साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 4:31 am

आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय.

तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील. गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)

सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..
यांच्या लिखाणाविषयी बोलायचे झाले तर मी आवर्जून सुदीप नगरकरच्या 'That's the way we met!' मधले दोन परिच्छेद येथे नमूद करू इच्छितो..

  1. I want to marry you near the sea, maybe Marine Drive. I always imagine
    how, after the ceremony is over you will sit in the car and I will drive us
    towards our new home. The girls in our family don’t wear Punjabi chuda in
    marriage, but I want you to wear it. You will be dressed in my favorite red
    saree with a silver border on it. I will look at the chuda in your hand and
    smile. You will coyly glance at me and I will smile seeing you blush. All the
    way while driving, I would think of how beautiful you looked on our wedding
    night.
  2. I don’t want to lose you forever. Don’t you remember our romantic nights
    in Manali, where we cuddled with each other, and made sweet love until day
    break? I think we broke the flower vase too that night. We were on the table
    and all over. How can you forget the chuda you bought just because it was
    my wish? Our name carved over it, I thought Aditya and Riya couldn’t be
    separated. They are one. Why do you want to change that?

तर वरील फक्त दोन परिच्छेदातच जरी तोडक्या मोडक्या इंग्रजीकडे दुर्लक्ष केले तरी नगरकर महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो.
फक्त एक कॉलेजकुमार आणि एक कुमारिका उचलायचे, आणि त्यांच्यातले काही इनटीमेट सीन, लैंगिक संबंध, नात्यातले बालिश आणि मूर्ख चढउतार दाखवायचे आणि अकरावी, बारावी आणि ग्रजुअशन ची पोर टार्गेट करून हि कागदाची बंडलं 'कादंबरी' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग

यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात.
एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक पुस्तक विकले गेले म्हणून "बास, आता आयुष्यात दुसरे काही करायचेच नाही तर फक्त पुस्तके लिहित राहायचे" असला करिअरीस्टिक प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेली हे लोक सध्या दर वर्षी दोन कादंबऱ्या लिहितात (नव्हे खपवतात) . आणि जोड धंदा म्हणून 'टाइमस ऑफ इंडिया' मध्ये "What young India wants?" या मथळ्याखाली भारतीय तरुणाचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात.

आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का? तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.

एक मजेशीर गोष्ट सांगतो आणि माझे पाल्हाळ संपवतो, काही महिन्यांपूर्वी, या नगरकरांचा म्हणे महानगर पालिकेच्या कुजलेल्या पोलमुळे स्कूटर वरून अपघात झाला, किरकोळ जखमीही झाले तर हे महाशय पोहचले थेट महानगरपालिकेत, आणि म्हणाले 'आता मला एक महिना बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे १० लाखांचे नुकसान होईल आणि मला अगोदरच १ लाख दवाखान्यात खर्च झाला आहे हि सर्व रक्कम मला नुकसान भरपाई म्हणून द्यावी' पण महानगरपालिकेने फक्त माफी मागून प्रकरण संपवले. मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो आदमी कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे धैर्य को नही हर सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा एक पुस्तक बाजारात आणले.
आता या महान माणसाविषयी आणि याला 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणणाऱ्या एबीपी माझा विषयी मी काय लिहू तेच सुचेनासे झालेय

(आपली मते जाणून घ्यायला आवडतील, चेतन भगत आणि दुर्जोय दत्ता विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...)

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

25 Feb 2016 - 5:32 am | अनंत छंदी

यशाचे गमक भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्गच आहे.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 6:37 am | तर्राट जोकर

१. तुम्ही जळता काय हो त्यांच्या पुस्तकांच्या खपावर, त्यांना मिळणार्‍या प्रसिद्धीवर...?
२. तुमचा नक्की काय प्रॉब्लेम काय आहे...?

आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते.

>> एखाद्या प्रथितयश, वयोवृद्ध कलाकाराला एकेरी संबोधण्यासाठी एक विशिष्ट अधिकार लागतो, आय होप तुमच्याकडे आहे.

गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत.

>> बरं मग? चांगलंच आहे ना. लेखनकामाठी करुन करोडपती होता येतं हे दाखवुन दिलंय की पठ्ठ्यांनी.

ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती.

>> कमाल तुमची आहे. भारतात घडत असलेला बदल तुम्हाला दिसत नाही तो.

आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय?

>> लोकांना त्यांनी लिहलेले आवडते व त्यासाठी ते पैसे मोजतात. सो षिंपल. तुम्ही लिहा, तुम्हालाही मिळतील.

भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)

>> ह्या ह्या. अभ्यासूपणाचा फारच दुष्काळ ब्वा तुमच्याकडे. जरा ह्या दोन कुंपनांपलिकडे उडी मारायची ताकद मिळवा. कारणे सापडतील. नाहीच सापडली तर मला विचारा. पण आधी मेहनत करा थोडी. यशाचे गमक तिथेच आहे.

सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..

>> सुदिप नगरकर ह्यांनी व्यक्तिगत आयुष्यात काय उठाबशा काढल्यात याच्याशी त्यांच्या लिखाणातल्या साहित्यिक मूल्य असण्या-नसण्याशी काय रिलेशन आहे ते समजले नाही. असले प्रेमभंग गेल्या कित्येक दशकात कित्येक इंजीनीअरींग कॉलेजात झाले असतील, कित्येक देवदास दारू-सिगरेटमधे बुडाले, पण अशी डायर्‍यांतून पुस्तके प्रसवून त्याला बेस्टसेलर बनवणारे निपजले नाहीत, त्यांच्यात पापभीरू वृत्ती असेल नाही?

यांच्या लिखाणाविषयी बोलायचे झाले तर मी आवर्जून सुदीप नगरकरच्या 'That's the way we met!' मधले दोन परिच्छेद येथे नमूद करू इच्छितो..

तर वरील फक्त दोन परिच्छेदातच जरी तोडक्या मोडक्या इंग्रजीकडे दुर्लक्ष केले तरी नगरकर महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो.

>> का म्हणू नये लेखक? ते लिहतायत, वाचक पैसे देऊन वाचतायत.

फक्त एक कॉलेजकुमार आणि एक कुमारिका उचलायचे, आणि त्यांच्यातले काही इनटीमेट सीन, लैंगिक संबंध, नात्यातले बालिश आणि मूर्ख चढउतार दाखवायचे आणि अकरावी, बारावी आणि ग्रजुअशन ची पोर टार्गेट करून हि कागदाची बंडलं 'कादंबरी' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग

>> इतकं सोपं तंत्र आहे, नाही? आपल्या मिपावर २७००० मेंबर आहेत. चला पुढच्या वर्षी २७००० बेस्टसेलर काढू. फॉर्मुला लागला हातात. ध्यन्यव्याद, खाडेसर! __/\__

यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन.

>> कादंबर्‍या एकामागून एक विक ल्या जातात म्हणुन साहित्यिक मूल्य शून्य? अजब शोध. काय असते बा हे साहित्यिक मूल्य जरा आम्हालाही कळू द्या, खाडेसर!

आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज.

>> कोवळ्या पोरांना जे वाचायचे तेच वाचतात आणि संपवतात हो. म्हातार्‍यांसारखे चघळत बसत नाहीत. आपण खातोय ते चुयंगम नक्की कशासारखं लागतं ह्यावर तासंतास चर्चा करायला कोवळ्या पोरांना वेळ नाही.

यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात.

>> कोसला ययाती आजही बेस्टसेलर आहेत. काळानुसार रीलीवंस कमी झाला असेल. दो बिघा जमीन, आवारा, बुटपॉलिश एकेकाळचे व्यावसायिक हिट सिनेमे, कलात्मक दर्जाही उत्तम. आज रिलीवंट नाहीत. आज गंगाजल, अपहरण, ब्लॅकफ्रायडे आवडतात पोरांना. भाइजान, किंगखान चे टिनपाट पिच्चर दर शुक्रवारी निघतात, हिटही होतात, म्हणून चित्रपट कळत नाही हो ह्या पोरांना असा आरडाओरडा होत नाही. समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी एक समझ है। समझ समझ के जो न समझे, मेरे समझ में वो ना समझ है। असे बुजुर्ग बोलून गेलेत.

एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक पुस्तक विकले गेले म्हणून "बास, आता आयुष्यात दुसरे काही करायचेच नाही तर फक्त पुस्तके लिहित राहायचे" असला करिअरीस्टिक प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेली हे लोक सध्या दर वर्षी दोन कादंबऱ्या लिहितात (नव्हे खपवतात) .

>> मग तुम्हाला काय म्हणायचय ह्यांनी काय करावं. ते कादंबर्‍या खपवतात त्याने साहित्य विश्वाचं नेमकं काय नुकसान होतंय हो? झालाच तर फायदाच होतो ब्वा, काय खाडेसर!

आणि जोड धंदा म्हणून 'टाइमस ऑफ इंडिया' मध्ये "What young India wants?" या मथळ्याखाली भारतीय तरुणाचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात.

>> लै भारी. लोकांच्या पोटापाण्याच्या धंद्यावर काय डोळा तुमचा, काय कळंना ब्वा!

आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात.

>> हे हे. आयआयटीची पोरं आयमाय एक करणार्‍यांची आयमाय एक करतात हे तुम्हाला ठावूक नाय का खाडेसर! लोक उगंच नाय हो लाख लाख रुपये देत. जरा ट्राय करुन पा तुम्हीबी!

खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का?
तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.

>> तुम्ही स्वतः ह्या माणसाबद्दल तुच्छतापूर्ण लिहिताय ह्यास तुम्ही काय पात्रता मिळवली ह्याबद्दल प्रश्न आहे, उत्तर मिळेल काय?

एक मजेशीर गोष्ट सांगतो आणि माझे पाल्हाळ संपवतो, काही महिन्यांपूर्वी, या नगरकरांचा म्हणे महानगर पालिकेच्या कुजलेल्या पोलमुळे स्कूटर वरून अपघात झाला, किरकोळ जखमीही झाले तर हे महाशय पोहचले थेट महानगरपालिकेत, आणि म्हणाले 'आता मला एक महिना बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे १० लाखांचे नुकसान होईल आणि मला अगोदरच १ लाख दवाखान्यात खर्च झाला आहे हि सर्व रक्कम मला नुकसान भरपाई म्हणून द्यावी' पण महानगरपालिकेने फक्त माफी मागून प्रकरण संपवले. मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो आदमी कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे धैर्य को नही हर सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा एक पुस्तक बाजारात आणले.

>> खरं खरं सांगा, तुमचं काय बिनसलंय ह्या माणसाशी, एवढा पाठपुरावा करुन बैगरे माहिती काढता? आम्हाला हे सगळं तुम्ही लिहिलं म्हणुन कळलं. इतके चतुरस्र मिपाकर इथे आहेत. कुण्णी कुण्णी आम्हाला नाय सांगितलं नगरकर विडियो बनवतायत म्हणून.

आता या महान माणसाविषयी आणि याला 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणणाऱ्या एबीपी माझा विषयी मी काय लिहू तेच सुचेनासे झालेय

>> जितके झाले मुक्ताफळे उधळून तितकी खूप आहेत. ज्वलनशील पदार्थाने चांगलाच पेट घेतलाय. धूर नाकातोंडात जाइल, तुमच्या. काळजी घ्या खाडे सर!

एक राहिलंच. राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही ब्वा..

आणि हे नगरकर कोण, हे काय आपल्याला माहित नाही. तुमच्यामुळे कळलं, असं कोणतरी लिवतं, विकतं, कोणतरी विकत घेतं, कोणतरी जळतं. असो.

आपलाच.
तर्राट जोकर, नाम तो सुना होगा!

महासंग्राम's picture

25 Feb 2016 - 11:39 am | महासंग्राम

तोडलस भावा …. काय लिवलंय झकास या प्रित्यर्थ एक आगामी पुस्तकाचा संच भेट नाव काही महाराष्ट्रातील असाहित्यिक साहित्य जीवन भाग १,२,३,४,५,६,७… आणि असंख्य

एक भाग करता साहित्यिक

उगा काहितरीच's picture

25 Feb 2016 - 11:59 am | उगा काहितरीच

"पिसफुली पिसं काढणे" , ते हेच का ? ;-)

प्रणवजोशी's picture

16 May 2016 - 8:33 am | प्रणवजोशी

आनुमोदन

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 12:08 pm | निशांत_खाडे

ज्या विषयी तुम्हीकधी ऐकलेच नाही, त्याच्याविषयी माझा अभ्यासूपणा तपासू पाहताय आपण. पण तुमचे पटले मला. लिहितायत ना, विकून करोडो रुपये कमावतायत ना, मग आपल्याला काय करायचे? फालतू कादंबऱ्या खपवल्याने आणि वर्तमानपत्रातून फक्त आपल्या कादंबऱ्या खपतात यामुळेच हे लोक तरुणांचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे साहित्याचा आणि समाजाचा काहीच तोटा होत नाही हेही आपण छान बोललात. श्री. तर्राट जोकर, मते पटत नसतील त्याचे खंडन करणे किंवा त्यावर योग्य तो प्रतिसाद देणे गरजेचे असते. सदस्यानावाची निवड आणि परील संपूर्ण प्रतिसाद मात्र एकमेकांना अगदीच छान जुळतात.

तसेही, तुम्ही फक्त माझी टवाळीच करण्यासाठी इथे आला होतात, नाहीतर नगरकर विषयी कधी ऐकलेही नाही तुम्ही.
हे भारी आहे राव, म्हणजे मिपावरही वाचन करणारे लोक प्रतिसाद देताना आपल्याला फक्त या माणसावर कोटी करायची आहे एवढाच पूर्वग्रह घेऊन येतात. चालुद्या तुमचे...
आह्माला आणखीनही कामे आहेतच.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 3:07 pm | तर्राट जोकर

खाडे सर! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत का तुमच्याकडे? कशाला बाकीचा फाफटपसारा? मिपावर कोण लिहितोय ह्यावर टिका होत नाही. काय लिहिताय ह्यावर टिंगल होते. तुम्हीही तेच केलं, स्वत:सोबत झाले की कसे वाटते ह्याचे प्रात्यक्षिक दिले.

बाकी, आम्ही रिकामटेकडेच आहोत.

आनंद निलकांतन,अमिश राहिले का ?या यादीत

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 12:09 pm | निशांत_खाडे

संपूर्ण इंग्रजी साहित्यावरच टीका नाही करतय म्हटले मी.. :D

बोका-ए-आझम's picture

25 Feb 2016 - 8:06 am | बोका-ए-आझम

क्रमशः टाकायचं राहिलंय का?कारण फक्त नगरकरांबद्दल वाचायला मिळालं. दुर्जय दत्ता आणि चेतन भगत यांच्याबद्दल काही दिसलं नाही.

नाखु's picture

25 Feb 2016 - 10:44 am | नाखु

ही धमकी वाचली नाहीत (

आपली मते जाणून घ्यायला आवडतील, चेतन भगत आणि दुर्जोय दत्ता विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...)
यशोधरा's picture

25 Feb 2016 - 11:46 am | यशोधरा

दु दु नाखुकाका. वाक्य ठळक करुन आठवण करुन देताय!

महासंग्राम's picture

25 Feb 2016 - 11:54 am | महासंग्राम

चेतन का, सुदीप का, दुर्जोय का सबका बदला लेगा तेरा निखा

बोका-ए-आझम's picture

25 Feb 2016 - 12:38 pm | बोका-ए-आझम

गँग्ज आॅफ मिपा!

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 12:11 pm | निशांत_खाडे

एक दोन दिवसात लिहीन

नाना स्कॉच's picture

25 Feb 2016 - 3:28 pm | नाना स्कॉच

कश्याला लिहिता? नका मनाला लावुन घेऊ इतके! जमल्यास बेत बारगळवा तो एकदोन दिवसात लिहायचा :D

शुभेच्छा!

(हे वाचन "मात्र" गेल्याच्या दुःखात) नाना

खाडे अगदी खाडा न करता जिलब्या पाड्तायेत
मस्त येउंद्या

अप्पा जोगळेकर's picture

25 Feb 2016 - 6:37 pm | अप्पा जोगळेकर

जाने दो भाई. जवान हैं, जवानी का आलम है.
बाकी ते खांडेकर वगैरे वाचून जरा आश्चर्यच वाटले. कारण त्यांचीसुद्धा पुस्तके तसली असतात असे ऐकून आहे.

पक्षी's picture

25 Feb 2016 - 12:18 pm | पक्षी

खिक्क...

लेखक म्हणून करियर करायचं एकदा ठरवलं की ते वाचकशरण होणारच. जो बिकता हय वहीं बेचना पडेगा.

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 12:25 pm | निशांत_खाडे

सध्याचे लेखक तरी हेच करत आहेत.

अभ्या..'s picture

25 Feb 2016 - 12:43 pm | अभ्या..

तुमचा काही वेगळी वाट चोखाळायचा विचार आहे का सध्या निशांतराव?
बादवे तुमचे लेखन आणि ऍटीट्युड मला खूप आवडतंय.

बोका-ए-आझम यांना दिलेला प्रतिसाद वाचा, उत्तर मिळेल. धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

25 Feb 2016 - 12:48 pm | बोका-ए-आझम

नक्की कशावर खाडेसाहेब नाराज आहेत?

जेपी's picture

25 Feb 2016 - 12:53 pm | जेपी

+1
हाच प्रश्न आला..
नक्की आक्षेप कश्यावर आहे?
यांची भांरभार पुस्तके विकतात याला की हे लेखक तरुणांचे प्रतिनिधी म्हणवुन घेतात याला..?

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 1:31 pm | निशांत_खाडे

त्याचे असे आहे कि, एक मुलगा इंजिनियरिंग करताना लिहिलेली डायरी तोडून माडून त्याचे पुस्तक करतो, आणि ते छापून आणतो. बर नशिबाने ते चलले म्हणून, हा लेखक होतो. आणि मग तिथलेच नायक उचलून परत एक पुस्तक लिहितो, आणि नंतर यातच करिअर घडवतो.
काहीही लिहून काढायचे आणि आपली पुस्तके खपतात म्हणून स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या आणि साहित्याची धन्देबाजी करणाऱ्या कारकुनी लेखकांची इंग्रजीत गर्दी झाली आहे. असे होण्याचे कारण प्रकाशने आणि प्रचारसंस्था साहित्याची जान नसणाऱ्या धन्देवाल्यांच्या हाती आहेत हेच केवळ नाही तर खुद्द लेखकच मागणी असलेल्या गोष्टींचा पुरवठा करणारा धन्देबाज होऊ पाहतो आहे हेही आहे.
याने होते काय कि साहित्याची चांगली जान असलेल्या नवख्या लेखकाना ही सगळी संस्था संपवूनच टाकते. विचार करा नां, गेल्या एका वर्षात इंग्रजीतले २८ भारतीय बंडल पुस्तके 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहून खपले, म्हणजे आता पुढची काही वर्षे तरी यांची दुकाने रोमान्स ज्या जीवावरच चालणार. मग एखादा नवा लेखक इतर विषयावर कितीही चांगली कादंबरी घेऊन आला तरी हे कसे छापतील? हि धन्देबाजे साहित्याचा आणि नव्या लेखकांचा गळा घोटणारी नाही, हे कश्यावरून?
आणि फक्त पुस्तके लिहून किंवा व्याख्याने करून करिअर घडवायचे यापेक्षा अघोरी काय असेल. कमर्शिअल लेखक व्हायचे म्हटले कि पोटापाण्यासाठी पैसे कमावणे यांना जरुरीचे होणार आणि मग त्यासाठी हे लोक काहीही लिहिणार. यांना कसली साहित्य आणि समज विषयी बांधिलकी. नगरकरणे तर एका पुस्तकात फक्त चटपटीत पण राहावा म्हणून बलात्काराचा प्रसंग ही इतका भारी आणि शृंगारिक रित्या सांगितला आहे कि बघायचे काम नाही.

हे जिथे जातात तिथे स्वतःला 'लेखक' म्हणवून घेतात आणि स्टेजवर जाऊन 'आजच्या तरुणाला काय हवे आहे' या विषयावर भाषणे करतात. माझ्यामते लेखक समाजाचाच एक भाग असतो, त्याला "लेखक" असे स्वतंत्र अस्तित्व नसते. 'केवळ लेखक' म्हणून जगणे हा लेखकपनाचा व्यत्यास आहे. आणि तोच मला सर्वात जास्त खटकतो.
यांच्या लेखनाविषयी बोलायचे तर साहित्याचे मोठेपण लेखकाच्या व्यक्तिमत्वावर आणि व्यासंगावर सिध्द होते, आता हि शुद्ध बाजारू विचारसरणी असणारी लेखक मंडळी, मुबलक प्रमाणात लिखाण करतात, वर्षात दोन तीन कादंबर्या, दर महिन्यात कुठे न कुठे व्याख्याने, महिन्याला दहा-बारा वर्तमानपत्री लेख, नियमितपणे इतरांच्या पुस्तकांची फालतू समीक्षणे. हे सर्व करत असतात, नव्हे हे त्यांनी करिअरच बनवून घेतले आहे.
हीच जर यांची वृत्ती यांची असेल तर, रोज परसाकडे जाणे आणि लेखन करणे यात काय फरक राहिला? पैश्याकरता लेखन करणारे, आधी चेक घेऊन मग नंतर कादंबरी लिहायला सुरुवात करणारे हे लोक लेखक नसून दुकानदार आहेत म्हटले तर काय चुकीचे?
आता हे लोक तरुणांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात ते कशामुळे? तितका अधिकार त्यांना कोण देते? तर यांची पुस्तके खपतात म्हणून तरुण यांनाच आपला आदर्श मानत असतील हि भावना. याचेच एक उदाहरण महाजने एबीपी ने त्यांना दिलेले 'महाराष्ट्राचे शिलेदार' हे टायटल.

पण लेखकाने दुकानदार असण्यात नेमकं चुकीचं काय आहे? तुम्हाला वाटलं तर त्या दुकानात तुम्ही जाऊ नका. रोहींगटन मिस्त्री, किरण नगरकर, कल्पना स्वामीनाथन असे पर्यायही आहेत. त्यांच्याकडे जा. शिंपल.

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 2:19 pm | निशांत_खाडे

हाहाहाहा.. सोडाहो तुम्ही थेट असेच म्हणताय कि लेखकाने बाजारू असणे चुकीचे नाही. तुमच्यासोबत वाद घालण्यात अर्थ नाही. मते पटली नसतील तर वाचत राहा यांची पुस्तके. आणि मला जे लिहावेसे वाटते ते मी लिहतोच. 'तुम्हाला काय करायचे आहे' हा काही वादाचा मुद्दा करून भांडणार्या लोकांना मी उत्तर dene rast samjat नाही.

बोका-ए-आझम's picture

25 Feb 2016 - 4:16 pm | बोका-ए-आझम

याने होते काय कि साहित्याची चांगली जान असलेल्या नवख्या लेखकाना ही सगळी संस्था संपवूनच टाकते.

असं झालंय का तुमच्या पाहाण्यात खाडेसाहेब? एखाद्या चांगल्या लेखकाला डावलून कुणीतरी भलताच तोतया पुढे आलेला आहे?

आदूबाळ's picture

25 Feb 2016 - 4:26 pm | आदूबाळ

भारतीय इंग्रजी प्रकाशनव्यवसायात असं होत नाही हे माझ्या परिचितांमध्ये/मित्रमंडळींमध्ये असलेल्या एकमेव 'पब्लिश्ड ऑथर'चं मत आहे. त्यांना नवनवीन कादंबर्‍या हव्याच असतात.

आनन्दा's picture

25 Feb 2016 - 1:41 pm | आनन्दा

हे ठीक आहे. पण चेतन भगत मला अगदीच गल्लाभरू वाटला नाही.. म्हणजे मसाला असतो त्याच्या पुस्तकांमध्ये. नाही म्हणत नाही. पण काहीतरी विचार पण असतो. भले तो मला पटो ना पटो. विचार तर करतो!

गणेश उमाजी पाजवे's picture

25 Feb 2016 - 1:48 pm | गणेश उमाजी पाजवे

तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील. गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)

खाडे सर हा नववाचक वर्ग बदलत्या भरतच प्रतिनिधित्व करतो. काळासोबत चालायला शिका राव.

सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..

खाडे साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख चोपडे म्हणून करताय तेच चोपडे जगातली लाखो लोक्स वाचतायत. त्यांना तुम्ही सरळ सरळ मुर्खात काढताय. तुम्हाला नाही आवडत ठीक आहे नका वाचू. पण नव वाचक वर्गाला नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात.

खाडे साहेब मी स्वतः २२ वर्षांचा तरुण आहे आणि मी अभिमानाने सांगू शकतो कि हाफ गर्लफ्रेंड आणि फ्यु थिंग्स लेफ्ट अनसेड एवढेच मला बटाट्याची चाळ, ययाती, कोसला, राऊ, आमचा बाप अन आम्ही अशी पुस्तकेही आवडतात. तुम्ही स्वतः किती पुस्तके लिहिली आहेत ? तुमचे साहित्य क्षेत्रातले कर्तुत्व काय आहे ? त्यामुळे या लेखकांचे साहित्यिक मुल्य तुम्ही ठरवू नका जे वाचणारे आहेत ते बघून घेतील.

आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का? तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.

अक्सीडेंटल लेखक" हाहाहाहाहा .... काय राव तुमची जीभ तर घसरतच चाललीये. ज्या लेखकांच्या १३ लाख प्रती विकल्या जातात त्यांना अक्सीडेंटल लेखक" कसे म्हणू शकता तुम्ही. आम्ही काय डोक्यावर पडलो होतो काय यांची पुस्तके विकत घेताना. कि अक्सीडेंटलि आमच्यावर जादू होऊन आम्ही हि पुस्तके विकत घेतली.जो माणूस स्वत काहीही न करता यशस्वी झाला ? राव लेखक होन म्हणजे बाजारात जाउन दूध घेऊन येण्या एवढ सोप्प आहे का ? आणि लेखक हे सुद्धा आज करियर आहे.

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 2:09 pm | निशांत_खाडे

हे लोक मुर्खच आहेत. आणि फक्त त्यांचे साहित्य लाखो लोक वाचतात म्हणून काही ते भारी होत नाही. आणि माझी '' लेखक ची संकल्पना तुम्हाला कळलेली दिसत नाही. आणि तुम्ही डोक्यावर पडला होता का हे तुम्हालाच माहित. आणि काळासोबत चलने म्हणजे काय? ह्या मुर्खांची पुस्तके वाचणे का? बदलता भारत म्हणजे "We ate chocolates while having sex, I put a piece of chocolate on her tongue and started kissing her to taste the chocolate.."" (७२, That's the way we mate..)
हे लोक चुकीचा पायंडा घालून देत आहेत. येणाऱ्या नव्या लेखकांच्या पिढी करता.. आणि तुम्हाला नसेल वाचायचे तर नका वाचू असे म्हणून तर तुम्ही समीक्षण आणि टीका या दोन्हीचे तोंड दाबताय का? उलट मीच जर असे म्हणालो कि तुम्हाला आवडले तर तुम्ही वाचा आणि निघून जा तर?
आणि मला अधिकार आहे, माझे वयही २३ वर्षेच आहे. आणि माझे साहित्याक्षेत्रातले कर्तृत्व आणि नगरकरांच्या कादंबर्या याचं काय संबंध? मी जर एखादे पुस्तक लिहिले तरच मी नगरकरांच्या चोपड्यांचे समीक्षण करू शकतो असे म्हणायचे आहे का तुम्हाला? 'साहित्यिक मुल्ये' हे कशाशी खातात हेही तुमच्या नगरकरला माहित नाही.
तुम्ही मिपावर आहात, आणि वाचनही करतच असाल याचा अर्थ तुम्ही मराठीचे प्रथम वाचक आहात, बहुतेक हि 'हाफ गर्लफ्रेंड; आणि 'फ्यु थिंग्ज लेफ्ट अनसेड' हि थेरं तुम्ही दुय्यम स्वरुपात करत असाल. का तुम्ही वाचनाची सुरुवातच तिथून केली होती? मी ज्या कोवळ्या पिढीबद्दल बोलतोय तिच्यात तुम्ही येत नाही.

अनंत छंदी's picture

25 Feb 2016 - 5:14 pm | अनंत छंदी

तुम्ही समीक्षण आणि टीका या दोन्हीचे तोंड दाबताय का? उलट मीच जर असे म्हणालो कि तुम्हाला आवडले तर तुम्ही वाचा आणि निघून जा तर?

मला सबनीस का आठवतायत देव जाणे.......

भीडस्त's picture

25 Feb 2016 - 10:47 pm | भीडस्त

"We ate chocolates while having sex, I put a piece of chocolate on her tongue and started kissing her to taste the chocolate.."" (७२, That's the way we mate.

Mating बद्दलच सांगताहेत की ते.

बाकी
नगरकरांच्या पुस्तकाचे नाव That's the we 'met' असं आहे राव.That's the way we 'mate' असल्या नावाने कोणता 'काम'सू पुस्तक लिहिल बरे??

काय राव तुम्ही पण..

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 11:50 pm | निशांत_खाडे

हुकलाच जरा..

माहितच नव्ह्तं नगरकर बद्दल. आत्ता गूगल केलं.

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 2:13 pm | निशांत_खाडे

ह्या घ्या काही नगरकराच्या भाषणांच्या लिंक्स आणि ऐका सगळ्या दुनियेतून गोल केलेला निव्वळ stereotypical घोटाळा.
https://www.youtube.com/watch?v=u9lUqUBaQ-o
https://www.youtube.com/watch?v=6IHXTiKeNsM
https://www.youtube.com/watch?v=7toGe4L0gY0
https://www.youtube.com/watch?v=seX3AVThkOQ

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2016 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

खाडे साहेब, सुदीप नगरकरना तुम्ही क॑मीत कमी मिपावर तरी फेमस केले आहात (मलाही हे नाव माहीत नव्हतं) !

नगरकर मिपा वाचत असले तर त्यांनी तुमचे प्रत्यक्ष आभार मानल्यास आश्चर्य वाटणार नाही ! एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, यु नो !

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 2:31 pm | निशांत_खाडे

हो न.. मला ही वाटलेच... आता त्यांच्या पुस्तकांच्या एक-दोन प्रती जर माझ्यामुळे मिपाकरांनी विकत घेतल्या तर मला नरकातही जागा मिळायची नाही.. अवघड आहे..

जेपी's picture

25 Feb 2016 - 2:42 pm | जेपी
मिपाकर लै शाणे हायेत.. काय घ्याव काय नाय चांगल कळत त्यांना!
मुक्त विहारि's picture

25 Feb 2016 - 6:19 pm | मुक्त विहारि

.......काय घ्याव काय नाय चांगल कळत त्यांना!"

+ १

होबासराव's picture

25 Feb 2016 - 2:43 pm | होबासराव

Sir Arthur Conan Doyle, Earl stanley gardner
ईंग्रजि साहित्यात माझि मर्यादा एव्हढिच. त्यामुळे ह्या लेखापुरता आपला पास.

निखासाहेब.. तुमची तडफड समजली. एक सांगून पाहतो. पटेलच असं नव्हे, पण..

वाईटातली कुरुपस्थळे तपशीलवार शोधून अधोरेखित करण्यापेक्षा चांगल्यातली सौंदर्यस्थळे दाखवणं खूप परिणामकारक आहे जे तुम्हाला साध्य करायचंय त्या उद्देशासाठी.

याला कारणही आहे. बिलीव्ह मी, देअर इज टू मच टु हेट इन द वर्ल्ड.. आपण त्यात नेमकं काय आणि कसंकसं वाईट आहे हे जगासमोर कितीदाही आणलं तरी ते जर आधीच समाजमान्य असेल तर आपल्या प्रयत्नांनी शष्प फरक पडत नाही..

पण त्याऐवजी आपल्याला जे सुंदर आहे आणि टिकावं असं वाटतं ते लोकांसमोर अधिकाधिक आणणं आणि प्रसन्नपणे दाखवणं हेही कदाचित क्रांतिकारक बदल घडवत नसेल पण वरच्या कुरुपस्थळदर्शनाच्या ऑप्शनपेक्षा नक्कीच शतपट परिणामकारक ठरतं.

प्रसिद्ध प्रकाशक लाभण्याला सुंदर साहित्यिक मूल्यापेक्षा अनेक वेगळी गणितं लागत असतीलही, पण सुदैवाने आंतरजालावर लिखाणाचे खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही आधीच ते वापरताही आहात. ही चांगली सुरुवात आहे.

इथे लेखक राजा आहे. मोठ्या प्रकाशनाची लाखो पुस्तकं खपत असतील तर या आंतरजालीय माध्यमात किमान हजारोंनी वाचक मिळणं अजिबात कठीण नाही. लिहून घ्या, एक दिवस हा सर्वच लेखकांचा मेनस्ट्रीम प्लॅटफॉर्म बनेल. त्याला आकार देणं तुमच्या हातात आहे.

ज्याला तुम्ही लिहिलेलं बेहद्द आवडलं असा एक वाचक असला तरी त्या उच्च खपाच्या लाख प्रती त्याच्यावरुन ओवाळून टाकाव्यात.

गविंच उगाच आपले काहीतरी ;)

अद्द्या's picture

25 Feb 2016 - 4:50 pm | अद्द्या

देअर इज टू मच टु हेट इन द वर्ल्ड.. आपण त्यात नेमकं काय आणि कसंकसं वाईट आहे हे जगासमोर कितीदाही आणलं तरी ते जर आधीच समाजमान्य असेल तर आपल्या प्रयत्नांनी शष्प फरक पडत नाही..

पण त्याऐवजी आपल्याला जे सुंदर आहे आणि टिकावं असं वाटतं ते लोकांसमोर अधिकाधिक आणणं आणि प्रसन्नपणे दाखवणं हेही कदाचित क्रांतिकारक बदल घडवत नसेल पण वरच्या कुरुपस्थळदर्शनाच्या ऑप्शनपेक्षा नक्कीच शतपट परिणामकारक ठरतं.

हे ब्येष्ट .

बाकी या तिघांतल्या पैकी फक्त चेतन भगत माहित होता.

एकूण वाचन कमी आणि त्यातून इंग्रजी म्हणजे आणखी कमी.. त्यामुळे. .

असो

वाईटातली

कुरुपस्थळे तपशीलवार शोधून अधोरेखित करण्यापेक्षा चांगल्यातली सौंदर्यस्थळे दाखवणं खूप परिणामकारक आहे जे तुम्हाला साध्य करायचंय त्या उद्देशासाठी

That's the way we mate बघितलं आणि अगदी राहवले नाही हो.
कामसू छिद्रान्वेषी

मीनादि's picture

25 Feb 2016 - 2:57 pm | मीनादि

बिलीव्ह मी, देअर इज टू मच टु हेट इन द वर्ल्ड.. आपण त्यात नेमकं काय आणि कसंकसं वाईट आहे हे जगासमोर कितीदाही आणलं तरी ते जर आधीच समाजमान्य असेल तर आपल्या प्रयत्नांनी शष्प फरक पडत नाही..

पण त्याऐवजी आपल्याला जे सुंदर आहे आणि टिकावं असं वाटतं ते लोकांसमोर अधिकाधिक आणणं आणि प्रसन्नपणे दाखवणं हेही कदाचित क्रांतिकारक बदल घडवत नसेल पण वरच्या कुरुपस्थळदर्शनाच्या ऑप्शनपेक्षा नक्कीच शतपट परिणामकारक ठरतं.

सुमीत भातखंडे's picture

25 Feb 2016 - 3:32 pm | सुमीत भातखंडे

माहित होता. बाकीचे दोघे ह्या लेखामुळे कळले.
धन्यवाद!

अप्पा जोगळेकर's picture

25 Feb 2016 - 4:30 pm | अप्पा जोगळेकर

नगरकर, दत्ता ही नावे प्रथमच ऐकली.
जर पुस्तक फालतू आहे तर तुमचा बहुमोल वेळ कशाला फुकट घालवताय परीक्षण लिहिण्यात ? हर किसीको अपना पेट पालना है भाई.
भारताची लोकसंख्या खूप आहे त्यामुळे कोणताही धंदा कसाही केला तरी चालतोच.
तूर्तास हे घ्या आणि थंड व्हा.
Heineken

बबन ताम्बे's picture

25 Feb 2016 - 4:34 pm | बबन ताम्बे

आम्हाला किंगफिशर, हॅवार्ड, बडवाइजर याशिवाय भारतात इतर बियर कोणत्या मिळतात तेच माहीत नाही.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 4:49 pm | तर्राट जोकर

आहे ना, काल्सब'ग, टुबो... पैसा वसूल - तर्राट.

बबन ताम्बे's picture

25 Feb 2016 - 6:46 pm | बबन ताम्बे

.

अप्पा जोगळेकर's picture

25 Feb 2016 - 6:57 pm | अप्पा जोगळेकर

बाकी ते खांडेकर वगैरे वाचून जरा आश्चर्यच वाटले. कारण त्यांचीसुद्धा पुस्तके तसली असतात असे ऐकून आहे.

अप्पा जोगळेकर's picture

25 Feb 2016 - 6:58 pm | अप्पा जोगळेकर

एक लागार बिअर पण मिळायची पूर्वी. (म्हणजे दहा एक वर्षांपूर्वी पर्यंत) २० रुपयात पाईंट मिळायचा. आता ठाउक नाही.

अप्पा जोगळेकर's picture

25 Feb 2016 - 6:59 pm | अप्पा जोगळेकर

अरेच्चा बिअरचे प्रतिसाद देता देता मला हेंगोव्हर आला बहुतेक.

होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात तरी सर्वात जास्त खपणार्‍या बीअर बान्डमध्ये पहिला दुसरा असेल. एवढ्या चिल्लरात काढू नका.
हेवर्ड, कॅनान, खजुराहो, झिंगारो ह्या ब्रान्डला तसे म्हणले तर चालेल. ;)

होबासराव's picture

25 Feb 2016 - 7:01 pm | होबासराव

मि कुठ चिल्लर म्ह्टल राव ! सगळे आपल्याला माहित असलेल्या ब्रांड चे नाव सांगत होते तर म्या बि २ नाव सांगितले. मेरा कुछ चुक्या क्या

अभ्या..'s picture

26 Feb 2016 - 12:16 am | अभ्या..

आपका कभी चुकता क्या?

डोंट वरी. चीअर्स साह्यबा.

सनईचौघडा's picture

25 Feb 2016 - 5:01 pm | सनईचौघडा

पण आम्ही तर बुवा अजुनही चंपक, फँटम, चांदोबा, वगैरे वगैरे वाचतो. हे जो कोण तिघे तुम्ही म्हणताय त्यांना ओळ्खतही नाही.

चाचा चौधरी अमरिकामे
चाचा चौधरी और लकडबग्गासिंग
चाचा चौधरी और साबु जुपिटर पर

प्रमोद देर्देकर's picture

25 Feb 2016 - 7:04 pm | प्रमोद देर्देकर

छे छे त्या नंतर आम्ही मोठे झालो आणि चे.. , है..., अशी पुस्तके हाती लागली आमच्या.

होबासराव's picture

25 Feb 2016 - 5:08 pm | होबासराव

**चाचा चौधरी का दिमाख कंपुटर से भि तेज चलता है !

असे लिहिलेले रहायचे...खाक कळायच नाहि हि कंपुटर काय भानगड आहे ;)

तरीही कांहीतरी तेज चालणारं असणार हे तरी कळलं ना?
म्हणजे प्रत्येक साहित्याचा कांही ना कांही फायदाच होतो....!

नगरीनिरंजन's picture

25 Feb 2016 - 5:32 pm | नगरीनिरंजन

बर्‍याच जणांनी टवाळी केलेली पाहून मिपाकर असल्याचा इ. इ.
पण लेखातली तळमळ पोचली. भगतांचे फाईव्ह पॉईंट समवन वाचले (त्यांचे वाचलेले ते एकमेव पुस्तक) तेव्हाच पॉप्युलिस्ट आणि धंदेवाईक लेखन करणारा हा भिडू आहे हे कळून चुकले. सुदीप नगरकर आणि इतर कोणी नवैंग्लिश लेखकाच्या वाटेला गेलोच नाही.
ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच पाहून किळस येते पण आता काळच आर्थिक बाबतीत यशस्विता मोजण्याचा आहे आणि बॉलिवूड प्रमाणेच यांचाही मनोरंजनाचा धंदा आहे.
बाकी तरूणांना हेच साहित्य वाटले तर ती त्यांची मर्जी. त्यात वाईट काही वाटत नाही. आपल्याला जे चांगलं किंवा वाईट वाटेल तेच दुसऱयालाही तसेच वाटेल असे नाही. मला आवडत नाही तर मी चार हात दूर राहतो. पुढच्या पिढीची घाऊक चिंता आपण कशाला करा? त्यांचे आईबाप बघून घेतील.

आदूबाळ's picture

25 Feb 2016 - 5:44 pm | आदूबाळ

दादा, फाईव्ह पॉईंट समवन क्लासिक वाटावं इतकी पुढची रत्नं भारी आहेत...

बोका-ए-आझम's picture

25 Feb 2016 - 8:39 pm | बोका-ए-आझम

ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच पाहून किळस येते

किळस?

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2016 - 7:04 pm | नगरीनिरंजन

व्यापारी ॲप्रोच असायला हरकत नाही पण नंतर जो विचारवंती आव आणतात त्याची किळस येते. सुशि वगैरेंनीही पॉप्युलिस्ट लिखाण केले पण नंतर आव आणला नाही. काही गोष्टींचा व्यापार होऊ नये असे वाटते तो झाला की किळस येते. "मी व्यापारी" असं म्हणून स्वच्छ व्यापार केला तर हरकत नाही.

सतिश पाटील's picture

25 Feb 2016 - 5:58 pm | सतिश पाटील

कशासाठी एवढी उठाठेव चाललीये? निखा साहेब
उद्यापासून विकांत सुरु होतोय..त्याची तयारी करा.

जगात अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाहीत, परंतु त्यांच्या बाऊ करणे योग्य नाही. कारण जे आपल्याला पटत नाही ते दुसऱ्यालाहि पटत नसेल असं नसत न भाऊ.

तुमच्या लेखनामुळे लोकांचे प्रबोधन नाही तर मनोरंजन होतंय हे लक्षात घ्या.कशाला खिल्ली उडवून घेताय.

आणि आणखी एक गोष्ट मला जाणून घ्यावीशी वाटतेय, एवढं लिहित बसायला तुम्हाला वेळ तरी कुठून मिळतो हो?
दोन्ही हातात तलवार आणि पाठीला ढाल लावून मोहीम चालाविलीये म्हणून विचारतोय.

जाता जाता - तुमचा राकू होऊ नये एवढीच इच्छा.

गामा पैलवान's picture

25 Feb 2016 - 6:09 pm | गामा पैलवान

निशांत खाडे,

तुम्हाला काय म्हणायचंय ते थोडंसं समजलं. भारतीय बनावटीच्या ( = ब्रँडच्या ) इंग्रजी साहित्यात फारसा दम नाही. यानिमित्त संदीप वासलेकरांचा नुकताच लिहिलेला हा एक लेख आठवला : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=IPQFr

मात्र तुमचा त्रागा पटला नाही. जे मुळातून साहित्य नाही त्याला फारशी किंमत देऊ नये. शेवटी जे अस्सल असेल तेच काळाच्या कसोटीवर टिकेल, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

डीडी न्यूजने हे लिहिलं होतं चेतन भुगतबद्दल
a

Ranapratap's picture

25 Feb 2016 - 7:24 pm | Ranapratap

what about Robin sharma.

हा लेख वाचून चेसुगूंची कोणालाच आठवण आली नाही?

निदान त्यांच्या त्या लेखाची लिंक तरी मिळाली असती. ती लिंक मला आत्ता सापडत नाहीये. प्लीज मदत करा.

मोदक's picture

25 Feb 2016 - 8:09 pm | मोदक
तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 8:34 pm | तर्राट जोकर

चेसुगूंचा धागा संयत होता. जेवढं त्यांना पटलं, नाय पटलं ते मांडलं. अलम दुनियेची अक्कल काढत नव्हते. खाडेसरस्सुसाट आहेत.

सतिश गावडे's picture

25 Feb 2016 - 10:55 pm | सतिश गावडे

सुदीप नगरकर नावाची मराठी व्यक्ती इंग्रजीतून लिहिते हे आजच कळले तुमच्या या धाग्यामुळे.
मात्र लैच त्रागा करून घेत आहात तुम्ही. का बरे?

बरं खाडेसर - हे पुस्तक वाचलंय का?

"किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई
http://www.goodreads.com/book/show/23119374-killing-ashish-karve

खाडे सर तुमचे म्हणणे कळले. जे आजच्या पिढीला जे आवडत ते ते वाचतात. काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण उगाच कशाला त्रागा करता?