(असा नवरा असता तर..)

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
9 Mar 2016 - 10:19 am

असा नवरा असता तर, आम्ही असे झालो नसतो
भर उन्हात रिक्षावाला शोधत
हापिसला पायी निघालो नसतो
त्याच्या नखाची कुणाला आली नसती सर
असा नवरा असता तर

घरदार काय जग गाजवले असते
शॉपिंग हॉटेलिंग ऐश केली असती
आएम द क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणत मिरवले असते
पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर
असा नवरा असता तर

तळजाईच्या जंगलात निवांत हिंडलो असतो
आम्ही झेड ब्रिजवर तुम्हाला कधीच दिसलो नसतो
ओंकारेश्वराची कृपा झाली असती आम्हावर
असा नवरा असता तर

सेंट्रलच्या वॉचमनने केला असता सलाम
रोज दुपारी ताणून देऊन केला असता आराम
नवऱ्याने माझे न ऐकता वेळेअगोदर
रेडी ठेवले असते ब्रेकफास्ट लंच अन डिनर
असा नवरा असता तर

गाडगीळांनीही होम डिलिव्हरी केली असती
पाचूची अंगठी न बोलता हातात आली असती
काही नसता म्हटला तो मागितल्यावर
प्लॅटिनमचे ब्रेसलेट नाजूक पोवळ्यांचा सर
असा नवरा असता तर

मंगलात मैत्रिणींनी पकडली असती त्याच्या शेजारची जागा
म्हटले असते त्यांना टवळ्यांनो अंतर ठेऊन वागा
मेल्या स्कार्फवाल्याही जळल्या असत्या सिग्नलवर
असा नवरा असता तर

आता स्वतःला दोष देऊन काय फायदा
तो होता.. वेळही होती..
केला असता ठामपणे तेव्हाच एक वायदा
झाले असते घरटे दोघांचे सुंदर
असा नवरा असता तर...

पेर्रणा...

अविश्वसनीयप्रेम कविताविडंबन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Mar 2016 - 10:21 am | प्रचेतस

=))

जेपी's picture

9 Mar 2016 - 10:24 am | जेपी

=))=))=))

होळीच्या आधीच दिवाळी =))

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2016 - 10:26 am | श्रीरंग_जोशी

जमलंय पण नेहमीची मजा नाय आली.

बादवे या निमित्ताने प्रेरणा वाचली.

पलाश's picture

9 Mar 2016 - 10:29 am | पलाश

अगदी छानच!! :)))

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2016 - 10:30 am | प्राची अश्विनी

=))

सूड's picture

9 Mar 2016 - 10:44 am | सूड

वाईट्ट !! =))

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2016 - 10:45 am | पिलीयन रायडर

अगदीच भारी!! उच्चच!!

मंगलात मैत्रिणींनी पकडली असती त्याच्या शेजारची जागा
म्हटले असते त्यांना टवळ्यांनो अंतर ठेऊन वागा
मेल्या स्कार्फवाल्याही जळल्या असत्या सिग्नलवर
असा नवरा असता तर

महान!

विडंबन स्पर्धेसाठी काही शिल्लक आहे की नाही!!!

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 11:09 am | नूतन सावंत

मस्त.मस्त.

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2016 - 11:09 am | चौथा कोनाडा

ल ई भा री !

मजा आहे बुवा!

:-)))

यशोधरा's picture

9 Mar 2016 - 11:10 am | यशोधरा

=)) =))

अजया's picture

9 Mar 2016 - 11:13 am | अजया

लैच भारी.योग्य ठिकाणी फाॅरवर्ड केल्या गेले आहे ;)

प्रेरणा आणि विडंबनांची दुनिया न्यारी, तुमास्नी इडंबन जमलया, लै भारी !

पैसा's picture

9 Mar 2016 - 11:57 am | पैसा

=)) विडंबन भारी! पण शेवट जरा उदास करून गेला. आणि हो, मित्र खूप छान असतो. त्याचा नवरा झाला की गेलाच कामातून!

चिगो's picture

9 Mar 2016 - 2:09 pm | चिगो

भारीच विडंबन.. शेवट मात्र थोडा 'भातुकलीच्या खेळामधली..' टाईप झालाय..

नीलमोहर's picture

9 Mar 2016 - 2:32 pm | नीलमोहर

कवितेचा मी लिहीलेला शेवट आणि सर्वांच्या समजण्यात येत असलेला शेवट बहुधा वेगवेगळे आहेत.
मला अभिप्रेत असलेला अर्थ कोणाला शोधता येतो का बघू..

बॅटमॅन's picture

9 Mar 2016 - 11:58 am | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

नाखु's picture

9 Mar 2016 - 12:42 pm | नाखु

दगडात

इशारा,इरादा आणि इमानी (की इमामी) पक्षी उडवलेले आवडले..

हि होळीची झलक सम्जावी काय ?

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2016 - 12:44 pm | मराठी कथालेखक

पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2016 - 12:49 pm | मराठी कथालेखक

पण बाकी उल्लेखही दुर्गा टेकडी, भक्ती शक्ती, शिवार गार्डन, प्रदीप स्वीट्स , बिग सिनेमा यांचे असते तर अजून मजा आली असती (जयश्री सिनेमा पण चालला असता :)

नीलमोहर's picture

9 Mar 2016 - 2:22 pm | नीलमोहर

पीसीएमसीत घर घ्यायचं स्वप्न कधीचं आहे :)

सध्या पुणेकर असल्यामुळे पुण्यातील ठिकाणे आलीत, तिकडे रहायला गेलो की मग आहेच..
रावेत पूल, भे़ळ चौक, प्राधिकरण, आकुर्डी रे.स्टे, पुनावळे, स्पाईन रोड इ. इ.

नाखु's picture

9 Mar 2016 - 4:08 pm | नाखु

ठिकाणे चालत जाण्याच्या अंतरावर आहेत (माझ्या घरापासून)
रावेत पूल, भे़ळ चौक, प्राधिकरण, आकुर्डी रे.स्टे

पिंचीवाला पुणेकर नाखु

नीलमोहर's picture

9 Mar 2016 - 4:32 pm | नीलमोहर

असू द्या हो असू द्या.. जळवू नका..
मीही घेईन तिकडे घर मग असेच लिहीन..
(लहानपणापासून अजूनपर्यंत शिवाजीनगर ते आकुर्डी, लोणावळा लोकलने मामाच्या घरी जाणे एन्जॉय करणारी)

नाखु's picture

9 Mar 2016 - 4:37 pm | नाखु

जळवित नाहीच्च मुळी , उलट जास्तीत जास्त मिपाकर या भागात आले तर भागाला जरा प्रसिद्धी मिळेल.

कप्ताना,मुनी ऐकताय ना रे !!!!

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2016 - 10:01 am | मराठी कथालेखक

तुमच स्वप्न लवकर पुर्ण होवो म्हणून शुभेच्छा.

पिपरी चिंचवडमध्ये तुमचं स्वागत करायला आवडेल

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2016 - 4:59 pm | चौथा कोनाडा

जयश्री सिनेमा ....... :-)))

इस्कू बोलतें हार्ड कोर पिंचिंकर !
इथं बर्‍याच वारया केल्यात विशाल होण्यापुर्वी !

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2016 - 10:04 am | मराठी कथालेखक

:)
पुर्वी सहकुटूंबही जाता यायचे जयश्रीला.
तसेच जवळपासच्या काही कारखान्यातील लोक अर्धी सुटी घेवून वा मध्येच कलटी मारुन जयश्रीला सिनेमा बघून यायचे असं खूप ऐकलं आहे.
आताचं जयश्री मात्र... सहकुटूंब तर दूर राहिलं मित्रासोबतही जाण्याचा विचारही करवणार नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Mar 2016 - 12:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

चेष्टेच्या स्वरुपात का होईना पण सत्य मान्य केल्या बद्दल निलमोहरताईचे मन:पूर्वक अभिनंदन. हे सूर्यप्रकाशा इतके प्रखर सत्य आहे की जगातला प्रयेक नवरा असाच असतो आणि हे उघड सत्य मागील १० हजार वर्षात कोणत्याही स्त्रीने जाहीरपणे मान्य केलेले नाही.

पण प्रत्येक विवाहित स्त्री मनातल्या मनात हे मान्य करतेच की तिचा नवरा खुप महणजे खुपच, म्हणजे फारच, म्हणजे अतिशयच, म्हणजे लई म्हणजे लैच चांगला आहे. तिचे भाग्य थोर म्हणुनच तिच्या नशिबी असा सद्गुणांचा पुतळा आला. याच्याशी लग्न करताना तिची मागील सात जन्मांची पुण्याई सार्थकी लागली

पण इतर जळकुंड्या स्त्रियांची आपल्या नवर्‍याला नजर लागू नये या आणि केवळ याच भावनेने ती आपल्या नवर्‍याला चारचौघात नावे ठेवता असते. खरेतर जगातला प्रत्येक नवरा हा एक हिराच असतो. खराब टाकाऊ नवरा मी तरी आज पर्यंत पाहिलेला नाही.

या संसाररूपी रथाला दोन चाके असतात एक स्त्री आणि एक पुरुष. पण ही चाके बनवताना पण देवाने थोडी गम्मत केली आहे. त्यातले पुरुष रुपी चाक हे वर्तुळासारखे असते गोल गरगरीत . त्यामुळे ते कुठेही कसेही वेगाने जाऊ शकते. तर दुसरे चाक थोडे अष्टकोनी किंवा षटकोनी असते (काही पंचकोनी चौकोनी आणि त्रिकोणी चाके सुध्दा माझ्या पहाण्यात आहेत ). पण कसेही असले तरी, जे आहे ते आपल्याच रथाचे चाक आहे हे मान्य करुन पुरुष ते चाकही आपल्या बरोबर नेटाने चिकाटीने आणि मोठ्या धैर्याने ओढत असतात.

इथल्या मिपा बायकांनी दिलेल्या प्रतिक्रीया वाचल्यावर सुध्दा हीच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक स्त्रीला आपल्या नवर्‍या बद्दल किती आदर आणि अभिमान आहे ते.

पैजारबुवा,

यशोधरा's picture

9 Mar 2016 - 12:53 pm | यशोधरा

पण इतर जळकुंड्या स्त्रियांची आपल्या नवर्‍याला नजर लागू नये या आणि केवळ याच भावनेने ती आपल्या नवर्‍याला चारचौघात नावे ठेवता असते. खरेतर जगातला प्रत्येक नवरा हा एक हिराच असतो. खराब टाकाऊ नवरा मी तरी आज पर्यंत पाहिलेला नाही.

जळकुंड्या शब्द लईच आवडलेला आहे! =))

सूड's picture

9 Mar 2016 - 2:25 pm | सूड

कुजाया जायेत क्वचिदपि कुभर्तार न भवति॥ ;)

नीलमोहर's picture

9 Mar 2016 - 4:12 pm | नीलमोहर

अहो, मी या विषयावर टिप्पणी करण्याच्याही पोझिशनमध्ये नाही तिथे मान्य अमान्य काय करणार डोंबलं :p

'जगातला प्रयेक नवरा असाच असतो आणि हे उघड सत्य मागील १० हजार वर्षात कोणत्याही स्त्रीने जाहीरपणे मान्य केलेले नाही.'

- असाच म्हणजे नक्की कसा ?

अभ्या..'s picture

9 Mar 2016 - 4:16 pm | अभ्या..

असाच म्हणजे असातसाच हो.
(सगळ्या मिपाकर नवर्‍यानो/नवरे मिपाकरांनो सॉरी बर्का.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2016 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

अबोली२१५'s picture

9 Mar 2016 - 12:56 pm | अबोली२१५

नवरा विकणे आहे

पैसा's picture

9 Mar 2016 - 1:04 pm | पैसा

=))

अभ्या..'s picture

9 Mar 2016 - 1:54 pm | अभ्या..

हेहेहेहेहेहे
मस्त.
मंगला खरच फेमस दिसतय. ;)

नीलमोहर's picture

9 Mar 2016 - 4:46 pm | नीलमोहर

तुम्ही पाहिले असेल की, नसले तर जाऊन या.
मल्टिप्लेक्सच्या गर्दीत कधीच जावे वाटत नाही, त्यामुळे मंगलाला पर्याय नाही.
तिथे फालतू पब्लिक फिरकत नाही, निवडक प्रेक्षक येतात.

नाखु's picture

9 Mar 2016 - 4:53 pm | नाखु

रैट म्हंजे रैट्ट है !

तिथे फालतू पब्लिक फिरकत नाही, निवडक प्रेक्षक येतात.

पद्मावति's picture

9 Mar 2016 - 2:31 pm | पद्मावति

=)) मस्तं, मस्तं!!!

सस्नेह's picture

9 Mar 2016 - 4:04 pm | सस्नेह

एकदा बघावा म्हणते हा कवतिकाचा नौरा !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2016 - 6:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हल्ली क्रेडिट कार्डाला नवरा म्हणायची फ्याशन आलेली दिसते =)) =))

कविता अवडली =))

जव्हेरगंज's picture

9 Mar 2016 - 7:10 pm | जव्हेरगंज

हा हा हा !
झ्याक !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2016 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासच. जियो.

-दिलीप बिरुटे

काहीच्या काही कविता.

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2016 - 9:26 pm | श्रीरंग_जोशी

नीमोबेण आपणास मिपाच्या 'देवांगी पटेल(पुणेकर)' हा किताब पेशवेउद्यानातील तळ्याकिनारी, जिथे टिकाऊ रोपे दिसतात त्या गर्दीच्या साक्षीने देण्यात येत आहे.
जरा मंगळवारपर्यंत थांबा. सारे बेशणेलनेट्वापरणारे कसे निलायम टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)

पेर्रणा...

नीलमोहर's picture

10 Mar 2016 - 10:40 am | नीलमोहर

किताब वगैरे नको हो, सगळ्यांचे प्रोत्साहनाचे शब्द हाच सर्वात मोठा किताब (खिताब ?)

बाकी सत्काराचे ठिकाण पाहून मन भरून आले, डोळे पाणावून... असो.
मला नेहमी जाणवायचं, वाटायचं पण आज मात्र खात्री पटलीय... तुम्हीच... ते माझे जत्रेत हरवलेले भाऊ, हो ना?
त्या टेलिपथीशिवाय का तुम्हाला हे ठिकाण सुचलं असतं, तिथे सत्काराचे ठरलेच तर अजूनही बरीच मंडळी येतील नारळ, आपलं श्रीफळ द्यायला :p
(सांगाचतुम्हालाकसेकळालेमाझेहापिसतळ्यातलागणपतीपेशवेउद्याननिलायम्टोकीज्जवळआहेते!!)

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2016 - 10:59 am | श्रीरंग_जोशी

किताब वगैरे नको हो, सगळ्यांचे प्रोत्साहनाचे शब्द हाच सर्वात मोठा किताब (खिताब ?)

केवढा हा विनम्रपणा.

मला नेहमी जाणवायचं, वाटायचं पण आज मात्र खात्री पटलीय... तुम्हीच... ते माझे जत्रेत हरवलेले भाऊ, हो ना?

ही दुनिया म्हणजे एक जत्राच आहे अन मी प्रथमपासून हरवलेलाच आहे (सा प ड ल्या स स ड पा त ळ बां धा) =))

(सांगाचतुम्हालाकसेकळालेमाझेहापिसतळ्यातलागणपतीपेशवेउद्याननिलायम्टोकीज्जवळआहेते!!)

आकाशातल्यादेवाच्याकृपेनेटुक्कालागलानेहमीलागतनाहीआजचलागलाअबमैक्याकरू!!

नीलमोहर's picture

10 Mar 2016 - 11:30 am | नीलमोहर

स ड पा त ळ बां धा क र्क रा स जि ल बी प्र मा णे सा धे स र ळ शां त ग री ब वि न म्र सु स्व भा वी प रो प का री
म न मि ळा वू

सायकलस्वार's picture

10 Mar 2016 - 5:04 am | सायकलस्वार

ताई तू टेन्शन नको घेउ... आमच्या उर्मिलालासुद्धा बेचाळीसाव्या वर्षी का होईना नवरा मिळाला... तुलाही मिळेल हो!!...