लदाख सायकल ने : शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
8 Feb 2016 - 7:07 pm

चीन ची सीमा रेषा पण इथून जास्त लांब नाही. त्यामुळे परमिट घ्यावेच लागतं.
१५ ते २० मिनिट थांबून परत निघालो. येताना थोडासा उतार होता पण जाताना तोच थोडासा उतार थोडासा चढ झाला. रस्त्या मधेच गाढवांची झुंड पाहायला मिळाली. मी आल्यावर जोरात पळाले. आकाश्यात ढग होते. त्यामुळे खूप थंडी होती. साढे सात वाजता जेव्हा मी आपल्या ठीकाण्यावर पोहोचलो तर थंडीनं कापत होतो. जेवण करून गोधडीत घुसलो, तरी पण कापत होतो. इथली उंची ४६३० मीटर आहे. ह्याच्या पेक्षा जास्त उंचीवर झोपलो होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती, आज काय झाले कुणास ठाऊक?
आज पांग ते शो-कार मोड ते शो-कार परत शो-कार मोड अशी तब्बल ८८ किमी सायकल चालवली.

दिवस बारावा

साडे सात ला उठलो. वरती बघितले तर तंबू गळत होता. माझ्या अंथरुणात पण पाणी पडले होते. तंबू ला जर रेन कोट लावला नाही तर असच होणार. बाहेर येउन बघितले तर पाउस नाही, बर्फ पडत होता. आज मला तंगलंग-ला पार करायचं होतं. इथेच 4630 मीटर वर बर्फवृष्टी होत आहे तर तिकडे 5300 मीटर वर तंगलंग-ला ला काय होत असेल,याचा विचारच नको करायला.
अश्या बर्फवृष्टीत जाऊ कि नको हाच प्रश्न पडला होता. नंतर विचार केला कि नकोच जायला. पुढे ८ किमी वरती डेबरिंग आहे तिथे थांबूया आणि तंगलंग-ला उद्या पार करूया. तो पर्यंत बर्फवृष्टी पण थांबेल. बर्फवृष्टीत बाहेर पडणं बरोबर नाही. मग तिथेच थांबलो. चहा घेतला.

परत मनामध्ये कुजबुज सुरु झाली. मी द्विधा मनस्थिति मध्ये होतो. एक मन म्हणत होते कि नको जाऊ. तर दुसरे मन म्हणत होते कि, "लवकर निघ येथून."
का जाऊ?
"अरे, बर्फ एवढा पण पडला नाही कि, तुला चालता येणार नाही. खाली जमिनी कडे बघ !! बर्फाचे तर नामोनिशान पण नाही. तुरळक बर्फ पडला आहे. त्यात थंड हवा पण नाही. असं हवामान किती दिवस राहणार ते पण सांगू शकत नाही. असच जर हवामान दोन ते तीन दिवस राहिले तर तंगलंग-ला पण बंद होऊन जाइल. म्हणून लवकरात लवकर तंगलंग-ला पार कर."

मी दुसऱ्या मनाचे ऐकले. कारण आधीच मला तंगलंग-ला ची भीती होती. त्यात जर मी इथे थांबलो तर तंगलंग-ला हा माझ्यावरच भारी होईल. उद्या जायला ताकत पण रहायची नाही. आता पर्यंत चार घाट पार केलेत हा पण पार करेल.
गरम कपडे अंगावर चढवली. त्यावरती रेनकोट घातला आणि पावणे दहा वाजता येथून निघालो. रस्ता तर खराब होताच. पण उतार असल्यानं सायकल वेगाने जात होती. इथून तंगलंग-ला २५ किमी दूर होतं. थोडे पुढे गेल्यावर एक कुत्रं तंबू मधून भुकत आलं. मी सायकल तिथेच थांबवली. मग तो पण थांबला. मी परत पुढे जायचा प्रयत्न केला. तो पण भुकत भुकत पुढे आला. बरं झालं त्याच्या आवाजाने अजून कुत्री जमा झाली नाही. मग तंबू मधून एक बाई आली आणि तिने त्याला हुसकून लावलं.

मोरे मैदान हे गुरे चरण्यासाठी चागली जागा पण आहे. इथे कोणते गाव नाही पण बक्रीवले आणि याक वाले इथे येउन ठाण मांडून बसतात. यांची घर म्हणजे तंबुच असतात. त्यांची सुरक्षा हि कुत्र्या वरच अवलंबून असते. हे लद्दाखी कुत्रे बिबट्या बरोबर सुद्धा भिडतात. हे माणसाना काहीही करत नाही. रस्ता २४ तास चालू असतो. ह्यांना त्याच्याशी काहीही देणे घेणे नसते. आज बर्फ पडत होता. बकऱ्या आणि याक हे तंबू मधेच बंद होते. चरण्यासाठी बाहेर पडलेच नाही. त्यामुळे हा कुत्रा बोर झाला असेल. सकाळ पासून भूकलो नाही चला तर ह्याच्यावरच भूकुया.

डोक्यावरती जो रेनकवर होता, तो इतका नालायक होता कि, डोकं जरी हलवले तरी तो हलायचा नाही. त्यामुळे इकडे तिकडे बघण्यासाठी सायकल थांबवायला लागायची. तेव्हा कुठे तरी इकडचे तिकडचे दृश पाहायला मिळायचे. याचा परिणाम असा झाला कि, डेबरिंग कधी निघून गेले ते कळालेच नाही. दूसरा कारण असं होतं कि, डेबरिंग मध्ये मला तंबू दिसलेच नाहीत, जे दिसले त्यांना बकरीवाल्यांच समजून बसलो असेल.

डेबरिंग माझ्या साठी खूप महत्वाचं होतं कारण सकाळी दोनच परांठे खाऊन निघालो होतो. अंतर ८ किमीचे अंतर दीड तासात पूर्ण करून डेबरिंग ला पोहोचलो असतो. मग हवामान बघून ठरवले असते कि, थांबायचे कि जायचे. जायचे असते तर सोबत पराठे पैक करून घेतले असते. पण डेबरिंग कधी गेले ते कळालेच नाही. जेव्हा कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. बीआरओ च्या एका कामगाराला विचारलं होतं कि, डेबरिंग किती लांब आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नाही. ना डोळ्यात चमक, ना चेहऱ्यावर हास्य, ना आनंद ना कोणतंच दुख!! एकदम भाव विरहित. मी तर अश्या लोकांना लाशच म्हणतो. शेवटी परत दोनदा विचारल्यावर त्याने उत्तर दिलं कि, डेबरिंग तर माग राहिलं. बोला आता. !!

तंगलंग-ला ची चढाई सुरु झाली होती. एक वेळ अशी आली कि पैडल मारायचे पण मुश्किल झाले होते. मग सायकल ओढत चालू लागलो. हा उंच पर्वतीय आजार होता. आता हवा पण जोरात सुटायला लागली होती. हवेबरोबर कापसा सारखा बर्फ पण उडत होता. हाताची बोटे पण थंडीन आकडली होती. पायात मी बूट घातले नव्हते म्हणून चप्पल च्या आतून मौजे घातले.

दोन वाजले होते. जास्तच बर्फ पडायला लागला म्हणून बीआरओ च्या तम्बू मध्ये घुसलो. एक तर काळा तम्बू, त्यात अंधार, काळ्याच झोपायच्या पिशव्या आणि त्यात काळे कामगार!! सुरुवातीला वाटले कि, मी फक्त अंधाऱ्या मोकळ्या तंबू मध्ये घुसलोय. जेव्हा हळू हळू डोळे स्थिरावले. तेव्हा बघितलं तर, स्लीपिंग बैग मध्ये कामगार घुसून पडल्यात. मग विचारपूस सुरु झाली. काही जण पत्ते खेळत होते. मी त्यांना म्हटले थोडा वेळ आराम करतो मग पुढे जातो. जोराची भूख लागली होती. सकाळी फक्त दोन पराठे खाऊन निघालो होतो. तसं बैग मध्ये सुखा मेवा आणि फरसाण ठेवलेल होतं पण या कामगाराच्या समोर बसून कसं खाणार?

तिथून निघताना त्यांना विचारलं कि तंगलंग-ला अजून किती लांब आहे. म्हटले खूप दूर आहे. मी म्हटलं, तरी पण ? पंचवीस ते तीस किलोमीटर. हे ऐकून तर मला हसायला यायला लागली. गेल्या चार तासापासून चालतोय. त्यावेळेसच पंचवीस किलोमीटर नक्कीच असणार. दहा किलोमीटर तर नक्कीच चाललो असेन. आता दहा किलोमीटर पेक्षा जास्त नसणारच हे नक्की. परत अश्या हवामानात बाहेर पडलो. माहिती मिळाली कि, पुढे पण बीआरओ चे तम्बू लावलेले आहेत. विचार केला कि, पुढे जायला कठीण झालं तर या तंबू मधेच रात्र काढायची.
समोरून एक गाडी येउन थांबली. ड्राइवर एकटाच होता. मला तो दम भरू लागला. अश्या हवामानात तू जास्त हिम्मत करू नकोस. कोणत्यातरी ट्रक वरती सायकल टाक आणि तंगलंग-ला पार कर. आणि हे पण सांगितले कि, इथेच इतकी जोराची हवा आहे मग तंगलंग-ला किती जोरात असेल. उडून जाशील.
तो गेल्यानंतर मी पण विचार केला कि तो बरोबर म्हणत होता. मी खूप थकलो होतो. चालवतच नव्हतं. हवेची कमी पण जाणवत होती. आणि का नाही? 5000 मीटर उंचावरती होतो. चार पावलं पुढे चाललं कि थांबायचो. त्यात वरून बर्फाची थंड हवा. हाथ मौजे घालून सुद्धा बोटे सुन्न पडली होती. एका अश्या ठिकाणी थांबलो कि जिथं हवा कमी लागत होती. कोणत्या तरी ट्रक मध्ये सायकल टाकतो आणि तंगलंग-ला पार करून रूमसे ला पोहोचतो. अडीच वाजले होते. ट्रक वाल्याला जास्त वेळ थांबायला लागू नये म्हणून सायकल वरचं सामान काढून ठेवलं. आणि दुसरा म्हंजे सायकल वर चढवायला पण कष्ट कमी लागतील.

पहिल्यांदा मिलिटरीचा ट्रक आला. मी हात केला तर थांबवला. मी त्याला माझी समस्या सांगितली. त्याने म्हटले कि मागून भरपूर ट्रक येतायेत. त्याच्यात ठेव आणि पुढे जा. माझा पहिला प्रयत्न वाया गेला. आणि हे मिलिटरीवाले आपल्या सारख्या ‘सिविलियन’ ची मदत कश्याला करतील? ते देशाचे रक्षक, सीमारेषे वरती लढणारे ... मग एका सिविलियन बरोबर कशाला बरोबरी करतील? सिविलियन ची मदत ते तेव्हाच करतात जेव्हा त्यांना वरून आदेश येतो. भूकंप असू किंवा पूर असू. अश्याच प्रकारे एका मिलिटरी वाल्यांनी ऊधमपुर स्टेशन वरती धिंगाणा घातला होता. झाले काय तर, तिकीट खिडकी वरती मोठी लाइन होती. मिलिटरीवाल्याला पण तिकीट घ्यायचे होते. एकच खिडकी. पण तो सिविलियन बरोबर कसं लाइनला थांबेल.? सरळ खिडकी पाशी गेला. वर्दी मध्ये होता. क्लर्क ने तिकीट द्यायला मनाई केली. सांगितलं कि लाइनला थांब. बस, मग काय हाल्ल ना बाबाच डोकं.....शिव्या गाळ्या सुरु. "मैं फौजी हूं, साला हम बॉर्डर पर जाकर दुश्मन से लडें, गोलियां खायें और यहां सिविलियनों के साथ लाइन में खडे हों।" खूप धिंगाणा घातला त्याने. क्लर्कला तर, अशी लोकं दररोज भेटतात. शेवटी तिकीट नाही दिलं.

त्यानंतर दोन ट्रक आले. हात केला तर थांबले. नाही म्हणून सांगितलं. म्हणाले कि,जागा नाही ट्रक मध्ये. मी म्हटलं, छत खाली आहे आणि रेलिंग पण लावली आहे बाजूनी. म्हटले चढव मग. मी म्हटलं मी एकटा नाही चढवू शकत. तुमची गरज लागेल. म्हणाले कि अश्या बर्फाच्या तुफानात मदत? ते पण निघून गेले.
नंतर तीन टैंकर आले. त्यांना रेलिंग पण होती आणि वरती चढण्यासाठी शिड्या. मी हाथ केला तर नाही म्हणून निघून गेले.
त्यानंतर परत ट्रक आले. त्यांच्यात चांगली माणसे पण असू शकतात. पण माझी सहनशीलता आता संपली होती. परत सामान बांधले आणि निघालो. आणि ह्या सगळ्या ट्रक वाल्यांना शाप पण दिला कि, पुढे जाऊन पंक्चर होऊ दे. माहित नाही कि, माझा शाप खरा ठरला कि खोटा. बर्फ जास्त नव्हता पण त्यामुळे सगळा चिखल झाला होता. त्यात पायात मौजे घालून चप्पल घातली होती म्हणून चालता येत नव्हते.

शेवटी कामगारांचे तंबू भेटले. जीवात जीव आला. उंची ५१३० मीटर होती. म्हणजे तंगलंग-ला इथून चार किलोमीटर पेक्षा जास्त दूर नसेल. जर मला आज जेवण भेटला असतं तर मी कधीच पार केलं असतं. भूख, उंची, चढ, तूफान या सगळ्या कारणाने माझे शरीर शक्तिहीन झाला होतं. विचार केला कि इथेच थांबावे. एका तम्बू मध्ये घुसलो. सगळे झारखण्डी कामगार. आत जाउन बघितले तर, माझे डोळेच बाहेर आले. पाय ठेवायला पण जागा नव्हती. सगळे साले स्लीपिंग बैग मध्ये घुसून पडले होते. तरी त्यांनी म्हटले सामान घेऊन ये. जागा होईल. मी म्हटलं कोणाचं स्लीपिंग बैग शिल्लक आहे का? म्हणाले नाही. एक जण म्हणाला माझ्या बैग मध्ये ये. मी सामान घेऊन आलो. टैण्ट बाहेर सायकलला तसाच ठेवला. स्लीपिंग बैग होती माझ्याकडे, त्यांच्या कडे असती तर तेवढीच बाहेर काढायची वाचली असती. सगळे कामगार इकडे तिकडे हलले आणि मला जागा झाली. मी माझी स्लीपिंग बैग काढली तर हसायला लागले. इतका नाजुक, एकदम छोट्या पैकेट मध्ये येऊ शकणारं मग हि बैग कशी काय थंडी पासून संरक्षण करेल.? त्यांच्या बैगा ह्या मिलिटरी च्या कापसानी बनलेल्या. त्या बैगाना जागा पण जास्त लागते. त्यांनी मला सल्ला दिला कि दुसऱ्याच्या बैग मध्ये झोप. यात थंडी निघणार नाही. मी म्हटलं., माझी बैग दिसायला छोटी असली तरी त्यात गर्मी खूप आहे. वाटलं तर बैग अदला बदली करून आजमावून बघा.

मी खूप भुकेलो होतो. इथे जेवायला पण मिळाले असते. पण मी नाही जेवलो. कारण खायचे पैसे ह्यांच्या पगारातून कट होतात. इथे जेवण खूप महाग आहे. त्यामुळे जास्त पैसे कट होतात. झोपायला जागा मिळाली तेवढेच भरपूर आहे.
मी खाण्यासाठी काजू, मनुके आणि फरसाण काढले. माझ्या स्लीपिंग बैग मध्ये जागा कमी म्हणून शेजारच्याच्या स्लीपिंग बैग च्या वर ठेवलं. अर्धा पैकेट काजू होतं. मी म्हटलं सगळ्यांनी वाटून घ्या. सगळ्यान मध्ये वाटलं. नंतर मी फरसाण खाऊ लागलो आणि पाणी पिऊ लागलो. तेवढ्यात शेजारच्यानी मनुक्याच पैकेट उचलून आपल्या बैग च्या आत मध्ये ठेवलं. मी फरसाण खाऊन पैकेट मागितलं तर म्हणाला कसलं पैकेट? मी म्हटलं, मनुक्याच!! म्हणाला कि ते वाटून घेतलं. मी म्हटलं, तू मला येडा बनू नको. काढ चल आतून. तेव्हा त्यांनी बैग च्या आतून काढलं.

इथे सगळ्यात मोठी भीती चोरी ची होती. सगळेच चोर होते साले.. मैदानाकडून आले होते. माझ्या जवळ थोडेच सामान होते. ह्यातील एक पण गोष्ट चोरी झाली तर याचा परिणाम पुढच्या यात्रे वर पडणार होता. मोबाइल आणि कैमरा मी आपल्या स्लीपिंग बैग मध्ये ठेवला. बाकी सगळे डोक्याखाली घेतले. बाहेर सायकल आणि टैण्ट होता. सगळ्यांनी सल्ला दिला कि, ते पण आत मध्ये घे. लद्दाखी गुराखी ते पण घेऊन जातील. मी नको म्हटले. मनात म्हटले कि, साले तुम्हीच चोर आहात आणि दुसऱ्याच सांगता. ते तर डोंगर भागातले आहेत. त्यांना चोरी करता येत नाही.
आयुष्यात पहिल्यांदाच ५१३० मीटर उंचा वरती झोपत होतो. तुमच्या पैकी तर ९०% लोक एवढ्या उंचावर गेले पण नसतील. ह्या भागात फोटो कमी आहेत. कारण हि तसेच आहे सकाळ पासून जितका चाललोय तेवड्या बर्फाच्या थंड हवेतच चाललोय. हाथ मौजे काढून,कैमेरा चालू करण्याचा प्रश्नच नाही.
आज फक्त १९ किमी सायकल चालवली.

(क्रमशः)
पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

सहनशक्तीची परीक्षा घेणारा दिवस.
लहरी निसर्ग आणि लहरी मनुष्य दोघांचेही अनुभव एकत्रच.
आवडला हा भाग सुद्धा.

मयुरMK's picture

8 Feb 2016 - 9:07 pm | मयुरMK

फोटो क्रमांक ३ जबरदस्त
हाही भाग छान !

वेल्लाभट's picture

8 Feb 2016 - 9:21 pm | वेल्लाभट

कल्ला ! ! ! !

फोटो आवडले. एकूणच कठीण आहे प्रवास हा. नीरज जाट ह्यांच्या चिकाटीचे कौतुक.
हे सारे असले तरी बीआरओच्या कामगारांबद्दल काढलेले उद्गार, वापरलेली भाषा नाही आवडली. माफ करा. जीवावरचा धोका पत्करुन ही माणसे हिमालयामध्ये काम करत असतात, ते आहेत म्हणून हिमालयातले रस्ते चालते फिरते आहेत, हेही तितकेच खरे..

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 7:48 pm | अप्पा जोगळेकर

सहमत. पण इतक्या कठीण परिस्थितीमुळे त्यांची चिडचिड झाली असेल. आधीच तिथे ऑक्सिजन कमी असतो. मन थार्यावर राहात नाही.

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 7:50 pm | यशोधरा

हो, ते आहेच, नाकारीत नाही.