खर म्हणजे मी खूप थकलो होतो. १०० किलोमीटर पेक्षा आज जास्त सायकल चालवली होती. त्याचे मी लगेच ऐकला आणि दुकानाच्या पायर्यावर बसलो. बाकीचे लोक म्हणायला लागले कि इथे नको बसू आत जाउन खुर्ची वर बस. मी नाही म्हंटला इथेच ठीक आहे. मग सगळे जवळ आले. खूप गप्पा मारल्या. दिल्ली वरून आलोय, मनाली वरून सुरु केलं होतं आणि आज इथे संपवतोय. ते खूप लक्ष्य देऊन ऐकत होते. त्यांनी त्यांच्या घरी यायचे निमंत्रण दिला. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मला आशा नव्हती कि काश्मीर मध्ये एवडे प्रेम मिळेल ते. पण हे गाव होतं त्यामुळे असेल कदाचित. शहराची गोष्ट वेगळी आहे.
अर्धा तास थांबल्यानंतर तेथून निघालो. मग हजरतबल च्या समोरूनच लालचौकात आलो. मला इथेच थांबायचे होते कारण लालचौक पासूनच जम्मूला जाणाऱ्या गाड्या मिळतात. उदया निघताना जास्त चालावे लागू नये म्हणून.
आज सर्वात जास्त १२६ किमी सायकल चालवली.
दिवस एकविसावा
काल जेव्हा सायकल वरून जोरात लालचौक कडे चाललो होतो तेव्हा इकडे तिकडे हॉटेलवरती नजर फिरवत होतो. एक शेख लॉज दिसलं. तिथे थांबून भाव कमी जास्त करत होतो. तितक्यात हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या कामगाराने मला बघितलं. त्याने मला थांबायला सांगितलं. मी न थांबता तिथून पुढे गेलो. अर्धा किलोमीटर पुढेच गेलो असेल तितक्यात तो कामगार मोटारसायकल वरून आला आणि मला हॉटेल वरती चल म्हणाला. मग मी त्याच्या बरोबर गेलो.
मी त्याला आधीच सांगितलं कि मला एकदम स्वस्त रूम पाहिजे. तरी त्याने मला आठशे रुपयाची रूम दाखवली. रेट ऐकूनच नाही म्हणून सांगितले. मग त्याने सातशे रुपयाची रूम दाखवली. त्याला अटैच बाथरूम नव्हते. मी पाचशे रुपया पर्यंत तयार होतो. पण रूम सहाशे ला मिळाली.
जेव्हा मी जेवण करण्यासाठी खाली रेस्टॉरेण्ट मध्ये बसलो होतो. जेवण यायला वेळ झालेला पाहून त्याला सांगितलं कि वरतीच रूम मध्ये गेऊन ये. तोच कामगार माझ्याकडे अनोळखी माणसा सारखा पाहू लागला. म्हणाला ,"कौन से कमरे में?"
मी म्हटलं, " अरे तूच तर आता मोटारसायकल वरती पाठलाग केला. तूच तर रूम दाखवली आणि परत म्हणतोय कसा कोणती रूम."
मी असे बोलल्यावर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागला.
म्हणाला कि,"आप वही हो ना, जो साइकिल से लद्दाख से आये हैं. आप तो नहाने के बाद बिल्कुल ही बदल गये. पहचान में ही नहीं आ रहे."
सकाळी कश्मीर ची रेलवे यात्रा करण्याची इच्छा होती. श्रीनगर वरून बारामूला आणि परत श्रीनगर, परत काजीगुण्ड आणि परत श्रीनगर. पण ह्या प्रवासाला दुपार झाली असती. एकदा विचार आला कि सगळा समान घेऊन काजीगुण्ड ला जाऊ. मग तिथून कोणत्या तरी बस मध्ये किंवा अमरनाथ वाल्या कोणत्या तरी ट्रक मध्ये सायकल टाकू. नंतर परत विचार मनात आला कि, असं झाल नाही तर खूप हालत बेकार होतील. परत श्रीनगर ला यावे लागेल.
सकाळी सात ला उठलो. पण अजून हि उत्साह वाटत नव्हता. कालच्या प्रवासाने खूप थकलो होतो. अजूनही थकवा गेला नव्हता. काश्मीर रेल्वे यात्रा रद्द करायला वेळ नाही लागला. परत झोपलो आणि नऊ ला उठलो. अकरा वाजता बसच्या अड्ड्या वरती होतो. माहिती पडले कि जम्मू ला जाणारी शेवटची बस गेली होती. आता उद्या सकाळ पर्यंत कोणतीच बस नाही. मन नाराज झाले पण बाहेर जम्मू ला जाण्यासाठी सुमो तयार होती. मी जेव्हा सूमो स्टैण्ड ला पोहोचलो तेव्हा कळले कि त्यांना एकच प्रवासी पाहिजे होता सुमोत बसण्यासाठी. माझी सायकल बघून दचकत होते मला घेण्यासाठी. मी म्हंटले सायकलचे पण पैसे घ्या तेव्हा तयार झाले. श्रीनगर पासून जम्मू चे भाडे सातशे रुपये आहे आणि सायकल चे भाडे एक हजार रुपये म्हणजे सतराशे रुपये. मी पंधराशे रुपये दिले तर थोडे कानकुज करून मग तयार झाले. नंतर सायकल सुमो वरती बाकीच्या प्रवासांच्या सामना बरोबर बांधली.
मी शेवटचा प्रवासी होतो म्हणून मला मागची सीट मिळाली. आणि ह्या सीट वरती बसने खूप अवघड असते. आम्ही गेल्यानंतर त्याच रस्त्यावर असलेल्या सैनिकांच्या चौकीवर अतिरेक्यांनी हमला केला. त्यात पाच सैनिक हुतात्मा झाले. हि बातमी दिल्ली ला गेल्यावर समजली.
काजीगुण्ड पासून श्रीनगर साठ किलोमीटर लांब आहे. इथून पुढे गेल्यावर रस्त्याच्या खाली रेलवे लाइन जाताना दिसली. नक्कीच ती काजीगुण्ड-ऊधमपुर जाणारी असणार. नंतर एका चेक-पोस्ट वर गाडी थांबली. नंतर जवाहर सुरंग साठी चढाई सुरु झाली. खूप वरती चढल्यानंतर सुरंग आलं. जसा आम्ही सुरंग पार केली तसा आम्ही काश्मीर ला खूप मागे टाकला होतं. आता सगळा रस्ता डोंगरामधून होता. जैसे ही सुरंग से बाहर निकले, तो हम कश्मीर को पीछे छोड चुके थे। अब जम्मू तक यात्रा पर्वतों के बीच से होनी थी।
बनिहाल मध्ये जेवणासाठी गाडी थांबली. एकदम घाणेरडे मुस्लिम होटल वरती गाडी थांबली. बाकीचे प्रवासी काय माहित कसे जेवत होते. मला तर आत मध्ये घुसण्याची पण इच्छा झाली नाही. मी थेथे जेवलोच नाही. हा. समोर हिन्दू होटल, वैष्णों होटल व पंजाबी होटल पण होते. त्यांची हालत पण एवढी चांगली नव्हती.
माझे डोळे सारखे रेलवे लाइन ला शोधात होते. बनिहाल च्या खाली एक स्टेशन दिसलं. स्टेशन च्या नावाच चकाचक पिवळा बोर्ड दिसत होता पण त्यावरील नाव वाचता येत नव्हते. असं वाटत होतं कि रेल्वे लाइन चे सर्व काम पूर्ण झालेले आहे. अर्धवट काम कुठे दिसलं नाही. मी खुश झालो कि, काश्मीर आता सर्व राज्यांना जोडले जाणार. इथे काम पूर्ण झाले याचा अर्थ म्हणजे बनिहाल चा बोगद्याचे काम पण पूर्ण झाले आहे. त्यावेळेस माहित नव्हते कि चार दिवसा नंतर मनमोहन सिंह या बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत म्हणून. पहिली ट्रेन काजीगुण्ड पर्यंतच यायची आता बनिहाल पर्यंत. यानंतर पुढे व नक्कीच बाकीच्या स्टेशनला जोडली जाइल.
चेनाब नदी पर्यंत उतार आहे. नदी पार केल्यानंतर चढाई सुरु होते. हि चढाई मग पटनीटॉप पर्यंत राहते. पटनीटॉप नंतर जम्मू पर्यंत उतारच उतार आहे.
जम्मू ला पोहोचे पर्यंत अंधार पडला होता. आता मला सायकलीला बस वरती टाकायचं होत. मला सरकारी बस ने जायची इच्छा होती पण असे झाले नाही. बाहेर प्राइवेट बस वाले उभे होते. मी आपले सहज विचारले कि, सायकल चे भाडे किती लागेल. म्हणाले कि,तीस रुपये. पण हे त्यांनी टाकलेल जाळं होत. मी ह्यात फसत गेलो. माझ्या आयुष्यातील हि सर्वात खराब बस प्रवास होता. ह्या बस प्रवासाचा सारखा उल्लेख करून सायकल प्रवासाचा आनंद कमी करायचा नाहीय.
दिल्ली ला पोहोचलो. लोखान्द्च्या पुलावरून सायकल घेऊन चाललो होतो तर तिथे बैरियर लावले होते. यमुना नदी ने खतरनाक रौद्र रूप ध्राण केलं होतं. पण सायकल ला कोण अडवू शकतं?
सायकल गाडी वर टाकल्यावर
दिल्ली चा लोखडाचा पुल
(क्रमश:)
प्रतिक्रिया
19 Feb 2016 - 10:12 am | यशोधरा
आम्ही गेल्यानंतर त्याच रस्त्यावर असलेल्या सैनिकांच्या चौकीवर अतिरेक्यांनी हमला केला. त्यात पाच सैनिक हुतात्मा झाले. >> :(
19 Feb 2016 - 10:56 am | एस
वाचतोय!
19 Feb 2016 - 11:41 am | भुमी
स्वच्छंदी पक्षी,दंडवत._/\_
19 Feb 2016 - 11:41 am | वेल्लाभट
हं...................
19 Feb 2016 - 6:28 pm | प्रचेतस
संपत आला प्रवास.