सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय.
जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र.
(स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
12 Dec 2015 - 2:49 pm | भीमराव
माझा बी १ प्रश्न हाय, दखल मधले सगळे जुने लेख कुठे वाचायला मिळतील?
12 Dec 2015 - 9:35 pm | उपयोजक
पूर्वी CNBC वर GE corporation ची tion असलेल्या भरपूर शब्दांचा गाण्यात वापर करुन बनवलेली एक जाहिरात लागायची ती कोणती? त्याची लिंक मिळेल का? किंवा पूर्ण गाणे कोठे मिळेल?
15 Dec 2015 - 4:19 pm | gogglya
शहरात न जाताही पोहोचु शकता bright land हॉटेल च्या वळणावरुन. पुण्यात बुकींग होते. एकदम शांत जागा आहे. मुख्य म्हणजे पोट-माळा असलेल्या रूम आहेत, मुलांना मजा येते जिन्यावरून ये-जा करायला.
16 Dec 2015 - 12:00 pm | तुषार काळभोर
लोकेशन जबरा आहे. पण..
बजेटच्या थोडं बाहेर आहे. :)
२ रात्रींचे २२,००० होतात. माझं बजेट अंदाजे ३०००-३५०० रुपये प्रतिरात्र आहे. (विथ ऑर विदाउट फूड)
16 Dec 2015 - 3:38 am | श्रीरंग_जोशी
वाटाण्याच्या अक्षता या वाकप्रचाराची व्युत्पत्ती कुणी सांगू शकेल काय?
हा धागा सुरू करण्याबद्दल धन्यवाद पैलवानसाहेब.
22 Dec 2015 - 1:10 pm | भीडस्त
अक्षत-कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध.
वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें.वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून.
22 Dec 2015 - 7:59 pm | श्रीरंग_जोशी
अर्थ सांगण्यासाठी धन्यवाद.
21 Dec 2015 - 8:33 am | तुषार काळभोर
'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का?
ऑनलाईन कुठे दिसत नाही. (आख्ख्या इंटरनेटवर सुद्धा कसलाही उल्लेख नाहीये भाषांतराचा). कुणी पाहिलंय/ऐकलंय का मराठी भाषांतराविषयी?
22 Dec 2015 - 10:56 am | उगा काहितरीच
माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे, अतिशय चांगल्या कंडिशन मधे ! कमीतकमी ७०-८० वर्षांपूर्वीची. त्यावर मधल्या काळात कुणीतरी रेड अॉक्साईड नाहीतर अॉइल पेंट मारला होता. त्यामुळे त्याचे लाकूड झाकल्या गेले . काल तो कलर काढण्यासाठी abrasive paper चा वापर केला असता थोडा ओरीजनल लाकडी भाग दिसला जो की अतिशय सुंदर आहे.
आता प्रश्न असा आहे की त्या लाकडावरील red oxide कसे काढावे? Abrasive paper ने काढणे अतिशय मेहनतीचे व वेळखाऊ काम आहे. यापेक्षा काही सोपा उपाय करता आला तर मदत होईल .
22 Dec 2015 - 11:59 am | मोदक
"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते ते थोड्या भागावर वापरून बघा. मात्र त्याचा लाकडावर काही परिणाम होणार का याची कल्पना नाही.
22 Dec 2015 - 12:13 pm | संदीप डांगे
वेळखाऊ असले तरी अब्रेझिव पेपरनेच काढा. पेंट रीमूवरने एका दिवसात काम होईल पण लाकूड डॅमेज होइल. त्यापेक्षा महिना गेला तरी पेपरने घासून काढा. चांगल्या लाकडाची काळजी घ्यायलाच पाहिजे. चांदवडच्या होळकर महालाच्या कलाकुसरीवरचं आधीचं रंगकाम घासूनच काढलंय. किती पेशन्स असावे याचा उत्तम नमुना, तुम्हालाही प्रेरणा मिळेल.
22 Dec 2015 - 2:37 pm | रुस्तम
१ नंबर
22 Dec 2015 - 6:41 pm | आदिजोशी
त्या माणसाला शोधून आत टाका
22 Dec 2015 - 7:55 pm | संदीप डांगे
पेंट म्हणजे काहीतरी काळ्या रंगाचं उपयुक्त रसायन होतं. रिनोवेशनची प्रक्रिया सुरू असल्याने सर्व खरवडून काढलंय. पुन्हा कुठलंतरी रसायन लावणार आहेत. त्याचा काय रंग असेल देवजाणे.
22 Dec 2015 - 6:51 pm | रेवती
सुरेख!
22 Dec 2015 - 7:32 pm | उगा काहितरीच
दंडवत पेशन्सला ! कारण कुठल्याही प्रकारची कलाकुसर नसलेल्या लाकडावरचा रंग काढायला किती मेहनत लागते हे अनुभवतो आहे कालपासुन.
22 Dec 2015 - 7:56 pm | संदीप डांगे
;-) लगे रहो. शेवटी जो आनंद होइल तो निव्वळ अवर्णनीय असेल...!!!
23 Dec 2015 - 5:08 pm | पिलीयन रायडर
कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग केलंय का? आणि मुक्काम केलाय का / कँपिंग केलय का?
असल्यास प्लिझ माहिती द्या!
23 Dec 2015 - 6:03 pm | कपिलमुनी
१. सध्याच्या सीझनमधे करणार असाल तर उत्तम सीझन आहे.
२. वैविध्यपूर्ण डास असतात , त्याचा उपाय स्वतः करून जाणे.
३. गोठवणारी थंडी असते.
४.२-३ कपड्याचे एक्स्ट्रा सेट न्या . जंगल ट्रेल असेल तर खरब होतात.
५. अगदी बियास नदीचा फील नसला तरी मजा येते.
23 Dec 2015 - 6:05 pm | कपिलमुनी
Kundalika River Rafting यांचा अनुभव चांगला आहे.(काही वर्षांपूर्वीचा , सध्या रीव्हू वाचून जाणे)
कँपिगमधे तंबू मिळाल्यास मजा येते पण त्रास ( डास , थंडी ) सहन करायची तयारी ठेवा .
23 Dec 2015 - 6:41 pm | पिलीयन रायडर
धन्यवाद! पुढच्या एक दोन आठवड्यातच करायचे आहे. कँपिंगचे माहित नाही पण राफ्टींग तरी करुच.
http://koladrafting.co.in/ ही साईट चांगली वाटत आहे. रेट्स पुष्कळ आहेत. पण ठिके..
23 Dec 2015 - 6:50 pm | कपिलमुनी
http://www.riverandforest.com/ हे देखील चांगले आहे
15 Jan 2016 - 4:51 pm | भुमन्यु
बर्याचदा फसवतात. धरणातुन पाणी सोडले तरच राफ्टींग होऊ शकते. मागच्या वर्षी आमच्या ऑफिसची ट्रीप गेली होती २-३ तास सगळे लाईफ जॅकेट घालून पाणी येण्याची वाट बघत होते. शेवटी पोपट होऊन परतले.
23 Dec 2015 - 9:31 pm | कंजूस
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे.
भारतात अल्कोहोलमध्ये लाख मिसळून लुकण लावणे बहुतेक पोतृगिजांच्या अगोदर नव्हते.
होड्यांच्या लाकडांना काजूचं तेल लावतात ते काळं दिसतं आणि लाकूड सडू देत नाही.तेपण नंतरचंच असावं.
23 Dec 2015 - 9:49 pm | संदीप डांगे
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे.
>>> हे बरोबर आहे काका, तिथल्या माणसाने हेच मिश्रण सांगितलं होतं बहुतेक. रिनोवेशन पूर्ण पेशवेकालिन पद्धतींनीच होत असल्याने बर्याच असंबंधित वस्तूंची मिश्रणे, त्यांची नावे कानावर पडत असल्याने नेमकं लक्षात राहिलं नाही.
23 Dec 2015 - 9:52 pm | DEADPOOL
मिपावर लेखाच्या आधीच्या भागाच्या लिंक कशा द्याव्यात?
24 Dec 2015 - 7:40 am | कंजूस
DEADPOOL यांना त्यांच्या जन्या लेखाची लिंक द्यायची आहे ते असे करता येईल.
तुमच्या "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ "या लेखाची लिंक अशी देता येते-
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
याचे टेम्प्लेट:-
<a href="***" target="_blank" >???</a>
वरील टेम्प्लेटात
*** च्या जागी लेखाची अॅड्रेसबारमधली लिंक कॅापी पेस्ट करायची,
??? च्या जागी लेखाचे नाव वगैरे जे लिहाल त्यामागे लेखाची दडलेली लिंक असते ती क्लिक करता येते.
वरच्या उदाहरणात
*** = http://www.misalpav.com/node/34204
??? = घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
24 Dec 2015 - 8:59 am | DEADPOOL
थँक्स!
24 Dec 2015 - 9:02 am | DEADPOOL
मात्र याचा वापर अँड्रॉइडवर कसा होईल!
27 Dec 2015 - 10:26 pm | कंजूस
??? अँड्रॉइडशी काय संबंध??
27 Dec 2015 - 8:35 pm | पिशी अबोली
रस्त्यावर विकले जाणारे कपडे कुठून येतात? ते खरोखरच स्मगल्ड असतात का फक्त रिजेक्टेड माल असतो?
27 Dec 2015 - 8:43 pm | खेडूत
भांड्यांच्या बदल्यात घेतलेले, लोकांनी टाकून दिलेले, भिकार्यांनी विकलेले आणि रिजेक्ट झालेले असे सगळेच असतात...
27 Dec 2015 - 8:44 pm | खेडूत
आल्यापासून सुंठ कशी करतात? कुणाला माहीत आहे का?
27 Dec 2015 - 9:54 pm | आदूबाळ
आल्याची सालं काढून घेतात. मग ते तुकडे एकदोन दिवस चुन्यात भिजवतात (म्हणजे चुन्याच्या पाण्यात - हे बहुतेक दुकानात मिळतं.) त्या आल्याच्या शिरा दिसायला लागतात. मग ते आलं सावलीत वाळवतात. झाली सुंठ.
13 Jan 2016 - 1:47 pm | रॉजरमूर
चुना कोणता?
पानवाल्याकडे मिळतो तो का ?
13 Jan 2016 - 4:06 pm | आदूबाळ
हो, पण पानवाल्याकडे ज्या डब्या / ट्यूब्ज मिळतात त्यापेक्षा जास्त लागतो.
14 Jan 2016 - 11:19 pm | रॉजरमूर
धन्यवाद........!
उपयुक्त माहिति बद्दल.
सर्व मिपाकरान्ना मकर सन्क्रान्तिच्या हार्दिक शुभेच्छा....!
1 Feb 2016 - 4:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
चुन्याचे पाणी म्हणजे निवळी का हो आदूबाळ साहेब?
1 Feb 2016 - 4:58 pm | आदूबाळ
हो. हाच शब्द आठवत होतो!
27 Dec 2015 - 9:28 pm | नाव आडनाव
टीव्ही वर लागणार्या फॅशन शो मधे घालतात तसे चित्रविचित्र कपडे खरं कोणी घालत नसेल. अश्या फॅशन शो साठी कपडे "डिजाईन" करणार्यांना काय फायदा - म्हणजे जर कोणी ते विकत घेणारंच नसेल तर? काही तरी कारण असणार, पण ते मला समजत नाहीय, म्हणून इथे विचारतोय.
27 Dec 2015 - 9:34 pm | संदीप डांगे
फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले असते ते विकल्या जातं. घातलेले कपडे नाही. (तेही विकल्या जातात खरे तर)
कपड्यांचा पोत, प्रकार, त्यावरचे रंगसंगती, आकार-रेषा, कट्स, इत्यादी बरंच काही असतं. जे नाविन्यपूर्ण आणि बाजारात चालण्यासारखं आहे असे व्यापार्यांना वाटतं ते तेवढं उचलून घेतात. त्याबद्दल फॅ-डी शी करार केला जातो. नंतर मार्केटप्रमाणे कपड्यांचे साईझेस तयार करून बाजारात येतात.
सविस्तर नंतर लिहिन. ही थंडी हात गोठवून टाकतेय राव!!!
28 Dec 2015 - 7:22 am | भिंगरी
एखाद्या धागाकर्त्याचे लेखन कसे शोधावे?
जसे राजघराणं यांचे 'विज्ञानाच्या चष्म्यातून जाती'हा लेख शोधायचा असल्यास कसा शोधावा?
28 Dec 2015 - 8:20 am | कंजूस
त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद
त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद
Primary tabs
द्रश्य(active tab)
What links here
प्रेषक, राजघराणं, Tue, 22/05/2012 - 21:08
यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602
*********************************************
http://www.misalpav.com/node/21729
3 Jan 2016 - 5:13 pm | जेपी
kindle paper white घ्यायच आहे..
त्याअनुषंगाने प्रश्न-
यावर किती मराठी पुस्तक उपलब्ध आहेत ?किती भारतीय भाषातील पुस्तक उपलब्ध आहेत?
इतर ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात का (उदा.bookganga.com,इसाहित्य.कॉम)?
3 Jan 2016 - 6:34 pm | आदूबाळ
किंडलवर मराठी पुस्तकं फारशी पाहिली नाहीत. किंडलचे दोन फाईल फॉरमॅट आहेत - .mobi आणि .azw३. त्यात फक्त azw३ मध्ये देवनागरी फॉन्ट रेंडरिंग होतं.
आपण आपली पुस्तकं azw३ मध्ये रूपांतरित करून किंडलवर वाचू शकतो. उदा० मी स्पार्टाकस यांची ट्रॅप केली होती. "काही कारणांनी" वैतागून ती डिलिट केली ते सोडा. मिपावरच्या मोठ्या मालिका याप्रकारे किंडलवर वाचण्याचा विचार आहे.
माझं किंडल पेपरव्हाईट नसल्याने त्यात इतर सॉफ्टवेअर आणता येत नाहीत.
6 Jan 2016 - 12:21 pm | भाते
बहुतेक आहारतज्ञ अंडी खायला सांगताना अंडयाचा केवळ पांढरा भाग खायला सांगतात. मग अंडयातल्या पिवळा बलकाचे काय करायचे? फेकुन द्यायचा का तो? अंडयातल्या पिवळा बलक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतो का? संपुर्ण अंडे खाल्ले तर काय फरक पडतो?
6 Jan 2016 - 12:37 pm | सतिश पाटील
माझ्या मते एखादे पिवळे बलक खाण्यास काही हरकत नसावी, पिवळ्या भागात जास्त कोलेस्त्रोल असते, त्यामुळे ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. पांढऱ्या भागात जास्त प्रोटीन असते.
6 Jan 2016 - 3:34 pm | प्रसाद१९७१
मधे कदाचित मिपावर च एक लिन्क मिळाली होती. आता बर्याच तज्ञ लोकांचे असे मत झाले आहे की खाण्यातुन कोलेस्ट्रोल जास्त गेले किंवा कमी गेले तरी शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वर परीणाम होत नाही.
जरी कोलेस्ट्रोल कमी खाल्ले तरी शरीर मोठ्याप्रमाणावर कोलेस्ट्रोल बनवतच असते.
Cholesterol is no longer a villain. The 2010 guidelines suggested we should limit cholesterol from foods to no more than 300 milligrams daily. (A large egg has about 186 mg of cholesterol.) Experts now say cholesterol is ''not a nutrient of concern," because cholesterol from foods doesn't cause higher blood cholesterol levels.
6 Jan 2016 - 2:57 pm | नितीनचंद्र
रिव्हर राफ्टींग केलय मजा येते खास करुन पावसाळ्यात जेव्हा कुंडलिका प्रचंड वेगाने वहाते. मी १५ ऑगस्ट २०१५ ला केले आहे. राफ्ट आपोआपच पुढे जात असतो. फक्त दिशा देणे इतकाच भाग रहातो. हिवाळ्यात महत्वाचे चार " रॅपीड " ( जिथे राफ्ट पलटी होण्याची शक्यता असते असा प्रवाह ) असेल की नाही माहीत नाही.
माझ्या मते मुक्कामाची आवश्यकता असली तरी तो ह्या अॅडव्हेचरचा भाग नाही. इंटरनेटवर रिव्हर राफ्टींग चे बुकिंग करुन आपण कोलाडच्या जवळ कुठेही राहु शकता.
जय कुंडलिका !
6 Jan 2016 - 4:48 pm | नितीनचंद्र
https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home
तुम्ही एल पी जी सिलेंडर वापरता का ? जर दुदैवाने आपल्याला अपघात झाला तर रुपये ४० लाखाचा विमा आहे.
6 Jan 2016 - 5:11 pm | नितीनचंद्र
http://www.relakhs.com/lpg-consumers-lpg-insurance-policy-gas-cylinder/
ही घ्या लिंक
6 Jan 2016 - 5:07 pm | मी-सौरभ
तुमच बजेट चांगल्या हॉटेल्साठी कमी आहे.
तुम्ही एयर बीएन्बी ची साईट चेक करा. कदाचित चांगले पर्याय ऊपलब्ध असतील.
आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वर या मध्ये असलेल्या एका बंगल्यात राहीलो होतो (६ जण). ऊत्तम अनुभव होता.
8 Jan 2016 - 8:49 am | उपयोजक
१. मिपावर नवीन धागा कसा सुरु करायचा?
२. त्या धाग्यादरम्यान अन्य वेबसाईटींच्या लिंका कश्या द्यायच्या?
३. त्या धाग्यात आंतरजालावरील चित्र कसे अपलोडवावे.
8 Jan 2016 - 4:22 pm | श्रीरंग_जोशी
कृपया मदत पान पाहावे.
10 Jan 2016 - 12:11 pm | संदीप डांगे
व्याख्यान कार्यक्रमाची रुपरेषा व आयोजन कसे असावे?
11 Jan 2016 - 9:12 am | संदीप डांगे
माझा सॅमसंग नोट तीस तारखेला बंद पडला. ऑन करायला गेल्यावर फक्त सुरुवातीचे सॅमसंग नाव दिसतं पण पुढे काही घडत नाही. रीपेअरवाल्याकडे नेला असता तो म्हणाला की सेम केस तीन-चार झाल्यात, त्या दोन दिवसात. माझ्या मेहूण्याचाही फोन असाच बंद पडला. सॅमसंग स्मार्टफोन्ससोबत अजून कोणाला असे अनुभव आले आहेत काय एवढ्यात...?
27 Jan 2016 - 4:16 pm | भक्त प्रल्हाद
माझ्या फोन ला सुद्धा काही प्रोब्लेम अले होते. पण मी ब्याटरी बदलल्यावर चालु झाला.
तुमचा फोन अजुनही चालु नसेल तर दुसरी ब्याटरी टाकुन चालु होतो का ते पहा.
27 Jan 2016 - 4:34 pm | संदीप डांगे
फोन अजून डॉक्टरकडेच आहे. त्याने बॅटरीचा काही इश्यु सांगितला नाही.
27 Jan 2016 - 11:32 pm | भक्त प्रल्हाद
असे आहे होय...
म्हणजे सध्या फक्त प्रार्थना करणे आपल्या हातात आहे म्हणा.
फक्त त्याला रिपेअरिंगची किंमत काम करण्याआधी सांगायला लावा.
28 Jan 2016 - 9:40 am | संदीप डांगे
हो ना. जास्त नाही, हजार रुपयाच्या आत घेइल. दहा-बारा हजाराचा मोबाइल घेण्यापेक्षा बरे.
11 Jan 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी
महाबळेश्वरमध्य राहण्यासाठी एमटीडीसी ची निवास व्यवस्था आहे. बाजारपेठेपासून थोडी लांब व शांत ठिकाणी आहे. फक्त निवासाची व्यवस्था आहे. जेवण्याची नाही. अत्यंत माफक दर आहेत. खोल्या बर्या आहेत. टीव्ही, फ्रीज वगैरे नाही. एमटीडीसी च्या संकेतस्थळावरून बुकिंग होऊ शकते.
13 Jan 2016 - 3:43 pm | gogglya
तिथे बर्यापैकी जेवण्याची / न्याहारीची सोय होऊ शकते.
11 Jan 2016 - 3:02 pm | लई भारी
तुम्ही जाउन आला असाल तरी पण इतर कोणी शोधत असेल तर माहिती देत आहे :)
वेस्ट हिल रिसोर्ट मध्ये एकदा राहून आलोय. नवीन(गेल्या वर्षभरात) सुरुवात झाल्यामुळे कदाचित पण अजून चांगले आहे.
हे पहा.
12 Jan 2016 - 2:07 am | श्रीरंग_जोशी
इराक व सिरिया येथील इस्लामिक स्टेटमध्ये १०० हून अधिक देशांचे लोक अतिरेकी कारवायांसाठी सामिल झाले आहेत. इस्लामिक स्टेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्या भाषा कोणत्या?
28 Jan 2016 - 9:27 pm | श्रीरंग_जोशी
मला जालावर सहजपणे या प्रश्नाचे उत्तर अजुन तरी मिळाले नाही.
12 Jan 2016 - 10:11 am | भाते
कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली.
त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल.
इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
13 Jan 2016 - 4:14 am | श्रीरंग_जोशी
ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग.
म्हणजे एकाच उच्चारासाठी दोन वेगवेगळे लिहिण्याची अक्षरे आहेत. मराठीप्रमाणे उच्चारही वेगळे का नाहीत?
13 Jan 2016 - 3:42 pm | पिशी अबोली
लिखित भाषा आणि बोली यातील फरकामुळे हे घडते. मुळात वरील तिन्ही अक्षरांमधे ध्वनि 'ऋ' हाच अपेक्षित आहे. आणि हा ऋ स्वर आहे. त्याच्या सगळ्यात जवळचा स्वर 'इ' असल्याने अनेक नवीन इंडोआर्यन भाषांमधे उच्चार करताना संस्कृतात जिथे ऋ ची अपेक्षा असती, त्या जागी 'री' आलेला दिसतो.
पण बोलीमधे बदल घडला, तरी लिखित भाषा काही बदलत नाही. तिच्यात संस्कृतोद्भव शब्दांमधे अजूनही ऋ वापरला जातो.
मराठीत ऋचा उच्चार बऱ्याच ठिकाणी 'रु' होतो. अगदी उच्चरांच्या बाबतीत काटेकोर असणारे लोक संस्कृतयोग्य उच्चार करतात.
13 Jan 2016 - 4:32 pm | मन१
Doctors, friends ;
I need advice. Just now an NGO approache me to collect my cheek sample for HLA ( Human Leukocyte Antigen ). If it matches with some patient , i wil b donor for "Blood Stem Cell Transplant" .
The patient of Leukemia , Lymphoma , Thalasemmia cn thus be "cured".
While idea is great humanitarian step; i hv doubt abt the process.
They said donor will b subjected to Filgrastim innjections for 5 days ; to mobilise the stem cells frm bone marrow into blood.
This will cause three to five fold increase in WBC count.
This is the part i m concerned abt.
They said no extra precautions as such are reqd for this .
Is this correct ?
I m happy to help in saving a life; bt nt sure of consequences.
Filgrastim is a GCSF (Granulocyte Colony - Stimulating Factor )
btw, cant type marathi frm mobile. so writing everything in english.
15 Jan 2016 - 12:03 am | बहुगुणी
स्टेम सेल्स दान करण्यासंबधीचा हा लेख वाचा, यात ही How peripheral blood stem cells are collected या विभागात फिल्ग्रास्टिम विषयी थोडी माहिती आहे. या औषधाच्या side-effects विषयी आधिक माहिती इथे आणि इथे मिळेल. थोडक्यात, थोड्या काळासाठी पाठदुखी, हाड किंवा स्नायू दुखी, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, निद्रानाश किंवा थकवा हे प्रमुख side effects आहेत, आणि काही अॅलर्जी असतील तर हे औषध टाळलेलं बरं.
ही माहिती दिल्यानंतर थोडंसं अवांतरः
१. तुम्ही चीक स्वॅब देतांना अनाहुतपणे तुमचं डीएनए सँपलही देणार आहात, म्हणजे potentially, तुमची genetic fingerprint दिली जाते आहे, त्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यालच.
२. तुम्हाला हे लागू नाही, पण गर्भवती स्त्रियांना 'भविष्याची भीती' वगैरे दाखवून भारतात "कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" हा एक हजारो रुपये किंमतीचा अवैध बाजार बोकाळतो आहे. त्याविषयी कुणीतरी लिहायला हवं.
15 Jan 2016 - 5:02 pm | भुमन्यु
"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" - तद्दन लूटारु प्रकार आहे. ह्या संबंधीत कंपनी मध्ये काम करत होतो. सगळा फालतु पणा आहे.
14 Jan 2016 - 10:56 am | कंजूस
#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग.
-माझ्या मते पंजाबीची छाप आहे.शिवाय इंग्राजांनी कृष्णाला krishna,krisna केलं.गुजराथींनी क्रश्न भगवान केलं.लीला अम्रत.ह्रदय
पंजाबी-अम्रित.ह्रिदय
बंगाली-रत्विक{ रात्विक}
14 Jan 2016 - 12:01 pm | चिनार
गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकरामध्ये काही अंशी सुट मिळते असा नियम आहे. ती सूट खालील प्रकारे मिळते
१. गृहकर्ज रकमेतील वर्षभरात फेडलेली मुद्दल ८० C मध्ये दाखवता येते. मर्यादा १५००००
२. गृहकर्ज रकमेवरील फेडलेले व्याज सेक्शन २४ मध्ये दाखवता येते. मर्यादा २०००००
प्रश्न असा आहे… ह्या दोन्हीसाठी घराचे पझेशन मिळणे आवश्यक आहे का ?
माझा एक मित्र घराचे पझेशन न मिळता मुद्दल ८० C मध्ये दाखवतो आहे. त्याच्या मते व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही.
मला मार्च २०१६ मध्ये पझेशन मिळणार आहे. मला ही सूट मिळेल का ?
Investment प्रूफ या महिन्यात कंपनीत भरायचे आहेत.
मार्गदर्शन करावे
14 Jan 2016 - 4:40 pm | पिलीयन रायडर
पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनी प्रुफ्स घेणार नाही.
मलाही हाच प्रॉब्लेम होता. पण सीए ने कसं काय कोण जाणे नंतर ITR मधुन होम लोन क्लेम केले होते. मला आता ते नक्की आठवत नाही. तुम्हाला मार्च मध्ये पझेशन मिळाल्यास कदाचित तुम्ही सुद्धा ITR मधुन होम लोन क्लेम करु शकाल. नक्की माहित नाही.
14 Jan 2016 - 7:56 pm | रुस्तम
मित्राचं बरोबर आहे . व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. पझेशन मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे (२०% दर वर्षी प्रमाणे ), मागील व्याज दाखवून त्यावर सूट घेता येते.
14 Jan 2016 - 7:59 pm | रुस्तम
Pre-EMI interest (EMI paid before occupation of the house) is deductible in 5 equal installments starting from the year when the construction is completed or property is acquired.
14 Jan 2016 - 12:42 pm | मोदक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या कपड्यांचे रंग कोण ठरवते? ICC का?
भारताचा निळा, ऑस्ट्रेलियाचा पिवळा, NZ चा काळा हे कोणत्या लॉजीकने ठरवले आहे?
14 Jan 2016 - 2:44 pm | कपिलमुनी
यात काही लॉजिक असेल असे वाटत नाही. कारण सध्या अफगाणिस्तान सुद्धा निळ्या रंगाचे कपडे घालून क्रिकेट खेळतात.
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.
15 Jan 2016 - 5:04 pm | भुमन्यु
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.>>> ती त्या खेळाची गरज आहे. अन्यथा राँग पासेस दिले जातील.
18 Jan 2016 - 11:51 am | आनंदी गोपाळ
फोटोवरून तरी २००७ च्या टीममधे अंमळ काडीपैलवानच होते असे दिसते. नैका?
18 Jan 2016 - 10:21 am | उपयोजक
इंटरनेट डाऊनलोड मेनेजरचे नवीन व्हर्जन कसे क्रॅक करायचे.स्टेपअवाईज कोणी सांगेल का?
27 Jan 2016 - 8:08 pm | भाते
एका प्रोजेक्टसाठी मला कृत्रिम हातापध्दल (Prosthetic Hand) माहिती हवी आहे.
माझ्या काही शंका / प्रश्न आहेत. वैद्यकीय / इतर क्षेत्रातल्या मिपाकरांकडुन त्याचे निरसन होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी नविन धागा काढू का इथेच माझ्या शंका / प्रश्न विचारू?
27 Jan 2016 - 10:57 pm | इनू
मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे. विशेषत: केटरिंग टेक्नोलॉजी मध्ये. मी सध्या १२ वी सायन्स(पि+सी+एम) मध्ये आहे. मला यासाठी काय करावे लागेल? तसेच या क्षेत्रात पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध होतात?
28 Jan 2016 - 12:15 am | एस
मिपाकर श्री. निनाद यांना संपर्क करा.
28 Jan 2016 - 3:42 am | Jack_Bauer
लेख लिहिताना चंद्रबिंदी असणारे शब्द कसे लिहियाचे ? उदा : hack किंवा tab ?
28 Jan 2016 - 3:58 am | श्रीरंग_जोशी
हॅक साठी hEka
टॅब साठी tEba असे टंकावे.
अधिक माहिती - टंकलेखन साहाय्य
28 Jan 2016 - 9:59 pm | Jack_Bauer
परंतु मी hEka असा टंकले कि हेका असा होतंय. tEba = टेब ...
मी google IME हा पर्याय वापरून लेखन करतो त्यामुळे असे होत आहे कि काय ?
28 Jan 2016 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी
मी जे सांगितलं ते गमभन बाबत होतं.
एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची खात्री बाळगा.
28 Jan 2016 - 10:22 pm | तुषार काळभोर
+१२३४५
28 Jan 2016 - 4:37 am | खटपट्या
बँक साठी bEMk टंकावे
28 Jan 2016 - 5:34 am | आसिफ
२०१३ मध्ये सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 ने ज्या वेळी हा फोन लौन्च केला त्यावेळी चांगला वाटला म्हणुन घेतला पण १ वर्ष झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी परफॉरमन्स पार 'गाळपटला '. तेव्हा पासून तो तसाच पडुन आहे. त्याला काही करून(रुट वगैरे) मुख्य प्रवाहात आणता येईल काय ?
मला आलेले प्रॉब्लेम्स :
१. फोन वारंवार हँग होणे.
२. खूप स्लो रिस्पोन्स
३. फॅक्टरी रिसेट केल्या नंतर देखील परफॉरमन्स काही फरक न पडणे
४. बॅटरी लवकर संपणे , चार्गिंग करताना गरम होणे.
28 Jan 2016 - 9:22 am | पिंगू
आसिफ, फोन रुट केल्यास तुम्हाला बरेच काही प्रयोग करता येतील. खासकरुन हँग होणे आणि स्लो परफोर्मन्स.
28 Jan 2016 - 1:37 pm | असंका
नेटफ्लिक्स पहिला महिना फ्री आणि मग पाचशे रुपये दरमहा. नक्की कसं काम करतं? आय डी पासवर्ड वगैरे देतात का ते?
28 Jan 2016 - 1:45 pm | अनुप ढेरे
हो. आयडी पासवर्ड असतं. क्रेडिट कार्ड नंबर पण द्यावा लागतो.
28 Jan 2016 - 2:01 pm | वेल्लाभट
शेंदूर कसा बनवतात?
28 Jan 2016 - 3:38 pm | आदूबाळ
कोणाच्या बर्फीत घालायचाय त्यावर अवलंबून आहे ;)
28 Jan 2016 - 3:42 pm | वेल्लाभट
फासायचाय!
28 Jan 2016 - 3:47 pm | सुनील
शेंदूर म्हणजे रासायनिकदृष्ट्या लेड ऑक्साइड.
28 Jan 2016 - 4:17 pm | वेल्लाभट
अच्छा....
आणि मग तो केशरी रंग?
लेड चे दुष्परिणाम ऐकून आहे. मानवावर होणारे. दगडाच्या मूर्तींचं ठाऊक नाही.
28 Jan 2016 - 8:15 pm | भुमन्यु
ह्या वर्षाच्या उत्तरार्धात फोर्ड मस्टँग भारतात लाँच होणार. दुवा
28 Jan 2016 - 8:43 pm | संदीप डांगे
माझी सर्वात आवडती कार. पण तिकडे पंधरा-सोळा लाखाला मिळणारी कार इकडे पन्नास लाखाला लाँच करतात तेव्हा डोक्यात जातं. मित्सुबिशि इवो १० अशीच फ्लॉप झाली. बघूया हिची काय किंमत ठेवतात. २०१८ मध्ये एखादी सेकंडहँड मिळेलच.
- (महागड्या कार्स चा सेकंड हँड चाहता -आधे पैसे में फुल्ल मजा)
28 Jan 2016 - 9:12 pm | श्रीरंग_जोशी
एकदाच रेंटल कार म्हणून तीन दिवस चालवली होती काही वर्षांपूर्वी. टर्निंगवर वेगाने गेलं तरी कारचा अँगल फारसा वाकडा झाला आहे असे जाणवत नाही.
28 Jan 2016 - 9:17 pm | संदीप डांगे
रंगाण्णा, जला रै क्या? हम बी डालेंगे फटू, तुम्बी देकना शिरफ.
28 Jan 2016 - 9:22 pm | श्रीरंग_जोशी
गरीब आदमी क्या जलायेगा.
यंट्री लेवल गाडी रोज चलानेवाला - रंगा.
28 Jan 2016 - 9:34 pm | तुषार काळभोर
६२००० किमी पळालेली २०१४ची सर्टिफाईड मस्टँग ( 3.7L V6 Ti-VCT 24V, 6-Speed Automatic) अंदाजे १२लाखात येते 'तिकडे'.
आता इथं वर्जिनल जर ५०लाखात आली तर दीड-दोन वर्षे जुनी, ५०-६०००० किमी पळालेली (रोज ७०-१०० किमी!!!) ३० च्या पुढेच जाईल.
(अवांतरः जेनुइन प्रश्नः कितना देती है?)
28 Jan 2016 - 10:07 pm | संदीप डांगे
रोज शंभर किमी व भारतात? असा वापर असेल तर घेणार नै भौ. बाकी दिड वर्षे जुन्या गाडीवर २० लाख वाचत असतील तर पुढील पाच वर्षाची ओनरशीप कॉस्ट चाळीस लाखापेक्षा जास्त जाणार नाही. फायदेका सौदा अस्तुया.... अनुभवाचे बोल.
1 Feb 2016 - 3:55 pm | चिनार
"पालवी" या शब्दाला दूसरा मराठी शब्द कोणता ??
1 Feb 2016 - 11:45 pm | अमेरिकन त्रिशंकू
पालवी = पर्णसंभार
1 Feb 2016 - 11:48 pm | अमेरिकन त्रिशंकू
पालवी = पानफुटी
1 Feb 2016 - 4:33 pm | पिलीयन रायडर
मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो के३ नोट बद्दल एक प्रश्न विचारला होता. ह्या फोन मध्ये खुप सारे मालवेअर आणि व्हायरस आहेत. गुगलल्यावर हे सापडले
http://blog.teamleadnet.com/2015/06/removing-malware-and-bloatware-from....
पुण्यात हे सगळं कुठे करुन मिळेल? मी स्वतः तरी हे करु शकत नाही.. मला समजलेलंच नाहीये ते..
1 Feb 2016 - 6:25 pm | टवाळ कार्टा
काय सांग्ता....मी हा घ्यायचा विचार करतोय
1 Feb 2016 - 7:00 pm | पिलीयन रायडर
नको नको.. मला फार फार त्रास दिलाय ह्या वैतागवाडी फोन ने..
प्रचंड गंडलेला फोन आहे. कसं काय पण मला "रुटेड" फोन मिळाला आहे. मला अजिबात ह्यातलं काही कळत नाही पण ह्यातल्या किडा माणसाला दुरुस्त करता येईलही कदाचित हे प्रकरण. मी च विकुन टाकावा की काय ह्या विचारात आहे.
बाकी कॅमेरा आणि बॅटरी चांगली आहे. (मी गेम्स खेळत नाही. )
1 Feb 2016 - 7:45 pm | टवाळ कार्टा
सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा विचार करेन मग
2 Feb 2016 - 4:25 pm | मयुरMK
मोटो x play घ्या
11 Feb 2016 - 3:02 pm | टवाळ कार्टा
Coolpad Note 3 lite घेतल्या गेला आहे
2 Feb 2016 - 12:06 am | उगा काहितरीच
मी तर वापरतो आहे हाच फोन जवळपास एक महिन्यापासुन विशेष त्रास नाही दिला. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता ?
2 Feb 2016 - 2:23 pm | पिलीयन रायडर
१. फोन अमेरिकेतुन अॅमेझॉन वरुन मागवलेला आहे. त्यात तो रुटेड आहे असं दिसतय
२. ह्यात कंपनी इन्स्टॉल्ड गोष्टीच मालवेअर आहेत जसे की ट्विटर
३. त्रास असे आहेत :-
आपोआप वेगवेगळे अॅप्स डालो होणे,
सतत "वॉट्सअॅपने नवे अॅप रेकमंड केले आहे.. डालो करायचे का" असे पॉप अप्स येत रहातात.. सतत.. मी बरेच सेटींग्स बदलुन पाहिले..
कितीदाही.. कसेही कॉन्टॅक्ट सेव्ह केले तरी ते सेव्ह न होणे.. झालेच तर वॉट्सअॅप वर न दिसणे.. वॉट्सअॅपवर बहुदा मला लोकांचे प्रोफाइल पिक पण जुनेच दिसतात.. ते ठिक आहे.. पण अर्धी निम्मी जनता दिसतच नाही कारण कॉन्टॅक्ट सेव्हच होत नाही. कुणी मला मसेज केला, आणि मग मी तो नंबर सेव्ह केला तर थोडा वेळ वोट्सअॅपवर नंबरच्या जागी नाव दिसते. पण रात्रीतुन परत नाव गायब.. कॉन्टॅक्ट डिलीटेड..
अनेक मेसेज चायनीज मधुन येतात. अनेक अॅपची नावे चायनीज आहेत.. कॉन्टॅक्ट मध्ये यल्लो पेजेस चायनीजमध्ये आहे
मला सेटींग्स - अबाऊट फोन मध्ये अॅन्ड्रॉईड अपडेट दिसतच नाही. फोन उपडेट करायचा पर्यायच नाही. आणला तेव्हा होता हा पर्याय. एकदा पॉप आला की करयचा का अपडेट? तेव्हा शक्य नव्हते म्हणुन मी नाही म्हणले. तेव्हा पासुन तो ऑप्शनच गायब आहे..
सध्या एवढेच.. अजुन आठवुन सांगते..
माझ्या सासर्यांकडे हाच आहे.. त्यांना हे नाही पण अजुन वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत.
2 Feb 2016 - 2:50 pm | उगा काहितरीच
मी भारतातून आणी दुकानातून घेतला होता. पण मला अजूनतरी असा कोणता त्रास झाला नाही. फोन रूटेड नाहीये . बॕटरी थोडी कमी जातेय पण एकंदरीत ठीक वाटतो आहे.
15 Feb 2016 - 6:39 pm | मराठी कथालेखक
Reset factory settings करुन बघा
18 Feb 2016 - 10:39 pm | पिलीयन रायडर
Did that.. Many times
Facing new issue. Tried contacting Lenovo. They do not have warranty information updated. For that they need invoice. Checked on the website from where this phone was ordered ( Gearbest ). Raised tickets but no response at all for २ weeks. Without that Lenovo not ready to update warranty and repair.
Meanwhile, phone has started being slow while typing...
19 Feb 2016 - 9:41 am | तुषार काळभोर
तुमचा बाकी अनुभव (ब्लोटवेअरचा) नाही आला.
पण एस ८५० ला unfortunately contacts manager has stopped responding असा मेसेज येऊन फोन अनरिस्पॉन्सिव होऊन जातो. कालच लेनोवोला मेल टाकला योग्य आयएमईआय टाकून, तरी ते म्हणतात हा आयएमईआय त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही, इन्वॉईस कॉपी पाहिजे त्यांना.
1 Feb 2016 - 10:01 pm | एस
१११ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करावा अशी संमंस विनंती.
2 Feb 2016 - 4:17 pm | ब़जरबट्टू
एकसष्टी नेमकी केव्हा करतात ? ६० वर्षे पुर्ण झाल्यावर की ६१ ?
2 Feb 2016 - 5:03 pm | राघवेंद्र
६० वर्षे पुर्ण झाल्यावर आणि ६१ च्या आत.
2 Feb 2016 - 9:18 pm | कंजूस
सर्व विषयांचा परामर्ष घेतला जातोय पण कालच्या मुरुड होडी दुर्घटनेचा काहीच उल्लेख झाला नाही हे फार खटकले.यात कोकण पर्यटन हा मुद्दाही आहेच.
माझे दोन अनुभव-
१) वापी दादरा गार्डन येथे बोटिंग करताना पाहिले. एका कुटुंबातील चौघे दुसय्रा एका पॅडल बोटीत होते.धक्क्यावरच्या मल्याळी ओपरेटरने योग्य तह्रेने चौघांना बसवले होते.नवरा बायको वजनाप्रमाणे विरुद्ध तिरके. पण या लोकांनी मध्यभागी गेल्यावर जागा बदलायचे ठरवले.मियाबिबि जवळ! बोट तिरकी होऊ लागली.तिकडून शिट्टी मार मारून ओपरेटर ओरडत होता उठू नका.नशीब त्यांना समजले.
२) कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला मोठ्या बोटीतून जाताना ( २००९ साली थेक्कडीच्या दुर्घटनेनंतर ) लाइफ जॅकेट अनिवार्य केले होते.आलेल्या होडीतले उतरल्यावर जाकीटं काढून खाली जमिनीवर फेकत होते तीच जाणाय्रांनी घालायची होती चांगल्या कपड्यांवर.उगाचच नाटक केले सर्वांनी आणि जेमतेम धरल्यासारखी केली.म्हणजे काहीच उपयोग नव्हता.
एकूण काय सुरक्षिततेचे नियम बनवले आणि पाळले नाहीत तर उपयोग काय?
गेटवे ते मांडवा/रेवस/घारापुरी बोटसेवा कित्येक वर्षे आहे पण लाइफजाकिट सक्ती नव्हती ती आता सुरू करावी का?
3 Feb 2016 - 3:50 pm | मयुरMK
मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते २५ हजार पर्यंत एक चांगला मोबिल सुचवा
3 Feb 2016 - 7:47 pm | सुबोध खरे
http://www.91mobiles.com/phonefinder.php
3 Feb 2016 - 9:31 pm | मयुरMK
सुबोध भाऊ मी जालावर पहिले आहे आधीच :)
तुमचे स्वताचे अनुभव सांगा कारण आत्ता घेतला म्हणजे चार वर्ष दुसरा मोबाईल नाही
3 Feb 2016 - 9:38 pm | श्रीरंग_जोशी
स्वानुभावावर आधारीत सल्ला हवा असल्यास ब्लॅकबेरी १० ओएस वर चालणारा फोन घ्यावा असे सुचवीन. मी जवळजवळ तीन वर्षांपासून वापरत आहे. ब्लॅकबेरी झेड १० किंवा झेड ३० हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत.
4 Feb 2016 - 11:08 am | मयुरMK
श्रीरंग भाऊ विचार करतो :)
3 Feb 2016 - 9:54 pm | उगा काहितरीच
कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे म्हणजे जरा जास्तच होताएत. मोबाईलची लाईफ म्हणजे १८-२४ महिने ! त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.
4 Feb 2016 - 11:04 am | मयुरMK
२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.
पुरेपूर सहमत .. मोटो g 3rd gen चा विचार करतो मग १३ हजार ला आहे बहुतेक
4 Feb 2016 - 11:14 am | उगा काहितरीच
छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई जवळजवळ दीड वर्ष वापरला . थोडा पॉवर बटन चा प्रॉब्लेम सोडला तर चांगला होता.
4 Feb 2016 - 12:42 pm | चिनार
लय वेळा सह्मत !!
4 Feb 2016 - 11:47 am | सुबोध खरे
माझ्याकडे xiomi redme note आहे १ वर्षापासून ९९९९/- ला घेतलेला. ५. ५ इंच HD स्क्रीन, २ GB RAM, ३००० mAH Li polymer battery आणि ४G (४ G साठीच हा घेतला). मोबाइल काम उत्तम करतो. एअरटेल ४ G चा वेगही उत्तम आहे DOWNLOAD स्पीड ६-७ MBPS प्रत्यक्ष मिळतो.
आता घेताना कमीत कमी ३ GB RAM वाला फोन आणी LOLLIPOP वाला घ्या असा सल्ला मी देईन.कारण जसे जसे APP UPGRADE होतात तसे ते RAM खातात आणी फोन स्लो होतो. मला अजून तरी असा प्रश्न आलेला नाही. कोणत्याही कम्पनीचा फोन घ्या पण १५००० च्या आत घ्या एक वर्षाने फोन जुना होतोच.
आपल्याला फोन "SNOB व्हाल्यू" साठी पाहिजे असेल तरच बड्या कंपनीचा घ्या उदा APPLE I PHONE ६.
अन्यथा वर म्हटल्याप्रमाणेच घ्या
4 Feb 2016 - 11:19 am | कंजूस
"त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे."
--
हेच म्हणतो.
4 Feb 2016 - 11:39 am | मयुरMK
:)
4 Feb 2016 - 11:36 am | मयुरMK
माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे :)
4 Feb 2016 - 11:49 am | उगा काहितरीच
रच्याकने याच्या प्रतिक्षेत... हे मार्केट मधे आल्यावर मोबाईलचे सरासरी आयुष्य वाढेल.
4 Feb 2016 - 12:01 pm | मयुरMK
''मोबाईल ब्लॉक्स'' वाचाल होत एकदा जालावर भारी कल्पना आहे
7 Feb 2016 - 8:48 pm | श्रीगुरुजी
भारतासकट अनेक राष्ट्रे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून चाचणी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करतात. क्षेपणास्त्रांचा पल्ला काही शे किमी पासून काही हजार किमी पर्यंत असतो. समजा २००० किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी असेल तर प्रत्यक्षात लक्ष्य २००० किमी अंतरावर ठेवले असते का? इतक्या लांब ठेवलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र अगदी अचूक जाऊन आदळते का? तसे नसल्यास प्रत्यक्षात किती अंतरावर लक्ष्य ठेवून चाचणीचे निष्कर्ष काढतात?
8 Feb 2016 - 12:05 am | एस
एक्स्ट्रापोलेशन करतात.
8 Feb 2016 - 12:37 am | मोदक
मग समजा १ किमी = १० किमी असे प्रमाण ठरवून २०० किमी अंतरावर लक्ष्य ठेवले, आणि हे लक्ष्य भेदताना क्षेपणास्त्र ५ मीटर लक्ष्याबाहेर गेले म्हणजे प्रत्यक्षात ते ५० मीटर लक्ष्यापासून दूर जाईल का? की त्याला आणखी काही नियम लागू होतात?
8 Feb 2016 - 2:38 am | आदूबाळ
मला याबद्दल काहीही माहिती नाही, पण एक अंदाज.
१:१० :: ५:५० अशी लीनियर स्केल न ठेवता लॉगॅरिदमिक स्केल ठेवत असावेत.
8 Feb 2016 - 4:46 am | कंजूस
आता फार दूरच्या लक्षावर हल्ला करणारी अस्त्रे निरुपयोगी झाली असावीत.अती वेगवान पण हलके अस्त्र त्याला आकाशातच गाठून भेदते.शिवाय gps गाइडेड असल्याने ते स्वत:च वेध घेते.( इराक युद्धातले पेट्रिअट.)
8 Feb 2016 - 3:02 pm | मारवा
पहीली मुलाखत
श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त
वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे.
दुसरी मुलाखत
श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे.
वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत.
मनातले छोटे विचार
हल्ली मिपावरील लेखनाचा दर्जा खालावलाय का ?
याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
8 Feb 2016 - 3:03 pm | मारवा
पहीली मुलाखत
श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त
वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे.
दुसरी मुलाखत
श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे.
वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत.
मनातले छोटे विचार
हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ?
याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
8 Feb 2016 - 3:03 pm | मारवा
पहीली मुलाखत
श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त
वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे.
दुसरी मुलाखत
श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे.
वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत.
मनातले छोटे विचार
हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ?
याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
8 Feb 2016 - 4:40 pm | पिलीयन रायडर
मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातुन कुठे फिरायला जायचे असेल (३-४ दिवस) तर एखादी जागा सुचवाल का?
फार लांबचा प्रवास नको.
फार दिवस हातात नसल्याने खुप काही पहाणे वगैरे हेतु नसुन हवापालट आणि निव्वळ टाईमपास म्हणुन जायचे आहे.
माथेरान, महाबळेश्वर ते गोवा वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार पाहुन झालेले आहेत.
8 Feb 2016 - 4:50 pm | टवाळ कार्टा
पर्वती =))