सावली

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
22 Oct 2008 - 3:52 pm

मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!! :)

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

मुमुक्षु

प्रेमकाव्यकविताप्रकटन

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

22 Oct 2008 - 5:31 pm | दत्ता काळे

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

- फार छान कडवे

प्राजु's picture

22 Oct 2008 - 7:47 pm | प्राजु

प्रत्येक ओळ दाद द्यावी अशी आहे.
अतिशय सुरेख कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

22 Oct 2008 - 8:13 pm | मनीषा

अतिशय सुरेख कविता ..

पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. ..........खूप छान !!

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी, ...........सुंदर!!

विरहिणी आवडली

आवडली.
छानच.

बेसनलाडू's picture

23 Oct 2008 - 11:23 am | बेसनलाडू

फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

मदनबाण's picture

23 Oct 2008 - 11:28 am | मदनबाण

मस्त कविता....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मूकवाचक's picture

9 Feb 2016 - 6:59 pm | मूकवाचक

+१

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 11:32 am | अभिरत भिरभि-या

कविता आवडली.
येथे कोणी चाल बांधणारे आहे का ? चालीत आणखी छान वाटेल :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2008 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली.

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:17 pm | विनायक प्रभू
चतुरंग's picture

23 Oct 2008 - 8:26 pm | चतुरंग

एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असे नितांतसुंदर गाणे! :)

काय तात्या, घेताय का चाल लावायला? आणि रेकॉर्ड करुन टाका इथे तुमच्या आवाजात! B)

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Oct 2008 - 8:43 am | श्रीकृष्ण सामंत

कविता खूप छान आहे. आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

एकप्रवासी's picture

9 Feb 2016 - 4:53 pm | एकप्रवासी

भावना पोह्चली आपली.........