लदाख सायकल ने : मनोगत आणि तांत्रिक बाजू (समाप्त)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
20 Feb 2016 - 12:56 pm

जम्मू ला पोहोचे पर्यंत अंधार पडला होता. आता मला सायकलीला बस वरती टाकायचं होत. मला सरकारी बस ने जायची इच्छा होती पण असे झाले नाही. बाहेर प्राइवेट बस वाले उभे होते. मी आपले सहज विचारले कि, सायकल चे भाडे किती लागेल. म्हणाले कि,तीस रुपये. पण हे त्यांनी टाकलेल जाळं होत. मी ह्यात फसत गेलो. माझ्या आयुष्यातील हि सर्वात खराब बस प्रवास होता. ह्या बस प्रवासाचा सारखा उल्लेख करून सायकल प्रवासाचा आनंद कमी करायचा नाहीय.

दिल्ली ला पोहोचलो. लोखान्द्च्या पुलावरून सायकल घेऊन चाललो होतो तर तिथे बैरियर लावले होते. यमुना नदी ने खतरनाक रौद्र रूप ध्राण केलं होतं. पण सायकल ला कोण अडवू शकतं?

मनोगत आणि तांत्रिक बाजू

मी १९ दिवस सायकल चालवली. ह्या १९ दिवसात ९५२ किलोमीटर अंतर पार केले. खर सांगायचं तर जेव्हा मी सायकल खरेदी करत होतो तेव्हा माझ्या डोक्यात एवडेच होते कि लद्दाख ला जायचं. मी शारीरिक दृष्ट्या खूप कमजोर आणि आळशी माणूस आहे. पण मानसिक दृष्ट्या एकदम तन्दुरुस्थ.

मी सायकल खरेदी केल्यावर पहिल्यांदा नीलकण्ठ महादेव ला गेलो. ऋषिकेश पासून नीलकण्ठ पर्यंत जास्त चढाई नाहीय. तरी पण खूप कष्ट पडले. तेव्हाच पहिल्यांदा असं वाटलं कि लद्दाख काय सोपे जाणार नाहीये. इथे एक हजार मीटर वर सायकल चढत नाहीये मग तिथे पांच हजार मीटर वर कशी सायकल चढणार. तिथून आल्यावर मी चिंतेत पडलो. म्हटलं पंधरा हजाराची सायकल पाण्यात जाणार.

एक काहीतरी योजना बनवणं आवश्यक होतं. दुसऱ्यांची प्रवास वर्णने वाचली. अंतर आणि वेळ ह्यांचा मेळ लावला. पण अशी घरात बसून बनवलेली योजना काय कामाची जिथे प्रत्यक्श्य अनुभव नाही. नीलकण्ठ महादेव ची पहिला सायकल प्रवास वाया गेला. त्याचा काहीच फायदा झाला नाही. ६००-७०० मीटर उंचावर सायकल चालवणं आणि ४०००-५००० मीटर वरती सायकल चालवण्याची बराबरी कशी होऊ शकते? कधीच होऊ शकत नाही.

त्यानंतर राजस्थान ला गेलो सायकल घेऊन २५० किलोमीटर सायकल चालवली. घरी परतलो तर तीच गोष्ट पुढे आली. जयपुर पासून पुष्कर पर्यंत आणि तिथून घरी कुठेच डोंगर नाही. चकाचक सरळ रस्ता. पण इथे एक अनुभव मिळाला कि लांबच्या सायकल प्रवासात कमर आणि मागच्या पुष्ठ भागाचे काही खरं नाही.

हिवाळा सुरु झाला. डोंगरावरचे उंच रस्ते बंद झाले. तरी पण लद्दाख ला जायची इच्छा काय मेली नाही. मग त्या दिवसात सांपला ला गेलो. दिल्ली पासून ५० किलोमीटर लांब. परत सायकल वरतीच आलो. दोन चक्कर मेरठ ला मारले. प्रत्येक वेळी सायकल वरून निघण्याच्या आधी खूप उत्साह राहायचा पण तीस किलोमीटर पुढे गेल्यावर असे वाटायचे कि, सायकल फेकून देऊ. सायकल वरून निघायच्या आधी लद्दाख दिसायचं पण तीस ते चाळीस किलोइतर पुढे गेल्यावर वाटायचं खड्यात गेलं ते लद्दाख.

आतापर्यंत चालवलेल्या सायकल प्रवासात एवढं लक्ष्यात आलं कि, आपण फक्त लदाख ला जाण्याच्या इच्छे वरतीच लदाख ला जाऊ शकतो. जास्त अंतर कापल्याने हि इच्छा मरायची. हि इच्छा जिवंत ठेवणं खूप गरजेच होतं. म्हणून असं ठरवलं कि एवढी पण सायकल चालवायची नाही कि इच्छा मरेल. ह्या नियमाच मी काटेकोर पणे पालन केलं.

याचा नुकसान असं झालं कि, माझा जास्त अभ्यास झाला नाही. मनात म्हटलं,"नीरज, तू काळजी करू नकोस. तू याच्या पेक्षा अवघड प्रवास केला आहे. हा तर काहीच नाही. एक दिवस असा येईल कि, संपूर्ण जग बघेल तुला... लदाख च्या रस्त्यावर !!

मार्च महिना सुरु झाला. सराव करणं खूप गरजेच होतं. जगामधल्या उंच रस्त्यावरती सायकल चालवायची होती. त्यामुळे उंच रस्त्यावरती सायकल चालवणे गरजेचं होतं. हिमाचल मध्ये करसोग ची योजना बनवली. कामातून सुट्टी पण घेतली. पण येन वेळी माझ्या मनात काय आले कुणास ठाऊक, ती योजना रद्द केली. आता सराव अजिबात नाही. आता थकायचे नाही. शरीराने आणि मनाने पण. याच वेळेस विपिन गौड साहेबांनी पण यायची इच्छा दाखवली होती. मी नाही म्हणून सांगितले . सायकलला पण हाथ लावणार नाही. आता थेट लदाख.

ज्या दिवशी मी जाहीर केलं कि, सायकल वरून लद्दाख ला जात आहे. तेव्हा चारी बाजूनी,लोकांनी माझ्यावर स्तुती सुमने उधळली. पण ज्याच्या कडून मला अपेक्षा होती स्तुती ची, त्यानेच माझा धिक्कार केला. त्याने मला नाराज केलं. संदीप पवार साहेब मोटारसायकल वरती जाउन आले होते. त्यांनी मला मार्गदर्शन देणं, हे त्यांचं कर्त्यव्य होतं. तिथल्या रस्त्याविषयी तसेच तिथल्या कठीण प्रसंग वरती सांगणं आवश्यक होतं. पण त्यांनी उलट मला मागे खेचलं.
ते म्हंटले,"इस उम्र में आकर साइकिल चलायेगा तू? साइकिल तो बच्चे चलाते हैं."
माझ्या माहितीतील दोनच लोक असे होते कि, ते मोटारसायकल वरून लदाख ला जाऊन आले होते. संदीप साहेब त्यातील एक होते. पण त्यामुळे मला अजून उत्साह आला.ते म्हणतात ना कि एकदा का पाण्यात उडी घेतली कि आपोआप पोहायला येते. त्याप्रमाणे आपण पण पाण्यात उडी घ्यायचीच असे ठरवले.

या लद्दाख प्रवासा मध्ये किती तरी वेळा असा विचार मनात आला कि, खड्यात गेलं ते लदाख!! दररोज मी त्या लदाख ला खड्यात घालायचो. रोहतांग पार केलं, केलांग पार केलं, बारालाचा पार केल, सगळे मग मागे पडत गेले पण प्रत्येक दिवस असा नाही गेला कि लदाख ला खड्यात नाही घातलं.
समोरून दिल्ली ची बस किंवा ट्रक येताना दिसला कि, खूप इच्छा व्हायची कि सायकल टाकू ह्याच्या मध्ये. कधी कधी वाटायचे कि, इथेच सायकल दरी मध्ये फेकून देऊ. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी....

पण आता असं वाटतंय कि, खूप काही मिळवलं ह्या प्रवासात. आज प्रथमच माझ्या शरीराने माझ्या मनाला जिंकलंय. आज मी खरोखरचा विजेता झालोय. एरवी माझे मनच भटकून यायचे. स्वप्नांच्या जगामध्ये लदाख ला जाउन यायचे. शरीर मात्र लदाखला घाबरायचे...घरातच बसून राहायचे. पण आता मना बरोबरच शरीर पण लडाखला जाउन आले आहे. ते पण सायकलवर!! पांच हजार मीटर उंच रस्त्याला पार करून, जिथे चांगल्या मनुष्याला ऑक्सीजन सिलेण्डर ची गरज पडेल अश्या ठिकाणी, जिथे हवा आणि मनुष्य यांचे युद्ध चालते, जिथे उन्हात कातडी जळतात आणि सावलीत कडाक्याची थंडी वाजते, जिथे भयानक ओढे आहेत कि ज्यांच्या आवाजांनी धैर्याचा बांध फुटतो. तिथे सोसाट्याच्या वारा असा सुटतो कि घामाच्या थेंबाला पण तो आपल्या सोबत घेऊन जातो. अश्या ठिकाणी सायकल चालवली. आज मला खूप गर्व होतोय.

आता सायकल विषयी माहिती करून घेऊया :

माझ्याकडे सायकल चे कोणते मॉडल आहे, ते इथे महत्वाचे नाहीय. त्या मध्ये कोणत्या सोयी सुविधा आहेत. ते महत्वाचे आहे. सर्वात महत्वाची म्हणजे ती एल्यूमिनियम ची बनलेली आहे. एल्यूमिनियम हे हलक असतं स्टील पेक्षा पण महाग असतं. जर एखादी सायकल दहा हजार च्या वरती असेल तर ती नक्कीच एल्यूमिनियम असणार. आता कार्बन फाइबर च्या पण सायकली येत आहेत. त्या खूप महाग आहेत. कमीत कमी ६०००० च्या वर. एल्यूमिनियम पेक्षा हलका आणि महाग.

माझ्या सायकल ची रिम पण एल्यूमिनियम ची आहे. तसं पाहिला गेलं तर गिअर च्या सायकली पाच हजारापासून सुरु होतात. पण त्या स्टील च्या असतात. म्हणजे वजनाने जड. सायकल तुम्हाला जर शहरात चालवायची असेल तर स्टील काय वाईट नाही. गियर ते गियर आणि स्वस्तपण. पण लद्दाख साठी सायकल जेवढी हलकी तेवढं चांगलं.

दूसरी म्हह्त्वाची गोष्ट म्हणजे गिअर. ७x३ म्हणजे २१ गिअर. पुढे तीन गिअर असतात आणि मागे सात गिअर. काही सायकलींना १८ गिअर असतात. त्याचे समीकरण म्हणजे 6x3. सपाट स्रास्त्यानी सायकल चालवायची असेल तर गिअर ची काही गरज नाही. डोंगर भागात गिअर जरुरीचे आहेत. आपण पहिल्यांदा गिअर ची सायकल घेतो तेव्हा ती लवकर खराब होते. कारण गरज नसताना विनाकारण गिअर बरोबर चाळे केले जातात. उदाहरणार्थ सायकल उभी असताना गिअर बदलणे. असं केल्याने गिअर तर नाही बदलू शकत पण शिफ्टिंग मशीन वर दाब पडतो आणि ते खराब होऊ शकतात. त्यामुळे सायकल चालवतानाच गिअर बदलावे. मी आजूबाजूच्या लोकांना आधीच सांगून ठेवलं होतं कि, चावी घेऊन सायकल किती हि चालवा पण सायकल उभी असताना गिअर बदलू नका. हेच कारण आहे कि या प्रवासात मला गिअर च्या बाबतीत कोणतीच अडचण आली नाही.

माझ्या सायकल मध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत. ब्रेक दोन प्रकारचे असतात. एक डिस्क ब्रेक आणि दुसरा पावर ब्रेक. साध्या सायकली मध्ये पावर ब्रेक असतात. डोंगर भागा मध्ये सायकल चालवायची असेल तर डिस्क ब्रेक जास्त उपयोगी आहेत. मझ्या मते पावर ब्रेक पण उपयोगी आहेत. एक तर पावर ब्रेक दुरुस्थ करन खूप सोपं असतं. दुसरं म्हणजे डिस्क ब्रेक हे सायकलची किमत वाढवतात. डिस्क ब्रेकची कमी अशी आहे कि थोडी सुद्धा खराबी आली तर दुरुस्थ करण सोपं नसत. ब्रेक घासून घासून गुळगुळीत झाले तर बदलणं सोपं नाही. मला पण डिस्क ब्रेकन लद्दाख जायच्या आधी खूप हैराण केलं होतं. काही महिन्या पर्यंत पुढच्याच ब्रेक वर सायकल चालवली. मागचा ब्रेक नीट करायला किती तरी मैकानिक नापास झाले. पण शेवटी माझं मैकेनिकल इंजीनियर होणं कामास आलं. लद्दाख ला जायच्या आधी दोन्ही ब्रेक ठीक झाले.

माझ्या सायकल मध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे हिची अलग होणारी चाकं. एक्सल च्या एका बाजूला एक लीवर आहे. त्याला थोडं जरी फिरवलं तरी चाक आरामशीर वेगळे करू शकतो. हि सुविधा ह्या सायकलच्या दोन्ही चाकांना आहे. चाक पंक्चर झाल्यावर हि सोय खूप कामास येते. शॉकर फक्त पुढच्याच चाकाला आहे. पुढचा चाक मागच्या चाकाला दिशा दाखवतो म्हणून पुढच्या चाकाला शोकओब्जर गरजेचं आहे. मागच्या चाकाला नसले तरी चालते. दर रोज च्या कामाला शॉकर ची आवश्यकता नसते. साध्या सायकलीला शॉकर नसतात. शॉकर चा फायदा फक्त ऊबड खाबड रस्त्यावरती होतो. शॉकर चे नुकसान पण आहे. ते सायकलचा वेग कमी करत. आपण जास्त ताकत लावल्यावर वेग कमीच मिळतो. पण ते आपल्याला जाणवत नाही.

मी सायकल मध्ये काही बदल केले. सगळ्यात पहिल म्हणजे कैरियर लावलं. याआधी सायकल वरती कैरियर नव्हते. ज्या दुकानातून सायकल घेतली त्यालाच कैरियर लावायला सांगितले. सगळ्यात मोठी अडचण हि आली कि, एक्सल हे खूप लांब नव्हते. खूप छोटं होतं. एका बाजूला शिफ्टिंग मशीन लावलेली होती तर दुसऱ्या बाजूला डिस्क ब्रेक. ह्यामुळे एक्सल थोडे सुद्धा बाहेर निघालेले नव्हते. तो एक्सल कडून मग मोठा एक्सल लावला. तरी पण तो छोटाच पडत होता. मग कसंतरी जोर-जबरदस्ती करून कैरियर लावलं पण ते डिस्क ब्रेक ला अडथला आणू लागलं. मग डिस्क ब्रेक पण त्रास देऊ लागला.

लद्दाखला जाण्यासाठी कैरियर काढू शकत नव्हतो,नाही डिस्क ब्रेक. मग स्वताच एक देसी जुगाड वापरलं. माझी मैक्निकाल ची पदवी कामास आली. एक भन्नाट आयडिया शोधून काढली. दोन्ही गोष्टी लक्ष्यात ठेवल्या कैरियर पण आणि डिस्क ब्रेक पण. मग ती आयडिया वापरून कैरियर पण लावलं आणि डिस्क पण मस्त काम करू लागला. असं केल्याने कैरियर थोड पांच ते सहा इंच वरती झालं. त्यामुळे सामान ठेवायचं सायकलच गुरुत्व केन्द्र पण वरती झालं. त्याचं नुकसान हे झालं कि, सामान ठेवल्यावर सायकल असंतुलित वाटू लागली. पण त्या शिवाय दूसरा पर्याय नव्हता.

सायकल बरोबर दोस्ती करणं पण आवश्यक होतं. म्हणून सायकल खोलायला लावायला शिकलो. पंक्चर काढायला पण शिकलो. अभ्यासा साठी मुद्दामून सायकल पंक्चर करायचो. मागच्या चाकाच रिमूवेबल एक्सल कडून दूसरा मोठा लांब एक्सल लावलं होता. परत त्यात पूर्ण गिअर सिस्टम लावलं होतं. त्यामुळे त्याला खोलून लावायचं हे मोठं अवघड काम होतं. तरीपण मागचे चाक काढून पंक्चर काढून पंधरा मिनिटात लावायला शिकलो. पुढच्या चाकाची तर १० मिनिटात पंक्चर काढायचो. पंक्चर काढायचे पूर्ण सामान माझ्याजवळ होते पण अशी वेळ कधी आली नाही. सगळ्यात जास्त वजन हे मागच्या चाकावर असते. त्यामुळे मागच्या चाकाचे टायर आणि ट्यूब दोन्ही बदलले. पुढच्या चाकाचे जुनेच राहून दिले. जुनी ट्यूब जवळच ठेवली होती पण त्याची आवश्यकता पडली नाही.

ह्या सायकल प्रवासा मध्ये दिल्ली ते दिल्ली ११००० रुपये खर्च आला. जेवणा साठी जास्त पैसे गेले. प्रवास तर फुकटच केला. मी कोल्ड ड्रिंक बरोबर आमलेट घ्यायचो. लद्दाख मध्ये जेवण महाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तंबू घेऊन गेलो होतो. पण त्याचा उपयोग तेव्हाच केला जेव्हा मला खोली भेटली नाही. स्लीपिंग बैग मध्ये घुसून झोपणे आणि चादर अंगावर ओढून घेऊन झोपणे जमीन आसमानाचा फरक आहे. स्लीपिंग बैग मध्ये चांगली झोप लागत नाही. परत दिल्ली ते मनाली आणि श्रीनगर ते दिल्ली या दरम्यान बस ने प्रवास करण्यासाठी तीन ते साढे तीन हजार चा खर्च आला.

आणि शेवटच उपाशी पोटी माझं वजन ७३ किलो होतं. आता सायकल प्रवास करून परत आल्यावर ६७ किलो झालं. म्हणजे १९ दिवसात, सायकल चालवून सहा किलो वजन कमी झाले. जाताना पोट बाहेर आले होते. आता लेवल मध्ये आहे.
अश्या रीतीने माझ्या बरोबर तुमचा हि प्रवास संपला. आता परत भेटू पुढच्या प्रवासात "हिवाळ्यातला लदाख" मध्ये. ज्या मध्ये माझा पहिला विमान प्रवास आणि बर्फाच्या गुहेतील भयानक रात्र याचे वर्णन असेल....


कैरियर लावायची आयडिया


पुधच्या चाकाचा रिमूवेबल एक्सल


लिवर फिरवा थोडीसी ताकत लावा..


चाक बाहेर


गियर शिफ्टिंग मशीन

(समाप्त)

दिवसदिनांकविषय अंतर

दिवस पहिला४ जून २०१३
दिल्ली वरून सुरुवात (भाग १)बस ने

दिवस दुसरा५ जून २०१३
मनाली ते गुलाबा (भाग २)२१ किलोमीटर

दिवस तिसरा६ जून २०१३
गुलाबा ते मढी (भाग ३)१३ किलोमीटर

दिवस चौथा७ जून २०१३
मढी ते गोंदला (भाग ४)६४ किलोमीटर

दिवस पाचवा आणि सहावा८ व ९ जून २०१३
गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)४२ व ३४ किलोमीटर

दिवस सातवा १० जून २०१३
जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)४७ किलोमीटर

दिवस आठवा आणि नववा ११ व १२ जून २०१३
सरचू ते व्हिस्की ओढा (भाग ७)३७ व ११ किलोमीटर

दिवस दहावा १३ जून २०१३
व्हिस्की ओढा ते पांग (भाग ८) २८ किलोमीटर

दिवस अकरावा १४ जून २०१३
पांग ते शो-कार मोड (भाग ९)८८ किलोमीटर

दिवस बारावा१५ जून २०१३
शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०) १९ किलोमीटर

दिवस तेरावा१६ जून २०१३
तंगलंग-ला ते उप्शी (भाग ११)६५ किलोमीटर

दिवस चौदावा १७ जून २०१३
उप्शी ते लेह (भाग १२)४९ किलोमीटर

दिवस पंधरावा १८ जून २०१३
लेह ते ससपोल (भाग १३)६२ किलोमीटर

दिवस सोळावा१९ जून २०१३
ससपोल ते फोतूला (भाग १४)७० किलोमीटर

दिवस सतरावा २० जून २०१३
फोतूला ते मुलबेक (भाग १५)५९ किलोमीटर

दिवस अठरावा २१ जून २०१३
मुलबेक ते शम्शा (भाग १६)७१ किलोमीटर

दिवस एकोणिसावा २२ जून २०१३
शम्शा ते मटायन (भाग १७)४६ किलोमीटर

दिवस विसावा २३ जून २०१३
मटायन ते श्रीनगर (भाग १८)१२६ किलोमीटर

दिवस एकविसावा२४ जून २०१३
श्रीनगर ते दिल्ली (भाग १९)सूमो व बस ने

मागच्या भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

मस्त. नीलकंठचे फोटो आहेत का? असले तर टाकाल प्लीज.

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2016 - 1:01 pm | पिलीयन रायडर

निव्वळ म हा न!!! बास... अजुन काही बोलुच शकत नाही...

नीरजभाऊ / राजकुमार - फार भारी वाटलं लेखमाला वाचताना. पुढची लेखमाला लवकर येऊदे.

तुम्ही, मार्गी, मोदक, इ० लोक आमची प्रेरणास्थानं आहात.

इरसाल कार्टं's picture

14 Dec 2016 - 10:36 am | इरसाल कार्टं

मोदकाने मागे फोन केलेला, नंबर सेव्ह केला अन व्हाट्सअप वर प्रोफाइल पिक्चर बघितले तर राजे सायकल वर स्वार, आता मीही एक सायकल घ्यावी म्हणतो पण आधी हौस पुरवणारे रस्ते शोधावे लागणार आहेत.
माझ्या गावासमोरूनच महामार्ग आहे पण मला मोठ्या गाड्यांची भीती वाटते. सतत अपघात चालू असतात.

अफाट माणूस आहेत नीरजजी आणि तुमचा अनुवादही छान! Documentary पाहात असल्यासारखी संपूर्ण लेखमाला उलगडत गेली. पुढची लेखमाला लवकरच चालू करा!

एस's picture

20 Feb 2016 - 1:42 pm | एस

जबरदस्त!

बाबा योगिराज's picture

20 Feb 2016 - 1:58 pm | बाबा योगिराज

सम्पूर्ण लेखमाला पुढील लेख कधी येतोय याची वाट बघायचो.
सलाम.
या माणसाच्या धैर्याला सलाम.
सलाम पुढे चालवत राहण्याला.
सलाम जिद्दी पणाला.
सलाम ह्या माणसाच्या वेडेपणाला.

राजकुमार भौ, जश्या नीरज जाट यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या. आमचा सलाम सुद्धा त्यांच्या पर्यंत पोहोचवा.

सगळ्यात शेवटी, राजकुमार भौ आपण ही लेखमाला लिहिली या बद्दल धन्यवाद. असेच लिहित रहा आणि आमच्या समोर खजीना पेश करा हि विनंती.

धन्यवाद.

मिपावर अनुवाद केलेल्या लिंक जेव्हा नीरजजी ना शेअर करायचो. तेव्हा ते आवर्जून आपले प्रतिसाद वाचायचे. पण मराठी जास्त येत नसल्याने प्रतिसादाबद्दल मला विचारायचे. तेव्हा मी त्यांना सविस्तर पणे सांगायचो.

अभ्या..'s picture

20 Feb 2016 - 2:21 pm | अभ्या..

नीरजजी आपल्या धैर्याला, साधेपणाला आणि चिवटपणाला केव्हांच सॅल्युट केला आहे.

फारसे अवडंबर न माजवता, स्वतःची स्वतः तयारी करुन, परिस्थितीतून शिकत शिकत जाऊन केलेला हा प्रवास अगदी भिडला मनाला.

आगे बढते रहना मेरे भाई. मंजिल तो आनेवाली है, असली मझा तो सफर देती है.

प्रचेतस's picture

20 Feb 2016 - 6:24 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत.
नीरज आणि राजकुमार दोघांचेही आभार ह्या सुंदर प्रवासाबद्दल.

जगप्रवासी's picture

20 Feb 2016 - 2:33 pm | जगप्रवासी

राजकुमार भाऊ तुमच्यामुळे इतक्या चांगल्या सफरीच वर्णन आम्हाला वाचायला मिळालं.

सिरुसेरि's picture

20 Feb 2016 - 3:01 pm | सिरुसेरि

राजकुमार , नीरज या दोघांचेही अभिनंदन , धन्यवाद आणी शुभेच्छा .

स्पा's picture

20 Feb 2016 - 6:58 pm | स्पा

दणदणीत लेखमाला झाली

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2016 - 8:21 pm | टवाळ कार्टा

कडक

मधुरा देशपांडे's picture

20 Feb 2016 - 8:24 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम झाली ही लेखमाला. अफाट अनुभव आणि लेखन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2016 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रचंड साहसी सफर ! वाचताना आणि फोटो बघताना खूप मजा आली !

मस्तच. आपणसुद्धा कधीतरी करू शकतो असं वाटतं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Mar 2016 - 4:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकामागुन एक सगळे भाग वाचुन काढले. कसला जबरदस्त प्रवास !!
नीरजजींना कडक सलाम अणि राजकुमार यांचे आभार ही लेखमाला लिहिल्याबद्दल!!

मोदक's picture

29 Mar 2016 - 4:26 pm | मोदक

झक्कास लेखमाला...!!!!

पाटीलभाऊ's picture

13 Dec 2016 - 5:24 pm | पाटीलभाऊ

अतिशय झक्कास अशी लेखमाला...!
सगळे लेख एकत्र वाचून काढले.
सलाम आपल्या मित्राच्या जिद्दीला...!