सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
12 Dec 2015 - 11:41 am
गाभा: 

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय.

जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र.
(स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2016 - 4:53 pm | पिलीयन रायडर

तुझे हनिमुन डेस्टिनेशन्स नकोत रे सांगुस =))

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2016 - 5:13 pm | टवाळ कार्टा

बस्स...तुमारा सोच इत्ताईच?

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2016 - 5:06 pm | मराठी कथालेखक

ईगतपूरी बघा.
तिथे अश्विन नामक चांगले हॉटेल आहे.
इच्छा असल्यास विपश्यना केंद्राला एकदा भेट देवू शकता.
बाकी ब॑घण्यासारखे फारसे काही नाही (कळसूबाई, भंडारदारा ई आहे). सकाळ सायंकाळ गावातून चक्कर, कधी घाटात जावून सुर्यास्त बघणे वगैरे अनुभवू शकता.
मार्च /एप्रिलमध्ये तापमान जास्त असू शकते एसी रुम्स घेणे बरे राहील.

अदगाव बिचला जाऊ शकतेस.दिवेआगर करुन.

आंबोलीला जाऊ शकता. प्रवास थोडा लांबचा आहे, पण २-३ दिवस घालवू शकाल.
किंवा पन्हाळा-आंबा घाट हा भाग पण करू शकता.

गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक गाण्यांनी कॅसेट भरुन समजा कोणी देण्यासारखी भेटली तर
कोणती गाणी द्यावीत कृपया सुचवावीत. म्हणजे समजा अशी लेटेस्ट रोमँटीक गाण्यांची कॅसेट बनवायचीय तर तुम्ही कुठली गाणी टाकणार ?

गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक गाण्यांनी कॅसेट भरुन समजा कोणी देण्यासारखी भेटली तर
कोणती गाणी द्यावीत कृपया सुचवावीत. म्हणजे समजा अशी लेटेस्ट रोमँटीक गाण्यांची कॅसेट बनवायचीय तर तुम्ही कुठली गाणी टाकणार ?

अजया's picture

8 Feb 2016 - 8:02 pm | अजया

मनवा लागे
सावन आया है
तूही तू
तेरे बिना नाही लागे
मोह मोह के धागे
जीना जीना
मस्त मगन
कभी जो बादल बरसे
सुनो ना संगेमरमर
-बरीच निघतील.लगेच आठवली ती लिहिली.

मारवा's picture

8 Feb 2016 - 9:52 pm | मारवा

हे जीना जीना बदलापुरच च ना ?
ते थोड सॅड आहे हो आमच काम होता होता गंडेल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Feb 2016 - 9:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते लाटकरकाका कुठे आहेत हो सद्ध्या?

आदूबाळ's picture

8 Feb 2016 - 10:36 pm | आदूबाळ

ते मिपाचे लाईफगार्ड आहेत. संस्कृती, धर्म किंवा इतर काहीही बुडायला लागलं की "बुडत्याला धाग्याचा आधार" या न्यायाने धागा काढतात.

नाखु's picture

11 Feb 2016 - 5:30 pm | नाखु

काठावर बसलेत की काय ????

असंका's picture

9 Feb 2016 - 2:54 pm | असंका

एक सिंगल 'की' बदलता येते म्हणून चिकलेट कीबोर्ड वाला लॅपटॉप घेतला. त्याची 'की' कुठे मिळेल कुणाला माहित आहे का?

राजकीय नेत्यांची भाषणे कोण लिहून देतात? त्यांचे पर्सनल असिस्टंट की भाषणे लिहिण्यासाठी वेगळी फौज असते?

आणि म्येन शंका म्हणजे राहुल गांधीच्या वैयक्तीक सल्लागार समितीवर कोण आहे काही कल्पना आहे का?

(सिरीयस शंका आहे - टीपीसाठी विचारलेले नाहीये. आणि ही माहिती मिळवून काही प्रोजेक्ट वगैरे करणार नाहीये.
लै दिवसांची उत्सुकता आहे.)

लान्स नायक हनुमंताप्पा कालवश
फार वाईट वाटल ही बातमी ऐकून.....

लान्स नायक हनुमंताप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 1

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2016 - 2:09 pm | पिलीयन रायडर

अरेरे.... फार फार वाईट वाटलं....

भावपुर्ण श्रद्धांजली...

उगा काहितरीच's picture

13 Feb 2016 - 11:33 am | उगा काहितरीच

पेशव्यांच्या काळात जे कारंजे होते , ते कसे काम करीत होते ? म्हणजे आता जे कारंजे असतात त्यात विजेवर चालणाऱ्या मोटारी असतात. पण त्या काळात तर विजेवर चालणाऱ्या मोटारी नसतील ना !

जिन्क्स's picture

15 Feb 2016 - 5:25 pm | जिन्क्स

सायफुन पद्ध्त वापरत असावेत. दिल्लीच्या लाल महालात (शनिवार वाडा बांधायच्या बर्याच आधी) ही पद्ध्त वापर्त होते.

नाव आडनाव's picture

18 Feb 2016 - 9:05 pm | नाव आडनाव

मला हार्ड डिस्क घ्यायची आहे. माझ्याकडे अमॅझॉनचं एक कूपन आहे १००० रुपयांचं आणि १००० कॅश बॅक मिळणार आहे. सिगेट आणि डब्लूडी असे २ ऑप्शन आहेत २ टीबी मधे, जे मला वाटतंय सफिशियंट आहेत माझ्यासाठी. ह्याच दोन पैकी घ्यायची असं नाही, पण रिव्यूज पॉजिटिव्ह आहेत म्हणून या दोन लिंक पेस्ट केल्या. सगळे ऑप्शन इथे आहेत. एक्स्टर्नल हार्ड डिस्कची माहिती असणार्‍यांनी कॄपया निवड करण्यासाठी सल्ला द्या.

उगा काहितरीच's picture

18 Feb 2016 - 10:16 pm | उगा काहितरीच

मी WD ची वापरतो १ TB ची आहे माझ्याकडे . स्पिड चांगली आहे. बॕटरी कमी खाते, शिवाय वजनही जास्त नाही. सिगेट पेक्षा WD चांगली असे माझे मत . मित्राकडे सिगेट आहे. २ TB घ्यायची असेल तर वजन पाहून घ्यावी. आणी यात पार्टिशन होत नाहीत त्यामुळे डेटा सॉर्ट करायला अवघड जाते. माझ्याकडे ही आहे . आणी अजून एक याचा उपयोग pen drive सारखा केला आणी चुकून व्हायरस आला तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. मी याचा उपयोग Back-up साठीच करतो.

तुषार काळभोर's picture

19 Feb 2016 - 10:27 am | तुषार काळभोर

याच्याशी सहमत. सिगेट वाईट नसेल, पण वेस्टर्न डिजीटल आवडते मला.बाकी दोन्ही रिलायबल आहेत.(१००% रिलायबल काहीच नसते. कोणतीही हार्डडिस्क घेतल्यावर दुसर्‍यादिवशी बंद पडू शकते.) दुसरं काही शक्यतो घेऊ नका.

माहितीसाठी धन्यवाद मित्रांनो :)

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2016 - 10:27 am | श्रीरंग_जोशी

श्री संजय सोनवणी यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेले आवाहन इथे डकवत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मदत हवी.
शेतक-यांसाठी थेट खरेदी विक्रीचे माध्यम असावे म्हणून App आणि Portal बनवायचे काम सुरु आहे. त्यात धान्य, कडधान्य . फळे, भाज्या, फुले इत्यादिंचा समावेश असेल. हे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत असेल.
मदत ही हवी कि कोणी मला धान्ये-कडधन्ये, भाज्या, फळे, फुले यांची इंग्रजी नांवे व त्यांचे हिंदी व मराठीतील पर्यायी नांवे याची यादी पुरवु शकेल काय?
मला काही माहित असली तरी मग इंग्रजी नांवे माहित नाहित किंवा मग हिंदी नांवे माहित नसतात. य झटापटीत वेळ जातो आहे. तरी उदारहृदयी मित्रांनी मदत करावी. एखाद-दुसरे सुचवून उपयोग नाही. यादी शक्यतो येथे न देता मेल करावी ही नम्र विनंती.
sanjaysonawani@gmail.com

तुषार काळभोर's picture

20 Feb 2016 - 10:51 am | तुषार काळभोर

हे मिपावरच्या संदर्भासाठी.
http://www.vegetarian-cooking-recipes-tips.com/list-of-all-vegetables.html

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2016 - 10:54 am | श्रीरंग_जोशी

मनःपूर्वक धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2016 - 5:07 pm | मराठी कथालेखक

आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई) स्थानिक भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे (म्हणजे महाराष्ट्रात मराठीतून सोबत इतर भाषेतून लावू शकतातच पण मराठी सक्तीचे) आता या नियमाची /कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाचे कर्तव्य आहे ? मागे मी PCMC च्या संकेतस्थळावर दोन हॉटेल्सची तक्रार छायाचित्रांसकट टाकली होती मात्र ही गोष्ट PCMC च्या अखत्यारीत येत नाही असा शेरा देत ही तक्रार बंद करण्यात आली.
या संदर्भात कुणाकडे (मनसे सोडून) तक्रार करावी याचे कृपया नेमके मार्गदर्शन करावे