गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं
एक अधिक एक बरोबर दोनच असतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं.
फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं
लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं
यशाच्या पायऱ्या चढताच कळतं
इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं.
ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ)
मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता
नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं
इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता.
भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही
स्पिरीटचा दिवा, एबोनाईटचा दांडा अन् रेशमी रुमाल
माझ्याशी असे का वागले तेच कधी कळलं नाही
आज भौतिक सुखाचा लाभ घेताना
असे फालतू प्रश्न मुळीच पडत नाही.
रसायनशास्त्राच्या तासाला वाटतं
यशाचा फॉर्म्युला फारच कठीण असतो
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
आयुष्याला कोणताच फॉर्म्युला लागू नसतो
जीवशास्त्र डोक्याला फार ताण होतं
कापलेलं गांडूळ खूपच घाण होतं
जलव्यालाच्या कोलांटउड्या तेवढं करमणूक होतं
अनुभवाच्या पायऱ्या चढतानाच कळतं
जीवनातलं परस्परावलंबन त्यांच्याकडून शिकायचं असतं
ईकोच्या तासाला आकड्यांमध्ये डोकं फिरत होतं
दुसऱ्याच्या पाप-पुण्याचा हिशोब मांडत होतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
आयुष्याच्या ताळेबंदात माझं कुठंतरी चुकत होतं
प्रयोगशाळेत वातावरण नेहमीच मस्त होतं
ब्युरेटने किती मिळवलं, पिपेटनं किती गमावलं
याचं गणित करायचं होतं
लॉग टेबलमध्ये स्वतःचं नशिब शोधायचं होतं
तिच्या डोळ्यातले सूक्ष्म भाव
व्हर्निअर क्यालिपरने मोजायचं ते वयच होतं
H2S चा वास येताच नाक दाबून धूम ठोकायचं होतं
इतिहास - भूगोलाने जग आमचं केवढं मोठ्ठ केलं
नागरिकशास्त्र काय होतं, शेवटपर्यंत गुपितंच राहिलं
थोडफार शहाणपणं असेल शिल्लक राहिलं
ते संस्कृतच्या सुभाषितमालांमध्येच वाचायला मिळालं
असं आमचं शिक्षण वीस-एकवीस वर्षे चालू होतं
डोकं म्हणजे पुस्तकांची गोणी होतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
आम्हा पोरांचं पुढे काही खरं नव्हतं
जीवनाच्या बागेत फुलवा ८०% सद्गुणांचा मळा
लावून त्याला सजवा २०% पुस्तकांच्या माळा
यशाचे एकच सूत्र पाहिलं, याचि देहि याचि डोळा
आत्मिक उंची(EQ) शिवाय हे शक्य नाही बाळा
शिकवित नाही जे कोणतीच शाळा
अशी माझी पुस्तकांची शाळा
बनेल का सर्वांची जीवनशाळा
------ कवी मनाचा
प्रतिक्रिया
1 Mar 2016 - 11:41 pm | एक एकटा एकटाच
चांगलीय
2 Mar 2016 - 2:50 pm | पद्मावति
छान आहे. आवडली.