लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)
हा प्रवास माझे मित्र नीरज यांनी सायकल वरून केला आहे. हे प्रवास वर्णन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असा आमचा दोघांचा उद्देश आहे. म्हणून हे प्रवास वर्णन त्यांच्या संमतीने भाषांतर करून देत आहे. तर मग करू या सुरुवात प्रवासाला...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसंग एक : ‘‘हेलो, यू आर फ्रॉम?” “दिल्ली।” “व्हेयर आर यू गोइंग?” “लद्दाख।” “ओ माई गॉड! बाइ साइकिल?”
"मी फार चांगले हिंदी बोलू शकतो. आपण देखील हिंदी मध्ये बोलू शकत असाल तर कृपया हिंदी मध्ये बोला. आपण जर हिंदी बोलू शकत नसाल तर मला माफ करा. मी आपली भाषा समजू शकत नाही. "
रोहतांगला फिरायला जाणाऱ्या एका पर्यटकाशी बोलत असताना, हा संवाद झाला.
* * * * * *
प्रसंग दोन: "भाऊ, थांबा थांबा. आम्हाला तहान लागलेली आहे. बर्फ खूप, पण पाणी नाही. स्वताच्या समस्या पाहिले पण मुलांच्या समस्या नाही पाहू शकत. कृपया करून पाणी द्या. फक्त एकाच घोट द्या.. संपूर्ण पिणार नाही."
" होय, माझ्याकडे एक पाण्याची बाटली आहे. आपण संपूर्ण बाटली रिकामी करू शकता, एका घोटाचा प्रश्नच नाही. मी आता खाली उतरत आहे. खाली गेल्यावर खूप पाणी मिळेल. दहा मिनिटा नंतर माझ्याकडे पाणी असेल. "
रोहतांग येथे बर्फाची मजा घेत असलेल्या एक मोठ्या कुटुंबाचा आणि माझा संभाषणाचा हा एक भाग.
* * * * * *
प्रसंग तीन: होय सर " भाऊ, येथे या गावात रात्री राहण्यासाठी एक खोली मिळेल ",
"हो पण येथे शौचालय बाहेर जावे लागते"
"किती?"
"आपण आधी खोली पाहून घ्या.. नंतर पैश्याचे बोलेन."
" नाही, खोली नंतर बघेन. मग ती कशी का असेना...आपण आधी पैसे सांगा."
" पन्नास रुपये. पण आपण फार दुरून आले आहेत, आम्ही चांगली सेवा-सुविधा देऊ शकत नाही. पुढे जीस्पा आहे तिथे तुम्हाला खूप खोल्या मिळतील."
" नाही, मी जाणार नाही. मला इथेच थांबायचे आहे. "
गेमुर गावात रात्री आठ वाजता झालेल्या संभाषणाचा हा भाग.
* * * * * *
प्रसंग चार: " हॅलो, सर, कृपया पासपोर्ट दाखवा"
"भाऊ...आमचा पासपोर्ट होत नसतो कधी "
दारच्या चेक पोस्ट वरील संभाषणाचा भाग.
* * * * * *
प्रसंग पाच: "भाऊ, येथे जेवणाची व्यवस्था कुठे आहे?
"येथे नाही. इथून पुढे सहा किलोमीटर आहे."
" अरे बापरे!! जिंगजिंगबार तर हेच आहे. मग धोखा कशाला? माझे स्थिती गेल्या सहा किलोमीटर पासून खालावली आहे. कसा तरी मी सायकल ढकलत, पायांनी चालत , विचार करत इथ पर्यंत आलो आहे कि. जिंगजिंगबार ला आराम करील...चहा घेईन...हे खाईल...ते खाईल... आता परत सहा किलोमीटर? "
" नका विचार करू. आमचा ट्रक तिकडेच चालला आहे. सायकल ट्रक वर ठेवा."
" ठीक आहे ठेवा. भाऊ! तुम्हीच ठेवा. मी सायकल नाही ठेवू शकत. माझ्यात तेवढी शक्ती शिल्लक राहिली नाही."
" काही हरकत नाही, आम्हीच ठेवतो. "
हे जिंगजिंगबार मध्ये बीआरओ मध्ये काम करणारे कामगार आणि माझ्या मधला सवांद आहे.
* * * * * *
प्रसंग सहा: "मित्रा, आज दुसरा घाट पार केला आहे आणि या बारालाचा ने तर माझा जीव घेतलाय. कधी कधी असा विचार मनात येतो कि दिल्ली ची बस पकडून घरी जावे."
" नाही, असा काही करू नकोस. अशा खेपा नेहमी आणि सगळ्यांनाच येऊ शकत नाही. आपण यशस्वीरित्या प्रवास पूर्ण करू शकता, जेव्हा नंतर आपण विस्तृत माहिती किवा आपले अनुभव..आपल्या मित्रांना बोलसाल तेव्हा आपली छाती आनंदाने फुलून जाईल "
हा भरतपूर मधील एका दुकानदाराशी केलेला संवादाचा भाग आहे.
* * * * * *
प्रसंग सात: "भाऊ, तुम्ही आमच्या घरी जा. आमचे घर चोगलमसर मध्ये आहे. तुम्ही दिल्लीत एक मोठे अधिकारी आहात, मुलान आपणास भेटून खूप आनंद होईल. माझे नाव सेन्दुप सेरिंग आहे आणि घरचा फोन नंबर हा आहे. आपण फक्त सेरिंगला भेटले होते असे सांगा. "
वरील संभाषण हे व्हिस्की झरा पाशी एका लद्दाखी दुकानदारा बरोबरचे आहे.
* * * * * *
प्रसंग आठ: "अहो, येथे आज रात्री राहू शकतो का? "
"हो, हो, राहा ना!. माझ्या झोपायच्या पिशवी मध्ये झोपा. मोठ्या पिशव्या आहेत, दोन्ही माणसे बरोबर मावतील. "
" धन्यवाद भाऊ!! मी झोपायची पिशवी आणलेली आहे. फक्त थोडी जागा आवश्यक आहे."...
" तुम्ही खूप मूर्ख आहात. एवढ्या मोठ्या बर्फाच्या वादळात बाहेर पडायलाच नको होते."
"होय, तुम्ही योग्य बोलत आहात. आजच तंगलंग-ला पार करायची मस्ती माझ्या अंगात आली होती. पण आता त्याची मला खूप खंत वाटत आहे. "
हे झारखंडी बीआरओ मजदूर बरोबर तंगलंग-ला जवळ तंबू मध्ये प्रवेश केला असताना संभाषणाचा भाग आहे.
* * * * * *
प्रसंग नऊ: "भाऊ, तुम्हाला इथेच खोली मध्ये जेवण आणू का?... का आत येउन स्वयपाक घरात जेवणार आहात?"
"येथेच आणा"
"नाही, नाही भाऊ, एक काम करा स्वयपाक घरातच या... इथे मला खूप सामान घेऊन यावे लागेल.".
हे संभाषण ससपोल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या मुली सोबतचे आहे.
* * * * * *
प्रसंग दहा: "थांब.. भावा.. थांब !! कुठून आलास ? "
" मी मनाली वरून आलो आहे आणि श्रीनगर ला जात आहे. "
"बापरे!! मोटारसायकल वरून आमची हि अवस्था झाली आहे आणि आपण हे सर्व पर्वत ओलांडून सायकलिंग करत आहात. "
" अजून तरी तुमची अवस्था खूप चांगली आहे. जेव्हा तुम्ही लेह च्या पुढे जासाल तेव्हा तुम्हाला खरी परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. "
हे फोतू-ला ला पार केल्यानंतर मोटारसायकल वाल्यान बरोबर झालेला संवाद.
* * * * * *
प्रसंग अकरा: "थांब भावा... तू कोठे चाललास? "
" श्रीनगर. "
" आता खूप रात्र होणार आहे. चल आमच्या घरी."
"तुझे घर? किती लांब आहे? "
" वर फक्त थोडे."
"आपण किती पैसे घेणार?"
"हि हि हि हि , पैसे नाही घेणार ."
"कोण.. कोण आहे घरात?"
"आई वडील आणि लहान भाऊबहिण."
"ते तुला ओरडणार तर नाही ना? "
" नाही, अजिबात नाही."
" अरे खूपच वरती आहे तुझे घर. आणि रस्ता पण खूप छोटा आहे. एकदम गल्ली सारखा "
" काही हरकत नाही, सायकल वरची पिशवी काढ. ती मी खांद्यावर घेतो आणि सायकल ला मागून ढकलतो मग बरोबर वर जाईल. "
"चल..ठीक आहे "
हा शम्शा मध्ये संध्याकाळी ७ वाजता अहमद नावाच्या मुला बरोबर झालेला संवाद.
* * * * * *
प्रसंग बारा: "कुठे जाणार ?"
"श्रीनगर"
"मित्रा अजून खूप मोठी चढाई आहे. आणि जोजिला पण खूप लांब आहे. थकून जाशील"
"पण हा शेवटचा घाट आहे. मी मनाली पासून अद्याप सात घाट पार केले आहेत. हा पण पार करील."
" हं,आपण पुढे जा. मी ट्रक मागून घेऊन येत आहे. तुला बसवून आजच सोनमर्ग ला सोडेल. "
एका धाब्या वरती ट्रक वाल्या बरोबर झालेलं संभाषण.
* * * * * *
प्रसंग तेरा: "सर, थांबा थांबा!!. आज तुम्ही आमचाच गावात मुक्काम करा. आपण आपल्या शेतात तंबू लावू या. मी तुम्हाला लावायला मदत करेल. "
हे मटायन मध्ये लहान मुलां बरोबरचा संवाद.
* * * * * *
हे होते सायकल प्रवास मधील छोटे मोठे काही प्रसंग. अश्याच किती तरी प्रसंगाशी मला सामना करावा लागला. निसर्गानी तर साथ दिलीच पण माणसांनी पण कोणतीच कसर सोडली नाही.
मग ती माणसे स्थाईक असो कि फिरायला आलेले पर्यटक.
सायकल प्रवास हा काही सोपा नसतोच. आणि त्यात रस्ता जर जगातील उंच रस्त्या पैकी असेल म्हणजेच मनाली ते लेह.. मग खूपच कठीण होऊन बसतो.
फक्त चढत राहा..चढत राहा....चढत राहा ...मग श्वास फुलून येईल, दम लागेल, थंड हवा लागेल..काही पण होऊ दे.. फक्त एकच काम चढत राहा.
तसा पाहील गेले तर जेवढा घाट हा चढल्या नंतर.. तेवढाच घाट उतरणे आलेच. जर जीव तोडून एखादा घाट चढायला तीन दिवस लागत असेल तर कष्ट न करता एक दिवस उतरायला लागतो.
एखादा घाट तीन दिवस घाम गाळून चढल्या नंतर जेव्हा तुम्हाला उतार दिसतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कारण परत पुढच्या घाटा साठी तुम्हाला तयारी ठेवावी लागते.
मनाली ते लेह रस्त्या वरती असे पाच घाट आहेत.
सगळ्यात चांगली गोष्ट अशी कि सायकल मला चांगली साथ दिली. एकदा पण पंक्चर झली नाही. बिचारीला चांगल्या रस्त्या पासून ते अतिशय बेकार रस्त्यावरून चालवली. कितीतरी ओढे पार केले..नद्या पार केल्या..चिखलातून पण चालवली...बर्फाचा पण मुकाबला केला तरी पण कोणताच बिकट प्रसंग आला नाही. अश्या या माझ्या साथी ला वाकून मुजरा !!
तसेच तंबू आणि झोपायच्य पिशवीला पण सलाम!! दिवस भर सायकल चालवून खूप दमायचो कि संध्याकाळी तंबू लावायचा विचार पण मनात यायचा नाही. जिथे पण राहण्यासाठी सुविधा मिळाली तिथे पैसे देऊन राहिलो. कोणत्या हि परिस्थिथि मध्ये तंबू लावायचो टाळत आलो. तरी पण पाच वेळा अशी परिस्थिती आली कि मला तंबू लावायलाच लागला. तंबू ची किमत तर वसूल केलीच पण हे माहित पडले कि प्रवासा मध्ये तंबू आणि झोपायच्या पिशव्या किती महत्वाच्या आहेत.
सायकल वरूनच जायचे ठरविले होते. सुरुवातीला श्रीनगर मार्गे जाण्याची इच्छा होती आणि मनाली मार्ग परत येण्याची कल्पना होती. सर्व तयारी श्रीनगर नुसार केली जात होती . सगळे ठरवले होते ..कुठे कुठे थांबायचे..कुठे कुठे किती वेळात पोहोचायचे. हिमालय क्षेत्रांमध्ये आणि हिमालयाला ओलांडून पुढे उच्च सायकलिंगचा अनुभव नव्हता, त्यामुळे या योजनेला काही महत्व नव्हते. उदाहरणच घ्यायचे झाले तर याच मार्गाने श्रीनगर पासून सोनमर्ग पर्यंत 85km अंतर आहे आणि पूर्णपने चढाई आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू शक्य नव्हतो कि हे अंतर सायकल ने ठराविक वेळेत पार करेल. तरी पण मी हि योजना बनवली.
दिल्ली वरून दुपारी एक वाजता श्रीनगरला जायला बस धावतात. हीच बस दुसर्या दिवशी दुपारी २ वाजता श्रीनगरला पोहचते. या बसच्या छतावर लोखंडाच्या जाळ्या (रेलिंग) नसतात. त्यामुळे पूर्ण सायकल उलगडून ती एका पोत्या मध्ये भरून जायचे ठरले.
दुसरी योजना अशी होती कि दिल्ली वरून जम्मू पर्यंत रेल्वे ने जायचे. तिथून पुढे जीप किवा बसने श्रीनगर पर्यंत. दिल्ली वरून सकाळी जम्मू ला जायला मालवा एक्प्रेस निघते. तिची वेळ दिल्ली वरून सकाळी साडे पाच आहे. कधी कधी ती उशिरा पण निघते. बस पेक्षा रेल्वे ने प्रवास खूप चांगला आहे त्यामुळे माझे मन रेल्वेने जायचे होते. या सायकल प्रवासाची तयारी मी खूपच आधी पासून केली होती. पण हि आळसी माणसे कशी तयारी करतात हे तुम्हाला माहिती आहेच. त्याचा परिणाम असा झाला कि तीन तारखेला संध्याकाळ पर्यंत काहीच तयारी झाली नाही. मी कामावरती निघून गेलो रात्रपाळीला. सकाळी पहाटे लवकर आलो आणि तसाच झोपी गेलो. तोपर्यंत मालवा एक्प्रेस निघून गेली होती. सकाळी ११ ला उठलो.
आता मनाली वरून प्रवास सुरु करायचा मनात विचार घोंगावू लागला. हिमाचल प्रदेशची बस चे वेळापत्रक ऑनलाइन उपलब्ध असते. संध्याकाळची चार चाळीस ची बस पसंद आली.
मग काय बैगा भरायचे काम युद्धपातळीवर शुरू झाले. कपड्याचे दोन दोन जोड बैगेत भरले. एक जोड अंगावरती. शून्यापेक्षा कमी तापमानाला मुकाबला करावा लागणार म्हणून गरमीचे कपडे सोबत घेतले. कपड्यानीच पूर्ण बैग भरून गेली. तसेच टॉवेल, माकड टोपी, हातमौजे, पायमौजे पण घेतले. अश्या प्रवास मध्ये मी काजू , बदाम आणि मनुके जवळ ठेवतो...ते पण घेतले. मोबाइल, कैमेरा व त्यांचे चार्जर, मेमोरी कार्ड, मोबाइल साठी अतिरिक्त बैटरी पण घेतली. मी औषधे कधी हि जवळ ठेवत नाही. आणि घेत हि नाही. पण ती घ्यायला पाहिजेत.
संध्याकाळी सव्वा चार वाजता शास्त्री पार्क मधून बाहेर पडलो. लोखंडाच्या पुलावरून मी काश्मिरी फाटका पाशी आलो. मनाली ला जाणारी बस तयार होती. साडे पाचशेचे माझे तिकीट आणि पावणे तीनशे चे माझ्या सायकल चे तिकीट. बस च्या छतावर सायकल बांधून टाकली.
तिथे काही मुले भेटली ती युथ होस्टेल जवळ सारपास पाशी ट्रेक साठी जाणार होती. त्यांच्या मधला एक मुलगा युथ होस्टेल च्या मार्फत तिर्थन घाटी मध्ये जलोडी जोत पर्यंत सायकलिंग करणार होता. आणि महत्वाची गोष्ट अशी कि या युथ होस्टेल मार्फत जाणारे बहुतेक नवशिखे असतात. सायकल छतावर ठेवतानीच त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. रूपकुंड चे नाव ऐकताक्षणिक त्यांनी ओळखले कि मी कोणत्या मातीत बनलो आहे.
बस मध्ये अजिबात बोर झाले नाही कि त्रास झाला नाही. त्याचे कारण होते ते शेजारील मोकळी बैठक आणि समोरील जागे मधले लांब अंतर. त्यामुळे पाय लांबून बसता आले. मात्र चंडीगडला पूर्ण बस भरून गेली. चंडीगड वरून रात्री ११ ला आम्ही निघालो.
सायकलची पंक्चर काढायचा अभ्यास
महायात्रेला सुरुवात
(क्रमश:)
प्रतिक्रिया
31 Jan 2016 - 1:15 pm | टवाळ कार्टा
कहर...पुढचे भाग लौकर युदे
31 Jan 2016 - 1:17 pm | यशोधरा
वाचतेय.. पटपट लिहा पुढले भाग.
31 Jan 2016 - 1:49 pm | पद्मावति
वाचतेय. पु.भा.प्र.
31 Jan 2016 - 1:56 pm | अभ्या..
नो शोबाजी. फुल्ल डेरिंग.
सॅल्युट भावा.
31 Jan 2016 - 1:58 pm | संदीप डांगे
बाडीस फुल्ल्टू...
31 Jan 2016 - 3:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
+११११
_______/\________
2 Feb 2016 - 8:13 pm | सूड
+१
31 Jan 2016 - 2:37 pm | एस
पुभाप्र!
31 Jan 2016 - 2:44 pm | तुषार काळभोर
आम्हाला खुर्चीतून उठून चहा प्यायला जायचा कंटाळा येतो :(
(उगाच खुस्पटः भाषांतर अगदीच शब्दशः (word to word) वाटतंय. तुमचा स्वतःचा अनुभव थेट मराठीत लिहिताय, असं लिहा की. एखादा शब्द-वाक्य इकडं-तिकडं झालं तरी चालेल.)
31 Jan 2016 - 5:19 pm | राजकुमार१२३४५६
पुढच्या भागात नक्कीच फरक जाणवेल
31 Jan 2016 - 3:00 pm | अजया
बापरे! काय काय करतात लोक.सलाम आणि पुभाप्र
31 Jan 2016 - 3:06 pm | sagarpdy
भारी. पु भा प्र
1 Feb 2016 - 11:26 am | मयुरMK
मानलं भावा ___/\____
1 Feb 2016 - 11:36 am | श्रीधर
मानलं भावा पुढचे भाग लवकर येवुदे.
1 Feb 2016 - 12:42 pm | वेल्लाभट
क्लास
सध्या तरी अशी धाडसं, अशा मोहिमा फक्त बघण्यापुरती सवड आहे.
येऊदेत पुढचे भाग. कहर आहे.
1 Feb 2016 - 12:46 pm | राजकुमार१२३४५६
आपल्या प्रतिसादबद्दल अनेक धन्यवाद !! तसेच नीरज जी ची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे जी आपणा सोबत शेअर करत आहोत.
2 Feb 2016 - 9:05 pm | पिलीयन रायडर
एकच नंबर!! आता सुरु केलं आहे वाचायला.. अनुवाद सुद्धा चांगला जमला आहे.