साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली. मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली. त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले.
नंतर एका धाब्या वरती गेलो तर फक्त चहा आणि आम्लेट भेटेल म्हणून सांगितले. रोटी भात भाजी नाही. माझ्या साठी एवडे पुष्कळ होते. चहा आणि आम्लेटनीच पोट भरले.
आज ४६ किलोमीटर सायकल चालवली.
दिवस विसावा
पावणे आठ वाजता निघण्यासाठी तयार झालो. जेवण आता सोनमर्गलाच मिळेल असं सांगण्यात आलं. म्हणजे कमीत कमी ४० किलोमीटर लांब. त्यामुळे इथूनच भरपूर खाऊन घेतलं. आमलेट आणि चहा शिवाय दुसरे काहीही नव्हते. म्हणून चार अंड्याच आमलेट बनवून घेतलं. आज ह्या प्रवासा मधला शेवटचा घाट पार करायचा आहे - जोजीला. माझ्या कडे लेह-श्रीनगर मार्गाचा नकाशा आणि डेटा नव्हता. त्यामुळे माहित नव्हते कि, जोजीला किती उंच आहे आणि किती लांब. किलोमीटर च्या दगडा वरती गुमरी या ठिकाणाचे अंतर लिहिली होते. म्हणजे गुमरीला गेल्यावरच कळेल कि जोजीला किती लांब आहे ते. मटायन पासून गुमरी १६ किलोमीटर आहे. चढाई होती पण थोडीसी. एका तासाला सात ते आठ किलोमीटर वेगाने जात होतो.रस्ता चांगला होता. आजू बाजूला हिरवळ असल्याने उत्साह वाटत होता.
दहा वाजता गुमरी मध्ये पोहोचलो. इथे एक छोटंसं मन्दिर आहे आणि सैनिकांचं ठिकाण पण. गांव नाही आहे. इथेपण माहिती पडले नाही कि जोजीला किती लांब आहे ते. हा घाट खूप लांब आहे. मला आठवतंय कि , मी जेव्हा गूगल मैप वरती शोधत होतो तेव्हा मटायन गावापर्यंत घाट दिसत होता. खूप लांब आहे. एकाला विचारलं कि, जोजीला किती लांब आहे तर अपेक्षित उत्तर मिळाल. थोड्याच अंतरावर आहे. मला चैनच पडत नव्हते. असं झालं होतं कि कधी पार करतोय. कारण मग मला या घाटा पासून कायमचीच सुट्टी मिळणार होती. हा शेवटचा घाट आहे मग श्रीनगर पर्यंत उतारच उतार. वीट असलेला रस्ता सुरु झाला. चढाई आता संपत आली होती. समोर बर्फावरती काही पर्यटक खेळताना दिसले. इथे एक फौजी जिप्सी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. मी सायकल थांबवली. त्यामध्ये फौजी होता. हरियाणाचा होता.
मी म्हंटला, "रै भाई, गाड्डी ऊप्पर क्यूं टांग राक्खी सै?
म्हणाला,"कह थी, हमणै टांग दी.
मी विचारलं, "न्यू बता, जोजिल्ला कितणी दूर सै?
म्हणाला, "तू खड्या कित सै? स्यामी देख, वो बोरड दिख रा? वो जोजिल्ला का ही बोरड सै.
फक्त १०० मीटर लांब जोजीला पाहून खूप खुश झालो. एका फटक्यात जोजीला वर पोहोचलो. बाकीच्या घाटापेक्षा जोजीला एकदम रुक्ष वाटला. एक तुटलेला बोर्ड खूप लांब जाउन पडला होता. बाकी काही नव्हते तिथे. कोणत्याच झेंडे व पताका पण नव्हत्या. नंतर लक्ष्यात आलं कि, हा तर मुसलमान प्रदेश आहे. जोजीलाच्या सगळ्या बाजूनी मुसलमान आहेत. त्यामुळे इथे नाही कोणते मंदिर आणि नाही कोणत्या पताका.
इथेच जवळ पास बर्फ होता तिथेच पर्यटक खेळत होते. नीट बघितले तर तोच बर्फ वितळून त्याचा द्रास ओढा बनतो आणि त्यात काही हिस्सा हा सोनमर्ग वरून येणाऱ्या सिंधू नदीचा. दोन्ही नद्यांचा उगम हाच आहे. अजून एक गोष्ट कि जोजीला पार केला तरी चढाई हि राहतेच. माझ्या जीपीएस नुसार जोजीला ची ऊंचाई ३४३६ मीटर आहे आणि पुढे चढाला ३५१० मीटर दाखवते.
जोजीला नंतर खूप खराब रस्ता लागतो आणि चिखल पण. एका ठिकाणी बकरी मरून पडली होती. चरता चरता वरून पडली असेल. थोडा उतार सुरु झाला पण चिखल होता. त्यामुळे सारखा ब्रेक लावावा लागत होता. आता आनंद झाला होता कि, परत कधी चढाईचा सामना करावा लागणार नव्हता. समोरून हरिद्वारच्या नम्बर ची एक कार येताना दिसली. ते जोजीला च्या दिशेने निघून गेले. म्हटलं ठीक आहे. दहा मिनिटा नंतर परत ते मागून आले. माझ्या पुढे जाउन थांबले. त्यातून तीन प्राणी बाहेर निघाले. एक तीस वर्ष्याचा वन्दित सक्सेना आणि त्याचे मम्मी-पापा. ते चकित झाले माझी हिम्मत बघून. रुडकी चे राहणारे होते. मी त्यांना घरी येण्याचं निमन्त्रण दिलं. मग वन्दित नि घामाजलेल हेलमेट घालून सायकल चालवून पाहिली. खूप गर्व वाटला. काही वेळानंतर ते निघून गेले. आज ते सोनमर्ग ला थांबणार होते. इथे फक्त जोजिला बघायला आले होते. मी त्यांना सांगितलं कि द्रास जास्त लांब नाही सोनमर्ग सारखंच आहे. पण त्यांनी हॉटेल बुक करून ठेवले होते. त्यामुळे द्रास ला नाही गेले.
इथून पुढे गेल्यावर असा नजारा पाहायला मिळाला कि, मी कल्पनाच नाही करू शकत. समोर एक मोठा पर्वत दिसला आणि एक छोटा रस्ता पण. त्याच्या बरोबर खाली बालटाल दिसलं. इथे रस्ता नव्हताच बस फक्त डोंगराचे दगड कापून असा तसा रस्ता बनवला आहे. कशी तरी गाडी जाइल एवढाच. हा रस्ता १९४७ मध्ये बनवला होता जेव्हा पाकिस्ताननि लद्दाख वर आक्रमण केले होते. नाहीतर पहिले इथे पायवाट होती. पण असा वाटत कि आताच दगड कापून रस्ता बनवलाय. ह्या रस्त्यावरून जेवढे वरती चढायचे अवघड आहे तेवढेच उतरायचे. मनाली पासूनच्या आतापर्यंतच्या प्रवासातला हा खतरनाक रस्ता होता.
कपडे खूप खराब झाले होते. असे वाटत होते कि काढून फेकून द्यावेत. सायकल वर पण खूप धूळ बसली होती. सायकलचे सगळे पार्ट धुळीने माखले होते. खूप आवाज पण करत होती. विचार केला कि सोनमर्ग च्या अलीकडे ओढ्यावरती तोंड आणि सायकल धुवून घ्यावी.
दूसरी कडे बालटाल दिसत होतं. २८ तारीखेला म्हणजे पाच दिवसांनी अमरनाथ यात्रा सुरु होणार आहे. त्याची तयारी जोरात चालू होती. तम्बू आणि भण्डाराचा काम चालू होतं. पार्किंग आणि हेलीपैड पण दिसत होतं. हेलीपैड वरती कोणताच हेलीकॉप्टर दिसत नव्हते. यात्रा सुरु झाल्यानंतर येतील. आता बालटाल वरून येणारा रस्ता पण मिळाला त्यामुळे भण्डाराचे सामान वाहून नेणारे ट्रक पण दिसू लागले.
सव्वा दोन वाजता सोनमर्गला पोहोचलो. त्याआधी एका ओढ्यावरती थांबून तोंड धुतले होते पण सायकल नाही धुवू शकलो. सोनमर्ग मध्ये पर्यटकांची खूप गर्दी होती. जून महिन्यात तर खूप गर्दी असते. इथे अर्धा तास थांबून दाल भात खाल्ला. नेटवर्क भेटलं तेव्हा घरी सांगितले कि उद्या श्रीनगर ला पोहोचणार आहे. जेव्हा लेह वरून निघालो तेव्हा सोनमर्ग मध्ये थांबण्याचे नियोजन होते. पण अजून माझ्याकडे तीन चार तास आहेत. पुढे जाऊ शकतो. इथून श्रीनगर ८५ किलोमीटर आहे. त्यामुळे श्रीनगर ला पोहोचणे अशक्य आहे. इथून २३ किलोमीटर वर गुण्ड आहे आणि ४५ किलोमीटर वरती कंगन. जर जास्त कष्ट घेतले तर कंगन पर्यंत जाऊ शकतो. आज कंगनलाच थांबणार.
पावणे तीन ला सोनमर्ग वरून निघालो. आता जास्त हिरवळ आणि झाडे पण दिसू लागली. कितीतरी दिवस नंतर मी झाडे पाहत होतो. लद्दाख मध्ये पण झाडे आहेत. पण निसर्गानी दिलेले नाहीत. माणसाने किती तरी कष्ट करून निसर्गाच्या परवानगी शिवाय लावलेली आहेत. पण इथे सगळेच नैसर्गिक आहे. वाटत होते कि इथेच थांबावे. पण वीस दिवसात इतका थकलो होतो कि, वाटत होते लवकरात लवकर घरी जावे. आज कंगन लाच थांबावे. उद्या दुपार पर्यंत श्रीनगरला पोहोचावे. मग श्रीनगर ला रात्री आराम करून सकाळी दिल्ली कडे.
सवा चार वाजता गुण्ड पण पार केलं. आता गाव दिसत होते. लोकसंख्येच प्रमाण पण हि जास्त दिसत होतं. शेती पण दिसू लागली. शेतात काम करणारे शेतकरी. सगळे मुसलमान. एकच वाईट वाटत होते ते म्हणजे हिंदूना इथून पळून लावले त्याचे. कधी तरी इथे हिंदू पण राहत होते. एकजुटीने राहत होते, काम करत होते, आपले आयुष्य काढत होते. मला आश्चर्य वाटते कि. कसा काय एका कश्मीरी नि आपल्या हिंदू शेजाऱ्याला हाकलून लावलं? त्याला इथून जाण्यासाठी मजबूर केलं? आपले हे कश्मीरी ,हिमालयवासी असं कधीच करू शकणार नाहीत.
याचा मूळ आहे ते पाकिस्तान. तिथून शिकवलेले घुसखोर भारतात आले. बेरोजगार कश्मीरि युवकांना त्यांनी भडकावलं. पाकिस्तान मध्ये घेऊन गेले. इस्लाम च्या नावाखाली त्यांना कट्टर बनवलं आणि सोडून दिलं परत काश्मीर मध्ये वाट लावण्यासाठी. पूर्ण घाटी मधून हिंदू निघून गेले. त्यानंतर भारताने शुद्दिकरण अभियान चालवलं. मग लाखोंनी भटकलेले काश्मिरी युवक मुख्य धारा मध्ये आले. अजून हि काही भागात हे सैतानी विचार अधून मधून डोकावत असतात. मग आपली भारतीय सेना त्याला चोख उत्तर देते. तरी पण कश्मीर हा पर्यटकांसाठी आणि हिंडफिऱ्यान साठी स्वर्ग आहे.
पावणे सहा वाजता कंगन मध्ये होतो. काही तासापूर्वी विचार केला होता कि इथे थांबायचे. श्रीनगर अजून ४० किलोमीटर आहे. ब्रेक नाही लावू शकलो. कंगनच्या पुढे निघून आलो. आता वेध लागले होते ते श्रीनगर चे. मला आजच हा प्रवास संपवायचा होता. उद्यासाठी एक किलोमीटर पण ठेवायचे नव्हते.
साडे सहा वाजता गन्दरबल ला पोहोचलो. इथून श्रीनगर २२ किलोमीटर आहे. उतार आणि चांगला रस्ता ह्या जमेच्या बाजू होत्या. तहान पण खूप लागली होती. एका फात्यावर्ती पाण्याचा नल दिसला . मी लगेच सायकल एका खांबाला टेकून लावली. बरोबरच्य दुकानात तीन चार मुले उभी होती. मी पाण्याची बाटली भरायला लागलो तर एक जन लगेच tithe आला आणि माझी बाटली ओढून घेतली. म्हणाला कि, "आप थक गये हो, दुकान पर बैठो, मैं पानी दे देता हूं."
खर म्हणजे मी खूप थकलो होतो. १०० किलोमीटर पेक्षा आज जास्त सायकल चालवली होती. त्याचे मी लगेच ऐकला आणि दुकानाच्या पायर्यावर बसलो. बाकीचे लोक म्हणायला लागले कि इथे नको बसू आत जाउन खुर्ची वर बस. मी नाही म्हंटला इथेच ठीक आहे. मग सगळे जवळ आले. खूप गप्पा मारल्या. दिल्ली वरून आलोय, मनाली वरून सुरु केलं होतं आणि आज इथे संपवतोय. ते खूप लक्ष्य देऊन ऐकत होते. त्यांनी त्यांच्या घरी यायचे निमंत्रण दिला. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मला आशा नव्हती कि काश्मीर मध्ये एवडे प्रेम मिळेल ते. पण हे गाव होतं त्यामुळे असेल कदाचित. शहराची गोष्ट वेगळी आहे.
अर्धा तास थांबल्यानंतर तेथून निघालो. मग हजरतबल च्या समोरूनच लालचौकात आलो. मला इथेच थांबायचे होते कारण लालचौक पासूनच जम्मूला जाणाऱ्या गाड्या मिळतात. उदया निघताना जास्त चालावे लागू नये म्हणून.
आज सर्वात जास्त १२६ किमी सायकल चालवली.
मटायन वरुन निघल्यावर
जुगाड
समोर गुमरी आहे
जोजीला घाट
जोजीला नन्तर खराब रस्ता
रुडकीचे पर्यटक ज्यानी सायकल चालवुन पाहीली
मी जोजीला वर
जोजीला वरुन खाली उतरनारा रस्ता
बालटाल
बालटाल मधे पार्किंग आनी हेलीपैड
सोनमर्ग चे नजारे
डल तलाव ( तलाव म्हणण्या पेक्षा "झील" हा शब्दच खूप आवडतो)
(क्रमशः)
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 11:25 am | पिलीयन रायडर
अहो काय आहे काय हे!!! ते ट्र्कवाले म हा न आहेत!!!!! मी तो रस्ता बघुनच टरकले की इकडे जायचं असेल तर ह्या रस्त्यानेही जावं लागेल...
सोनमर्गचे नजारे अप्रतिम!!!
१२६ किमी सायकल.. घाटातुन... __/\__ साष्टांग आहे..!
17 Feb 2016 - 12:38 pm | एस
अफाट!
17 Feb 2016 - 1:18 pm | चांदणे संदीप
गलती से मिस्टेक हो गया था....आज पहिल्या भागात डोकावून पाहिले तेव्हा समजले की नीरजभाऊ आणि राजकुमारभाऊ दोन वेगळ्या व्यक्ती आहेत... :/
ओके, नीरजभाऊन्ना माझा साष्टांग दंडवत सांगा राजकुमारभाऊ!
Sandy
17 Feb 2016 - 1:42 pm | यशोधरा
केवळ अफ्फाट!
17 Feb 2016 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
17 Feb 2016 - 4:25 pm | वेल्लाभट
अबब
17 Feb 2016 - 4:58 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर आणि तितकेच खतरनाकपण.
हिमालयाचा ठिसूळपणा ठायीठायी जाणवतोय.
21 Feb 2016 - 7:53 am | पतन्ग
अतिशय सुन्दर!