जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
प्रतिक्रिया
9 Jul 2015 - 8:45 pm | ईश्वरसर्वसाक्षी
तुम्हिपण ना गुरुजि... अहो हे सगळ केंद्र सरकार स्वारि मोदि सरकारने रचलेला कुंभाड आहे.
"His party has accused the BJP of revenge politics"
अरे कोण हा मनोजकुमार...केंद्र सरकार कडे काय एवढेच काम राहिलेय का?
9 Jul 2015 - 8:49 pm | ईश्वरसर्वसाक्षी
Manoj Kumar has several cases of cheating and one of assault against him.
AAP leader Sanjay Singh attacked the BJP-ruled Centre, which controls the Delhi Police. "Modi is doing 'gundaraj'... this must be one of the FIRs filed in 2014 against us when we were protesting," Mr Singh said, adding, "The Delhi Police are not arresting other people in even more grave cases."
AAP had also cried foul when the capital's police dramatically arrested its Jitender Singh Tomar, then Delhi's law minister, last month. He is accused of faking degrees.
मज्जा आहे बॉ..
15 Jul 2015 - 9:23 pm | ट्रेड मार्क
पेट्रोल २.७८ आणि डीझेल १.८३ रुपयांनी वाढले.
15 Jul 2015 - 10:32 pm | विकास
आधी "वाट" लावणार मग VAT वाढवणार! ;)
15 Jul 2015 - 10:40 pm | ट्रेड मार्क
त्याचा फायदा उठवून परत केजरू म्हणायला मोकळा… जरी आम्ही VAT वाढवला तरी लोकांना जास्त किंमत द्यायला लागत नाहीये… म्हणजे परत जाहिरात करायला बरं!!!
15 Jul 2015 - 10:53 pm | श्रीगुरुजी
आआपचे प्रचारक श्री. रा. रा. नान्देडिअन यान्चे याच पानावरील खालील प्रतिसाद वाचा.
http://www.misalpav.com/comment/714566#comment-714566
या प्रतिसादात ते म्हणतात.
http://www.misalpav.com/comment/713367#comment-713367
वरील प्रतिसादात ज्या वस्तून्वर व्हॅट वाढविलेला आहे त्यान्ची यादी आहे, पण त्यात पेट्रोल व डिझेलचा समावेश नाही.
http://www.misalpav.com/comment/714197#comment-714197
वरील प्रतिसादात खालील वाक्ये आहेत.
^^
म्हणजे आआपच्या अधिकृत हॅन्डलवर खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केलेली होती. आआपचे अधिकृत सन्योजक दिलीप पान्डे यान्नी "पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढविणार नाही" अश अधिकृतपणे खोटी माहिती दिली होती.
केजरीवाल अत्यन्त धूर्त आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. पेट्रोलियम कम्पन्या दर महिन्याच्या १५ व ३०/३१ तारखेला पुढील पन्धरवड्यासाठी पेट्रोल व डिझेल च्या दरातील बदल जाहीर करतात. आज १५ तारखेला पेट्रोल व डिझेल चे देशभरातील दर प्रत्येकी २ रूपये प्रतिलिटर कमी झाले आहेत. बरोबर आजच केजरीवालान्नी दिल्लीत व्हॅट वाढवून पेट्रोलचे दर ३ रूपयान्नी व डिझेलचे दर २ रूपयान्नी वाढविले. म्हणजे दिल्लीकरान्ना प्रत्यक्षात डिझेल आहे त्याच किमतीने मिळेल व पेट्रोलमध्ये फक्त १ रूपयाची वाढ होईल. पेट्रोलियम कम्पन्यान्नी घटविलेल्या दरात आपले दर वाढवून वाढीव दराचा परीणाम दडविण्यात केजरीवाल यशस्वी झाले आहेत.
16 Jul 2015 - 9:53 am | नांदेडीअन
काही बातम्यांमध्ये सांगत आहेत की पेट्रोल २८ पैशांनी वाढले आणि डिझेल ५० पैशांनी स्वस्त झाले.
http://www.hindustantimes.com/business-news/petrol-diesel-prices-cut-by-...
&
http://profit.ndtv.com/news/commodities/article-petrol-price-in-delhi-in...
&
http://m.economictimes.com/industry/energy/oil-gas/petrol-diesel-prices-...
http://www.mypetrolprice.com/ या वेबसाईटवरसुद्धा हीच माहिती आहे.
म्हणजे दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल ६६ रूपये ९० पैसे आणि डिझेल ४९ रूपये ७२ पैशांना मिळत आहे.
पण काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले होते की पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट वाढवण्यात येणार नाही.
त्यांच्या या खोटारडेपणाचा निषेध करावा तेव्हढा कमीच आहे.
उत्तरेकडच्या राज्यांच्या टॅक्समध्ये सुसुत्रता असावी म्हणून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या अर्थमंत्र्यांनी मिळून व्हॅट वाढवला आहे असे ते आता सांगत आहेत.
हेच त्यांनी अगोदर सांगितले असते, तर त्यांचा एव्हढा विरोध झाला नसता.
पण आज प्रत्येक आप समर्थक या दरवाढीचा निषेध करतोय.
16 Jul 2015 - 2:42 pm | श्रीगुरुजी
केजरीवालान्च्या धूर्तपणाला सलाम!
भविष्यात जेव्हा पेट्रोलियम कम्पन्या पेट्रोल व डिझेलच्या भावात एखाद्या महिन्याच्या १५/३० तारखेला बदल जाहीर करतील, बरोब्बर तोच मुहूर्त साधून त्याच दिवशी दिल्ली सरकार पेट्रोल व डिझेल च्या व्हॅटमध्ये अजून ५% वाढ करेल (कारण व्हॅटची कमाल मर्यादा यापूर्वीच ३०% पर्यन्त वाढविली आहे व काल तो २५% पर्यन्त पोहोचला. म्हणजे अजून ५% वाढ होऊ शकते), जेणेकरून दिल्ली सरकारची वाढ झाकोळली जाईल.
16 Jul 2015 - 2:37 pm | श्रीगुरुजी
केजरीवालान्चा जनतेच्या हितासाठी अजून एक निर्णय -
http://indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-dcw-chief-appointment...
Opposition parties had accused Kejriwal of nepotism after the AAP government announced the decision to name Swati Maliwal as the next chief of Delhi Commission for Women. A former India Against Corruption (IAC) activist, Swati is married to party's Haryana leader Naveen Jaihind who is considered a close associate of Chief Minister Arvind Kejriwal. Presently, she is the advisor (grievances) to the Delhi CM.
यापूर्वीच आआपने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेन्द्र चौहान यान्च्या नेमणुकीला विरोध करून जनहिताचा निर्णय घेतला होता. या सन्स्थेच्या सन्चालक मन्डळात व अध्यक्षपदी गुणवत्ता न बघता सन्कुचित विचारान्च्या सन्घाची माणसे बसविण्याला आआपने विरोध केलेला आहे.
http://www.siasat.com/english/news/aaps-youth-wing-backs-ftii-students-p...
The AAP today extended support to FTII students protesting against the appointment of TV actor and BJP member Gajendra Chauhan as the new chairman of the premier institute's governing council.
"Moreover, individuals like Anagha Ghaisas, Rahul Solapurkar have been nominated to the institute's apex governing body. These individuals have openly endorsed 'Sangh ideology' and their latest statements run contrary to freedom of expression and its related freedom of unhindered and unconstrained creativity, which is essential for an institute like FTII," it added.
"Since the Modi government's ascent to power, RSS-affiliated organisations and individuals have begun pursuing their agenda through tacit support from the government. AAP will not tolerate the interference of forces emanating from narrow ideologies in the country's education system," the release said.
आआपच्या या दोन्ही जनहिताच्या निर्णयान्बद्दल अभिनन्दन!
18 Jul 2015 - 1:43 pm | पुण्याचे वटवाघूळ
ऐका हो ऐका.....
केजरीवाल सरकारला 'आपल्या' लोकांची किती काळजी आहे बघा. लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर आशीष खेतान या 'आपल्या' माणसाच्या पोटापाण्याची तजवीज म्जणून त्यांच्यासाठी एक नवे पद निर्माण करून खेतान यांना सरकारी बंगला, गाडी, पगार, भत्ते, मोफत वीज, पाणी आणि नोकर-चाकर द्यायचा निर्णय घेतला हो....
'आपल्या' माणसांची काळजी घ्यावी ती अशी.
18 Jul 2015 - 2:24 pm | श्रीगुरुजी
आम आदमी पक्ष हे कॉन्ग्रेसचाच धाकटा भाऊ आहे. साहेबान्ची भ्रष्टवादी कॉन्ग्रेस आणि इन्दिरा कॉन्ग्रेस यान्च्यात जितका फरक आहे, तितकाच फरक आम आदमी पक्ष व इन्दिरा कॉन्ग्रेसमध्ये आहे.
22 Jul 2015 - 6:13 pm | पुण्याचे वटवाघूळ
ऐका हो ऐका.. केजरीवालांना रडायला आता आणखी एक कारण मिळाले आहे हो.... महिला आयोगाच्या अध्यक्षपदी केजरीवाल सरकारने स्वाती मालिवाल यांची नियुक्ती नजीब जंग यांनी कॅन्सल केली हो.... पूर्वी बरखा सिंग या अध्यक्षा होत्या त्या काँग्रेस नियुक्त असल्यामुळे अनबायज्ड काम करणार नाहीत असे महापुरूष त्यांच्या पूर्वीच्या ४९ दिवसांच्या कारकिर्दीत म्हणाले होते. http://www.tehelka.com/2015/07/jung-vs-kejriwal-najeeb-jung-cancels-swat... पण आता महाक्रांतिकारी पक्षाच्या व्यक्तीला त्या पदावर नियुक्त करताना मात्र त्या अनबायज्ड काम करणार की नाही असे प्रश्न महाक्रांतिकारी नेत्याला पडणे शक्यच नाही.
जर का प्रोसिजर अशी असेल की दिल्ली सरकारच्या नियुक्त्या राज्यपालांमार्फत व्हाव्यात तर राज्यपालांना आधी निदान इन्फॉर्म तरी करायला नको का? हे सगळी प्रोसिजर डावलून परस्पर नियुक्त्या करून मोकळे होणार. मग राज्यपालांनी ते मान्य केले नाही की परत भोकाड पसरायला हे मोकळे. सगळ्या प्रोसिजरना केराच्या टोपलीत हे टाकणार आणि त्यासाठी इतरांनी यांच्या टपलीत मारली की परत हे भोकाड पसरणार.
कित्ती कित्ती ढोंगी असू शकतो माणूस याला काही लिमिटच नाही.
22 Jul 2015 - 6:22 pm | काळा पहाड
राबडी देवी बरी
22 Jul 2015 - 7:37 pm | विकास
हम्म...
(या धाग्याचा अजूनही केजरू होताना दिसला. म्हणून केवळ माझ्याकडून खारीचा वाटा म्हणून हा प्रतिसाद टाकला आहे)
23 Jul 2015 - 10:48 am | पुण्याचे वटवाघूळ
सतत रडत राहणारी काही माणसे असतात. अगदी सगळ्या गोष्टी अनुकूल होत असल्या तरी सतत पीरपीर, कटकट करत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. आम आदमी पक्ष आणि आपटार्ड त्यातलेच आहेत.
आता नवीन काय तर दिलीप पांडे या आपनेत्याला दिल्ली पोलिसांच्या गाडीने उडवायचा प्रयत्न केला हा आरोप. मागे १०-१२ वर्षांची मुले क्रिकेट खेळत असताना राखी बिर्लाच्या गाडीवर बॉल लागला आणि काचेला तडा गेला, त्या मुलाच्या बापाने माफी मागून भरपाई द्यायची तयारी दाखवली तरी ही बया 'आपल्यावर हल्ला झाला' म्हणून एफ.आय.आर दाखल करा म्हणून हटून बसली. राईचा पर्वत करणे वगरे मराठी म्हणींचा लाईव्ह प्रत्यय या आपनेत्यांच्या वर्तणुकीतून दिसून येईल. इतके प्रचंड एक्स्ट्रापोलेशन करायची सवय असेल तर पोलिसांची गाडी शंभर फूट बाजूने गेली तरी आपचे लोक 'गाडीने आम्हाला चिरडायचा प्रयत्न केला' असेच म्हणतील इतकी खात्री या अडाण*ट नेत्यांविषयी आहे.
आणखी काय तर पोलिसांनी आप कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर वळ कसे आले होते ही चित्रे फेसबुकवर पोस्ट झाली. आणि लगोलग कुणीतरी आणखी सर्च करून ती चित्रे मुळातली नेपाळमधील होती हे पण पोस्ट केले. अरे किती खोटारडेपणा कराल!!
सतत रडत राहायचे, सतत कटकट करायची, आखे जग आपल्याविरूध्दच आहे असे समजून विनाकारण हौतात्म्य पत्करायचा प्रयत्न करायचा या ढोंगीपणात त्या आपवाल्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.
लोकशाहीतूनच वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, नंबुद्रीपाद असे चांगले मुख्यमंत्री मिळतात.आणि त्याच लोकशाहीतून हा केजरीवाल नामक जोकरही मिळतो. काय करणार? इलाज नाही. हा ढोंगी आणि आक्रस्ताळा माणूस दिल्लीच्या लोकांना हवा होता ना. मग २०२० पर्यंत तो काही तुमच्या मानगुटीवरून जाणार नाही. तेव्हा दिल्लीकरांनो भोगा तुमच्या कर्माची फळे!!
23 Jul 2015 - 1:31 pm | श्रीगुरुजी
>>> आणि त्याच लोकशाहीतून हा केजरीवाल नामक जोकरही मिळतो.
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९.....
राजनारायण, लालू, रामदास आठवले इ. ची उच्च परम्परा केजरीवाल चालवित आहेत. त्यान्च्या माकडचेष्टान्मुळे कधी करमणूक होते तर कधी चीडही येते.
जितेन्द्र तोमरला पकडल्यावर आणि २ आठवड्यान्पूर्वी आआपच्या अजून एका आमदारावर एफआयआर दाखल झाल्यावर हे विनोदमूर्ती आआपच्या सगळ्या आमदारान्ना घेऊन पोलिस कमिशनरकडे गेले होते आणि 'फक्त त्या दोघान्ना कशाला पकडता, आमच्या सर्व आमदारान्वरच एफआयआर दाखल करून एकदाचे आत टाका म्हणजे तुमचे समाधान होईल' असा कान्गावा करून आले. आपल्या पक्षात जे गुन्हेगार आमदार आहेत त्यान्ची पाठराखण करायची आणि त्यान्च्यावर गुन्हे दाखल झाले की माध्यमान्समोर कान्गावा करायचा असे यान्चे सन्तापजनक वागणे आहे.
7 Aug 2015 - 1:45 pm | पुण्याचे वटवाघूळ
ऐका हो ऐका. या आम आदमी पक्षाचे सरकार म्हणजे किती नालायक होऊ शकते याला काही सुमारच राहिलेला नाही. नाफेड म्हणत आहे की एप्रिल महिन्यातच दिल्ली सरकारला १९ रूपये किलोने कांदा खरेदी करायला सांगितले होते.http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-gover... पण तो त्यांनी केला नाही.आता दिल्लीत कांदा ५० रूप्यांच्या पुढे गेला आहे. १९ रूपयाने कांदा घेतला असता तर एखाद वेळेस कांद्याची किंमत कमी राहिली असती पण या रड्या बाळाला मोदी आणि केंद्र सरकारच्या नावाने भोकाड पसरायला मिळाले नसते.
डिजगस्टींग
23 Dec 2015 - 11:03 am | गॅरी ट्रुमन
१६ डिसेंबर २०१२ च्या त्या काळरात्री निर्भयाची विटंबना करून 'मर साली' असे म्हणत तिच्यात लोखंडी सळई खुपसणार्यांपैकी एक हरामखोर तो त्यावेळी १८ पेक्षा कमी वयाचा होता या कारणावरून सुटला. आता त्याचे पुढे कसे होणार, तो आपले पोट कसे भरणार याची केवढी चिंता युगपुरूषजींना सतावत आहे. म्हणून त्याच्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून दिल्ली सरकार त्याला शिवण मशीन आणि १० हजार रूपये देणार !!
यातून केजरीवाल नक्की काय संदेश पाठवत आहेत? बलात्कार्यांनो, दिल्लीत या, तुमची काळजी दिल्ली सरकार घेणार हा? या प्रकारानंतर केजरूविषयी जे काही थोडेथोडके कन्सिडरेशन राहिले होते ते पण आता पूर्णपणे खतम झाले आहे.
निर्भयावर अत्याचार करणारे तक्षक आणि त्यांना पाठिशी घालणारे केजरीवालांसारखे इंद्र कधीनाकधी सर्पसत्रात भस्मसात होतील आणि व्हावेत असे फार वाटते.
23 Dec 2015 - 11:54 am | कपिलमुनी
THE JUVENILE JUSTICE (CARE AND PROTECTION OF CHILDREN) BILL, 2014' which was amended/passed by Central( Modi) Govt in 2014, every state govt has to provide rehabilitation to each and every Juvenile after his terms ends in Juvenile jail.
दुवा
जो नियम आहे तो दाखवला , त्या रेपिस्टबद्दलच्या कृतीचे समर्थन नाही. पण ज्याप्रमाणे न्यायालय कायद्यावर बोट ठेवून चालते तसेच सरकारला चालावे लागते.
23 Dec 2015 - 12:01 pm | गॅरी ट्रुमन
हा हा हा. वाटलेच होते की केजरूचा कोणीतरी गुलाम हे लिहिणार. हे मला माहित नाही असे नाही पण हा युक्तीवाद केजरीवालांना उपयोगी पडणार नाही. त्याच कायद्याने आणि राज्यघटनेने दिल्ली सरकारच्या अधिकारांवर घातलेल्या मर्यादांचा केजरीवालांनी कधी सन्मान केला आहे? प्रत्येक ठिकाणी आपल्या अधिकारकक्षेत नसलेल्या गोष्टीत नाक खुपसायला जायचे आणि ते कापले गेले की मग मोदींविरूध्द किंवा जंगविरूध्द कांगावा करायचा हाच यांचा खाक्या. आता बरे यांना कायद्यावर बोट ठेऊन चालायची उपरती होते? आता का नाही हे धरण्यावर बसत? आता का नाही प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी तमाशे करायची धमकी देत? गेलाबाजार त्याविरूध्द साधे ट्विटही करत?
कर्णाने आयुष्यभर अधर्माची बाजू घेतली होती त्यामुळे शेवटी रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर धर्माने त्याचे रक्षण करावे अशी त्याची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे.
अर्थात केजरूच्या गुलामांना हे समजेल ही अपेक्षाही नाही.
23 Dec 2015 - 12:14 pm | कपिलमुनी
मी तुम्हाला कधीही या प्रकारची भाषा वापरली नाहिये त्यामुळे मर्यादा पाळून लिहा.
वरती लिहिला आहे.
"जो नियम आहे तो दाखवला , त्या रेपिस्टबद्दलच्या कृतीचे समर्थन नाही"
मी केवळ नियम सांगितला , त्याचे समर्थन केले नाही. पण सिलेक्टीव रीडींग करायचे ठरवल्यावर सोयीस्कर तेवढे वाचले गेले.
सद्य मुद्द्यामध्ये त्या राज्य सरकारचा काय चुकला ते सांगा ? इतर वेळेस काय केला ते उकरत बसू नका !
उद्या न्यायालयाने सुटकेच्या वेळेस पुर्नवसनाबद्दल विचारणा केली असती तर राज्य सरकार बांधील होता ( जसा महाराष्त्र सरकार डान्स बार सुरू करण्याबद्दल आहे, कारण हे न्यायालयाचे निर्णय असतात , सरकार त्याच्या विरूद्ध काही करू शकत नाही)
23 Dec 2015 - 12:17 pm | कपिलमुनी
मी आप समर्थक नाही तरी याबातमी मध्ये आपची भूमिका आहे. वाचून घ्या .
23 Dec 2015 - 12:22 pm | गॅरी ट्रुमन
मजाच म्हणायची. म्हणजे केजरीवाल स्वतःच्या सोयीप्रमाणे कायद्यावर बोट ठेवणार आणि इतर वेळी फाट्यावर मारणार आणि वर स्वतः नितीमत्तेचे पुतळे असल्याचा टेंभा मिरविणार?
या गृहस्थाला कायद्याची नक्की किती चाड आहे याचे किस्से शेंबड्या पोराला देखील ठाऊक आहेत.
23 Dec 2015 - 2:44 pm | कपिलमुनी
तुम्ही एका स्पेसिफिक प्रकरणाचा उल्लेख करून प्रतिसाद टाकला आहे.
त्याच्या अनुषंगाने चर्चा करू या.
टेंभे , पुतळे , शेंबडे पोर यांवर इतरत्र चर्चा झाली आहेच.
23 Dec 2015 - 4:03 pm | गॅरी ट्रुमन
आजपर्यंत मोदींवरील एकतरी चर्चा आहे का जी २००२ चा उल्लेख न होता संपली आहे? काही कारण आणि संबंध नसताना केजरीवाल (आणि आशीष खेतान आदी चमचे) इतरांना अडानी/अंबानीचे एजंट वगैरे बकवास चालवतात तेव्हा मुद्द्यांवर अनुषंगून असलेली चर्चा असते का ती? की त्यावेळी केजरू समर्थकांना सोयीची म्हणून 'मुद्द्यांवर चर्चा करा' वगैरे गोष्टी बासनात गुंडाळलेल्या असतात?
तेव्हा अंगाशी आले की स्पेसिफिक प्रकरणावर चर्चा करू आणि इतर वेळा यांना वाटेल तेव्हा वाटेल ते मुद्दे चर्चेत संबंध असो वा नसो खेचून आणायचे हे शिफ्टिंग गोल पोस्टचे उत्कृष्ट उदाहरण आहे.केजरूशाहीचा पीळ पुरेपूर उतरल्याचे लक्षण आहे का हे?
23 Dec 2015 - 4:11 pm | मोदक
या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद वाचताना "तुमचा आयडी हॅक झाला आहे का?" अशी शंका वारंवार का येत आहे?
23 Dec 2015 - 5:03 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी..
मी चारदा चेक केलं की नक्की कोण लिहीत आहे.
23 Dec 2015 - 4:40 pm | कपिलमुनी
इतर वेळेस इतर चमचे काय करतात त्याच्याशी मला देणेघेणे नाही.
मी चर्चा करताना इथे वा कुठेही प्रत्येक वेळेस २००२ चा उल्लेख करतो का ? या संस्थळावर किती वेळा केला आहे ?
आणि आज स्पेसिफिक मुद्द्यावर चर्चा करण्यास योग मुद्दे नाहीत म्हणून आकांडतांडव करू नका. सध्या तुम्ही सोयीनुसार गोलपोस्ट शिफ्ट करत आहात.आतासुधा तुम्ही केजरूशाहीचा पीळ वगैरे भाषा वापरत आहात.
अशा आक्रस्ताळेपणाची गरज योग्य मुद्दे असताना पडत नाही.
24 Dec 2015 - 7:47 pm | ट्रेड मार्क
कायद्याप्रमाणे त्याला राज्य सरकारने मदत करावी असं आहे. पण मुद्दा हा आहे त्याच्या सुटकेविरुद्ध एवढे प्रयत्न चालले असताना केजरीला एवढी घाई का झाली मदत जाहीर करायची? त्यात आम्हा सर्वसामान्यांना फक्त एवढेच दिसले की एवढे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला केजरी मदत करणार, ती पण कसली? तर शिवण मशीन देणार. म्हणजे मुली/ स्त्रियांशी संबध येवू शकतो. त्यातही खुले आम कात्री, सुया बाळगायची मुभा मिळणार. कायदा असं सांगतो का की फक्त शिवण यंत्र द्यावे? अफरोज जो एका बस मध्ये हरकाम्या म्हणून होता त्याला शिवण कला येते का?
डिसेंबर २०१२ मध्ये हाच केजरी अपराध्यांना पकडावे, कडक शिक्षा द्यावी यासाठी आग्रही होता. त्यावेळच्या दिल्ली सरकारच्या नावे शंख करत होता. विचारात आणि कृतीत एवढा फरक पडण्याएवढे या ३ वर्षात काय झाले? त्या टोळीतील सगळ्यात जास्त अत्याचार करणाऱ्याला योग्य शिक्षा व्हावी या साठी केजरीने काय केले? तो ३ वर्षात सहज सुटून जाईल हे माहीत असताना, सुधारित कायदा राज्यसभेत लटकला असताना केजरीने तो मान्य व्हावा या साठी काय प्रयत्न केले?
23 Dec 2015 - 7:07 pm | चिंतामणी
युगपुरुष अण्णांच्या आंदोलनाचे काळात काय म्हणाले ते बघा.
आणि मग ROFL
24 Dec 2015 - 9:36 am | सुबोध खरे
A gem from BACHI KARKARIA
FOrget cars and numbers
Delhi has an ODD chief minister
who wants to get EVEN with everyone else
17 Jan 2016 - 9:14 pm | श्रीगुरुजी
अवतारी महापुरूष श्री श्री १००८ केजरीवाल यांची स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःवर शाई फेकून घ्यायची नाटके परत सुरू झालेली दिसतात. नेहमीप्रमाणेच शाई फेकणारी महिला आआपची कार्यकर्ती आहे व केजरीवालांनी नेहमीप्रमाणेच भाजपवर खापर फोडले आहे.
http://indianexpress.com/article/cities/delhi/woman-throws-ink-on-arvind...
18 Jan 2016 - 3:29 pm | कपिलमुनी
ती महिला आपची कर्यकर्ती आहे असे कुठे लिहिले आहे. एएन आय च्या
बातमीमधे Aam Aadmi sena's Punjab unit ची कार्यकर्ती आहे असे लिहिले आहे.
आणि आम आदमी सेना हा आपच्या विरोधातला गट आहे.
18 Jan 2016 - 8:16 pm | श्रीगुरुजी
आम आदमी सेना हा पूर्वाश्रमीच्या आआपच्या कार्यकर्त्यांचाच गट आहे. या गटाचा भाजपशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा केजरीवालांनी या प्रकारामागे भाजप/संघच असल्याचा थेट (आणि अर्थातच बिनबुडाचा) आरोप केला. या पूर्वी योगेंद्र यादव, सोमनाथ भारती, दस्तुरखुद्द केजरीवाल इ. जेव्हाजेव्हा शाई फेकली गेली व ३ वेळा केजरीवालांना थोबाडीत मारली गेली त्या प्रत्येकवेळी प्रकार घडल्यावर लगेच केजरीवालांनी भाजपवर आरोप केले होते आणि नंतर या प्रकारांमागे आआपचेच कार्यकर्ते असल्याचे सिद्ध झाले होते. सवंग लोकप्रियता व सहानुभूती साठी केजरीवालच हे प्रकार मॅनेज करतात हे स्पष्ट दिसून येते.
काल झालेला प्रकार तसाच आहे असे दिसून येते. पण हद्द म्हणजे हा केजरीवालांच्या हत्येचा कट होता आणि भाजप/संघाने हा कट केलेला होता इतके हास्यास्पद आरोप करण्याइतकी केजरीवालांची मजल गेलेली आहे. स्वतःकडे दिल्लीमध्ये ७० पैकी ६७ आमदार असताना ते असली सवंग लोकप्रियतेसाठी मॅनेज केलेली नौटंकी का करतात हे अजूनही गूढ आहे.
18 Jan 2016 - 8:41 pm | कपिलमुनी
तुम्ही असे खोटं का लिहीता ?
ती कार्यकर्ती आप सेनेची आहे. त्यामुळे ती सध्या आपची कार्यकर्ती नाहीये . त्यामुळे तुमचा वरचा वाक्य चुकीचा आहे
पूर्वाश्रमीची कार्यकर्ती असल्यास तसे मूळ प्रतिसादात नमूद करावयास हवे होते.
कारण
१ दुवा १
२. दुवा २
यामधे हे काम आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याच नसून आम आदमी सेनेचे आहे
त्या सेनेबद्दल अधिक माहिती खालील दुव्यामध्ये आहे
आम आदमी सेना म्हणजे कोण ?
तुम्ही योग्य विदा देवुन लिहा , आंधळ्या विरोधामुळे चुकीचे लिहू नका .
18 Jan 2016 - 9:02 pm | श्रीगुरुजी
त्यात खोटे काय? ती मूळची आआपचीच कार्यकर्ती आहे. ती इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तिचा एखाद्या पक्षाशी संबंध असेल तर तो फक्त आआपशीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड किंवा इंदिरा काँग्रेस व सेवा दल हे जसे वरवर वेगळे वाटतात तसेच आआप पक्ष व आम आदमी सेना आहेत.
गंमत अशी की भाजप, संघ, विहिंप, हिंदू महासभा इ. ना सर्वजण एकाच मापात तोलतात. पण आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे मात्र वेगळे मानतात.
यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मागील १-२ वर्षात केजरीवाल व इतर आआप नेत्यांवर शाई फेकण्याचे झालेले प्रसंग आणि हा प्रसंग यात विलक्षण साम्य आहे. मागील प्रत्येक प्रसंगानंतर केजरीवालांनी लगेचच त्यासाठी भाजपला जबाबदार ध्ररले होते व काही काळाने त्यामागे आआपचेच कार्यकर्ते असल्याचे सिद्ध झाले होते. ते प्रसंग केजरीवालांनीच मॅनेज केले होते. यावेळीही तसेच असणार आहे. फक्त यावेळी ही नौटंकी थेट आआपच्याच कार्यकर्त्याकडून मॅनेज करण्याऐवजी केजरीवालांनी कागदोपत्री वेगळ्या भासणार्या आम आदमी सेना या गटाकडून सर्व प्रसंग मॅनेज केलेला दिसतो. शाई फेकल्यानंतर काही काळ कॅमेरा केजरीवालांच्या चेहर्यावर स्थिरावला होता. त्यावेळचा त्यांच्या चेहर्यावरील लबाड भाव सर्व सत्य परिस्थिती सांगून जातात.
18 Jan 2016 - 10:32 pm | कपिलमुनी
फॅक्टस् डावलून तर्कट लावण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.
जर तर न करता आहे त्यावर बोला आणि खोटारडे पणा बंद करा
19 Jan 2016 - 1:50 pm | श्रीगुरुजी
अहो, केजरीवालच खोटारडेपणासाठी प्रसिद्ध आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी आजतगायत त्यांनी अनेकवेळा नौटंकी केलेली आहे व ती नौटंकी प्रत्येकवेळा उघडकीस आलेली आहे. स्वत:वर हा शाई फेकून घेण्याचा हा नवीन प्रकार हा त्या नौटंकीचाच एक भाग आहे.
19 Jan 2016 - 2:37 pm | कपिलमुनी
तुम्ही पण आता तेच करत आहात ! कोणीही शाई फेकली की तो माणूस आपचाच आहे असा ओरडा करायचा .
सग़ळ्या माहितीचे दुवे देउनसुद्धा तुम्ही कबूल होत नाही. तुम्ही मिपाचे केजरीवाल आहात
19 Jan 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी
शाई फेकणारे आआपचेच आहेत. पूर्वीच्या प्रकरणातही आआपचीच माणसे होती आणि आताही आआपचीच महिला आहे. आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे फक्त वरवर वेगळे आहेत (जसे इंदिरा काँग्रेस व सेवादल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड). ही सर्व नौटंकी मागील नौटक्यांचीच पुनरावृत्ती आहे. त्यात तसूभरही फरक नाही.
आता एक नवीन माहिती येत आहे. त्या महिलेने शाई फेकण्यापूर्वी काही मिनिटे आधी केजरीवालांच्या व्यक्तिगत सहाय्यकानेच केजरीवालांच्या जवळ स्टेजवर उभ्या असलेल्या पोलिसाला खाली उतरून लांब उभे रहायला सांगितले होते. तो तिथेच उभा असता तर त्या महिलेला केजरीवालांच्या जवळ स्टेजवर येताच आले नसते व पुढचा प्रकार घडलाच नसता. हा मॅनेज्ड प्रकार आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.
NEW DELHI: On a day when the Aam Aadmi Party said the ink thrown on chief minister Arvind Kejriwal on Sunday part of a deep-rooted conspiracy and that the CM wasn't being adequately protected, one of the cops from Kejriwal's security detail told his seniors that he was asked to step down from the dais when Kejriwal was addressing the gathering in Chhatrasal stadium on Sunday.
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Kejriwals-PA-asked-me-to-g...
19 Jan 2016 - 3:41 pm | कपिलमुनी
तुम्ही दिलेला व्हिडीओ नीट बघा गुरुजी , त्या मुलीने खालून शाई फेकली आणि तिच्या आजूबाजूला पोलीस दिसत आहेत .
बाकी माझा मुद्दा तुम्ही ती मुलगी आपची कार्यकर्ती आहे असे जे खोटेपणे सांगत आहात तो आहे.
आता तुम्ही आप आणी आप सेना हे वर वर वेगळे आहेत अशी फिरवा- फिरवी करत आहात. आतून एक आहेत, जसे की केजरीवालांनी तुमच्या कानात येउन हे सांगितले आहे.
बाकी तुमच्या मते काँग्रेस आणी आप पण आतून एक असतील . मनसे शिवसेना एक असतील , अशा हिशेबाने जनता दल आणी भाजपा पण एकच असतील
19 Jan 2016 - 9:15 pm | श्रीगुरुजी
ती मुलगी स्टेजवर पोहोचल्यानंतर मग काही वेळाने पोलिस आला. मुळात जवळ पोलिस नसल्यानेच ती मुलगी केजरीवालांच्या इतक्या जवळ पोहोचू शकली आणि पोलिस जवळ नव्हते कारण केजरीवालांच्या पीएनेच त्यांना लांब पाठविले होते.
काँग्रेस व आआप आतून एकच आहेत. काँग्रेसनेच केजरीवालांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर केजरीवालांनीच आजतगायत काँग्रेसच्या शीला दिक्षितांचा भ्रष्टाचाराच्या खटल्यापासून बचाव केला आहे. ऑगस्टमध्ये केजरीवालांच्याच एका मंत्र्याने शीला दिक्षितांवर सीएनजी भ्रष्टाचार प्रकरणात खटला सुरू करावा अशी मागणी एका पत्रात केल्यावर त्याला केजरीवालांनी ३ दिवसात त्याला मंत्रीपदावरून हटविले होते. बिहारमध्ये राजद + काँग्रेस + संजद यांच्या युतीला केजरीवालांनी जाहीर पाठिंबा दिला होता. अजून काय पाहिजे?
19 Jan 2016 - 9:41 pm | कपिलमुनी
आप आणी आप सेना एकत्र आहे याचा पुरावा द्या !
आतुन एकत्र वगैरे बाजारगप्पा नकोत
नैतर तुम्ही खोटारडे
20 Jan 2016 - 12:35 am | अर्धवटराव
रुलाएगा क्या ... =))
20 Jan 2016 - 12:40 pm | श्रीगुरुजी
सगळं अगदी तसंच आहे. केजरीवालांवर शाई फेकण्याचा मॅनेज केलेला कार्यक्रम, लगेच केजरीवालांचे भाजपवर आरोप, शाई फेकणारे आआपशीच संबंधित . . . सर्व काही सूर्यप्रकाशाईतकं स्वच्छ आहे.
बादवे, आआप आणि आम आदमी सेना एकत्र नाहीत याचा पुरावा द्या.
20 Jan 2016 - 1:36 pm | सुनील
बाकी सगळं जौद्या.
पण पुरावा जे 'आहे' त्याचाच देता येतो. जे 'नाही' त्याचा पुरावा कसा द्यायचा?
21 Jan 2016 - 12:43 am | कपिलमुनी
गुरुजी, तुमच्या विधानाला पुरावा सापडला का ?
की खोटा लिहीलात हे कबूल आहे ?
21 Jan 2016 - 1:00 am | संदीप डांगे
गुरुजी आणि केजरीवाल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी जे म्हटलं तेच सत्य, सत्य सिद्ध कशाला करायचं?
21 Jan 2016 - 1:20 pm | श्रीगुरुजी
माझ्या उभ्या आयुष्यात मला इतकी घाणेरडी शिवी कोणीही दिली नव्हती. जाहीर निषेध!
21 Jan 2016 - 1:20 pm | श्रीगुरुजी
ती महिला आआपशी संबंधित आहे हे सर्व वृत्तपत्रातून आलेले आहे. परंतु तुम्ही झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला जागे करणे अवघड आहे.
21 Jan 2016 - 1:42 pm | कपिलमुनी
कोणी घेतले आहे हे उघड आहे .आधी ती महिला आपची कार्यकर्ती आहे म्हणायचा आणि मग आपसेनाची आहे म्हणायचा , पुन्हा आप आणि आपसेना एकच आहे म्हणायचा , पुरावा मागितला की तो नसल्याने आता शब्दांची फिरवाफिरवी करत आहात.
मी तुम्हाला वर्तमानपत्रांच्या लिंक दिल्या आहे ज्यात आप आणि आपसेना यांतला फरक सांगितला आहे .
आणि ती महिला आपसेनाची आहे हे सुद्धा आहे.
तुमच्या अरण्यरूदनापेक्षा पुरावा द्या , लिंक द्या आणि सिद्ध करा .
तरच चर्चा योग्य दिशेने चालली आहे असे म्हणता येइल.
22 Jan 2016 - 2:19 pm | श्रीगुरुजी
अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा इंदिरा काँग्रेस व सेवा दल यांच्यात अजिबात फरक नाही, तसाच या दोघांमध्येही काहीही फरक नाही. अर्थात तुम्हाला जागे करणे अवघड आहे.
22 Jan 2016 - 9:50 pm | कपिलमुनी
सेवा दल ई. गप्पा न सांगता तुमच्या विधानाला पुरावा द्या !
तुम्ही काय म्हणता, याला षष्प महत्व नाही .
पुरावा नाही असे कबूल करा ( तुम्ही किती जागे आहात हे या निमित्ताने कळेलच )
22 Jan 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
त्यांचे प्रतिसाद अन पोस्ट्स असहिष्णु नसतात बरंका कपिलमुनी!!
24 Jan 2016 - 9:24 pm | श्रीगुरुजी
तुम्हीच जरा जागे व्हा. सर्व काही पूर्वीप्रमाणेच जसंच्या तसंच घडलं आहे. तेच कलाकार, तोच प्रसंग, तशीच घटना, तसाच कांगावा, तसेच दोषारोप, स्वतःला दीन/पतित्/अन्यायी असे दाखविण्याची अगदी तशीच पद्धत, प्रसिद्धीसाठी कितीही खालच्या थराला जायची तशीच उमेद आणि एकाच साच्यातल्या गणपतीच्या मूर्तीसारखे एकाच पक्षातून आलेले तेच तेच कलाकार ... सर्व काही अगदी स्पष्ट आहे. जागे झालात तर समजेल.
25 Jan 2016 - 1:06 am | कपिलमुनी
अहो गुरुजी ,
सध्याची आरोपी महिला त्याच पक्षाची आहे याचा वर्तमानपत्रांतला , वाहिनीवरचा कोणता पुरावा तुमच्या कडे आहे ??
तीच तीच कॅसेट वाजवू नका. तुम्ही पुरावा देउ शकत नाही हे सर्वांना कळले आहे .
या निमित्ताने फेकुगिरी उघडकीस आली
25 Jan 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी
आधीचे अनेक प्रयोग झालेल्या त्याच नाटकाचा, तीच संहिता असलेला, तेच कलाकार असलेला, तेच नेपथ्य असलेला, तेच समीक्षक उपस्थित असलेला नवीन प्रयोग पुन्हा एकदा त्याच संचाने सादर केला. सर्व काही तेच आहे. तसूभरही फरक नाही. जागे झालात की लक्षात येईल तेच नाटक आपण त्याच संचासोबत त्याच नेपथ्यासहीत पुन्हा एकदा पहात आहोत.
25 Jan 2016 - 10:55 pm | कपिलमुनी
पूर्वीच्या कहाण्या सांगू नका . तुमच्याकडे पुरावा नाही .
तुम्ही खोटे आरोप करता.
पुरावा देता आला नाही की गोल गोल फिरता.
26 Jan 2016 - 1:11 pm | श्रीगुरुजी
त्यात काय गोल गोल फिरायचं? हा अनेक प्रयोग झालेल्या पूर्वीच्याच त्याच नाटकाचा त्याच कलाकारांसहीत, त्याच नेपथ्यासहीत हा एक पुढचा प्रयोग होता. तुम्हाला हे एक संपूर्ण नवीन नाटक आहे असे वाटत आहे याचेच आश्चर्य वाटत आहे.
"सही रे सही" नावाचे एक नाटक गेली १३-१४ वर्षे रंगभूमीवर प्रयोग करीत आहे. त्यात एकूण ८ वेगवेगळे कलाकार काम करतात. त्यातील भरत जाधव, जयराज नायर व भरत जाधवच्या सहाय्यकाचे काम करणारे कलाकार पहिल्या प्रयोगापासून आजतगायत काम करीत आहेत. उर्वरीत ५ भूमिका प्रत्येकवेळी वेगवेगळे कलाकार करतात. केजरीवालांच्या "शाई रे शाई" या नाटकात सुरवातीपासून केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष इ. कलाकार आजतगायत टिकून आहेत. शाई फेकण्यासाठी ते प्रत्येक वेळी वेगळे कलाकार निवडतात व त्यामुळे तुमच्यासारख्यांना प्रत्येक प्रयोग हे एक नवीन नाटक आहे असा भास होतो.
26 Jan 2016 - 1:20 pm | प्रचेतस
गुर्जी, कपिलमुनी ह्यांचे म्हणणे पटतंय. पुरावे द्यायचे सोडून तुम्ही नुसतेच गोल गोल फिरत राहात.
26 Jan 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी
याच "शाई रे शाई" या हातखंडा नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग आआपवाल्यांनी भूतकाळात अनेकवेळा केलेले आहेत. नुकताच घडवून आणलेला प्रसंग हा त्यातलाच एक नवीन प्रयोग.
भूतकाळातील सर्व प्रसंगात केजरीवालांनी आपल्यावर शाई फेकण्यासाठी आआपच्याच कार्यकर्त्यांना सांगितले होते. कधी शाई फेकल्याचे आरोप, कधी गाडीवर अंडी टाकल्याचे आरोप, कधी आपल्या अंगावर व्हॅन घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप, कधी सार्वजनिक थोबाडीत मारून घेणे असे वेगवेगळे प्रयोग ते आपल्याच कार्यकर्त्यांकडून घडवून आणतात.
यावेळीही तसेच झाले आहे. यातील प्रयोगातील सर्वजण आआपशी संबंधित असलेले तेच तेच कलाकार आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी अशी नौटंकी करणे व त्यासाठी भाजपला जबाबदार धरणे आणि चौकशीनंतर हे त्यांनीच आपल्या लोकांकडून ठरवून केलेले नाटक आहे हे उघडकीस आल्यावर तोंडात मिठाची गुळणी धरणे हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
26 Jan 2016 - 11:37 pm | प्रचेतस
पुरावे द्या ना पण.
पुराव्यांचं नाव काढलं तर त्याबाबतीत तुम्ही सुद्धा मिठाची गुळणीच धरत आहात.
28 Jan 2016 - 8:17 pm | श्रीगुरुजी
नौटंकीतले सर्वजण एकाच पक्षाचे आहेत. ही नौटंकी त्याच सर्वांनी अनेकवेळा पार पाडलेली आहे. सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे.
27 Jan 2016 - 4:55 pm | कपिलमुनी
सध्याचा धाग्यावर लिहलेल्या एका विधानाला पुरावा देता येत नाही.
तुम्ही चर्चा करायला येत नसुन एक राजकीय अजेंडा राबवायला मिपाचा वापर करत आहात.
एखाद्याने ते मक वैयक्तीक आहे / किंवा पुरावा नाही असे सीमगितले असते , पण तुमची ईगो खरी गोष्ट कबूल करू देत नाही.
गेट वेल सून गुरूजी !!
28 Jan 2016 - 8:13 pm | श्रीगुरुजी
अगदी अपेक्षित प्रतिसाद! यापेक्षा वेगळा प्रतिसाद अपेक्षितच नव्हता.
28 Jan 2016 - 8:36 pm | संदीप डांगे
पुरावा द्याहो! बाकीचे नेहमीचे डोयलोग ठेवा बाजुला. तुम्हाला वाटतं म्हणून सत्य आहे हे म्हणणे आता बास करा. लोकांना पुरावे मागत फिरता, स्वतःची वेळ आली की डोंबार्याचा खेळ!
28 Jan 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी
या नौटंकीतील सर्वजण एकाच पक्षाचे आहेत. हीच नौटंकी यांनी यापूर्वी अनेकवेळा पार पाडलेली आहे. अजून कसला वेगळा पुरावा हवाय?
28 Jan 2016 - 8:50 pm | संदीप डांगे
म्हणजे जे पूर्वी झालंय तसंच पुन्हा झालं तर पूर्वी झालेल्या घटनेमागे जे कारण होते तेच आता झालेल्या घटनेमागे असतेच असा नियम आहे काय तुमचा? सांगून टाका. म्हणजे कसं पुढे कुठे गरज पडल्यास हा नियम दाखवता येईल.
28 Jan 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी
केजरीवालांच्या बाबतीत तेच कारण असतं. सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करणे, भाजपला शिव्या घालणे, आपण व्यसस्थेचा बळी असल्याची बतावणी करणे हीच पूर्वी घडलेल्या (खरं तर घडवून आणलेल्या) घटनांमागची कारणे होती. आताही तेच आहे.
28 Jan 2016 - 8:57 pm | संदीप डांगे
म्हणजे उद्या कोणी त्यांना बॉम्बने उडवले तरी तुम्ही हेच कारण द्याल?
28 Jan 2016 - 11:33 pm | मी-सौरभ
याच न्यायाने नितीश कुमार ना चप्पल फेकून घेण्याचा आणि मोदींना परदेशात स्वत:ची प्रतिमा मलिन करून घेण्याचा छंद आहे असे म्हणणे योग्य असेल.
29 Jan 2016 - 12:20 pm | श्रीगुरुजी
आता हे काय नवीन?
29 Jan 2016 - 12:18 pm | श्रीगुरुजी
केजरीवाल अत्यंत चतुर आहेत. बाँबबिंबने उडविण्यातील धोका ते ओळखतात. त्यामुळे असले कार्यक्रम ते करणारच नाहीत. त्याऐवजी स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे कार्यक्रम मॅनेज करणे किंवा स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःवर शाई शिंपडून घेणे असे निरूपद्रवी कार्यक्रम मॅनेज करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भूतकाळात अनेकवेळा त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीपणे मॅनेज केले आहेत व भविष्यकाळातही असे कार्यक्रम ते करीत राहतील.
29 Jan 2016 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे बास झाले. अधिक उजवीकडे गेलात तर कडेलोट होईल =)) =)) =))
18 Jan 2016 - 11:12 pm | संदीप डांगे
त्यांच्या चेहर्यावरील लबाड भाव
आजकाल काही सरकारी जाहिरातींमधल्या हसर्या चेहर्यावरचे भाव आम्हालाही लबाड वाटायला लागलेत बॉ....
19 Jan 2016 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
गुरुजींना आमचे तुरीचे वरण काही पचले नव्हते कपिलमुनी! तवा पासुन आम्ही आग्रह सोडला! :D
19 Jan 2016 - 1:27 pm | होबासराव
त्यासोबत मिसयि चि भाकर आन थोडा खुरसनिचा ठेचा बि त मस्त लागते ना :)
19 Jan 2016 - 1:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
भाकर देऊ पर ठेसा नाही भेट्न!! लोकयची गुड मॉर्निंग टाइम ची असहिष्णुता वाढन !!
19 Jan 2016 - 2:16 pm | चिनार
त्यैची असहिष्णुता साम्भायाले सरकार हाय ना बाप्पा …. तुम्ही कायले फिकीर करता बापू…
तुम्ही देजा ठेचा मस्त लवंगी मिरच्या टाकून…झोमल्या त झोमुद्या
19 Jan 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी
समजा ठेच्याने वाढली सकाळची असहिष्णुता, तर ठेच्यामुळे मिळालेले पुरस्कार सकाळी परत देऊ टाकू. हाकानाका.
22 Jan 2016 - 2:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
आधी साधं वरण पचवा!! :D :D
22 Jan 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी
असहिष्णु प्रतिसाद!
22 Jan 2016 - 2:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
:D :D असहिष्णु गुरूजी असहिष्णु प्रतिसाद!!! :D :D
22 Jan 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी
मी असहिष्णु नाही आणि माझे प्रतिसादही असहिष्णु नसतात!
22 Jan 2016 - 3:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
चेष्टा करतोय हो गुरूजी! आपण पर्सनल घेऊ नका ही विनंती करतो! उणे अधिक झाल्यास माफ़ी मागतो
(स्वगत :- आयला आता प्रत्येकाला कृहघ्या समजवाव लागणार असे दिसते बाप्या)
22 Jan 2016 - 3:59 pm | चिनार
बापू…
कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया सहिष्णू घ्या' असा वाकप्रचार मिपावर रुजू करण्याची विनंती मी संपादक मंडळाला करतो.
तुमचं अनुमोदन गृहीत धरलंय
22 Jan 2016 - 4:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
धरा न मंग! तुम्हाले कोण मना करन!!
22 Jan 2016 - 4:08 pm | ईश्वरसर्वसाक्षी
अश्लिल अश्लिल
22 Jan 2016 - 4:11 pm | चिनार
नाय पन तुमाले सांगा तं लागन ना…
22 Jan 2016 - 9:01 pm | श्रीगुरुजी
अनुमोदन
22 Jan 2016 - 11:33 pm | चिनार
चीमायबीन...बापु अन गुर्जीच यकाच मुद्द्याले अनुमोदन...याले म्हंतेत सहिष्नुता गड्या..
20 Jan 2016 - 1:49 pm | मोदक
25 Jan 2016 - 9:19 am | नमकिन
उत्कृष्ट नमूना.
दोन्ही बाजूस शुभेच्छा १००० साठी, प्रणव चा विक्रम (क्रिकेट) मोडा.
बाकी तेल स्वस्त झालेय तर जाऊदे गाड़ी भरधाव (अबकारी, मुल्यवर्धित कर वाढवणारे आपणंच निवडलेत)
एकंदरीत सहामाही आढावा घेतो.
28 Jan 2016 - 11:35 pm | कपिलमुनी
ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. सध्या फक्त केविलवाणी धडपड चालली आहे.
अति केला आणि हसू झाला .
यापुढे पुरावा असेस तर उपप्रतिसाद द्यावा
28 Jan 2016 - 11:38 pm | संदीप डांगे
गुरुजी मिपावरचे केजरीवाल आहेत. त्येच जज, तेच जल्लाद, ते म्हणतात तेच पुरावे.
जाऊद्या, लक्ष देऊ नका फार. त्यांची ही नेहमीची नाटकं आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
29 Jan 2016 - 12:22 pm | श्रीगुरुजी
मी तुमच्याविषयी एकही वावगा शब्द उच्चारलेला नसताना तुम्ही मला पुन्हा एकदा घाणेरडी शिवी दिलीत.
29 Jan 2016 - 12:29 pm | संदीप डांगे
केजरीवाल ही शिवी आहे काय? मला वाटलं सत्य बोलण्याची पराकाष्ठा करणार्या व्यक्तिला केजरीवाल म्हणत असावेत.
29 Jan 2016 - 12:42 pm | श्रीगुरुजी
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी आहे.
29 Jan 2016 - 1:31 pm | संदीप डांगे
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी आहे.
सनी लियोनच्या उल्लेखाबद्दल आगपाखड करणार्यांनो, आता आपले काय मत आहे?
29 Jan 2016 - 12:21 pm | श्रीगुरुजी
केजरीवालांवर शाई फेकणारी महिला आआपचीच होती हे अगदी पहिल्या दिवसापासून सर्वत्र उघड झाले आहे. ती आआपची नाही असे दाखविण्याची तुमचीच केविलवाणी धडपड सुरू आहे.
29 Jan 2016 - 11:03 pm | कपिलमुनी
महिला आआपचीच होती हे अगदी पहिल्या दिवसापासून सर्वत्र उघड झाले आहे.
दुवे , फिती , बातम्या द्या ना ! कुठे लिहीलाय तसा ?
मी तुम्हाला वर्तमानपत्रांच्या लिंक दिल्या आहे तशा तुम्ही पण द्या आणि सिद्ध करा
29 Jan 2016 - 1:17 pm | कैलासवासी सोन्याबापु
गुरूजी आपले असहिष्णु आहेत हे आम्ही आधीच सांगितले आहे बुआ!!
29 Jan 2016 - 1:21 pm | श्रीगुरुजी
बरं बुवा. असहिष्णु तर असहिष्णु. कोणीतरी सहिष्णु म्हणावं म्हणून कोणी आम्हाला केजरीवाल अशी घाणेरडी शिवी दिली तर आम्ही ती गोड मानून घ्यावी अशी तुमची अपेक्षा दिसतेय.
29 Jan 2016 - 1:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
अजिबात नाही,
आपणाकडून काही अपेक्षा करायला आपण माझे किंवा मी आपले काहीच देणे लागत नाही, नाही का?
केजरीवाल ह्यांचे उठसुट मोदी किंवा केंद्रावर आरोप करून गळे काढणे जितके अतार्किक अन असहिष्णु आहे तितकेच तुमचे वारंवार विनापुरावा गोळीबार करणे अन केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी" असल्याचे विद्वेषपूर्ण गरळ ओकणे हे सुद्धा अतार्किक अन असहिष्णु आहे हे नोंदवु इच्छितो मी. केजरीवाल हे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील सगळ्या खेळी करून अन दिल्लीच्या जनतेचा कौल घेऊन सीएम झालेले आहेत, त्यांचे नाव म्हणजे त्यांचे अस्तित्व हेच शिवी म्हणताना तुम्ही थेट दिल्लीची जनताच एक शिवी आहे असे दर्शवता आहात गुरूजी, म्हणजेच जेव्हा दिल्लीकर जनतेने अगोदर बीजेपी ला कौल दिला तेव्हा ती शिवी नव्हती अन आता केजरीवाल म्हणजेच पर्यायाने दिल्लीची जनता ही शिवी झाली असे म्हणता आहात तुम्ही, ह्याचा अर्थ सरळसरळ हा निघतो, की तुम्ही ज्या राजकीय विचारसरणी चे खंदे समर्थक आहात त्या विचारसरणीला नाकारणारे केजरीवाल (लोकनियुक्त असूनही) अन त्यांना नियुक्त करणारी जनता ही एक शिवी आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचे अस्तित्व एका गलिच्छ शिवी सारखे खुपते आहे
ही असहिष्णुता नाही तर अजुन काय आहे?????
तळटिप :- मला केजरीवाल ह्यांच्याविषयी ममत्व असण्याचे कारण नाही अन गरज ही नाही तसेच मी दिल्लीचा रहिवाशी सुद्धा नाही, तसेच मला मोदी सरकार करत असलेले साधक कार्य अन व्यक्तिशः मोदींची निष्ठा ह्यावर नितांत आदर आहेच, पण म्हणून कोणी मोदी विरोधी आहे म्हणून त्याचे अस्तित्व शिवी आहे असा कांगवा सुद्धा मी करणार नाही, ते तुम्ही करता आहात गुरूजी म्हणून तुम्ही असहिष्णु आहात.
बाकी देशातल्या जनतेत पॉलिटिकल pragmatism अजिबात अस्तित्वात नसल्याचा मुद्दा परत एकदा समोर आलाच पण तो इथे विषय नाहिये. तस्मात् असो
29 Jan 2016 - 4:18 pm | चिनार
जबराट प्रतिसाद !!
29 Jan 2016 - 7:10 pm | कपिलमुनी
योग्य प्रतिसाद !
( अर्थात आतापण यावर गोलगोल प्रतिसाद येतील , पण चर्चा विरोधाकडून तिरस्काराकडे जात असल्याने इथेच थांबावे हे उत्तम )
29 Jan 2016 - 8:39 pm | श्रीगुरुजी
केजरीवालांचे आजपर्यंतचे वर्तन हे कमालीचे बेगडी व नाटकी असून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे, जनतेला वेठीस धरून स्वतःची पोळी भाजून घेणे (दिल्लीत नुकताच सुरू असलेला कचरा सेवकांचा चौथ्यांचा झालेला संप हे अगदी आजचे उदाहरण) ही त्यांची व्यवच्छेदक लक्षणे. यांच्या नाटकांमुळेच मागील वर्षी गजेंद्र सिंह नावाच्या एका नागरिकाचा जीव गेला. तो गेल्यावर सुद्धा त्याच्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यात त्यांनी यत्किंचितही कसूर ठेवली नाही.
असल्या ढोंगी व्यक्तीशी माझी तुलना करणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत संतापजनक व अपमानास्पद आहे. यापूर्वी सुद्धा माझी तुलना केजरीवालांशी केली तेव्हाही मी नापसंती दर्शविली होती. मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे माझा इतका वाईट अपमान यापूर्वी कोणीही केला नव्हता. विशेषतः श्री. रा. रा. डांगे यांच्याबद्दल मी या धाग्यावरील एकाही प्रतिसादात वाईट लिहिले नसताना त्यांनी दोन वेळा माझा उल्लेख केजरीवाल असा करून वाईट अपमान केला.
केजरीवालांचे वर्तन अत्यंत वाईट आहे व त्यामुळे माझी त्यांच्याशी तुलना करू नका असे सांगणे यात कोणतीही असहिष्णुता नाही.
29 Jan 2016 - 9:07 pm | संदीप डांगे
केजरीवाल ही शिवी आहे की नाही हे ठरवणे हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न. तुम्ही जी केजरीवाल यांची लक्षणे इथे सांगितली, ते तुमच्या प्रतिसादांमधून तुमच्या विचारांमधेही दिसली. (जशी तुम्हाला केजरीवाल यांची दिसली व भाजप यांची दिसत नाहीत.) यास्तव तुलना झाली. एखाद्याला केजरीवाल म्हणणे हे शिवी वा पुरस्कार ह्याबद्दल माझे वैयक्तिक कोणतेही मत नाही.
30 Jan 2016 - 12:23 pm | श्रीगुरुजी
एक्झॅक्टली. माझ्या दृष्टीने ती शिवी आहे. जे माझे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर इतरांनी आक्षेप का घ्यावा? ती शिवी समजायला अनेक सबळ कारणे आहेत जी वर दिलेली आहेत. ती पुरेशी आहेत.
29 Jan 2016 - 9:48 pm | चैतन्य ईन्या
आपण जेंव्हा केजारीवाल्ला शिवी म्हणतो तेंव्हा आपण पण नकळत दुसर्याला वाटेल ते बोलायला जागा उपलब्ध करून देतो. तसाही केजरीवाल आवडत नाही. पण त्याने सगळी चेष्टा वा माकड चेष्टा करून सत्ता मिळवली आहे आणि खणखणीत मिळवली आहे. त्याने जे केले ते आपल्याला जमले नाही. ह्यापेक्षा मोदी भाऊ पण फार काही वेगळे करत आहेत असे मला वाटत नाही. जवळपास २ वर्षांपुर्व्हीचा पाठींबा कमी होतंय. असे काहीतरी बोलून तो अजूनच कमी होतो असे लक्षात ठेवावे
29 Jan 2016 - 9:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
________/\___________
29 Jan 2016 - 9:20 pm | संदीप डांगे
आमचाही. _____________/\___________
(संतुलित विचारांसोबत नेहमीच असलेला व कम्युनिस्ट नसलेला) कॉम्रेड डांगे.
30 Jan 2016 - 6:28 am | मी-सौरभ
आता तरी हां धागा मेन बोर्डावर दुसऱ्या धाग्याला जागा देईल अशी आशा आहे.
29 Jan 2016 - 10:58 pm | कपिलमुनी
शेवटी पुरावा न देता विषय भरकटवून विषय संपवला म्हणायचा.
पुरावा दिलाच पाहिजे या गोष्टीला बऱ्याच मिपाकरांनी पाठींबा दिला याबद्दल आभार .
बहुसंख्य मिपाकर आंधळा सपोर्ट करत नाही आयडी असो वा पक्ष !
30 Jan 2016 - 12:19 pm | श्रीगुरुजी
पुरावा पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. पूर्वी मॅनेज केलेल्या अनेक घटनांचीच ही पुनरावृत्ती, पूर्वीच्या सर्व घटनांमागे आआपचेच कार्यकर्ते होते, या घटनेतील महिला सुरवातीपासून आआपमध्येच आहे, तिला व्यासपीठावर केजरीवालांच्या जवळ जाऊन शाई शिंपडता यावी यासाठी केजरीवालांच्याच सहाय्यकाने तिथून पोलिसाला हटवून लांब पाठविणे, शाई शिंपडल्यावर लगेचच भाजपवर दोषारोप ... पूर्वीच्याच प्रसंगाची झेरॉक्स कॉपी ... सर्व काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
30 Jan 2016 - 12:38 pm | कपिलमुनी
तुमच्या शिवाय दुसरे कोणीही म्हणत नाही .
माझा आक्षेप तुमच्या खोट्या बोलण्यावर आहे. तुम्ही खोटारडे आहात
एक साधा दुवा , रेफरन्स नाही आणि फुकाच्या गप्पा मारता .
ती महिला आपमधे नाही याचे दुवे दिलेत उघडुन वाचायचे कष्ट घ्या
30 Jan 2016 - 12:53 pm | श्रीगुरुजी
या प्रसंगाची मालिका पहिल्यापासून नीट बघितलीत तर हे आआपवाल्यांचेच काम आहे हे अगदी सहज लक्षात येईल. परंतु तुम्ही केवळ अट्टाहासाने ते नाकारत आहात.
30 Jan 2016 - 5:41 pm | कपिलमुनी
लक्षात येणे , स्पष्ट असणे असले शब्दप्रयोग वापरु नका .
एखादा माणूस वेडा आहे हे लक्षात येता, स्पष्ट असता , पण डॉक्टर कडुन तसा लिहून मिळाल्यावरच सिद्ध होता
तुमच्याकडे पुरावा आहे की नाही ? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या आणि हा प्रश्न मिटवा
30 Jan 2016 - 11:16 pm | श्रीगुरुजी
वरील शाईप्रकरणातील घटना व पुरावे अगदी स्पष्ट आहेत. परंतु केवळ अट्टाहासाने ते तुम्ही नाकारत आहात. आधीच्या सर्व प्रकरणाप्रमाणेच हेदेखील आआपनेच घडवून आणलेले नाटक हे मान्य करण्याची तुमची तयारीच नाही.
30 Jan 2016 - 2:48 am | ट्रेड मार्क
शाई फेकणारी भाजपशी संबंधित होती वा आहे याचा काही पुरावा आहे का कोणाकडे?
30 Jan 2016 - 8:18 am | संदीप डांगे
असं कुणी म्हटलंय का?
30 Jan 2016 - 12:15 pm | श्रीगुरुजी
शाई फेकल्याफेकल्या लगेचच आआपवाल्यांनी यामागे भाजपचे कटकारस्थान असल्याचा व केजरीवालांना जीवे मारण्याच्या प्रयत्नांची ही रंगीत तालीम असल्याचा (अर्थातच बिनबुडाचा) आरोप केला होता.
30 Jan 2016 - 12:21 pm | प्रचेतस
त्यांचे ते बिनबुडाचे आणि तुम्ही करता ते बुडाचे असं का हो गुर्जी?
30 Jan 2016 - 12:24 pm | श्रीगुरुजी
म्हणजे काय?
30 Jan 2016 - 12:31 pm | प्रचेतस
आरोप ओ.
30 Jan 2016 - 12:43 pm | संदीप डांगे
=)) =))
30 Jan 2016 - 12:54 pm | श्रीगुरुजी
कोणते आरोप बिनबुडाचे होते?
30 Jan 2016 - 1:09 pm | प्रचेतस
आआपवाल्यांचे.
असं काय करता गुर्जी? तुमचेच विधान पहा की वरचे.
30 Jan 2016 - 12:48 pm | कपिलमुनी
प्रतिसादमधे
लिहीलेले
मत व्यक्तीनिरपेक्ष , धागानिरपेक्ष आणि पूर्वग्रहनिरपेक्ष असेल अशी आशा करतो .
आणि त्या मताच्या अनुषंगाने या धाग्यातील खोटे ( ध्वनित ) आरोप केले आहे आणि त्यासाठी पुरावा नाही.
संमंना विनंती , त्यांनी हे आरोप संपादीत करावे
23 Feb 2016 - 11:06 pm | श्रीगुरुजी
एक मजेशीर बातमी सापडली. अरूण जेटलींनी केजरीवाल, कुमार विश्वास इ. आआपच्या ६ नेत्यांविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी व बदनानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यात जेटलींचा हात आहे अशा स्वरूपाचे आरोप (अर्थातच कोणत्याही पुराव्याशिवाय) या मंडळींनी जाहिररित्या केले होते. आपला कोणत्याही भ्रष्टाचारात हात नसून कोणताही पुरावा नसताना केलेल्या या आरोपांमुळे आपली मानहानी व बदनामी झाली आहे असा दावा करून संबंधितांना शिक्षा देण्यासाठी जेटलींनी या सहा जणांविरूद्ध फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत.
या दाव्याविरूद्ध आपले म्हणणे मांडताना केजरीवालांनी न्यायालयात खालील शब्दात आरोपांचे समर्थन केले.
Arvind Kejriwal today responded to Arun Jaitley's defamation suit with a stinging reply in which he taunted the Union Finance Minister for "losing by over one lakh votes" in the national election and said he has no high public "reputation to protect".
In a statement to a Delhi court, the Chief Minister said Mr Jaitley's "claim that he enjoys a high public character is totally frivolous and unsustainable."
He wrote: "The last time he contested the election to the Lok Sabha was from Amritsar as a BJP candidate in 2014. Despite the success of the BJP this plaintiff lost by a margin of more than 1,00,000 votes. Indian democracy has never accepted his claim of public character."
In a democracy, he argued, one's public reputation can only be the reaction, response and manifestation of the people's attitude.
हा युक्तिवाद वाचल्यावर हसावे का रडावे का केजरीवालांची कीव करावी हेच समजेना. जो निवडणुक हरतो त्याला कोणतीच सार्वजनिक प्रतिष्ठा नसते (व त्यामुळेच त्याच्यावर कोणतेही आरोप केले तरी त्याची बदनामी व मानहानी होत नाही) व जनता निवडणुकीत जसा जनादेश देते तीच त्याची सार्वजनिक प्रतिष्ठा असते (म्हणजे निवडणुक जिंकलेल्याला सार्वजनिक प्रतिष्ठा असते व हरलेल्याला प्रतिष्ठा नसते) असा अत्यंत अतार्किक युक्तिवाद कोणी न्यायालयात करेल असे कधीही वाटले नव्हते.
दस्तुरखुद्द केजरीवाल वाराणशीत मोदींविरूद्ध तब्बल २.५ लाखाहून अधिक मतांनी हरले होते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज व वाजपेयी हे देखील निवडणुकीत हरले होते. बाबासाहेब आंबेडकर व मनमोहन सिंग हे देखील निवडणुकीत हरले होते. अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पुण्यातून अविनाश धर्माधिकारी हे देखील पडले होते. केजरीवालांच्या युक्तिवादानुसार निवडणुकीत पराभव झाल्याने या सर्वांना कोणतीही सार्वजनिक प्रतिष्ठा नाही.
http://www.ndtv.com/india-news/what-reputation-arun-jaitley-lost-by-1-la...
23 Feb 2016 - 11:50 pm | अर्धवटराव
कोर्टकज्जे करताना असले आर्ग्युमेण्ट्स करावे लागतात. आशीलाची बाजु मांडताना वकील लोक आरोपकर्त्याच्या प्रत्येक वाक्याचा कीस पाडतात. हा त्यातलाच प्रकार. अर्थात, स्वतः केजरीवाल फार काहि लॉजीकल बोलतात असं नाहि.
24 Feb 2016 - 2:43 am | प्रदीप साळुंखे
केजरीवालांची नौटंकी आता कळू लागली आहे,
.
[सब मिले हुए है जी]
22 Mar 2016 - 9:16 pm | होबासराव
युगपुरुष कलियुगि हरीश्चंद्र ह्यांनि निवड्णुकिच्या वेळेस सबमिट केलेल अॅफिडेव्हिट खोट असल्याच समोर आलय. संपत्ति कमि दाखवण्यात आलिय.
25 Mar 2016 - 12:17 pm | कपिलमुनी
बातमीनुसार केजरीवालन यांना फॉर्चुन मॅगेझिनने जागतिक पातळीवरच्या टॉप ५० लीडर्स मधे स्थान दिला आहे.
या यादीमधले ते ऐकमेव भारतीय नेते आहेत
केजरीवालन यांचे अभिनंदन !
25 Mar 2016 - 12:20 pm | कपिलमुनी
केजरीवाल * असे वाचावे
25 Mar 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी
दिल्लीत १ जानेवारी ते १५ जानेवारी हे १५ दिवस समविषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणून प्रदूषण कमी करण्याचा प्रयोग केजरीवाल सरकारने केला. त्याबद्दल फॉर्च्युन मासिकाने जगातील ५० ग्रेटेस्ट लीडर्समध्ये केजरीवालांना स्थान दिले आहे. त्याबद्दल केजरीवालांचे अभिनंदन!
25 Mar 2016 - 8:59 pm | श्रीगुरुजी
या यादीतील जगातील ग्रेटेस्ट नेत्यांबद्दल अजून माहिती मिळाली.
Fortune’s third annual ‘World’s 50 Greatest Leaders’ list features men and women from across the globe from the fields of business, government, philanthropy and the arts who are “transforming the world and inspiring others to do the same.”
It said leadership is not “demagoguery, pandering, even populism” but is defined by people across the world “you’ve never heard of who are rallying followers to make life better in ways you never imagined.”
26 Mar 2016 - 9:27 pm | गॅरी ट्रुमन
या स्वयंघोषित युगपुरूषांचा खरा चेहरा दाखवणारे दोन फोटो---
१. दिल्लीमध्ये डॉ.नारंग यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर for obvious reasons हे युगपुरूष असा बहाणा करत आहेत की त्यांचे कुटुंबिय सध्या प्रचंड धक्क्यामध्ये आहेत आणि ते कोणाला भेटायच्या मनस्थितीत नाहीत म्हणून त्यांना भेटायला जात नाहीत. पण त्याचवेळी सतीश उपाध्याय आणि खासदार प्रवेश वर्मा हे डॉ. नारंग यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटूनही आले.देशात इतर ठिकाणी काही खुट्ट वाजले की अगदी धाऊन जावून त्या घटनेचे राजकारण करायची संधी अजिबात न सोडणारे युगपुरूष आता मात्र खुद्द दिल्लीत ती घटना घडूनही धावून जायला तयार नाहीत. त्याचे कारण काय असावे? सूज्ञांना सांगणे न लागे.
२. दुसरा फोटो तसा जुना आहे. त्या काळात हा धागा मागे पडला होता. म्हटले उगीच कशाला शिळ्या कढीला उत आणा म्हणून धागा वर आणला नव्हता.पण या युगपुरूषाने हलकटपणाची परमावधी गाठली असल्यामुळे प्रत्येक वेळी तो जी काही आगळीक करेल त्याला उघडे पाडायचे काम मी मिपावर अगदी इमाने इतबारे करायचे ठरविले आहे. म्हणून हा फोटो जुना असला तरी इथे देत आहे.
गोष्ट आहे नोव्हेंबर २०१५ मधील. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभासाठी हे युगपुरूष गेले नसते तरच नवल. आपण भ्रष्टाचारविरोधी आहोत म्हणून जगभर डिंडोरे पिटत असलेल्या युगपुरूषांना लालूंबरोबर एकाच स्टेजवर जायला काही टोचणी लागली नव्हती. त्यावेळी मी फेसबुकवर लिहिलेलाच मजकूर इथे देत आहे:
"केजरीवाल म्हणतात--लालूच माझ्या गळ्यात पडले!! माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे केजरीवालांची ही लेटेस्ट मखलाशी!!लालू समजा खरोखरच यांच्या गळ्यात पडले तर यांना बाजूला होता आले असतेच की.बरं ते सोडाच. या फोटोमध्ये तर केजरीवाल व्यवस्थितपणे लालूंचा हात धरून हसताना दिसत आहेत.फार तर दुसरा माणूस बळजबरीने हात हातात घेऊ शकेल पण ज्या पध्दतीने केजरीवाल हसताना दिसत आहेत त्याची बळजबरी इतर माणूस कसा करू शकेल?
हा मनुष्य एक नंबरचा ढोंगी आणि कमालीचा चालू आहे हे २०११ मध्ये अण्णा आंदोलनात याचे नाव आल्यापासूनच माझी खात्री झाली होती. याचा भ्रष्टाचाराला विरोध वगैरे सगळी बकवास आहे हे माझे मत पहिल्यापासून होतेच. ते लालूची गळाभेट आणि लालूबरोबर हात उंचावून निर्लज्जपणे हसून त्यावर याने शिक्कामोर्तबच केले आहे.
अर्थातच आआप समर्थकांकडून याविरोधात काही भाष्य होईल अशी अपेक्षाच नाही. मोदी समर्थकांपैकी अनेकांनी अनेक गोष्टींना जाहीरपणे विरोध केला आहे. मी स्वतः साक्षी महाराज कंपनीच्या वाचाळखोरीला इथेच भरपूर विरोध केलेला आहे. हा फोटो येऊन दोन दिवस झाले तरीही आजपर्यंत फेसबुकवर मोदीविरोधात आणि केजरीवाल समर्थनात बोलणार्या एकानेही अवाक्षर काढलेले नाही. हे लोक माझ्यासारख्यांना मोदीभक्त म्हणतात. पण आम्ही भक्त असू तर हे गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नाहीत तर केजरूके गुलाम (जोरूका गुलाम च्या धर्तीवर).फारच किळसवाणी जमात आहे ही.
हे गुलाम लोक काय करायचे ते करतील.पण केजरीवालांनी आपण स्वतः भ्रष्टाचारविरोधी असल्याचा दावा करून कायम मॉरल हायग्राऊंड कायम घेतली होती त्या केजरीवालांचे पाय मातीचे नाही तर चिखलाचेच आहेत हे लवकरात लवकर भारतातल्या जनतेला समजावे असे मात्र फार वाटते."
26 Mar 2016 - 11:58 pm | अर्धवटराव
मागे मिपावर मोदि आणि अंबानींच्या गळाभेटीवर यथेच्च गळे काढणारे, कमालीची एकसंघ मानसीकता वगैरे फेकाफेकी करणारे महात्मा केजरी-लालुंच्या फोटूवर काय प्रवचन बडबडले असते? कि मूग गिळुन गप्प बसले असते ?(असं सोयीस्कर गप्प बसण्यात ते अत्यंत तरबेज होते)
26 Mar 2016 - 10:00 pm | विवेक ठाकूर
त्याची खंत काढणं चालूये !
26 Mar 2016 - 10:15 pm | तर्राट जोकर
=))
26 Mar 2016 - 10:51 pm | lakhu risbud
मुद्दा काय आहे आणि तुम्ही कोणाला त्यात ओढता आहात वर त्यावर अनुमोदन पण मिळाले
यावरूनच कळते गुलाम नं १ आणि गुलाम नं २ कोण ते.
26 Mar 2016 - 10:55 pm | lakhu risbud
वो अगर कहे कि हात धोना अच्छी सेहत के लिये अनिवार्य है
तो हम विरोध प्रदर्शित करने के लिये हात चाटेंगेही चाटेंगे
11 Apr 2016 - 1:55 am | होबासराव
युगपुरुष ह्यांना काल पुन्हा कोणितरी जोडा फेकुन मारला.
गुर्जि मागे एका स्त्री ने शाई फेकली होति ह्या सुर्यावर ति सुध्दा आप शेना का आप कि शेना ह्या पक्षाचिच होति ना ?
एक गोष्ट नोटिस केलि का कोणि कि कन्हैय्या आणि मंडळि नि ह्यांचा यु.एस.पी. आधिच कमि केलाय. पण हि आत्ताचि न्युज सुद्धा काहि फार काहि दळलि नाहि चॅनेल वाल्यानी.
11 Apr 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी
'रोज मरे त्याला कोण रडे' अशी केजरीवालांवर पादत्राणे फेकणार्या घटनांची अवस्था झालीये. संपूर्ण देशभरात ठराविक कालावधीनंतर फक्त केजरीवालांच्याच बाबतीत हे प्रकार कसे घडतात (का घडविले जातात?) हे एक गूढच आहे. त्यांच्या कानाखाली जाळ काढणार्यांचे किंवा त्यांच्यावर पादत्राणे/शाई फेकणार्यांचे पुढे काय होते हे आजतगायत समजलेले नाही.
नेहमीप्रमाणे कालच्या प्रकारानंतरही त्यांनी सर्वात पहिला आरोप भाजपवर केला आहे. बूट फेकणार्या वेद प्रकाश नावाच्या व्यक्तीने बूट फेकण्यापूर्वी दिल्लीतील एका भाजप नेत्याला फोन केला होता असे आआप नेत्यांचा आरोप आहे. वेद प्रकाशला पडल्यानंतर आआप कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले व त्याचे फोन रेकॉर्डही तपासले. परंतु त्याने कोणत्या भाजप नेत्याला फोन केला होता हे त्यांना सांगता आले नाही.
दोन वर्षांपूर्वी केजरीवालांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी थोबाडीत मारण्यात आली. तीनही वेळा त्यांनी तातडीने या प्रकारासाठी भाजपवर आरोप केले. नंतर दुसर्या दिवशी हे उघडकीला आले की त्यांना थोबाडीत मारण्याचा शो मॅनेज करणारे आआपचेच कार्यकर्ते होते. त्याच काळात योगेंद्र यादवांना शाई फासणारा माणूस देखील आआपचाच होता हेही उघडकीला आले. या सर्व नौटंकी प्रकारानंतर आआपवाले उघडे पडून तोंडघशी पडले.
सहानुभूती व सवंग लोकप्रियतेसाठी असले मॅनेज्ड प्रकार आआपवाले स्वतःच घडवून आहेत असे चित्र दिसायला लागल्यावर नंतरच्या काळात आआपने स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. आता हे प्रकार आम आदमी सेना या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहेत. म्हणजे यात आआपचा संबंध नसून यामागे दुसरेच कोणीतरी आहे व ते भाजपच्या सांगण्यावरूनच होत आहेत असा कांगावा करायला आता आआपचे नेत मोकळे आहेत.
मुळात अशा पादत्राण/शाई फेकी विरूद्ध बोलण्याचा आआपच्या नेत्यांना कणभरही हक्क नाही. २०१३ मध्ये एका पत्रकार परीषदेत तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम् बोलत असताना जर्नेल सिंग नावाच्या पत्रकाराने त्यांच्या बूट फेकला होता. त्याच जर्नेल सिंगला केजरीवालांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आआपचे तिकीट दिले होते.
वृत्तवाहिन्यांवर आपली छबी दिसेनाशी झाली व लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची चिन्हे दिसायला लागली हमखास केजरीवालांवर बूट किंवा शाई फेकण्याची नौटंकी घडविली जाते. यावेळीही तसेच घडलेले आहे.
11 Apr 2016 - 2:56 pm | होबासराव
जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत, जर असे असेल तर मग काय बोलावे.
लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची चिन्हे दिसायला लागली
नवयुगपुरुषाने ह्यांचा यु.एस.पी कमि केलाय, आणि आता स्वतः सुद्धा वाहिन्या, मिपावरुन गायब झालाय. मेरे कु तो ये बौत बडा झोल लगता है.
11 Apr 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी
http://www.ndtv.com/elections-news/aap-fields-man-who-hurled-shoe-at-p-c...
11 Apr 2016 - 2:52 pm | गॅरी ट्रुमन
आचार्य अत्रे उवाच--
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोरात चालू असताना एका सभेत कोणीतरी स.का.पाटील आणि काकासाहेब गाडगीळांवर जोडे फेकले.त्यावर आचार्य अत्रे म्हणाले--"काँग्रेस नेत्यांवर आणि मंत्र्यांवर कोणी जोडे फेकून मारू नयेत.कारण तो जोड्यांचा अपमान आहे".
तसेच काहीसे या आआपमधील नौटंकीविषयी लिहावेसे वाटते.
11 Apr 2016 - 10:57 am | गॅरी ट्रुमन
आपले युगपुरूष ज्याला सायबाच्या भाषेत Run with the hare and hunt with the hounds म्हणतात ते करण्यात अगदीच वाकबगार आहेत हे परत एकदा सिध्द झाले आहेच.
पंजाब आणि हरियाणात सतलज-यमुना कालव्याचा वाद गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे. आणि युगपुरूषांना आपला पक्ष दोन्ही राज्यांमध्ये वाढवायचा आहे.खरे तर अशावेळी कोणत्याही जबाबदार पक्षाची अडचण व्हायला हवी.कारण कोणतीही एक बाजू घेतली तर दुसर्या राज्यात त्याचा परिणाम होणार!! पण असल्या लहानसहान अडचणींना घाबरतील तर ते आपले युगपुरूष कसले. त्यांनी तर एक मस्त शक्कल लढवली.ती अशी---
पंजाबात जाऊन पंजाबची बाजू घ्यायची
आणि दिल्लीत परतल्यावर हरियाणाची बाजू घ्यायची आणि पंजाबात जाऊन ज्या कालव्याला विरोध केला त्याच कालव्याच्या समर्थनार्थ (हरियाणाची बाजू घेऊन) कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यायचे--
आणि दोन्ही बाजूंकडून लाथा पडायला लागल्या की मग वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने दिल्ली जल बोर्डाच्या ज्या वकिलाने कोर्टात हरियाणाची बाजू घेऊन प्रतिज्ञापत्र दिले होते त्याला कामावरून काढायचे .
उत्तम. चालू द्या.
12 Apr 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी
अजून गंमत अशी की आता हे लातूरला दिल्लीतून तब्बल २ महिने दररोज १० लाख लिटर पाणी देण्यास तयार आहेत. जर दिल्लीत एवढे जास्त पाणी असेल तर ते हरयानाला देण्यास काय समस्या आहे? त्यांना माहित आहे की दिल्लीतून कोणीही लातूरला पाणी नेण्याची अव्यवहार्य योजना अंमलात आणणार नाही. म्हणून तर निव्वळ मोठेपणा घेण्यासाठी असल्या सवंग घोषणा करायच्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/delhi-cm-kejriwal-writes-t...