केजरूके गुलाम

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
31 Mar 2015 - 9:50 pm
गाभा: 

जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.

सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.

पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?

मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.

असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.

केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.

नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.

प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.

हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.

अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.

या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).

या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया

दिगोचि's picture

1 Jul 2016 - 11:01 am | दिगोचि

केजरीवालना दिल्ली सरकार चालवताना किती कमि काम आहे हे त्यान्च्या या व अशा शोधावरुन समजते. काही दिवसापूर्वी वाचले होते की त्यानी इलेक्शन कमिशन्कडे अर्ज टाकून पन्जाब सरकारने नेमलेल्या चोविस पार्लमेन्टरी सेक्रेटरीन्च्या नेमणुकीची चौकशी करावी.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यापासून मागील १६-१७ महिन्यात खालील महत्त्वाची कामे केली आहेत.

१) मोदी रोज कोणते कपडे घालतात यावर लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवणे. गुगलच्या माध्यमातून ते यावर लक्ष ठेवतात.

२) मोदी दिवसातून किती वेळा कपडे बदलतात याची नोंद ठेवणे.

३) मोदींच्या प्रत्येक ड्रेसची किंमत शोधणे.

४) मागील २ वर्षात मोदींनी एकूण किती किंमतीचे कपडे वापरले याची नोंद ठेवणे.

५) मोदी एकदा वापरलेला ड्रेस परत वापरतात का, तो ड्रेस धुतात का याची नोंद ठेवणे.

६) प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे.

७) देशातील कोणत्याही राज्यात खुट्ट झाले तरी लगेच तिथे धाव घेऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे.

८) सकाळी उठल्यावर "मोदी, मोदी, मोदी, ...", दुपारी "मोदी, मोदी, मोदी, ...", संध्याकाळी "मोदी, मोदी, मोदी, ..." आणि झोपताना "मोदी, मोदी, मोदी, ..." अशी जपमाळ ओढणे.

९) दिवसभर ट्विटरवर वेळ घालविणे.

केजरीवाल हे बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नसल्याने भरपूर वेळ हातात आहे. त्याचा ते वरीलप्रमाणे सदुपयोग करतात.

केजरीवाल हे अत्यंत नाटकी आणि कमालीचे ढोंगी आहेत आणि त्याबद्दल मी आणि इतर अनेक मिपाकर नेहमीच टिका करत असतो. पण जर त्यांनी एखादी सेन्सिबल गोष्ट केली तर त्याबद्दल त्यांना श्रेय देणेही गरजेचे आहे.

आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. http://www.ndtv.com/india-news/arvind-kejriwal-government-moves-supreme-...

राज्यघटनेतील काही बाबींबद्दल पुरेशी स्पष्टता नाही असे कोणाला वाटत असेल तर ती स्पष्टता केवळ सर्वोच्च न्यायालयच देऊ शकेल.हे पाऊल बरेच पूर्वी उचलायला हवे होते.ठिक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर.

फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

म्हणजे नंतर झालेले अनेक अप्रिय संघर्ष (शकुंतला गॅमलिन यांची नेमणूक, नायब राज्यपालांशी सतत चालू असलेल्या चकमकी) घडले नसते. ही गोष्ट करणे हे जरी सेन्सिबल असले तरी सेन्सिबल गोष्टींमध्ये त्या योग्य वेळी करणे हेही अंतर्भूत असतेच. आता त्या संसदीय सचिवांचा मुद्दा अंगाशी येतो आहे त्यामुळे ही पश्चातबुद्धी सुचते आहे.
शिवाय त्यांनी आत्ता एक अजून भारी विधान केलं - गोवा विधानसभेत आआपला ४० पैकी ३५ जागा मिळतील. आणि का - तर काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भ्रष्ट पक्ष आहेत आणि आआप हा एकमेव भ्रष्टाचारमुक्त पर्याय आहे.
काँग्रेस आणि भाजप भ्रष्ट आहेत हे मान्य आहे. दोन्हींच्या सरकारांमध्ये भ्रष्ट लोक आहेत. पण आआपने दिल्लीतला भ्रष्टाचार कमी केलाय म्हणजे नक्की काय केलंय? त्यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना घालवताना जो तमाशा केला, तो भ्रष्टाचार नव्हता का? शीला दीक्षित यांच्यावर अजूनही खटला भरलेला नाही, निवडणूक आयोगाला खर्चाचं विवरण दिलंय का ते माहित नाही (बहुधा नसावं, कारण त्याची आआपने मोठी बातमी केली असती) - म्हणजे इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळं असं काहीच केलेलं नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ही याचिका वेगळ्या संदर्भात आहे.

The HC had on May 24 reserved its verdict on the plea of the AAP government seeking a stay on the proceedings on the petitions arising out of its standoff with the LG over powers to appoint bureaucrats in the national capital and other issues.

The Supreme Court on Friday agreed to hear on Monday the plea of the Aam Aadmi Party government in Delhi seeking a direction that the high court be restrained from delivering its judgement on issues including the scope of powers of the city government to exercise its authority in performing public functions.

दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नेमणुका करण्याचा अधि़कार नायब राज्यपालांचा आहे का लोकनियुक्त सरकारचा याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आआप सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २४ मे ला या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. हा निर्णय जाहीर करण्यापासून उच्च न्यायालयाला रोखावे अशी मागणी आआपने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्या मागणीवरील सुनावणी उच्च न्यायालयात सोमवारी होणार आहे.

फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

+१

ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. याचं स्पष्टीकरण अजून बातमीत आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाला हा मुद्दा स्पष्टीकरण देण्याजोगा वाटत नसावा - दुस-या शब्दांत सांगायचं तर त्यांना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर घटनात्मक आक्षेप घेण्याची गरज वाटली नसावी - असा याचा अर्थ होऊ शकतो का?

गॅरी ट्रुमन's picture

8 Jul 2016 - 1:46 pm | गॅरी ट्रुमन

ही बातमी मी जेवढी केवढी फॉलो केली आहे त्यावरून समजते की दिल्ली सरकारने सुरवातीला दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. २४ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला. त्यानंतर हे प्रकरण राज्य आणि केंद्र यामधील आहे त्यामुळे उच्च न्यायालयाला या बाबतीत अधिकारक्षेत्र (जुरिसडिक्शन) नाही असा साक्षात्कार दिल्ली सरकारला झाला आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाला या प्रकरणी निकाल देण्यापासून रोखावे अशी मागणी केली.

अधिक माहिती http://www.thehindu.com/news/cities/Delhi/delhi-govtcentre-row-supreme-c... वर

प्रत्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयही या प्रकरणी केजरीवालांच्या बाजूने निर्णय देईल याची शक्यता फार वाटत नाही. कारण न्यायालय सद्यकालीन कायदे आणि राज्यघटना यांनाच बांधील असते. जर सध्याच्या कायद्यांमध्ये आणि राज्यघटनेत दिल्ली हे पूर्ण राज्य नाही हे म्हटलेले असेल तर त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालय काय करणार? आपण स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीतलावर पडलो आहोत असे केजरीवालांना वाटत असेलही आणि त्यामुळे 'हम करेसो कायदा' आणि तसा कायदा न केल्यास उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला वेठीस धरायचा यांचा खाक्या आहेही. पण देशाचा कारभार तसा चालत नसतो.कायदे करणे हा संसदेचा विशेषाधिकार आहे इतरांचा नाही.

एक गोष्ट मात्र पक्की आहे. समजा निकाल आपल्या बाजूचा आला तर केजरीवाल 'जितं मया' म्हणून जल्लोष करणार आणि विरोधात आला तर मात्र ते थयथयाट करणार. १४ जुलै रोजी निवडणुक आयोगाने आआपच्या २१ आमदारांना लाभाचे पद प्रकरणी सुनावणीसाठी बोलावले आहे. त्यानंतर निवडणुक आयोग निकाल जाहिर करेल. तो समजा केजरीवालांच्या विरोधात गेला तर मात्र मोठ्या आपटर्डचा (केजरीवाल, आशिष खेतान, आशुतोष इत्यादींचा) आणि छोट्या आपटर्डचा (फेसबुक आणि इतर ठिकाणच्या केजरूच्या गुलामांचा) थयथयाट किती होईल हे बघाच.

गॅरी ट्रुमन's picture

1 Jul 2016 - 2:01 pm | गॅरी ट्रुमन

२०१३ मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान केजरीवालांनी असे वातावरण निर्माण केले होते की त्यांच्याकडे शीला दिक्षितांविरूध्द सज्जड पुरावे (३७० पानी आरोपपत्र) आहेत आणि त्या लवकरच तुरूंगात जातील. अर्थातच तसे काही झाले नाही आणि केजरीवालांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे 'तुम्ही शीला दिक्षित यांच्याविरूद्धचे पुरावे सादर करा मग आम्ही कारवाई करू' हे बोलायचे ढोंगही झाले. मग एसीबी (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) दिल्ली सरकारच्या अंतर्गत नाही, सीबीआय नाही, दिल्ली सरकारला अमुक अधिकार नाहीत, तमुक मला काम करू देत नाहीत वगैरे बकवासही झाली.

यावरून एक गोष्ट आठवली. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला भाजपचे नेते रामदास नायक यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांच्याविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून कोर्टात धाव घेतली.अंतुले त्यातून पुराव्याअभावी सुटले पण १०-१२ वर्षे त्यांच्याविरूध्द हा कोर्टाच्या केसचा ससेमिरा लागला होता.त्यांचे मुख्यमंत्रीपदही गेले त्यामागे हे पण एक कारण होतेच. रामदास नायक या एका माणसाला या सगळ्या प्रकाराचा पाठपुरावा करणे नक्कीच सोपे गेले नव्हते. पण तरीही एसीबी, सीबीआय इत्यादी काहीही दिमतीला नसताना (किंबहुना विरोधातच असतानाही) रामदास नायक यांनी अंतुलेंना चांगलेच सतावले होते.

जर का ३७० पानी आरोपपत्र भरण्याइतके पुरावे केजरीवालांकडे होते तर मग ते स्वतंत्रपणे कोर्टात जाऊ शकतच होते की. कोणी अडवले होते त्यांना?

पण अर्थातच नुसता धुराळा उडविण्यातच या गृहस्थाला इंटरेस्ट असल्यामुळे याच्या हातून फारसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी

डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी भाजप ३२, आआप २८, काँग्रेस ८, संजद १ व अपक्ष १ अशी स्थिती होती. कोणालाच बहुमत नव्हते. त्यावेळी शीला दिक्षितांना वाचविण्याच्या बदल्यात काँग्रेसने आआपला पाठिंबा दिल्याने केजरीवालांनी सरकार बनविले. नंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी काँगेसने आपली दिल्लीतील मते आआपकडे वळविली. शीला दिक्षितांवर कारवाई न करणे ही काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याची किंमत होती.

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 7:25 pm | संदीप डांगे

सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवारांवर कारवाई न करणे ही पण कशाची तरी किंमतच म्हणायची... :)

भोळा भाबडा's picture

1 Jul 2016 - 8:14 pm | भोळा भाबडा

इथे हे अवांतर होईल,यासाठी वेगळा धागा हवा,पण माझे धागे लगेच उडतात त्यामुळे श्रीगुरूजींनी महाराष्ट्रात भाजपाने दीड वर्षात काय केले हे तपशीलवार लिहावे.
1) सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटळा झाला म्हणणारे, अजित पवार आणि तटकरेंना अटक का करत नाहीत?

2) शरद पवारांना शिव्या देणारे इथले सन्मानणीय सदस्य मोदी-पवार किंवा शहा-पवार यांच्या अंतर्गत राजकारणाबद्दल काय मत आहे?

3) शरद पवारांच्या कामाचा अभ्यास आहे का?
http://www.misalpav.com/node/19871
हा मागचाच धागा आहे,इथे पवारांबद्दल कशी गरळ ओकली आहे ते बघा,
आणि हा एक↓
http://www.misalpav.com/node/6674

आता या धाग्यावर केजरीवालांबद्दल गरळ ओकत आहेत,काय गरज नाही आणि फायदाही नाही,,
कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 8:18 pm | संदीप डांगे

कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.

'विकृत मनोरंजन' असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

बोका-ए-आझम's picture

1 Jul 2016 - 9:59 pm | बोका-ए-आझम

कुणा एकाची मक्तेदारी नाहीये डांगेसाहेब. पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच. बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय.

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 10:04 pm | संदीप डांगे

पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच,
स्पष्ट कराल काय?


बाकी तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग चांगला दिसतोय

कसला व्यासंग. साधं 'पिंडी ते ब्रह्मांडी' सूत्र आहे.
मै काला जग काला, मै भला जग भला.

स्पार्टाकस's picture

14 Jul 2016 - 3:26 am | स्पार्टाकस

डांगेसाहेब,

मै भला, बाकी सब चोर असं सूत्रं आहे ते .. केजरीवाल साहेबांचं

सचु कुळकर्णी's picture

1 Jul 2016 - 8:14 pm | सचु कुळकर्णी

सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवारांवर कारवाई न करणे ही पण कशाची तरी किंमतच म्हणायची... :)
पटेश.
कारवाई आता होण्याचि चिन्हेहि नाहित. सगळा करसडा काढला भुजबळांवर.

इथे माहिति नसणारेच पवाराना शिव्या देतात.

सचु कुळकर्णी's picture

1 Jul 2016 - 8:25 pm | सचु कुळकर्णी

भोळा भाबडा तुम्हिच गरीब चिमणा असावेत मागच्या अवतारात :)

मागच्या अवतारात होबासक्या केलेला
सच्या

भोळा भाबडा's picture

1 Jul 2016 - 8:27 pm | भोळा भाबडा

मुद्दे महत्वाचे आहेत न कि आयडी कोण आहे

सचु कुळकर्णी's picture

1 Jul 2016 - 8:29 pm | सचु कुळकर्णी

:)

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2016 - 11:27 pm | श्रीगुरुजी

अजित पवार तटकरे, सिंचन घोटाळा, त्याबाबत अतिशय व्यवस्थित सुरु असलेली कारवाई इ. वर मी सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकतो. परंतु हा या लेखाचा विषय नाही. धागा भरकटेल. या विषयावर कोणी वेगळा धागा काढला तर तिथे उत्तर देईन.

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2016 - 3:38 pm | श्रीगुरुजी

मोफत वायफाय, ९ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही, २५ लाख नवीन नोकर्‍या, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जनलोकपाल विधेयक, प्रत्येक खेड्यात मोफत तपासण्या व औषधे, ....

वरील गोष्टी परिचित वाटताहेत का?

ईश्वरसर्वसाक्षी's picture

13 Jul 2016 - 8:08 pm | ईश्वरसर्वसाक्षी

भगवंत मान युगपुरुषांच्या ट्यार्पि चे स्वारि पार्टि चे सांसद ह्यांचे टल्ली असलेले, पोलिस त्यांना उभे राहण्यास मदत करत असलेले फोटो मध्यंतरी बघण्यात आले होते पण आज कॅ. अमरींदर सिंग ह्यानि गौप्यस्फोट केलाय कि हे भगवंत मान संसदेत सुद्धा दारु पिवुन येत असत.
जय हो जय हो

पांच साल केजरीवाल

गॅरी ट्रुमन's picture

14 Jul 2016 - 9:26 am | गॅरी ट्रुमन

कालपरवाचीच गोष्ट. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते (आणि सध्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या) संजय निरूपम यांनी शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांच्यावर आरे कॉलनीतील जमीन लाटल्याचा आरोप केला. त्याविरूध्द रविंद्र वायकरांनी निरूपमांना नोटिस धाडली आणि १५ दिवसात जाहिर माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी असे सांगितले. त्यावर न्यूज चॅनेलवर बोलताना निरूपम यांनी म्हटले की ते अजिबात माफी मागणार नाहीत. रविंद्र वायकरांना पाहिजे तर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करू देत. कोर्टाने विचारल्यावर मी कोर्टापुढे पुरावे सादर करेन आणि मग वायकरांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही!!

आणि हे आपले युगपुरूष!! उठल्यासुटल्या सगळ्यांवर आरोप करत सुटायचे. मग कोर्टाने विचारल्यावर ’मी असे बोललोच नव्हतो’ असे म्हणायचे. हे बघा--

Kejru 1

मागे नितीन गडकरींना ’सर्वात भ्रष्ट माणूस’ असे म्हणून झाले. त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर आपल्याकडचे पुरावे सादर न करता हे युगपुरूष प्रत्येक वेळी पुढची तारीख मागत राहिले. मग पुढच्या तारखा मागता येणे कठिण झाल्यावर मग तिहार तुरूंगात आठवडाभर राहायचे ढोंग झाले.जामिनावर सुटायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा ’मी जामिन भरणार नाही’ असेही म्हणायचे ढोंग झाले. जामिन भरायचा नव्हता तर मग राहायचे ना आयुष्यभर तुरूंगात. हा ढोंगी माणूस कुठून आला आहे कुणास ठाऊक.

यावेळी अरूण जेटलींनी या हलकटाला अजिबात सोडू नये अशी फार इच्छा आहे. फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूर येथे लालकृष्ण अडवाणी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभेत भाषण करणार होते त्यावेळी शहरात बॉम्बस्फोट झाले. आणि हे बॉम्बस्फोट रा.स्व.संघाने केले आहेत असा आरोप तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला.इतकेच नव्हे तर त्यात रा.स्व.संघाच्या सहभागाविषयी आपल्याकडे पुरावा आहे असेही केसरींनी म्हटले. त्यांच्याविरूध्द रा.स्व.संघाने अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला.पण नंतर तो खटला मागे घेतला. बहुदा केसरींचे वय झाल्यामुळे म्हातारचळ लागले आहे आणि म्हणून ते वाटेल ते बरळत आहेत असे वाटले असावे कदाचित.पण या युगपुरूषांना मात्र अजिबात कोणत्याही प्रकारचे सौजन्य दाखवू नये असे फार वाटते.

केजरीवालांचे हे वाटेल ते आरोप करून धुराळा उडवायचा, सतत प्रसिध्दीचा झोत आपल्यावर ठेवायचा आणि मग पुरावे सादर करायची वेळ आली की हात वर करायचे हे 'हिट अ‍ॅन्ड रन' चे दुकान कायमचे बंद करून टाकायला हवे.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2016 - 3:27 pm | श्रीगुरुजी

याच धाग्यावरील याच विषयाशी संबंधित एक जुना प्रतिसाद जसाच्या तसा इथे देत आहे.
http://www.misalpav.com/comment/807812#comment-807812
________________________________________________________________________________

एक मजेशीर बातमी सापडली. अरूण जेटलींनी केजरीवाल, कुमार विश्वास इ. आआपच्या ६ नेत्यांविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी व बदनानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यात जेटलींचा हात आहे अशा स्वरूपाचे आरोप (अर्थातच कोणत्याही पुराव्याशिवाय) या मंडळींनी जाहिररित्या केले होते. आपला कोणत्याही भ्रष्टाचारात हात नसून कोणताही पुरावा नसताना केलेल्या या आरोपांमुळे आपली मानहानी व बदनामी झाली आहे असा दावा करून संबंधितांना शिक्षा देण्यासाठी जेटलींनी या सहा जणांविरूद्ध फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत.

या दाव्याविरूद्ध आपले म्हणणे मांडताना केजरीवालांनी न्यायालयात खालील शब्दात आरोपांचे समर्थन केले.

Arvind Kejriwal today responded to Arun Jaitley's defamation suit with a stinging reply in which he taunted the Union Finance Minister for "losing by over one lakh votes" in the national election and said he has no high public "reputation to protect".

In a statement to a Delhi court, the Chief Minister said Mr Jaitley's "claim that he enjoys a high public character is totally frivolous and unsustainable."

He wrote: "The last time he contested the election to the Lok Sabha was from Amritsar as a BJP candidate in 2014. Despite the success of the BJP this plaintiff lost by a margin of more than 1,00,000 votes. Indian democracy has never accepted his claim of public character."

In a democracy, he argued, one's public reputation can only be the reaction, response and manifestation of the people's attitude.

हा युक्तिवाद वाचल्यावर हसावे का रडावे का केजरीवालांची कीव करावी हेच समजेना. जो निवडणुक हरतो त्याला कोणतीच सार्वजनिक प्रतिष्ठा नसते (व त्यामुळेच त्याच्यावर कोणतेही आरोप केले तरी त्याची बदनामी व मानहानी होत नाही) व जनता निवडणुकीत जसा जनादेश देते तीच त्याची सार्वजनिक प्रतिष्ठा असते (म्हणजे निवडणुक जिंकलेल्याला सार्वजनिक प्रतिष्ठा असते व हरलेल्याला प्रतिष्ठा नसते) असा अत्यंत अतार्किक युक्तिवाद कोणी न्यायालयात करेल असे कधीही वाटले नव्हते.

दस्तुरखुद्द केजरीवाल वाराणशीत मोदींविरूद्ध तब्बल २.५ लाखाहून अधिक मतांनी हरले होते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज व वाजपेयी हे देखील निवडणुकीत हरले होते. बाबासाहेब आंबेडकर व मनमोहन सिंग हे देखील निवडणुकीत हरले होते. अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पुण्यातून अविनाश धर्माधिकारी हे देखील पडले होते. केजरीवालांच्या युक्तिवादानुसार निवडणुकीत पराभव झाल्याने या सर्वांना कोणतीही सार्वजनिक प्रतिष्ठा नाही.

http://www.ndtv.com/india-news/what-reputation-arun-jaitley-lost-by-1-la...

गॅरी ट्रुमन's picture

14 Jul 2016 - 6:11 pm | गॅरी ट्रुमन

असले गुडघ्यातले युक्तिवाद केजरीवाल सोडून अन्य कोणी करू शकेल असे वाटत नाही.

उठल्यासुटल्या सगळ्यांवर पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणार्‍या केजरीवालांना एका तरी केसमध्ये कोर्टाने शिक्षा ठोठावावी असे फार वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

14 Jul 2016 - 11:43 am | गॅरी ट्रुमन

दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक चालू करायची आपल्या युगपुरूषांची महत्वाकांक्षा आहेच. त्या मोहल्ला क्लिनिकचा असाही उपयोग होऊ शकेल हे आमच्यासारख्यांच्या लक्षातच आले नव्हते. त्याचे झाले असे की आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कन्या सौम्या हिला दिल्लीमधील जवळपास १०० मोहल्ला क्लिनिक सांभाळायची जबाबदारी देण्यात आली ही बातमी कालच आली. इतकी जबाबदारी देण्यात आली म्हणजे ती किमान डॉक्टर असावी असे कोणाला वाटावे. पण कुठचे काय. ती आहे आर्किटेक्ट!! अर्थातच अशा कोणत्याही पदांवर आपल्याच नातेवाईकांची वर्णी लावली गेल्यास नेपोटिझमचा आरोप होणारच. आणि तो सत्येंद्र जैन यांच्यावर झालाच. त्यानंतर आताच बातमी आली आहे की सौम्या जैनने त्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थातच करदात्यांचे पैसे आपल्यावरच खर्च करणे हा प्रकार आआपला नवीन नाहीच. त्याच उदात्त परंपरेतील हा एक प्रकार दिसतो.

मोहल्ला क्लिनिक सांभाळायला डॉक्टर न नेमता आर्किटेक्ट नेमावा यामागचे गणित समजण्यापलीकडचे आहे. आणि आर्किटेक्ट नेमायचा तर नेमायचाच. पण ती आर्किटेक्ट आरोग्यमंत्र्यांची कन्या असणे हा पण योगायोग समजायचा का? बरं ती त्या कामासाठी इतकी पात्र आणि योग्य असेल तर मग बोंबाबोंब झाल्यावर तिनी राजीनामा का दिला असावा?

आमच्यासारख्यांनाच हे प्रश्न पडतात. आपटर्ड्सना मात्र असे प्रश्न कधीच पडत नाहीत का?

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2016 - 12:19 pm | श्रीगुरुजी

http://m.rediff.com/news/report/repentant-kejriwal-cleans-dishes-at-gold...

नौटंकीसम्राटांची नवी नौटंकी

गॅरी ट्रुमन's picture

19 Jul 2016 - 1:55 pm | गॅरी ट्रुमन

नौटंकीसम्राटांची नवी नौटंकी

प्रचंड नाटकीपणा आणि ढोंगीपणा यात केजरीवालांचा हात कोणीच धरू शकत नाही हे कित्येक वेळा सिद्ध झाले आहेच. त्याचेच आणखी एक उदाहरण कालपरवाच पुढे आले. केजरीवालांनी सुवर्णमंदिरात जाऊन भांडी घासली ती म्हणे खरकटी नव्हतीच आणि मुळातच घासलेली स्वच्छ भांडी होती.

उत्तम. चालू द्या.

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी

यांच्या नाटकाची ही चित्रफीत -

https://www.youtube.com/watch?v=w4KLuqpGPJ8

कपिलमुनी's picture

19 Jul 2016 - 5:25 pm | कपिलमुनी

जशी स्वच्छ जागी पालापचोळा( कचरा) टाकून साफ करण्याचा स्वच्छ भारतची नौटंकी होती तश्शीच का ओ ?

अजया's picture

19 Jul 2016 - 3:48 pm | अजया

=))))

आजच श्री नवज्योत सिद्धू भा.ज.पा तून बाहेर पडून आ.आ.प मधे जाणार असल्याची बातमी आहे. आपचा पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा म्हणुनही त्यांचे नाव घेतले जात आहे. आता नौटंकी सोबत कॉमेडीचीही सोय झाली बघा.

कालपर्यंत पवित्र असलेला सिद्धू आज अचानक कॉमेडीयन झाला !
राज्यसभेवर खासदारकी दिली तेव्हा कोणी ब्र काढला नाही.

गॅरी ट्रुमन's picture

20 Jul 2016 - 4:41 pm | गॅरी ट्रुमन

आपल्या युगपुरूषांच्या पक्षाच्या एक स्त्री सदस्य सोनी हिने आत्महत्या केली आहे.त्याचे झाले असे की कुणी रमेश वाधवा नामक आम आदमी पार्टीच्या नेत्याने तिचा विनयभंग केला होता.त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. ही गोष्ट २ जून रोजीची. रमेश वाधवाला पोलिसांनी दुसर्‍या दिवशी अटक केली.पण त्याची ४ जून रोजी जामिनावर मुक्तता झाली.

या प्रकारानंतर रमेश वाधवाविरूध्द पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही म्हणून सोनी अत्यंत व्यथित झाली होती.शेवटी तिने आज आत्महत्या केली. अधिक माहिती इथे.

हे जर अन्य कोणत्या पक्षात झाले असते तर या युगपुरूषांनी नक्की काय केले असते याची कल्पनाही करवत नाही. पण कसे आहे हा प्रकार संपूर्ण विश्वातील सर्वात प्रामाणिक पक्षात झाला आहे. त्यामुळे कोणतेही प्रश्न विचारायला बंदीच आहे.

(केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 2:18 pm | श्रीगुरुजी

दिल्लीच्या आआप सरकारला उच्च न्यायालयाने आज झटका दिला. सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून गेली दीड वर्षे सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारशी भांडणार्‍या व आपल्या अपयशाचे खापर सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारवर फोडणार्‍या आआप सरकारला नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय मुख्य आहेत व नियुक्तींसाठी व कोणताही चौकशी आयोग नेमण्यासाठी त्यांची संमती अनिवार्य आहे असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

आम्ही दिल्लीत निवडून आल्याने आम्हाला वाटेल ते करायची परवानगी आहे, मग ते घटनाबाह्य का असेना अशा आविर्भावात गेली दीड वर्षे वावरणार्‍या व नायब राज्यपाल, मोदी व केंद्र सरकार यांच्यावर जवळपास दररोज अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍या केजरीवाल व आआप सरकार यांना या निर्णयाने नक्कीच झटका बसलेला आहे.

In a jolt to AAP, Delhi HC holds Lt. Governor as administrative head

In a big blow to the Aam Aadmi Party government's fight for Statehood for Delhi and control of power with the Union government, the Delhi High Court on Thursday held that National Capital Territory continues to be a Union Territory and the Lieutenant Governor is its administrative head.

With this, a series of moves made by the Delhi government such as commissions of inquiry into CNG fitness scam, Delhi and District Cricket Association illegalities, policy directions to electricity regulatory commission for compensation to people for disruption in power supply, were declared illegal by the court since the same were made without the approval or views of the Lieutenant Governor.

The court also held as illegal the appointment of Nominee Directors of Government of NCT of Delhi on Board of BSES Rajdhani Power Limited, BSES Yamuna Power Limited and Tata Power Delhi Distribution Limited by the Delhi Power Company Limited on the basis of the recommendations of the Chief Minister of Delhi without communicating the decision of the Chief Minister to the Lt. Governor of NCT of Delhi for his views.

In its 194-page judgement, the court concluded that “On a reading of Article 239 and Article 239AA of the Constitution together with the provisions of the Government of National Capital Territory of Delhi Act, 1991 and the Transaction of Business of the Government of NCT of Delhi Rules, 1993, it becomes manifest that Delhi continues to be a Union Territory even after the Constitution (69th Amendment) Act, 1991 inserting Article 239AA making special provisions with respect to Delhi.”

गॅरी ट्रुमन's picture

4 Aug 2016 - 2:23 pm | गॅरी ट्रुमन

आता केजरीवाल (किंवा आशिष खेतान) दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशही मोदींचे किंवा अंबानी-अडानींचे एजंट किंवा बीजेपीच्या पेरोलवर आहेत असे म्हणाले तरी आश्चर्य वाटू नये.

गेल्या काही दिवसात केजरीवालांनी अजून जास्त मर्कटलिला केल्याच आहेत. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याविषयी अधिक लिहिणारच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. केजरीवाल आणि आआपला मिपावर पूर्ण उघडे पाडणे हे माझे उद्दिष्ट आहे.

कपिलमुनी's picture

4 Aug 2016 - 7:16 pm | कपिलमुनी

मिपावर अरूणाचल प्रदेश च्या वेळी न्यायालयीन निर्णयावर टीका करणारे अचानक निर्णय योग्य असल्याचे सांगतात ते पाहून आश्चर्य वाटले

या तो घोडा कहो य चतूर

कपिलमुनी's picture

4 Aug 2016 - 7:14 pm | कपिलमुनी

म्हणजे आता दिल्लीचा जे काही वाटोळा चालला आहे त्याला नायब राज्यपाल जबाबदार आहेत का केजरीवाल ?

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 8:14 pm | श्रीगुरुजी

अर्थातच केजरीवाल. जे काम करायचे आहे ते सोडून इतर राज्यांना भेटी देऊन तिथल्या प्रश्नात नाक खुपसणे (हैद्राबाद, गुजरात, उ. प्र. इ.), ज्या क्षेत्रात काम करण्याचा घटनादत्त अधिकार आहे तिथे काम करायचे सोडून घटनात्मक अधिकार नसलेल्या क्षेत्रात ढवळाढवळ करणे, रोज एक नवीन नौटंकी करणे, पक्षातील भ्रष्टाचार्‍यांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणे, प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे, दिवसभर ट्विटरवर वेळ वाया घालवून मोदींना शिव्या देत बसणे, आपल्या पक्षात नसलेल्यांवर वाटेल ते बिनबुडाचे बेछूट आरोप करणे, केंद्र सरकारविरूद्ध सातत्याने न्यायालयाचा पायर्‍या चढणे, बदनामीच्या खटल्यांना तोंड देण्यासाठी वारंवार न्यायालयाच्या पायर्‍या चढाव्या लागणे .... इ. साठी केजरीवालच जबाबदार आहेत. यासाठी नायब राज्यपाल जबाबदार नाहीत.

बादवे, सध्या दिल्लीचे वाटोळं होत आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद!

तर्राट जोकर's picture

5 Aug 2016 - 9:37 am | तर्राट जोकर

मोदींना शिव्या देत बसणे

केजरीवालबद्दल तुमची दुखरी नस फक्त एवढीच आहे... म्हणून स्वतःचा दिवसातला बहुमुल्य वेळ घालवून इथे त्याच्याबद्दल कुरकूर करायला येता.

मार्मिक गोडसे's picture

5 Aug 2016 - 12:02 pm | मार्मिक गोडसे

तजो फार दिवसांनी हजेरी लावली व घेतलीही. बरं वाटलं

कपिलमुनी's picture

5 Aug 2016 - 4:09 pm | कपिलमुनी

कैच्या काय !

प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे

एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू !
किंवा वन नाईट स्टँडचा !

काहीजणांना पतंग उडवायला आवडतो काहींना चित्रपट बघायला .

श्रीगुरुजी's picture

5 Aug 2016 - 5:53 pm | श्रीगुरुजी

या. केजरीवालांच्या अंधभक्तांचीच वाट पहात होतो.

कपिलमुनी's picture

5 Aug 2016 - 11:08 pm | कपिलमुनी

प्रत्येक गोष्ट वाढवून चढवून सांगितली पाहिजे का ?
पुन्हा प्रत्येक चित्रपट पाहिल्याचा आरोप सिद्ध करा म्हणला की पळून जाल

श्रीगुरुजी's picture

5 Aug 2016 - 11:15 pm | श्रीगुरुजी

पहिल्यांंदा चित्रपट न पाहिल्याचा दावा सिद्ध करा.

कपिलमुनी's picture

6 Aug 2016 - 3:50 pm | कपिलमुनी

तुम्हाला भूत असल्याचा पुरावा मागितला तर तुम्ही भूत नसल्याचा मागता.
तुम्ही जे काय ४ पिक्चर वरुन विधाने केली कारण त्यांनी त्याबद्दल ट्वीट केले. म्हणून लोकांना कळले । यावरुन प्रत्येक पिक्चर बघतात असला बिनडोक निष्कर्ष काय लॉजिक वापरुन काढला?

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 5:18 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांनी फक्त ४ चित्रपट पाहिले असे म्हणून त्यांची खिल्ली उडविणे अयोग्य आहे.

कपिलमुनी's picture

6 Aug 2016 - 10:12 pm | कपिलमुनी

मुद्दा संपला , टीपी सुरु ! फिरा गोल गोल

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 11:10 pm | श्रीगुरुजी

फिदीफिदी . . .

सगळाच टीपी होता. मुद्दा नव्हताच. मग तो संपणार कसा?

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी

कैच्या काय !

>>> प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे

एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू !
किंवा वन नाईट स्टँडचा !

वरील वाक्यातील उपरोध आवडला. केजरी अंधभक्तांकडून इतके उपरोधिक वाक्य यावे हे एक आश्चर्यच!

कपिलमुनी's picture

5 Aug 2016 - 11:10 pm | कपिलमुनी

केजरीवाल सरकारने दिल्ली मधे आमदारांचे पगार वाढवल्यावर रडणारे लोक महाराष्ट्रामधे आमदार , मंत्र्यांचा पगार पेंशंन वाढून सुद्धा मूग गिळून आहेत.
दुटप्पीपणाचा कहर आहे

गॅरी ट्रुमन's picture

6 Aug 2016 - 3:47 pm | गॅरी ट्रुमन

धरणेसम्राट केजरीवाल सरकारने मुख्यमंत्री निवासाजवळ धरणे धरायला बंदी घातली आहे. जानेवारी २०१४ मध्ये केजरीवालांच्या त्या कुप्रसिध्द धरण्याचे समर्थन करणारे लोक आता मात्र मूग गिळून आहेत.

दुटप्पीपणाचा कहर आहे

कपिलमुनी's picture

6 Aug 2016 - 3:51 pm | कपिलमुनी

शांततामय मार्काने विरोध व्यक्त करायला परवानगी हवीच.
अशी बंदी चुकीची आहे

कपिलमुनी's picture

6 Aug 2016 - 3:56 pm | कपिलमुनी

हे पद कोणाच्या अखत्यारीत आहे ? दिल्ली सरकार की केंद्र की नायब राज़्यपाल?
( दिल्ली च्या पदांबद्दल कंफ्यूजन आहे म्हणून विचारला)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

6 Aug 2016 - 4:21 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

गुरूजी,द्रुमन तुम्ही दोघेच आपपसांत मॅच खेळताय!!!!

अर्धवटराव's picture

8 Aug 2016 - 11:53 am | अर्धवटराव

नुकतेच मोदि साहेब दलितांविषयीच्या कळवळीतुन (हा कळवळा बहुतेक उत्तरेकडुन पश्चिमेत नुकताच दाखल झाला आहे) "दलितांऐवजी मला गोळ्या घाला" टाईपचे डायलॉग मारायला लागले आहेत. हि खास केजरीस्टाईल आता मोदिंना पण आवडायला लागली बहुतेक :)

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

मोदींवर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी खर्चिले ७० लाख रूपये

जाहिरातीवर खर्च केलेल्या रक्कमेपैकी ८५ टक्के खर्च दिल्लीबाहेर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आप सरकारने कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या जाहिरांतीवर तब्बल ५२६ कोटी रूपये खर्च केले असून यातील १०० कोटींचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरत त्यावर ७० लाख रूपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. दिल्ली सरकारने टीव्हीवरील जाहिरातीसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने आपल्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

कॅगने आपल्या अहवालात केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत आप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्याप्रमाणात जाहिराती करण्यात आल्या होत्या. केजरीवाल यांनी त्यावेळी आपच्या जाहिरातीसाठी ३३.४ कोटी रूपये खर्च केले असून त्यातील ८५ टक्के रक्कम ही दिल्ली बाहेर खर्च केली आहे.

एका जाहिरातीत एक व्यक्ती झाडू दाखवताना दिसतो. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाची जाहिरात नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे. जाहिरातीत राज्य सरकारची उपलब्धी ही केजरीवाल यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-government-spent-75-lacs-on...

केजरीवालांच्या अंधभक्तांना त्यांनी पंतप्रधानांवर आपली हत्या करण्यासाठी प्रयत्न करु शकतात असा आरोप केला, दिल्लीत पूर आलेला असताना ते धरमशाला इथे विपश्यनेसाठी निघून गेले वगैरे गोष्टी दिसणार नाहीतच. काय करतील बिचारे? अव्यापारेषु व्यापार केल्यावर असंच होणार.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2016 - 9:09 pm | श्रीगुरुजी

दिल्लीच्या आआप सरकारमधील एक मंत्री संदीप कुमार एका चित्रफितीत महिलांशी अश्लील चाळे करताना सापडला. त्याची चित्रफीत मिळाल्यापासून केवळ ३० मिनिटांच्या आत आम्ही त्याला हाकलले, आम्ही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करीत नाही इ. तात्विक भाषण करून केजरीवालांनी आपण महान असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. ज्याने चित्रफीत बाहेर आणली त्याच्या म्हणण्यानुसार ही चित्रफीत बर्‍याच दिवसांपासून केजरीवालांकडे होती. पण ते गप्प बसून राहिले. जेव्हा काल माध्यमांकडे ही चित्रफीत पोहोचली तेव्हा नाईलाजास्तव त्यांना मंत्र्याला काढायला लागले. अर्थात हे केल्यावर सुद्धा आपल्याला हे माहित नसल्याचे त्यांनी साळसूदपणे सांगितले. एखादा माणूस काय करणार हे कोणाच्याही चेहर्‍यावर लिहिलेले नसते, त्यामुळे संदीप कुमार काय करीत होता हे मला माहितीच नव्हते असा आव त्यांनी आणला. "वो परेशान करते रहे और हम 'काम' करते रहे" हे आआपच्या जाहिरातीतील वाक्य संदीप कुमारने खरे करून दाखविले आहे.

आणि आज आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला न्यायालयाने १८ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिलेली आहे. २००९ मध्ये झालेल्या एका कामगाराच्या मृत्युप्रकरणी गुन्हा सिद्ध होऊन पवन शर्माला ही शिक्षा झाली. हे प्रकरण २००९ चे आहे. त्यामुळे २०१५ मध्ये त्याला आमदारकीचे तिकीट देताना त्यावेळी मला हे प्रकरण माहितीच नव्हते अशी लोणकढी थाप केजरीवालांना मारता येणार नाही. जितेंद्र तोमरवर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असूनसुद्धा त्याला तिकीट देऊन निवडून आल्यावर केजरीवालांनी त्याला मंत्री केले. संदीपकुमारबद्दल माहिती मिळूनसुद्धा त्याच्यावर लगेच कारवाई केली नाही. पवन शर्मावरील गुन्ह्याची माहिती असूनसुद्धा त्याला तिकीट दिले.

आणि ह्यांनी म्हणे इथली व्यवस्था बदलण्यासाठी अवतार धारण केला आहे!

http://www.business-standard.com/article/news-ians/aap-mla-sentenced-for...

सुबोध खरे's picture

3 Sep 2016 - 3:32 pm | सुबोध खरे

आताच आलेल्या बातमी नुसार केजरीवाल साहेबानी आरोप केला आहे कि मंत्र्यांच्या चावट चित्रफीतिचा सर्वत्र प्रसार करण्यासाठी श्री मोदींनी अंबानींना हाताशी धरून नेट स्वस्त केले आहे. "सब मिले जुले है"

डँबिस००७'s picture

3 Sep 2016 - 8:25 am | डँबिस००७

भारत देशाचे आंतर राष्ट्रिय ख्यातीचे नेते श्री केजरीवाल यांनी वॅटीकन सिटिला मदर तेरेसा सेंट हुड प्रोग्रामला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्म निरपेक्ष राजकारणाचा उत्तम पायंडाच श्री केजरीवाल यांनी पाडलेला आहे !!

कपिलमुनी's picture

5 Sep 2016 - 1:01 am | कपिलमुनी

सुषमा स्वराज दिसल्या का तिथे गेलेल्या ?
त्यांनी काय पायंडे पाडले ते सांगा

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 4:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

धाग्याचे नाव

केजरूचे गुलाम विरुद्ध मोदींचे अंधभक्त

असे करण्यात यावे ही माननीय संपादक मंडळाला विनंती!! जरा फुकट कंदील लावणे, हे आपलं कलगी तुरा रंगल्याचा फील तरी येईल.

ह्या निमित्ताने मिपावरील एका माजी (का पाजी!) अन विद्यमान काळात आपटार्ड असलेले एक मजेशीर भोचक पात्र आठवले!

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 4:30 pm | संदीप डांगे

टाझो का?

गॅरी ट्रुमन's picture

6 Sep 2016 - 3:42 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही दिवसात आआपमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी घडल्या आहेत. अर्थात आआपमध्ये शिसारी न आणणार्‍या फारच थोड्या गोष्टी आहेत (इफ अ‍ॅट ऑल असल्याच तर). त्याच मांदियाळीतल्या या आणखी काही गोष्टी:

मंत्री संदीप कुमार सीडी प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ सादर करणार्‍याचे म्हणणे असे की त्याने हा व्हिडिओ केजरीवालांना काही दिवस आधीच दिला होता.पण काही दिवस केजरीवालांनी त्यावर काहीच पावले उचलली नाहीत.पण मग तो व्हिडिओ उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे आणि मिडियाकडे पोहोचल्यावर मात्र 'अर्ध्या तासात' संदीप कुमार यांची उचलबांगडी केली गेली. एकीकडे केजरीवाल म्हणत होते की या कृत्याने संदीप कुमार यांनी पक्षाच्या विचारसरणीला धक्का पोहोचवला तर दुसरीकडे मकराश्रू फेम आशुतोष म्हणत होते की जे काही झाले ते संदीप कुमार आणि त्या स्त्री मध्ये परस्परसहमतीने झाले तेव्हा इतरांना याविषयी तक्रार करायचे कारण नाही.इतकेच नाही तर आशुतोष यांनी महात्मा गांधींच्या ब्रम्हचर्यावरील प्रयोगांचे आणि सरला चौधरी यांच्याबरोबरच्या संबंधांचे दाखले दिले.पण असे दाखले उठल्यासुटल्या कुणीही देऊन कसे चालेल?गांधीजींची ध्येयनिष्ठा आणि त्याग याच्या ०.०१% ही न करता कोणीही उठावे आणि असे काहीतरी दाखले द्यावेत हे कसे काय समर्थनीय आहे? याच न्यायाने हे उद्या रेल्वेगाडीतील खजिना लुटतील आणि म्हणतील की काकोरी प्रकरणात क्रांतिकारकांनीही हेच केले होते!! २०१४ च्या निवडणुकांच्या काळात उजव्या गटाच्या अनेकांनी (ज्यांना 'मोदीभक्त' म्हणतात अशांपैकी अनेकांनी) नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचे फोटो फॉरवर्ड करायचा प्रकार केला होता.त्यावर टिका केलीच पाहिजे. पण मग काहीसा प्रकार फोटोच्या माध्यमातून नाही तर शब्दाच्या माध्यमातून आआपच्याच एका नेत्याने केल्यावर ही शांतता का? असो.हे थोडेच झाले की काय म्हणून त्या पिडीत स्त्रीने संदीप कुमारने आपल्यावर बलात्कार केला असा दावा केला. त्यानंतर संदीप कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले.

"वो परेशान करते रहे हम काम करते रहे" यातील 'काम' चा असा अर्थ लागेल असे वाटलेही नव्हते!!

सध्या केजरीवालांना पंजाबात मोठा विजय मिळवायची महत्वाकांक्षा आहे. त्यासाठी दिल्लीवरून संजय सिंग आणि दुर्गेश पाठक यांना केजरीवालांनी पंजाबात रवानाही केले. कर्नल देविंदर सेहरावत हे पक्षाचे बिजासवान येथील आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाने दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.कालच त्यांनी केजरीवालांना पत्र पाठवून पंजाबातील नेते पक्षातील स्त्री नेत्यांचे उमेदवारी द्यायच्या आमिषावरून शोषण करीत आहेत असा आरोप केला. हा आरोप करणारे कोणी बाहेरचे नाहीत तर दोनदा पक्षाच्या अत्यंत उच्च मुल्यांच्या चाळणीतून पार झालेले नेते आहेत. आता त्याविरूध्द आआपचे नेते सेहरावतांविरूध्द अब्रूनुकसानीचा खटला दाखल करायची गोष्ट करत आहेत. तर आशुतोष यांच्या ब्लॉगपोस्टविरूध्द राष्ट्रीय महिला आयोगाने नोटिस बजावल्यानंतर आशुतोष महिला आयोगावर उखडले आहेत!! म्हणजे एकूणच काय तर यांच्या अमर्याद मर्कटलीला चालूच आहेत.

हा सगळा प्रकार शिसारी आणणारा नाही का? आणि याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते. असो. इतर कोणालाही काहीही वाटले तरी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी मी मिपावर तरी लिहिणे सोडणार नाही!!

याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते

हे मी बोललो होतो.

नेहमी तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचण्याची सवय आहे मात्र केजरीवालबद्दल बोलताना तुमची लेखणी वेगळे रूप धारण करते आणि ते नेहमी खटकत राहते म्हणून तो प्रतिसाद दिला होता.

केजरीवाल कितीही पातळी सोडून वागूदे किंवा राजकारणात कोलांट्या उड्या मारूदे... आपण येथे चर्चा करताना पातळी सोडणे अयोग्य आहे इतकेच माझे मत आहे.

(क्लिंटनचा चाहता) मोदक

शिव्यांचा जन्म कसा झाला? तर जेव्हा शिव्या द्यायच्याच लायकीच्या लोकांचा जन्म झाला, तेव्हा शिव्यांचा जन्म झाला. हा formula आहे. यात पाहिजे ती नावं substitute करा म्हणजे सगळी समीकरणं सुटतील.
- (क्लिंटनचा, गॅरी ट्रूमनचा आणि मिल्टनचा चाहता) बोका-ए-आझम

तर्राट जोकर's picture

6 Sep 2016 - 9:21 pm | तर्राट जोकर

मग मिपावर शिव्या देणारे बॅन का होतात....

अमितदादा's picture

6 Sep 2016 - 11:00 pm | अमितदादा

तुमचे प्रतिसाद खूप माहितीपूर्ण असतात, पण आप बाबतीत आपला पूर्वग्रह दिसून येतो. खालील वाक्याशी सहमत नाही

आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी

केजरीवाल यांनी विकासावर लक्ष केंद्रित न करता खूप उचापती केल्या आहेत पण याचा अर्थ ते कलंक वैगेरे नाहीत. त्यांच्यापेक्षा इतर खूप पक्षांनी वाईट दिवे लावले आहेत. त्यांच्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला.

आप ला लोकांनी विकास आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार साठी निवडून दिलेलं, त्यांनी पाणी आणि वीज यावरती चांगलं काम केलं आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, दिल्ली सरकार च्या अख्ततिरित असणाऱ्या सेवा चांगल्या प्रकारे पुरवल्या जातात. खाजगी शाळा ची मुजोरी कमी केलीय. PWD डिपार्टमेंट सुधरवल, जेणेकरून रस्ते बांधणी आणि दुरुस्ती चांगली होईल. अर्थात जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन बरोबर तुलना करून नाही चालणार कारण सगळेच पक्ष मतदारांना चंद्राचं आमिष दाखवतात. आप च्या चांगल्या कामाबद्दल इथे वाचा. तसेच अनेक दुवे जालावर मिळतील.

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संदीप कुमार प्रकरणात आप ची नाचक्की झाली, मग काँग्रेस चे मनू सिंघवी सेक्स प्रकरण मध्ये काँग्रेस ने साधी कारवाई पण केली नाही. इथे तर आप ने कारवाई केली. तसेच आप चे स्थानिक नेते अजून राजकारणात मुरलेले नाहीत त्यामुळं political correct राहायला जमत नाही. पण चांगल्या लोकांना आप ने राजकारणाचे दरवाजे खुले केले हे नाकारून चालणार नाही.

आप धर्माच्या नावांनी ते काँग्रेस चे बाप आहेत, ultra psedu secularist आहेत. सतत मोदींच्या नावाने किंवा जंग च्या नावाने ओरड करून आप ने पत घालवली आहे. परदेश नीती संदर्भात त्यांची मते फालतू आहेत. अजून बरेच दोष निघतील पण ते सगळीकडे आहेत.

मी आप समर्थक अजिबात नाही. सतत बोंबलणारे केजरीवाल डोक्यात जातात मी हि आप बद्दल जास्त वाचत नाही परंतु तुम्ही जेवढ वाईट रंगवताय तेवाढे पण ते वाईट नाहीत. माझा प्रतिसाद खूप विस्कळीत आहे, तसेच मला तुम्ही मांडलेले मुद्दे मान्य आहेत पण त्याची जी तीव्रता तुम्ही दाखवताय तेवढि ती नाही.

या बाबतीत मी क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत आहे.
आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो. अरविंद केरीवाल यांची तुलना मी इदी आमेन वगैरेंशी करेन. क्रूरतेच्या बाबतीत नाही परंतु चेहेऱ्यावर सोज्वळ भाव असणाऱ्या केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्ती मनातून अतिशय घाण प्रवृत्तीच्या असतात . सत्तापिपासू , दुसऱ्यांच्या सतत द्वेष करणे , त्यासाठी कोणत्याही थराला जाणे , दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते.
आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. भगवंत मान या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च संस्थेला धोका येईल असे चित्रण केले व स्पष्टीकरण विचारल्यावर निर्लज्जपणे मोदींचे नाव पुढे केले होते. जर यांच्या हातात पंजाब सारखे सुरक्षादृष्टीने महत्वाचे राज्य मिळाले तर तिथे हे लोक नंगानाच चालू करतील.
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते मात्र ज्यांना निववळ हुल्लडबाजी करायची आहे अशा मूर्ख आप पार्टी कडे इथून पुढे कधीही कुठलेहि राज्य जाऊ नये.
आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 8:01 am | सामान्य वाचक

प्रतिसाद

गॅरी ट्रुमन's picture

8 Sep 2016 - 11:59 am | गॅरी ट्रुमन

आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो.

आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाते!!

दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते.

असे म्हणतात की a man's character is known by what he does when nobody is watching!! वरकरणी "इन्सान का इन्सान से हो भाईचारा" वगैरे घोषणा देणारेच केजरीवाल योया आणि प्रभू यांच्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून द्यायची भाषा करतानाचे फोनवरचे बोलणे जाहिर झाले आहे. आणि हो उंटाच्या त्याच विशिष्ट अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर "ही कसली भाषा" म्हणून आआपसमर्थक तुटून पडले होते.पण प्रत्यक्ष केजरीवालांनी माणसाच्या त्याच अवयवाचा उल्लेख केल्यावर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले होते. आमचे जॉर्ज ऑरवेल साहेब म्हणूनच गेले आहेत--"all animals are equal. But some animals are more equal than others." आता त्या न्यायाने उंट माणसापेक्षा कमी equal निघाला असे म्हणायचे तर!!

आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.

आपण नक्की कोणत्या पदावर काम करत आहोत, त्या पदाचे अधिकार आणि मर्यादा किती याचे भान प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे आणि त्या प्रमाणेच वर्तन असले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? ठिक आहे. दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रचंड बहुमताने निवडून दिले पण याचा अर्थ तुम्हाला त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी बेताल बडबड करायचा परवाना मिळत नाही. समजा उद्याला कुणा गैबी कुडुत्री गावच्या सरपंचपदी ९९.९% मते घेऊन कोणी निवडून आला आणि मला जनतेचे मॅन्डेट प्राप्त आहे असा दावा करत त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी (उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्रधोरण) कोणी बडबड करू लागला तर ते जितके गैर ठरेल तितकेच केजरीवालांचेही वर्तन गैर आहे.

(अवांतरः याच कारणामुळे आमच्या रघुराम राजन साहेबांचे वर्तनही अनेकवेळा खटकण्यासारखे होते.अशा पदावरील कोणीही त्यांच्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींवर जाहिरपणे बोलणे अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही सरकारला अर्थकारण सोडून विविध गोष्टींवर free advice मधूनमधून राजनसाहेब देत असत. त्यांची गव्हर्नर म्हणूनची इतर कारकिर्द कशीही असली तरी हा प्रकार म्हणजे त्यावर नक्कीच डाग होता असे मला वाटते)

काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन.

नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी

नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.

देशात समर्थ विरोधी पक्ष असावा, पण तो काँग्रेस नक्कीच नसावा. काँग्रेस हा विरोधी पक्ष होण्यास सुद्धा पात्र नाही. काँग्रेस ही फक्त गुन्हेगार, भ्रष्टाचारी, देशद्रोही व जातीयवाद्यांची देशविघातक टोळी आहे. या टोळीचा संपूर्ण नि:पात होणे भारतासाठी गरजेचे आहे. विरोधी पक्ष असावा पण त्यात नवीन पटनाईकांसारखे नेते असावेत.

पंजाबात अकाली-भाजपने चांगला कारभार केला नसला तरी काँग्रेस, बसप, आआप, सिधूचा नवीन पक्ष इ. पर्याय हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारातले आहेत. एकवेळ अकाली-भाजप परवडले, पण यापैकी कोणीही नको.

अगदी योग्य बोललात गुरुजी.

पण, सध्या सगळी खान्ग्रेसी मंडळी भाजप मधे जाताना दिसत आहे त्याचे काय?

म्हणजे काहिही होउ दे, हि लोकं सत्तेपासुन दुर नाहिच आहेत!!!!!

विशुमित's picture

29 Sep 2016 - 12:43 pm | विशुमित

असल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

एखादा खांग्रेससी भाजप मध्ये गेल्यावर गोमूत्र शिंपडले लगेच शुद्ध होतो.. तेवढी पावरच आहे गोमूत्रात...

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2016 - 2:51 pm | श्रीगुरुजी

आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.

संपूर्ण प्रतिसादातील वाक्यावाक्याशी सहमत, अपवाद फक्त खालील वाक्यांचा.

काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते

मी दोघेही निवडणार नाही. कॉंग्रेस हा आआपइतकाच नालायक पक्ष आहे.

सुज्ञ's picture

8 Sep 2016 - 8:35 am | सुज्ञ

म्हन्जे काय ?

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 8:38 am | पिलीयन रायडर

सुज्ञ प्रतिसाद!

असं म्हणाली ती!!

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 9:24 am | सामान्य वाचक

असे झाले का
Btw
जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे,
आमच्या नवरोबाना हा चांगला माणूस इ इ वाटत होता

पैज हरला ना राव

त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे

त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे >> फार वेळा म्हणू नका हं.. नाहीतर "तुझी पारख मी केली आणि तू माझी" असे उत्तर ऐकायला मिळेल ;)

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 10:08 am | सामान्य वाचक

हा धोका आहे नाही का

गॅरी ट्रुमन's picture

8 Sep 2016 - 12:07 pm | गॅरी ट्रुमन

जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे,

यावरून एक गोष्ट आठवली. अण्णांचे २०११ मधले उपोषण जोरात चालू होते त्यावेळी त्या उपोषणाला विरोध करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देणे वगैरे हिस्टेरिया जाणीवपूर्वक तयार करण्यात आला होता. त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते तर काँग्रेस समर्थक अर्थातच या प्रकाराचा विरोध करत होते.पुढे आआपची स्थापना झाल्यावर केजरीवाल भाजपविरूध्द उलटल्यावर भाजप समर्थक केजरीवालांना नावे ठेवायला लागले आणि काही काँग्रेस समर्थक केजरीवालांच्या बाजूने बोलायला लागले.(मुळचे इकडचेच असलेले) पण सध्या तिकडे असलेले काही या कॅटेगिरीमध्ये मोडतात.

या बाबतीत मात्र माझी भूमिका कन्सिस्टन्ट आहे याचा सार्थ अभिमान मला आहे :) अण्णांच्या उपोषण काळापासूनच या असल्या अराजकवादाला माझा विरोध होता.आणि त्यातही केजरीवाल म्हणजे गुड फॉर नथिंग लोकांचा सरताज आहे हेच मत होते.

आणि हो. मिपावर तरी केजरीवाल आणि आआपचा माझ्यापेक्षा अधिक कडवा विरोधक सापडणे तसे कठिणच आहे याचाही मला अभिमान आहे :)

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 12:18 pm | सामान्य वाचक

कारण प्रामुख्याने हे महोदय आहेत

ते खोटे वागणे, बोलणे, खोटा साधेपणा इ इ पहिले कि tv फोडीन असे वाटते

बाकी तुमच्या पोस्ट शी सहमत
सगळाच एकंदरीत भंपकपणा होता

त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.

ह्या चर्चेची लिंक मिळेल का ? दुर्दैवाने त्यावेळी मी मिपावर नव्हतो..
आशुतोषची शप्पथ घेऊन सांगतो, ती चर्चा फक्त वाचेल. धागावर काढणार नाही. :-)

गॅरी ट्रुमन's picture

8 Sep 2016 - 12:43 pm | गॅरी ट्रुमन

काही लिंका पुढीलप्रमाणे:

एक
दोन
तीन
चार

आणखी काही चर्चा सापडल्या तर इथे लिंका देतोच.

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2016 - 2:59 pm | श्रीगुरुजी

आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने २००९ मधील एका कामगाराच्या मृत्युच्या संदर्भात दोषी जाहीर करून १८ महिन्यांच्या तुरंगवासाची शिक्षा जाहीर केली. ही बातमी बहुतेकांच्या नजरेतून निसटलेली दिसते. २०१२/१३ मध्ये केजरीवालांनी असे जाहीरपणे सांगितले होते की "शिक्षा झाल्यावर आमदारकी/खासदारकी रद्द होण्याऐवजी एखाद्यावर नुसते आरोप असले तरी त्याची/तिची आमदारकी/खासदारकी रद्द व्हायला पाहिजे". या पवन शर्माचे प्रकरण २००९ चे आहे. खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करणार्‍या जितेंद्र तोमरवर २०१५ मधील निवडणुक होण्याच्या आधीपासून आरोप होते. अर्थात केजरीवालांनी त्याला जाहीररित्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्या निवडणुकीच्या वेळी या दोघांना तिकीट देताना केजरीवालांना आपल्याला जाहीर घोषणेचा सोयिस्कर विसर पडला.

सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते

सुरवातीला त्यात मीही होतो. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड येथे भाजपला बहुमत मिळावे व दिल्लीत आआपला बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे असे मी एका धाग्यावर लिहिले होते. केजरीवालांमुळे मी त्यावेळी खूप प्रभावित झालो होतो. अर्थात नंतर इतरांप्रमाणे माझाही भ्रमनिरास झाला. मात्र अण्णांबद्दल मला अजूनही पूर्वीइतकाच आदर आहे व त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे.

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 12:29 pm | सामान्य वाचक

दुसरा धागा काढताय का ?

कारण अजून खूप लोकाना खूप बोलायचे असणार आहे

गॅरी ट्रुमन's picture

8 Sep 2016 - 12:45 pm | गॅरी ट्रुमन

दुसरा धागा काढताय का ?

हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

अन्य कोणी मिपाकराने नवीन धागा काढल्यास हा धागा वाचनमात्र करायला काहीच हरकत नाही. ८००+ प्रतिसाद म्हणजे तसे खूपच झाले. या क्षणी तरी नवा धागा काढायचा उत्साह नाही. पण तुम्ही किंवा अन्य कोणी नवा धागा काढल्यास नक्कीच सहभाग घेईन :)

क्षमस्व's picture

16 Sep 2016 - 5:39 pm | क्षमस्व

हजार होऊ द्या ना प्लिज।।।

रुस्तम's picture

8 Sep 2016 - 12:46 pm | रुस्तम

दिल्ली उच्च न्यायालयाचा आप सरकारला झटका; २१ संसदीय सचिवांची नियुक्ती रद्द

गॅरी ट्रुमन's picture

8 Sep 2016 - 1:05 pm | गॅरी ट्रुमन

मागच्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो.माझे हॉटेल होते दक्षिण दिल्लीत अमृतनगर भागात, जो कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघात येतो. कस्तुरबा नगर मतदारसंघाचे आआपचे आमदार मदनलाल हे या २१ संसदीय सचिवांपैकी आहेत.किमान दोन ठिकाणी रस्त्यावर या मदनलालांचे बोर्ड बघितले. त्यात "विधायक (कस्तुरबा नगर) आणि पार्लामेन्टरी सेक्रेटरी-- दिल्ली सरकार" असाही उल्लेख होता.

या २१ आमदारांपैकी काहींनी "आम्ही मंत्र्यांच्या ऑफिसात इंटर्न" म्हणून काम करत आहोत असा दावा केला होता.जर इंटर्न असाल तर मग रस्त्यावर पाट्या लावून ते सर्व जनतेला सांगायचे प्रयोजन कळले नाही.

ही पाटी मी उबरमधून बघितली होती आणि त्यामुळे फोटो घेता आला नव्हता. जर दिल्लीतील कुणा मिपाकराने (पटाईतकाका किंवा चित्रगुप्त किंवा अरूण जोशी किंवा अन्य कोणी) अशा एखाद्या पाटीचा फोटो घेऊन इथे दिला तर ते फारच चांगले होईल.

गॅरी ट्रुमन's picture

16 Sep 2016 - 4:34 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये आआपच्या सरकारमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी झाल्या आहेत.

तर झाले असे की दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ आली.१२-१५ जणांच्या त्यामुळे मृत्यूही झाला.खरे तर आआपचे सरकार कसा लोकाभिमुख कारभार देऊ शकते हे दाखवून द्यायची संधी या साथीच्या निमिताने मिळाली होती.

दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्री नाही कारण दिल्ली पोलिस दिल्ली सरकारला रिपोर्ट करत नाहीत तर ते केंद्र सरकारला रिपोर्ट करतात.तेव्हा दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्र्याचे कामच नाही.पण दिल्लीच्या मंत्रीमंडळात सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री आहेत. याचाच अर्थ दिल्ली सरकारच्या हातात शहरातील आरोग्यसेवा पुरवायचा अधिकार काही प्रमाणात नक्कीच आहे. बाकी काही नाही तरी एकूण ३८ हॉस्पिटल्स दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतात हे दिल्ली सरकारचेच संकेतस्थळ म्हणत आहे. मान्य आहे की एम्स किंवा राममनोहर लोहिया हॉस्पिटल ही हॉस्पिटल्स केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात आणि दिल्ली मनपाची काही हॉस्पिटल्स असतीलच त्यावरही यांचा काही अधिकार नाही.पण दिल्ली सरकारच्या अंतर्गत जी हॉस्पिटल्स येतात त्यात या प्रकाराविषयीची व्यवस्थित उपाययोजना करता आलीच असती.

परवा टाईम्स नाऊवर एक डॉक्टर म्हणत होता की चिकनगुनिया १००० मध्ये सरासरी एकाचाच मृत्यू घडवतो.म्हणजे जर १२-१५ जणांचा मृत्यू झाला आहे तर याचाच अर्थ १२ ते १५ हजार लोकांना त्याची लागण झाली असली पाहिजे.डेंग्युचे रूग्ण किती असावेत याची कल्पना नाही. म्हणजे करायचे ठरविले असते तर बरेच काही करण्यासारखे होते. पण कसे आहे की स्वतः काही करायचे नाही आणि इतरांवर दोष ढकलायचा ही आमच्या युगपुरूषांची आणि आआपची जुनी परंपरा आहे.त्यातूनच मग बघा कोर्टाने नायब राज्यपालांना दिल्लीचे सर्वेसर्वा ठरविले आहे ना मग त्यांनाच विचारा, मनपांना विचारा वगैरे मखलाशी करून झाली.

एक गोष्ट कळत नाही.जर नायब राज्यपालच सर्वेसर्वा असतील तर शीला दिक्षित दिल्लीमध्ये मोठे रस्ते, फ्लाय-ओव्हर इत्यादी कशा काय बांधू शकल्या? कोर्टाचा आदेश काय आहे हे बघायला हवे पण असे दिसते की दिल्लीचे नायब राज्यपाल राज्य सरकारचे प्रस्ताव 'व्हेटो' करू शकतात (जो अधिकार इतर राज्यांच्या राज्यपालांना नसतो).असो. जे काही असेल ते. टाईम्स नाऊ मध्यल्या त्याच कार्यक्रमात पूर्वाश्रमीच्या आआपच्या आणि सध्या भाजपत असलेल्या शाझिया इल्मी म्हणत होत्या की दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे चांगले ३००० कोटींचे बजेट आहे.मग त्या बजेटचा वापर करून यांना चिकनगुनियाविषयी काहीही करता आले नाही?

दिल्ली मनपांचा कारभार भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे हे अगदी जगजाहीर आहे.अशावेळी दिल्लीतल्या ३ मनपा काम करत नसतील तर ते काम दिल्ली राज्य सरकारला करून त्या मनपांना आणि भाजपला तोंडघशी पाडायची अगदी उत्तम संधी होती.आपले युगपुरूष दिल्लीबाहेर काहीही कुठेही झाले तरी तिथे धाव मारतात.मग ती दादरीची घटना असो की रोहित वेमुलाची आत्महत्या असो. पुण्यातल्या एफ.टी.आय.आय ला दिल्लीमध्ये जागा द्यायची तयारी होती त्यांची.म्हणजे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या अनेक गोष्टींमध्येही नाक खुपसणारे हे युगपुरूष शहरात फॉगिंग करून डेंग्युचे डास उत्पन्न होणार नाहीत या त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या (पण दिल्ली मनपांच्या अधिकारक्षेत्रातील) गोष्टीपासून मात्र दूरच राहिले.भाजपवर डाव उलटवायची नामी संधी त्यांनी घालवली नाही का? असो.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी तर अगदीच कहर केला.पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर यांचा पारा चढला आणि म्हणे त्यांनी हातातला फोनच भिरकावला.बरं ही साथ सुरू होण्यापूर्वी हे कुठे होते?तर गोव्यातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची व्यवस्था बघायला तिकडे गेले होते.आपले युगपुरूष त्यावेळी पंजाबमध्ये प्रचार करायला आणि नंतर ऑपरेशनसाठी बंगलोरला गेलेले होते.अन्य एक मंत्री हाजसाठी सौदी अरेबियाला गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कुठे होते तर फिनलंडमध्ये. काय करायला ते तिकडे गेले आहेत? तर फिनिश शिक्षणव्यवस्था जगात सर्वोत्तम आहे आणि त्या पध्दतीच्या शाळा दिल्लीत आणायच्या या उद्देशाने त्या व्यवस्थेचा अभ्यास करायला तिकडे गेलेले आहेत. एकीकडे म्हणायचे की १० रूपयाचे पेन घ्यायचाही अधिकार दिल्ली सरकारला नाही आणि दुसरीकडे त्या शाळांचा अभ्यास करायला फिनलंडला जायचे? म्हणजे तशा शाळा सुरू करायचा अधिकार यांना आहे का या प्रश्नाचे उत्तर आधी शोधून ठेवले आहे का?की करदात्यांच्या पैशावर एक जीवाचे ब्राझील झालेच आहे तसे दुसरे जीवाचे फिनलंडही होऊन जाऊ द्या!!म्हणजे दिल्लीमध्ये साथ आलेली असताना दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचाच शहरात पत्ता नव्हता.आता परत नायब राज्यपालही न्यू यॉर्कमध्ये होते ते का विचारत नाही हे केजरूच्या गुलामांनी म्हणूनही झाले. पण प्रश्न असा आहे की आम्ही सोडून इतर सगळे चोर आहेत, भ्रष्ट आहेत, अमक्यातमक्याचे एजंट आहेत असली बकवास यांनीच करून ठेवली होती.त्यामुळे जनतेच्या यांच्यापासूनच्या अपेक्षांची पातळी वाढली तर त्यांनी इतरांकडे बोट दाखवून उपयोग नाही.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे म्हणणे की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही.हे त्यांनी एकदा म्हटले.आणि त्यावर गदारोळ झाल्यावर परत "गुगल म्हणते की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही" असेही हास्यास्पद विधान केले.

एकूणच काय की हे आआपवाले प्रचंड माजले आहेत.मिळालेल्या ७० पैकी ६७ जागांची हवा यांच्या डोक्यात शिरली आहे आणि दिल्लीच्या मतदारांना हे गृहित धरू लागले आहेत.अशा माजोरड्यांचे विमान कधीनाकधी जोरदार आपटतेच. या आआपवाल्यांचे विमानही लवकरात लवकर आपटू दे हीच सदीच्छा.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा फिनलंडमधील शाळांचा अभ्यास अगदीच जोरदार चालू आहे असे दिसते:

S

दिल्ली सरकारने आपल्या लोकांची सोय लावायला दिल्ली डायलॉग कमिशन म्हणून एक प्रकार चालू केला आहे. त्याचेच प्रमुख म्हणून आशिष खेतानची नियुक्ती झाली आहे. चीनमध्ये डेंग्युच्या डासांचा बंदोबस्त कसा केला गेला याचा अभ्यास करायला हा मनुष्य मागच्या वर्षी चीनलाही जाऊन आला. या दौर्‍यासाठी करदात्यांचे पैसे खर्च झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले हा प्रश्न विचारायला बंदी का?

बाकी काही म्हणा खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते राव!!

गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...?

मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा.

या न्यायाने मोदी ढोल वाजवताना किंवा तेथील कलाकारांची कला बघतानाचा वेळ वाया गेला असे समजायचे का? आपण हाफिसात १००% वेळ कामातच घालवतो का? ब्रेक, विरंगुळा, पूल खेळणे वगैरे कधी ना कधी करतोच ना..?

असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!

गॅरी ट्रुमन's picture

16 Sep 2016 - 7:29 pm | गॅरी ट्रुमन

गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...?

अहो जुनी सवय आहे ती माझी. मी एखाद्याच्या मागे लागलो की काहीही झाले तरी सोडत नाही. म्हणूनच कधीकधी वाटते की मी कधी भूतबित झालो आणि कुणाच्या मानगुटीवर बसलो तर त्या माणसाची खैर नाही :)

मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा.

जे मिपावर इतर कुठलाही लेख/प्रतिसाद लिहून सिध्द करायचे असते तेच :)

असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!

काय उथळ आणि काय खोल हे व्यक्तिपरत्वे बदलेल. तरीही सूचनेबद्दल आभारी आहे.

मोदक's picture

16 Sep 2016 - 8:09 pm | मोदक

धन्यवाद :)

संदीप डांगे's picture

16 Sep 2016 - 8:34 pm | संदीप डांगे

When you loose balance, you loose credibility too!

बाकी ट्रुमन/क्लिंटन साहेबांची मर्जी!

मोदक's picture

16 Sep 2016 - 8:42 pm | मोदक

त्ये Lose हाये वो.. Loose न्हाई.

संदीप डांगे's picture

16 Sep 2016 - 8:52 pm | संदीप डांगे

आजकाल टायपो फार व्हाइलेत! ;))

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 10:01 am | गॅरी ट्रुमन

When you loose balance, you loose credibility too!

छे हो असे काही होत नसते. तुम्ही स्वतः चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या अश्लाघ्य घटनेचे एका अर्थी समर्थन केलेत तरी तुमची क्रेडिबिलिटी कुठे कमी झाली? उलट तुमच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसतच आहे की :)

तर्राट जोकर's picture

17 Sep 2016 - 4:31 pm | तर्राट जोकर

क्लिन्टन = इन्वर्टेड टार्झन?

ईश्वरसर्वसाक्षी's picture

17 Sep 2016 - 4:43 pm | ईश्वरसर्वसाक्षी

खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते
राव!!
मुझे तो सब आप वालो के चेहरे एक जैसे हि लगते है

ईश्वरसर्वसाक्षी's picture

17 Sep 2016 - 4:54 pm | ईश्वरसर्वसाक्षी

का हो गजोधरवा तुमका खाट मीली का नाही ?
उधर यूपी मा कॉंग्रेस ई कहके खाट पंचायत मा
लोगन को बुलाती है का भया आव पपु का कॉमेडी शो भी देखने को मीलेगा और जाते समय खाट भी मीलेगी

मरण पावलेल्यांसाठी आअापने मोर्चा काढला होता. उरीमध्ये आपल्याच देशाचे सैनिक शहीद झालेत. अजून एकही आआप
नेता/कार्यकर्ता मोर्चा काढणं तर सोडाच, प्रतिक्रियाही देत नाहीये. निदान गाझामध्ये जाऊन तरी मोर्चा काढा राव!

महामहीम मूर्खमंत्री श्री ४२० अरविंद खुजलीवाल यानी आज आपल्या आत्तापर्यंत केलेल्या सर्व गाढवपणावर कळस केला.

आज या मूर्खमंत्र्याने उरी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर भारत पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय कोंडी करू पहात असताना कुठल्यातरी एका भिकार लेखाआधारे भारताचीच आंतरराष्ट्रीय कोंडी कशी होत आहे ( परिणामी पाकिस्तान कसा वरचढ ठरत आहे ) असे सिद्ध करणारे ट्विट केले .

मोदींविरुद्ध बोलण्याच्या नादात (किंवा त्यांचे प्रयत्न कमी पडले असे उगीचच दाखवण्याच्या नादात) आपण स्वताच्याच देशाची प्रतिमा लीन करत आहोत इतकेही भान आता या मूर्खमंत्र्यास राहिलेले नाही. माझ्या वैयक्तिक मतानुसार या माणसास एखाद्या चांगल्या समुपदेशनाची गरज आहे असे वाटते . ( तसेही ते विपश्यना करून आले पण त्यानंतरही यांचे वागणे पाहता लोकांचा विपश्यनेवरचाच विश्वास उडाला !)

असल्या लोकांना मतेच काय पण भर चौकात ... असो.

निर्लज्ज नेते , नालायक पार्टी आणि निर्बुद्ध समर्थक असेच यांचे वर्णन करावे लागेल.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 7:37 am | संदीप डांगे

2014 च्या आधीसुद्धा एक मुख्यमंत्री बहुधा अशीच पंतप्रधानांची येत जाता खेचायचा! हि प्रवृत्ती राष्ट्रीय आहे की काय?

तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

आज या मूर्खमंत्र्याने उरी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर भारत पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय कोंडी करू पहात असताना कुठल्यातरी एका भिकार लेखाआधारे भारताचीच आंतरराष्ट्रीय कोंडी कशी होत आहे ( परिणामी पाकिस्तान कसा वरचढ ठरत आहे ) असे सिद्ध करणारे ट्विट केले . हे नीट वाचलेत का ??

येथे प्रश्न पंतप्रधानांविरुद्ध बोलण्याचा नसून एक जबाबदार मुख्यमंत्री आपल्याच देशाची उगीचच नाचक्की करत आहे याचा आहे.

थोडे विचार करून लिहीत चला . प्रत्येक धाग्यावर त्यात मांडलेल्या मताविरुद्ध बोलले कि लोक तुम्हाला शहाणे ठरवतात असे नसते.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 9:27 am | संदीप डांगे

"लोक आपल्याला शहाणे ठरवतात का मूर्ख" हा व एवढाच विचार अर्धवट बुद्धीच्या लोकांना येतो. असो.

इथे फक्त मोदी-विरोधी केजरीवाल बरळतोय म्हणून आकांततांडव केला जात आहे ह्या धाग्यावर हे जगजाहिर आहे. त्याबद्दल सुज्ञ सदस्यांनी थोडा विचार केलात तर आपण मूर्ख समजले जाऊ अशी काही चिंता सतावत आहे की काय?

केजरीवाल काय ट्विट करतो, कुठे जातो, काय बोलतो हे बघत बसायला, त्याबद्दल जिथेतिथे जाऊन बोंबाबोंब करत बसायला लोकांना एवढा वेळ कसा काय मिळतो ह्याबद्दल मात्र माझ्या अतिशाहाण्या मेंदूला फार आश्चर्य वाटत आले आहे. 'अरविंद-मोदीविरोधी-केजरीवाल' बद्दल भक्तलोकांचा कायतरी सॉलिड केमिकल लोचा झालेला आहे. विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. अभिनंदन!!

आणि हो, केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.

-संदीप डांगे (अतिशाहाणा मिपाकर)

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 9:35 am | सुबोध खरे

डांगे अण्णा
श्री केजरीवाल हे "दिल्लीचे मुख्यमंत्री" आहेत जी भारताची "राजधानी" आहे. त्यांनी इतर वक्तव्ये केली तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला कमीपणा आणणारे वक्तव्य टाळले तर जास्त चांगले होईल. उगाच प्रसिद्धीत राहण्यासाठी सवंग वक्तव्य न करणे हि या क्षणाची गरज असताना असे वक्तव्य केले तर त्याला आपली प्रसार माध्यमे अवास्तव प्रसिद्धी देतात. त्यामुळे ते "काय म्हणाले" यासाठी खोदकाम करायची गरज नाही.
विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे.
म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 9:38 am | संदीप डांगे

म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"

>> हाय हाय डॉक्टरसाहेब, तुम्ही शहाणे नाही ह्याचं फार वैट वाटतंय बॉ म्या अतिशाहाण्याला.. =))

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 9:40 am | सुबोध खरे

जाऊ द्या हो
आम्ही थोडेसे "ढ" च आहोत. काय करणार?

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 9:48 am | संदीप डांगे

नै हो, आणि एका गोष्टीची अपरंपार भीती वाटली ती ही की एका देशाच्या राजधानीच्या पदस्थ मुख्यमंत्र्याला 'टिनपाट' म्हटले तर मी अतिशाहाणा आता रोष ओढवून घेणार की काय?

श्री केजरीवाल हे "दिल्लीचे मुख्यमंत्री" आहेत जी भारताची "राजधानी" आहे.

काय की इकडे आड, तिकडे व्हिर झाली आहे - मोदीभक्तांची हो! (हे फक्त शहाण्यांना कळेल) ;) =))

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 9:53 am | सुबोध खरे

अनाठायी आणि अवांछित वक्तव्य करण्यात श्री मार्कंडेय काटजू आणि श्री केजरीवाल यांची चढाओढ लागली आहे काय असे वाटू लागले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 9:55 am | गॅरी ट्रुमन

विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. अभिनंदन!!

या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!

आणि हो, केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.

म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 10:07 am | संदीप डांगे

या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!

ओ माय माय!!

म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.

केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अ‍ॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै, केजरीवालचे लाखो फॉलोअर आहेत? अरेवा! म्हणजे माणूस दमदार असला पाहिजे नै? मला नै माहित कारण मी टिनपाट माणसांना फॉलो करत बसून माझी ट्विटफीड फालतू ट्विट्सने भरत बसण्यात इण्टरेस्ट नै. इतरांना असा काय इन्टरेस्ट असतो ह्याबद्दल मात्र कुतूहल आहे.

बाकी बचा मिपाका स्वाल! तर केजरीमहोदयांच्या ट्विटबद्दल समस्त सोशलमिडियावर दणादण प्रसिद्धी सुरु आहे, ही प्रसिद्धी करणारे खुद्द नामांकित भक्त लोक्स आहेत. केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. त्यातलेच एक मिसळपाव हे ४००-५०० सदस्यांचे संस्थळ.

लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत. पण असोच!

बाकी सुज्ञांसि काय सांगणे!

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 10:14 am | गॅरी ट्रुमन

केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अ‍ॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै,

का? एखाद्या माणसाला विरोध करायचा त्यासाठी तो माणूस नक्की काय मते ठेऊन आहे हे बघणे गरजेचे नाही का?ट्विटरवर फॉलो केले की आपल्या फिडमध्ये त्या माणसाचे ट्विट दिसतात त्यामुळे तो काय म्हणत आहे हे त्या ट्विटर अकाऊंटवर न जाताही दिसते. असो.

केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत.

म्हणजे ते सगळे कोट्यावधी लोक केजरीवालचे समर्थक बनणार का? काही कुंपणावरील लोक असतील तर त्यांच्यापर्यंतही केजरीवाल म्हणजे नक्की काय चीज आहे हे पोहोचावे या उद्देशाने कशावरून हा टिवटिवाट शेअर केला जात नसेल?

लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत.

देशाच्या इभ्रतीला केजरीवालमुळे धक्का बसणार नाही हो. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी फुकटात मिळत असतील तर त्या माणसाला डोक्यावर घ्यायची फार वाईट सवय अनेकांना असते. दिल्लीतल्या मतदारांनी ते दाखवून दिलेही आहे. इतका सावळागोंधळ घालूनही केजरीवाल समर्थक अजूनही आहेतच.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.

बाकी सूज्ञांस सांगणे न लागे.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 10:26 am | संदीप डांगे

राजदिप सरदेसाई, बरखा दत्त, तत्सम पत्रकार हे आपले आदर्श नसावेत?

.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.

परत दोन गोष्टी: एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे. दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे. आय अ‍ॅम स्टिल नॉट गेटिंग द कोअर ऑफ धिस केजरीहेटींग. त्यामुळे आता गॄहपाठ करणे आले.

स्वाध्याय:
१. आपच्या स्थापने आधी व नंतर केजरीसमर्थकांची संख्या किती होती ते शोधा.
२. दिल्लीत दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याआधी व नंतरची केजरीसमर्थकांची संख्या कीती ते शोधा.
३. केजरीवाल प्रभावशाली आहे की नाही हे शोधा.
४. केजरीवाल धोकादायक आहे म्हणजे काय ते शोधा.

लै अभ्यास आहे, क्लिंटन-ट्रुमन राव. मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 10:35 am | गॅरी ट्रुमन

एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे.

हा माणूस मोदीविरोधक आहे आणि धोकादायक आहे हे मी म्हटले आहे. याचा अर्थ हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे असा अर्थ कोणी काढत असेल तर मात्र नाइलाज आहे.

दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे.

नक्कीच.

मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!

रामराम. मी कधी तुमच्यावर प्रतिसाद द्यायची सक्ती केली होती?

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

केजरीवाल काय ट्विट करतो, कुठे जातो, काय बोलतो हे बघत बसायला, त्याबद्दल जिथेतिथे जाऊन बोंबाबोंब करत बसायला लोकांना एवढा वेळ कसा काय मिळतो ह्याबद्दल मात्र माझ्या अतिशाहाण्या मेंदूला फार आश्चर्य वाटत आले आहे.

असाच प्रश्न तुमच्या मेगाबायटी प्रतिसादांविषयी इतर मिपाकर मनातल्या मनात विचारत असतीलच की!! काय म्हणता?

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 10:12 am | संदीप डांगे

निदान माझे मेगाबायटी टिनपाट लोकांबद्दल विनाकारण लिहीत बसून त्यांना विनाकारण प्रसिद्धी देण्यात खर्च होत नाहीत ह्याबद्दल इतर मिपाकर मनातल्या मनात विचार करत असतील तरच ते शहाणे, अन्यथा मूर्खांना तोटा नाही. काय म्हणता?

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 10:43 am | संदीप डांगे

क्लिंटन:

या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!

डॉक्टरसाहेब :

म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"

आपण दोघेही ह्याच धाग्यावरच्या माझ्या प्रतिसादांना विसरला असाल असे वाटले नव्हते. असो, आठवण करुन देण्याचे पातक करत आहे.

http://misalpav.com/comment/683163#comment-683163

इथून पुढे माझा ह्या धाग्यावरचा प्रत्येक प्रतिसाद वाचून घेऊ शकता.

बाकी तुम्हा दोघांच्या वर निर्दिष्ट केलेल्या वाक्यांमधून एक वृत्ती स्पष्ट दिसत आहे. ती काय आहे ह्याचा विचार करावा ही तुम्हा दोघा दिग्गजांना नम्र विनंती.

शाम भागवत's picture

29 Sep 2016 - 11:50 am | शाम भागवत

भारतात दोन विद्वान माणसे एकमेकांशी नेहमी असे प्रेमात का बरे बोलत असतात?????

एक जपानी राजदूत आपली भारतातील मुदत संपवून जपानला परत जात होता. त्याला निरोप समारंभात विचारले गेले की,
"भारतीय माणूस व जपानी माणूस या दोघांमधे तुम्हाला कोणता फरक जाणवला?"

तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "एकटा भारतीय माणूस हा हिरो असतो तर जपानी असतो झिरो. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा भारतीय होतात झिरो आणि जपानी बनतात हिरो."

अनुप ढेरे's picture

29 Sep 2016 - 12:09 pm | अनुप ढेरे

युगपुरूषजी उद्या फार मोठं स्क्यांडल प्रसिद्ध करणार आहेत म्हणे.

इथे फक्त मोदी-विरोधी केजरीवाल बरळतोय म्हणून आकांततांडव केला जात आहे >>

असे नसून मोदी विरोधात हा माणूस इतका वाहवत गेला आहे कि स्वतःच्या देशाविरुद्ध आपण बोलत आहोत इतकेही भान याला राहिले नाही. हा ह्याचा दुतोंडीपणा आणि विद्वेष जगासमोर आणणे हे त्या ट्विट ला प्रसिद्धी देण्याचे कारण आहे.
आपल्याला उठसूट भक्त , मोदी विरोध केल्याने भक्त पिसाळले वगैरे असले बरळण्याने मजा वाटते का ? पण भक्त वगैरे म्हणावे असे काहीच कुणाच्या कुठल्याही पोस्ट मध्ये मला तरी दिसत नाही. केजरीवाल कसा चुकीचा आहे हे दाखवले म्हणजे लगेच सगळे भक्त ? म्हणून म्हणतो नीट विचार करून मग उत्तर देत चला .

बाकी आपण म्हणता तसे केजरीवाल टिनपाट असला तरी तो एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यामंत्री आहे त्यामुळे त्याच्या या देशविरोधी ट्विट ला महत्व येते. गल्लीतील पोराने ट्विट करणे व एका (जबाबदार ?) मुख्यमंत्र्याने ट्विट करणे यात फरक नक्कीच आहे . हाच केजरीवाल चा खरा चेहेरा लोकांसमोर आणायचा आहे म्हणून हा प्रयत्न.
.. आणि हो त्यांनी काय ट्विट केले हे बघायला मुद्दाम वेळ काढावा लागत नाही किंवा त्यासाठी "भक्त" असण्याची गरज नाही. कदाचित आपण ट्विटर वापरात नसाल किंवा दिवसात बातम्या वाचत नसाल . आपल्या स्वताच्या या अज्ञानामुळे ज्यांना अरविंद काय ट्विट करतो हे माहित आहे व ते इथे मांडतात ते लगेच भक्त होत नाहीत. आधी स्वतःचे अज्ञान दूर करा.

केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.>>>

ख्या ख्या ख्या . . भीती या ? या ट्विट मुळे श्री ४२० यांचा मूर्खपणा व ते किती खालच्या पातळी चा विचार करतात हे सर्वाना दाखवणे हा मूळ उद्देश होता. आपण भक्त भक्त वगैरे बरळण्याच्या नादात दुसरीकडेच वहावत गेला की .

असो. भारतात कोणीही कुठल्याही पक्षाचे समर्थक असावे त्यांच्याशी किमान चर्चा होऊ शकते पण 'आप' या पार्टीचे कोणी समर्थन करत असेल तर त्याला तिथल्या तिथे हणलाच पाहिजे ( शाब्दिक हा ) असे माझे वैयक्तिक मत. कारण या पक्षाचे नेते, वाटचाल व एकंदर विचारधारा पाहता संपूर्ण देशासाठीच हा पक्ष अत्यंत धोकादायक आहे असे मला वाटते. ( आणि हो .. हे केजरीवाल केवळ मोदींविरोधात बोलतो म्हणून बनलेले मत नाही. नाहीतर याल पुन्हा भक्त भक्त वगैरे करत . )

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 1:14 pm | संदीप डांगे

मनोरंजक प्रतिसाद! अजून येऊ द्या...! ;)

सुज्ञ's picture

29 Sep 2016 - 2:25 pm | सुज्ञ

येतील येतील धीर धरा . :o

गॅरी ट्रुमन's picture

29 Sep 2016 - 1:35 pm | गॅरी ट्रुमन

जबराट प्रतिसाद. शब्दाशब्दाशी सहमत.

भारतात कोणीही कुठल्याही पक्षाचे समर्थक असावे त्यांच्याशी किमान चर्चा होऊ शकते पण 'आप' या पार्टीचे कोणी समर्थन करत असेल तर त्याला तिथल्या तिथे हणलाच पाहिजे ( शाब्दिक हा ) असे माझे वैयक्तिक मत.

माझेही अगदी असेच मत आहे.

यश राज's picture

29 Sep 2016 - 3:51 pm | यश राज

+११११११११११११११११११११११११११

शलभ's picture

29 Sep 2016 - 1:50 pm | शलभ

+१
सहमत

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2016 - 2:03 pm | प्रसाद_१९८२

जबरदस्त प्रतिसाद.

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी

क्लिंटन उपाख्य गॅरी गॅरी ट्रुमन,

केजरीवालांच्या कारकीर्दीचे ६० पैकी २० महिने संपण्याच्या आतच या धाग्यावर जवळपास ८२५ प्रतिसाद आले आहेत. केजरीवालांच्या कारकीर्दीचे संपूर्ण ६० महिने पूर्ण होतील तेव्हा या धाग्यातील प्रतिसादांची संख्या २५०० हून अधिक होऊन एक नवा विश्वविक्रम होईल. हे कार्य सिद्धीस नेण्यास श्री केजरीवाल समर्थ आहेतच. लवकरात लवकर विश्वविक्रम होण्यासाठी आम्हीदेखील खारीचा वाटा उचलू असे आम्ही आश्वासन देतो.

अवांतर - केजरीवाल जे काही मह्णतात त्याला आता आआपचे नेते सोडले तर इतर कोणी गांभिर्याने घेत असेल असे वाटत नाही. आआपचे फारसे नेतेदेखील आता केजरीवालांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करीत असावेत. पूर्वी केजरीवालांनी काहीही ट्विट केले की लगेच आशुतोष, संजय सिंह इ. वाचाळ मंडळी पत्रकार परीषद घेऊन त्यात तिखटमीठ ओतायचे. आता असे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 5:35 pm | संदीप डांगे

अतिशय तीव्र सहमत...

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 9:15 am | बोका-ए-आझम

केजरीवाल आणि इतर जण (राहुल गांधी वगैरे) रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर लगेच हैदराबादला धावले होते. सरकारला दलितविरोधी वगैरे शिव्या घालून झाल्या, स्मृती इराणींना मनुस्मृती इराणी वगैरे नावं ठेवून झाली. मिपावरच्या आॅरगॅझ्मिक अाणि विवेकवादी विचारवंतांनी थयथयाट करुन झाला (त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली ते सोडा). पण त्या सगळ्यांचा फुगा आता फुटला आहे.
Rohith Vemula's mother faked Dalit status: Panel
http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/Rohith-Vemulas-mother-... via @timesofindia

न्यायमूर्ती अशोक रुपनवल आयोगाने रोहित वेमुलाच्या आईने दलित असल्याचा खोटा दावा केला हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि बाकीही बरेच फुगे फोडले आहेत. ते लोक्स वाचतीलच. पण केजरीवाल पुन्हा एकदा तोंडघशी पडल्यामुळे आज आनंद मनात माझ्या माईना अशी अवस्था आहे.

वेडा बेडूक's picture

22 Mar 2024 - 1:14 pm | वेडा बेडूक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Mar 2024 - 3:50 pm | अमरेंद्र बाहुबली

भीती असावी एखाद्याची पण किती??

मुक्त विहारि's picture

22 Mar 2024 - 4:07 pm | मुक्त विहारि

खुद्द न्यायालये देखील, CBI आणि ED ला पाठिंबा देत आहेत...

कर नाही तर डर कशाला?

बाय द वे,

केजरीवालांवर नक्की आरोप तरी काय आहेत?

अहिरावण's picture

22 Mar 2024 - 6:55 pm | अहिरावण

भ्रस्टाचार

Anna Hazare on Kejriwal: 'मुझे बहुत दुख है...', CM केजरीवाल की गिरफ्तारी पर अन्ना हजारे का आया बयान

https://www.jagran.com/politics/national-arvind-kejriwal-news-anna-hazar...

--------
मेरी बात नहीं सुनी...
अन्ना ने आगे कहा कि मैंने केजरीवाल को शराब नीति को लेकर दो बार चिट्ठी तक लिखी, लेकिन उन्होंने मेरी एक नहीं मानी। अन्ना ने कहा कि मेरी बात नहीं मानने का ही ये नतीजा है कि आज केजरीवाल गिरफ्तार हो गए हैं। उन्होंने कहा कि जब मेरे साथ मनीष सिसोदिया और केजरीवाल काम करते थे, तो उन्हें हमेशा कहता था कि जनता की भलाई ही हमारा काम है, लेकिन आज दोनों ने मेरी बात नहीं मानी।

सुशिक्षितांनी राजकारणात उतरायला हवे असे नेहमी म्हटले जाते.

केजरीवाल सारख्या शिक्षिताचा राजकारण प्रवेश झाला तेव्हा आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु सत्ता आणि अबसोल्युट सत्ता प्राप्त झाल्यावरचे कारनामे पाहता निराशाच पदरी पडली.

“Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely” 

अहिरावण's picture

23 Mar 2024 - 10:43 am | अहिरावण

राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध कधीही नसतो, नाही.

फक्त भाबडे लोक असा विचार करतात.