उप्शी सिन्धु नदीच्या किनारी आहे. एक रस्ता सिन्धु nadi बरोबर वरती जातो. तर दुसरा रस्ता २०० किमी पुढे जाउन चीन सीमारेषे वरती हनले गावात जाऊन मिळतो. तिथे आपला एक मित्र मिलिट्री मध्ये आहे. त्याला मी सांगितले होते कि, मी तुला भेटायला येणार आहे. पण हि प्रवासाला निघण्याच्या आधीची गोष्ट आहे. आता ५ घाट पार करून इतका जीव गेला कि अजून २०० किमी नाही जाऊ शकत. आणि ह्या रस्त्या वरून जाण्यासाठी लेह मधून परमिट घेणं आवश्यक आहे.
उप्शी मध्ये १०० रुपयाला एक बिस्तर मिळालं. त्याच बरोबर मोबाइल व कैमरे चे चार्जिंग पण फुल झाले.
आज मी ६५ किलोमीटर सायकल चालवली.
दिवस चौदावा
सात वाजता उठून बगितलं तर माझ्या रूम मध्ये अजून काही लोकं झोपली होती. माहिती पडले कि,ते मनालीला चाललेत. रात्री ते उप्शी वरून चालले होते, तेव्हा पुलिसानी अडवले. आणि सांगितले कि पुढे रस्ता बंद आहे. मजबुरीमुळे रात्रभर इथेच राहावे लागले. बाहेर बघितला तर बैरियर लावलं होतं आणि गाड्यांची लाइन पण होती. लेह वरून दिल्लीला जाणारी बस पण इथेच उभी होती.
तंगलंग-ला वरती दोन दिवसापासून बर्फवृष्टी होत आहे. मी पण बर्फातच पार केलं होतं. आज मौसम अजूनच बिघडलं,म्हणून रस्ता बंद केला. आता असे म्हणतात कि, तंगलंग-ला वरून दुसरी गाडी आली तर इथून तिकडे जायला गाड्या सोडणार. आणि मला एक भीती पण आहे कि, इथून रूमसे पर्यंत चा रस्ता खूप खतरनाक आहे. रस्ता उंच उंच पर्वतामधून जातो. जर रात्री पाउस पडला असेल तर नक्कीच कुठेतरी दरड पडली असेल. त्यामुळेच उप्शी पर्यंत गाड्या थांबवल्यात. माहिती नाही तंगलंग-ला कधी उघडणार आणि उघडला तरी २ तासाने इथे गाडी पोहोचणार. तेव्हाच उप्शी वरून गाड्या पुढे हलतील.
सव्वा दहा वाजता उप्शी वरून निघालो. रस्ता सिन्धु च्या उजव्या किनाऱ्याच्या बरोबरीने जातो. कारु इथून 14 किलोमीटर आहे. आणि मला माझे एयरटेल चे नेटवर्क पण भेटणार आहे. घरच्यांना कुणालाच माहित नाही कि, मी कुठे आहे , कसा आहे आणि मला पण माहित नाही कि, दुनिया मध्ये काय चाललंय. कारू मध्ये माहिती पडेल.
पांच कैनाडा चे सायकलवाले भेटले. मनाली वरून येत होते आणि लेह ला चालले होते. त्यांच्या घातलेल्या कपड्यावरून ओळखले कि, हे परफेक्ट साइकिलिस्ट आहेत. रात्री लातो मध्ये थांबले होते.
कारु मध्ये मोठा सैनिकांचा अड्डा पण आहे. रस्ता एकदम उताराचा होतं. त्यामुळे कुठे थांबायची गरजच पडली नाही.
कारु मध्ये प्रवेश करायच्या आधी एक रस्ता सिन्धु नदी पार करून हेमिस ला जातो. हेमिस मध्ये लद्दाख भागातील सर्वात मोठा गोम्पा आहे. मला वाटले कि, तिकडे जावे. पण बघितलं कि, हेमिस ला जाण्यासाठी सिंधू पार करून पहिले चढ चढावा लागतो. म्हणून तिकडे जाण्याचे टाळले.
बारा वाजता कारूला पोहोचलो. इथून पेंगोंग तलावाला जाण्यासाठी रस्ता फुटतो. मोटारसायकल वाल्यांची गर्दी झाली होती. चांग-ला बन्द आहे, म्हणून सगळ्यांना इथे थांबून धरले होते.
नेटवर्क मिळाले. मग पहिल्यांदा घरच्यान बरोबर बोलून घेतलं. माहिती पडले कि, उत्तराखण्ड मध्ये जोराचा पाउस आहे. ढगफुटी पण झालीय. केदारनाथ आणि गंगोत्री मध्ये खूप मोठं नुकसान झालंय. घरचे पण चिंतीत होते कि, तिकडे पण असेच झाले काय. मी म्हटले कि, नाही. लदाख मध्ये जास्तीच जास्त बर्फ पडेल ते पण उंच घाटावरती. ह्याच्या पुढे काहीही व्हायची अपेक्षा नाही. माझ्या बरोबर बोलून त्यांना हायसे वाटले. मला भीती होती ती, परतीच्या प्रवासाची. हिमालयाच्या पडयालचा तर, मला भरोसा आहे. व्यवस्थित पर्यंत जोजीला पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर हिमालय सुरु होतो. मान्सून पावसाने उत्तर भारतावरती पण कब्जा केला आहेच. मला पण तो त्रास देऊ शकतो. श्रीनगर ते जम्मू. 300 किलोमीटर चे अंतर मला बस ने करायचे आहे. जर तिथे पण पाउस असेल तर तो पण रस्ता बंद होऊ शकतो.
मी जेव्हा प्रवासा वरती असतो, तेव्हा खाण्या बरोबरच कोल्ड ड्रिंक घ्यायचं पण पसंद करतो. आत्ता पर्यंत मला १० रुपये जास्त भावाने घ्यावे लागत होते. आता एक रुपया पण फालतू नाही. तीस रुपये म्हणजे तीस रुपये। मनाली मध्ये पस्तीस ला मिळाली होती. मी विचारले तर म्हणाला, "भाई पहाड है, महंगी हो ही जाती है आते आते." मग कारू पर्यंत तर १०० ची व्हायला पाहिजे होती. लद्दाख मध्ये बनलेली नव्हती ती. खालीच बनलेली होती.
साडे बारा वाजता कारू वरून निघालो. लेह अजून सुद्धा ३५ किलोमीटर आहे. आजच लेह ला पोहोचायचे आहे. स्टैक्ना दस किलोमीटर वर आहे. किलोमीटर च्या दगडा वरती जास्त करून इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. कधी कधी हिन्दी मध्ये पण बघायला मिळते. स्टैक्ना (Stakna) ला सटकना लिहेलल बघून हसायलाच आलं. स्टैक्ना मध्ये गोम्पा पण आहे. मला तर अजिबात इच्छा राहिली नाही बघायची. फक्त लेह ला पोहोचायचे आहे बस!! प्रवासाचा एक भाग संपवायचा आहे.
दीड वाजता स्टैक्ना पार केले. इथून ३ किमी पुढे रणबीरपुर आहे. बौद्ध चा देश असून सुद्धा हिन्दू नाव ऐकून आश्चर्य वाटलं. मग आठवलं कि, १९३३ कि राहुल सांकृत्यायन नि पण आपल्या लद्दाख यात्रे मध्ये या ठिकाणाचा उल्लेख केला होता. रणबीरपुर मध्ये मुसलमान सुद्धा पाहायला मिळाले.
रणबीरपुर च्या तीन किलोमीटर पुढे ठिक्से आहे. ठिक्से पण आपल्या गोम्पा मुळे प्रसिद्ध आहे. दोन वाजता ठिक्से ला पोहोचलो तेव्हा इच्छाच नव्हती सायकल वरून उतरण्याची. बसूनच गोम्पा चा एक फोटो काढला आणि पुढे निघालो.
जानेवारी महिन्या मध्ये जेव्हा लद्दाख ला आलो होतो तेव्हा ठिक्से ला यायची खूप इच्छा होती. शे पर्यंत आलो होतो पण बस नाही भेटल्याने त्याच्या चार किलोमीटर पुढे ठिक्से पर्यंत येत आले नाही. आज आलो पण होतो. गोम्पा ला बघण्यासाठी वेळ पण होता. पण मनच करत नव्हतं सायकल वरून उतरण्याचे.
कारू नंतर सारखी लोकं वस्ठी पाहायला मिळते. छोटे मोठे गांव पण रस्त्या मध्ये येतात. सिन्धु नदीच्या पाण्याचा उपयोग करून हा भाग चांगला हिरवेगार केला आहे. चारी bajuni ओसाड जमीन आणि मधेच हिरवळ पाहून मन प्रसन्न होते. जानेवारीत आलो होतो तेव्हा झाडांची पाने झडून गेली होती. झाडे हाडांच्या सापळ्या सारखी दिसत होती.
शे मध्ये प्रवेश केल्यानंतर ते ठिकाण पाहायला मिळाले, जिथे जानेवारीत पूजा चालली होती. त्यानंतर शे पैलेस तेव्हा खाली होते आणि आता पर्यटकांनी भरून गेले होते. शे पैलेस समोर भरपूर गाड्या उभ्या होत्या तसेच काही दुकानें पण होती. मी बाहेरूनच एक फोटो काढला आणि आपल्या मार्गाला निघालो.
सिन्धु घाटावरती धूळच धूळ होती. नवीनीकरनाचे काम चालू होते. दोन दिवस आधी इच्छा होती कि सिन्धु घाता वरती काही वेळ काढू, पण आता खूप घाई झाली होती लेह ला पोचायला.
चोगलमसर मध्ये ट्राफिक तुंबला होतं. जानेवारी महिन्या मध्ये पण इथे गर्दी होती आणि आता पण होती. व्हिस्की ओढ्या वरचे सेरिंग साहेब आठवले. ते इथलेच राहणारे होते. त्यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिलं होतं. फोन नम्बर पण दिलं होता. त्या वेळेसच ठरवलं होतं कि नाही जाणार म्हणून. शेवटी नाही गेलो.
जेल च्या समोर काही वेळ थांबलो. मी जानेवारी महिन्यामध्ये भरपूर दिवस काढले होते. माझा भाऊ विकास हा सीआरपीएफ मध्ये आहे. आणि त्याची त्यावेळेस पोस्टिंग इथेच होती. आता इथे नाही तो. त्यामुळे हि जागा पण माझ्या काही कामाची नव्हती. जेल च्या पुढे गेल्यावर थोड चढ लागला. मी तंगलंग-ला पार केल्यावर खालीच चाललो होतो. विसरून गेलो होतो कि चढ काय असतो ते. ह्या दोन ते तीन किलोमीटर च्या चढाई मुळे खूपच त्रास झाला. ह्याच चढाई वरती मागे वळून पहिले तर खूपच सुंदर दृश्य पाहिला मिळते. पण ह्या वेळेस सगळा सुखल होतं. जानेवारी महिन्या मध्ये कोपर्य कोपर्य मध्ये बर्फ होता. त्यामुळे हाच नजारा बघायला मजा यायची. आता तेवढी मजा नाही आली. हा. दोन दिवसापासून उंच पर्वतावर्ती बर्फ अवश्य पडलाय.
चार वाजता लेह च्या मुख्य चौकात येउन पोहोचलो. इथून उजव्या बाजूने एक रस्ता श्रीनगर ला जातो. मला माहित होते कि, लेह मध्ये घुसल्यावर परत चढ लागणार आहे. त्यामुळे विचार केला कि, विमानतळाच्या बाजूला वळू. तिथेच रस्त्या मध्ये एखादे होटल बघून थांबूया. परत मनात विचार आलाकी, नको. आज लेह्लाच थांबूया. प्रवासाचा पाहिला टप्पा तर संपत आलाय. मग का नाही लेह ला थांबून पार्टी करूया. उद्या परत दुसरा हिस्सा सुरु होणार आहे. लेह ते श्रीनगर चा. मग मी सायकल लेह शहराकडे वळवली. चढ आहे. हॉस्पिटल पर्यंत, मी सायकल चालवली. पुढे नाही चालवू शकलो. खूपच चढ आहे. पायाने चालत गेलो. लेह च्या आतील रस्त्या बद्दल मला खूप माहिती आहे. टैक्सी स्टैण्ड पासून हा रस्ता तीन हिस्या मध्ये वाटला गेलाय. उजव्या हाताचा रस्ता मुख्य बाजार कडे जातो. तसाच पुढे सरळ शान्ति स्तूपा कडे जातो. दुसरा थोडा उजव्या बाजूला डीसी ऑफिस कडे आणि तिसरा खारदूंग-ला ला.
मी टैक्सी स्टैण्ड च्या जवळ एका होटल मध्ये खोली बघितली. गीजर ची खूप गरज होती. त्यांनी सांगितले उद्या दुपारीच पाणी येणार. भाडे सातशे रुपये. मला गीजर पाहिजे होता. सातशे रुपये देऊन सुद्धा गिजर मिळत नसेल तर काय फायदा. ती खोली सोडून दिली. त्यानंतर मी मुख्य बाजारा कडे गेलो. बाजार पार केल्यानंतर एक छोटी बोळ लागली. तिथे आकर्षक गेस्ट हाउस च्या जाहिराती पाहायला मिळाल्या. सहाशे रुपयात एक खोली भेटली. गीजर इथे पण नाही भेटला पण म्हणाले कि, सकाळी सात ते अकरा वाजता गरम पाणी मिळेल. त्यांनी सांगितले कि,लेह मध्ये कुठेच गीजर नाहीं. त्याच्या जागी लाकडापासून पाणी गरम करायची सिस्टीम आहे. तुमच्या बाथरूम मध्ये स्वतः ते पाणी येत राहील. मी इथेच थांबलो.
किती तरी दिवसानंतर आरसा पाहायला मिळाला. मी आरश्यात बघितलं. म्हटलं, हा कोण आहे? माकड पण ह्याच्या पेक्षा चांगले दिसतात. दाढी खूप वाढली होती. म्हटला चला.. न्हाव्या कडे जाउन सपाट करून येऊ. मग न्हाव्या कडे जाउन सपाट करून आलो. चेहरा कला पडला होतं. हीच तर लदाख ची निशाणी आहे. आता इथून पुढच्या प्रवासात झाकून ठेवणार आणि काळजी घेणार. दिल्ली ला गेल्यावर वाटले पाहिजे कि, जास्त नाही बिघडला. सगळ्यात जास्त नुकसान, नाकाचे झाले होते. जळून कातडं निघालं होतं.
मी लेहला तीन दिवस उशिराने पोहोचलो होतो. एक दिवस तर रोहतांग च्या आधीच खराब गेला होत. त्या दिवशी तर, दिवसभर गुलाबा ते मढी १३च किलोमीटर सायकल चालवली होती. दूसरा दिवस व्हिस्की ओढ्या वरती खराब हवामाना मुळे वाया गेला. जास्त उंची मुळे 11 किमी च्या पुढे जाऊ शकलो नाही. आणि तीसरा दिवस तंगलंग-ला वरती वाया गेला. दहा दिवसात लेहला पोहोचायचे होते पण लागले 13 दिवस.
खारदूंग-ला म्हणजे जगमाधला सगळ्यात उंचीवर असणारा रस्ता. तिथे जायची खूप इच्छा होती. पण मी आता आहे 3400 मीटर उंचीवर. खारदूंग-ला इथून 40 किलोमीटर पुढे आहे. लेह पासून 2000 मीटर उंच. म्हणजे 40 किलोमीटर मध्ये 2000 मीटर वरती चढायचे होते. हि काय सोपी गोष्ट नाही. नको जायला खारदूंग-ला ला. त्यात हवामान पण खराब झाला होतं. आणि आता खारदूंग-ला पण बंद असेल.
होटल वाला माझ्या ह्या प्रवासा बद्दल विचारपूस करत होता. मी त्याला विचारले कि, अजून पर्यंत मला रस्ता खूपच खराब मिळालाय. इथून पुढे कसा आहे? म्हंटला खूपच चांगला. रस्त्या मध्ये तुम्हाला गाव पण भेटतील. उद्या आरामशीर कारगिल पर्यंत जासाल. मी म्हंटला, "नहीं भाई, साइकिल है, मोटरसाइकिल नहीं. तीन दिन लगेंगे कारगिल पहुंचने में. शायद चार दिन भी लग जायें."
त्याने असं माझ्या तोंड कडे पाहिला कि, हा असा कसला सायकलवाला. म्हणे चार दिवस लागतील कारगिल ला.
लेह शहरामध्ये फिरण्याची इच्छा नव्हती. जानेवारी मधेच फिरलो होतो. त्यावेळेस गल्ली बोलात बर्फ होता. चालायला पण भीती वाटायची. कधी घसरून पडतोय. ती भीती आता नव्हती. लेह ला एक हि फोटो काढला नाही. माझ्या जेव्हा मनात येईल तेव्हाच काढतो. नाही आले तर नाही काढत. खोली मध्ये तव लावलं होता. केदारनाथ च्या बातम्या दाखवत होते.
पहिल्या टप्प्या मध्ये ४७४ किलोमीटर चे अंतर मी पार केले. त्याच बरोबर पाच घाट पण पार केले. चांगला रस्ता थोड्याच ठिकाणी भेटला. जास्त करून खराबच मिळाला. लांब लांब पर्यंत गावच भेटले नाही. तरी पण जास्त काही अडचण न येता, हे अंतर पार केले. हे माझे मोठं यश आहे. म्हणून मी माझा, माझ्यावरच गर्व करतोय.
आज ४९ किमि सायकल चालवली
उप्शी मध्ये लावलेला बैरियर आणि गाड्यांच्या लाईनि
उप्शी मध्ये हिमाचल परिवहन ची लेहवरून दिल्लीला जाणारी बस.
उप्शी च्या जवळ पेट्रोल पम्प
सिन्धु नदीच्या बरोबरीने लेह कडे
हे लाईट चे खांब बघून मला मजा वाटत होती
कनाडा सायकलवाला लेह कडे
कारु पाशी लावलेला एक दगड
कारू
स्टैक्ना गोम्पा
मनाली पासून ४५० किमी लांब
हिरवळ बघून वाटत नाही कि हे लदाख आहे.
ठिक्से गोम्पा
चोगलमसर
लेह मध्ये आपले स्वागत आहे.
लेह चा मुख्य चौक
लेह शहराचं प्रवेशद्वार
(क्रमशः)
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 5:17 pm | पिलीयन रायडर
हा ही भाग उत्तम!!
10 Feb 2016 - 5:33 pm | यशोधरा
मस्त! सिंधू नदी!
10 Feb 2016 - 5:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं रंगत आलीय सहलीत (वाचायला आणि फोटो बघायला... सायकल चालवताना काय हालत झाली असेल याचा केवळ अंदाजच बांधू शकतो :) )
10 Feb 2016 - 5:56 pm | एस
मस्त वर्णन!
10 Feb 2016 - 10:02 pm | प्रचेतस
सलाम तुमच्या जिद्दीला.
एक टप्पा पूर्ण झाला. पुढच्या टप्प्याची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहात आहोत.
10 Feb 2016 - 10:14 pm | प्रीत-मोहर
मस्त लेखमाला . पु भा प्र
10 Feb 2016 - 10:20 pm | पैसा
अद्भुत आहे हे सगळं!
11 Feb 2016 - 11:53 am | मयुरMK
प्रत्येक भाग पुढील भागाची उत्सुकता वाढवतोय........