लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
31 Jan 2016 - 4:47 pm

लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)

रूपकुंड चे नाव ऐकताक्षणिक त्यांनी ओळखले कि मी कोणत्या मातीत बनलो आहे.
बस मध्ये अजिबात बोर झाले नाही कि त्रास झाला नाही. त्याचे कारण होते ते शेजारील मोकळी बैठक आणि समोरील जागे मधले लांब अंतर. त्यामुळे पाय लांबून बसता आले. मात्र चंडीगडला पूर्ण बस भरून गेली. चंडीगड वरून रात्री ११ ला आम्ही निघालो.

सकाळी ५ वाजता मंडी मध्ये गाडी चे आगमन झाले. जास्त वेळ न थांबता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. औट पाशी जलोडी जोतला जाणारा सायकलस्वार उतरला. पुढे भून्तर ला सारपास ला जाणारे पण उतरले. सारपास चा ट्रेक कसोल पासून सुरु होतो.

जो जातो कुल्लू ला तो बनतो उल्लू !! कंडक्टर नि सगळ्यांना खाली उतरवले. आणि म्हणाला कि हि बस आता पुढे जाणार नाही. दुसर्या बस मध्ये बसा. मला काही प्रोब्लेम नव्हता. पण सायकल उतरवून दुसर्या बस मध्ये टाकावी लागणार होती.
आठ वाजता मनाली मध्ये पोहोचलो. मौसम खूपचं छान होता. निखळ उन पडले होते. पर्यटकांची गडबड चालू होती. हॉटेल वाल्याची पण चांगलीच गर्दी होती. बस मधून उतरल्या उतरल्या हॉटेल वाल्यांनी मला घेरले.

मी सायकल चे पहिले निरीक्षण केले. मग सगळे सामान सायकलला बांधले. बांधण्यासाठी घरूनच सुतळी आणली होती. मागच्या कॅईरेजला बैग, तंबू आणि झोपायची पिशवी बांधून घेतली. हे काम खूप गुंतागुंतीचे असते. एकदा सामान बांधले कि परत काढणे अशक्य. त्यामुळे नुकसान पण सोसावे लागते. घालायची धुतलेली कपडे बैग मधून काढायची तसीच राहून गेली. दिल्ली वरून घालून आलो होतो हाफ पैंत आणि टी शर्ट त्याच्या वरतीच राहावे लागले.

मनाली हि समुद्रसपाटी पासून २००० मीटर उंचीवर आहे. चांगले उन पडल्यामुले थंडीचे तर नामोनिशान नव्हते. परवा दिवशी सायकलच्या चाकामध्ये तेल टाकले होते. त्यामुळे ते सगळे तेल बाहेर येउन डिस्क ब्रेक वर येउन सांडले होते. असे दोन्ही चाकांना झाले होते. त्यामुळे ब्रेक लागणे बंद.
मग डिस्क ब्रेक ची साफ सफाई केली. तेव्हा कुठे थोडे थोडे लागू लागले. आज चढाई चा रस्ता होता. उद्या मी रोहतांग पार करणार होतो तेव्हा मात्र ब्रेक ची जास्त गरज पडणार होती. म्हणून बारीक पणे साफ सफाई करणे गरजेचे होते.
ब्यास नदी पार केली. आता कुठे या यात्रे ची सुरुवात झाली होती. चार किलोमीटर गेल्या नंतर खूप भूक लागली होती. म्हणून चहा आम्लेट चा नाश्ता करून घेतला.

९ किलोमीटर वरती पलचान आहे. बरोबर १२ वाजता पलचान ला पोहोचलो. म्हणजे ताशी ३ किलोमीटरच्या स्पीड ने. आज मढी पर्यंत जाऊन थांबण्याचा संकल्प होता. मढी मनाली पासून ३४ किलोमीटर दूर आहे. म्हणजे मी जर याच स्पीड ने पुढे जात राहिलो तर मला 11 तास लागतील. म्हणजे रात्री ८ ला मी मढी मध्ये असेल. रात्री तर मला सायकल चालवायची इच्छा नव्हती. त्यामुळे मढी मला अशक्य वाटू लागले. तरुण गोयल बरोबर माझे बोलणे झाले. हिमालयाची त्यांना खूप माहिती आहे. त्यांनी सांगितले कि मढी मध्ये जेवणास मिळणार नाही. पहिले मिळत होते पण उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आता मिळत नाही. माझ्या साठी हि खूप खराब बातमी होती.
पलचान मध्ये चाउमीन खाल्ली. इथे आल्यावर कळाले कि गोयल साहेब बरोबर म्हणत होते.
एक चांगली गोष्ट कळली कि मढी मध्ये फक्य ५ पर्यंतच जेवण मिळणार होते त्यानंतर नाही. पण मी ५ पर्यंत पोहचू शकणार नव्हतो त्यामुळे हि चांगली गोष्ट पण माझ्यासाठी वाईटच ठरली.

पलचान पासून एक रस्ता सोलांग ला पण जातो. रोहतांग नंतर सोलांग हे गर्दीचे ठिकाण आहे. त्यामुळे या चौकात खूप वाहनाची गर्दी होते.
पलचान पासून ४ किमी अंतरावर कोठी आहे. 2 वाजता कोठी ला पोहोचलो. एवढे नक्की होते कि कोठीच्या पुढे गेल्यावर काही खायला मिळणार नाही. आलूचे पराठे मग पैक करून घेतले. पावणे तीन ला तेथून निघालो. ८ पर्यंत मढीला पोहोचण्याचा निचय केला. ह्या वेळेला रोहतांग वरून गाढ्या वापस मनाली कडे येत होत्या. त्यामुळे खूप गर्दी होती रस्त्याने. सायकल खूप हळू चालत होती. त्यात रस्ता चढ-उताराचा होता. कैरियर ला जे सामान बांधले होते ते एका साईटला झाले. एकदा तर गाड्यामुळे मला रस्त्यावरून खाली उतरावे लागले. खालचा रस्ता खूप ओबडधाबड होता. आणि त्यात चढाई..त्यामुळे पुढचे चाक सारखे वर व्हायचे. कैरियर वर जवळ जवळ २० किलोचे सामान असेल. मनात विचार आला कि काहीतरी केले पाहिजे जुगाड. पुढच्या चाकावर थोडा भार टाकावा तर पुढच्या चाकाला मरगार्ड नव्हते.

हिमालयाची एक सर्वात खराब सवय आहे. दुपारी ३ नंतर हवामान खूप खराब होते. दुपारी काळे ढग येतात आणि संध्याकाळी पाऊस पडतो. साडे चार वाजले होते वरती तोंड करून बघितले तर काळे ढग जमा झाले होते. असे वाटत होते कि खूप पाऊस पडणार आहे. संध्याकाळी ५ ला गुलाबा ला पोहोचलो. मढी अजूनही १३ किमी दूर होती. खराब हवामान बघून इथेच राहण्याचा विचार केला. सीमा सडक संघटना म्हणजेच बी.आर.ओ चे ठिकाण मला दिसले. बी.आर.ओ वाल्यान बरोबर थांबण्यासाठी मी बोलणी सुरु केली. त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितले. तिथेच मी तंबू टाकायचा विचार केला. तेवड्यात पाऊस सुरु झाला. बी.आर.ओ वाल्यांना दया आली. पाऊस थांबे पर्यंत थांबू दिले. गुलाबा मध्ये सुद्धा खाण्याची व्यवस्था होती पण उच्च न्यायालया नुसार सगळे बंद झाले.

तितक्यात तिघे जण भिजत भिजत आले. बी.आर.ओ वाल्यांनी आमच्या साठी चहा केला. हे तिघे जण मोटारसायकल वरती रोहतांग वरून आले होते. पाऊस आला म्हणून इथे येउन थांबले. पाऊस कमी झाला तसे ते निघून गेले. जातानि मात्र माझी टोपी घेऊन गेले. मी हेल्मेट पण आणले होते. पण बैग मधून काढले नव्हते. टोपी वरच काम भागवत होतो. त्यात एकाने मला टोपी मागितली मी म्हटले जा घेऊन. त्यांच्या कडे हेल्मेट पण नवते.
बी.आर.ओ वाल्यांना मी खूप प्रार्थना केली कि मी खायला प्यायला पण मागणार नाही, अंगावरती चादर ,ब्लंकेत पण मागणार नाही. फक्त थोडीशी जागा द्या. तर ते म्हणाले कि आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशा शिवाय काहीही करू शकत नाही. मी म्हणालो कि मग साहेब कुठे गेलेत त्यांना विचारा मग. तर ते म्हणाले कि खाली गेलेत माहित नाही कधी येतील ते. मागे कामगार राहत होते. मी म्हणालो तिकडे जागा द्या. ते मला तिथे घेऊन गेले. ते झारखंडी होते. त्यांनी पण मला राहण्यास नकार दिला. आता तंबू लावण्या शिवाय मला पर्याय नव्हता. मग काय थोडा वरच्या साईट ला गेलो आणि तंबू लावायला सुरुवात केली. पाऊस पण उघडला होता.

मी तंबू लावायला सुरुवात केली लगेच एक कामगार तिथे आला. त्याने मला सावध केले कि वरती जंगल आहे. तिकडे जाऊ नकोस. कालच एका जंगली कुत्रानी लहान बाळाला नेले आणि त्याला खात बसला होता. मी म्हणालो कुणाचे होते बाळ. एका कामगाराचे. ऐकून खूप वाईट वाटले. मी असे ऐकले होते कि जंगली अस्वल असे करते. इथे तर जंगली कुत्रे. आता तर मला खूप भीती वाटू लागली. थोड्या वेळाने अंधार पसरला. खालच्या साईटला असलेले कामगार त्यांचा आवाज पण कमी होऊ लागला. तसी मला अजून भीती वाटू लागली. तेवड्यात तंबूच्या बाहेर कसला तरी आवाज होऊ लागला. सर सर सर असा. नक्कीच कुणीतरी जनावर असणार..त्यांनी वास पण घेतला आणि आपले अंग पण रगडले. मी खूप घाबरलो. म्हटले नक्कीच तो जंगली कुत्रा असणार. आता हा आपला तंबू फाडून टाकणार!! माझी तंबूतून बाहेर डोकवायची इच्छा पण झाली नाही.

काही वेळाने एखादी वस्तू घासल्याचा आवाज आला. आवाज थोडा ओळखीचा वाटू लागला. हा तर बैलाच्या पायाचा आवाज आहे. थोडी भीती दूर झाली. मग मी तंबू ची चैन उघडून बघितले. बाहेर कोणीतरी दिसत होते. नक्की काय आहे हे बघण्यासाठी टोर्च मारला. तर सगळी भीती गायब!! पाच गाय होत्या. त्यानंतर त्यांनी तंबू भोवती खूप चक्कर मारल्या. गवत खाल्ले, माझ्या सायकल वर पण चढल्या. मग मी निवांत झोपून गेलो.

आज मी २१ किलोमीटर सायकल चालवली. मी आज एक चूक केली कि आजच दिल्ली वरून आलो होतो. मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल होण्यासाठी.


मनाली चे सौंदर्य


मनाली पासून अंतर


मनाली पासून १ किमी पुढे गेल्यावर


माझा साथी


सोलांग चौकात वाहनाची गर्दी


एक रस्ता सोलांग कडे आणि एक रोहतांग कडे


रोहतांग कडे


कोठी


बी.आर.ओ वाल्यांच्या घोषणा खूप महत्वाच्या आहेत


हेल्मेट तर खूप महत्वाचे आहे. सायकल असू दे कि मोटारसायकल


गुलाबा मध्ये आपला तंबू

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

वाचते आहे. कुल्लू, नग्गर केले आहे. सोलांग, रोहतांग करायचे आहे...

एस's picture

31 Jan 2016 - 8:27 pm | एस

अनुवादाचा दर्जा सुधारण्यास थोडा वाव आहे असे सुचवतो. बाकी लेखमाला उत्तम होणार यात शंका नाही.

सही! बादवे तंबूत झोपताना सायकल कुठे ठेवायचा?

पैसा's picture

31 Jan 2016 - 11:39 pm | पैसा

मस्त लिहिल्ण आहे! एस म्हणतात तसं जरा अनुवाद अधिक चांगला कसा होईल हे बघा.

या नीरज जाट यांचा उल्लेख वाचलेला आहे. अवलिया असाच उल्लेख केलेला आहे. तो खरा आहे हे दाखवणारे अनुभव आणि लिखाण. पुभाप्र. अनुवादाची क्वालिटी सुधारली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही पण अनुभव मांडणं जास्त महत्वाचं. अनुवाद वाचक मनातल्या मनातही करु शकतील.

आदूबाळ's picture

1 Feb 2016 - 12:24 pm | आदूबाळ

मार्गी यांच्या लेखमालेत उल्लेख झालेले नीरज जाट आपणच का?

मस्त चालली आहे लेखमाला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2016 - 12:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

उत्तम लेखमाला, मंडी मनाली कसोल सेवबाग़ भुंतर डोभी ह्या एरियामधे खुप फिरलोय त्यामुळे सहज कनेक्ट झाले मला.

एक अनाहूत सल्ला, पुढल्यावेळी जर हिमाचल मधे साइकिल न जायचे असले तर आधी तुम्ही राहता तिथे म्हणजे दिल्लीत युथ हॉस्टल च्या ब्रांच मधे चौकशी कराल, त्यांच्याच एक्सपीडिशन मधे असले पाहिजे असे नाही पण एकट्यादुकट्याला ते रात्री झोपायला जागा जेवण वगैरे आनंदाने प्रोवाइड करतात. (मी एक्टिव असताना तरी करत होते)

मार्गी यांनी त्यांचा प्रवास अर्धवट सोडला होता. नीरज जी नि वारंवार फोन करून मार्गी यांना सांगितले होते कि प्रवास अर्धवट सोडू नका म्हणून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2016 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चाललीय सफर ! खूप जुन्या आठवणी जाग्या केल्यात.

खूप खूप पूर्वी, १९८१ मध्ये, मनाली-रोहतांग रस्त्यावरून कोठीपर्यंत गेलो होतो. शोलांग नाल्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (!) बर्फावरचे खेळ खेळायला मजा आली होती. पुढे रोहतांग पास पर्यंत जायचे होते, पण बर्फवृष्टीने रस्ते बंद झाल्याने ते जमले नाही. वेड लावेल असा भन्नाट निसर्ग आहे त्या रस्त्यावर.

सतिश पाटील's picture

1 Feb 2016 - 1:13 pm | सतिश पाटील

त्यांनी सांगितले कि मढी मध्ये जेवणास मिळणार नाही. पहिले मिळत होते पण उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आता मिळत नाही.

हा निर्णय नक्की उच्च न्यायालयाचा आहे कि हिमाचल सरकारचा हे माहित नाही पण खूप महत्वचा आणि योग्य निर्णय घेतलाय.

मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल होण्यासाठी.

किमान २ दिवस तरी राहावे असे मला वाटते.

छान लिहिलंय.फोटोही छान.
अजून सविस्तर वर्णन हवे. वाचायला मजा येईल.