✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.

न
निशांत_खाडे यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 04:31  ·  लेख
लेख
आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील. गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.) सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले.. यांच्या लिखाणाविषयी बोलायचे झाले तर मी आवर्जून सुदीप नगरकरच्या 'That's the way we met!' मधले दोन परिच्छेद येथे नमूद करू इच्छितो..
  1. I want to marry you near the sea, maybe Marine Drive. I always imagine how, after the ceremony is over you will sit in the car and I will drive us towards our new home. The girls in our family don’t wear Punjabi chuda in marriage, but I want you to wear it. You will be dressed in my favorite red saree with a silver border on it. I will look at the chuda in your hand and smile. You will coyly glance at me and I will smile seeing you blush. All the way while driving, I would think of how beautiful you looked on our wedding night.
  2. I don’t want to lose you forever. Don’t you remember our romantic nights in Manali, where we cuddled with each other, and made sweet love until day break? I think we broke the flower vase too that night. We were on the table and all over. How can you forget the chuda you bought just because it was my wish? Our name carved over it, I thought Aditya and Riya couldn’t be separated. They are one. Why do you want to change that?
तर वरील फक्त दोन परिच्छेदातच जरी तोडक्या मोडक्या इंग्रजीकडे दुर्लक्ष केले तरी नगरकर महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो. फक्त एक कॉलेजकुमार आणि एक कुमारिका उचलायचे, आणि त्यांच्यातले काही इनटीमेट सीन, लैंगिक संबंध, नात्यातले बालिश आणि मूर्ख चढउतार दाखवायचे आणि अकरावी, बारावी आणि ग्रजुअशन ची पोर टार्गेट करून हि कागदाची बंडलं 'कादंबरी' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात. एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक पुस्तक विकले गेले म्हणून "बास, आता आयुष्यात दुसरे काही करायचेच नाही तर फक्त पुस्तके लिहित राहायचे" असला करिअरीस्टिक प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेली हे लोक सध्या दर वर्षी दोन कादंबऱ्या लिहितात (नव्हे खपवतात) . आणि जोड धंदा म्हणून 'टाइमस ऑफ इंडिया' मध्ये "What young India wants?" या मथळ्याखाली भारतीय तरुणाचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात. आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का? तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये. एक मजेशीर गोष्ट सांगतो आणि माझे पाल्हाळ संपवतो, काही महिन्यांपूर्वी, या नगरकरांचा म्हणे महानगर पालिकेच्या कुजलेल्या पोलमुळे स्कूटर वरून अपघात झाला, किरकोळ जखमीही झाले तर हे महाशय पोहचले थेट महानगरपालिकेत, आणि म्हणाले 'आता मला एक महिना बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे १० लाखांचे नुकसान होईल आणि मला अगोदरच १ लाख दवाखान्यात खर्च झाला आहे हि सर्व रक्कम मला नुकसान भरपाई म्हणून द्यावी' पण महानगरपालिकेने फक्त माफी मागून प्रकरण संपवले. मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो आदमी कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे धैर्य को नही हर सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा एक पुस्तक बाजारात आणले. आता या महान माणसाविषयी आणि याला 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणणाऱ्या एबीपी माझा विषयी मी काय लिहू तेच सुचेनासे झालेय (आपली मते जाणून घ्यायला आवडतील, चेतन भगत आणि दुर्जोय दत्ता विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
22557 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

चांगली असते का हो ही?

बबन ताम्बे
गुरुवार, 02/25/2016 - 16:34 नवीन
आम्हाला किंगफिशर, हॅवार्ड, बडवाइजर याशिवाय भारतात इतर बियर कोणत्या मिळतात तेच माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आहे ना, काल्सब'ग, टुबो...

तर्राट जोकर
गुरुवार, 02/25/2016 - 16:49 नवीन
आहे ना, काल्सब'ग, टुबो... पैसा वसूल - तर्राट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

धन्यवाद हां तर्राटभाऊ.

बबन ताम्बे
गुरुवार, 02/25/2016 - 18:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 18:53 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बाकी ते खांडेकर वगैरे वाचून

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/25/2016 - 18:57 नवीन
बाकी ते खांडेकर वगैरे वाचून जरा आश्चर्यच वाटले. कारण त्यांचीसुद्धा पुस्तके तसली असतात असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

एक लागार बिअर पण मिळायची

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/25/2016 - 18:58 नवीन
एक लागार बिअर पण मिळायची पूर्वी. (म्हणजे दहा एक वर्षांपूर्वी पर्यंत) २० रुपयात पाईंट मिळायचा. आता ठाउक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरेच्चा बिअरचे प्रतिसाद देता

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/25/2016 - 18:59 नवीन
अरेच्चा बिअरचे प्रतिसाद देता देता मला हेंगोव्हर आला बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात

अभ्या..
गुरुवार, 02/25/2016 - 18:58 नवीन
होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात तरी सर्वात जास्त खपणार्‍या बीअर बान्डमध्ये पहिला दुसरा असेल. एवढ्या चिल्लरात काढू नका. हेवर्ड, कॅनान, खजुराहो, झिंगारो ह्या ब्रान्डला तसे म्हणले तर चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

अभ्या भौ

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 19:01 नवीन
मि कुठ चिल्लर म्ह्टल राव ! सगळे आपल्याला माहित असलेल्या ब्रांड चे नाव सांगत होते तर म्या बि २ नाव सांगितले. मेरा कुछ चुक्या क्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपका कभी चुकता क्या?

अभ्या..
Fri, 02/26/2016 - 00:16 नवीन
आपका कभी चुकता क्या? डोंट वरी. चीअर्स साह्यबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

पण आम्ही तर बुवा अजुनही चंपक,

सनईचौघडा
गुरुवार, 02/25/2016 - 17:01 नवीन
पण आम्ही तर बुवा अजुनही चंपक, फँटम, चांदोबा, वगैरे वगैरे वाचतो. हे जो कोण तिघे तुम्ही म्हणताय त्यांना ओळ्खतही नाही.
  • Log in or register to post comments

पम्या चाचा चौधरी वाचत नाहिस होय

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 17:07 नवीन
चाचा चौधरी अमरिकामे चाचा चौधरी और लकडबग्गासिंग चाचा चौधरी और साबु जुपिटर पर
  • Log in or register to post comments

छे छे त्या नंतर आम्ही मोठे

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 02/25/2016 - 19:04 नवीन
छे छे त्या नंतर आम्ही मोठे झालो आणि चे.. , है..., अशी पुस्तके हाती लागली आमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

**चाचा चौधरी का दिमाख कंपुटर

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 17:08 नवीन
**चाचा चौधरी का दिमाख कंपुटर से भि तेज चलता है ! असे लिहिलेले रहायचे...खाक कळायच नाहि हि कंपुटर काय भानगड आहे ;)
  • Log in or register to post comments

तरीही कांहीतरी तेज चालणारं

खेडूत
गुरुवार, 02/25/2016 - 17:22 नवीन
तरीही कांहीतरी तेज चालणारं असणार हे तरी कळलं ना? म्हणजे प्रत्येक साहित्याचा कांही ना कांही फायदाच होतो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

बर्‍याच जणांनी टवाळी केलेली

नगरीनिरंजन
गुरुवार, 02/25/2016 - 17:32 नवीन
बर्‍याच जणांनी टवाळी केलेली पाहून मिपाकर असल्याचा इ. इ. पण लेखातली तळमळ पोचली. भगतांचे फाईव्ह पॉईंट समवन वाचले (त्यांचे वाचलेले ते एकमेव पुस्तक) तेव्हाच पॉप्युलिस्ट आणि धंदेवाईक लेखन करणारा हा भिडू आहे हे कळून चुकले. सुदीप नगरकर आणि इतर कोणी नवैंग्लिश लेखकाच्या वाटेला गेलोच नाही. ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच पाहून किळस येते पण आता काळच आर्थिक बाबतीत यशस्विता मोजण्याचा आहे आणि बॉलिवूड प्रमाणेच यांचाही मनोरंजनाचा धंदा आहे. बाकी तरूणांना हेच साहित्य वाटले तर ती त्यांची मर्जी. त्यात वाईट काही वाटत नाही. आपल्याला जे चांगलं किंवा वाईट वाटेल तेच दुसऱयालाही तसेच वाटेल असे नाही. मला आवडत नाही तर मी चार हात दूर राहतो. पुढच्या पिढीची घाऊक चिंता आपण कशाला करा? त्यांचे आईबाप बघून घेतील.
  • Log in or register to post comments

दादा, फाईव्ह पॉईंट समवन

आदूबाळ
गुरुवार, 02/25/2016 - 17:44 नवीन
दादा, फाईव्ह पॉईंट समवन क्लासिक वाटावं इतकी पुढची रत्नं भारी आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच

बोका-ए-आझम
गुरुवार, 02/25/2016 - 20:39 नवीन
ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच पाहून किळस येते
किळस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

व्यापारी ॲप्रोच असायला हरकत

नगरीनिरंजन
Fri, 02/26/2016 - 19:04 नवीन
व्यापारी ॲप्रोच असायला हरकत नाही पण नंतर जो विचारवंती आव आणतात त्याची किळस येते. सुशि वगैरेंनीही पॉप्युलिस्ट लिखाण केले पण नंतर आव आणला नाही. काही गोष्टींचा व्यापार होऊ नये असे वाटते तो झाला की किळस येते. "मी व्यापारी" असं म्हणून स्वच्छ व्यापार केला तर हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कशासाठी एवढी उठाठेव चाललीये?

सतिश पाटील
गुरुवार, 02/25/2016 - 17:58 नवीन
कशासाठी एवढी उठाठेव चाललीये? निखा साहेब उद्यापासून विकांत सुरु होतोय..त्याची तयारी करा. जगात अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाहीत, परंतु त्यांच्या बाऊ करणे योग्य नाही. कारण जे आपल्याला पटत नाही ते दुसऱ्यालाहि पटत नसेल असं नसत न भाऊ. तुमच्या लेखनामुळे लोकांचे प्रबोधन नाही तर मनोरंजन होतंय हे लक्षात घ्या.कशाला खिल्ली उडवून घेताय. आणि आणखी एक गोष्ट मला जाणून घ्यावीशी वाटतेय, एवढं लिहित बसायला तुम्हाला वेळ तरी कुठून मिळतो हो? दोन्ही हातात तलवार आणि पाठीला ढाल लावून मोहीम चालाविलीये म्हणून विचारतोय. जाता जाता - तुमचा राकू होऊ नये एवढीच इच्छा.
  • Log in or register to post comments

निशांत खाडे, तुमचा मुद्दा समजला

गामा पैलवान
गुरुवार, 02/25/2016 - 18:09 नवीन
निशांत खाडे, तुम्हाला काय म्हणायचंय ते थोडंसं समजलं. भारतीय बनावटीच्या ( = ब्रँडच्या ) इंग्रजी साहित्यात फारसा दम नाही. यानिमित्त संदीप वासलेकरांचा नुकताच लिहिलेला हा एक लेख आठवला : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=IPQFr मात्र तुमचा त्रागा पटला नाही. जे मुळातून साहित्य नाही त्याला फारशी किंमत देऊ नये. शेवटी जे अस्सल असेल तेच काळाच्या कसोटीवर टिकेल, नाहीका? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हे चित्र बहुधा आधी पण डकवलं होतं.

अनुप ढेरे
गुरुवार, 02/25/2016 - 18:26 नवीन
डीडी न्यूजने हे लिहिलं होतं चेतन भुगतबद्दल Image removed.
  • Log in or register to post comments

what about

Ranapratap
गुरुवार, 02/25/2016 - 19:24 नवीन
what about Robin sharma.
  • Log in or register to post comments

हा लेख वाचून चेसुगूंची

मोदक
गुरुवार, 02/25/2016 - 20:06 नवीन
हा लेख वाचून चेसुगूंची कोणालाच आठवण आली नाही? निदान त्यांच्या त्या लेखाची लिंक तरी मिळाली असती. ती लिंक मला आत्ता सापडत नाहीये. प्लीज मदत करा.
  • Log in or register to post comments

मिळाली मिळाली. :))

मोदक
गुरुवार, 02/25/2016 - 20:09 नवीन
मिळाली मिळाली. :)) अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चेसुगूंचा धागा संयत होता.

तर्राट जोकर
गुरुवार, 02/25/2016 - 20:34 नवीन
चेसुगूंचा धागा संयत होता. जेवढं त्यांना पटलं, नाय पटलं ते मांडलं. अलम दुनियेची अक्कल काढत नव्हते. खाडेसरस्सुसाट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सुदीप नगरकर नावाची मराठी

सतिश गावडे
गुरुवार, 02/25/2016 - 22:55 नवीन
सुदीप नगरकर नावाची मराठी व्यक्ती इंग्रजीतून लिहिते हे आजच कळले तुमच्या या धाग्यामुळे. मात्र लैच त्रागा करून घेत आहात तुम्ही. का बरे?
  • Log in or register to post comments

बरं खाडेसर - हे पुस्तक वाचलंय

आदूबाळ
गुरुवार, 02/25/2016 - 23:04 नवीन
बरं खाडेसर - हे पुस्तक वाचलंय का? "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई http://www.goodreads.com/book/show/23119374-killing-ashish-karve
  • Log in or register to post comments

खाडे सर तुमचे म्हणणे कळले.

Rahul D
Fri, 02/26/2016 - 00:06 नवीन
खाडे सर तुमचे म्हणणे कळले. जे आजच्या पिढीला जे आवडत ते ते वाचतात. काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण उगाच कशाला त्रागा करता?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा