लदाख सायकल ने : पांग ते शो-कार मोड (भाग ९)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
7 Feb 2016 - 2:08 pm

शेती जास्त प्रमाणात होत नाही म्हणून मांस जास्त खातात. लद्दाख सारख्या ठिकाणी तर हे गरजेचं आहे. ते तिघे यात्रेकरू होते. तिसरा शेजारच्या तंबू मध्ये खात पीत होता. त्यानंतर नाच गाणी सुरु झाली. एक गोलाकार चक्कर मारून नाच सुरु झाला. ती बाई इतके हळू हळू पाय उचलीत होती कि जशी काय झोपली नाचता नाचता. मी पण एक तास कार्यक्रम पाहिला आणि झोपायला गेलो.
आज २८ किमी सायकल चालवली.

दिवस अकरावा

सकाळी साडे सातला डोळे उघडले. हॉटेल च्या मालकिणीने "जुले जुले" म्हणून आमचा स्वागत केलं. आता मी "जुले जुले" च्या धरतीत प्रवेश केलाय त्यामुळे मला पण हीच परंपरा शिकावी लागणार आहे.
सायकल वरती सामान बांधत होतो तितक्यात स्पीति वाले तीर्थ यात्री आले. त्यातील एकाचं नाव रणजीत सिंह होतं. बौद्ध नाव दुसरेच आहे. त्यांचे वडील पंजाबी होते म्हणून रणजीत हे नाव ठेवलं. पिन घाटी मध्ये शगनम या आपल्या गावी ते ट्रैकिंग करतात. त्यांनी आमंत्रण दिला कि, पिन-पार्वती पास किवां भाभा पास पासी, जर ट्रैकिंग करायची असेल, तर या आमच्या घरी. आता मी खालच्या भागात राहणारा माणूस पिन-पार्वती किंवा भाभा पास ला ट्रैकिंग करायला शगनम कशाला जाईल? सगळे लोक मणिकर्ण या किन्नौर वरून ट्रैक सुरु करतात आणि मुद मध्ये संपवतात. असं उलट डोकं कुणी सांगितलंय चालवायला?

नौ वाजता पांग मधून बाहेर पडलो. पांग 4486 मीटर उंचावर आहे. आज चा लक्ष्य 52 किलोमीटर लांब 4800 मीटर वरील डेबरिंग.. कारण उद्या तंगलंग-ला पार करायचे होते. पांग वरून निघताक्षणिक चढाई चा सामना करावा लागला. गूगल मैप वर बघितलं तर कळलं कि थोडी सी चढाई आहे. त्यानंतर मोरे चं सपाट मैदान येणार आहे. हीच थोडी सी चढाई पांच किलोमीटर पर्यंत ताणली गेली. बरोबर दीड तासात खूप ऊर्जा पण गेऊन गेली. ह्यावर चढून जेव्हा 4745 मीटर वर पोहोचलो तर समोर पाहिले तर मोठ्ठं मैदान आणि सरळ रस्ता दिसत होता. आता पाय पैडल मारायला आणि हाथ गियर टाकायला पुढे सरसावले.

मोरे मैदान ची रुंदी जास्त नाही पण लांबीला 60 किलोमीटर लांब तंगलंग-ला च्या खालपर्यंत पसरलेलं आहे. डेबरिंग ला जाणारा रस्ता ह्याच मैदानं मधून जातो. त्यानंतर रस्ता तंगलंग-ला पार करण्यासाठी वरती चढतो आणि मैदान खाली राहत. ह्याच मैदानाच्या एका बाजूला पांग आहे तर दूसरी बाजूला तंगलंग-ला. पांग 4486 मीटरच्या ऊंचाई वरती आहे तर तंगलंग-ला 5300 मीटर वर. साहजिकच, मैदानाचा उतार हा पांग च्या बाजूला पाहिजे. पण तसा नाहीय तंगलंग-ला च्या बाजूला आहे. हा उतार शो-कार मोड पर्यंतच राहतो मग हेच मैदान चढाई सारखा होता.

खरं म्हणजे मोरे मैदान हे एक २ किमी रुंदी असलेलं नदीपात्र आहे. लद्दाख मध्ये पाउस जास्त पडत नसल्याने ते कोरडेच आहे. पूर्ण रस्ता हा ह्याच मैदानाच्या उजव्या बाजूने जात राहतो. हा रस्ता पांग च्या वरच्या बाजूने सुरु होतो तिथे ह्याची ऊंचाई 4745 मीटर आहे. नंतर 36 किलोमीटर लांब शो-कार मोड वर ह्याच रस्त्याची उंची 4627 मीटर आहे त्यानंतर थोडीसी चढाई सुरु होते. नंतर 8 किलोमीटर वरती डेबरिंग आहे तिथे ह्या रस्त्याची उंची 4800 मीटर आहे. मग तंगलंग-ला. नंतर मी शो-कार पण गेलो होतो.तो 4530 मीटर वर आहे शो-कार (Tso Kar) एक तलाव आहे. जो मनाली-लेह रस्त्यापासून बाजूला 20 किलोमीटर वरती आहे. ह्या गोष्टीवरून एक स्पष्ट होतं कि नदी पांग च्या बाजूने येते. दूसरी तंगलंग-ला च्या बाजूने. शो-कार मोड वरती दोन्ही नद्या भेटतात व नंतर शो-कार तलाव मध्ये जाऊन मिळतात. हां, ती गोष्ट वेगळी आहे कि, या नद्या पावसाळी आहेत आणि इथे पाउस हा दुर्मिळ आहे. पाणी नसल्याने नद्या आटल्यात त्यामुळे मैदानंसारख्या दिसतात. उतार असेन आणि त्यात रस्ता शानदार बनलेला असेल तर सायकल चं वेग हा काय विचारायलाच नको. मध्ये मध्ये पूल येतात त्याने एकरूपता भंग पाऊन ब्रेक मारावे लागत होते.

शो-कार च्या 15 किलोमीटर अलीकडेच खराब रस्ता सुरु होतो. एवढा पण खराब नाहीय, पण रस्त्या मध्ये बारीक खडे खूप आहेत. अश्या रस्त्या मधून जोरात सायकल चालवताना,सायकल पंक्चर होण्याची भीती असते.
एक ब्रिटिश सायकल वाला भेटला. त्याने म्हटलं, - हाय! हाऊ आर यू? मला कोणी असे "हाऊ आर यू" विचारले तर माझ्या तोंडातून एकच शब्द निघतो. - मस्त.
इथे पण तेच सांगितलं - मस्त. त्याने अजून काही भरपूर विचारलं पण ते सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. कारण तो ब्रिटिश होता. त्याचं इंग्लिश मी तेव्हा समजेल जेव्हा मला भारतीय इंग्लिश येईल. असो तो माझ्या पुढे निघून गेला.

पुढे गेलो तर त्याची सायकल रस्त्याच्या कडेला पडली होती. आणि तो गायब. हि शो-कार मोड च्या अलीकडची गोष्ट आहे. हे खूप मोठे मैदान आहे. रस्ता वरच्या बाजूने आहे. महाराज नक्कीच खालच्या पाण्याच्या बाजूला गेले असतील. आता कश्याला गेला हे वेगळे सांगायची गरज नाही.
हरियाणा ची एक कार उभी होती. बोनट उगडलेला होतं. माहिती पडले कि कार गरम झाली आहे. ते चौघे जण होते. हिसार चे. माझे आणि त्यांचे बोलणे सुरु झाले. तितक्यात मागून तो अंग्रेज आला. माझी एल्ग्लिश किती भारी आहे एव्हाना त्याला माहिती पडले असेलच. ह्या वेळेस त्यानी कार वाल्यान बरोबर संवाद साधायला सुरुवात केली. - हे, हाऊ आर यू? कार च्या आतमध्ये तिघे जण बसले होते आणि एक जण बाहेर उभा होता. ‘हाऊ आर यू’ हे वाक्य बाहेरच्याला विचारलं होतं. ते ऐकून त्याने मला विचारलं. - भाई, यो के कह रया सै?
मी म्हटलं- न्यू कहदे बेरा ना।
त्याने पण ‘बेरा ना’ च म्हटलं.
त्यानंतर बोनट उघडं बघून त्या अंग्रेजानी कार विषयी विचारपूस सुरु केली.
मी त्याला परत ‘बेरा ना’ चं इशारा केला.
त्यावर तो हरियानवी बोलला, " भाई, ना बेरा हमनै। अंगरेजी जाणते तो यहां बोनट खोलकै खडे होत्ते?"

सव्वा दोन वाजता शो-कार मोड वरती पोहचलो. तिथे दोन तंबू दिसले. मला इथे तंबू भेटण्याची अपेक्षाच नव्हती. पांग वरून येताना आलूचे दोन परांठे पैक करून आणले होते. कोल्ड ड्रिंक बरोबर परांठे खाल्ले. विचार केला आठ किलोमीटर वरती डेबरिंग है, एका तासात पोहोचू शकतो. त्या पुढे जाणार नाही मग चला तर शो-कार बघून येऊया.
सगळं सामान उतरवून इथेचं ठेवलं. पाण्याची बोतल, रेनकोट व सायकलचे पंक्चर काढायचे सामान बरोबर घेऊन मी चार वाजता तलाव बघयला निघालो. परत येउन इथेच थांबणार होतो.
एक मिनी बस उभी होती. यात्री चहा पीत होते. लेह ला चालले होते. बस मधल्या एका यात्रेकारुनी मला विचारलं. - बेटे, तुम यहीं के रहने वाले हो क्या?
मी म्हटलं- नहीं, आपकी ही तरह हूं।
म्हटले - पहले कभी लद्दाख आये हो?
- हां, आया हूं।
- "तो यह बताओ कि आगे पेड कहां मिलेंगे? ऑक्सीजन की बडी समस्या है। खुद तो देखा जाये, लेकिन बच्चों की समस्या नहीं देखी जाती."
मी म्हटलं, "हवा की कमी पेड न होने की वजह से नहीं है। यह अत्यधिक ऊंचाई की वजह से है। आप अभी 4700 मीटर पर हो। यहां से आगे चढाई शुरू हो जायेगी। 5300 मीटर ऊंचे तंगलंग-ला को पार करके आप नीचे उतरना शुरू हो जाओगे व 3400 मीटर पर लेह पहुंचोगे। लेह पहुंचने पर आपको सांस लेने में बहुत आसानी रहेगी। और हां, लेह में थोडी बहुत हरियाली भी मिल जायेगी।"

संध्याकाळी चार वाजता शो-कार बघायला तेथून बाहेर पडलो.पहिल्यांदा थोडीसी चढाई आहे. त्यानंतर थोडा स उतार. 16 किलोमीटर पर्यंत हाच उतार पैन्दल मारून देत नाही. एकेरी रस्ता आहे वाहतूक अजिबात नाही. तलाव हा लांबूनच पहावयास मिळतो. शेजारी लोकवस्तीचे ठिकाण "थुक्जे गोम्पा" 16 किलोमीटर लांब आहे. इथून जवळ जवळ ४ किमी पुढे, पायाने चालत तलावापाशी जावे लागते.
मी जेव्हा थुक्जे पासून ७-८ किलोमीटर लांब होतो तेव्हा समोरून चार मोटरसाइकिल वाले येत होते. रस्त्यावरती उतार अवश्य होता पण हा पहाडी रस्ता नव्हता. तलावाचे क्षेत्र खूप मोठे आहे. पानी तर एकाचं कोपऱ्यात आहे बाकीचे सुखं मैदान आहे . 7-8 किलोमीटर लांबूनच थुक्जे गाव दिसत होतं

समोरून मोटारसायकल वाले येत होते. त्यांच्या पासून 100 मीटर अंतरावर रस्ता सोडून, चार-पांच जनावरं पण जोरात पळत येत होती. अंतर लांब असल्या कारणान जनावरं ओळखू येत नव्हती. ती मोटर सायकल बरोबर पळत होती. साहजिकच ती माझ्या कडे येत होती. मला वाटलं ते लद्दाखी कुत्रे आहेत. लद्दाखी कुत्रे पण मोठे असतात. मी खूप घाबरलो.
जशी अजून जवळ आली तर कळले कि , ती गाढवं होती. लद्दाखी रानटी गाढवं म्हणजेच त्याला "क्यांग" असे म्हणतात. इथे पाणी पण आहे तसेच पाण्यामुळे थोडेसे गवत पण आहे. त्यामुळे त्यानी इथेच आपला अड्डा बनवला होता. हि गाढवं मोटार सायकल मुळे घाबरली होती. त्यांना काय करावे हे समझत नव्हते. म्हणून गाडीच्या पुढे पुढेच पळत होती.
सव्वा तासात थुक्जे ला पोहोचलो. वरती डोंगरावरी गोम्पा आहे. गांव एकदम ओसाड आणि घाणेरडे आहे. घरांच्या छतावरती बकऱ्यांची कातडी वाळायला ठेव्ल्याली असतात. गाव पार केल्यानंतर दोन मोठे तंबू पाहायला मिळाले. तंबू च्या समोरच चार पाच लोक बसली होती. मी तिथे गेल्यावर चहाची ऑर्डर दिली.

मनाली-लेह रस्ता हा एक नुसता रस्ता नाहीय एक सीमारेषा पण आहे. लद्दाख क्षेत्र मध्ये आपण स्वताच्या मनाने कुठे हि फिरू शकत नाही, लाधाख मधून पूर्वेच्या बाजूला भरपूर रस्ते गेले आहेत.
लेह मध्ये खारदूंग-ला च्या बाजूला नुब्रा रोड, कारू मध्ये चांग-ला च्या बाजूला पेंगोंग रोड, उप्शी मध्ये चांगथांग रोड आणि हि शो-कार वाली रोड; ये चार रस्ते मुख्य आहेत. ह्या चारही रस्त्यांनी फिरण्यासाठी लेह वरून परमिट घेणे आवश्यक आहे. शो-कार ला जाणाऱ्या रस्त्याचा चेकपोस्ट इथेच आहे. म्हणजे आपण 16 किमी पर्यंत विना परमिट जाऊ शकतो. पुढे हा रस्ता चांगथांग व शो-मोरीरी ला जातो. पण आपल्याला फक्त शो-कारच बघायची असेल तर तीन-चार किलोमीटर पुढे विना परमिट चे जाऊ शकता. मला फक्त हाच तलाव बघायचा होता म्हणून मला पुढे जाऊ दिलं.

गाव पासून चार किलोमीटर पुढे आलो. तलाव हा खूप छोटा आहे पण खाऱ्या पाण्याचा आहे. जसं गाव सोडल्या पासून आपण तलावाच्या दिशेने जाऊ लागतो तशी आपल्याला पांढरी माती बघायला मिळते. हि माती म्हणजे मीठ आहे. तिथे काही पक्षी पण होते. किलबिल करत होते. बऱ्याच दिवसांनी कोणत्या तरी प्राण्याचा आवाज ऐकायला मिळाला.
आता माझ्यासाठी चांगथांगच खूप मोठा भाग मोकळा होता आणि मी चेकपोस्ट पण पार केलं होतं. पण विना परमिट चे फिरणे बरोबर नाही. चीन ची सीमा रेषा पण इथून जास्त लांब नाही. त्यामुळे परमिट घ्यावेच लागतं.
१५ ते २० मिनिट थांबून परत निघालो. येताना थोडासा उतार होता पण जाताना तोच थोडासा उतार थोडासा चढ झाला. रस्त्या मधेच गाढवांची झुंड पाहायला मिळाली. मी आल्यावर जोरात पळाले. आकाश्यात ढग होते. त्यामुळे खूप थंडी होती. साढे सात वाजता जेव्हा मी आपल्या ठीकाण्यावर पोहोचलो तर थंडीनं कापत होतो. जेवण करून गोधडीत घुसलो, तरी पण कापत होतो. इथली उंची ४६३० मीटर आहे. ह्याच्या पेक्षा जास्त उंचीवर झोपलो होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती, आज काय झाले कुणास ठाऊक?
आज पांग ते शो-कार मोड ते शो-कार परत शो-कार मोड अशी तब्बल ८८ किमी सायकल चालवली.


पांग च्या पुढे चढाई आहे.


डोंगरावरून दिसणारं पांग


सोनेरी छटा मध्ये उजळून निघालेलं लढाख


उन पडल्यावरती लढाख चे डोंगर सोनेरी होतात.


मोरे मैदान


हा फोटो माझ्या लैपटॉपचा स्क्रीन सेवर आहे.


मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळ वाल्यांच ठिकाण


१५ किमी अश्याच रस्त्यांनी जावे लागले. खूप खडे होते


शो-कार मोड


शो-कार मोडला जानारा रस्ता


पाणी आणि गवत असल्याने मेंढ्यांची मज्जा


शो-कार एक छोटासा तलाव आहे. लांबूनच दिसू लागतो.


पुर्थ्वी च्या भोवती वातावरण सारख्याच उंचीवर आहे. पण जमीन खाली-वर आहे. लढाख मध्ये ढगांची सावली डोंगरावर पडते. काळा डाग म्हणजे ढगाची सावली आहे.


लढाखी गाढव त्यालाच क्यांग म्हणतात.


शो-कार च्या शेजारी वसलेलं गाव


वरती दिसणारं गोम्पा आणि खाली वसलेलं गाव


राहण्यासाठी आणि खाण्यासाठी स्थानिक लोकांनी लावलेलं तंबू.


गाढवांचा (क्यांग) कळप

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2016 - 2:26 pm | पिलीयन रायडर

Nehami pramanech mast!!

राजकुमार१२३४५६'s picture

7 Feb 2016 - 2:49 pm | राजकुमार१२३४५६

आपल्या प्रतिसादबद्दल अनेक धन्यवाद !!

क्या बात! डोगर/ पर्वतरांगा, तलाव सुंदर दिसत आहेत!

बाबा योगिराज's picture

7 Feb 2016 - 7:13 pm | बाबा योगिराज

झक्कास. आवड्यास.

स्वर्गीय प्रदेश आहे हा! पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

7 Feb 2016 - 9:05 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

फोटो सुंदर च लेख ही
पुभाप्र.

नीलमोहर's picture

8 Feb 2016 - 11:38 am | नीलमोहर

या लेखमालेसाठीे अनेक धन्यवाद.

प्रचेतस's picture

8 Feb 2016 - 8:13 pm | प्रचेतस

भयंकर सुंदर.
रोजच पुढच्या भागाची वाट बघत असतो.

Rajashri Gargate's picture

25 Mar 2016 - 7:36 am | Rajashri Gargate

Khoopch sundar.