लदाख सायकल ने : मुलबेक ते शम्शा (भाग १६)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
15 Feb 2016 - 3:47 pm

मुलबेक मध्ये बुद्ध ची एक विशालकाय मूर्ति आहे जी मोठ्या दगडावर बनवली आहे. नसीब धर्मांतराच्या वेळेस लद्दाखी मुसलमानांनी याला सोडून दिलं. मुलबेक याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. गेस्ट हाउसला जाताना माझ्याच रस्त्यावर दिसली होती. विचार केला कि सकाळी निघताना बघू.

आज ५९ किलोमीटर सायकल चालवली ज्या मध्ये दोन घाट फोतूला आणि नामिकला पण पार केले. दोघान मध्ये अंतर जास्त नव्हते. पण सायकल वरून ४१०० मीटर आणि ३८०० चे दोन घाट पार करणे म्हणजे चेष्टा नाही.

दिवस अठरावा

रोजच्या प्रमाणे आरामशीर उठलो. पण हा आराम खूप महागात पडणार होता कारण कारगिल नंतर फक्त द्रास मधेच राहण्याची व्यवस्था होती. इथून कारगिल ४० किलोमीटर आणि द्रास १०० किलोमीटर वर आहे. ह्या प्रवासात अजूनपर्यंत जास्तीत जास्त ८८ किलोमीटर सायकल चालवली आहे. चढाई तर लांबच उताराला पण एवढ्या लांब सायकल चालवली नाही. आज १०० किमी द्रास पर्यंत जाने गरजेचे होते. आज उतार कुठेच नव्हता. कदाचित कारगिल पर्यंत थोडा फार मिळू शकतो पण त्यानंतर जोजीला पर्यंत अजिबात नाही. आजच हिशोब सरळ होता कि, कारगिल ला चार तासात जाऊ शकतो पण पुढे द्रास ला कोणत्याहि परिस्थितीत पोहोचणार नव्हतो. अंधारात तर सायकल चालवू नाही शकत.

आज अजून एक अडचण होती कि, कारगिल आणि द्रास च्या मधी १५ किलोमीटर पर्यंत चा रस्ता असा आहे. जो पाकिस्तानी सेनेच्या फायरिंग रेंज मध्ये येतो. हा रस्ता चढाईचा आहे. मला कमीत कमी ४ तास लागतील पार करायला. मी ह्याच विचाराने चिंतीत झालो होतो. कधी असं पण मनात येत होते कि, ह्या रस्त्या मध्ये कोणत्या तरी ट्रकला हाथ करून, हा रस्ता पार करावा.

नाश्ता करून साडे नऊ वाजता इथून निघालो. सुरुवातीला रस्ता चांगला होता नंतर खराब रस्ता सुरु झाला. काही काही ठिकाणी रस्त्याचे काम पण चालू होते. त्यामुळे कडक उन्हात धुळीचा पण सामना करावा लागत होता. पूर्ण घाटी लोकसंख्येची आहे. एका नंतर एक गाव येत गेले. भरपूर ठिकाणी हिरवळ पहावयास मिळत होती. त्यामुळे हिरवळ दिसली कि, मी समजून जायचो कि इथे कोणते तरी गाव आहे. मुलबेक नंतर बौद्ध लोक दिसेनासे झाले आणि मुसलमान दिसू लागले. बौद्ध आणि मुसलमान यातील फरक आता स्पष्टपणे दिसू लागला होता. त्यांचे राहणी मान आणि कपड्या मध्ये मागासलेलापणा स्पष्टपणे जाणवत होता.

आपण जर नदीच्या प्रवाहाबरोबर जात असेल तर तुम्हाला उतार हा नक्कीच मिळणार. कधी तरी चुकून चढ लागतो. इथे पण असेच झाले. कारगिल पर्यंत रस्ता नदी च्या बरोबरीने आहे. त्यामुळे उतार आहे. मुलबेक ३२५० मीटर उंचीवर आहे तर कारगिल २६५० मीटर उंचीवर.

कारगिल च्या पांच किलोमीटर अलीकडे उंची २९०० मीटर आहे. आणि वाटत पण नव्हतं कि, कारगिलला जाण्यासाठी एवढे खाली उतरावे लागेल. हे एक तऱ्हेने चांगले होते कारण कारगिल नंतर परत चढाई चा सामना करावा लागणार होता. मी ह्याच उताराने खाली उतरलो. आता इथून कारगिल घाटी ५ किलोमीटर लांब होती. आता उंची २९०० वरून,ती सरळ २६५० पर्यंत आली. निसर्गाचा नियमच आहे. जेवढे खाली उतरावे लागते. तेवढेच वरती चढावे लागते. त्यामुळे मी अजून चिंतीत झालो. उताराने सायकल वेगाने जात होती.

एक वाजता कारगिल ला पोहोचलो. नदी पार केल्यानंतर एक रस्ता श्रीनगरला जातो आणि दुसरा रस्ता पदुम. मी श्रीनगर च्या रस्त्याने निघालो. येथे नेटवर्क मिळालं. मग घरच्यान बरोबर बोलून घेतले. आज जुम्मा होता. ह्या वेळेला नमाज चालू होतं. मस्जिद मध्ये गर्दी होती. भाषण पण चालू होते. कारगिलच्या बाजारा मध्ये पण गर्दी होती. इथे वेगळ्याच तोंडाची लोक पाहायला मिळाली. त्यांना दार्द असे म्हणतात. ते सिन्धु नदीच्या बटालिक च्या बाजूला राहतात. जास्त करून मुसलमान आहेत.

कोणतेच होटल नीट धडाचे नव्हते. असले तरी गर्दीमुळे दिसले नसेल. थोड्याच वेळात कारगिल च्या पुढे निघून गेलो. परत ओसाड वाळवंट सुरु झाले. कारगिल मध्ये खायला होते पण तरी भुकेलाच राहिलो. रस्ता एकदम खराब आणि चढाईचा होता. पायाने चालत जावे लागले. एकेरी रस्ता असल्याने, सायकल रस्त्याच्या खालून चालवावी लागत होती. कारगिल,ज्या नदीच्या किनारी वसलेल आहे. ती नदी पुढे जाउन सिन्धुला मिळते. कारगिल च्या पुढे अजून एक नदी ह्या नदीला येउन मिळते. रस्ता पण ह्या नदीच्याच किनारीने गेला आहे.

हा लेह-श्रीनगर रस्त्यावरील एकदम खराब रस्ता होता. कोणतेच गाव दिसत नव्हते. लोक वस्ती नव्हती. मग प्रश्न पडला कि, जेवायला कुठे मिळणार? एका पोलीस्वल्याला विचारले तर तो म्हणाला कि, ५ किलोमीटर पुढे मिळेल. ऐकून खूप बरे वाटले.

थोडे पुढे गेल्यावर बीआरओ वाले दिसू लागले. एकरे रस्त्याला दुहेरी रस्ता बनवण्याचे काम चालू होते. रस्त्या वरती वाळूचे ढीग पडले होते. सायकल चालवता येत नव्हती. मग पायाने चालू लागलो. याच धुळी मध्ये एक धाबा दिसला तेव्हा कुठे हायसे वाटले. पोटभरून राजमा-भात खाल्ला. एवढे चांगले बनवले नव्हते. पण उपाशी राहण्या पेक्षा पोट भरून जेवलो.

पावणे तीन वाजता येथे आलो होतो. साडे तीन वाजता येथून निघालो. कारगिल पासून २० किलोमीटर आलो होतो, द्रास अजून सुद्धा ४० किलोमीटर होते. पण जर असाच रस्ता पुढे पण भेटला तर, उद्या पण द्रास ला पोहचू शकणार नाही.

जेवून निघाल्यानंतर दोन किलोमीटर पर्यंत चांगला रस्ता होता. एकदम नवीन बनवला होता. एक पण खड्डा नाही आणि रुंदी ला मोठा पण. पुढे गेल्यानंतर अजून एक नदी येउन ह्या नदीला मिळते. हि नदी जोजिला वरून येते. ह्या नदीला द्रास नदी किंवा द्रास ओढा पण म्हणतात. जिथे ह्या दोन्ही नद्यांचा संगम होतो तिथला नजारा बघण्यासारखा आहे. द्रास नदी वर एक छोटा पूल पण होता. मी कारगिल पासून १५ किलोमीटर पुढे आलो होतो तरी पण पाकिस्तान च्या फायरिंग रेंज वाला भाग अजून आला नव्हता. कुणाला विचरले पण नाही. नंतर माहित पडले कि, जिथे त्या नद्यांचा संगम होतो तोच तो भाग आहे. द्रास नदी तर जोजीला वरून येते पण दुसरी नदी पाकिस्तानचे नियन्त्रण असणाऱ्या भागातून येते आणि ती जास्त लांब पण नाही. वरती डोंगरावर थोड्याच अंतरावर पाकिस्तानच नियन्त्रण कक्ष आहे. त्यामुळे हा भाग त्यांच्या फायरिंग रेंज मध्ये येतो. पण रस्त्याच्या कामामुळे तिथली सूचना पट्टी काढून टाकली होती. ज्यावर ती चेतावनी लिहिली होती. जर तो सूचना देणारा बोर्ड मला दिसला असता तर माझा अजूनच जीव गेला असता. उलट मी फायरिंग मधल्या भागात थांबून निसर्ग बघण्याचा आनंद घेऊ शकलो, तसेच पाणी पण पिलो, फोटो पण काढले.

सव्वा पाच वाजता खारबू मध्ये पोहोचलो. हे २८०० मीटर उंच आहे. इथे मला राहण्यासाठी मिळेल अशी आशा होती. मी तुम्हाला पहिलेच सांगितले आहे कि, मुलबेक जसं मुसलमानाच भाग आहे तसं खारबू पण मुस्लिम आहे. छोटस गांव आहे. एका म्हाताऱ्याला राहण्यासाठी विचारले तर त्यांनी नाही म्हणून सांगितले. नाराज होऊन पुढे जाउन परत एका ठिकाणी थांबलो. घरासमोर एक माणूस आपल्या छोट्या दोन मुलीना घेऊन बसला होता. मी त्याला राहण्या बाबत विचारले तर त्यांनी पण नाही म्हणून सांगितले. तितक्यात त्या मुली माझ्याजवळ आल्या आणि चॉकलेट मागू लागल्या. मग मी दोघांना दोन दोन चॉकलेट दिल्या.

आता शेवटचा विकल्प माझ्याकडे राहिला होता. तो म्हणजे तंबू लावणे. रस्त्या मध्ये ठीक ठिकाणी बीआरओ वाल्यांचे तंबू दिसत असतात. असाच एक तंबू बघून त्या शेजारी आपला तंबू लावणे. रस्ता चांगला होता पण चढाई होती. संध्याकाळची वेळ होती. पश्चिमकडे जाणारा रस्ता. त्या बरोबरीने नदी. निसर्गाचं असं सुंदर दृश होतं कि सगळी निराशाच निघून गेली.

खारबू पासून आठ किलोमीटर पुढे एक गाव दिसलं - शम्शा. लांबून येणाऱ्या सायकली ला पाहून काही मुळे पळत माझ्याकडे आली आणि हेलो हेलो म्हणू लागली. मला आता याची सवय झाली होती. जेव्हा चढ लागत असेल, घाम येत असेल अश्या वेळेस हीच मुले मला शत्रू वाटतात. लांबूनच हसत हसत येतात, चॉकलेट मागतात ,हाथ मिळवून नाव विचारतात. असं प्रसंग जर एखाद वेळा आला तर काही वाटत नाही पण सारखाच येऊ लागला तर मग मुलांकडे बघून खूप राग येतो. मी त्या मुलांकडे लक्षच दिलं नाही. तसाच पुढे गेलो.

शम्शा च्या पुढे निघून आलो होतो. एकदम शांत सामसुम ठिकाणी दहा वर्ष्याचा मुलगा उभा होता. त्याने मला थांबायला सांगितले. काय झाला काय माहित मी चक्क थांबलो. दम पण लागला होता म्हणून थांबायचेच होते. त्याने विचारले कि,"कहां जाओगे?
मी म्हटलं, "श्रीनगर."
म्हणाला कि, "आज कहां रुकोगे?"
मी म्हटलं, "आगे रुकूंगा बीआरओ के कैम्प के पास."
म्हणाला कि," वो तो पांच छह किलोमीटर आगे है, अन्धेरा हो जायेगा वहां पहुंचते पहुंचते.आप हमारे घर चलो."
हे ऐकून माझे कान तर उभे राहिले. ऐकलं होतं कि, डोंगराळ प्रदेशात सुमसाम भागा मध्ये भूत असतात. जे दिवसा तर दिसत नाही पण रात्री दिसतात. मी लगेच त्याच्या पाया कडे पाहिले. पाय तर ठीक होते.उलटे नव्हते आणि जमिनीवरच होते.
“कहां है तुम्हारा घर?”
“वहां ऊपर पहाडी पर...”
“घर में और कौन कौन हैं?”
“मां बाप और भाई बहन.”
“वे तेरी पिटाई तो नहीं करेंगे.”
“नहीं, बिल्कुल नहीं।”
“पहले भी तुम्हारे यहां कोई इस तरह आया है?”
“नहीं, लेकिन नीचे आये हैं. हमारा घर ऊपर है, तो कोई जाता नहीं.”
“पैसे कितने लोगे?”
“पैसे? आप हमारे यहां मेहमान बनकर चलोगे। मेहमानों से पैसे नहीं लिया करते।”
मी त्याला हा म्हटले. त्यानेच सायकल वरून मोठी बैग काढून कमरेवर अडकवली. मी सायकल घेऊन वरती चढत होतो. त्याच्या कडे बैग असून सुद्धा सायकलला मागून धक्का मारत होता. मला खूप त्याचे नवल वाटले. मग मी जाता जाता त्याच्या बरोबर संवाद साधायला सुरुवात केली.
“क्या नाम है तुम्हारा?”
“मुश्ताक अहमद.”
“कितने भाई बहन हैं?”
“हम छह भाई बहन हैं. मैं दूसरे नम्बर का हूं.बडा भाई कारगिल में काम करता है.”
“पिताजी क्या करते हैं?”
“बाप? वो यहीं काम करता है खेतों पर. कुछ देर बाद आयेगा वो घर।”

खूप चांगल्या प्रकारे स्वागत झालं त्याच्या घरी. आतून घर चांगलं बनवलं होतं. पण घर लहान आणि सहा भाऊ बहिण असल्याने त्याचा परिणाम घरावर साफ दिसत होता. मी या सहा भावा-बहिणींचा विचार करत होतो. कारगिल जिला लद्दाख मध्ये येतो. त्यामुळे चारी बाजूनी ओसाड वाळूचे डोंगर. फक्त गाव जवळच हिरवळ. शेती हि फक्त नावालाच. हि मुलं मोठी झाल्यावर काय करणार? बापाने तर अल्लाहच्या आदेशाच पालन केलं. अल्लाह ने तर संदेशच देऊन ठेवला आहे. किती हि मुलांना जन्म द्या. त्याचे पालन पोषण तर मीच करणार. जगात कोटीच्या कोटी किड्या मुंग्यांना मी सांभाळतोय. तर तुम्हाला पण सांभाळीन.

तिथे गेल्या गेल्या चहा आणि रोटी मिळाली. माहिती पडले कि, मुले इंग्लिश मध्ये शिकतात पण उर्दू पण शिकावी लागते. पण लेह जिल्ह्यात असे नाही. लोक उर्दू ऐवजी हिन्दी पसंद करतात.
रात्र झाल्या नंतर घराचा मालक पण घरी आला. थोडा चिंतीत होता. त्याला चिंता ह्याची होती कि, पाव्हण्याला आज काय जेवायला घालावे. भात बनवला होता आणि मटण केले होते. मी मटण खात नाही. त्यांनी विचारलं तर मी नाही म्हणून सांगितलं. हेच त्यांच्या चिंतेचं कारण होतं. त्यांनी सांगितलं कि घरात काहीच नाही. डाळ आणण्या साठी मुलाला खाली पाठवावे लागेल. मी म्हटलं मला काही नको. दुपारीच मी भरपूर खाऊन आलो आहे आणि आता इथे रोटी पण खाल्ली आहे. मला आता भूक नाही. पण ते पाव्हण्या ला भूके कसे ठेवणार. त्यामुळे आज मला मांसाहार करावेच लागणार होते. मी जर काही खाल्ले नाही तर यांना वाईट वाटेल. त्यानंतर मला एक युक्ति सुचली.
मी म्हटलं, "सकाळची काही भाजी शिल्लख आहे का?"
म्हणाले कि,"हां, घास सब्जी है. आधी कटोरी लेकिन मेहमान को हम बासी सब्जी नहीं देंगे."
मी म्हंटले द्या चालते मला. मग भाता मध्ये मिक्स करून खाऊन टाकले. आपल्याकडे कसे पालक,मेथी असते तसीच कोणती तरी पाले भाजी होती.

जमीन वरच गाद्या अंथरल्या आणि चादर घेऊन झोपलो. खूप गरम होत होते. आज सायकल ने खूप त्रास दिला. गियर शिफ्टिंग मशीन मध्ये काहीतरी गडबड होती और आणि गडबड पण चढाई च्या वेळेसच करायची. चढाला पहिल्या गियर ची आवश्यकता पडायची त्यावेळेसच आपोआप दूसरा गियर पडायचा. कितीतरी वेळा असे झाले. रस्त्यावरच्या धुळीने आणि मातीने असे झाले असेल.
मी आज ७१ किलोमीटर सायकल चालवली.


कारगिल कडे


कारगिल शहर


कारगिल


कारगिल नन्तर


हाच तो सन्गम आहे जो पाकिस्तानी सेने च्या फायरिंग रेंज मधे येतो.


द्रास कडे


सर्वात मोठा मुश्ताक अहमद. बाकी सगळे त्याचे भाऊ बहिण

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 6:59 pm | प्रचेतस

हा भागही आवडला.
प्रवास करता करता येणारे अनुभव रोचक आहेत.

चांदणे संदीप's picture

15 Feb 2016 - 7:04 pm | चांदणे संदीप

+१

(इतकंच सध्या)

Sandy

एस's picture

15 Feb 2016 - 7:08 pm | एस

तंतोतंत!

मुश्ताक आणि भावंडं लईच गोड आहेत.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 7:52 pm | यशोधरा

किती गोड आहेत मुश्ताक आणि भावंडे :) बिकट आर्थिक परिस्थितेमध्येही त्यांनी जपलेली माणुसकी पाहून काय वाटलेहे शब्दांत सांगता येत नाही!

बोका-ए-आझम's picture

15 Feb 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम

दिसायलाही आणि स्वभावानेही. माणसाने धर्माचा शोध लावला नसता तर फार बरं झालं असतं.

माणसाने धर्माचा शोध लावला नसता तर फार बरं झालं असतं.

+१

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2016 - 6:01 pm | पिलीयन रायडर

मुश्ताक फारच गोड. त्या फोटोत त्याचा दावीकडुन ३ रा भाउ असा डोळे वटारुन का पहातोय!!!

असं रस्त्यावरुन जाणार्‍याला आपल्या घरी पाहुणा म्हणुन घेऊन जाणं किती मोठ्या मनाचं लक्षण आहे!