काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 3:24 pm | संदीप डांगे
हाव, आन पानीपुरी जव्हारनगरचौकातली. आता सोन्याबापुंची राउतवाडी फेमस व्हयेल हाय 'पानीपुरीबाजा'इसाठी.
9 Feb 2016 - 5:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक प्रेमळ शब्द "फुग्गे" (फुगे नाही फुग्गेच)
इचीभन काय पोट्टे हात राजेहो तुम्ही!! सायची आता मधुची गिल्ली मिसळ संग छटाकभर कलाकंद कुकुन आना अटीसा!! हट्ट बटे!! बेकार हाय हे!!
डांगेब्वा, फुग्गे तर सर्व्यात ख़ास भेटते राजेश्वर मंदिरा म्हावरे, भीकमचंद खंडेलवालच्या कोपर्यावर एक निरानाम कयकला फुगेवाला सकाऊन हुबा राह्यत जाय, पका भाऊ म्हणत त्याले सारे! सायचा वल्ला लसुन अन अदरकचं पानी बनवे! लोकाइले त्याचं एडिक्शन झालतं माणसे सकायटायमाले पैले तोंडी ब्रस धरून तटी येत फुगे खात मंग प्रेशर आलं का घरी पयत जात!!
9 Feb 2016 - 8:06 pm | संदीप डांगे
फुग्गेच! :))
आमी नाय बॉ गेलो कंदी इतल्यादूर. राजेश्वर मंदिराजोळची किर्ती आयकेल हाय फकत.
9 Feb 2016 - 2:51 pm | उगा काहितरीच
मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही ? काही कमी प्रसिद्ध ठिकाणे - लोहगावला "राहुल" म्हणून एक हॉटेल आहे. इथली मिसळ एक वेगळंच प्रकरण आहे. केवळ तिखट सॕंपल आणी जाड शेव- पापडी ! सोबत पाव . पहिलाच घास घ्याल अन् नाका तोंडातून पाणी गॕरंटिड! चव प्रत्येकाला आवडेलच असं नाही. पण पट्टीच्या मिसळभोक्त्याला आवडणारच. बाकी इथला चहा पण मस्त असतो. लोहगावातच थोड पुढे एक "तुकाराम" नावाची साधी खानावळ आहे तिथेही मिसळ चांगली असते. पण तेथील वडा सॕंपल मिसळपेक्षा भारी. सांगवीत "निसर्ग"ची एक शाखा आहे गजानन महाराज मंदिराच्या बाजूला तिथली मिसळ पण मस्त आहे. डेक्कन चे "काटाकिर्र" तर प्रसिद्धच आहे. अजूनही भरपूर आहेत वेळ मिळाला की टंकतो.
9 Feb 2016 - 3:09 pm | उगा काहितरीच
धानोरीला जकात नाक्याजवळ "साईतिर्थ" या नावाचे एक हॉटेल आहे. इथली मिसळ म्हणजे एका मोठ्या जेवायला असते तशा ताटात असते. त्यात एक मिसळचा बाऊल , एक तर्री कम सॕंपलची वाटी, एक दह्याची छोटी वाटी, पाव ,कांदा वगैरे सरंजाम असतो. चव पण मस्त पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
9 Feb 2016 - 3:12 pm | अभ्या..
लुसलुशीत ताज्या पावापेक्षा जर्रा कडक झालेले थोडेसे क्रीस्पी कडा असलेले पाव ट्राय करा मिसळीसोबत. ती मज्जा अल्लगच
9 Feb 2016 - 3:45 pm | उगा काहितरीच
तसे पाव पण ट्राय केले (करावे लागले ) पण माझी आवड म्हणजे ताजे पावच !
9 Feb 2016 - 2:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
आयला!! अजुन पुण्यातील काटाकिर्र्,रामनाथ पभ्रुतींची आठवण कोणी काढली नाही या धाग्यावर?? छे: पुर्वीचे मिपा राहीले नाही.
9 Feb 2016 - 3:07 pm | भक्त प्रल्हाद
अगदी हेच लिहायचे होते.
त्यातल्या त्यात रामनाथ चा उल्लेख तरी हवाच.
16 Feb 2016 - 6:12 pm | सूक्ष्मजीव
पुण्यातील रामनाथची मिसळ खाल्ली..... हॉटेलमागच्या पायरीवर भर दुपारी पन्नास मिनिटापेक्षा जास्त उभा होतो, मग नंबर लागला. वरच्या मजल्यावर गेल्यावर ऑर्डर दिली पण सगळ्यांनी ऑर्डर दिल्याशिवाय वेटर खाली गेला नाही. मग साधारण दहा मिनिटांनी खालून मिसळ वरती आली. भरीस भर म्हणून. पावांऐवजी ब्रेडच्या स्लाईस समोर आल्या. यावर अजून वरताण म्हणून समोरच्या बोर्डवर कांदा आणि सँपल चे वेगळे पैसे लागतील अशी पाटी होती. पुन्हा पाव मागवले तर ते आलेच नाहीत शेवटी कंटाळून ताक नावाचे पांढरे पाणी पिऊन परतलो. पिंपरीतली दे धक्का रामनाथपेक्षा शंभरपट भारी..
9 Feb 2016 - 2:56 pm | होबासराव
तसा लहान असताना खुप वेळा पुण्याला आलो होतो पण मित्रांसोबत फिरायला काहि तरि ९९ सालि आलो होतो, कोणि सांगत होत जोशिवडा पाव लय फेमस ते टेस्ट केले. गम्मत त राजा तवा झालि जवा एका हाटेलात वडा-शँपल मागवला..तो आला आलुबोंडा अन पांचट पानि घेउन..दोस्तान इचारल अबे ते शँपल का काय हाय ते काउन नाय आनल्..वेटर म्हने हे काय वाटित.. अबे हा त रस्स्सा आहे ते बि बिना तर्रिचा :)
नाहि त्यानंतर पुण्यात खुप जागि खरच अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल मिळाले..पण हा अनुभव लक्षात राहिला :))
9 Feb 2016 - 3:28 pm | संदीप डांगे
अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल>> त्याशिवाय गोठ नायी. असंच मनाजोगतं श्याम्पल एकदा वारी हनुमानले खाल्लं बावा. बायको मुंबईची हाय, तिले ते निरा खेड्यातल्या टपरीवरचं आलुबोंडा-रस्सा लयच आवडला बॉ... म्या म्हटलं, हे असली चीज हाय, तुम्ही मुंबैवाले निरा पानी टाकता ज्यात्यात...
9 Feb 2016 - 8:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमचं एक पोट्ट होतं डाबकी रोड वालं इच्चक सायचं! त्याले पोट्याईनं भरी पाडलं चाल म्हणे बावा तुले फुग्गे चारतो, हा गेला गड़ी, त्या फुग्गेवाल्यानं रगड़ा टाकला गरम फुग्ग्यातनी, दुसऱ्यां फुग्ग्याले गड़ी जोरात चिल्लावला
"
"
:D :D
9 Feb 2016 - 9:55 pm | संदीप डांगे
पैल्यांडाव ते वरण पायल्यावर तेबी फुग्यात पायल्यावर काय भावना आल्या असतील राजेहो तुम्ही समजू शकता... मी शब्दात नै सांगू शकत.
9 Feb 2016 - 3:04 pm | मदनबाण
मध्यंतरी वाडीला गेलो होतो तेव्हा मुद्दामुन कुरुंदवाडला जाउन एकाट्यांची मिसळ चापुन आलो. :)
मामलेदारांच्या मिसळी बरोबर लिंबु मिळत नाही, हा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. मागच्या वेळी तर्री मधे तेलाचे प्रमाण भयानक होते,जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले होते म्हणा ना ! लयं रसभंग झाला आपला. :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
9 Feb 2016 - 3:24 pm | गवि
मबाशेटशी सहमत. त्यामुळे ही मिसळ मनातून उतरली. ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही चांगली.
9 Feb 2016 - 6:25 pm | माझीही शॅम्पेन
प्रत्येक मिपाच्या काय अप्पा वर हेच सांगत असतो कोणीही ऐकेना राव , तिथे पियुष पण भारी मिळते !!!
तुमच्याच प्रमाणे गोखले आवडले (थोड अवांतर हेच मत पॉप टेट्स बद्दलही आहे)
9 Feb 2016 - 6:48 pm | मदनबाण
तिथे पियुष पण भारी मिळते !!!
दादरला पणशीकरांकडे मिळणार्या पियुषची आठवण आली रे ! किती काळ लोटला पियुष पिउन... गोखल्यांकडे जावेच लागेल असे दिसते !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
9 Feb 2016 - 7:56 pm | टवाळ कार्टा
तात्पुरते वायदे आझम का हो? =))
9 Feb 2016 - 3:33 pm | मीउमेश
मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात
१) साधी - यात तेल , तरी बिलकुल नसते
२) मिडीयम - थोडा रस्सा थोडी तरी
३) तिखट - जालीम तिखट , तरी तरी तरी
9 Feb 2016 - 4:20 pm | गवि
मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे तीन अॉप्शन्स आहेत हे कळल्यावर "सर्वात तिखट" अॉप्शन मागितला. तेव्हा चहाच्या बशीत लाल तेल आणि शेव आली.
तिखट डज नॉट मीन अॉल तेल.
नंतर तिथून जवळच तलावाच्या चौकात पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉटेलात खाल्ली तीही मामलेदारच्या इथूनच येते असं ऐकलं. खखोदेजा.
ती कमी तेलाची आणि रस्सेदार चांगली होती.
9 Feb 2016 - 4:59 pm | संदीप डांगे
ते 'आमंत्रण', तिकडेच खाल्ली होती दोन-तीनदा.
9 Feb 2016 - 10:41 pm | बोका-ए-आझम
मालक एकच दोघांचाही.
10 Feb 2016 - 10:54 pm | मोगा
अमच्या कुरुंदवाडात जाउन आलात.
एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ बाजारात मस्त मिसळ मिळते.
मसाला वडा खाल्ला का ?
11 Feb 2016 - 10:08 am | मदनबाण
एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ बाजारात मस्त मिसळ मिळते.
हे ठि़काण माहित नाही.
मसाला वडा खाल्ला का ?
नाही, कोणाकडे मिळतो ?
एकाटेंच्या जवळ मस्त फिके पेठे मिळण्याचे दुकान आहे, नाव नक्की आठवत नाही, बहुतेक शिंदे असावं.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
11 Feb 2016 - 10:09 am | मदनबाण
फिके पेठे हे फिके "पेढे" असे वाचावे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
9 Feb 2016 - 3:16 pm | शान्तिप्रिय
मिसळ्पाववर मिसळपाववर धागा आल्याने मिसळ्पाव आणि मिसळ्पाव दोघांना अतिशय आनंद झाला असेल.
9 Feb 2016 - 3:37 pm | होबासराव
ज्योति मिसळ...इथे सुद्धा छान मिसळ मिळते.
9 Feb 2016 - 3:46 pm | स्पा
मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा आहे, इतकी भिकार मिसळ तर मीही घरी बनवू शकतो
9 Feb 2016 - 4:55 pm | मुक्त विहारि
ह्याला प्रचंड सहमत
"इतकी भिकार मिसळ तर मीही घरी बनवू शकतो."
अजिबात नाही. इतकी भिकार मिसळ आम्ही कितीही प्रयत्न केला तरी घरी बनवू शकत नाही.
आजकाल मामलेदारच्या मिसळीच्या रश्यात झमझमीतपणा नावालाच आणि तेल मात्र भरपूर असते.
१९८० ते १९९० पर्यंत मामलेदारची मिसळ मस्त होती.आजकाल मात्र तेलात मिसळ करतात.
9 Feb 2016 - 5:32 pm | स्पा
चला मूवी तुमच्या घरीच बसू आता ;)
9 Feb 2016 - 11:02 pm | मुक्त विहारि
आमची बायको मस्त मिसळ बनवते.
9 Feb 2016 - 3:49 pm | मृत्युन्जय
आता धागा इतर मिसळींनी हायजॅक केलाच आहे तर मग पुण्यात इन्क्म टॅक्स लेनमधल्या भाडाईत मिसळीचा उल्लेखही झाला पाहिजे. अतिशय दमदार मिसळ. पुणेरी मिसळ (थोड्क्यात बेडेकर) म्हटल्यावर नाकी मुरडणार्या ४ -५ पुणेद्वेष्ट्यांना आवडली आहे ही मिसळ आजवर. मला स्वत:ला देखील फार आवडते.
पुण्यात कोथरुडला कोथरुड स्टँड जवळ (मनिषा पाणीपुरीची गल्ली) मस्ती मिसळ देखील उत्तम असते. तिथे मिसळीबरोबर गारेगार दहीभात मिळतो (काँबो घेतल्यास) आणि गारेगार काकडी कोशिंबीर असतेच. मिसळ + दही भात + काकडी हा काँबो लय भारी आहे. नुसती मिसळ देखील उत्तम.
सिंहगड रोडवर आणि बाणेरला मिळणारी कोल्हापूरची खासबाग मिसळादेखील मस्त. पण नंबर वन नाही.
नेवाळे तिखटजाळ असते. सगळीकडुन धुर निघतो. खायला छान वाटते पण अति तिखटपणामुळे ही मिसळ नापास. (चव मात्र चांगली असते तिखट कमी केल्यावर कशी लागेल कोण जाणॅ)
काटाकिर्र तर सगळ्यांना माहितीच आहे. सुंदर.
टिंबर मार्केट मध्ये महेशची मिसळदेखील सुंदर मिळते.
पौड फाट्यावर कोल्हापूर मिसळ सुरु झाली आहे (काळे ब्रदर्स च्या लेनमध्ये. शीलाविहार कॉलनीच्या सुरुवातीला). लोकांना लैच आवडलीय. मला नाही आवडली खास. एकदा ९ ला पोचलो तर याने दुकान उघडले नव्हते म्हणून दुसर्यांना १० ल गेलो तर अजुन मिसळ तयार होत होती. खुपच वैतागलो होतो. एनीवे मला स्वतःला खास नाही आवडली. अशीच श्रीकृष्ण, श्री आणी रामनाथची मिसळदेखील नाही आवडत.
असो. तरीदेखील अखिल भारतात बेडेकर पेक्षा चांगली मिसळ इतरत्र कुठेही मिळत नाही हे जाताजाता नमूद करु इच्छितो.
9 Feb 2016 - 4:32 pm | अनिरुद्ध.वैद्य
सुस गावालगत तापकीर मिसळ सुरु झालीय. ती सुद्धा छान. उपवासाची मिसळ नावाचा नवा आयटम दिसला. पण ट्राय केला नाही. त्याचप्रमाणे एनडीए रोडवर वैष्णवी येथील मिसळ चांगली वाटलीय.
पण बेडेकर बेष्ट!
13 Feb 2016 - 2:10 pm | Maharani
Vaishnavi chi Chan aasate misal....tasech paud road la Shivtirth nagar- new friends colony javal Gurudatt chi misal pan mast aasate.
9 Feb 2016 - 4:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
हल्ली खूप तिखटजाळ असते. अर्ध्या वाटी तिखटात तितक्याच प्रमाणात तर्री टाकल्यासारख वाटत.
9 Feb 2016 - 9:28 pm | आदूबाळ
हायला. यह किधर हय? कर्वेरोड एंडला का? (तिथे रस्त्याकडेला एकदोन गाड्या आहेत असं आठवतंय...)
9 Feb 2016 - 11:33 pm | अभिदेश
पौड फाट्याजवळ , कीर्ती हार्डवेयर च्या लेन मध्ये . खाऊन बघा . मला आवडली . तिखट पण जळजळीत नाही . बाकी मामलेदारच्या मिसळी बद्दल अनुमोदन , आता नो टेस्ट ओन्ली जळजळाट ….
9 Feb 2016 - 3:49 pm | स्पा
बर्याच शहरातल्या मिसळ खाल्ल्या आहेत, इथून तिथून सारख्याच असतात, लोक उगाच आपापल्या गावाची लाल करायची म्हणून वर्णन करून लिहितात बाकी काही नाही
9 Feb 2016 - 3:53 pm | असंका
-))
9 Feb 2016 - 3:54 pm | अभ्या..
काहीजण गावाची लाल करण्यासाठी लिहितात, काही स्वतःची लाल करण्यासाठी लिहितात. चालायचेच स्पावड्या. विपस्सनेचे कुठवर आले??
9 Feb 2016 - 3:55 pm | स्पा
चल येतो का
9 Feb 2016 - 3:57 pm | अभ्या..
जाऊ की. इलासरावांना आणि इतर बर्याच जणांना लै आनंद होईल. ;)
9 Feb 2016 - 3:58 pm | स्पा
हिहि
9 Feb 2016 - 4:35 pm | नीलमोहर
एवढ्या लोकांकडून माहिती घेतली, काय निष्कर्ष निघाला कळू द्या की..
बाकी काय असेल ते असो, मिसळपाव अगदी आवर्जून असं कधी खावं वाटत नाही :)
9 Feb 2016 - 11:25 pm | चाणक्य
उत्तरार्धाशी बाडीस. खरा मिसळभोक्ता विविध ठिकाणच्या मिसळी सारख्याच भक्तिभावाने खातो. व्यक्तिगत आवडनिवड असतेच पण कुठल्या मिसळीला कधी तुच्छतेने कमी लेखत नाही.
11 Feb 2016 - 10:59 am | सुबोध खरे
स्पा बुवा
बहुसंख्य वेळेस उत्तम खाद्यपदार्थ हे सर्वच शहरात मिळतात. पण ते आपल्या निगडीत असलेल्या आठवणीमुळे जास्त लक्षात राहतात. पुण्यात शिक्षण/ नोकरी मिळून १२ वर्षे काढली. पुण्याच्या कानाकोपर्यात नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतचे सर्व पदार्थ चांगले आणि वाईट असे दोन्ही मिळाले/ खाल्ले. हेच पदार्थ मुंबईत फिरले तर कुठेना कुठे मिळतातच. तेंव्हा अमुक ठिकाणची मिसळ, तमुक ठिकाणचे पोहे हेच बेष्ट आहेत हे काही सत्य नव्हे.
मथुरेचे पेढे, जोधपूरचा मिरची वडा आणि माव्याची कचोरी, लखनौचे काकोरी कबाब किंवा काली मिर्च मुर्ग ( हे सर्व प्रत्यक्ष चाखलेले पदार्थ आहेत) हेच जगात सर्वोत्तम असा काही नसतं.(यातील बहुसंख्य पदार्थ मुंबईत कुठेना कुठे उत्तम दर्जाचे मिळाले)
सर्वोत्तम असतात त्या त्याच्या बरोबर निगडीत असणार्या आठवणी. मधुचंद्राच्या दिवशी "आपली"च बायको जगातील सर्वात सुंदर स्त्री असते.
आमच्या (होणार्या) बायको बरोबर थंडीत सिंहगडावर खाल्लेली भजी, मटक्यातील घट्ट दही आणि गरम गरम झुणका भाकर जगात सर्वोत्कृष्ट आहेत असे "मला" वाटू शकते.
तेंव्हा जिथे जाल तेथे उत्तम पदार्थ मित्र/ मैत्रिणी बरोबर चाखा, मैफिल जमवा म्हणजे ते पदार्थ सर्वोत्कृष्ट असतील.
11 Feb 2016 - 11:41 am | कैलासवासी सोन्याबापु
लखनौचे काकोरी कबाब किंवा काली मिर्च मुर्ग ( हे सर्व प्रत्यक्ष चाखलेले पदार्थ आहेत)
हाय काय आठवण काढली डॉक् साब!!!
16 Feb 2016 - 12:58 am | बोका-ए-आझम
.
9 Feb 2016 - 3:53 pm | शान्तिप्रिय
धाग्यावर प्रतिसाद लिहिताना विनोदी प्रतिसाद परन्तु वैयक्तिक टीका न करता लिहावा.
पु ल देशपांडे ची पुस्तके वाचलेल्यांना हे शक्य होईल.
प्रत्येकाला आपले गाव आणि तेथील खादाडी याबद्दल अभिमान असणे नैसर्गिक आहे.
9 Feb 2016 - 3:54 pm | स्पा
यात वयक्तिक काय दिसले ब्वो
- अशांतीप्रीय
9 Feb 2016 - 3:54 pm | शान्तिप्रिय
पु ल देशपांडेंची..... , चुकून एकेरी उल्लेख झाला क्षमस्व!
9 Feb 2016 - 3:59 pm | मृत्युन्जय
आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान असणे हा इतका काळ पुण्याचा युएस्पी होता. आता अभिमानाच्या ठिणग्या गावोगावी पडायला लागलेल्या दिसत आहेत.
9 Feb 2016 - 4:06 pm | स्पा
??
वणवाच पेटलाय
उद्या चार शेवेच्या कांड्या टाकून लाल तिखटाच पाणी दिले तरी लोक जाज्वल्य अभिमानाने मिटक्या मारत खातील
9 Feb 2016 - 4:06 pm | संदीप डांगे
हा हा, असं नै हो ते. गावोगावी ज्वालामुखी असतातच, तिथून उडून आजकाल पुण्यात ठिणग्या पडायला लागल्याने पुणेकरांना कळले की पुण्याच्या बाहेरही जग आहे. ;-)
प्रत्येक शहरात जाऊन मी हा पेटंट ड्वायलाक ऐकलायः "जो इथल्या भयानक ट्रॅफिकमधे गाडी चालवील तो जगाच्या पाठिवर कुठेही बिन्दास चालवू शकतो".
बोलणार्याने गावाच्या बाहेर कधीच पाऊल टाकलेलं नसतं हे अगदी नक्की!
9 Feb 2016 - 4:17 pm | मृत्युन्जय
पुणेकरांना कळले की पुण्याच्या बाहेरही जग आहे
अस्सल पुणेकर नदीबाहेर पुणे मानत नाही तर पुण्याबाहेरचे जग मानेल की नाही कुणास ठाऊक. पुण्याबाहेरच्या द्विपाद प्राण्याला माणूस म्हणणे पण पुणेकरांना अवघड जाते. बात करता है ;)
9 Feb 2016 - 4:21 pm | संदीप डांगे
=))
9 Feb 2016 - 4:26 pm | अनिरुद्ध.वैद्य
येवा हिंजवडीत मंग! सक्काळी ९ ले पोचा वाकड ब्रिज पाशी.
9 Feb 2016 - 4:07 pm | अभ्या..
हं. आणतात लोकं विस्तू सांभाळून कुठून कुठून.
9 Feb 2016 - 4:15 pm | स्वाती दिनेश
मिसळ म्हणजे मा मि.. हे समीकरण इतकं पक्कं आहे.. की जाउदे..
आता ठाणेवारीची वाट पाहणे आले..
स्वाती
9 Feb 2016 - 4:31 pm | भीमराव
पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व मिसळ ट्राय कराव्या वाटालय ,
आमच्य कॉलेजातल्या ऊडाप्यानं मिसळीत तर्रीच्या ऐवजी सांबार नावाचा आंबट पदार्थ दिलेला, त्यावेळी जवळजवळ त्याचा खुन करायचीच ईच्छा झाली होती.
9 Feb 2016 - 4:38 pm | अभ्या..
करायचा किनै मग.
तेवढाच पुणेकरांना सांगायला अजून एक किस्सा झाला असता.
"आमच्यात किनई एकाने कटाएवजी सांबार घातले म्हणून भोसकले चक्क. ते पण उडप्याला. समजलेस काय"
9 Feb 2016 - 6:18 pm | मदनबाण
अभ्या... कधी सोलापूरात आलो तर तिकडची मिसळ नक्कीच चापेन ! :) फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटले. :)
बाकी पुणेकरांच्या किस्स्यात "शँपलचा" उल्लेख मात्र करायला विसरु नका ! मिसळीचे इतके पांचटीकरण फक्त पुण्यातच होउ शकते. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
9 Feb 2016 - 8:19 pm | अभ्या..
येच बाणा. कॅमेरा तेवढा घेऊन ये. अजून जळवू आपण.
साला आमाला फोटॉग्राफी येत नाही मग चांगला कॅमेरा कोण हाताळू देणार ;) हाय त्या मोबाईल कॅमेर्याने काढलेला फोटो तो. ताकाची बाटली पण दिसतीया थोडीशी बघ. ;)
9 Feb 2016 - 4:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
ईथे एखादा वडापाव आणि मिसळीचा जॉईंट सुरु केला तर चालेल (आय मीन धंदा चालेल) का हो? साला सगळीकडे नुसते पंजाबी खायला मिळते ईंडियनच्या नावाखाली..नाहीतर डोसे/ बिसे
कॉलिंग पेठकरकाका....
9 Feb 2016 - 4:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
अॅमस्टरडॅम लिहायचे राहिलेच!!
9 Feb 2016 - 5:41 pm | वेल्लाभट
कुणी व्हिजा देत असेल तर मी तयार आहे म्यानेज करायला :)
9 Feb 2016 - 4:39 pm | नाखु
माझा प्राधान्यक्रमः
१.पुर्वीची जनता मिसळ (पिंपरी वाघेरे ) आता बंद आणि बाद आहे कारण पहिल्यांदा माल्काने भाड्याच्या जागेतुन बाहेर काढले नंतर दुसर्या मिसळवाल्याने (आचारी/कामगार) पळवला.
२.दीप्ती मिसळ्,निसर्ग मिसळ (पिंपरी पुलाजवळ गावठाण) आणि मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन) समान दुस्र्या क्रमांकावर
३.जयश्री (आकुर्डी गावठाण बजाज अॅटोसमोर)/अरिहंत (चिंचव्ड गाव ते काळेवाडी रस्त्यावरच)
४.नेवाळे (५-६ वर्षांपुर्वी पर्यंत आब राखून होती ती तोपर्यंत सुमारे १०-१२ वर्षे नियमीत खाल्ली आहे) शेवटी तिथे खाऊनही सुमारे ४-५ वर्षे झाली आहेत सध्याचे (दर्जाबाबत) माहीत नाही. पण मित्रांच्या अनुभवातून कळाले की तिखट वाढत गेले आणि रश्याचा मसाला+मटकी कमी होत गेली. त्यामुळे चवही अगदी फाफलली आहे.
स्थळ गांधीपेठ चिंच्वडगाव.
बाकी कोल्हापुरच्या नावाखाली पाट्या लावलेल्या खोपटांमध्ये कधी गेलो नाही जाईल असे वाटत नाही .
रच्याकाने : जळगावात मामा चौकाजवळ सुमारे १८ वर्षांपुर्वी खालेल्या शेव्+ चव्दार तिखट रस्सा आणि पाव याची अजून आठवण येते खरी.
मिसळपाव्वाला वारकरी नाखुस.
9 Feb 2016 - 5:19 pm | असंका
याबद्दल तीव्र सहमती!!!
9 Feb 2016 - 11:36 pm | चाणक्य
डी.वाय. जवळ जे निसर्ग आहे ती यांचीच शाखा का?
रच्याकने, मयुरची तिसरी शाखा तिथेच समोर सुरू झालीये.
10 Feb 2016 - 10:44 am | असा मी असामी
मोरया मंदिराजवळ बालाजी मिसळ ती पण मस्त असते.
मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन)एकदा गेलो होतो पण काही खास नाही वाटली.
9 Feb 2016 - 5:03 pm | पैसा
माझी आजी मिसळीला आंबोण म्हणायची.
(प्रतिक्रिया वाचायला थांबत नाहीये. गेले पळून.)
9 Feb 2016 - 5:21 pm | असंका
शिळी भजी नसतील तर मिसळ मिसळच नाही!!
एकदम करेक्ट!!
9 Feb 2016 - 6:50 pm | जेपी
मिसळ नामक पदार्थ ज्यात फरसाणावर तिखट पाणी टाकातात.
लोक ते का खातात ते कळत नाही?
लै तर वड्यावर सांबर टाकुन खावे..
असो हा प्रकार कै आवडत नाही..
रच्याकने 100 री झाली.
अभिनंदन
9 Feb 2016 - 7:26 pm | एस
सहमत.
9 Feb 2016 - 7:39 pm | उगा काहितरीच
जेपीभौ संभालके ! मिसळपावला नाव ठेवताल तर निषेध सभा, निषेध मोर्चे निघतील . उगाच भावी संपादक पद धोक्यात यायचं तुमचं ! हघ्या हेवेसांनलगे ;-)
रच्याकने वड्यावर (बटाटा वडा, वडापाव मधे असतो तो) सांबर टाकून कसं खातात लोक काय माहीत ? सांबर सोबत खायचा तर उडीदवडा आहे ना ! अन् बटाटा वड्यावर घ्यायला सॕंपल (कट, रस्सा,तिखट पाण,) आहे ना.
9 Feb 2016 - 9:14 pm | जेपी
बटाटा वड्या सोबत सांबर अप्रतिम लागत,
कुठल्याही उडपी हॉटेलात खा..
कट वड्याची वेगळी मजा असते,
कधी तुळजापुरला गेलात तर खा!
10 Feb 2016 - 11:13 am | वेल्लाभट
कड्ड्ड्ड्डक लागतं. मी आवर्जून मागून घेतो.
9 Feb 2016 - 6:56 pm | मी-सौरभ
१. पिंपळे गुरव बस स्टॉप कडून दापोडीकडे यायच्या रस्यावर (जगतापांच्या ओफ्फिस नन्तर) एक मिसळ वाला आहे. तो लई भारी (खुप छान हे विषेशण मिसळिला शोभत नाही ;) ) मिसळ बनवतो.
२. आमच्या तळेगावात आणी गावाजवळ ३ मिसळ्वाले पण झक्कास मिसळ बनवतात. कधीतरी या, खाऊया.
9 Feb 2016 - 7:56 pm | मोहनराव
इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे का या गावाजवळच्या ३ मिसळवाल्यात?
एक तळेगावकर मिसळप्रेमी..
9 Feb 2016 - 9:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाबौ इंदोरी मधे समाधानला रस्सा वाट्या रिचवायच्या पैजा लागत आमच्या!!, त्या शिवाय थंडया मामल्यात सब्जी लसूनी!! अहाहा गेले ते दिवस
10 Feb 2016 - 5:45 pm | मी-सौरभ
ईकडे आलास की घेऊन जाईन.
16 Feb 2016 - 6:27 pm | सूक्ष्मजीव
माउली मिसळ, घरगुती चव..........
17 Feb 2016 - 12:50 am | सूक्ष्मजीव
पिंपळे गुरव मधली माउली मिसळ
मस्त घरगुती चव............
9 Feb 2016 - 7:30 pm | बिपिन कार्यकर्ते
http://www.misalpav.com/node/3343
आमचीही मामलेदार मिसळ! :)
9 Feb 2016 - 9:38 pm | धनावडे
नाव माहित नाही पण माळशेज घाट उतरताना सुरुवातीला एठ ढाबा आहे एसटी बस पण थांबतात तिथे मिसळ छान मिळते तिथे
आणि आमच्या वाईमध्ये जॅाली मिसळ मस्त मिळते
9 Feb 2016 - 9:45 pm | धनावडे
एक*
9 Feb 2016 - 9:56 pm | बहुगुणी
मिसळभक्तांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या गावांमधील मिसळवारी जियो मिपावर आणावी असं आवाहन करतो. म्हणजे प्रवासादरम्यान इतर भाविकांनाही भेटी देता येतील.
मी उदाहरण म्हणून मामलेदार मिसळ या ठिकाणाचा झेंडा पश्चिम ठाण्यात (अंदाजे) लावलेला आहे. याच (brown) रंगाचा झेंडा वापरावा म्हणजे मिसळवारी इतर स्थानांपेक्षा वेगळी उठून दिसेल.
आधिक माहितीसाठी हा मूळ लेख वाचू शकाल.
9 Feb 2016 - 10:06 pm | प्रचेतस
मायला इतक्या ठिकाणच्या मिसळींचे उल्लेख होऊनही आख्ख्या व्होल मिपावर फेमस असलेल्या मामा मिसळीचा उल्लेख कुणी कसा नाही काढला?
ह्या मिसळीचे ख़ास वैशिष्ट्य म्हणजे ती मिसळ खाण्याआधी रश्श्याच्या पातेल्यात डोकावून बघावे लागते. एखादा पट्टीचा खवय्या नुसत्या त्या डोकावण्यावरुनच मिसळ कशी आहे ते सांगू शकतो.
9 Feb 2016 - 10:18 pm | होबासराव
कॉलिंग आत्मुस बाबा