पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना
तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो
डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात
ते अगदीच टाकाऊ असतात
मला तो भाग आवडत नाही
स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते
चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही
येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही
कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही
रॅडीसनमध्ये एकदा जेवल्यावर बिल भरल्याचं चांगलच आठवतयं
ते मात्र मी अजून जपून ठेवलयं, मात्र ते किती होतं हे मी तुम्हाला सांगणार नाही
आताशा या आठवणी मला जास्तकरुन येत नाहीत
कारण सध्या मी पुण्याबाहेर राहतो
प्रतिक्रिया
28 Feb 2016 - 8:29 pm | पैसा
मिस यू पुणे का! का या कवितेच्या मागेही पुन्हा कोलटकर?
28 Feb 2016 - 9:22 pm | जव्हेरगंज
येस मिसींग पुणे !
कोलटकर नाहीत यामागे..
पण त्याच धर्तीवर ..
28 Feb 2016 - 9:57 pm | उगा काहितरीच
तुम्ही कथाच लिहीत जा हो !
29 Feb 2016 - 8:51 am | प्रचेतस
जयश्री मिसळ का?
साफ गंडलेली आहे ती.
29 Feb 2016 - 9:57 am | नाखु
त्यांना पातेल्याची पातळीवाली मिसळ का सुचवित नाही.
स्मरणशील नाखु
1 Mar 2016 - 12:01 am | सतिश गावडे
तुमच्या घराच्या बाहेरच गावडे पेट्रोल पंपासमोर जाळ काढणारी मिसळ आहे. नांव काय आहे त्या हाटेलाचे?
1 Mar 2016 - 6:59 am | प्रचेतस
दे धक्का झटका मिसळ =))
29 Feb 2016 - 8:57 am | अजया
:)
29 Feb 2016 - 10:31 am | यशोधरा
वा, वा, कोणीतरी पुण्याची आठवण येते असे लिहिले ब्वॉ.
29 Feb 2016 - 11:44 am | चांदणे संदीप
लोल कविता!
(रसग्रहण इज कमिंग सून...स्टे ट्यून्ड! ;) )
Sandy
29 Feb 2016 - 6:42 pm | जव्हेरगंज
वेटींग फॉर धीस !
स्टेईंग ट्यून्ड!
=))
29 Feb 2016 - 8:27 pm | चांदणे संदीप
आत्मचरित्र + प्रवासवर्णात्मक काव्य हा नवीनच प्रकार कवीने इथे सुरू केल्याबद्दल सर्वप्रथम कवीचे अभिनंदन! कवीने उल्लेखलेल्या एकूणएक ठिकाणांवर, वाचक, कवी स्वत: तिथे उभा आहे असेच चित्र डोळ्यासमोर आणतो! त्यामुळे चित्रमय अशी ही कविता झालेली आहे.
आधीच 'पुणे' हा विषय घेऊन कवी, जणू बोर्डाच्या परीक्षेत नुसत्या एकाच प्रश्नाचे उत्तर लिहून १०० पैकी ३५ गुण मिळावे, आणि पास व्हावे! असा पास होऊनही नुसत्या 'पास क्लास' वर थांबत नाही तर पहिल्या ओळीत शनवारवाड्याला उभे करून 'डिस्टिङ्गक्षण' मिळवायच्या कामगिरीवर दमदारपणे मार्गक्रमण करतो! इथे गर्दी, गोंगाट याचा भाग होऊनही कवी स्वत: ते साफ विसरून जातो, यायोगे, कवीने आपण मनुष्यच असल्याचा प्रबळ-सबळ, काय तो, पुरावा दिलेला आहे, याबद्दलही कौतुक!
इथे कवीने अत्यंत मोलाची तसेच अद्ययावत माहिती वाचकांस दिली आहे ती म्हणजे, "डुप्लिकेट पीनांचे चार्जर!" कुठल्या "पीना" चार्ज कराव्या लागतात? याच्या उत्तरासाठी वाचकाच्या संशोधनवृत्तीस चालना दिल्याबद्दल वाचक कवीचे आभारी आहेत. शिवाय ते 'टाकाऊ' वगैरे लगेच सांगूनही टाकल्याने वाचकांस होणारया भावी संशोधनत्रासातून लगेचच मुक्तीही दिल्याने वाचक कवीचे ऋणी'च' राहतील!
तुडुंब भरलेली पीएमटी(कविता प्राचीन असल्याचा पुरावा!) बघितल्यावर कवीची जी भोवळ आहे ती आनंदोत्कट नवलाईतून आलेली आहे हे वाचून सुजाण वाचकांस आनंदाचे भरते आल्याशिवाय राहत नाही! इथे कवीची एखाद्या ठिकाणाची/व्यक्तीची/समूहाची/पदार्थाची, प्रशंसा/कौतुक/स्तुती/तारीफ करण्याची जी आगळी पद्धत आहे ती मराठी काव्यात विरळच! तोच प्रकार "मिसळपाव" या खाद्यविशेषांच्या बाबतीतही दिसतो. इथे कवी कबूल करतो की जागतिक दर्जाची, केवळ फरसाण्याची भाजी अशा नावाने कवीला माहित असलेली वाटी (डिश!) कवी नंतर पुढे तिचे "मिसळपाव" हे नाव माहित झाले तरी अन्यत्र कुठे जिभेसही लावत नाही कारण एकच! "फरसाण्याची भाजी" समजून खाल्लेल्या आणि अत्त्युच्च रसास्वाद मिळवून दिलेल्या त्या मिसळीची सर पुन्हा कशी येणार? वा! वा! ह्याला म्हणतात खरी रसिकता! इथे कवीला पुन्हा त्याच प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात समस्त वाचकवर्गातफ्रे मी आमंत्रित करतो. (बिल कवीला'च' द्यायचे आहे! धन्यवाद!)
आहार व स्वास्थविषयीच्या टीपा नकळतपणे देऊन कवी वाचकांस आगामी कविता वाचण्यासाठी जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो. तसेच बाकरवड्या हा शब्द नुसता लिहूनच कवी पुण्याच्या प्रसिद्ध पदार्थाची जाहिरात करण्याकामी खारीचा वाटा उचलताना दिसतो! सेम टू सेम जोशी वडेवाल्याच्या बाबतीत!
येरवडा! इथे पुण्यातल्या दोन प्रसिद्ध वास्तू गळ्यात गळे घालून उभ्या असल्याने, कवी नेमक्या कोणत्या वास्तूस भेट देण्यास गेलेला? हा प्रश्न निर्माण करून वाचकांस सुन्न(!) करून सोडण्यास कवी यशस्वी झालेला आहे!
इथे कवीची हळहळ वाचकांच्या हृदयास भिडून डोळ्यातून हळूच बाहेर डोकावते!
शेवटी कवीला सर्व जमाखर्च आठवला आहे आणि कवी वाचकांस निरोप द्यायच्या तयारीत आहे!
इथेच कवीने अफलातून श्लेष पुण्याच्या क्षितीजावर उधळवून दिलेला आहे..... आणी (खासकरून पुण्याच्या) वाचकांना माना वर करायची (पक्षी: ताठ करायची) संधी मिळवून दिलेली आहे. अशी ही उमदी कविता मराठीच्या (पुण्याच्या?) वैभवास काळा तीट लावते. हिची अनेक पारायणे होवोत, अनेक वेगवेगळ्या (सुधारित!) आवृत्त्या निघोत, 'वि' आणि 'सु' अशी डंबणे निघोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो!
(कृहघ्याहेवेसांनल!!)
Sandy
29 Feb 2016 - 9:01 pm | जव्हेरगंज
च्यामारी !!
गाडी लय बुंगाट सुटलीय तुमची !!
साष्टांग ___/\___
याचा स्वतंत्र धागा काढावा अशी शिफारस करतो :)
29 Feb 2016 - 9:11 pm | स्वामी संकेतानंद
अफाट!!
29 Feb 2016 - 9:13 pm | प्रचेतस
अगागागागागा... चांदणेबुवा _/\_
महान आहात.
29 Feb 2016 - 10:47 pm | चांदणे संदीप
लाज्वू नका!
(लाजलेला)
Sandy
1 Mar 2016 - 12:00 am | अभ्या..
सॅनदीबाबा पीएचडी करतो का आता "मेकिंग ऑफ डायनासोर फ्रॉम लिझर्ड" वर ?
1 Mar 2016 - 12:53 am | चांदणे संदीप
अच्च जालं काय!
दादानु, उल्ट पण येतयं की...
.
.
.
.
निस्ता ढिश करायचा की.... 'ढॅण्डॅढॅण'...
...डायनोची पालुडी!
('ढॅण्टॅढॅण' सौजन्य: मराठी नाटक, "यदा कदाचित")
Sandy
1 Mar 2016 - 2:04 am | बोका-ए-आझम
असा तो पुण्यनगरीचा महिमा माऊली!
1 Mar 2016 - 8:45 am | नाखु
(धागेको)चार चांद लगाने का काम !
संजीदा दीपोंका प्रकाश अभिलाषी नाखु
1 Mar 2016 - 9:46 am | चांदणे संदीप
जरा 'टिपूर' झाले तर 'पेटते' म्हणताय तुम्ही!
;)
Sandy
1 Mar 2016 - 9:01 am | एक एकटा एकटाच
हायला
सॉल्लीड
1 Mar 2016 - 1:22 pm | भरत्_पलुसकर
देवा पाय दाखवा जरा _/\_
1 Mar 2016 - 1:57 pm | उगा काहितरीच
संदिपभौ , दंडवत स्विकारा म्हाराज्या ! एक नंबर प्रतिसाद ! लोल लोल !
1 Mar 2016 - 2:09 pm | बॅटमॅन
जहापन्हा.......तुस्स्स्सी ग्रेट हो........तोहफा कुबूल क्रो....................
(योग्य ते चित्र कल्पावे.)
1 Mar 2016 - 2:18 pm | तुषार काळभोर
29 Feb 2016 - 12:03 pm | नीलमोहर
कोल्ह्याला द्राक्षे आंबट :p
कृ प या ह ल्के च घे णे इ त र प र्या य ना ही या ची नों द घ्या वी :)
1 Mar 2016 - 10:11 am | मुक्त विहारि
इतक्या सुंदर कवितेत...श्रीखंडाच्या पाण्याचा उल्लेख नसल्याने, टीव्र णिषेध...
1 Mar 2016 - 1:20 pm | भरत्_पलुसकर
जंक्शन!