मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते
घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते
कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते
हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते
तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते
उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते
तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
प्रतिक्रिया
22 Feb 2016 - 7:12 pm | जव्हेरगंज
मस्तच!!
आवडली!!!
22 Feb 2016 - 7:45 pm | गौरी लेले
वाह !
इथे वैशाखाची चाहुल लागत असतानाही ही श्रावणसर चिंब भिजवुन गेली :)
22 Feb 2016 - 8:49 pm | प्रचेतस
गौरीशी सहमत.
22 Feb 2016 - 10:18 pm | अजया
असं चिंब भिजलीस तर सर्दी होईल गं गौरी.जपून.
23 Feb 2016 - 9:13 pm | सस्नेह
प्रचेतस आणि अजयाशी सहमत !
22 Feb 2016 - 8:20 pm | रातराणी
धन्यवाद :)
22 Feb 2016 - 8:56 pm | चांदणे संदीप
स्वारी! :(
22 Feb 2016 - 9:58 pm | रातराणी
हैला का चेष्टा करता गरीबाची :) साधी सरळ हाये ना कविता :(
23 Feb 2016 - 12:17 am | एक एकटा एकटाच
नेहमी प्रमाणेच
उत्तम
23 Feb 2016 - 8:53 pm | एकप्रवासी
सुंदर....!
23 Feb 2016 - 8:59 pm | विजय पुरोहित
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते वाह... प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या एका स्त्रीचे मनोगत अगदी प्रभावीपणे मांडलेय...
तो : अगदी भाव खाणारा....
ती : त्याच्या प्रेमात आकर्षणात अगदी आकंठ बुडालेली...
वाह्..... सुंदर.....
23 Feb 2016 - 9:17 pm | सस्नेह
हळवी कविता !
23 Feb 2016 - 9:21 pm | एस
छान कविता.
24 Feb 2016 - 12:15 am | रातराणी
सर्वांचे धन्यवाद :)
24 Feb 2016 - 3:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता वाचताना आवडल्यासारखी वाटते
पण परत वाचताना काहीतरी चुकल्या सारखे वाटते
पैजारबुवा
25 Feb 2016 - 12:09 am | रातराणी
येस सर! संदीपने समजावून सांगितल आहे काय घोळ झाला तो. एक डाव माफी द्या.
( चुकीला माफी नाही अस म्हणू नका प्लीज.)
24 Feb 2016 - 4:34 pm | आनंद कांबीकर
आवडली.
25 Feb 2016 - 12:09 am | रातराणी
सर्वांचे आभार. :)
25 Feb 2016 - 9:34 pm | सुमीत भातखंडे
आवडली कविता.
उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते
तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
मस्त :)
7 Mar 2016 - 2:40 pm | गणेशा
खुप सुंदर कविता ! मनापासुन आवडली.
मिठित गुंफुन घ्या आणि शब्द जोगवा हे शब्दप्रयोग आवडले ..