसंस्कृतच होती!

तिला खूप खूप बोलायचं होतं माझ्याशी. ती बोलतही होती. आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घेतंय याचंच तिला खूप समाधान वाटत असणार! नाहीतर फोरासरोडवरच्या त्या रंडीबाजारातल्या मावशीशी एरवी कोण गप्पा मारणार? कोण एकून घेणार तिच्या कथा, व्यथा? मी आपला तिला बरा सापडलो होतो गप्पा मारायला. हा खूप सेन्सिबल माणूस आहे, सभ्य माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे असा कुठेतरी तिला विश्वास वाटत असणार माझ्याबद्दल! फक्त पैशांची आणि वासनेची भाषा समजणार्‍या त्या वस्तीत तिला या भाषेव्यतिरिक्त इतरही भाषा बोलायची होती आणि त्याकरताच तिने मला अचूक हेरला होता, मन्सूरमार्फत बोलावून माझ्याशी मुद्दाम ओळख करून घेतली होती, पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असलेल्या कृष्णाला माझ्या हाती सोपवू पाहात होती!

आणि खरं सांगायचं तर मलाही तिच्या व्यक्तिमत्वाने भुरळ घातली होती. आमची वेव्हलेन्थ जुळली होती, जुळत होती!

"मै तो मेरे पिताजी की जान थी. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर! तुम्हाला एक गंमत सांगू तात्या, लहानपणी मी खूप म्हणजे खूपच खुबसूरत होते. मी इतकी लख्ख गोरीगुलाबी होते की माझे वडील कौतुकाने माझ्याकडे पाहून म्हणायचे, 'मेरी बेटी, मानो सूरज की रौशनी है, उसकी सुबहकी सुनहरी किरने है!' तेव्हापासूनच माझं रौशनी हे नांव पडलं तात्या!" :)

असं म्हणून रौशनी प्रसन्नपणे हसली. सुरेख दंतपंक्ति, सुरेख जिवणी! मला रौशनीच्या बोलण्यात जराही अतिशोयोक्ती वाटत नव्हती! कारण माझ्यासमोर बसलेली रौशनी पन्नाशीतही तशीच गोरीपान होती, सुरेख होती!

रौशनीकडची माझी मैफल आता रंगली होती. बाहेरचा माहोल तोच होता. त्याच त्या धंद्याला उभ्या असलेल्या मुली, गिर्‍हाईकंची वर्दळ, नेहमीच्या शिव्या, ओव्या, तेच ते सगळं नेहमीचं. रौशनी माझ्याशी बोलताना मध्येच सांधा बदलून इतर कुणाशी तरी बोलत असे आणि लगेच माझ्याशी बोलणं सुरू ठेवत असे.

"तात्या, ग्वाल्हेरात आमच्या घरी, दुकानी रामनाथजी नांवाचा एक कारिगर यायचा. उसको हिरोंकी बडी अच्छी पेहेचान थी. तो हिर्‍यांना पैलू पाडायचं काम करत असे. दहा-पंधरा दिवसातनं एकदा तरी त्याची ग्वाल्हेरात चक्कर असायची. घरी येऊन वडिलांशी, घरातल्यांशी खूप गप्पा मारायचा. मला खूप आवडायचा तो!"

तेवढ्यात हातात बिर्याणीचं ताट घेऊन कृष्णा आणि त्याच्यासोबत एक नऊ-दहा वर्षांची छानशी गोड, नक्षिदार परकरपोलकं घातलेली, चेहेर्‍यावर मिश्किल, निष्पाप भाव असलेली एक मुलगी, आतल्या खोलीतून बाहेर आली!

"तात्या, यह नीलम है! मेरी बेटी!"

???

रौशनीला मुलगी आहे? या गोड मुलीचं हिनं पुढे काय करायचं ठरवलं आहे? कुणाची मुलगी ही? त्या रामनाथजीची की काय? आणि ग्वाल्हेरातल्या इतक्या संपन्न, खानदानी घरातील ही रौशनी इथे मुंबईच्या फोरासरोडवर कशी काय पोहोचली? अशी कशी काय अवस्था झाली हिची?

पुन्हा एकदा सगळे प्रश्न!

मंडळी खरंच सांगतो, त्या गोड मुलीकडे पाहून, रौशनीकडे पाहून मला अगदी प्रथमच खूप वाईट वाटलं, भडभडून आलं! आणि तो भाबड्या चेहेर्‍याचा कृष्णा आणि त्याच्या डोळ्यातून माझ्याकडे पाहणारी, मी कधीही न पाहिलेली ती अमिता! छ्या, आपण तर साला सुन्नच होऊन गेलो!

"लिजीये तात्यासाब. बिर्याणी खा. हमारे गरीबखाने का दानापानी स्वीकार करे!"

असं म्हणून रौशनी स्वत: उठून मला बिर्याणी वाढू लागली!

ती गोड मुलगी, थोड्याश्या उत्सुकतेने, थोड्याश्या आश्चर्याने माझ्याकडे पाहात तिथेच उभी होती. मला उठून त्या मुलीला जवळ घ्यावसं वाटलं, क्षणभर तिचे लाड करावेसे वाटले. काहीही झालं तरी आमच्या रौशनीची मुलगी होती ती! माझ्या मैत्रिणीची मुलगी होती ती!

पण ते मगासचे प्रश्न? त्यांची उत्तरं मला कधी मिळणार होती?

क्रमश:

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2008 - 9:02 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच आहे हा भाग. उत्कंठा वाढते आहे...

बिपिन.

विद्याधर३१'s picture

21 Jan 2008 - 9:13 pm | विद्याधर३१

छान...... ,

बरेच दिवसानी रोशनी वाचून आनन्द वाटला.
पुढचा भाग लवकर येउ द्या....

सुनील's picture

21 Jan 2008 - 9:23 pm | सुनील

बर्‍याच दिवसांनी रोशनीला पाहून संतोष जाहला!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2008 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना  आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. या भागात तिला असलेली गाण्याची आवड, तीची मुलगी आणि जाफरभाइच्या  बिर्यानीची याद राहील. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!!
अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ? 

तात्याच्या लेखनाचा फॅनप्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 7:43 am | ऋषिकेश

तात्या,
रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!!

अगदी अस्सच!!! आता मात्र पुढला भाग लवकरात लवकर टाका बॉ :)

-ऋषिकेश

नंदन's picture

22 Jan 2008 - 10:32 am | नंदन

म्हणतो, तात्या. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे. [शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू's picture

22 Jan 2008 - 6:50 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

21 Jan 2008 - 9:32 pm | धोंडोपंत

वा तात्या,

पहिल्या चार भागांसारखा हा भागही उत्तम आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेय. ही रौशनी अजून काय काय गुपिते उघड करेल हा विचार करतांनाच हा भाग संपला. उत्कंठा अजून ताणली गेली.

पुढील भाग आता लवकरात लवकर येऊदे.

झकास लेखन झालाय. शुभेच्छा.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग's picture

21 Jan 2008 - 9:37 pm | चतुरंग

इतकी थोडी-थोडी बिर्याणी वाढताय की अंमळ "अडजीभ खाऊन पडजीभ बोंबलली" असं वाटतयं हो!
जरा जोरकस ताटभरुन येऊ द्या की राव!
लिखाण बाकी फक्कड हों तुमचें:)!!

चतुरंग

केशवसुमार's picture

22 Jan 2008 - 2:16 pm | केशवसुमार

अगदी हेच म्हणातो.. पुढचे भाग जरा भरभर लिहा नाहीतर कथा तरी भरभर पुठे पळवा..असे आशेला लावून ठेऊ नका..
हा ही भाग उत्तम हे सांगणे न लगे..
केशवसुमार

प्राजु's picture

21 Jan 2008 - 10:57 pm | प्राजु

अशा उत्कंठावर्धक ठिकाणी भाग संपवायचा आणि पुढचा भाग १ महिन्यानी लिहायचा.. तात्या शोभतं तुम्हाला हे.
हा भाग ही इतर भागांप्रमाणे तरल झाला आहे.
आता पुढच्या भागासाठी किती प्रतिक्षा करावी लागणार आहे हे देव आणि तात्याच जाणोत..
लवकरच यावा ही देवाला आणि तात्याना प्रार्थना.. (ह्.घ्या.) :)))

- प्राजु

संजय अभ्यंकर's picture

21 Jan 2008 - 11:03 pm | संजय अभ्यंकर

तात्या,

फारच सुंदर लेखन!

मी लहानाचा मोठा मोरलँड रोड, नागपाडा भागात झालो.

फोरास रोड, कामाठीपुरा, फॉकलंड रोड, चोर बाजार इ. भाग हा आमचा परिसर.
आमची शाळेची वाटही ह्या भागातुन जात असे.

आम्ही रात्री बेरात्री याभागात मिळणारे विविध खाद्य पदार्थ खाण्यासाठि फिरत असु. परंतु आम्हाला याचा (इथल्या घटना, नित्यक्रम यांचा)ताप नसे.
फोरास रोड वरच्या बच्चुभाईच्या वाडीत शिग कबाब व पराठे खाण्यासाठी आम्ही तेथे फेरफटका मारायचो.
मोहंमद अली रोड ते भायखळा हा भाग अपना एरिया, इतके त्याभागावर प्रेम.

नागपाडा सोडताना अतिव दु:ख झाले.

आमचे शाळामित्र ह्याच भागातले. गुन्हेगारी, स्मगलिंग, टोळियुद्धे हे आमच्या नित्य पहाण्यातले.
परंतु आम्ही स्वतःला या प्रकारांपासुन अलिप्त ठेवले.

हे सर्व प्रकार करणारे, स्थानीक लोकांना याचा उपद्रव होउ देत नसत.

नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली.
आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते.

संजय अभ्यंकर

प्रमोद देव's picture

21 Jan 2008 - 11:06 pm | प्रमोद देव

सुरुवातीची नोमतोम संपून आता बड्या ख्यालाला सुरुवात झालेय. तात्या तब्येतीत होऊन जाऊ द्या. आम्ही मैफिलीत आहोतच... तुम्हाला दाद द्यायला. चांगला रंग भरा.

वरदा's picture

22 Jan 2008 - 7:38 am | वरदा

पुन्हा एकदा उत्कंठा ताणलेय्...तुमची लिहिण्याची स्टाईल एकदम मस्तंच्....

तात्या विंचू's picture

22 Jan 2008 - 10:33 am | तात्या विंचू

तात्या तुम्ही जिक्लाय..........

झकासराव's picture

22 Jan 2008 - 10:53 am | झकासराव

आता तात्या कपुर न बनता पटपट भाग येवु देत. उत्सुकता वाढली आहे :)

विसुनाना's picture

22 Jan 2008 - 12:20 pm | विसुनाना

तात्या, रौशनी मस्त होते आहे. जरा लवकर लिहा बुवा.

अवांतर -
आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे.
'निवडुंग' चित्रपटातली लालन सारंगची व्यक्तीरेखा (नाव आठवत नाही) काहीशी अशीच होती नाही का?
परवाच दिलखुलास या 'मी मराठी' वाहिनीवरच्या कार्यक्रमात वेश्याव्यवसायावर उघड चर्चा झाली. त्यातल्या बर्‍याच वेश्यांची हीच कहाणी होती.
त्या चर्चेत भाग घेणार्‍या एका समाजसेवकाचे (पुन्हा नाव आठवत नाही) म्हणणे मनात घुसून बसले आहे -
"वेश्याव्यवसाय हा समाजाचा सेफ्टी व्हॉल्व आहे असे म्हणणारी माणसे करंटी आहेत. वेश्यांमुळे आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहू शकतात म्हणून तो व्यवसाय चालू द्यावा असे मत असणार्‍यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आया-बहीणी तिथे पाठवाव्यात आणि सामाजिक सुरक्षिततेला मोलाचा हातभार लावावा."- इति.

स्वाती दिनेश's picture

22 Jan 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश

बर्‍याच प्रतिक्षेनंतर रौशनी आली परत, आता मात्र लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त ताणू नको बाबा,:)..असे इतरांसारखेच म्हणते.
नेहमीप्रमाणेच हा भाग सुध्दा छान जमून आला आहे.
स्वाती

राजे's picture

22 Jan 2008 - 12:21 pm | राजे (not verified)

वा.. वाचनीय भाग, पुढील भाग लव्कर लिहा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jan 2008 - 9:09 pm | प्रकाश घाटपांडे

उत्सुकता! ही प्रश्नचिन्ह उत्कंठा निर्माण करतात.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

26 Jan 2008 - 9:43 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या आणि न देणार्‍या (केसु ष्टाईल) सर्व वाचकांचे आभार...

काही उत्तरे -

बिरुटेशेठ,

अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ?

हो, असे काहीसे आहे खरे! :)

नंदनशेठ,

[शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.]

हो, नक्की लिहीन...

संजय अभ्यंकर

नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली.
आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते.

धन्यवाद संजयराव!

विसूनाना,

अवांतर -
आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे.

हा शोध तुम्हाला केव्हा लागला? रौशनी रामनाथसोबत पळून गेलेली नव्हती, तसेच रामनाथ व्यसनाधीन होता असेही कधी मला रौशनीने सांगितले नाही!

असो, विसूनाना तुम्ही एक काम करा. नाहीतरी तुम्ही वेगवेगळे शोध लावताच आहात तर आत्तापर्यंतच्या कथेनुसार रौशनीची पुढील कथा तुम्हीच लिहा तिच्यायला! ती वाचायला मी उत्सुक आहे. रौशनीची आत्तापर्यंतची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर आधारीत काल्पनिक अंदाजच जर तुम्हाला बांधायचे असतील तर या पुढील कथा तुम्हीच पूर्ण करा. माझं काहीच म्हणणं नाही!

च्यामारी मी तरी पुढे लिहिण्याचा त्रास कशाला घेऊ?

ऑर्कुटवर देखील कुण्या महाभागाने रौशनीची कथा लिहिलेली आहे असे कुठेतरी वाचनात आले, त्याचेही कुणी दुवे दिल्यास मी आभारी राहीन. म्हणजे तो सद्गृहस्थ पुढे काय लिहितो हे वाचनास मी उत्सुक राहीन!

असो, लोक रौशनीबद्दल पुढचे अंदाज बांधू लागले आहेत, विसूनानांसारखे छातीठोकपणे पुढचे दावे करू लागली आहेत, कुण्या महाभागाला ती ढापून ऑर्कुटवर आणाविशी वाटली हेच मी रौशनीचे यश समजतो..!

असो, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार...

आपला,
(खुद्द रौशनीला पाहिलेला मूळ लेखक!) तात्या.

मी-सौरभ's picture

14 Mar 2010 - 5:49 pm | मी-सौरभ

रोशनी ची कथा इथेच थांबवलीत का??????

-----
सौरभ :(

मी-सौरभ's picture

27 Feb 2012 - 8:32 pm | मी-सौरभ

काय झालं?
रोशनीची कहाणि पुढे कधी सरकवताय???

स्वाती राजेश's picture

26 Jan 2008 - 2:53 pm | स्वाती राजेश

रोशनी चे पुढील भाग लवकरच टाका खूप उत्सुकता लागली आहे..
रोशनी चे पहिले सर्व भाग अप्रतिम लिहिले आहेत..
ते वाचत होते त्यामुळे प्रतिक्रियेस उशीर झाला.
एवढ्या छान लेखकाला उशीरा प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल क्षमस्व.

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत...

सुधीर कांदळकर's picture

28 Jan 2008 - 8:14 pm | सुधीर कांदळकर

बार, इ. चित्रपट डोळ्यांसमोर उभे राहिले. खरे म्हणजे १ ते ५ भाग आतांच वाचले. अमिताची कहाणी हृदयद्रावक आहे. सत्याची दाहकता वर्णन करून सांगता येत नाही. आपण बरेच कणखर आहात. अमिताची कहाणी ऐकून मी तर कृष्णाचे काम त्वरित केले असते. निदान जीवतोड प्रयत्न केले असते. हल्लीच एक भाषांतरित कादंबरी वाचली. मूळ काश्मिरी कादंबरी. कश्मीर्मधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरील. त्यात एका वेश्येसाठी एक मनस्वी तरूण आयुष्य कसे उधळतो ते आठवले. सुन्न झालो. पुढील भाग लवकर येऊ द्यात.

प्राजु's picture

29 Jan 2008 - 2:27 am | प्राजु

अहो, रागावू नका.
पण तुम्हीच लवकर लिहायला घ्या रोशनी. कारण, जितका तुम्ही वेळ कराल तितके अंदाज किंवा काल्पनिक कथा बांधल्या जातील. तुमची रोशनी.. तुमच्याच शब्दांत वाचायची आहे.
कारण तुम्ही तिला पाहिली आहे. तिच्याशी गोष्टी केल्या आहेत तुम्ही. तिला तुमच्याइतके स्पष्ट आणि तरल कोण वर्णु शकेल?
तेव्हा आता... लग जाईये काम पे!

- प्राजु

झंप्या's picture

29 Jan 2008 - 5:56 am | झंप्या

तात्या ये भाग कुछ जम्या नही!
एखाद्या सिरियल प्रमाणे चिंगम सारखे हे भाग आता तू ताणत आहेस असे वाटत आहे. वर कुणीतरी म्हंटल्या प्रमाणे पुढच्या 'एपिसोड' मध्ये जरा जास्त बिर्याणी वाढ आता!!

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 10:08 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या.. आपल्या 'रौशनी' चा प्रत्येक अपूर्ण भाग कायम आम्हाला 'तडपाना ' म्हणजे काय याचा प्रत्यय देत आहे....कृपया पुढचे भाग लवकर लिहुन ही हूरहूर थांबवा...
(तात्यांच्या लेखनाला दाद देणारा)
डॅनी.....
पुण्याचे पेशवे

तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली. पण किती दिवस नुसति बिर्याणीच खात बसलाय ...पुढचे भाग लवकर लिहा.

(बिर्यणी चाहता) आम्बोळी

सन्जोप राव's picture

16 Mar 2008 - 8:11 pm | सन्जोप राव

एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली
हेच म्हणतो. बाबा कदम, सरकारी रेस्ट हाऊस, सोनेरी रंगाचे पेग, करुणेची झालर असणारी (लेकिन दिल की अच्छी!) अशी नायिका, वाफाळत्या बिर्याण्या, फिश फ्राय, शास्त्रीय संगीतातल्या उस्तादांचे उल्लेख.... मराठीत एकता कपूरसारखी निर्माती नाही याचे शल्य वाटते.

The meek shall inherit the earth. Are you sufficiently meek? Ask yourself!

सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 12:41 pm | विसोबा खेचर

स्वाती राजेश, सुधीरराव, प्राजू, झंप्या, मिराशीसाहेब, आंबोळी,

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे....

पुढचा भाग लिहितो लवकरच. सध्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नाही. थोडी सवड मिळाली की पुन्हा एकदा रौशनीच्या विश्वात जाईन..

तात्या.

पराग's picture

7 Mar 2008 - 8:40 pm | पराग

पुढचा भाग कधी लिहीनार ?

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

लिहितो लवकरच..

धन्यवाद,

तात्या.

सर्किट's picture

8 Mar 2008 - 10:26 pm | सर्किट (not verified)

हा भाग वाचण्यात आलाच नव्हता.

आज वाचला..

इतर काही वाचकांनी लेखमाला "हळू हळू पुढे सरकते आहे" असे अभिप्राय दिले आहेत. पण आम्ही त्यांच्याशी अजीबात सहमत नाही.

- सर्किट

विकास्_मी मराठी's picture

16 Mar 2008 - 3:01 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
तात्या तो महाभाग सापडला......त्यानेच रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&...

त्याने तुम्ह्च्याच नावाने रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे ......

"रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही.

http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&...
..........................................................................
आप्ला लेख्नाचा एक िनिस्सम चाह्ता....
िवकास िशदे....

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर

धन्यवाद साहेब!

आपण मुद्दामून ऑर्कुटवर जाऊन रौशनीचा शोध घेतलात याचे खरंच कौतुक वाटते!

"रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही.

याचे आम्हाला लेखक म्हणून समाधान आहे. तो महाभाग साहित्यचोर नाही हे कळले आणि खूप खूप बरे वाटले. आता उलटपक्षी आम्ही त्याला रौशनीला त्याने स्वत:हून ऑर्कुटवर प्रसिद्धी दिल्याबद्दल त्याचे आभार मानतो!

ऑर्कुटवरदेखील काही लोक रौशनी वाचत आहेत, तिच्या दुव्यांचा ट्रॅक ठेवीत आहेत, प्रतिसादही देत आहेत हे पाहून खरंच खूप बरे वाटले.

प्रत्यक्षात आंतरजालीय जगताशी पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या आमच्या रौशनीला, आज आंतरजालीय जगतात ओळख मिळते आहे याचे समाधान वाटते!

आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद िव्कासराव!

आपला,
(रौशनीच्या आठवणीने किंचित ह़ळवा झालेला!) तात्या.

अभिज्ञ's picture

16 Mar 2008 - 3:40 pm | अभिज्ञ

नमस्कार.
तात्या,
विकास राव ह्यानि दिलेलि लिंक पाहिलि.आपला त्यावर आलेला प्रतिसाद हि वाचला.
परन्तु ,हि कथा मराठी विनोद --हसण्यातच मजा आहे अशा कम्युनिटिवर प्रसिद्द झालि आहे.
आता या कथेत हसण्यासारखे काहिहि नाहि.उलट हि एक चान्गलि साहित्यकृति आहे.
मिसळपाव वरिल लेख नुसते लिन्क देउनहि पाठवता आले असते.
ते पेस्ट करण्याचे काय कारण?आणी ते पण कुठल्या ठिकाणि?
हे प्रश्न राहतातच.

(रोशनि प्रेमि)अबब

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 4:06 pm | विसोबा खेचर

अबबराव,

तुमचं म्हणणं खरं आहे. पण जाऊ द्या! काय करणार? अहो जिथे सार्‍या जगानेच आमच्या रौशनीचं हसं केलं त्याला ऑर्कुट तरी कसं अपवाद असणार?!

तेव्हा चालायचंच!

तात्या.

नन्दु's picture

16 Mar 2008 - 8:29 pm | नन्दु

तात्या लवकर पुडचा भाग येऊ द्या
मी रोशनि ओर्कुत वेर प्रथम वाचलि अनि त्या खना पासुन तुम्चा फ्यान झालो

"रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही.

हेय वाचुन मग मिसल् पाव ल भेट दिलि अनि हेय क्य इथे अलो व इथ् लाच झालो
मिसल पव चि पहिलि ओल्ख रोशनी मुले झालि माझि
तर तात्या लवकर पुड्चा भाग लिहा

हर्शल's picture

16 Mar 2008 - 8:36 pm | हर्शल

तात्या ये भाग कुछ जम्या नही!
एखाद्या सिरियल प्रमाणे चिंगम सारखे हे भाग आता तू ताणत आहेस असे वाटत आहे. वर कुणीतरी म्हंटल्या प्रमाणे पुढच्या 'एपिसोड' मध्ये जरा जास्त बिर्याणी वाढ आता!!

इसम's picture

16 Mar 2008 - 9:09 pm | इसम

तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली.

काय चुकतंय तात्या?

उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का? शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का?

मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत?

-एक इसम

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 10:57 pm | विसोबा खेचर

काय चुकतंय तात्या?

माझ्या मते काहीच चुकत नाहीये!

उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का?

नाही. जे काही लेखन आहे ते केवळ अन् केवळ सत्य घटनेवर आधारीत आहे. सत्य घटनेवर आधारीत, जे घडलं तसं लिहिलं आहे, ते जर कुणाला अतिरंजित वाटलं तर वास्तव किती भयानक असेल याची कल्पना करा!

असो, स्वत:च्या ए सी दिवाणखान्यात बसून अतिरंजित लेखन किंवा बाबा कदमांची कांदंबरी वाटते आहे असे शेरे मारणे हे मी समजू शकतो! अहो ज्यांनी कधी रंडीबाजारात नौकरी तर सोडाच, परंतु साधी चक्करही मारली नाही, दारूच्या गुत्त्यावर काम केले नाही, त्या सुशिक्षित, उच्चशिक्षित पांढरपेशी वर्गाला या लेखनाबद्दल काय वाटेल, कसं वाटेल हे मी कसं सांगू?

शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत?

शब्दसंपत्तीची काहीच गरज नाही. कारण जे आहे जसं आहे, जसं घडलं, ते घडताना मला जे वाटलं तेच मी माझ्या शब्दात मांडलं आहे. शब्दसंपत्तीची गरज कल्पित साहित्य लिहिणार्‍याला लागते!

नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत?

मुळीच नाही. कारण सगळी वर्णनं ही सत्य घटनेनुसारच लिहिली आहेत आणि ती सत्यकथा जशी समोर आली तशीच लिहिली आहेत! प्रश्न आहे तो मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे असंही काही घडू शकतं हे समजण्याच्या कुवतीचा!

क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का?

असं मला वाटत नाही. मूळ गाभ्याकडे कुठे दुर्लक्ष झाले आहे असं आपल्याला वाटतंय? मुळात आपल्याला मूळ गाभा काय आहे तो माहित्ये का?

मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत?

ते कृपया पिटातल्या माणसांना विचारा! मी ते कसं काय सांगू शकणार?

असो, आपण आपुलकीने काही प्रश्न विचारल्याबद्दल मी आपला आभारी आहे!

आपला,
(मुंबईच्या रंडीबाजारात नौकरी केलेला!) तात्या.

अवधुत पुरोहित's picture

17 Mar 2008 - 5:39 am | अवधुत पुरोहित

(तात्या भक्त फिल्मी) अवधुत

आंबोळी's picture

17 Mar 2008 - 10:34 am | आंबोळी

मला तात्यान्ची आणि बाबा कदमान्ची अजिबात तुलना करावयाचि नव्हती .. दोघेही स्वतन्त्र प्रतिभा आसलेले लेखकु आहेत असा आमचा दावा आहे... फक्त ही कथा वाचुन बाबान्ची आठवण होण्यापलिकडे आम्हाला काहीही सुचवायचे नव्हते. असो.

क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का?

एक वाचक म्हणुन आम्हाला तसे वाटत नाही.... पण दुसर्या कुठल्यातरी कामात गुन्तून पडून कथा पुर्ण करण्याकडे दुर्लक्श होत आहे असा आमचा आरोप आहे.

(दावेदार) आम्बोळी

प्रसन्न's picture

17 Mar 2008 - 11:26 am | प्रसन्न

फार उत्सुकता लागली आहे, तरी लवकरात लवकर पुढील भाग प्रकाशित करावा हि विनती

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Mar 2008 - 8:11 am | डॉ.प्रसाद दाढे

भाग ५ न॑तरचे भाग कुठे आहेत्?का, अजुन तात्या॑नी लिहिलेच नाहीत्..लवकर अपलोड करा..

सन्दीप's picture

1 Apr 2008 - 11:50 am | सन्दीप

तात्या
उत्कन्था शिगेला पोहचवुन अर्ध्यवर का बरे सोदलेत आम्हला. पुधचा भाग लवकर येउन्दे.

(आसुसलेला) सन्दीप

शैलेन्द्र's picture

18 Jun 2008 - 1:46 pm | शैलेन्द्र

तात्या, तुम्ही आमचा मामा केलात हो....,

पुढ्च्या महीन्याची वर्गणी नाहि भरणार मी...

यशोधरा's picture

18 Jun 2008 - 2:33 pm | यशोधरा

आला, आला ५ वा भाग आला!! वाचते मग शांतपणे.. :)
अजुनही क्रमशः आहेच का? लवकर लवकर टाका.

रामदास's picture

18 Jun 2008 - 10:04 pm | रामदास

सौ गज दिखाते हो दो गज फाडते हो.
तहान भागत नाही हो चारच घोटात.
जे जसे आहे तसेच सादर करण्याच्या शैलीमुळे रंगतदार झाले आहे.
( प्रतीक्षेत) रामदास

यशोधरा's picture

18 Jun 2008 - 10:12 pm | यशोधरा

छान जमलाय हा भाग.. लवकर लिहा पुढचंही

संदीप चित्रे's picture

18 Jun 2008 - 11:41 pm | संदीप चित्रे

रौशनी वाचून आनंद झाला तात्या. लवकरच पुढचा भाग लिही असा (इतरांसारखाच) आग्रह :)

विकास्_मी मराठी's picture

1 Jul 2008 - 4:09 pm | विकास्_मी मराठी

िव्कास_मी म्राठी
लवकर िल्हा तात्या पुढचंही....आतुर्तेने वाट पाह्त आहे......

िव्कास िश्दे

या बद्द्ल काही अपडेट्स आहे का कुणाकडे???
---नितिन.

विसोबा खेचर's picture

15 Aug 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर

गांधीसाहेब,

आपल्या उत्सुकतेबद्दल अन् आपुलकीबद्दल धन्यवाद, परंतु रौशनी आम्ही दिवाळीत प्रसिद्ध करू. एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरून रौशनी हे लेखन चांगले असून लोकांना आवडते आहे असे दिसते. मिपाचा दिवाळी अंक नसल्यामुळे दिवाळीतदेखील लोकांना काही चांगले वाचायला मिळावे या हेतूने रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! ;)

इतके दिवस थांबलात, कृपया अजून काही दिवस थांबावे ही विनंती! :)

तात्या.

काय तात्या, किती शोधल पुढच्या भागांना आणि शेवटि प्रतिसाद वाचायला घेतले..
चला ठिक आहे, दिवाळीत का होइना पण येवुद्यात

तुमच्या लेखनाचा पंखा :-)
टुकुल.

स्नेहश्री's picture

9 Oct 2008 - 5:35 pm | स्नेहश्री

भाग तर फारच छान आहेच...... पण अरे परत तोच शब्द........."क्रमशः".......आता ह्या शब्दाने मी बेजार झाले आहे......!!!! ~X( @)
अरे नविन भाग कधी ?????????

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

तात्याराव,
आता फिरून मागे पहाणे नाही."निर्मितीने" आपला चार्ज घेतलेला आहे.लिहिणार नाही म्हटलंत तरी ती तसं करू देणार नाही. "रौशनीचा "आणि आपल्या जवळ असलेल्या "संगीता" चं अगदी जवळच नातं आहे.

'लेकर सुहाने सपनो की कलिया
आके बसा दे पलको की गलिया
पलको की छोटीसी गलियन मे
निंदिया आजा री आ जा'

"संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही.
म्हणून म्हणतो,

"प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला's picture

10 Oct 2008 - 12:16 pm | अनिल हटेला

वाह !!
क्या बात है !!!

तात्या ,
घ्या वेळ आम्ही वाट बघु पूढच्या भागाची !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 9:28 pm | आंबोळी

रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे!

तात्या,
दिवाळी गेली, शिमगा गेला, ३१ मार्च संपला .... आता ईस्टर पण झाला......

कधी पुर्ण करताय रौशनी?

आंबोळी

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 10:42 pm | विसोबा खेचर

येत्या १५ दिवसात नक्की पूर्ण करतो..

काय तात्यांनु

तुमी बी ह्ये रीशेशन संपायच्या वायद्यापरमाने वायदे करुन र्‍हायला की राव!! १५ दिवसात संपेल १ महिन्यात संपेल!!!

(रीशेशन ग्रस्त) खालिद

नीधप's picture

3 Jul 2009 - 11:08 am | नीधप

हे १५ दिवस कधी संपायचे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रशान्त पुरकर's picture

14 Mar 2010 - 5:45 pm | प्रशान्त पुरकर

छान लिखान्...अधाश्यासारखे वाचुन काढलेत सगळे भाग....या लेखाचे पुढचे भाग प्रकाशीत झाले आहेत का ??? नसल्यास तात्यासाहेबाना विनन्ति कि त्वरित पुर्ण करावे..

II विकास II's picture

14 Mar 2010 - 10:08 pm | II विकास II

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, असे एका बातमीच्या वाहीनीवर सांगत आहेत. तोपर्यंत कराल तर बरे आहे.

सन्दीप's picture

15 Oct 2012 - 1:29 pm | सन्दीप

तात्या रोशनी पुर्ण कर हि विनन्ती.

लवकर लिहा हो

सन्दीप's picture

9 Jan 2013 - 2:50 pm | सन्दीप

तात्या रोशनी पुर्ण कर हि विनन्ती.

चाणक्य's picture

9 Jan 2013 - 3:38 pm | चाणक्य

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

जेनी...'s picture

10 Jan 2013 - 5:25 am | जेनी...

ओह्ह माय गॉड !

झपाटल्यासारखे सगळे भाग वाचले .

तात्या रौशनी ला तुमच्या विश्वातुन आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खुप खुप आभार

फक्त तिला अर्धवट ठेवु नका .

कळकळीची विनंती .

बांवरे's picture

10 Jan 2013 - 6:14 am | बांवरे

पूर्ण कधी करणार ओ हे ?

अनिता ठाकूर's picture

29 Jan 2013 - 2:09 pm | अनिता ठाकूर

मी पण आजच सगळे भाग एकदम वाचले.पुढचे भाग वाचावयाची उत्कंठा आहे. ते केव्हा येणार?

लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त ताणू नको बाबा,..असे इतरांसारखेच.

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 10:00 pm | प्यारे१

सन्दीप नवीन आहे का मिपावर? :)

हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही नावीन्य दिसत नाही. फिरुन फिरुन त्याच चौकात...!

अल्जेरियाच्या प्रवासवर्णनाची वाट पहात आहे...

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 10:36 pm | प्यारे१

पोटासाठी आलोय राजा!
मी काय फिरायला आलोय काय? काढू दे थोडे दिवस.
तसं असतं तर मुक्तपीठावर नसता टाकला लेख? ;)

तात्याच्या रोशनीवर आपले कारनामे नकोत. भेट तिकडे. ख व मध्ये. ;)

नन्दादीप's picture

19 Mar 2013 - 10:36 pm | नन्दादीप

५ वर्ष ६ महीने वय आहे त्याच...

अविकुमार's picture

2 May 2013 - 2:32 am | अविकुमार

तात्या, पूर्ण करा आता...५ वर्षांनंतर तरी.

विवेक्पूजा's picture

28 May 2014 - 1:53 pm | विवेक्पूजा

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी??? पुर्ण करा हो लवकर....

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी??

स अर्जुन's picture

2 Dec 2017 - 12:09 pm | स अर्जुन

तात्या रोशानि अपुर्ना का ठेवलि.......

रॉबिन हुड's picture

13 May 2019 - 2:06 pm | रॉबिन हुड

तात्या या जन्मी भेटेल ना वाचायला.....

विजुभाऊ's picture

13 May 2019 - 2:44 pm | विजुभाऊ

तुम्हाला या जन्मी तात्याभेटला तरी खूप समजा

जालिम लोशन's picture

13 May 2019 - 3:00 pm | जालिम लोशन

तात्या नाहित?

विजुभाऊ's picture

14 May 2019 - 10:59 am | विजुभाऊ

तात्या आहे की.
फक्त त्याचा पत्ता मिळत नाही

विजुभाऊ's picture

15 May 2019 - 11:40 am | विजुभाऊ

अरे बापरे. काल हे लिहीत होतो.
आज तात्या गेल्याची बातमी आहे.

धक्कादायक आहे हे

पुष्कर's picture

15 May 2019 - 1:43 pm | पुष्कर

खूपच धक्कादायक बातमी.

स्मिता श्रीपाद's picture

15 May 2019 - 11:42 am | स्मिता श्रीपाद

बापरे...धक्कादायक बातमी आहे ?
असं कसं झालं अचानक ?

गामा पैलवान's picture

15 May 2019 - 2:11 pm | गामा पैलवान

ऐकीव कारण हृत्शूळ ( = हार्ट अ‌ॅटॅक) आहे.

त्यांना शांती लाभो.

-गा.पै.