दिनुची प्रेम कहाणी
( एक सत्य कथा )
भाग १
आज दिनु थोडा ऊदास दिसत होता . रवी ने त्याला नाराजीच कारण विचारल पण दिनु आज काहीच बोलत नव्हता मुकाट्याने टेकडीची वाट चढत होता त्याच्या पाठीमागे रवी ,, शेवटी रवीने त्याचा हात पकडला व त्याला खोदुन विचारले तेव्हा कुठे दिनु ने तोंडातुन उच्चार काढला अगदी बारीक आवाजात तो बोलला ' अरे रवी काल तिला बघायला स्थळ आल होतं रे !
ओ हो अच्छा तर हे कारण आहे माझ्या मित्राच्या नाराजीच ,,
अरे रवी तुला मजाक वाटतोय का ? अरे मी तिच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती तर जीवच देईल कारण कालच ती मला म्हणाली होती . की लवकरात लवकर घरी सांग नाहीतर मी जीव देईन .
अरे मग सांगुन टाक ना घरी रवी म्हणाला
नाही रे घरचे ऐकणार नाही.
हे ऐकुन रवी पण शांत झाला. कारण दिनुचे घरचे समजुन घेणार नाही हे रवी ला पण चांगले माहीत होते.
बोलत बोलत ते टेकाडाच्या वर आले आजुबाजुला करवंदीच्या जाळ्या काळ्या भिन्न पिकल्या होत्या . दिनुने एक करवंद तोंडात टाकले आणि त्याची मधुर चव जीभेला लागताच तो ४ वर्षापुर्वीच्या काळात हरवुन गेला . याच टेकाडावर करवंदे खातांना झालेली त्यांची पहिली भेट आणि घाबरत मारलेला प्रपोज . सार काही डोळ्यासमोर घडत वस जाणीव दिनुला झाली. क्रमशः
प्रतिक्रिया
8 Jan 2016 - 9:03 pm | जव्हेरगंज
येऊ द्या मोठे भाग पटाटा !!
8 Jan 2016 - 9:25 pm | कविता१९७८
प्रपोज मारतात?????
9 Jan 2016 - 5:24 am | दिनु गवळी
हो प्रपोज मारता म्हणजे विचारता (करता) अस म्हणतात
9 Jan 2016 - 6:36 am | विवेक ठाकूर
तुम्ही तुमच्या स्टाईलनं बिनघास्त लिहा . शुद्ध अशुद्ध वगैरे फाटयावर मारा . प्रपोज मारणे बरोबर आहे .
29 Jan 2016 - 9:03 am | संदीप डांगे
कचकुन समर्थन.
9 Jan 2016 - 6:51 am | दिनु गवळी
मी तसच तर लिहीतो बिनधास्त ..
9 Jan 2016 - 12:15 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
11 Jan 2016 - 1:18 am | Savnil
याला म्हणतात सामन्यांच्या साथी लिहिलेले सामान्य शब्द
11 Jan 2016 - 5:52 am | दिनु गवळी
लेखन समजुन घेतलेत
29 Jan 2016 - 8:45 am | शित्रेउमेश
पुढचा भाग येवुदे आता....