काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 1:13 pm | मृत्युन्जय
आयला हा लेख तर पुण्यातुन ठाण्यात निर्यात झालेल्या एखाद्या पुणेकराने लिहिल्यासारखे वाटते. पुणेकर सुद्धा बेडेकर बद्दल असेच भरभरुन लिहितो.
अवांतरः माझ्यासाठी बेडेकरची गोडसर मिसळ आणि मामलेदारचा झटका नेहमीच संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरा नंबर दिवे आगरच्या आवळसकरांचा. मग बाकीचे बरेच आहेत.
9 Feb 2016 - 1:24 pm | माम्लेदारचा पन्खा
सासूबाईना घेऊन कसे गेलात दोघे ?
9 Feb 2016 - 2:08 pm | मीउमेश
माफ करा ते राहून गेलं
तिघ होतो म्हणूनच गाडी(कार) नी जावा लागलं ,
9 Feb 2016 - 1:34 pm | प्रचेतस
मामलेदारला वड्याबरोबर मिळणारी हिरवी चटणी फारच आवडते. मिसळ काही इतकी खास वाटली नाही मात्र.
9 Feb 2016 - 1:48 pm | माम्लेदारचा पन्खा
हल्ली ठाणेकर असली वाक्यं वैयक्तीक पराभव म्हणून घेतात बर्का....
9 Feb 2016 - 1:54 pm | प्रचेतस
=))
जे आहे ते आहे. मला व्यक्तीशः कोल्हापूरची फडतरे मिसळ आवडली. काहींना ती आवडत नाही. ज्याची त्याची चव. :)
9 Feb 2016 - 2:09 pm | वेल्लाभट
फडतरे रॉक्स!
पण रत्नागिरीला मारुती मंदिराजवळ गोपाळ ची मिसळ खाऊन बघा एकदा. आमची ती नंबर वन आहे.
9 Feb 2016 - 2:19 pm | प्रचेतस
कधी गेलो तर खाईन नक्कीच.
9 Feb 2016 - 2:55 pm | स्वच्छंदी_मनोज
ज्जे बात..
वेल्लाभट गोपाळच्या मिसळीच्या आठवणीने एकदम हळवे केलेत हो.
ह्याच मारुती मंदिराजवळाची गोपाळ आणी समोरील साईची मिसळ ह्याला जगात तोड नाही... :) :)
9 Feb 2016 - 5:39 pm | पैसा
गोपाळपेक्षा साईश्वरी, त्याचाच वडापाव भारी असतो. आणि गावात गांधीची मिसळ लै भारी. त्याला गांध्याची मिसळ असं म्हणायचं असतं.
9 Feb 2016 - 5:44 pm | गवि
नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य आठवणी नकोत.
मला तर विहार डिलक्सची मिसळपण आवडते. आणि त्याच्या समोर पंपाशेजारी तीस वर्षांपूर्वी "आहार" नावाची टपरी होती मिसळीची. ती बंद झाली असं कोणी सांगू नका.. यादोंके सब जुगनू जंगल में रहेते है..
9 Feb 2016 - 5:52 pm | पैसा
आहार छान चालू आहे! अगदी दुधो नहाव पुतो फलो!! आता साधारण दर्जाचे हॉटेल आहे. हल्लीच गेल्या महिन्यात पोहे खाऊन आले!
9 Feb 2016 - 5:59 pm | नन्दादीप
आता चान्गल मोठ्ठ प्रस्थ झालय ते... महाराष्ट्रीय पन्जाबी चायनीज दाक्षिणात्य अस काय काय मिळत तिथे...
रत्नागिरीतील मिसळीची ठिकाणे :
भिडे उपहार गृह : पुणेरी मिसळ
गोपाळ
साईश्वरी
गान्धी - टॉकीज समोर
रसराज (पापडी मिसळ) - टॉकीज शेजारी
माऊली (हल्ली दर्जा किंचीत खालावलाय)
रुद्र (मालक जरी दाक्षिणात्य असला तरी मिसळ चा रस्सा घट्ट, खोबर्याच वाटप लावलेला असतो)
9 Feb 2016 - 7:14 pm | विशाखा राऊत
साईश्वरी सोबत वायंगणकरचा वडापाव पण बेस्ट. ताई गांधी मिसळला सध्या गोपाळ आणि रसराजने मागे टाकले आहे. आहार दणक्यात सुरु आहे. स्तंभावरची भेळ, थिबा पाँईटला बोंद्रेकाकींचा कोन, भेळ, मांडवी भेळ, छाया मधले पॅटीस बस आता जास्त आठवत नाही.
9 Feb 2016 - 7:55 pm | गवि
बोंद्रेकाकांनी थिबा पॉईंटवरच्या फळ्या लावून केलेल्या भेळस्टॉलवर पहिल्यांदा "पावभाजी" ही कन्सेप्ट रत्नागिरीत लाँच केली. मस्का पावभाजी, रुपया जास्त.
नंतर हळुहळू खूप आले. पण त्यांनी फार फार आधी सुरु केला पदार्थ. त्यांची भेळही तुलनेपलीकडची. लहानपण आहे सगळं त्यात. कुठे तुलना करणार?
एकदम पंधरा वर्षांच्या अंतराने गेलो. बोंद्रेंच्या स्टॉलवर शेवटचं तर वीस वर्षांहून जास्त झाली असतील त्यावेळी. पाऊस पडत होता. थिबा पॉईंट तसाच होता. तिकीट लावून उद्यानाचा अजून पायाही झाला नव्हता. बोंद्रेकाका एकटेच पावसात उभे होते. समोर गेल्यावर नावाने ओळखलं. भेळ बनवून दिली. डोळ्यात पाणीच आलं.
पुढच्या एका वेळी भेळेचा कोनही खाल्ला, नवीन उद्यानही पाहिलं. पण बोंद्रेकाका नव्हते आणि थिबापॉईंटही गाडला गेला होता.
9 Feb 2016 - 8:37 pm | पैसा
रत्नागिरीत पावभाजी वैशाली मधे सुरुवात झाली बहुतेक. नंतर थिबा पॉइंटला बोंद्रेंच्याही आधी कलघटगीचा भेळेचा स्टॉल असायचा. नंतर मग बंदरावर लहान लहान हॉटेल्स सुरू झाली. पण आधी वाटेत मुरलीधराच्या देवळाबाहेर एकजण पानाच्या गादीसारख्या स्टॉलवरून भेळ द्यायचा. पांढर्या समुद्राजवळ गाड्यांवर भेळ मिळायची. ती खाणे हा आवडता उद्योग असायचा. आता पांढरा समुद्रच मरून गेला.
9 Feb 2016 - 9:31 pm | गवि
मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर खानावळ म्हणून अस्सल राईसप्लेट फेम खानावळ होती. संध्याकाळनंतर बॅचलरांची फुल गर्दी. खानावळीचा फ्लेवरही टिपिकल. खेरीज स्टँडशेजारी हेळेकर शिक्केवाला प्रचंड पेढा. ..विहार डिलक्समधे तेव्हा दोन दालनं होती. अंधुक प्रकाश, संगीत.. एकीकडे शाकाहारी, दुसरीकडे मांसाहार अन परमिट रुम.
विवेक लॉजसमोर साईकृपा की कायतरी. त्या वेळची "फाईन डाईन"च ही दोन्ही.
9 Feb 2016 - 9:54 pm | पैसा
विहार डिलक्स तेव्हा जरा पैशेवाल्यांसाठी म्हणून फेमस होतं. आता त्यानी रेस्टॉरंट दुसर्या कोणाला चालवायला दिलंय बहुतेल. क्वालितीही ती राहिली नाही. जुनं विठोबाच्या देवळाजवळचं विहार मात्र आपली चव टिकवून आहे. तसंच खानोलकरांचं प्रशांत लंच होम.
रत्नागिरीतल्या खानावळींशी कधी संबंध आला नाही, पण भाटवडेकरांचं नाव आठवतंय. नित्यानंद चव्हाणचं अंगण नंतर बंद झालं.
हेळेकरांचे आणि मलुष्ट्यांचे पेढे, कोहाळे पाक, चपटे पेढे अगदी तसेच्या तसे अजून मिळतात.
11 Feb 2016 - 2:47 pm | स्वच्छंदी_मनोज
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा, तिथेच विठोबा देवळाजवळच्या राजा आईस्क्रीम सेंटर मधे कसाटा आणी कुल्फी, साईश्वरी वडापाव, समाधानचा डोसा, अशोक हॉटेलची कुर्मापुरी (दुर्दैवाने पार्टनरच्या भांडणात बंद झाले हे :( ), छाया गेस्ट हाऊस मधले पियुष, पांढर्या समुद्रावरची भेळ आणी अनेक अनेक अनेक..
खंप्लीट नॉस्टॅल्जिक...
11 Feb 2016 - 3:05 pm | गवि
खाली आणि वर याचा अर्थ रत्नागिरीतल्यांनाच बरोबर कळतो.
बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे.
11 Feb 2016 - 3:55 pm | स्वच्छंदी_मनोज
बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे >>> एकदम करेक्ट..
सड्यावर जाऊन येतो असे म्हणणारे अजूनही रत्नागिरीत आहेत. आता सडा म्हणजे मेंटल हॉस्पिटलचा चढाव चढून वरती माळनाक्याला आले म्हणजेच असे पण त्यावेळी एस्टी स्टँड ही हद्द होती आणी माळनाका म्हणजे गावाच्या बाहेर. माळनाक्यावरच्या वैद्य वकीलांच्या बंगल्यातून समुद्र दिसत असे म्हणूनच त्या बंगल्याचे नाव 'सागर दर्शन' असे आहे.
असो.. मिसळीच्या धाग्यावर बरेच अवांतर झाले.
11 Feb 2016 - 4:22 pm | गवि
कृपया लगेच रत्नागिरी असा धागा काढा. लगोलग येतोच. भेटू तिकडे. कोंकणातले इतरजणही आपापल्या गावाबद्दल चर्चा करतील.
11 Feb 2016 - 4:25 pm | सौंदाळा
+१००
11 Feb 2016 - 5:57 pm | विशाखा राऊत
खरच खुप आठवणी जाग्या झाल्या.
12 Feb 2016 - 11:02 pm | यशोधरा
खरंच, खरंच.
11 Feb 2016 - 2:54 pm | विशाखा राऊत
मी ह्यावेळी कोहाळेपाक आणला हेळेकरांचा.. खुपच आवडला सगळ्यांना. पुढच्या वेळी दुप्पट आण सांगितले आहे :)
11 Feb 2016 - 3:12 pm | सुनील
कोहाळेपाक म्हणजे उत्तरेत ज्याला पेठा म्हणतात तोच का?
11 Feb 2016 - 5:56 pm | वेल्लाभट
पण पेठा कोहाळ्यापासूनच बनवतात म्हणे.
11 Feb 2016 - 5:59 pm | विशाखा राऊत
पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा. कोहाळेपाकमध्ये बहुदा खवा पण असतो.
पेठा पांढराशुभ्र आणि कोहाळेपाक चॉकलेटी.
इथे लोकांनी फज म्हणून खाल्ले हिहिहि
9 Feb 2016 - 3:04 pm | असंका
एवढी भारी असते? गेली सहा वर्षं त्या गोपाळवरून जा ये करतोय. अगदी सुरुवातीला एकदा आत पाउल टाकलंय-सहा वर्षांपूर्वी.
आता एकदा जायला हवं....
9 Feb 2016 - 4:04 pm | नन्दादीप
आठवड्यातून एकदा तरी मिसळग्रहण करण्याचे व्रत घेतले आहे.... त्यातूनही गोपाळलाच जास्त...
तशी हल्ली राधाकृष्ण टॉकीज च्या बाजूला नवीनच खास मिसळ सेंटर उघडलय... फरसाण न घालता फक्त पापडीची मिसळ.... झक्कास एकदम...
अवांतर : नाही नाही म्हणता या प्रतिसादावर बरेच रत्नांग्रीकर मिपाकर समजले...
9 Feb 2016 - 5:36 pm | विशाखा राऊत
रसराज की काय... गोपाळच्या मिसळसाठी कुछ भी. :)
9 Feb 2016 - 5:55 pm | पैसा
रसराज जुनं ग! मी कॉलेज मध्ये असतानापासून आहे.
9 Feb 2016 - 6:01 pm | नन्दादीप
पैसा ताई, रसराजच ते..
फक्त हे नव्या साच्यातल... सद्ध्या तात्पुरत स्थलांतर केलय त्यानी...
9 Feb 2016 - 6:08 pm | पैसा
त्याने थिएटरच्या बाजूला लहानशा जागेत भेळेने सुरुवात केलेली. अप्रतिम भेळ मिळायची. कैरी घातलेली.
9 Feb 2016 - 7:17 pm | विशाखा राऊत
ताई तेच ते पण आता सध्या नवीन सुरु झालेय. पायनॅपल शिरा मस्त असतो तिथे असे बहिण सांगत होती.
कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही?
भेळ तर कधीही कुठेही मस्तच मिळते रत्नागिरीला.
10 Feb 2016 - 10:51 am | नन्दादीप
+१११११
11 Feb 2016 - 2:50 pm | स्वच्छंदी_मनोज
कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? >>> + १००. कॉलेजला असताना शेंबेकरांच्या कँटीनमध्येच पडीक असायचो आम्ही. त्यांचा मुलगा आमच्या बरोबरचा असल्याने आमची फुल वट कँटीनमध्ये :) :)
9 Feb 2016 - 4:01 pm | कपिलमुनी
फडतरे याक्क !
खुद्द कोल्हापूरकर फडतरेकडे खात नाहीत.
9 Feb 2016 - 4:08 pm | असंका
गर्दीमुळे फक्त!
शिवाय थोडं पुढे शेजारीच महालक्ष्मी मिसळ पण आहे की...
9 Feb 2016 - 2:12 pm | मीउमेश
मुनमुन मिसळ डोंबिवली ,
कवीची मिसळ चिंचवडगाव ,
पेण RTO ची मिसळ ,
मयुर मिसळ मंचर एस टी स्टेंड
9 Feb 2016 - 2:20 pm | प्रचेतस
अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच श्याम्पल आणते.
चिंचवडला कविपेक्षा मयुरची चांगली आहे.
9 Feb 2016 - 3:40 pm | खान्देशी
मयूर मिसळ किधर हय?
9 Feb 2016 - 5:45 pm | चाणक्य
वल्ली, 'जयश्री'ची पण चांगली असते.
11 Feb 2016 - 3:14 pm | जिन्गल बेल
चिंचवड ला अरिहंत मिसळ मस्त एकदम :) !!!!
9 Feb 2016 - 2:19 pm | प्रमोद देर्देकर
साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ भारी असे समजु नका. मागे खफवर लिहले होते तेच सांगतो त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन.
9 Feb 2016 - 2:23 pm | होबासराव
त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन.
हे बर्याच मित्रांकडुन ऐकले आहे.
9 Feb 2016 - 2:24 pm | मीउमेश
असं काहीही नाही , अफवा आहे
9 Feb 2016 - 2:27 pm | होबासराव
" होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले
वाह ! खुब जमेगि मेहफिल जब मिल बैठेंगे तिन यार...जबराट
9 Feb 2016 - 2:34 pm | भावना कल्लोळ
मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब भरले, पण जर मामलेदार मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर कधी कधी ठाण्यात आगमन झाल्यास चव घ्यावी असा मानस आहे, मिपा बंधुच्या मार्गदर्शनच्या अपेक्षेत.
9 Feb 2016 - 2:45 pm | शान्तिप्रिय
भावना कल्लोळ
ठाणे रेल्वे स्टेशन पासुन अगदी चालत्या अंतरावर आहे.
कोणालाही विचारा दुकानापर्यंत आणून सोडतील. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोरच!
9 Feb 2016 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
बाजारपेठ ठाणे, जिल्हा परीषद कार्यालयासमोर
9 Feb 2016 - 2:49 pm | मीउमेश
ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे
मामलेदार हाच मोठा लेन्दमार्क आहे
मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर ?
: अवांतर : हा अपमान आहे , ठाण्यात कुणालाही विचार नेउन सोडेल तिकडे…
9 Feb 2016 - 2:34 pm | संदीप डांगे
मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी सगळ्या मिसळ बळेबळेच्या कॉप्या... त्याही धड नाही. ;-)
खालील उतारा मी लिहिला नाही पण महाराष्ट्रात धा ठिकाणी खाल्ल्यावर हे खूपच पटलं:
नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऐवजी मिसळ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड घोषित करावे अशी माझी सरकार कडे मागणी आहे ,आणि नाशिककरना वाईन पेक्षा मिसळ जास्त भारी बनवता येते यावर माझा ठाम विश्वास आहे.
महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मिसळ बनते पण त्यानी मिसळ कशी बनवावी हे नाशिकला येउन शिकून घ्यायला हवे . पुण्यात मला एकदा मिसळ मध्ये बेदाणा लागला होता , कडेलोटाची शिक्षा असती तर मी त्या हॉटेल मालकाला लोटून दिला असता .
फरसाण आणि कांद्याचा चिखल उसळीत कालवण्याला काही शहरात मिसळ म्हणतात ,त्यांची मला दया येते. डायट मिसळ नावाचा एक बोगस पदार्थ मी एकदा खाल्ला होता हे मी मान खाली घालून कबूल करतो , परत हा गुन्हा मी करणार नाही , क्यालरी मोजून घाबरत घाबरत खायचा हा पदार्थच नाही .
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे , ही असली तर्री आपण खाल्ली तर काय परिणाम होईल असले भेकड विचार ज्यांच्या मनात येतात त्यांनी दह्यात बुडवून ढोकळा खावा, मिसळ नाही .
छोट्या वाटीत वेगळी “तर्री ” देतो तो मुरलेला नाशिककर मिसळवाला नाही, खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो . तर्री वाढण्यात कंजूसपणा करणारा आणि त्याचे extra पैसे मागणारा हा नीच माणूस असतो , तो नाशिककर असू शकत नाही ….
रस्सा आणि तर्री यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना नाशिकचे रेशन कार्ड मिळत नाही .
मिसळ ही नाशिकची कुंभमेळ्या पेक्षा जास्त उदात्त ओळख असायला खरतर काहीच हरकत नाही पण मिसळीसाठी केंद्राचा निधी येत नाही आणि कुंभमेळ्यासाठी येतो म्हणून ठेकेदार आजही नाशिकला “मिसळ ग्राम” ऐवजी कुंभग्राम म्हणतात .
नाशिकचा विकास आराखडा बनवताना Special Economic Zone (SEZ ) सारखे Special Misal Zone (SMZ ) सरकारने बनवायला हवेत . Readymix , Precook मिसळीच्या निर्यातीसाठी विशेष चालना द्यायला हवी . जगभरात राहणार्या भारतीयांची मोठीच सोय त्यामुळे होईल .
Global Misal Festival नाशिक मध्ये साजरा केला जायला हवा . देखण्या models आपल्या हाताने मिसळीसाठी भराभर कांदा कापताहेत आणि त्यातल्या काही प्रेमाने तर्री वाढताहेत असले काहीतरी त्या फेस्टीवल असायला काहीच हरकत नाही . शालेय पोषण आहारात बेचव खिचडी ऐवजी मिसळ पाव दिला तर पोर जास्त आनंदाने शाळेत जातील आणि खातील , फक्त मिसळ नाशिकची हवी .अमुक एक गुन्हा केला तर आयुष्यभर मिसळ खाता येणार नाही अशी जर शिक्षा ठेवली तर नाशिककर तो गुन्हा कधीच करणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे .
अनेक भुक्कड लोकांना पद्म पुरस्कार मिळताना मी पाहतो , मिसळ बनवण्याची अभिजात कला ज्यांनी टीकवून ठेवली आहे त्या एकाही नाशिककर मिसळवाल्याला अद्याप पद्मश्री मिळू नये याची मला खंत आहे .
(मंदार भरडे -की भारदे?- यांच्या ब्लॉगपोस्टवरुन साभार)
9 Feb 2016 - 2:46 pm | बोका-ए-आझम
मखमलाबादची रामभाऊ पिंगळ्यांची काळा मसालावाली झणझणीत मिसळ आणि नदीजवळची समर्थ कोल्ड्रिंक्सजवळची एक मिसळ (नाव विसरलो. मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत)या दोन्हीही अफाट. मामलेदार असते झणझणीत पण कधीकधी नुसताच तिखटपणा असतो असं वाटतं. पु.लं. कडून वाक्य उधार घेऊन म्हणतो - या मिसळींनी नाशिकच्या वाईनला जी झणझणीत साथ दिली ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या आसमानात पोचवून आली!
9 Feb 2016 - 3:11 pm | संदीप डांगे
मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत
>> अगदी अगदी. माझाही हाच प्रॉब्लेम होतो.
9 Feb 2016 - 5:22 pm | पगला गजोधर
नाशिककडून सिन्नरमार्गे शिर्डीकडे जाताना कदाचित, वावी इथे बाजारपेठेतील टपरीवर, श्याम्पल रस्सा शेव पाव मिसळ खाल्ली, अतिशय शिम्पल पण तरीही चविष्ट होती…
13 Feb 2016 - 1:09 pm | रषातु
राम भाऊ ची मिसळ.... नाव आठवले
13 Feb 2016 - 1:10 pm | रषातु
राम भाऊ ची मिसळ.... नाव आठवले
9 Feb 2016 - 2:48 pm | मृत्युन्जय
ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप काहितरी आहे ना नाशकात? तिथे मिसळीबरोबर पापड वगैरे असा सरंजाम असतो आणि मिसळ काहितरी ९० का १०० रुपयाला आहे. कुठले हॉटेले ते?
बादवे एका दर्दी मिसळप्रेमीने सांगितल्याप्रमाणे एकदा खाण्यासाठी नाशकातली मिसळ चांगली वाटते पण काही खास असे नाही. सांगणारा पुणेकर होता आणि बेडेकरच्या प्रेमात आहे हे नमूद केले पाहिजे. याच माणसाने हे पण मान्य केले की बेडेकर पुणेकरांना सोडुन इतरांना आवडत नाही तसेच असावे हे :)
9 Feb 2016 - 3:22 pm | संदीप डांगे
अशी बरीच हॉटेलं आहेत. मिसळीबरोबर नागली-नाचणीचा पापड, तर्री, मिसळ वेगवेगळी एक्स्ट्रा... मिसळीत घटक पदार्थपण इतके की बास...
बाकी बेडेकर प्रेमींबद्दल आणि पुणेकरांबद्दल बरोबरच आहे. आमच्या अकोलेकरांनाही पानीपुरी आणि बर्फाचा गोळा अकोल्यातल्याशिवाय कोणाचाच चांगला वाटत नाही. नॉस्टेल्जिक टैप.
9 Feb 2016 - 3:26 pm | होबासराव
रंग्गीन गोला :))
9 Feb 2016 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
बावा आम्ही नवा मोबाइल घेतला होता ११०० नोकियाचा तवा जब जब नंबरं जमा करत जाओ!! आमचा एक गोलेवाला होता "टोपी" ओरिजिनल जौनपुर चा मुसलमान त्याले बी देल्ता नंबर!! गड़ी जवा जवा फोन करत जाय मस्त स्क्रीन वर "गोलेवाला कॉलिंग" दिसे!! अजुनगी हाय वाटते जित्ता थो!! आम्ही यक रुपयांचा गोला खात जाओ अन इतर कारमेल मधील मारवाड्याईचे लेकरं दहा दहा च्या आइस डिस खात बापा!!
9 Feb 2016 - 4:21 pm | अनिरुद्ध.वैद्य
आकोलेकी पाणीपुरी बोलेतो एक नंबर भो …
9 Feb 2016 - 4:37 pm | संदीप डांगे
बास बास. एकदम!
फक्त एक करा पावनेबॉ (पंत या अर्थाने), ते पाणीपुरी नाही, पा'नी'पुरीच म्हणायचं. ;-)
9 Feb 2016 - 4:40 pm | होबासराव
सोयरे-धायरेच हाव ना हो आपन सारे
9 Feb 2016 - 4:41 pm | संदीप डांगे
बापुसायेब सांगत होते ना हो की अनिरुद्धबॉची सासुरवाळी हाये आकोल्याले... मंग आपले पावनेबॉ नैत का?
9 Feb 2016 - 4:46 pm | होबासराव
सांगा मंग पावनेबॉ (अनिरुध्दराव)* कई हाय नेक्श्ट अकोला वारी ?
* आम्च्या अथि जावयाले राव लावाच लागते, आन अहो-काहो कराच लागते...जावयाले अरे कारे हे नागपुर फॅशन होय.
9 Feb 2016 - 5:33 pm | अनिरुद्ध.वैद्य
अर्र स्वारी बरका … आतापासन पानीपुरीस.
मार्चमध्ये चक्कर होईल मोस्टली. पन राव नका लाउ भो … आपन पयले मिपावाले ;)
9 Feb 2016 - 2:52 pm | मुक्त विहारि
मिपा कट्टा, नाशकातल्या मिसळी बरोबर करू...
9 Feb 2016 - 3:11 pm | संदीप डांगे
कधीपासून वाट बघतोय तुमची कृपादृष्टी नाशिककडे वळण्याची.
9 Feb 2016 - 2:56 pm | मीउमेश
मी जिकडे जातो तिकडची मिसळ हमखास खातोच
बर्याच ठिकाणी शहरात, गावा - खेड्यातली मिसळ खाल्ली आहे
नाशिक ची मिसळ इतकीशी नाही आवडली
9 Feb 2016 - 3:09 pm | संदीप डांगे
कुठे आणि कधी खाल्ली ते महत्त्वाचे. आजकाल मिसळीच्या नावावर कोणीही सोम्यागोम्या दुकानं टाकायला लागलेत. असे झटके मीही सुरुवातीला खाल्ले. माझेही हेच मत होते. माझा मेहुणा एवढा का तुड तुड उडतो नाशिकच्या मिसळीवर ते मला काही कळेना. नंतर चित्र बदलले! :-)
9 Feb 2016 - 3:40 pm | बोका-ए-आझम
http://www.misalpav.com/node/20565
9 Feb 2016 - 9:45 pm | भुमन्यु
आठवणिंनी मन भरुन आलं. पोटापाण्यासाठी नासिक सुटलं आणि चांगल्या मिसळ पण. कॉलेजात असतांना सकाळी ७ - ७३० ला पण विहार किंवा श्यामसुंदर ला हजेरी लावायचो. नाही तर एच.पी.टी. च्या हिरव्या कँटीनला (२००२-०७) (जिमखान्या जवळ) रतीब लावलेलाच होता. पॉकेट मनी कमी असायमग, मग ३ मिसळ मागऊन त्यात ५ जण तृप्त होईपर्यंत पाव आणि तर्री मागवायचो. आता साधनाच्या चुलिवरच्या मिसळीबद्दल ऐकलंय. बघु कधी जम्तंय ते.
9 Feb 2016 - 11:21 pm | अभिदेश
नाशिकला विन्जिनीरिन्गला असताना सकाळि तुशार (college road) आणि सन्ध्याकाळी अम्बिका (पन्चवटी)हा ठरलेला कार्यक्रम.
9 Feb 2016 - 2:34 pm | मीउमेश
लढ बाप्पू
9 Feb 2016 - 2:35 pm | शान्तिप्रिय
मामलेदार ची मिसळ नंबर १.
जगात भारी मामलेदारची मिसळ ठाणेरी!
(जगात भारी कोल्हापुरी (अख्खा मसुर) च्या तालावर!)
9 Feb 2016 - 2:56 pm | अभ्या..
मापं हे आमचे खास मित्र असले तरी मामलेदाराची मिसळ तेवढी खास नै. दोनतीन वेळा शनिवार असलेने खायचा योग हुकलेला पण एकदा खाल्लीच. अगदी बोगस म्हणले तरी चालेल. जेवढे कौतुक ऐकले होते त्याच्या १० टक्के सुध्दा भारीपणा आढळला नाही. कोल्हापूरची फडतरे तर लै वेळेला चाखलेली. ती एक वेळ भारी म्हणता येईल. जस्ट २ दिवसापूर्वी पंढरपूरला जाताना सोलापूरच्याच हद्दीत हायवेवर चटणीवाल्या ठेंगीलचीच ही मिसळ.

सोलापूरात तसे मिसळीचे जास्त प्रस्थ नाही. लाईन लावून हॉटेलात थांबणे हे धंदे पुणेमुंबईकरच करु जाणे. त्यामुळे मिसळीचे असे खास ठिकाण सोलापुरात नसले तरी ही मिसळ टेस्ट आणि झणझणीतपणात मामलेदाराच्या कीतीतरी उजवी होती. शिवाय आमचे सोलापुराचे स्पेशल रेट. मग काय....हाणली दाबून प्लस लिटरभर ताक. आहाहाहाहा.
9 Feb 2016 - 3:35 pm | माम्लेदारचा पन्खा
थोडाफार दर्जा बदलला असेल पण मामलेदारला पर्याय नाही...
माझ्या मताचा फेरविचार मी करावा असं वाटत असेल तर मला इतर ठिकाणं नेऊन दाखवा....
अवांतर .....आम्ही तुमच्या सोलापूरच्या शेंगाचटणी ,दहीआणि भाकरीवर लय मरतो !
9 Feb 2016 - 3:40 pm | अभ्या..
मापंदादा एक ठिकाण तर वर दाखवलेलं हाय. त्यासाठी मात्र सोलापुरात यावं लागेल.
या महिन्यात निमंत्रितांच्या कट्ट्याचा प्लान चालूय. तुम्हीबी या. दुपारी दहीचटणीभाकरी नंतर संध्याकाळी मिसळ खाऊ. कसे?
9 Feb 2016 - 3:47 pm | बोका-ए-आझम
नरीबाला का असंच काहीतरी नाव असतं ना त्या ज्वारीचं?
9 Feb 2016 - 3:51 pm | अभ्या..
नरीबाला हे काय एकलेले नाय ब्वा. आमच्या इथल्या ज्वारीला दगडी शाळू म्हणतात. पांढर्या शुभ्र अन पातळ भाकर्या होतात एवडे माहीत. आता कडक ५/१० भाकर्यांचे पाकीट पण मिळते. महिनाभर टिकते.
9 Feb 2016 - 5:00 pm | कपिलमुनी
बॉर !!
9 Feb 2016 - 5:33 pm | टवाळ कार्टा
माजघरातल्यांचा आहे का कट्टा?
9 Feb 2016 - 5:36 pm | अभ्या..
हम्म. म्हणू शकतोस. सगळे माजलेलेच हायेत. तुझा शिल्लक राहिला असेल थोडासा तर ये तू बी.
9 Feb 2016 - 5:43 pm | चांदणे संदीप
मोठ्ठा ब्बोर्र!!
;)
Sandy
9 Feb 2016 - 11:24 pm | अभ्या..
घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा ठेवायची नसती सॅन्डीबाबा. नीट पंगत वाढायला घ्यायची असती. वेगळे सांगायचे का तुला.
9 Feb 2016 - 2:44 pm | होबासराव
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे....जबरा
खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो .. ह्याचा फायदा घेतलाय सप्तश्रुंगि ला...आन तर्रि आन रे बावा..वेटर कंटाळला होता.
9 Feb 2016 - 2:46 pm | होबासराव
मिसळ-पाव म्हणजे नाशिक
पन गिल्लि-मिसळ अकोलाच.