लदाख सायकल ने : शम्शा ते मटायन (भाग १७)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
16 Feb 2016 - 1:13 pm

जमीन वरच गाद्या अंथरल्या आणि चादर घेऊन झोपलो. खूप गरम होत होते. आज सायकल ने खूप त्रास दिला. गियर शिफ्टिंग मशीन मध्ये काहीतरी गडबड होती और आणि गडबड पण चढाई च्या वेळेसच करायची. चढाला पहिल्या गियर ची आवश्यकता पडायची त्यावेळेसच आपोआप दूसरा गियर पडायचा. कितीतरी वेळा असे झाले. रस्त्यावरच्या धुळीने आणि मातीने असे झाले असेल.
मी आज ७१ किलोमीटर सायकल चालवली.

दिवस एकोणिसावा

सकाळी उठलो तसं मुलांनी घेरलं. हातात पाण्याचा जग आणून दिला. इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं. शौचालय हे लद्दाखी लोकांसारखा होतं. दोन छोट छोट्या खोल्या असतात. एकावर एक अश्या. वरच्या मध्ये लाकडाच्या फरशीला एक छेद असतो. कारण घाण खाली पडत राहावी म्हणून. तसेच वरच्या मध्ये मातीचा ढींग पण असतो. त्या ढिगातून थोडी थोडी माती पडत राहते. यामुळे ती घाण झाकून जाते, वास पण येत नाही आणि मुख्य म्हणजे ओसाड जमिनी मध्ये याचा खत म्हणून चांगला उपयोग होतो.

मोठ मोठ्या रोट्या मिळाल्या चहा बरोबर खाण्यासाठी. घराच्या मालकीनिन आग्रह केला कि मी लद्दाखी चहा पिऊ. लद्दाखी चहा बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. खरी गोष्ट अशी आहे कि, अजून पर्यंत मी लद्दाखी चहा पिलाच नाही. तरी पण नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगितल्यावर डोक्यात आलं कि घ्यायला पाहिजे होता.
कशी तरी एकच रोटी खाल्ली. काय करणार! जवळ जवळ एक डझन डोळे माझ्याकडे बघत होते. मी कसा खातो ते. त्यामुळे लाजत काजत एकच रोटी खाल्ली. पुढे ५ किमी नंतर ढाबा आहे. तिथेच पराठे खाऊया. या विचाराने हाथ धुतला आणि उठलो.
काल पासून मी यांचा पाहुणा आहे. मुश्ताकनि किती आनंदानी मला थांबवल आणि घरी घेऊन आला. माझा चांगल्या रीतीने पाहुणचार केला. हा.. काल त्याने पैशे घ्यायला मनाई केली होती. म्हणून माझे पण कर्त्यव्य होतं कि त्याला काही तरी द्यावं. त्याला दोनशे रुपये द्यावं असं ठरवलं. म्हणून मी पाकीट उघडून बघितलं तर त्यात पाचशेची नोट होती आणि वरती दहाची. माझ्या कडे पैश्याची कमतरता असल्याने त्याला पाचशे रुपये नव्हतो देऊ शकत. आणि दहा रुपये तरी कोणत्या तोंडाने देणार. आणि पाचशे देऊन तीनशे रुपये तरी कसे मागणार. आजूबाजूला दुकान पण नव्हते कि सुट्टे करून आणावे. मी मोठ्या धर्मसंकटा मध्ये सापडलो होतो. शेवटी ठरवलं कि पैसे न देताच निघायचं.

नऊ वाजता तेथून निघालो. त्यातलि काही मुलं, मला सोडायला खाली रस्त्यापर्यंत आली. खाली परत अजून दोन मुलं मिळाली. ती त्या गावातली होती. त्यांनी सायकल चालवायची इच्छा आहे म्हणून सांगितले. मी पण त्यांना सायकल चालवायला दिली. मग सामान बांधले आणि सव्वा नऊ ला निघालो.

जे ठिकाण मी पांच किलोमीटर पुढे आहे असं मनात होतो तेच बीआरओ चा कैम्प एक किलोमीटर वरती मिळाल. अर्धा तास तेथे थांबलो. आलू चे दोन परांठे खाल्ले. येथे दोन ट्रक वाले भेटले. ते श्रीनगरला चालले होते. त्यांनी जोजीला चे नाव घेऊन भीती दाखवायचा प्रयत्न केला. त्यांनी आग्रह केला कि त्यांचा ट्रक खाली चालला आहे. सायकल त्या मध्ये टाकू. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. आता पर्यंत सात घाट पार केले आहेत. त्या मानाने जोजीला तर खूप छोटा आहे. त्याला पण पार करेल. तरी त्यांनी सांगितले कि, आपण रस्त्या मध्ये भेटूच तेव्हा जर सायकल चालवायला त्रास होत असेल तर सायकल ट्रक मध्ये टाक.

आता लद्दाखी दृश्य संपणार होतं. शेवटी जोजिला नंतर हिमालयीन दृश्य दिसणार होतं. रोहतांग च्या पुढे गेल्यावर लाहौल मध्ये प्रवेश केला होतं. त्याच्या सारखाच दृश्य इथे पाहायला मिळाल. आता वाळू संपली होती. दगडाचे आणि थोडे फार हिरवे डोंगर दिसू लागले होते. हिरवळ असणारी मैदाने दिसू लागली होती. अजून एक बदल पाहायला मिळाला कि, पाणी खूप दिसू लागलं. रस्ता चांगला बनवलेला होता. एका ठिकाणी तीन चार लोक रस्त्याच्या कडेला काम करत होते. कश्मीरी होते साहजिकच मुसलमान होते. मी त्यांना विचारलं कि, चश्मा अजून किती लांब आहे. त्यांनी सांगितलं कि तीन किलोमीटर पुढे. चश्मा म्हणजे पाण्याच स्रोत. मला खूप तहान लागली होती. बाटली पण खाली झाली होती. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं कि, आमचा मुलगा वरती गेला आहे पाणी आणायला. थोडावेळ थांबा. मी त्यांना बाटली दिली कि पाणी आणले कि भरा. तो येइस पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. पंधरा मिनिटे झाली तरी तो आला नाही. मी त्यांना बाटली परत मागितली कि, पुढे तीन किलोमीटर वरती चश्मा आहे तिथेच भरेल म्हणून. बाटली परत देण्यास त्यांनी नकार दिला. म्हटले कि, पाणी न पिता आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून. मला घाई पण नव्हती आणि त्यांचे प्रेम बघून थांबलो. काही वेळाने मुलगा आला. पोट भरून थंड पाणी पिलो. बाटली पण भरून घेतली.

द्रास च्या सहा किलोमीटर आधी तोलोलिंग डोंगराच्या खाली एक युद्ध संग्रहालय आहे. कारगिल युद्धाच्या स्मरणार्थ ते बनवले आहे. मला ते बघायचे होते. बाहेर भरपूर गाड्या उभ्या होत्या. मी पण सायकल लावली आणि आत मध्ये प्रवेश केला.

१९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मश्कोह घाटी पूर्णपणे ताब्यात घेतली. तसेच मश्कोह नदी पार करून उंच पर्वता वरती पण चढले. त्यामुळे श्रीनगर-लेह रस्ता पण त्यांच्या ताब्यात आला. द्रास पण त्यांच्या ताब्यात येणार होतं. पण आपल्या सैनिकांनी त्यांना साडे तोड उत्तर दिलं आणि मश्कोह घाटी मधून त्यांना हाकलून लावलं. तसेच तोलोलिंग आणि टाइगर हिल सारखे भाग पण त्यांनी स्वतंत्र केले. त्याच बरोबर बटालिक च्या बाजूने पण लडाई झाली. कारगिल मध्ये कोणतीच लडाई झाली नाही. पण द्रास आणि बटालिक हे कारगिल जिल्ह्यात येत म्हणून याला कारगिल युद्ध असे म्हणतात.

हि माहिती मला नंतर मटायन मध्ये एका वयस्कर माणसाने दिली होती. त्यांनी सांगितलं कि, जोजीला पासून पुढे द्रास आणि बटालिक पर्यंत भारताची हद्द त्यांच्या नियंत्रणात आली होती. आम्हाला पण घर जमीन सोडून इथून जावे लागले होते. आम्ही श्रीनगर ला गेलो. युद्ध संपल्या नंतर जेव्हा आम्ही परत इथे आलो तर नाही जमीन मिळाली नाही घर. जमिनी ह्या दारू गोळ्यांचे अड्डे बनले होते आणि घर हे उध्वस्थ झाले होते. नंतर सैनिकांनी दारू गोळे हटवले आणि त्यांनीच आम्हाला घरे बांधून दिली. शेती पण मिळाली.
मी म्हंटले, मश्कोह नदी वर तर कोणताच पुल नाही. आणि ती वाहते पण जोरात. मश्कोह च्या ह्या बाजूचा बराच लांब पर्यंतचा भाग हा भारताचा आहे. मग तिथे भारतीय सैनिक नव्हते का? एवडी सगळी हत्यारे त्यांनी मश्कोह नदी पार करून कशी काय आणली? आणि टाइगर हिल सारख्या एवढ्या उंचावरती कसे काय घेऊन गेले? त्यांनी सांगितलं कि हे एक रहस्यच आहे.
असो ...ह्या युद्धाच्या आठवणी म्हणून हे संग्रहालय बनवले आहे. वेगवेगळ्या रेजीमेण्ट ची माहिती, वीर मरण आलेल्या सैनिकांची नावे, युद्धा मध्ये वापरली गेलेली हत्यारे यांची माहिती दिली आहे. प्रवेश फी अजिबात नाही.

संग्रहालय पासून सहा किलोमीटर वरती द्रास आहे. द्रास नदी आणि मश्कोह नदी शिवाय खूप सार्या नदीचा संगम येथे होतो. खूप मोठी घाटी आहे. मैदानी भागामध्ये बकऱ्यावाले बकऱ्या चारत होते.
अडीच वाजता द्रासला पोहोचलो. एका हॉटेल मध्ये जेवण केला आणि साडे तीन ला निघालो. लेह ला जेव्हा मी कार्यक्रम बनवला होता त्यानुसार आज इथेच थांबायचे होते. पण वेळ होता आणि पुढे अजून गाव भेटणार होते. म्हणून मी पुढे निघालो. इथून मटायन 21 किलोमीटर आहे. विचार केला आज तिथेच थांबूया.

द्रास नैसर्गिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. कश्मीर आणि सोनमर्गला येणारे पर्यटक यांनी द्रास ला पण आले पाहिजे. पहिले ते असुरक्षित होतं, आता तसं नाहीय. आज च्या घडीला द्रास हे कश्मीर पेक्षा खूप शान्त आहे. द्रास हे जागा मधलं दोन नम्बरच लोक वस्तीचं थंड ठिकाण आहे. पहिला ठिकाण हे साइबेरिया मध्ये आहे. ९ जानेवारी १९९५ रोजी वजा ६० डिग्री तापमान नोंदवलं गेलं. आजपण थंडी मध्ये लेह ते कारगिल पर्यंत दोनशे किलोमीटर चा रस्ता हा खुला असतो. पण द्रास हे अत्याधिक थंड आणि बर्फवृष्टीमुळे रस्त्यामध्ये बाधा येते. यात्रा सुरु करताना मला पण भीती होती कि, द्रास मध्ये थंडी लागू शकते. पण असं काही नव्हतं. चांगले उन पडले होते. आणि गरम होत होते.

मश्कोह घाटी हे द्रास चे मुख्य आकर्षण आहे. ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध आहे. ह्या घाटी मध्ये जाण्या साठी परमिट घ्यावे लागते जे द्रास मध्ये मिळते. आपण जर मश्कोह नदी च्या बरोबरीने चालत गेलो तर एक घाट पार करून आपण किशनगंगा नदी च्या घाटी मध्ये प्रवेश करतो. हीच किशनगंगा पुढे पाकिस्तान मध्ये जाते. तिथे हिचे नाव वेगळे आहे. तिथे ती नीलम नदी व नीलम घाटी च्य नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगर वरून एक घाट पार करून आपण किशनगंगा घाटी मध्ये जाऊ शकतो. असं ऐकलय कि, आता द्रास हे किशनगंगा घाटी च्या रस्त्याला जोडले आहे. परंतु हा रस्ता नकाश्यात दिसत नाही. पण जर असं असेल तर ह्या हिंडफिऱ्यान साठी एका नवा भागच उपलब्ध होईल.

शम्शा २८६० मीटर च्या उंची वर आहे तर द्रास ३०८५ मीटर वर. द्रास नंतर थोडीसी चढाई सुरु होते. आज मटायन मध्ये थांबायचे होते जे २१ किलोमीटर लांब आहे. संग्रहालय मध्ये मटायन चे काही फोटो पहिले. त्यात मटायन हे एक मोठं समांतर मैदान आहे. तिथे पण चांगलेच युद्ध झाले होते. मटायन पण पाकिस्तानच्या नजरे मध्ये होतं.

पूर्ण रस्ता हा नदीच्या बरोबरीने आहे. नदी च पत्र पण मोठे आहे. त्यामुळे मेंढपाळ पण आपले अड्डे बनवून तेथे थांबले होते. लद्दाख च्या सुख्या डोंगरातून आलो होतो. त्यामुळे इथले हिरवे बघून डोळ्यांना बरे वाटले. पण झाडे अजून आली नव्हती. जोजीला पार केल्यानंतरच झाडे दिसतील.

साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली. मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली. त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले.
नंतर एका धाब्या वरती गेलो तर फक्त चहा आणि आम्लेट भेटेल म्हणून सांगितले. रोटी भात भाजी नाही. माझ्या साठी एवडे पुष्कळ होते. चहा आणि आम्लेटनीच पोट भरले.
आज ४६ किलोमीटर सायकल चालवली.


शम्शा मधे मुश्ताकच्या घरा पासुन खाली उतरताना


रस्त्य मधे भेटलेले पंडरस नावाचे गाव


ह्यानी मला थाबवले आणि फोटो काढायला लावले


द्रास कडे


हेच होते ते ज्यांनी माझी बाटली घेतली आणि पाणी येइस पर्यंत थांबायला सांगितले.


मी मोकळी बाटली मागितली तर मुल्लाजी बाटली घेऊन लांब गेले. मुलगा आल्यावर पाणी पाजुनच जाउन देणार.


द्रास कडे


द्रास च्या सहा किलोमीटर अलीकडे युद्ध संग्रालय


द्रास


टायगर हिल च्या खाली वसलेलं द्रास


द्रास


मागे बकऱ्या आणि पुढे त्यांचे बोडीगार्ड


मटायन गांव


ह्याच मुलांनी तंबू लावून दिला


हिमालयाच्या कुशीत माझा तंबू.

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Feb 2016 - 1:30 pm | कंजूस

भारी आहे.

नेहमीचीच प्रतिक्रिया समजून घेणे!

सगळेच वर्णन आणि फोटो अप्रतिम आहेत. पण मला ऐक प्रश्न आहे. तिथे (अवेरेज) तापमान किती होते कारण तुम्ही नेहमीच पायात चप्पल घालून सगळा प्रवास करता आहेत. आणि त्याचा त्रास सायकल चालवताना होत नाही काय?

राजकुमार१२३४५६'s picture

16 Feb 2016 - 2:55 pm | राजकुमार१२३४५६

लदाख मध्ये जून महिन्यात सरासरी तापमान हे २१ डिग्री ते ७ डिग्री च्या आसपास असते. जून महिन्यात रेकॉर्ड तापमान हे जास्तीत जास्त ३५ डिग्री आणि कमीत कमी -१ आहे.

वेल्लाभट's picture

16 Feb 2016 - 3:26 pm | वेल्लाभट

केवळ कमाल !

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 4:27 pm | चांदणे संदीप

खूप सविस्तर प्रतिसाद लिहायचाय राव....पुरेसा वेळ नाहीये हे खूपच प्रकर्षाने आता जाणवायला लागलाय :(
'प्रतिक्रिया' नाही तर 'रसग्रहण'च म्हणायला हवे खरे!!

:( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :(

असो, चांगल चालल आहे....नंतर निवांत भेटू! ____/\____

Sandy

rahul ghate's picture

16 Feb 2016 - 4:35 pm | rahul ghate

नीरज जी

फोटो व लेख दोन्ही जबरदस्त आहेत , मला १ प्रश्न आहे , मी गुगलून पहिले पण लेह ते श्रीनगर किवा कारगिल चे रस्ते नकाशात हि दिसत नाहीत , तेव्हा तुम्ही पुर्व तयारी कशी केली , सगळा अभ्यास / प्लानिंग कसा केला ..

प्रचेतस's picture

16 Feb 2016 - 5:09 pm | प्रचेतस

हा भागही प्रचंड आवडला.
हॅट्स ऑफ..!!!

पैसा's picture

16 Feb 2016 - 5:10 pm | पैसा

युद्ध संग्रहालय बघताना अभिमान वाटला असेल तसंच गेलेल्या तरुण सैनिकांसाठी दु:ख. कल्पनातीत अनुभव हे एकेक.

सतिश पाटील's picture

16 Feb 2016 - 5:19 pm | सतिश पाटील

मश्कोह च्या ह्या बाजूचा बराच लांब पर्यंतचा भाग हा भारताचा आहे. मग तिथे भारतीय सैनिक नव्हते का? एवडी सगळी हत्यारे त्यांनी मश्कोह नदी पार करून कशी काय आणली? आणि टाइगर हिल सारख्या एवढ्या उंचावरती कसे काय घेऊन गेले?

टायगर हिल आणि इतर दुसर्या उंच ठिकाणी जिथे आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तिथे जेव्हा भरपूर बर्फ पडतो तेव्हा तापमान खूप खाली आल्याने दोन्हीकडचे सैनिक खाली उतरून भरपूर मागे हटतात. तेव्हा याचा फायदा घ्याचा नाही असा दोन्ही देशाचा एक नियम होता. आपण नेहमी हा नियम पाळला. परंतु त्यावेळी पाकिस्तानने गद्दारी करून याचा फायदा उचलला जेव्हा आपले सैनिक भरपूर बर्फावृष्टी मुळे खाली उतरले होते.
अर्थातच त्यांनी यासाठी भरपूर आधीच तयारी करून ठेवली होती.

हिवाळा संपून जेव्हा वरील डोंगरावरचा बर्फ कमी झाला तेव्हा हि गोष्ट आपल्या निरीक्षणात आली, कि तिथे आता पाकडे येऊन बसलेत.

त्याआधी स्थानिक मेंढपालाने संशयित लोकांना भरपूर शस्त्रानिशी त्या डोंगरावरून खाली येताना पहिले होते आणि त्यांनी हि खबर सेनेला दिली.

आम्हाला तिथल्या सैनिकांनी आणि स्थानिक लोकांनी दिलेली हि महिती.

सतिश पाटील's picture

16 Feb 2016 - 5:22 pm | सतिश पाटील

काही महिने अगोदर कारगिल ते श्रीनगर हा रस्ता गुगलच्या नकाशात दिसत होता.

फोटो आणि लिखाण मस्तच.
पुढल्या वेळेला बायिक ऐवजी सायकलच घेऊन जाव अस आता मला वाटू लागलाय.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2016 - 6:13 pm | पिलीयन रायडर

हा ही लेख नेहमीप्रमाणेच मस्त!!

"सुप्रीम सॅक्रिफाईस" शब्द कितीदाही वाचला तरी डोळे भरुन येणं थांबत नाही.. एवढ्या थंड वातावरणात कसे सीमेची रक्षा करतात.. कोणत्या वेडाने झपाटलेले असतात.. आकलनाच्या पलीकडे आहे...

मयुरMK's picture

16 Feb 2016 - 6:20 pm | मयुरMK

अप्रतिम !

मधुरा ashay's picture

16 Feb 2016 - 10:52 pm | मधुरा ashay

रोचक लिखाण.. तुमच्या पुढच्या लेखाची उत्सुकतेने वाट पाहते..मालिका सुरू झाल्यापासून..निव्वळ अप्रतिम..