लद्दाखी गुराखी ते पण घेऊन जातील. मी नको म्हटले. मनात म्हटले कि, साले तुम्हीच चोर आहात आणि दुसऱ्याच सांगता. ते तर डोंगर भागातले आहेत. त्यांना चोरी करता येत नाही.
आयुष्यात पहिल्यांदाच ५१३० मीटर उंचा वरती झोपत होतो. तुमच्या पैकी तर ९०% लोक एवढ्या उंचावर गेले पण नसतील. ह्या भागात फोटो कमी आहेत. कारण हि तसेच आहे सकाळ पासून जितका चाललोय तेवड्या बर्फाच्या थंड हवेतच चाललोय. हाथ मौजे काढून,कैमेरा चालू करण्याचा प्रश्नच नाही.
आज फक्त १९ किमी सायकल चालवली.
दिवस तेरावा
सकाळी ७ ला आवाज ऐकून जाग आली. बाहेर बघितलं तर बर्फ होता. म्हणजे रात्री बर्फवृष्टी झाली होती. कामगारांनी तर अजून वाढून सांगितलं कि, खूप बर्फ पडलाय. मी बाहेर येउन बघितलं तर दोन इंच पेक्षा जास्त नव्हता. तंगलंग-ला इथून जास्त दूर नाही त्यामुळे तिथे पण जास्त बर्फाची शक्यता नव्हती. जुन्या झालेल्या बर्फावरती चालायला अवघड असतं. पण नुकत्याच पडलेल्या बर्फावरती नाही. इय्हे फक्त २ इंचचं बर्फ पडला होता आणि रस्त्यावरती अजिबात नव्हता. जो थोडाफार होता तो गाड्यांच्या टायर खाली येउन संपला होता. माझ्यासाठी हि चांगली गोष्ट होती.
सायकलवर थोडा बर्फ पडला होता. हातानी तो झटकला. सामान सायकल वर टाकले. सव्वा आठला तिथून बाहेर पडलो. नाश्ता पाणी तर विचारूच नका. पाण्याची बाटली मात्र आठवण करून भरून घेतली. माझी प्रत्येक गोष्ट कामगारा साठी एक तमाशाच होता. उठल्या पासून तर निघे पर्यंत कुणी कौतुक केलं नाही कि, मला निरोप पण दिला नाही. असो. माझी सायकल यात्रा त्यांच्या साठी एक फुकटचा टाईमपास असेल.
रस्त्यावर चिखल झाला होता. पाणी पण जमले होते. जास्त वेळ सायकल नाही चालू शकलो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ५१३० मीटर वर संपूर्ण रात्र काढून सुद्धा शरीर अनुकूल झालं नव्हतं. त्यात भूख पण लागली होती. मला जेवण करून २४ तास झाले होते. सायकल वरून उतरलो आणि पायाने चालू लागलो. चप्पल व मोजे किती वेळ पायाचे रक्षण करतील. मौजे पाण्याने भिजले. त्यामुळे पायाची बोटे सुन्न झाली. रस्त्यावरून चालताना दोनच विकल्प होते. एकतर चिखलातून चला किंवा बर्फातून. मी दुसरा विकल्प निवडला.
बर्फामुळे डोंगर झाकून गेले होते. बर्फ फक्त वरतीच पडला होता. खाली अजून आला नव्हता. मी आता इतल्या उंचा वर आलो होतो कि, ५० किमी लांब पसलेले मोरे मैदान शेवट पर्यंत बघू शकत होतो. बकरी चारणारे मेंढपाळ तर लांबून ठिपक्या सारखे दिसत होते.
लांब मागे एक जनावर येताना दिसले. शरीर तर कुत्र्यासारखा दिसत होतं पण लद्दाखी कुत्रे हे तंदुरुस्थ असतात. हा तर हाडांचा सापळा दिसत होता. वेगाने माझ्याकडे येत होता. शेपटी लांब होती. नंतर वाटले कि नक्कीच लांडगा असेल. लढाख मध्ये लांडगे पण असतात. माझी बोटे सुन्न झाली होती तरी पण हातात दगड घेऊन त्याची जवळ यायची वाट बघू लागलो. पण माझ्या ‘फायरिंग रेंज’ मध्ये यायच्या आत मधेच डोंगराच्या बाजूला पळाला. डोंगरावरती झाडे झुडपे नसल्याने खूप लांबवर जात पर्यंत दिसत होता. तेव्हा कुठे हायसे वाटले.
दोन ट्रक उभे होते. एकाला स्टार्ट करण्यासाठी धक्का मारण्याची आवश्यकता होती. मला बघितल्यावर एक जण बोलला," भाई, जरा धक्का लगवा देना." मग आम्ही चार पाच मिळून धक्का मारू लागलो. ट्रक रिकामा होता. तरी पण तो थोडा सुद्धा हलत नव्हता. धक्का मारताना दम लागायचा. तीन चार वेळा सगळ्यांनी मिळून जोर लावला पण काहीच उपयोग झाला नाही. सगळे तिथून हटले. मी मोबाइल वर जीपीएस ने उंची मोजली तर ती होती.- 5250 मीटर. आहा! मी माझंच 5200 मीटर पर्यंत चढायचं रिकार्ड मोडलं होतं. आता थोड्या वेळात तंगलंग-ला पोहोचेन तेव्हा नवीन रिकार्ड होईल.
तंगलंग-ला -१७५८२ फुट म्हणजेच ५३५९ मीटर. त्या पाटीच्या खाली लिहिलं आहे ५३२८ मीटर पण माझं जीपीएस सांगतंय कि ५३११ मीटर. आता यातलं खर कुणाचं मानायचं. मी तर माझ्या जीपीएस वरतीच भरोसा ठेवणार. - ५३११ मीटर. आता बघूया हेच रिकार्ड कधी तुटणार ते. इथ एक मंदिर आहे. तसे प्रत्येक घाटावरती असतात. पण इथले मंदिर खूप मोठे आहे. पक्कं बांधलेले आहे. पण छप्पर बरोबर नाही. काल जो बर्फ पडलेला होता. तो मंदिराच्या आत मध्ये पण भेटला. हे सर्व धर्म मंदिर आहे. सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. इथे मक्का मदीना पासून ईसा मसीह, बौद्ध, जैन, नानक, गोविन्द सिंह सर्व आहेत. ३३ करोड मधले पण काही देव आहेत. पण सगळया मध्ये वर्चस्व आहे ते महादेवाचे.इथे भरपूर वेळ बसण्याची इच्छा होती. खूप थकलो होतो जसे मंदिराच्या पायरी वर बसलो तसे कळले कि पायऱ्या खूपच थंड आहेत. इथे जास्त वेळ बसू नाही शकत. तितक्यात एक लद्दाखी आला. जुले जुले झालं. त्याने तिथं पडलेला एक झाडू उचलला आणि पायऱ्यावर पडलेला बर्फ झाडू लागला.
आता सायकल वर बसायची पाळी होती. इथपर्यंत तर पायांनीच आलो होतो. जसा सायकल वर बसलो पैडल वर पाय ठेवला. सायकल पुढे गेलीच नाय. पैडल कुठे तरी अटकला होता. खाली उतरून पहिले तर चेन वरती बर्फ साचला होता. हा कच्चा बर्फ नव्हता. कठीण बर्फ होता. दोन्ही पैडल च्या मध्ये साचला होता. मी चिखलातून सायकल चालवीत आणली होती तेव्हा चैन वरती पाणी पडले आणि त्याचा बर्फ झाला. एक दगड घेऊन बर्फ फोडला तेव्हा कुठे चैन फिरू लागली.
तंगलंग-ला च्या पुढे तीन किलोमीटर पर्यंत रस्ता खूप खराब आहे. नंतर चांगला रस्ता सुरु होतो. तंगलंग-ला पासून रूमसे ३२ किलोमीटर आहे. पूर्ण रस्ता उताराचा आहे. इथ पर्यंत येईस्तोवर न भूख लागली न तहान. रूमसे ला यायला दोन तास लागले. रूमसे ४२०० मीटर वर आहे. आता गरम व्हायला लागले होते. अंगावरचे काही कपडे मी काढून ठेवले. इथे भरपूर जेवलो. काल पासून भुकेला होतो.
रूमसे च्या मागे 250 किलोमीटर वरती दारचा आहे. दारचा आणि रूमसे च्या मधी कोणतेच गांव नाही. हां, सरचू नदी च्या दूसर्या बाजूला मात्र गांव आहे. ते बौद्ध गांव आहे. छोटासा गोम्पा पण पाहायला मिळतो. किती ओसाड आणि निर्मनुष्य भाग आहे हा. चार मोठ मोठे घाट आहेत. रस्ता उघडला कि हे हिमाचली, लद्दाखी आणि नेपाली लोक इथे ठीक ठिकाणी तात्पुरते तम्बू लावतात. नाहीतर इथून प्रवास करायचा, मुश्किल झाला असता. सरचू आणि पांग मध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या तम्बू कोलेनि आहेत.
तंगलंग-ला वरून येणाऱ्या नदी बरोबर रस्ता पुढे जातो. रस्त्या मध्ये ग्या, लातो, मीरु अशी गांव येतात. इथ पण सरळ उंच उभे असलेल्या पर्वतातून जातांना अंगावर काटा उभा राहतो. लेह वरून रूमसे ला लाईट च्या तारा गेल्या आहेत. त्या बघायला पण वेगळीच मजा येते. ते बघू वाटत राहते कि जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
साढे चार वाजता उप्शीला पोहोचलो. वातावरण पण खूप खराब झालं होतं. आजच कारु पर्यंत जायची इच्छा होती. जे इथून 14 किलोमीटर पुढे आहे. पण नाही जाऊ शकलो. कारु मध्ये एयरटेलचं नेटवर्क चांगल काम करतं. आठ दिवस झाले शेवटचं नेटवर्क केलांग मध्ये आलं होतं. घरच्यान बरोबर बोलायची खूप इच्छा झाली होती. पण आज उप्शी मध्ये थांबावे लागणार होते. त्यामुळे हा उतावळे पणा अजून एक दिवस पुढे लांबणार होता.
उप्शी सिन्धु नदीच्या किनारी आहे. एक रस्ता सिन्धु nadi बरोबर वरती जातो. तर दुसरा रस्ता २०० किमी पुढे जाउन चीन सीमारेषे वरती हनले गावात जाऊन मिळतो. तिथे आपला एक मित्र मिलिट्री मध्ये आहे. त्याला मी सांगितले होते कि, मी तुला भेटायला येणार आहे. पण हि प्रवासाला निघण्याच्या आधीची गोष्ट आहे. आता ५ घाट पार करून इतका जीव गेला कि अजून २०० किमी नाही जाऊ शकत. आणि ह्या रस्त्या वरून जाण्यासाठी लेह मधून परमिट घेणं आवश्यक आहे.
उप्शी मध्ये १०० रुपयाला एक बिस्तर मिळालं. त्याच बरोबर मोबाइल व कैमरे चे चार्जिंग पण फुल झाले.
आज मी ६५ किलोमीटर सायकल चालवली.
सायकलवर थोडा बर्फ पडला होता. हातानी तो झटकला.
मागे वळून बघितल्यावर
तंगलंग-ला कडे
हाच तो लांडगा माझ्या कडे येत होता. मी दगड घेतल्यावर पळाला.
तंगलंग-ला वरून दिसणारं मोरे मैदान . डाव्या बाजूला वरती जो रस्ता दिसतोय,त्याच रस्त्याने मी आलोय.
तंगलंगला
तंगलंग-ला हा जगामाधला दोन नंबरचा सर्वात उंच मोटोरेबेल घाट आहे.
तंगलंगला वर मन्दिर
तंगलंगलाच्या दुसर्या बाजुचा रस्ता आनि खालि जानारा रस्ता
रूमसे गांव
रुम्से वरुन उप्शी पर्यन्त सगला रस्ता असाच द्रुश्यानि भरला आहे
जिथे लोकवस्थि आहे तिथे हिरवल पाहायला मिलते
उप्शी मधे सिन्धु चे पहिले दरशन होते
(क्रमशः)
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 6:05 pm | चांदणे संदीप
कहर!
वाचूनच गोठलो!
शि. सा. दंडवत! ____/\____
Sandy
9 Feb 2016 - 6:58 pm | स्वच्छंदी_मनोज
__/\__
9 Feb 2016 - 7:01 pm | यशोधरा
हा भाग मस्त! हिमलांडग्याचे दर्शन झाले तुम्हाला, ग्रेट!
9 Feb 2016 - 7:37 pm | एस
वाह!
9 Feb 2016 - 7:54 pm | अप्पा जोगळेकर
थक्क. अत्यंत प्रेरणादायी.
10 Feb 2016 - 9:06 am | प्रचेतस
जबरदस्त.
10 Feb 2016 - 9:17 am | sagarpdy
__/\__
10 Feb 2016 - 11:07 am | मयुरMK
नजर खिळवून टाकणारे फोटो
___/\___ प्रवास- ''थरारक'' !
10 Feb 2016 - 11:45 am | अजया
_/\_
10 Feb 2016 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त !!! काही फोटो भयंकर आवडले !
10 Feb 2016 - 12:45 pm | स्पा
एकदम जबरी,
ते छोटास रुमसे गाव आवडलं, अशा एखाद्या एकदम लहानश्या गावात छोटेसे हॉटेल टाकून कायमच राहायचं :)
10 Feb 2016 - 3:53 pm | मोदक
झक्कास..!!
10 Feb 2016 - 4:07 pm | अन्नू
स्वर्गातच जाऊन आलासा म्हणायचं कि!
मन भरतं तसं डोळे भरुन आले फोटों बघून. ;)
बाकी एवढा सगळा बर्फातला प्रवास तोही साध्या सायकलीने? मान गए.. :)