तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी.
असो.
१. मुखपृष्ठ
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 1:09 pm | विजय पुरोहित
अरे वा... मस्तच डांगे अण्णा...
एकदम क्लास फोटो...
4 Feb 2016 - 1:10 pm | sagarpdy
मस्त !
4 Feb 2016 - 1:13 pm | नंदन
अलीकडच्या काथ्याकूटकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर हा धागा एकदम आवडून गेला. टार्गेट ऑड्यन्स हा परदेशी पर्यटकवर्ग असल्याने काही फोटोंत हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस जाणवणे स्वाभाविक आहे, मात्र तरीही छायाचित्रकाराचा वेगळेपणा जाणवतो.
4 Feb 2016 - 4:26 pm | संदीप डांगे
हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस > अचूक ओळखलेत. धन्यवाद!
4 Feb 2016 - 1:19 pm | कैलासवासी सोन्याबापु
हे बी कलाकारी हाय नाही मंग अंगी!!! लैच ख़ास माहोल टिपला लेक!!
ऑन अ सीरियस नोट,
जेव्हा कधी जमेल आयुष्यात तेव्हा एक "फ़ूड वॉक" काढू अकोल्याचा! अन त्याचा एक जॉइंट धागा बनवु!! इथेच मिपावरच!! सगळे काही इंक्लूडेड राधास्वामी च्या ब्रेड वड्या पासुन राठीवाला, श्रीराम वडापाववाला, कलकत्ता ढाबा, बशीर भाई, मुहम्मद अली रोडचे हलाल मार्केट, जुन्या शहरातला राजस्थान दहिबडा सेंटर अन नुक्कड़ कचोरी सब्बन तुम्ही कॅमेरा मधे पकड़सान, अन खाऊ बी सोबतीनं!!
क्या बोलते??
4 Feb 2016 - 1:29 pm | संदीप डांगे
कलाकारीचं काय सांग्याचं बापुसायेब, आमची बायको मंते जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन! ;-)
आकोल्यातल्या फूड वॉकसाठी कवाबी तयार. तुम्ही टाईम काळा फक्त!
4 Feb 2016 - 1:53 pm | होबासराव
संदिप भौ हरहुन्नरी आहेत. हरफनमौला हाईत
4 Feb 2016 - 1:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाई नाई थुमी बी चालसान अन इकळे जितले इच्चक लेकरं हैत साऱ्याईले हेच खुल्ले निमंत्रण हाय न लेक!!
4 Feb 2016 - 2:01 pm | होबासराव
दिवसभराचि सारि खादाडि म्हंजे हानने भाइरच करु..बास राजा आपल्या सार्या कुचिनायचा टाइम मेळ खायले पायजे.
तुम्हा दोघाइच म्हैत नाइ पन म्या लय कुचिन होतो लानपनि.
5 Feb 2016 - 9:13 am | महासंग्राम
पुण्यात भरपूर वेळा फोटो काढत फिरलो आहे, पण अकोला कधीही एक्स्प्लोर केलं नाही. बहुतेक अकोल्यात आल्यावर मी किती भारी हा सगळा गर्व गळून पडत असावा. पण अकोल्यात फोटू काढायला कधीबी तयार. नेहरू पार्क जवळ प्रकाश TVS समोर एक चहा वाला बसतो, त्याच्या कडच्या पाट्या पाहण्यासारख्या असतात.
4 Feb 2016 - 1:46 pm | स्पा
क्या बात , सर्व प्र.चि. आवडली
4 Feb 2016 - 1:52 pm | याॅर्कर
.
4 Feb 2016 - 2:17 pm | पगला गजोधर
फोटो आवडले
4 Feb 2016 - 2:25 pm | सूड
भारी!!
4 Feb 2016 - 2:29 pm | प्रीत-मोहर
सुंदर!!!
4 Feb 2016 - 2:34 pm | पद्मावति
वाह, मस्तं!
4 Feb 2016 - 2:45 pm | कंजूस
चांगलेत फोटो.
फेसबुकावरच्या सर्व फोटोंना एकच मथळा -mumbai ------पडलाय/दिलाय.
(कुंभमेळा नाशिकचा संपून उज्जैनचा आला तरी नाशिकची क्षणचित्रे आलीच नाहीत.)
4 Feb 2016 - 4:30 pm | संदीप डांगे
धन्यवाद काका!
नाशिकमधे पोलिसांनी घातलेल्या गोंधळाचा राग अजून गेला नाही काका, फोटो आहेत पण अजून सॉर्टींग केले नाही.
4 Feb 2016 - 2:47 pm | प्रचेतस
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
4 Feb 2016 - 2:47 pm | प्रचेतस
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
4 Feb 2016 - 3:02 pm | अनुप७१८१
झका्स फोटो आहेत ...
थिम मधे रेल्वे स्थानक बस स्थानक- चहाचि टपरी - जोगिन्ग-मोर्निग वोक करणारि लोक ... कचरा साफ करनारे आप्ले बि एम सि चे लोक पण दखवा
4 Feb 2016 - 4:31 pm | संदीप डांगे
धन्यवाद! फोटोग्राफीची पहिलीच फेरी होती. नंतर सगळं थांबलं क्लायंट कडून. तुम्ही म्हणताय ते फोटोज आवश्यक आहेतच.
4 Feb 2016 - 3:20 pm | उगा काहितरीच
छान फोटो!
4 Feb 2016 - 3:26 pm | पैसा
सगळेच फोटो आवडले!!
4 Feb 2016 - 3:29 pm | शान्तिप्रिय
छानच!
4 Feb 2016 - 3:34 pm | विवेक ठाकूर
सुरेख फोटो!
4 Feb 2016 - 3:42 pm | अजया
सगळेच फोटो आवडले पण बोराबझारचा रस्ता थेट काॅलेजच्या दिवसात घेऊन गेला..
4 Feb 2016 - 3:42 pm | मयुरMK
छान फोटो आहेत आता घेतोच मी पण एक कॅमेरा :P
4 Feb 2016 - 3:47 pm | नाखु
नाही हे मार्क नाहीत मला दिसलेले फोटो.
ही पण कला आहे तर !!!
बाकी प्रवासाच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे.
आरक्षण (त्याच त्या) दळणाने वैतागलेला वाचक नाखु
4 Feb 2016 - 4:35 pm | संदीप डांगे
स्टीरीओटाईप होण्याच्या धोक्याची जाणीव झाली म्हणून इतर रंगही दाखवावे म्हणतो ;-)
पुढचा भाग येईलच लवकर आणि पुढचा प्रवासही बदलणार मिपावरचा... आगे आगे देखो होता है क्या! ;-)
- (स्टीरीओटाईप होण्यास अतिशय घाबरणारा) संदीप
4 Feb 2016 - 8:28 pm | अभ्या..
अच्छी बात है संदीपभौ.
लगे रहो.
(आपण आपल्याला वाटतं तस बदलायचं, पण लोकांच्या अपेक्षेनं कधीच नाही. काय???? ;) )
4 Feb 2016 - 8:29 pm | अभ्या..
बादवे जवळपास सगळे फोटो आवडले बर्का. ;)
ही कला माझ्यापासून लै म्हणजे लैच लांब है.
4 Feb 2016 - 3:56 pm | पॉइंट ब्लँक
झकास पकडली आहे मुंबई.
डिवायडर तर मास्टर पिस आहे. किप इट अप :)
4 Feb 2016 - 4:36 pm | संदीप डांगे
धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक विशेष असतं.
4 Feb 2016 - 5:38 pm | पॉइंट ब्लँक
जाणकार वगैरे नाही हो. शिकतोय अजूनही. :)
4 Feb 2016 - 4:05 pm | चित्रगुप्त
व्वा. मस्तच.
4 Feb 2016 - 4:26 pm | एक एकटा एकटाच
सगळे फ़ोटो आवडले
4 Feb 2016 - 4:38 pm | मुक्त विहारि
मस्त,,,
(स्वगत : आमच्या हातात आमच्या घरातले लोक कॅमेरा देत नाहीत....)
4 Feb 2016 - 4:39 pm | मितभाषी
अप्रतिम! !!!
4 Feb 2016 - 4:40 pm | आदूबाळ
एक नंबर!
हे कसं नाही आठवलं अजून कोणाला?
4 Feb 2016 - 5:17 pm | चांदणे संदीप
http://www.misalpav.com/comment/799600#comment-799600
6 Feb 2016 - 8:11 pm | चौथा कोनाडा
सुंदर प्रतिसाद !
हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला.
कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल !
ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
6 Feb 2016 - 8:11 pm | चौथा कोनाडा
सुंदर प्रतिसाद !
हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला.
कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल !
ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
4 Feb 2016 - 4:45 pm | बोका-ए-आझम
पुरीभाजी पंचमपुरी का? आणि तो आजच्या मजुरीच्या चिंतेत असलेल्या माणसाचा चेहरा परफेक्ट पकडलेला आहे. आणि डिव्हायडर नावाच्या फोटोला b/w केल्यामुळे एकदम तो अंगावर येतो. त्या फोटोतला रिकामा भकासपणा कलरमध्ये आला नसता. रच्याकने कधी सिनेमॅटोग्राफी करायचा प्रयत्न नाही केला का?
4 Feb 2016 - 5:29 pm | संदीप डांगे
धन्यवाद बोकाशेठ!
ती पंचमपुरी नाही. अब्दुल रहमान स्ट्रीटवर रस्त्याच्या बाजुलाच एक कुटूंब पुरीभाजी बनवत होतं.
सिनेमॅटोग्राफीची आठवण नका काढु राव! लै दुकतं. नको तिथे स्वाभिमान नडला अन् संधी असून सही वक्त पे सही जगह नव्हतो आम्ही, नै तो दुनिया कुछ अलग होती हमारी!
असो. दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफी आपलं डाय-हार्ड ड्रीम. ते करायचं आहेच. उससे पैले मरने का नै :-)
4 Feb 2016 - 4:46 pm | संदीप डांगे
प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे मनःपुर्वक आभार! धन्यवाद! :-)
4 Feb 2016 - 4:53 pm | अन्नू
मस्त कॅच केलेय मुंबई कॅमेरॅत.
त्यात "मछली का पानी!" फुटुत- कडेला ठेवलेल्या टोपलीतून डोकावणार्या माशांच्या शेपटांकडे बघून, ती तशीच टोपली उचलून घरी आणावी आणि ताजी-ताजी मछली मसाला लावून- गरम-गरम तेलात फ्राय करुन खावी, असं वाटतंय!! ;)
-माशाला हावरट अन्नू!! ;)
4 Feb 2016 - 5:18 pm | चांदणे संदीप
आवडले!
Sandy
4 Feb 2016 - 5:20 pm | नगरीनिरंजन
मस्त!
4 Feb 2016 - 5:39 pm | विलासराव
बोरा बाजार संपतो तिकडे जवळच माझे ऑफिस होते,आणि नंतर ठाकुरद्वारला. तेव्हा रोजची संध्याकाळ मरीन ड्राइव्हला असायची.
पण असे फोटो काही आम्हाला काढायला आले नाहीत.देणार्याने कोणतीच कला मला दिली नाही समजत नाही.