जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात आणि भाजी.
ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत नव्हता. अल्ची ला जायची माझी इच्छा पण नाही.
दिवस सोळावा
सात वाजता उठलो. गेस्ट हाउस हे घरासारखेच असते. हे गेस्ट हाउस पण खूप मोठ होतं. पूर्ण घर पालथे घातलं कोणीच दिसलं नाही. आतल्या खोलीत जाउन बघितले. तसे मी कुणाच्या घरी आत पर्यंत जात नाही. पण मला लवकर निघायचे होते. काही वेळाने मुलगी दिसली माहित पडले कि, तिची आई लामायुरू ला गेली आहे. तिथे पूजा आहे कसली. घरात ती एकटीच होती. तिने नाश्त्यासाठी विचारलं. मी लगेच हो म्हणून सांगितलं. म्हणायला लागली कि, तुम्हाला इथे आणू खोली मध्ये का, स्वयपाकघरात येता. माझी इच्छा होती कि, लद्दाखी घर आतून पाहण्याची, पण मुलगी एकटी पाहून बरोबर नाही वाटले, आत जायला. मी म्हटले, खोली मधेच आन. ठीक आहे. तुमच्या मनाप्रमाणे असं म्हणून ती आत गेली.
अचानक परत आली. म्हटली, "नहीं भैया, आप अन्दर ही चलो, कोई परेशानी नहीं है. मुझे काफी सारा सामान उठाकर लाना पडेगा."
मी तुरु तुरु लगेच तिच्या मागे गेलो.
मी जेव्हा जानेवारीत आलो होतो तेव्हा असच चिलिंग मध्ये एका लद्दाखी घरात थांबलो होतो. तिथल्या घरा प्रमाणेच हे घर होते. मोठ मोठ्या मऊ गाद्या, बसायला लांब आयताकृती चटया, वाटला तर त्यावर झोपू पण शकता आणि समोर भगवान बुद्ध. भिंती वरती रैक बनवून भांड्यांची केलेली सजावट आणि जबरदस्त साफ सुतरेपणा.
त्या मुलीचे नाव आता आठवत नाही. बारावी मध्ये शिकत होती. तिने गरमागरम लद्दाखी रोट्या वाढल्या. ह्या रोट्या खूप मोठ्या असतात. विस्तवावरती शेकतात. जैम आणि चहा बरोबर खातात. तिने वेगवेगळ्या प्रकारचे जैम चे डब्बे माझ्यासमोर आणून ठेवले. छोटे तोंड असलेला चहाचा थर्मास पण आणून ठेवला. तसं हे सगळे जैम, या जाड्या रोट्यान बरोबर खायची पद्धत नेमकी बरोबर कोणती, हे मला माहित नाही. पण चिलिंग मध्ये असताना जी पद्धत वापरली होती तीच इथे वापरली. चाकुनी डब्या मधून जैम बाहेर काढलं आणि रोट्याना थाप थाप थापल. मग एक घास खाल्ला कि एक कप चहाचा घोट!! त्या मुली नि पण मधी काही टोकल नाही,म्हटलं हेच बरोबर आहे.
नऊ वाजता तेथून निघालो. आजच लक्ष्य होतं. 61 किलोमीटर लांब लामायुरू. इथून खालसी पर्यंत रस्ता सिन्धु च्या बरोबरीने जातो. पुढे रस्ता सिन्धु पासून दूर होऊन फोतूला ची चढाई सुरु होते.
ससपोल वरून निघाल्यावर डाव्या हाताला सिन्धु पार करून एक रस्ता प्रसिद्ध गोम्पा अल्ची ला जातो. मला अल्चीला जायचे नाही म्हणून मी सरळ पुढे गेलो. दोन्ही बाजूला वाळू आणि दगडाचे पर्वत आणि मधी सिन्धु. खूपच छान नजारा होता. सिन्धु चांगला मोठ्या पात्रा तून वाहते. तिचा प्रवाह पण जोरात आहे. थांबून बघायला मजा वाटे.
ससपोल पासून २३ किलोमीटर पुढे नुरला आहे. साडे अकरा वाजता नुरला पार केले. नुरला ३००० मीटर उंचावर आहे. छोटंसं गाव आणि राहायला,खायला काही नाही. नुरला च्या पुढे 12 किलोमीटर वरती खालसी आहे. खालसी २९७८ मीटर उंचावर आहे. साहजिकच रस्ता मध्ये उतार आहे. पण एवढा पण नाय जेवढी मला अपेक्षा होती. एक वाजता खालसीला पोहोचलो.
खालसी मध्ये ढाबे, होटल व गेस्ट हाउस आहेत. धुळीमधेच गाडया उभ्या होत्या. लोक खाण्यासाठी थांबली होती. मी पण एका पंजाबी ढाब्या मध्ये जेवायला थांबलो आणि मस्त पैकी डाळ भाताचा आनंद घेतला. नऊ वाजता ससपोल वरून निघून एक वाजता ३५ किलोमीटर लांब खालसी मध्ये पोहोचलो होतो. जास्त उतार नव्हता आणि उन खूप होते म्हणून थकलो होतो. मागच्या १५ दिवसात आज पहिल्यांदाच ३००० मीटर च्या खाली आलो होतो. त्यामुळे गरम पण खूप होत होते. शरीर पण मी पूर्ण झाकून घेतले होते. सगळी समीकरणे माझ्या उलट होती.
दोन वाजता इथून निघालो. चांगला रस्ता मिळाला आणि उतार पण. दहा मिनिटात तीन किमी अंतर पार केलं. खालसी च्या तीन किलोमीटर पुढे एक फाटा फुटतो. तो रस्ता सरळ बटालिकला जातो. बटालिकला जाण्यासाठी परमिट घ्यावे लागते. त्याच रस्त्या वरती लद्दाख क्षेत्र मधील प्रसिद्ध गाव धा आणि हनु आहे. म्हणतात कि ते शुद्ध आर्य होते. तसे तिथे अजून बरीच सारी गाव आहेत पण या दोनच गावात जायला परवानगी आहे.
इथे एक चेकपोस्ट भेटला. कोण येत जात त्याची नोंद करावी लागते. मी पूर्ण झाकलेलो होतो. हवालदाराला सायकल वरून वाटले कि, मी विदेशी आहे. इंग्लिश मध्ये काही तरी बोलत विदेशी लोकांचं रजिस्टर माझ्या पुढे ठेवलं. मी अश्या लोकांची खूप मजा घेतो.
मी त्याला एकदम सरळ भाषेत सांगितले. - भाई, देस्सी रजिस्टर कित सै?
मग त्याचा चेहरा बघण्यासारखा झालता.
बटालिक वाला रस्ता सिन्धु च्या बरोबर उजव्या हाताला निघून जातो आणि आपला कारगिल वाला रस्ता सिन्धु पार करून जातो. मुख्य रस्त्या पासून खालसी ते कारगिल १३३ किलोमीटर आहे, तसेच बटालिक च्या रस्त्याने १५० किलोमीटर. मुख्य रस्त्यांनी दोन घाट लागतात. एक ४१०० मीटर व दुसरा ३८०० मीटर ऊंच. तसेच बटालिक च्या रस्त्यांनी एकच ४००० मीटर उंचीचा घाट लागतो. सगळी समीकरणे बटालिक च्या बाजूनी आहेत पण इथून पाकिस्तान ची सीमारेषा जवळ आहे. त्यामुळे कारगिल व श्रीनगर ला जाण्यासठी या रस्त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे. बटालिक ला जाण्यासाठी परमिट ची आवश्यकता लागते.
सिन्धु पार केल्यानंतर एक किलोमीटर पर्यंत रस्ता सिन्धुच्या बरोबरीने जातो. परत डाव्या हाताला वळतो. नदीच्या बरोबरीनेच जातो पण जमिनी मध्ये फरक दिसून येतो. आतापर्यंत मोठ्या रुंदीच्या घाटी मधून चाललो होतो. आता छोट्या रुंदीची घाटी सुरु होते. नदी च्या दोन्ही बाजूला उंच्या उंच पर्वत. त्याच्या बरोबर खाली रस्ता. कोणता दगड जरी पडला तरी सरळ रस्त्यावर. ह्याच दगडा मुळे काही ठिकाणी रस्ता उखडला होता. पाउस असता तर ह्याच रस्त्यांनी जायला भीती वाटली असती. आता काहीच भीती नव्हती. उलट आनंद होत होता. प्रत्येक नव्या वळणावर नवीन दृश्य.
माझ्या पुढे जाउन एक गाडी थांबली. त्यातून चार लोक बाहेर पडले. आणि फोटो काढू लागले मझे पण फोटो काढले. त्यांच्या जवळ गेलो तर मला थांबावेच लागले. पूर्ण कपडे अंगावर असल्या कारणाने त्यांनी मला विदेशी समझले. इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली. लवकरच समझले कि, भारतातील लोक सुद्धा असे करू शकतात. ते काही दिवस पूर्वी श्रीनगर वरून लेह ला गेले होते. आता परत येत आहेत. त्यांची तक्रार होती कि रस्ता खराब आहे. मी म्हंटले, मनालीच्या रस्त्यांनी आले असते तर, ह्याच रस्त्याला तुम्ही स्वर्ग म्हटलं असतं. असो ..खूप कौतुक केलं माझं.
रस्ता चढाईची होता. खूप थकलो होतो. घामाच्या धारा वाहत होत्या. त्यांच्या कडूनच पाणी घेतले. बाटली पण भरून घेतली. याच नदीच्या कडे कडेने जात असताना ६ किमी पुढे एक फाटा मिळाला. इथून मला नदीची सोबत सोडायची होती. फोतूला ची चढाई आता सुरु होणार होती. दुसरा रस्ता नदीच्या कडे कडेने गेला आहे. एक सूचना पाटी पण दिसली त्यावर लिहिले होते कि, वांगला- फोतोकसर-नेरक रोड. नेरक बघून मी ओळखले कि, हा रस्ता अजून बनत आहे. नेरक जांस्कर नदी च्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे अजून कोणताच रस्ता ह्या रस्त्याला मिळाला नाहीये.
इथून जी चढाई सुरु झाली. तिनी तर माझा जीवच काढला. दोन-तीन वळणे पण आहेत. थोड चालायचो ,थोडा थांबायचो. आता चार वाजले होते आणि लामायुरू पण जास्त लांब नव्हते. त्यामुळे उशीर झाला असता तरी चालले असते. रस्त्या मधेच ‘मूनलैण्ड’ लागलं. लामायुरू च्या आधी पर्वतांच्या आकृत्या एकदम वेगळ्या आहेत. असं म्हणतात कि, ह्या आकृत्या चंद्रावरच्या जमिनी सारख्या आहेत. ह्या पर्वता मध्ये मातीचे प्रमाण जास्त आहे तसेच हवेच्या आणि पाण्याच्या प्रवाहाने अश्या आकृत्या बनल्यात. त्या आकृत्या बघून माणूस आश्चर्य चकित होतो. परग्रहा वरती आल्या सारखे वाटते. आज अष्टमी होती. आणि योगायोगाने वरती चंद्र उगवला होता. त्यामुळे मूनलैण्ड वरती चंद्र पाहायला मिळाला. हे योगायोग समझा कि माझे नसीब!!
साढे पांच वाजता लामायुरू मध्ये प्रवेश केला. हे एक बौद्ध गांव आहे. आणि एक गोम्पा पण आहे. गोम्पा मध्ये पूजा होती. त्यामुळे लांबून लांबून श्रद्धालु आले होते. संध्याकाळ झाल्यानंतर परत परतीच्या प्रवासाला निघाले होते. गाडया आणि बस भर भरून लोक लामायुरू मधून परत येत होती. पूजा उद्या पण राहणार आहे. खूप गर्दी होती.
मला आज इथेच थांबायचे होते. आज ६१ किलोमीटर सायकल चालवली होती. जास्त करून चढाईच होती. लामायुरू ३४०० मीटर उंचावर आहे. पुढे फोतूला आहे. माझ्या जवळ लेह-श्रीनगर रस्त्याची कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे मला माहित नव्हते कि, फोतूला किती उंचावर आहे आणि इथून किती दूर आहे. एकाला विचारले तर, त्याने दहा किमी सांगितले. मग विचर केलं कि, आजच फोतूला पार करतो. मग उतार मिळेलच. खारबू ला जाऊन रात्री थांबतो. परत विचार केला कि,फोतूला दहा किलोमीटर आहे. मला तीन तास लागतील पार करायला. आता साढे पांच वाजलेत. फोतूला ला पार करायला रात्र होईल. नाही, आज लामायुरू मधेच थांबतो.
एका गेस्ट हाउस मध्ये गेलो. एक खोली पंधराशे रुपयाला. दुसरी कडे गेलो तर बाराशे ला. माझी तर झोपच उडाली. पूजा असल्याने आज लामायुरू इतकं महाग होतं. खायला पण काही नाही भेटलं. पुढे जाण्याशिवाय काही पर्याय नाही. पुढे गेलो. इथून पुढे चढाई तर आहे. पण वळण नाही. आता मन पण तयार झाले होते. पुढे जायला. दहा मिनिटात एक किलोमीटर पुढे जाऊ लागलो.
चार किलोमीटर पुढे गेल्यावरती मोटरसायकल वाले भेटले. मी एकाला विचारल, फोतूला किती लांब आहे. तो म्हणाला कि, फक्त चार किलोमीटर. मी खूप खुश झालो. आजच फोतुला पार करणार. जास्तीच जास्त एका तासात फोतुला पार होऊन जाइल. एकदम जोश मध्ये पैन्दल मारू लागलो.
चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर बघितले कि, रस्ता पुढे जाउन वळतो आणि लगेच गायब होतो. आशा होती कि, तिथेच फोतुला असणार. मनात म्हटलं, " बेटा फोतूला, आज तुझे फतह करने की उम्मीद नहीं थी. आज तो मैं लामायुरू में रुकने वाला था. तू लेह-श्रीनगर रोड पर सबसे ऊंचा दर्रा है. देख, लेह से चलने के दो दिन बाद ही तुझे पार करने वाला हूं." नंतर सायकल पुढे दामटली.
पण त्या वळणावर गेल्यावर मी हैरान झालो. फोतूला वोतूला काहीच नव्हतं तिथे. लांब कमीत कमी सात ते आठ किलोमीटर रस्ता दिसत होता. ते पण एकावर एक वळण घेत. मी ह्याच वळनांना फोतुला समजून बसलो होतो. वळणे तर पुढे आहे. जी माझी यायची वाट बघत आहेत. मी त्या मोटारसायकल वाल्यांना पक्या शिव्या घातल्या. ज्यांनी सांगितलं होतं कि फोतुला फक्त ४ किमी आहे.
शरीर पण गळून गेलं होतं. पुढे जाऊ नको म्हणून सांगत होतं. लामायुरू पासून बरोबर नऊ किलोमीटर वरती एक ओढा आहे. ह्याच्याच किनार्यावरती बीआरओच्या काही मशिनी आहेत. त्यांच्या निगराणी साठी एक लद्दाखी उभा केला होता. त्याच्या साठीच एक छोटंसं शेड होतं. मी त्याच्याच जवळ टैण्ट लावायचा निर्णय घेतला. तो लामायुरू चा गाववाला होता. टैण्ट लावण्यासाठी त्यांनी मला साथ दिली. टैण्ट लावल्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला. सकाळी माहित पडले कि, पूर्ण रात्र त्याची चौकीदारीची ड्यूटी होती. बघा आता !! पण त्याच्या जाण्यामुळे माझं एक नुकसान झालं. पूर्ण रात्र त्या सन्नाटेच्या काळोखात एकट्यालाच काढावी लागली. तिथे या साठी थांबलो कि, हा पण माझ्या सोबत असेल. पण तंबू लावून बाबा पळाला कि. या आधी गुलाबा मध्ये थांबलो तेव्हा शेजारीच बीआरओ वाले होते. त्यानंतर नकीला च्या जवळ तंबू लावला तेव्हा सचिन होता. इथे मात्र मी एकटाच.
मला अश्या ठिकाणी भूतांची भीती वाटते. काळोखात बाहेर येउन बघितलं तर लांब लांब पर्यंत कोणीच नव्हते. अश्या वेळेस तर मला चारी बाजूनी भूतेच दिसू लागतात. मनाला माहिती आहे कि, भूत भीत काही नसतं. पण अशी वेळ आली कि चांगलीच फाटते. दिवसा मी सिद्ध करू शकतो कि, भूत भीत काही नसते. पण अश्या शांत रात्री एकटे असताना.... सिद्ध करायचे तर बाजूलाच राहिले. विचार करूनच भीती वाटते. तंबू लावल्या नंतर जे मी स्लीपिंग बैग मध्ये घुसलो. सकाळ होई पर्यंत डोळे उघडलेच नाही.
आज 70 किलोमीटर सायकल चालवली.
ससपोल गांव
ससपोल च्या जवळ सिन्धु
सिन्धु च्या बरोबरीने राजमार्ग-1
खालसी मधे एक पुल
खालसी मधेच पुला वरती पुल
खालसी च्या तीन किलोमीटर पुधे फाटा.
सिंधू नदी सोडल्या नंतर आपण या छोट्या घाटात प्रवेश करतो.
नदी पार करण्याची कसरत !!
हा बघा विदेशी!!
लामायुरु कडे
खालुनच वरती आलोय. ह्या चधाईनी तर जीव घेतला.
लामायुरू च्या आधी ‘मूनलैण्ड’ आहे.
मूनलैण्ड
आज अष्टमी होती. वरती चंद्र उगवला होता. त्यामुळे मूनलैण्ड वरती चंद्र पाहायला मिळाला. हे योगायोग समझा किवा माझे नसीब!!
मूनलैण्ड चे जबरदस्त फोटो
हे चित्र मला स्वप्नातल्या एका नगरी सारखे वाटते.
लामायुरू मधे आपल स्वागत आहे.
लामायुरू मधे जत्रा
बाय बाय !! लामायुरू .. परत भेटुया !!
लामायुरू च्या पुधे
(क्रमशः)
प्रतिक्रिया
12 Feb 2016 - 6:18 pm | चांदणे संदीप
आई शप्पथ!
मस्तच! जगात भारी!
12 Feb 2016 - 6:27 pm | चांदणे संदीप
अच्कुली लेखन, प्रवास, फ़ोटो इतकं सुंदर झाल आहे की प्रतिसाद नेमका कशावर लिहावा हाच प्रश्न पडल्याने आतापर्यंत सविस्तर प्रतिसाद लिहिणे झाले नाही. आताही ते शक्य नाहीच!
फक्त जाता जाता एवढ नमूद करून जातो की खालून सातव्या फ़ोटोत मला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दूदूदूदूदू.....दिसलं आहे!!! \o/ \o/ \o/ \o/
बाकी, राजकुमार१२३४५६ लौ यू!
कभी पूना आये तो मिलना....मिल बैठेंगे....भूत-वूत का डर निकाल दूंगा यार! :)
Sandy
12 Feb 2016 - 6:24 pm | वेल्लाभट
सॉलिड ! एकदम सॉलिड
जबरा आहेस भौ.
12 Feb 2016 - 6:38 pm | एस
भारी!
12 Feb 2016 - 6:52 pm | यशोधरा
भारी! अफाट!
12 Feb 2016 - 9:03 pm | मयुरMK
जिद्द ................ __/\__
12 Feb 2016 - 9:56 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर.
हळूहळू लडाखचा रखरखीतपणा थोडासा कमी कमी होऊन मधूनच काश्मीर खोऱ्याची हिरवाई दिसायला लागली आहे.
12 Feb 2016 - 11:08 pm | पिलीयन रायडर
Kay foto aahet!!!!!!