आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा .
त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात.
दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार !
सगळी टाळकी एकदम १२ **ची !
पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा..
पन गेल्या साली घोळ झाला.. तसा पैला पन हुता पन त्या सालास्न लैच वाढला..
आमच्या गावात हिकडल्या आळीला उजवी गल्ली आणी तिकडल्या आळीला डावी गल्ली म्हंतेत.
तशा बाकीच्या पेठा , आळ्या हैत की . भटार गल्ली हाये,त्त्या पल्याड मास्तर गल्ली, पाराच्या अल्याड बलुइतेदार बस्त्यात . गावाच्या टोकाला रंगार्याची आळी हाये.
पण मेन गल्ल्या दोनच ! उजवी आणि डावी !
तर कुठन आली ठाव न्हाय पण येका सालात गावात लै कुत्री आली ! काहीजण म्हणत्यात , म्युनिसिपाल्टीवाले आणून सोडत्यात म्हणून !
पण गावात कुत्री लै वाढली. दिवस रात नुसता राडा !उजव्या गल्लीतला भुंकणा वाढला की डाव्या गल्लीतला भुंकायचा !
पारावर तर नुसते कळवंड !
पैला त्यांच्याच गल्लीत चालायचा तवंर कोनी काय बोल्न ! पण नंतर ह्या गल्लीस्न त्या गल्लीत मायंदाळ दंगा ! एक गल्ली , आळी सोडली न्हाय.
ल्हान बगना, थोर बगना कुठबी चावत सुटलीत.
जसा ह्यो ताप वाढला तसा गावाचा गावपन गेला, आता जवा पारावर यावा तवा नुस्ता कलकलाट आणि याला चाव त्येला चाव ! येवडा भुकायचे की एकमेकाचा ऐकना बंद झाला , कोन काय बोल्ता कळना! कुनाचा पायपोस राह्यला नाय. एक दोन डाव हाकलून झाला , पण आता कुतरी गावातल्यांवर्च गुर्रायला लागली तसा
बाया बापड्या पोर-सोरा पारावर यायची बंद झाली..
चार चौघानी सरपंचास्नी सांगून पाहयल , पन सरपंच पापभिरू मानूस !
म्हणला , जशी आपली गाय बैल तशीच कुत्रीबी ! दोगास्नी सारखाच न्याय ! कुत्र्यास्नी मारय्चा न्हाय !
( तसा आदीमधी पिस्साळल्याला दिसला की मारतय गोळीम, तसा बरा हाय गडी )
मदी तर त्यात एक लाळेचा कुतर घुसला, आरारा ! पाय ठिवला की घसरायचा राव ! दिसलं तिथ जुगायचा ! आता भादवा न्हाय, वैशाख न्हाय ! रीत भातच राह्यली न्हाय!
तर मंडळी मुद्दा असा हाये , गावात लै तरास चालाय.. डाव्या-उजव्या, दोन्ही बी गल्ल्यातली कुत्री लै माजलीत आणि आता मान्सा पेक्षा त्येंची संख्या जास्त झाल्याने गावाचा रुपड बदल्लय !
यास्ने कसा आवरावा , काय कराव सुदरना , म्हणून तुमच्या पायाशी गार्हाणं !
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 8:32 pm | अभ्या..
हायला शाहीर.
मला तर गावाच्या वेशीवर मिपा खुर्दचा बोर्ड दिसून राह्यला.
तसलं काय नाय ना? उगी तंटामुक्तीचे बक्षीसासाठी भांडने लागायला नकोत.
.
आपला नम्र, सालस, तंटामुक्त समिती अध्यक्श, स्वच्छ मिपा अभियान संयोजक, हागणदारी मुक्त समितीचा प्रवर्तक.
अभ्या मिपाकर
रंगारी आळी (टोकाकडंची)
मौजे मिपा खुर्द.
.
ता. क.: ते तुम्हच्या स्पेशल गिफ्ट प्रकरणाचे लागलं का हो मार्गी? ;)
7 Mar 2016 - 9:21 pm | शाहिर
बरोबर वळिखलीस !
7 Mar 2016 - 8:49 pm | जव्हेरगंज
असा सगळा प्रकार झाला तर !!!
9 Mar 2016 - 5:57 pm | असंका
मी डावा की उजव्या आळीतला ते आठवतोय. पण बाकी काय, बरोबरच्चे सगळं!
9 Mar 2016 - 8:58 pm | तुषार काळभोर
आधीसारख्या गप्पा टप्पा कदी व्हतील??
वाट बघतुय.
आपला
(पोरा-सोरांच्या गल्लीचा उपसदस्य अन् गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वतः झाडू घेऊन उभा असलेला पन कुत्र्यांना घाबरणारा)
पैलवान
9 Mar 2016 - 9:02 pm | जेनी...
लय भारी ..... पण कच्चा माल म्हणुन जो याला हात लावेल त्याला
मिपाकुन माझ्या हस्ते पुस्प्गुच =))
10 Mar 2016 - 12:15 pm | नीलमोहर
काही महिन्यांआधी याच थीमवर, अगदी असाच (कुत्र्यांसकट) लेख मिपावर आला होता. त्यानंतरच्या धुराळ्यात काही आयडी पण उडाले होते वाटतं..
सरपंच पापभिरू मानूस - अगदी.. दोघेही :)
11 Mar 2016 - 12:54 am | शाहिर
त्या धाग्याची लिंक मिळेल का ?
11 Mar 2016 - 9:44 am | नीलमोहर
आयडी फुर्ररर धागा फुर्ररर :)
11 Mar 2016 - 9:14 am | यशोधरा
अगदीच अनुमोदन.