केजरूके गुलाम

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
31 Mar 2015 - 9:50 pm
गाभा: 

जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.

सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.

पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?

मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.

असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.

केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.

नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.

प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.

हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.

अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.

या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).

या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 2:30 pm | श्रीगुरुजी

अजित पवारही निश्चितच अडकणार आहेत. प्रत्यक्ष चौकशीला आले किंवा पत्राने उत्तरे दिली तरी फरक पडत नाही. राष्ट्रवादीशी साटंलोटं म्हणताना भुजबळांचे नाव २ घोटाळ्यात आरोपी म्हणून नक्की झाले आहे. हळुहळू राष्ट्रवादीचे इतर नेतेही अडकणार हे निश्चित.

कपिलमुनी's picture

12 Jun 2015 - 2:59 pm | कपिलमुनी

अजित पवारांनाच भुजबळ नको आहेत :)

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 3:05 pm | श्रीगुरुजी

त्याने काय फरक पडतो?

तसं पाहिलं तर थोरल्या चुलत्यांनाही अजित पवार नकोसे आहेत!

होबासराव's picture

12 Jun 2015 - 3:13 pm | होबासराव

थोडी दुरुस्ती, अनंतराव पवार शरद पवारांचे थोरले बंधु.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 8:07 pm | श्रीगुरुजी

थोरले म्हणजे वरीष्ठ या अर्थाने मला सांगायचे होते.

होबासराव's picture

12 Jun 2015 - 1:13 pm | होबासराव

अजित पवारांचि चौकशी होइल आणि त्यांना तुरुंगवास होइल हि अपेक्षाच भाबडि होति, सेम फॉर शिला दिक्षित. एवढे सोपे नसते हे मान्य, भाजपा एम्.सि.ए. च्या निवडणुकित सुद्धा राष्ट्रवादि बरोबर आहे. ह्या तडजोडि भाजपा ने करायला नको होत्या. दिलेला शब्द फिरवण्या सारखे आहे हे.

कपिलमुनी's picture

12 Jun 2015 - 1:40 pm | कपिलमुनी

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे

राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या उभारणीतील गैरव्यवहारांचे बैलगाडी भरून पुरावे भाजप सोमवारी (२१ ऑक्टोबर) माधवराव चितळे समितीसमोर सादर करणार आहे. त्यासाठी कांचनवाडीपासून 'वाल्मी'पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. 'या गैरव्यवहारांशी संबंधित आम्ही सादर करीत असलेले पुरावे पुरेसे आहेत. मात्र, आणखी पुरावे देण्यासाठी समितीकडे पंधरा दिवसांचा वेळ मागण्यात येणार आहे,' असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 'मटा'शी सांगितले.

स्पार्टाकस's picture

12 Jun 2015 - 11:21 pm | स्पार्टाकस

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस?

फडणवीस मुख्यमंत्री आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत.

कपिलमुनी's picture

12 Jun 2015 - 11:54 pm | कपिलमुनी

दुवा वाचावा ही विनंती

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 2:37 pm | श्रीगुरुजी

देशपातळीवरील किंवा राज्यपातळीवरील पक्षीय समीकरणे जशीच्या तशी नगरपालिका, एम सी ए इ. ठिकाणी कायम राहतीलच असे नसते. एम सी ए पातळीवर शरद पवार + मनोहर जोशी, शरद पवार + विलासराव देशमुख इ. समीकरणे भूतकाळात जमलेली होती. नगरपालिका पातळीवर राकाँ + शिवसेना + भाजप, मनसे + भाजप, मनसे + राष्ट्रवादी, मनसे + काँग्रेस इ. समीकरणे अस्तित्वात आहेत.

त्यामुळे भाजप एम सी ए च्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आहे यातून जास्त काही अर्थ निघत नाही.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 8:12 pm | श्रीगुरुजी

भाजप हळुहळू राष्ट्रवादीला खच्ची करीत आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे, परंतु काही महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने पुणे शहर विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेऊन वेगळे PMRDA स्थापन केले आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपने राष्ट्रवादीला भगदाड पाडले आहे. या दोन्ही महानगरपालिका अजित पवारांच्या वर्चस्वाखाली आहेत.

कपिलमुनी's picture

12 Jun 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

वाल्मी (वॉटर अॅण्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट)

सतिश गावडे's picture

12 Jun 2015 - 8:20 pm | सतिश गावडे

या धाग्याने आणि त्यावरील प्रतिसादांनी सामान्य माणसाच्या राजकीय ज्ञानात नक्कीच वाढ होईल. :)

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2015 - 2:57 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल म्हणतात माझीच **

https://youtu.be/F3aup2aqwJU

मोदीन्च्या राज्यात अच्छे दिन आले का नाही याविषयी मतमतान्तरे असू शकतील. परन्तु केजरीवालान्च्या राज्यात समस्त पतीदेवान्ना अत्यन्त अच्छे दिन आले आहेत हे नक्की, कारण केजरीवालान्च्या राज्यात गृहिणीच सर्व कामे करतात आणि पतीदेव मस्तपैकी सोफ्यावर आरामात रेलून वर्तमानपत्र वाचत किन्वा टीव्ही बघत निवान्त असतात. बसल्या जागीच त्यान्च्यासमोर भरलेले ताट येते. त्यान्ना काही काम करायची गरजच नाही.

सुधीर काळे's picture

24 Jun 2015 - 4:45 am | सुधीर काळे

क्लिंटन, खूप दिवसांनी मिपावर आलो आणि तुझे नांव पाहून तुझा लेख वाचला! वा, वा, वा! तू सुरेख लेख तर लिहिला आहेसच व त्याहून सुरेख तू आपल्या विधानांचा बचाव केला आहेस!
मी खरे तर ’केजरू’च्या अंदाजपत्रकाची वाट पहात आहे. "पैशाचे सोंग आणता न ये" हे पुन्हा एकदा मला पहायचे आहे!

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2015 - 1:31 pm | श्रीगुरुजी

दिल्लीचे अन्दाजपत्रक ही फारच किरकोळ व बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. केजरीवाल मुख्यमन्त्री होऊन जेमतेम साडेचार महिने झालेत. इतक्या दिवसात ते इतर अत्यन्त महत्त्वाच्या कामात गर्क होते.

पक्षान्तर्गत विरोधकान्ना बाऊन्सर्सकरवी धोपटून काढून पक्षातून हाकलणे, गजेन्द्र सारख्या शेतकर्‍यान्ना दिल्लीला बोलावून आत्महत्या करायला लावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करणे, केन्द्र सरकार/राजनाथ सिन्ह/मोदी/उपराज्यपाल यान्च्याशी कुस्ती खेळणे, स्वपक्षातील गुन्हेगारान्चा बचाव करणे, सचिवान्च्या कार्यालयाला कुलुप लावणे, नावडते सचिव महाभ्रष्टाचारी आहेत असे जाहीर खोटे आरोप करणे, सचिवान्च्या बदल्या करणे, दूरदर्शनवर स्वतःच्या मोठमोठ्या जाहिराती करणे, दिल्लीत मोदी आणिबाणी आणणार आहेत असा कान्गावा करणे . . . या व अशा अनेक महत्त्वाच्या कामात ते गर्क आहेत.

त्यामुळे दिल्लीचे अन्दाजपत्रक मान्डणे, सफाई कामगारान्चा अनेक महिने थकलेला पगार देणे, दिल्लीतील वीज व पाणी टन्चाईवर उपाय काढणे अशा किरकोळ प्रश्नान्कडे लक्ष देण्यास ते आपला अमूल्य वेळ खर्च करू इच्छित नाहीत.

क्लिंटन, एक मुद्दा राहून गेलाय् तुझ्या लेखात! दिल्ली विधानसभेच्या दुसर्या निवडणुकीत भाजपाला पहिल्या निवडणुकीत मिळाली होती जवळ-जवळ तितकीच मते मिळाली. ’आआप’ला कॉन्ग्रेसची मते मिळाली म्हणून त्याचे ६७ उमेदवार निवडून आले व कॉन्ग्रेसची सफाई झाली! भाजपाच्या लोकप्रियतेत कांहींच फरक पडला नव्हता!

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2015 - 1:34 pm | श्रीगुरुजी

हे बरोबर आहे. फरक इतकाच आहे की आआपला कॉन्ग्रेसची मते मिळाली नसून भाजपला अपशकुन करण्यासाठी कॉन्ग्रेसने आपली स्वतःची मते आआपकडे वळविली होती. या निवडणुकीत भाजपच्या मतात फक्त १.५ % इतकी घट होऊन ३२% मते मिळाली, पण कॉन्ग्रेसच्या मतात तब्बल १५ % घट होऊन कॉन्ग्रेसला जेमतेम ९% मते मिळाली होती.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 2:35 pm | कपिलमुनी

मान गये !
मोदी निवडून यावे म्हणून पण काँग्रेसने मत भाजपाकडे वळवली का ?
आणि अशी सगळी मते वळवता येतात ?
काँग्रेस आणि भाजपा यापेक्षा दिल्ली मतदारांना आप आपलासा वाटला आणि त्यामुळे पराभव झाला .
हे स्पष्ट मान्य करा की ! गिरे तो टांग उप्पर किती दिवस

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Jun 2015 - 4:22 pm | पुण्याचे वटवाघूळ

काँग्रेस आणि भाजपा यापेक्षा दिल्ली मतदारांना आप आपलासा वाटला आणि त्यामुळे पराभव झाला .

त्याचप्रमाणे देशातील मतदारांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना कौल दिला हे तुम्ही पण मान्य करायला हवे. जर का मोदींच्या 'फेकुपणामुळे' लोकसभेत इतके यश मिळाले असे तुम्ही म्हणत असाल तर केजरीवालने सगळे काही फुकट द्यायचे आश्वासन दिले हा फेकुपणा केला असे इतर लोक म्ह्नणारच.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 4:28 pm | कपिलमुनी

जनतेने मोदींना कौल नक्कीच दिला आहे !

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2015 - 12:17 pm | श्रीगुरुजी

ह्या लेखात काँग्रेसने भाजपचा पराभव करण्यासाठी आपली दिल्लीतील मते आआपकडे कशी वळविली याविषयी सविस्तर विवेचन आहे. ते पुन्हा लिहित नाही.

कपिलमुनी's picture

25 Jun 2015 - 12:39 pm | कपिलमुनी

त्या लेखात काँग्रेसने मते कशी वळवली याचे विवेचन असलेले उतार पुन्हा टंकावे किंवा डकवावे ही नम्र विनंती

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2015 - 8:44 pm | श्रीगुरुजी

तो धागा बराच जुना व खूप मोठा आहे (४००+ प्रतिसाद). परत सगळा धागा वाचण्याचे आणि प्रतिसाद शोधण्याचे त्राण नाहीत.

एकाच गोष्टीवर विचार करा. भाजपच्या मतांमध्ये अगदी किरकोळ घट झाली. काँग्रेसची मते २४% वरून ९% आली. आआपकडे मुख्यत्वेकरून कोणत्या पक्षाची मते फिरली ते उघड आहे. अनेक मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराऐवजी उघडउघड आआपच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते. याचा अर्थ उघड आहे.

अनुप ढेरे's picture

24 Jun 2015 - 2:23 pm | अनुप ढेरे

सचिवांच्या मुद्द्यांवरून ना.रा आणि पर्यायाने केंद्र सरकार अत्यंत कोतं राजकारण खेळत आहे. राज्य सरकारने केलेल्या नियुक्त्या ना.रा.ने रद्द करण हे मुद्दाम पायात पाय घालणं आहे. आणि हे लोकांना समजत असेलच. भाजपाला या असल्या राजकारणाचा फटका नक्की बसेल. बसायला हवाच.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2015 - 12:25 pm | श्रीगुरुजी

दिल्ली हे खर्‍या अर्थाने राज्य नाही. तो केंद्रशासित प्रदेश आहे. तिथली विधानसभा आणि महानगरपालिका यात फार फरक नाही. दिल्लीत काही विभाग विधानसभेच्या अखत्यारीत येतात व बरेचसे विभाग नायब राज्यपालांच्या अखत्यारीत येतात.

२१ मे रोजी केंद्रीय गृहखात्याने एक अधिसूचना काढून दिल्ली विधानसभेचे अधिकार कोणते व नायब राज्यपालांचे कोणते याविषयी पुरेश्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे. आपण निवडून आल्याने दिल्लीतील सर्व निर्णय आपल्या मर्जीनेच व्हायला हवेत असा केजरीवालांचा हट्ट आहे. घटनेतील तरतुदीनुसार त्यांना ज्या विभागात ढवळाढवळ करण्चाचा अधिकार नाही त्या विभागात सुद्धा सचिवांच्या बदल्या करून त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन केले. त्या विभागांवर नायब राज्यपालांचा अधिकार असल्याने व त्यांच्या संमतीशिवाय सचिवांच्या बदल्या झाल्याने नायब राज्यपालांनी त्या बदल्या रद्द केल्या. नायब राज्यपालांची कृती घटनेला अनुसरूनच आहे.

या अधिसूचनेविरूद्ध केजरीवाल न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने अधिसूचना बेकायदेशीर किंवा चुकीची आहे असे म्हटले नसून अधिसूचनेला स्थगिती द्यायला नकार दिला आहे.

आपण दिलेली अवास्तव आश्वासने पूर्ण करणे अशक्य आहे हे केजरीवालांच्या लक्षात आल्याने ते विनाकारण इतरांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करून आणि विनाकारण केंद्रसरकारशी भांडण उकरून 'मला काम करू दिले जात नाही' असा कांगावा करीत आहेत.

अनुप ढेरे's picture

25 Jun 2015 - 1:51 pm | अनुप ढेरे

कागदोपत्री ना.रा. बरोबर असतीलच. पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं. ( आणि माझ्या आजूबाजूला अनेकांना)
स्वच्छ आणि काम करतील असं वाटणारे लोक नियुक्त करू द्यायचे नाहीत वर आरडा ओरडा करायचा की बघा काही झालं नाही हा दुटप्पीपणा आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Jun 2015 - 1:59 pm | पुण्याचे वटवाघूळ

पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं.

संस्कृतमध्ये एक म्हण आहे--शठं प्रति शाठ्यं. म्हणजे ठकाशी ठकाप्रमाणेच वागावे.

का हो अनुपराव-- यांना राजस्थानातल्या शेतकर्‍याला बोलावून आत्महत्या करायचा फार्स करायचा आणि भर सभेत-- लटका क्या असे अ‍ॅक्टिंग करत विचारायचा नैतिक अधिकार होता का? हाच प्रश्न आम आदमी पक्षाच्या इतर अनेक चाळ्यांविषयी विचारता येईल. तेव्हा कुठे गेला होती तुमची नैतिकता? आता कन्व्हिनिअन्टली नैतिकता आठवत असेल तर त्याला काही अर्थ नाही.

अनुप ढेरे's picture

25 Jun 2015 - 2:41 pm | अनुप ढेरे

तेव्हा कुठे गेला होती तुमची नैतिकता?

एका विषयावर चर्चा चालू असताना याच्याशी संबंध नसलेल्या मुद्दाला हात घालण्याचं प्रयोजन समजल नाही.

असो, मागे सुहास यांनी मनसेची 'बाजू' मांडणारा धागा काढला होता त्यात त्यांच्या प्रतिसादांनी मनसेचं नुकसानच झालं असावं. पुण्याचे वटवाघूळ आणि गुरुजींच्या प्रतिसादांचा तसाच परिणाम होउ नये ही इच्छा.

(मोदी समर्थक)
अनुप

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2015 - 9:01 pm | श्रीगुरुजी

>>> असो, मागे सुहास यांनी मनसेची 'बाजू' मांडणारा धागा काढला होता त्यात त्यांच्या प्रतिसादांनी मनसेचं नुकसानच झालं असावं. पुण्याचे वटवाघूळ आणि गुरुजींच्या प्रतिसादांचा तसाच परिणाम होउ नये ही इच्छा.

हे वाचून जरा हसायला आलं. सुहासच्या धाग्याने मनसेचं नुकसान झालं असावं असं वाटत असेल तर सुहासने धागा काढला नसता तर मनसेला फायदा झाला असता का? मिपावरील धाग्यांनी किंवा प्रतिसादांनी कोणत्याही पक्षाला शष्प फरक पडत नाही. मग तो धागा मी काढलेला असो वा सुहासने वा अजून कोणी.

सव्यसाची's picture

25 Jun 2015 - 2:43 pm | सव्यसाची

मुळातच दिल्लीच्या कारभाराबद्दल नैतीकतेपेक्षा सगळ्यात जास्त काय चालत असेल तर कायदा. हे आजचे आहे असे पण म्हणायला नको. भाजप आणि कॉंग्रेस च्या मागच्या मुख्यमंत्र्यांना पण हेच करावे लागले आहे.
वरती गुरुजी म्हणाले तसे, दिल्ली ची विधानसभा म्हणजे महापालिकेपेक्षा जास्त अधिकार असलेली पण राज्यसरकारचा दर्जा नसलेली आहे. अशीच दुसरी विधानसभा म्हणजे पुदुच्चेरी. पण त्यावरती कधी तुम्ही बातम्या ऐकल्या नाहीत? कि फक्त दिल्लीच्याच बातम्या येतात?
इथे संविधानानुसार ना. राज्यपाल हे administrator आहेत आणि आत्ताचे नोटिफिकेशन थोडेसे बाजूला ठेवले तरी चीफ सेक्रेटरी आणि काही अजून सेक्रेटरी नियुक्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. त्यांच्या सहीशिवाय सगळ्या गोष्टी null & void आहेत.
मग आपण संविधान मानायचे कि नैतिकता? आणि नैतीकताच मानायची असेल तर कुणाची नैतिकता? आपची कि नायब राज्यपालांची?
बाकी प्रशांत भूषण यांनी सुद्धा कायदा दिल्ली सरकारच्या बाजूने नाही तेव्हा अश्या पद्धतीने आपने लढाई खेळू नये असे त्यांना वाटत होते.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2015 - 8:58 pm | श्रीगुरुजी

>>> कागदोपत्री ना.रा. बरोबर असतीलच. पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं. ( आणि माझ्या आजूबाजूला अनेकांना)
स्वच्छ आणि काम करतील असं वाटणारे लोक नियुक्त करू द्यायचे नाहीत वर आरडा ओरडा करायचा की बघा काही झालं नाही हा दुटप्पीपणा आहे.

प्रशासन हे कोणाला काय नैतिक/अनैतिक वाटते किंवा कोणाचा अधिकार नैतिक/अनैतिक यावर चालत नसते. नैतिक/अनैतिकतेची कोणतीच सर्वमान्य व्याख्या नाही. प्रशासन नियम व कायद्यांनुसार चालते. आज केजरीवाल त्यांना कायदेशीर अधिकार नसलेल्या विभागात ढवळाढवळ करीत आहेत. उद्या ते राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश इ. च्या नेमणुका मी करणार असे सांगायला लागतील.

आणि केजरीवालांना जे लोक स्वच्छ आणि काम करणारे वाटतील, ते प्रत्यक्षात स्वच्छ आणि काम करणारे आहेत हे कशावरून? जितेंद्रसिंह तोमरची भानगड जानेवारी २०१५ मध्येच बाहेर आली होती. तरीसुद्धा केजरीवालांनी त्याला तिकीट देऊन नंतर मंत्रीपदाचे बक्षिस दिले. जितेंद्रसिंहच्या पदव्या पूर्णपणे खर्‍या आहेत अशी माझी खात्री झाली आहे असे प्रमाणपत्र केजरीवालांनी जाहीररित्या दिले होते. आता जितेंद्रसिंहला १६ दिवस तुरूंगात राहून सुद्धा न्यायालय जामीन द्यायला तयार नाही. तात्पर्य, केजरीवालांना जे स्वच्छ आणि काम करणारे वाटतात ते प्रत्यक्षात तसे असतीलच असे नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 1:16 pm | श्रीगुरुजी

http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-cm-arvind-kejriwals-elect...

बापरे! वीजबिलात ५०% सवलत दिल्यानंतर सुद्धा फक्त २ महिन्यात ५ व्यक्तींच्या कुटुंबाने एवढी प्रचंड वीज वापरली!

जुन्या दराने आकारणी केली असती तर फक्त १ महिन्याचं बिल एवढं आलं असतं.

ते मुख्यमंत्री असल्याने हे बिल सरकारच्या म्हणजे पर्यायाने लोकांच्या कराच्या पैशातूनच भरले जाणार ना?

आम आदमीने आम आदमी चालवित असलेल्या आम आदमींच्या सरकारसाठी इतका किरकोळ भुर्दंड सोसलाच पाहिजे.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 2:25 pm | नांदेडीअन

ते बिल फक्त त्यांच्या घरासाठीचे नाहीये.
त्यांचे घर, त्यांचे ऑफिस आणि २०० लोकांसाठी असलेल्या जनता दरबार हॉलचे मिळून आहे ते बिल.
या बिलातला सगळ्यात जास्त वाटा याच हॉलचा आहे, कारण जनतेच्या सुविधेसाठी इथे अनेक एसी लावून ठेवलेले आहेत.
दररोज शेकडो लोक येतात इथे.

जाऊ द्या, हा खालचा फोटो बघा.
यावर काही एक्स्पर्ट ओपिनिअन ?
आणि हो, ‘फोटो फोटोशॉप केलेला आहे.’ असे कृपया म्हणू नका.
इथला तुमचा आणि माझा एक-एक पोस्ट कमी होईल आणि बॅन्डविड्थ वाचेल थोडीफार.

bill

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 2:34 pm | श्रीगुरुजी

म्हणजे मग केजरीवाल ह्यांच्यासारखेच झाले की. काँग्रॅट्स! आम्ही त्यांना विनाकारणच वेगळे समजत होतो आणि तेही आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशा पोकळ बढाया मारत होते.

>>> कारण जनतेच्या सुविधेसाठी इथे अनेक एसी लावून ठेवलेले आहेत.

एसी? मघाशी तर आआपचा प्रवक्ता एका वाहिनीवर सांगत होता की तिथे पंखे आणि कूलर लावलेत. मग हे एसी कोठून आले?

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 2:52 pm | नांदेडीअन

तुम्हाला नेमका आनंद कशाचा होतोय ?
केजरीवालसुद्धा कॉंग्रेस-भाजपसारखे झाले याचा, की भाजप-कॉंग्रेस अगोदरपासूनच तसे होते याचा ?

परत एकदा वाचा.
हे लाईट बिल फक्त त्यांच्या घराचे नाहीये.
त्यांचे घर, ऑफिस आणि जनता दरबार हॉलचे मिळून आहे.

माझ्या माहितीप्रमाणे तिथे AC लावलेल्या आहेत.
कोणत्या न्युज चॅनलवर कोणता प्रवक्ता म्हणाला तिथे AC नाहीयेत ?
मला माझी माहिती दुरूस्त करून घ्यायची इच्छा आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 3:29 pm | श्रीगुरुजी

मला आनंद होत नसून याचं दु:ख होतंय की केजरीवाल देखील यांच्यापेक्षा वेगळे नाहीत.

आआपच्या प्रवक्त्यानुसार एका महिन्याच्या ४५००० रू. बिलापैकी १५००० रू. बिल घराचे व उर्वरीत ऑफिसचे आहे. वीजेचा दर प्रति युनिट ५ रू. धरला तर एका महिन्यात केजरीवालांच्या घरात ३००० युनिट इतकी वीज जाळली गेली असं दिसतंय. माझ्या ५ खोल्यांच्या घराला एका महिन्यात अंदाजे ८०-९० युनिट इतकी वीज लागते. केजरीवाल माझ्या ३० पट वीज जाळतात असं दिसतंय.

२-३ वेगवेगळ्या वाहिन्यांवर (बहुतेक आयबीएन, इंडिया न्यूज, न्यूज नेशन इ.) आआपचे दावे दाखवित होते.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 1:23 pm | श्रीगुरुजी

http://indianexpress.com/article/cities/delhi/m-k-meena-to-remain-acb-ch...

केजरीवालांची पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने निराशा केली. केंद्राच्या नेमणुकांना न्यायालयात आव्हान देण्यातच केजरीवाल आपली ५ वर्षे घालविणार असं दिसतंय.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 2:42 pm | नांदेडीअन

ही बातमी वाचा.
Delhi ACB paralysed, no cases registered in almost a month
http://www.hindustantimes.com/newdelhi/delhi-acb-paralysed-no-cases-regi...

एम.के.मीना यांना तिथे का आणून बसवले आहे हे सगळ्यांना माहित आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 3:23 pm | श्रीगुरुजी

१) मीणा या अधिकार्‍याला तिथे ८ जूनला आणण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त ३ आठवडे होतात, १ महिना नव्हे.

२) मीणांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच आआप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून, त्यांना एसीबी चे प्रमुख म्हणून काम करण्यास व त्यांना कोणतेही नवीन एफआयआर दाखल करण्यास बंदी घालावी अशी याचिका दाखल केली होती. जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री एखाद्या अधिकार्‍याने काम करण्याच्या विरोधात व त्याने कोणताही नवीन एफआयआर दाखल करू नये अशी मागणी घेऊन न्यायालयात जातो, तेव्हा निकाल लागेपर्यंत संपूर्ण अनिश्चितता असते व निकाल लागेपर्यंत सरकार अजिबात सहकार्य करीत नसल्याने सर्व कामे ठप्प होणारच.

३) नायब राज्यपालांच्या संमतीविना आआप सरकारने बिहारच्या ५ अधिकार्‍यांची एसीबीत भरती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला राज्यपालांची परवानगी नसल्याने एसीबी प्रमुख त्यांना कोणतेही काम देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते सर्व अधिकारी रिकामे बसून आहेत.

४) मीणांनी नवीन एफआयआर दाखल करण्यास संमती दिलेली नाही असे एखादे उदाहरण आहे का असे न्यायाधीशांनी विचारल्यावर सरकारी वकील इंदिरा जयसिंग यांना असे उदाहरण देता आलेले नाही. याचा अर्थ उघड आहे.

The face-off between the Centre and Delhi chief minister Arvind Kejriwal has paralysed the city-state’s anti-corruption arm, casting shadows over a key promise that the AAP leader had made to his voters. Kejriwal, who stormed to power in February this year, had promised to deliver a corruption-free government in Delhi.

एसीबीचे काम ठप्प होण्यास संपूर्णपणे केजरीवालच जबाबदार आहेत. केंद्राने व राज्यपालांनी त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारात केलेल्या प्रत्येक नेमणुकीला विरोध करून न्यायालयात आव्हान देऊन कामात अडथळे आणत आहेत.

बरं. खालील बातमीबद्दल आपले काय मत आहे?

http://www.indiatvnews.com/politics/national/kejriwal-exposed-rti-reveal...

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 4:02 pm | नांदेडीअन

बरं. खालील बातमीबद्दल आपले काय मत आहे?
http://www.indiatvnews.com/politics/national/kejriwal-exposed-rti-reveal...

Delhi's ACB reveals details of 35 arrested officials
http://www.abplive.in/india/2015/06/13/article617763.ece/Delhis-ACB-reve...

चिनार's picture

30 Jun 2015 - 4:10 pm | चिनार

या दोघांनाही अश्या परस्परविरोधी बातम्या इतक्या लगेच कश्या सापडतात देव जाणे!
एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही..

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 4:27 pm | कपिलमुनी

मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही
बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतात

मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही
बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतात

लय वेळा सह्मत !

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 5:12 pm | नांदेडीअन

या दोघांनाही अश्या परस्परविरोधी बातम्या इतक्या लगेच कश्या सापडतात देव जाणे!
एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही..

मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतात

बाब्बौ...
आता मात्र कहर झाला राव. :P

आत्ता नेमके आठवत नाही, पण मागे कोणत्या तरी एका धाग्यावर तुम्ही ‘आप’ला किंवा केजरीवालला शिव्या घालत होतात.
ते कोणत्या माहितीच्या आधारे ?

आत्ता नेमके आठवत नाही, पण मागे कोणत्या तरी एका धाग्यावर तुम्ही ‘आप’ला किंवा केजरीवालला शिव्या घालत होतात.
ते कोणत्या माहितीच्या आधारे ?

आजही घालतो शिव्या !!
पण तुम्हा दोघांची जुगलबंदी आता तार्किक नाही तर विनोदी व्हायला लागली आहे.

श्री मोदी आणि श्री केजरीवाल यांच्या पदाविषयी आणि आजपर्यंतच्या पूर्ण आदर राखून तुमच्यातली जुगलबंदी नक्की कशी आहे ते खालील उदाहरणात सांगतो.
भाजपवाले (श्रीगुरुजी) -- केजरीवाल आज १० वेळा शौचास गेले. हा वेळेचा आणि पाण्याचा अपव्यय आहे. खालील लिंक बघा.

आप वाले (नान्देडीयन)-- माहितीच्या अधिकाराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान वाट्टेल तेंव्हा शौचास जातात. हेच का अछ्छे दिन ? ही बातमी वाचा..

अश्या चिखल फेकीची सुरवात कोण आधी करते ते महत्वाचे नाही. ती कोणीही करते.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 6:26 pm | श्रीगुरुजी

अत्यंत चुकीचे उदाहरण आहे.

जुगलबंदी विनोदी असेल तर त्याचा हसून आनंद घ्या. वाटेल ती उदाहरणे देऊ नका.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 6:32 pm | नांदेडीअन

आजही घालतो शिव्या !!
पण तुम्हा दोघांची जुगलबंदी आता तार्किक नाही तर विनोदी व्हायला लागली आहे.

अच्छा, तुम्ही कुठल्यातरी माहितीच्या आधारे इतरांवर टिका करता ते अभ्यासपूर्ण लिखाण, आणि मी जे विषयाला अनुसरून कमेंट करतो, ते अतार्किक आणि विनोदी ?
व्वा, हे छान आहे !

आप वाले (नान्देडीयन)-- माहितीच्या अधिकाराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान वाट्टेल तेंव्हा शौचास जातात. हेच का अछ्छे दिन ? ही बातमी वाचा..

^^
ह्या अशा प्रकारची टिका मी कोणत्या धाग्यावर केली होती हे खर्‍या उदाहरणासकट सांगितले तर खूप उपकार होतील आपले.

अपेक्षेप्रमाणेच माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हा दोघांनाही कळला नाही. असो. चालुद्या..

रच्याकने..ज्या मिडीयाच्या बातम्या वाचायला आणि इथे पोस्ट करण्याला तुम्ही अभ्यासपूर्ण लिखाण वगैरे म्हणता त्या मिडीया वर मागे मी एक लेख लिहिला होता
http://www.misalpav.com/node/30423

स्वत: च्या धाग्याची जाहिरात करण्याची ही मोदींची मार्केटिंग पद्धत मी आत्मसात केली आहे किंवा उठसूट कोणावरही टीका करण्याची ही केजरीवाल पद्धत मी वापरतो आहे असे कुठलेही अर्थ तुम्ही दोघेही काढू शकता..

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jul 2015 - 1:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

अपेक्षेप्रमाणेच माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हा दोघांनाही कळला नाही. असो. चालुद्या..

अहो तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने का होईना नांदेडियन आणि श्रीगुरूजींचे एकमत झाले हे काय कमी आहे?

चिनार's picture

1 Jul 2015 - 2:17 pm | चिनार

ह ह पु वा !!

नाखु's picture

3 Jul 2015 - 2:20 pm | नाखु

झाले आहे असे वाटणे म्हणजे हा "हिंदुत्वाचा" अपमान आहे - कशाचे ही शेपूट हिंदुत्वास जोडणारा सामना

खरेच झाले तर बघा आम्ही सांगत होतो भाज्पा आणि आप मिळालेले आहेत (आतून) -लोक्मत(कांन्ग्रेसी प्येपर)

प्रचंड धागा टीआर्पी साठी हे साटेलोटे - पटा पटा मटा

संघात खळबळ तर आपची खळखळ : धुगधुगी तरूण भारत

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 5:21 pm | श्रीगुरुजी

>>> एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही..

हा! हा!! हा!!! हहपुवा.

बादवे, यालाच 'शोध पत्रकारिता' म्हणतात का?

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 5:20 pm | श्रीगुरुजी

याचा अर्थ RTI अर्जातून खोटी माहिती दिली जात आहे. तोमरने सुद्धा आपल्या शिक्षणाविषयी कोणालातरी RTI अर्ज करायला लावून त्यात आपल्या पदव्या खर्‍या असल्याची माहिती RTI च्या प्रतिसादातून आल्याचे दाखविले होते.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 5:29 pm | नांदेडीअन

ऍंटी करप्शन हेल्पलाईन लॉंच झाल्याच्या ३५ दिवसांच्या आत ही माहिती मागवली होती. (भाजपने किंवा कॉंग्रेसने)
त्यावेळी सात जणांनाच अटक झालेली होती.

पण मग फक्त ३५ दिवसांवर कशी टिका करायची म्हणून भक्तांना आत्ता रसद पुरवली एव्हढेच.
भक्तसुद्धा इतके प्रामाणिक आहेत की एका शब्दाने त्यांनी ‘RTI ची कॉपी कुठे आहे ?’ असा प्रश्न विचारला नाही त्यांच्या पक्षाला/मालकाला.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 6:15 pm | श्रीगुरुजी

>>> ऍंटी करप्शन हेल्पलाईन लॉंच झाल्याच्या ३५ दिवसांच्या आत ही माहिती मागवली होती. (भाजपने किंवा कॉंग्रेसने)
त्यावेळी सात जणांनाच अटक झालेली होती.

ही माहिती भाजप किंवा काँग्रेसने मागितली नव्हती. विवेक गर्ग नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागविली होती.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 6:35 pm | नांदेडीअन

ही माहिती भाजप किंवा काँग्रेसने मागितली नव्हती. विवेक गर्ग नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागविली होती.

https://www.facebook.com/vivekgargadvrti
&
http://www.iamin.in/en/chandni-chowk/news/i-don%E2%80%99t-want-do-rajnee...
&
http://www.thehindu.com/elections/delhi2015/manoj-tiwari-seeks-votes-for...

भाजपाच्या या विवेक गर्ग व्यतिरिक्त अजून कोणते विवेक गर्ग असतील, तर कृपया माझ्या माहितीत भर घाला.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 8:37 pm | श्रीगुरुजी

विवेक गर्ग २००१ पासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. भाजपशी त्यांचा संबंध २००८ मध्ये आला. माहिती अधिकार कार्यकर्ते या नात्याने त्यांनी आजपर्यंत २-जी घोटाळा, दिल्लीतील वाहतूक घोटाळा, दिल्लीतील वीज घोटाळा, दिल्लीतील लो-फ्लोअर बसेसचा घोटाळा, अनधिकृत वसाहतींचा घोटाळा असे अनेक घोटाळ्यांची माहिती बाहेर काढली आहे. २००१ पासून आजतगायत त्यांनी १०००० हून अधिक माहिती अधिकार अर्ज भरून वेगवेगळ्या घोटाळ्यांची माहिती बाहेर आणली आहे. त्यामुळे ती माहिती एक अत्यंत जुना माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने त्यांनी मिळविली होती.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 9:22 pm | नांदेडीअन

इतके काय गोलगोल फिरवताय राव ?
सरळ सांगून टाका ना भाजपाचे नाहीयेत म्हणून.
कोणी काही म्हणणार नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 2:23 pm | श्रीगुरुजी

तुम्ही समजता त्या अर्थाने ते भाजपचे नाहीत. त्यांच्याशी संबंधित बातम्यात सुद्धा 'वकील व माहिती अधिकार हक्काचे कार्यकर्ते विवेक गर्ग' असाच उल्लेख असतो.

वेगळ्या शब्दात सांगायचं तर नंदन निलेकणी जितके काँग्रेसचे आहेत तितकेच विवेक गर्ग भाजपचे आहेत.

कर्ण-२'s picture

30 Jun 2015 - 5:14 pm | कर्ण-२

मोदी काम करू देत नाही हे स्पष्ट दिसत आहे, आणि तुम्हाला दिसत नाही म्हणजे तुम्ही जरूर अंधभक्त असाल

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 5:24 pm | श्रीगुरुजी

खरं तर केजरीवालांना काम करण्याची इच्छा नाही हे स्पष्ट दिसत आहे आणि ते तुम्हाला दिसत नाही, म्हणजे जरूर तुम्ही अंधद्वेष्टे असाल.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 4:15 pm | नांदेडीअन

मीणा या अधिकार्‍याला तिथे ८ जूनला आणण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त ३ आठवडे होतात, १ महिना नव्हे.

मी मागेही म्हणालो होतो की साहेबांच्या भाषेचे मला तितकेसे ज्ञान नाही.
पण माझ्या मते Almost a month म्हणजे 'एक महिना' नसतो.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 2:19 pm | श्रीगुरुजी

>>> पण माझ्या मते Almost a month म्हणजे 'एक महिना' नसतो.

ते ठीक आहे. परंतु केजरीवालांच्या आडमुठेपणामुळेच एसीबीचे काम ठप्प झाले आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.

कालची अजून एक नवीन बातमी . . . हा प्रकार आता पोरखेळ म्हणण्याच्याही पलिकडे गेला आहे.

After two unit chiefs, the anti-corruption branch now has two SHOs. The Delhi government has declared the appointment of the new SHO as void. This comes a day after the high court refused to accept the government's plea to oust M K Meena from ACB.

The vigilance department on Tuesday cancelled three of the orders passed by the ACB chief, Meena, on Monday. One of them is the appointment of the new SHO. Arguing that ACB was a part of the department of vigilance and any work allocation can happen only with the approval of the head of the department, director of vigilance, Sukesh Jain, termed the orders as those "without authority".

"Vinay Malik will continue to work as the SHO of ACB," the vigilance order further reads. This order, officials said, will only add to the confusion as the new SHO, Brij Mohan, already took charge from Malik on Monday and has discharged his duty through Tuesday. It is unclear as to how Malik will be reinstated, if at all.

The DoV gives reference to the allocation of business rules 1993 in his order. Jain also uses strong words against Meena and advises him to refrain from passing such "unauthorized orders" in future. The current order is likely to have repercussions as Meena has earlier warned the director of vigilance not to interfere in the matters of ACB, which is a police station.

It will be interesting to see how Meena and the lieutenant governor react to the order, a source said.

कर्ण-२'s picture

30 Jun 2015 - 5:10 pm | कर्ण-२

असाच एक लेख येउद्या 'मोदि के अन्धभ्क्त' मह्नुन

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 5:25 pm | श्रीगुरुजी

+१

'मोदि के अन्धद्वेष्टे' असा देखील एक लेख येऊ द्या.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 5:26 pm | श्रीगुरुजी

'केजरीवाल के अन्धभक्त' असा देखील लेख चालेल.

ट्रेड मार्क's picture

30 Jun 2015 - 10:01 pm | ट्रेड मार्क

श्री मोदी अजून ४ वर्ष पंतप्रधान आणि श्री केजरीवाल अजून ४.५ वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत (या पैकी कोणीही राजीनामा दिला नाही तर). जो काम करणार नाही तो पुढच्या वेळी निवडून येणार नाही.

तसं पण राहुल गांधी किंवा केजरीवाल पंतप्रधान म्हणून किती लोकांना मान्य आहेत हा पण प्रश्न आहे. उगाच वाद घालून काय उपयोग? एक देश चालवणे आणि एक अर्धा राज्य चालवणे याची तुलना होवू शकत नाही.

दोघांनी आपल्या जागी चांगले काम करावे आणि देशाला आणि राज्याला चांगले दिवस दाखवावे ही इच्छा.

पण वाचून करमणूक होते आहे हे तितकेच खरं, त्यामुळे लगे रहो.

त्यांना पुढील पंतप्रधान म्हणून केजरीवाल पाहिजेत. तसा वेगळा group पण आहे "Kejriwal as our PM", आणि ....

मग खाली हळूच लिहिलंय PM म्हणजे personal motivator :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jul 2015 - 1:33 pm | पुण्याचे वटवाघूळ

दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून ३०% वर नेला. पेट्रोल, सी.एन.जी या गोष्टी दिल्लीमध्ये महाग होणार.

म्हणजे केजरीवार एका हाताने स्वस्त इलेक्ट्रिसीटी देणार आणि दुसर्‍या हाताने अशा प्रकारे जास्त चार्जेस लावून जनतेला येडे बनविणार. आणि केजरीचे गुलाम त्यावर स्तुतीसुमने टाकत राहणार आणि केजरीवालांना पंतप्रधानपदी बसवायची स्वप्ने बघणार.आणी नांदिडियन त्यावरही काहीतरी तिरपागडे लॉजिक आणणार. मजाच म्हणायची.

नांदेडीअन's picture

1 Jul 2015 - 2:21 pm | नांदेडीअन

दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून ३०% वर नेला. पेट्रोल, सी.एन.जी या गोष्टी दिल्लीमध्ये महाग होणार.
म्हणजे केजरीवार एका हाताने स्वस्त इलेक्ट्रिसीटी देणार आणि दुसर्‍या हाताने अशा प्रकारे जास्त चार्जेस लावून जनतेला येडे बनविणार. आणि केजरीचे गुलाम त्यावर स्तुतीसुमने टाकत राहणार आणि केजरीवालांना पंतप्रधानपदी बसवायची स्वप्ने बघणार.आणी नांदिडियन त्यावरही काहीतरी तिरपागडे लॉजिक आणणार. मजाच म्हणायची.

लोकांपुढे खरी माहिती तुम्ही पोस्ट कराल अशी मुळीच अपेक्षा नाहीये, किमान स्वतःशी जरी प्रामाणिक राहिलात तरी पुरेसे आहे.
हां तुम्हालासुद्धा खरे काय ते माहित नसेल, तर मग हरकत नाही.
चालू द्या नेहमीप्रमाणे न वाचता, न माहिती घेता टीका.

दिल्ली सरकारने व्हॅटची अप्पर लिमिट २०% वरून वाढवून ३०% केली आहे, व्हॅट वाढवलेला नाहीये.
यामुळे खालील १४ प्रोडक्ट्स महाग होऊ शकतात. (झाले नाहीत.)
vat

मला सांगा या १४ पैकी कशाची किंमत वाढल्यावर जनतेला महागाईची झळ बसणार आहे किंवा जनतेला ‘त्रास’ होणार आहे.

बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि हरियाणामध्ये व्हॅटची अशी कोणतीही अप्पर लिमिट नाहीये.
सरकार वाट्टेल तेव्हढा वॅट वाढवू शकते.
महाराष्ट्रामध्ये ही लिमिट ५०% आहे.
अर्थात याबद्दल आपण बोलू शकत नाही तो भाग वेगळा.

माझी माहिती चुकीची असल्यास कृपया दुरूस्त करावी ही नम्र विनंती.

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jul 2015 - 2:26 pm | पुण्याचे वटवाघूळ

http://www.ibnlive.com/news/politics/delhi-government-hikes-vat-from-20-...

http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-pe...

यातील एक वाक्य--- "With this move of the Arvind Kejriwal government, prices of petrol, cooking gas, CNG and liquor are set to go up."

नांदेडीअन's picture

1 Jul 2015 - 2:39 pm | नांदेडीअन

तुमच्या मते पेट्रोल, डिजेलची ही दरवाढ कधीपर्यंत लागू होईल ?
त्या दिवशी मीसुद्धा तुमच्यासोबत उलटा लटकायला तयार आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 2:52 pm | श्रीगुरुजी

इंडिया-टुडे मधील बातमीत खालील माहिती आहे.

The Delhi Assembly on Tuesday passed VAT (Second Amendment) Bill, 2015 which proposes to increase value added tax on petrol, aerated drinks, tobacco and liquor among other products. Petrol price will be hiked by Rs 5.56 per litre to Rs 72.49 in Delhi if the proposal gets final approval.

या विधेयकाला दिल्ली विधानसभेची कालच मान्यता मिळाली. आता अंतिम मान्यता कोणाची मिळवायची आहे खुदा जाने.

वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला जागा तयार करा बरं उलटं लटकण्यासाठी

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jul 2015 - 3:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला जागा तयार करा बरं उलटं लटकण्यासाठी

छे हो. आआपवाल्यांना माझ्या आजूबाजूलाही फिरकू देत नाही मी :)

ह. घ्या

चिनार's picture

1 Jul 2015 - 3:36 pm | चिनार

असं काय करताय राव?..एका झाडावर तुम्ही ..दुसऱ्या झाडावर नान्देडीयन साहेब असे उलटे लटकलेले..त्याच झाडाखाली श्रीगुरुजी मिरचीची धुनी देतायेत त्यांना..तुम्ही हे बघून टाळ्या वाजवत आहात.. बाजूलाच केजरीवाल धरण्यावर बसलेले.. मोदी विकासाचे भाषण देत असलेले ..आणि मी हे दृश्य क्यामेरात टिपतोय असे रम्य स्वप्न बघितलं मी.

नांदेडीअन's picture

1 Jul 2015 - 4:35 pm | नांदेडीअन

दुसऱ्या झाडावर नान्देडीयन साहेब असे उलटे लटकलेले..त्याच झाडाखाली श्रीगुरुजी मिरचीची धुनी देतायेत त्यांना

काय योगायोग !
आज स्वप्न दिवस आहे का हो ?
मलासुद्धा एक स्वप्न पडले रात्री.
तुम्ही थांबलेला आहात एका जागी आणि समोरची व्यक्ती तुम्हाला बिस्किट टाकत आहे.
मनोहारी दृष्य होतं एकदम !

साक्षात नांदेडीअन साहेबांच्या स्वप्नात मी !! कसं शक्य आहे?
आप च्या मनोहारी स्वप्नरंजनातून आणि भाजपच्या स्वप्नभंगातून बाहेर पडता तुम्ही ?
स्वप्नातही बातम्यांच्या लिंकाच शोधत असाल.

नांदेडीअन's picture

1 Jul 2015 - 4:51 pm | नांदेडीअन

नाही हो, लिंक शोधायची काय गरज आहे.
स्वप्नात असले म्हणून काय झाले, डोळ्यापुढे दिसत होते सगळे. :)

नांदेडीअन's picture

2 Jul 2015 - 4:33 pm | नांदेडीअन

VAT

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 12:50 pm | श्रीगुरुजी

या बातमीची लिंक आहे का? या चित्रातल्या बारीक अक्षरातल्या ओळी वाचता येत नाहीत.

एक शंका आहे.

ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?

तसे नसल्यास, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असे माध्यमे व विरोधी पक्ष खोटे का बोलत आहेत?

तसे असल्यास, मूल्यवर्धित कर वाढवून सुद्धा पेट्रोल व डिझेलच्या भावात का वाढ होणार नाही?

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 1:23 pm | नांदेडीअन

या बातमीची लिंक आहे का? या चित्रातल्या बारीक अक्षरातल्या ओळी वाचता येत नाहीत.

ही घ्या लिंक.
http://epaper.navodayatimes.in/c/5747289

इथून पुढे असे काही वाचता येत नसेल, तर फोटोवर राइट क्लिक करून Open Image In New Tab हा पर्याय निवडत जा.
फोटो मूळ साइझमध्ये पाहता येईल.

एक शंका आहे.
ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?

^^
माझ्या माहितीप्रमाणे नाही.
मला ही माहिती आपच्या काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून मिळाली होती.
आता तर दिल्लीच्या आप संयोजकांनी ही माहिती अधिकृतपणे जाहिर केल्यावर शंका घ्यायला काही वाव नसावा अशी अपेक्षा आहे.

तसे नसल्यास, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असे माध्यमे व विरोधी पक्ष खोटे का बोलत आहेत?

^^
याबद्दल तर तुम्हीच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 2:10 pm | श्रीगुरुजी

ती बातमी वाचली. त्यातून काहीच अर्थबोध झाला नाही.

'ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढवायचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे त्यात इतर वस्तूंबरोबर पेट्रोल व डिझेलचा समावेश आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मूल्यवर्धित कर वाढल्यावर पेट्रोल व डिझेलवर कर वाढेल', हे आआपचे प्रवक्ते दिलीप पांडे यांचे विधान बुचकळ्यात टाकणारे आहे. ही बातमी इतर वृत्तपत्रात दिसली नाही.

असो. थोड्या दिवसात खरे काय ते समजेलच.

>>> याबद्दल तर तुम्हीच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.

माझा तो अधिकार नाही व त्याविषयी मला माहिती नाही.

चिनार's picture

3 Jul 2015 - 2:30 pm | चिनार

या विषयावरच्या माझ्या मर्यादित ज्ञानानुसार दिल्ली सरकारने ११ गोष्टींवर (ज्यात पेट्रोल,डीझेल येतात) VAT वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित करून घेतला आहे. याचा अर्थ ते VAT वाढवतीलच असे नाही. फक्त परवानगी घेऊन ठेवली पुढचं पुढे बघू असं काहीसं हे चित्र आहे. आता या गोष्टीला विविध बाजू आहेत
१. उद्या पेट्रोल,,डीझेल चा VAT वाढवण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे जर VAT वाढलाचं तर "आम्ही कायदेशीर वाढ केली आहे" असे म्हणायला सरकार मोकळे.
२. आधी विधानसभेत प्रस्ताव पारित करून घेऊ मग जनतेची प्रतिक्रिया बघून VAT वाढवायचा की नाही ते ठरवू. जनता अनुकूल असेल तर ठीकच नाहीतर VAT नाही वाढवला म्हणू स्व:त ची पाठ थोपटून घेऊ.
३. किंवा सरकारला पेट्रोल,,डीझेल सोडून अन्य ९ गोष्टींवर VAT वाढवायचा असेल पण VAT च्या त्या विशिष्ट category मध्ये पेट्रोल,,डीझेल चं समावेश सुद्धा असेल. पण VAT वाढवताना सरकार पेट्रोल,,डीझेल त्यातून वगळतील.

सुबोध खरे's picture

3 Jul 2015 - 8:21 pm | सुबोध खरे

The Delhi Assembly on Tuesday passed VAT (Second Amendmnt) Bill, 2015 which proposes to increase value added tax on petrol, aerated drinks, tobacco and liquor among other products. Petrol price will be hiked by Rs 5.56 per litre to Rs 72.49 in Delhi if the proposal gets final approval.
http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-pe...

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jul 2015 - 2:30 pm | पुण्याचे वटवाघूळ

http://www.ibnlive.com/news/politics/delhi-government-hikes-vat-from-20-...

http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-pe...

यातील एक वाक्य--- "With this move of the Arvind Kejriwal government, prices of petrol, cooking gas, CNG and liquor are set to go up."

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 10:42 am | पुण्याचे वटवाघूळ

ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने स्वतःच्या अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी ५००+ कोटी रूपये बाजूला काढले हो SSS. यावर इथल्या आपटार्डांचे काय म्हणणे आहे? मागे टिव्ह्वीवर एक अ‍ॅड दाखवली त्यात एक गृहिणी घरात काम करताना दाखवली होती आणि तिचा नवरा आरामात टिव्हीवरचे चॅनेल बदलताना दाखवला होता. समजा अशी अ‍ॅड भाजपकडून आली असती तर इथल्या फेमिनिस्टांनी अगदी आकाशपाताळ एक केले असते (किंवा कदाचित नसते. कारण बहुदा असे सगळे लोक एन-मास ऐसीअक्षारेवर गेले आहेत आणि इथे फिरकत नाहीत--ते ही बरेच आहे म्हणा). पण काय करा? आपलेच दात आणि आपलेच ओठ. तेव्हा मौन बाळगा. तेच श्रेयस्कर. हो की नाही नांदेडीयन राव?

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 12:45 pm | श्रीगुरुजी

हे तर काहीच नाही.

केजरीवालांच्या निवासस्थानाचे जून महिन्याचे वीजेचे बिल आहे रू. १,३६,०००.

अजून एक -

AAP admits giving perks to party members

NEW DELHI: Aam Aadmi Party (AAP) government in Delhi admitted that a few party members were getting benefits like official house and cars.

In a reply to BJP MLA O P Sharma's question, government said that these members have been appointed as co-terminus staff with it.

Government in its reply said that Bibhav Kumar, private secretary to chief minister Arvind Kejriwal and Aswathi Muralidharan, joint secretary to chief minister, have been allotted houses.

The government also said the salary of these staff, who are in the grade pay of Rs 8,700 equivalent to senior IAS officers.

Apart from 17 co-terminus staff, eight contractual staffs are hired and get Rs 60,000 to Rs 1.15 lakh.

There are two advisors who work on the salary of Rs one per month.

जेमतेम ४-५ महिन्यात करदात्यांचा इतका पैसा उधळणं सुरू आहे आणि ते सुद्धा 'आम आदमी' असा जयघोष करून. हेच ढोंगी आधीच्या सरकारवर जनतेचा पैसा उधळण्याचा सातत्याने आरोप करीत होते.

असो.

याचेही समर्थन करणारे आपटार्ड्स असणारच.

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 12:47 pm | श्रीगुरुजी
कपिलमुनी's picture

3 Jul 2015 - 1:12 pm | कपिलमुनी

हे कारमधल्या कॉलगर्लने रस्त्यावरच्या वेश्येकडे तुच्छतेने बघण्यासारख आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 1:57 pm | श्रीगुरुजी

जर वेश्या गरतीचा आव आणून कॉलगर्लला कायम तुच्छ लेखत असेल तर असे होणारच.

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 2:03 pm | नांदेडीअन

या बातमीची लिंक
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AAP-admits-giving-perks-to...

ज्या लोकांना हे 'Perks' मिळत आहेत, ते लोक घरी बसून नाहीयेत.
सरकारसाठी काम करत आहेत ते, आणि त्याचाच पगार आहे हा.
या लोकांच्या नियुक्तीमध्ये काही नियमबाह्य झाले असेल, तर त्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे.
आणि जर हे भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत असेल, तर मात्र याचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे !

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 8:35 pm | श्रीगुरुजी

>>> ज्या लोकांना हे 'Perks' मिळत आहेत, ते लोक घरी बसून नाहीयेत.
सरकारसाठी काम करत आहेत ते, आणि त्याचाच पगार आहे हा.

नक्की काय काम करताहेत हे आआपचे लोक. नक्की कोणत्या कामासाठी त्यांना केजरीवालांनी घर, गाडी आणि प्रचंड पगार दिलेला आहे. कोणत्या आधारावर या आपच्या कार्यकर्त्यांना वरीष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बरोबरीचे मानले गेले आहे.

बादवे, यातल्या काही जणांचा पगार मासिक रू. १,१५,८८१ फक्त आहे (घर आणि गाडी वेगळीच) असे काल काही वाहिन्यांवर दाखवित होते.

>>> या लोकांच्या नियुक्तीमध्ये काही नियमबाह्य झाले असेल, तर त्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे.

केजरीवाल कधी काही नियमबाह्य करतात का?

>>> आणि जर हे भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत असेल, तर मात्र याचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे !

ज्या गोष्टींसाठी इतरांना सपाटून शिव्या मोजायच्या, आम्ही आम आदमीसाठीच काम करणार असे सांगायचे आणि नेमके शिव्या घातलेल्याच गोष्टी करायच्या हे कदाचित पहिल्यांदा झाले नसले तरी क्षम्य नाही.

सुबोध खरे's picture

3 Jul 2015 - 8:35 pm | सुबोध खरे

यांची नियुक्ती कोणत्या नियमानुसार झाली आहे हे आपल्याला सांगता येईल काय? आणी "त्या" लोकांना सरकारी नोकरी देण्यासाठी साठी कोणते निकष लावले गेले आहेत. सरकारी नोकरी अशी दीड दिवसात मिळणारी गणपतीची खिरापत नाही. आणी हा पगार सरकारी खजिन्यातून येण्यासाठी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध व्हावे लागते. नोकरी लागली कि तीन महिने तरी यासाठी जातात.
उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे आप सारख्या साधन शुचितेचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाला शोभत नाही.

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 1:45 pm | नांदेडीअन

ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने स्वतःच्या अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी ५००+ कोटी रूपये बाजूला काढले हो SSS.

सर्वप्रथम अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्या पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावरून कल्टी मारली, त्याबद्दल आपले आभार.

आता या ५०० कोटींबद्दल बोलू.
यासंदर्भात मी जेव्हढ्या बातम्या वाचल्यात, त्यात reportedly हा शब्द वापरलाय.
अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझी इंग्रजी खूप कच्ची आहे, त्यामुळे कृपया कोणीतरी मला reportedly या शब्दाचा अर्थ सांगावा ही नम्र विनंती.
आणि आप त्यांच्या जाहिरातींवर येत्या काळात खरंच ५०० करोड खर्च करणार आहे हे जरी गृहीत धरले, तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही.
हां, पण यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल.
भाजप तर त्यांच्या न्युज चॅनल्सवर आम आदमी पार्टीचे काम दाखवणे शक्य नाही, मग दिल्लीच्या बाहेरच्या जनतेपर्यंत केलेल्या कामाची माहिती कशी पोहोचवायची ?
मला तरी जाहिरात हा एकच पर्याय दिसतोय, आणि म्हणूनच जाहिरातीला माझे समर्थन आहे.
पण हे ही तितकेच खरे की मोदींनी स्वतःच्या इमेज बिल्डअपसाठी पाच हजार करोड रूपये खर्च केले म्हणून केजरीसाठी तोच पर्याय जस्टिफाय होतो असे नाही.

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 2:17 pm | श्रीगुरुजी

आआपभक्त जाहिरात खर्चाचं समर्थन करणार याची खात्री होतीच.

>>> हां, पण यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल.

दूरदर्शन वाहिन्यांवरील एका १२० सेकंदाच्या जाहिरातीत एक बाई घरातील व घराबाहेरील सर्व कामे करताना दाखविली आहे. तिचा नवरा कोणतेही काम न करता सोफ्यावर लोळत टीव्ही बघत किंवा वृत्तपत्र वाचत आरामात बसलेला दाखविला आहे. तो सोफ्यावर असतानाच काही वेळाने ती बाई त्याच्यासमोर जेवणाचे भरलेले ताट घेऊन येते.

या जाहिरातीत कमीतकमी १२-१३ वेळा अरविंद, केजरीवाल, अरविंदने यँव केलं, अरविंदने त्यँव केलं असे उल्लेख आहेत. हा केजरीवालांचाच उदो उदो आहे.

>>> पण हे ही तितकेच खरे की मोदींनी स्वतःच्या इमेज बिल्डअपसाठी पाच हजार करोड रूपये खर्च केले म्हणून केजरीसाठी तोच पर्याय जस्टिफाय होतो असे नाही.

पाच हजार कोटी हा आकडा कोठून आला? मोदींनी जाहिरातीसाठी सरकारी पैसे वापरले होते का पक्षाचे पैसे?

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 3:39 pm | नांदेडीअन

पाच हजार कोटी हा आकडा कोठून आला? मोदींनी जाहिरातीसाठी सरकारी पैसे वापरले होते का पक्षाचे पैसे?

http://www.hindustantimes.com/state-of-the-states/advertisement-war-to-w...
^^
इथून आला ५ हजार कोटींचा आकडा.

निवडणुकीदरम्यान भाजपाने ७०० करोड खर्च केले होते. (अधिकृत आकडा)
१५ वर्षं सलग सत्तेत असून, एकापेक्षा एक महाघोटाळे करूनसुद्धा कॉंग्रेसने ५०० करोड खर्च केले. (अधिकृत आकडा)
इतकी वर्षं सत्तेच्या बाहेर असणार्‍या पक्षाकडे इतका पैसा कुठून आला ?
अधिकृत आकडा हा आहे, तर प्रत्यक्षात किती पैसा खर्च केला असेल ?
यामुळेच भाजप त्यांच्या देणगीदारांची नावं सांगत नाही का ?

चर्चेदरम्यान असे प्रश्न पुढे आले, तर तुम्हालाच अवघड होईल म्हणून जास्त खोलात जात नव्हतो.
बरं हे ही जाऊ द्या, झाली निवडणूक.

आता निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात सरकारने जाहिरातींवर किती खर्च केले, ते पाहूया.
Rs 780 crore spent by DAVP in 6 months till March 2015: Government
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615852_1_...

म्हणजे निवडणूकीपूर्वी स्वतःच्या पैशाने ७०० करोड, आणि निवडणूकीनंतर (सहा महिन्यांत) सरकारच्या पैशाने ७८० करोड !

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 4:15 pm | पुण्याचे वटवाघूळ

तुमचे इंग्रजी खरोखरच कच्चे आहे नांदेडियन राव. तुम्हाला रिपोर्टेड म्हणजे खात्री नाही हे कळले पण 'मे' चा अर्थही तोच होतो हे कळले नाही. ते ५००० कोटी (समजा आकडा खरा असला तर) नक्की कुणी खर्च केले होते? पक्षाने की सरकारने? इथे तुमचे आम आदमीचे सरकार (पक्ष नव्हे) ५००+ कोटी खर्च करणार म्हणत आहे.

यामुळेच भाजप त्यांच्या देणगीदारांची नावं सांगत नाही का ?

तुमची कुठल्याकुठल्या लिंका शोधून काढून मिपावर टाकायची कपॅसिटी दांडगी आहे.म्हणून अजून एक लिंक मागतो. तुमच्या आपने निवडणुक आयोगाला लोकसभा निवडणुकांमधील खर्चाचे हिशेब दिले का हो? की अजून नाही?मला तरी अशी बातमी कुठे सापडलेली नाही. तुम्ही लिंक एक्स्पर्ट असल्यामुळे तुम्हाला ती लवकर सापडेल. की संगमांच्या पक्षाची मान्यता रद्द झाली तशी आपची पण मान्यता रद्द होणार?

चिनार's picture

3 Jul 2015 - 4:36 pm | चिनार

एक प्रश्न :
DAVP कडून होत असलेल्या जाहिराती किंवा अन्य प्रसारणे फक्त मोदींचा (किंवा त्या त्या वेळेच्या सरकारचा) उदो उदो करण्यासाठीच असतात का ? माझ्या मते, सरकारच्या योजना जनतेपर्यन्त्त पोहोचवण्यासाठी या जाहिराती असतात उदा. पोलियो मोहीम , जन धन वगैरे..
असे असल्यास त्यात काय गैर आहे ?
हा प्रश्न खवचट्पणे विचारलेला नाही ..

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 8:43 pm | श्रीगुरुजी

>>> इथून आला ५ हजार कोटींचा आकडा.

तो आकडा खरा असेल तर तो निवडणुकीतील प्रचाराचा खर्च आहे, करदात्यांच्या पैशातून स्वतःचा उदोउदो केलेला नाही.

>>> निवडणुकीदरम्यान भाजपाने ७०० करोड खर्च केले होते. (अधिकृत आकडा)

निवडणुक होऊन १३ महिने होऊन गेले तरीसुद्धा आआपने आपला खर्च सांगितलेला नाही.

>>> १५ वर्षं सलग सत्तेत असून, एकापेक्षा एक महाघोटाळे करूनसुद्धा कॉंग्रेसने ५०० करोड खर्च केले. (अधिकृत आकडा)इतकी वर्षं सत्तेच्या बाहेर असणार्‍या पक्षाकडे इतका पैसा कुठून आला ? अधिकृत आकडा हा आहे, तर प्रत्यक्षात किती पैसा खर्च केला असेल ? यामुळेच भाजप त्यांच्या देणगीदारांची नावं सांगत नाही का ?

आधी आआपच्या खर्चाचा आकडा आणि देणगीदारांची नावे तर येउ देत. फेब्रु २०१५ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आआपच्या बनावट देणग्या उघडकीला आल्या होत्या हे लक्षात असेलच. लोकसभा निवडणुकीला १३ महिने होऊन गेले तरी आआप निवडणुकीचा खर्च द्यायला तयार नाही यावरून काय गडबड असेल ते लक्षात येत आहे.

>>> जास्त खोलात जात नव्हतो. बरं हे ही जाऊ द्या, झाली निवडणूक.

का खोलात जात नव्हता? आआपच्या निवडणुक खर्चाबद्दल प्रश्न येतील म्हणून का अजून दुसरे कारण आहे?

>>> आता निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात सरकारने जाहिरातींवर किती खर्च केले, ते पाहूया.
Rs 780 crore spent by DAVP in 6 months till March 2015: Government
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615852_1_...
म्हणजे निवडणूकीपूर्वी स्वतःच्या पैशाने ७०० करोड, आणि निवडणूकीनंतर (सहा महिन्यांत) सरकारच्या पैशाने ७८० करोड !

या जाहिरातीत मोदींचा उदोउदो नसून नवीन सुरू झालेल्या सरकारी योजनांची माहिती आहे (उदा. जनधन योजना, अटल पेन्शन योजना इ.) व त्यात विरोधकांना शिव्या दिलेल्या नाहीत.

आआपच्या जाहिरातीत नुसताच केजरीवालांचा उदोउदो आहे आणि विरोधकांना शिव्या आहेत.

या दोन्ही जाहिरातीतला फरक कळला असेल अशी आशा आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 2:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

सर्वप्रथम अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्या पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावरून कल्टी मारली, त्याबद्दल आपले आभार.

कसं आहे-- एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो--काय ते तुझे फेंगडे पाय, काय ती तुझी वाकडी चाल. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणतो की अरे तुझे पाय पण फेंगडे आहेत, तुझी चालपण वाकडी आहे.त्यावर पहिला काय म्हणतो--- आता बोलणे कोणाविषयी चालू आहे? तुझ्याविषयी.माझी चाल वाकडी असली तरी तो चर्चेचा विषय नाही.

तुमचे हे वाक्य वाचून मला त्या खेकड्याचीच आठवण आली बघा. अहो या चर्चेतून तुम्ही किती वेगवेगळ्या प्रश्नावरून कलटी मारली आहेत ते बघितलेत का? रामदासांचा कार्यकाळ संपत होता असे तुम्ही म्हणत होतात पण तसे नव्हते हे स्वतः रामदास म्हणाल्याचे निदर्शनास आणल्यावर तुम्ही गप्पच. केजरीवालांनी इतरांच्या पार्श्बभागाचा उल्लेख केला हे लक्षात आणून दिल्यावर तुम्ही गप्पच. अ‍ॅन्टी करप्शन हेल्पलाईनच्या उद्घाटनाच्या वेळी तालकोटरा स्टेडियमवर व्ही.आय.पी पार्किंग हा स्पष्ट फोटो उपलब्ध होता ते लक्षात आणून दिल्यावर तुम्ही गप्पच.आता सहज चाळल्यावर हे २-३ उल्लेख मिळाले. ३८० पेक्षा जास्त प्रतिसादांमध्ये असे इतरही उल्लेख मिळतीलच.

आता या ५०० कोटींबद्दल बोलू.
यासंदर्भात मी जेव्हढ्या बातम्या वाचल्यात, त्यात reportedly हा शब्द वापरलाय.
अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझी इंग्रजी खूप कच्ची आहे, त्यामुळे कृपया कोणीतरी मला reportedly या शब्दाचा अर्थ सांगावा ही नम्र विनंती.

अहो तुमच्याच आपने त्या ५०० कोटींचे समर्थन केले आहे. http://www.ndtv.com/delhi-news/attention-seeking-worth-500-crores-aap-de... इथे आणि http://www.ndtv.com/opinion/aaps-500-crore-ad-budget-is-far-from-excessi... इथे वाचा. दुसरी लिंकतर त्या आशुतोषने लिहिली आहे.---तोच आशुतोष-- एप्रिल महिन्यापासून मगरीच्या अश्रूंऐवजी आशुतोषचे अश्रू असे म्हणले तरी काही चुकीचे ठरणार नाही तोच तो आशुतोष. मग आता तुम्ही कशाला उगीच रिपोर्टेडली वर अडून बसले आहात?

आणि आप त्यांच्या जाहिरातींवर येत्या काळात खरंच ५०० करोड खर्च करणार आहे हे जरी गृहीत धरले, तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही.

कसले समर्थन करता राव? २०१३ च्या निवडणुका केवळ २० कोटींमध्ये लढवून शीला दिक्षित, अशोक वालिया, किरण वालिया, परवेझ हाशमी या सगळ्या काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारली म्हणून तुम्हीच आपटार्ड मोठी कॉलर ताठ करत होतात ना? त्यावेळी तुम्हाला आपले नाव कसे पोहोचवावे ही अडचण आली नाही. आता त्याच्या २५ पटींनी पैसे हवेत? पैसे खर्च करायचे तर जरूर करा पण ते स्वतः उभे करा आणि खर्च करा. करदात्यांचे पैसे असे खर्च करायचा तुम्हाला काय अधिकार? (आता प्लीज इतर पक्ष पण असेच करतात हे सांगू नका. अगदी शीला दिक्षित सरकारचे अ‍ॅडव्हर्टायझिंगचे बजेट २५ कोटी होते).

यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल.

असे विरोध करायला पात्र असलेले कित्येक मुद्दे तुम्हीलोक सोडून देता आणि त्याविषयी कधीच काही बोलत नाही. आणि इतरांना मात्र भक्त आणि परमभक्त वगरे बोलता.म्हणूनच तुम्हाला केजरीचे गुलाम म्ह्टले जाते आणि योग्यच आहे. आपटार्ड म्हणजे खरोखरच गुलाम आहेत. खरं तर गुलाम नाही तर झोंबी आहेत. एकदा झोंबी माणसात शिरला तर तो माणूस कामातून गेलाच म्हणायचे. आप ही तशी एक झोंबी आहे.

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 4:27 pm | नांदेडीअन

कसं आहे-- एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो--काय ते तुझे फेंगडे पाय, काय ती तुझी वाकडी चाल. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणतो की अरे तुझे पाय पण फेंगडे आहेत, तुझी चालपण वाकडी आहे.त्यावर पहिला काय म्हणतो--- आता बोलणे कोणाविषयी चालू आहे? तुझ्याविषयी.माझी चाल वाकडी असली तरी तो चर्चेचा विषय नाही.

यातला कोणता खेकडा आहात तुम्ही ?
पहिला की दुसरा ?

अहो तुमच्याच आपने त्या ५०० कोटींचे समर्थन केले आहे.
http://www.ndtv.com/delhi-news/attention-seeking-worth-500-crores-aap-de... इथे
आणि
http://www.ndtv.com/opinion/aaps-500-crore-ad-budget-is-far-from-excessi... इथे वाचा.
दुसरी लिंकतर त्या आशुतोषने लिहिली आहे.---तोच आशुतोष-- एप्रिल महिन्यापासून मगरीच्या अश्रूंऐवजी आशुतोषचे अश्रू असे म्हणले तरी काही चुकीचे ठरणार नाही तोच तो आशुतोष. मग आता तुम्ही कशाला उगीच रिपोर्टेडली वर अडून बसले आहात?

पहिल्या लिंकमधला एक पॅराग्राफ.
You are confusing what has been earmarked with what will be finally spent," said the government's media advisor Nagendar Sharma to NDTV.
He also said that the publicity budget appears outsized because it clubs together the allocation for every government department.

दुसर्‍या लिंकमधला एक पॅराग्राफ.
There is no denying the fact that that budget has been increased many fold to 500 crores, but that is the outer limit which the government can spend; it doesn't mean the government will end up spending as much.

बाय द वे, ती ५०० करोडची बातमी खरी होती हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

कसले समर्थन करता राव? २०१३ च्या निवडणुका केवळ २० कोटींमध्ये लढवून शीला दिक्षित, अशोक वालिया, किरण वालिया, परवेझ हाशमी या सगळ्या काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारली म्हणून तुम्हीच आपटार्ड मोठी कॉलर ताठ करत होतात ना?
त्यावेळी तुम्हाला आपले नाव कसे पोहोचवावे ही अडचण आली नाही. आता त्याच्या २५ पटींनी पैसे हवेत?

कसलाही बेस नसतांना ४०० जागा लढवणे केवळ मूर्खपणाचे होते यात वादच नाही.
पण आता हळूहळू बेस तयार होतोय.
दिल्लीमध्ये आलेल्या ६७ जागा आणि गेल्या वर्षभरात मोदी सरकारने प्रामाणिकपणे केलेले काम यामुळे तर लोकांमध्ये उत्सुकता अजून वाढली आहे.
पंजाबमधली निवडणूक ठरवेल, आप दिल्लीपुरता मर्यादित राहतो की दिल्लीच्या बाहेरसुद्धा येऊ शकतो.

पैसे खर्च करायचे तर जरूर करा पण ते स्वतः उभे करा आणि खर्च करा. करदात्यांचे पैसे असे खर्च करायचा तुम्हाला काय अधिकार? (आता प्लीज इतर पक्ष पण असेच करतात हे सांगू नका. अगदी शीला दिक्षित सरकारचे अ‍ॅडव्हर्टायझिंगचे बजेट २५ कोटी होते).

इतर पक्षसुद्धा असेच करतात हे का नाही सांगायचे ? :O
श्रीगुरूजींना खाली रिप्लाय केलाय एक.
त्यात सत्तेत आल्यानंतर ६ महिन्यांत भाजपाने किती खर्च केले याची आकडेवारी दिली आहे.

देवांची पार्टी आहे का आम आदमी पार्टी ?
एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची आता भाजप-कॉंग्रेससोबत तुलना व्हायला काही हरकत नाही आणि ती होणारच

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 4:58 pm | पुण्याचे वटवाघूळ

You are confusing what has been earmarked with what will be finally spent," said the government's media advisor Nagendar Sharma to NDTV.
He also said that the publicity budget appears outsized because it clubs together the allocation for every government department.

याला वेड पांघरून पेडगावला जाणे म्हणतात. अमाऊंट इअरमार्कड म्हणजे अमुक इतकी रक्कम सरकार खर्च करणार आहे म्हणजेच एवढी रक्कम खर्च करायची तयारी सरकारची आहे असा त्याचा अर्थ होतो. सगळ्या वर्षाचे बजेट २-३ महिन्यात खर्च होत नसते. म्हणजे परत तुम्ही म्हणणार का ही रक्कम इअरमार्क्ड आहे म्हणून आणि खर्च झालेली नाही?

आणि सगळ्या मंत्रालयांची अ‍ॅड बजेटे एकत्र केली तर ५०० कोटी हा आकडा होतो आणि म्हणून तो मोठा दिसतो हे सांगणारे आणि असल्या हास्यास्पद खुलाशावर आपटार्ड सोडून कोणीच विश्वास ठेऊ शकणार नाही. शीला दिक्षित यांच्या सरकारचाच सगळी मंत्रालये मिळून २५ कोटी हा खर्चाचा आकडा होता तो २० पटीने का वाढला एवढा साधा प्रश्न आहे. पण कसे असते की असे प्रश्न आले की सोयीस्करपणे पळ काढायचा आणि वर इतरांवर कलटी मारायचा आरोप करायचा हा तुम्हा आपटार्डांचा खाक्याच आहे.

There is no denying the fact that that budget has been increased many fold to 500 crores, but that is the outer limit which the government can spend; it doesn't mean the government will end up spending as much.

असे म्हणणारा आणि त्यावर विश्वास ठेवणारा आपटार्डच असू शकतो. बजेट विधानसभेकडून पास करून घेणे याचा अर्थच कळलेला दिसत नाही. प्रश्न असा की ५००+ कोटी खर्च करायला विधानसभेकडून मान्यता मिळवली (आणि ती मिळणारच) की त्याचा अर्थ सरकारला तेवढे खर्च करायचा अधिकार मिळाला आणि म्हणजेच तेवढा खर्च करायची सरकारची तयारी आहे आणि इच्छाही आहे. सुरवातीला बजेटमध्ये काही रक्कम अ‍ॅलॉट केली आणी नंतर ती कमी पडते असे लक्षात आले तर सरकार पुरवणी मागण्या कधीही विधानसभेकडून मान्य करून घेऊन शकतेच.

तुम्ही इंग्लिशमध्ये कच्चे असलात तरी इंग्लिश नीट कळणार्‍या आपटार्डांसाठी लिहितो---we were not born yesterday.

ट्रेड मार्क's picture

3 Jul 2015 - 9:08 pm | ट्रेड मार्क

भारताने ४५० कोटी चे मंगळयान पाठवले होते तेव्हा काही लोकांना तो वायफळ खर्च वाटत होता. देशात एवढे गरीब भुकेलेले असताना एवढे पैसे मंगळयानावर कशाला खर्च केले असा सूर होता. त्या लोकांना या ५००+ कोटी जाहिरातीवर खर्च करण्यात काही चुकीचे वाटत नाही? कुठे पळाले सगळे?

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Jul 2015 - 10:21 am | पुण्याचे वटवाघूळ

शू... असे काय बोलता ट्रेड मार्क? हा ५०० कोटींचा क्षुल्लक खर्च आम आदमी पक्षासारखा क्रांतिकारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोदीविरोधी पक्षचे सरकार करणार आहे ना? मग ते सगळे प्रेस्टिट्यूट कशी त्या पक्षाची तळी उचलून धरायला पुढेपुढे करतील ते बघाच. असले प्रश्न विचारायची बंदीच आहे नाहीतर विचारणारा भ्रष्ट ठरतो.

मिसळ्पाववरच मंगळयानावर ४५० कोटी खर्च कशाकरता आणि तो कसा व्यर्थ आहे अशी चर्चा मदनाच्या पुतळ्यांनी सुरू केली होती.ते कुठे आहेत? की मोदी कसे वाईट, मोदी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये कसे नेणार या कल्पना लढविण्यात दंग आहेत?

मला तर या हजारे, केजरीवाल यांपैकी कोणाविषयीही किंचितही सहानुभूती असलेल्या कोणाविषयीही किंचितही सहानुभूती वाटत नाही.

(जगतील सर्वात भ्रष्ट) पुण्याचे वटवाघूळ

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 8:49 pm | श्रीगुरुजी

>>> देवांची पार्टी आहे का आम आदमी पार्टी ?

आआप देवांचा पक्ष आहे असा आआपभक्तांचाच गैरसमज होता.

>>> एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची आता भाजप-कॉंग्रेससोबत तुलना व्हायला काही हरकत नाही आणि ती होणारच

काही फरक दिसतोय का आआप व इतर पक्षात?

कर्ण-२'s picture

3 Jul 2015 - 12:56 pm | कर्ण-२

लेखक पक्का अंधभक्त वाटत आहे …

'आम' मुख्यमंत्री केजरीवालांच्या बंगल्यात ३० एसी

सर्वसामान्य दिल्लीकरांचे प्रतिनिधी म्हणून सत्तेवर बसलेल्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तथाकथित साधेपणाचे नवनवे किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. केजरीवालांच्या सरकारी बंगल्याचे जून महिन्याचे वीजबिल तब्बल १ लाख ३५ हजार रुपये आले असून त्यात केजरीवालांच्या दिमतीला असलेल्या ३० एसींचा मोठा वाटा असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऊर्जा संवर्धनाच्या गप्पा मारणाऱ्या 'आप'च्या भूमिकेवर त्यामुळं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

केजरीवालांचे सरकारी निवासस्थान नवी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स येथील फ्लॅग स्टाफ रोडवर आहे. या घरात तब्बल ३० एसी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यापैकी किती एसींचा खासगी वापर केला जातो, हे कळू शकलेले नाही. मात्र, त्यामुळं 'साधी राहणी व उच्च विचारसरणी'चे नारे देणाऱ्या 'आप'चा बुरखा फाटला आहे. केजरीवालांच्या घरात विजेचे दोन मीटर बसविण्यात आले आहेत. यापैकी एक मीटर मुख्यमंत्र्यांच्या घरगुती वापरासाठी, तर दुसरा मीटर मुख्यमंत्री कार्यालयासाठीचा आहे. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या मीटरवरील विजेचा दाब वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबाबतच्या अर्जात दोन्ही मीटर घरगुती वापराच्या कॅटेगरीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केजरीवालांच्या बंगल्याचे जूनचे विक्रमी बिल पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जून महिन्याच्या वीज बिलानुसार, केजरीवालांच्या निवासस्थानातील पहिल्या मीटरमध्ये २,५१० युनिट वीज वापरल्याची नोंद आहे. त्यापोटी २२,६८९ रुपये भरावे लागणार आहेत. तर दुसऱ्या मीटरमध्ये ११,६३७ युनिट वीज वापराची नोंद झाली असून त्याचे बिल १,१३,५९८ आहे. विजेचा दाब वाढविण्यासाठी केजरीवालांनी केलेल्या अर्जात दोन्ही मीटर घरगुती वापरासाठी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, एका मीटरचा वापर पूर्णपणे कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो. मुख्यमंत्र्यांचे जनता दरबार व अन्य बैठकाही येथे घेतल्या जातात. या साऱ्यासाठी होणारा वीजवापर व्यावसायिक सदरात मोडतो. त्यामुळं चुकीची माहिती दिल्याबद्दल केजरीवालांच्या कार्यालयाला नोटीस पाठवण्याचा विचार कंपनी करत आहे. एका मीटरचा वापर व्यावसायिक उद्देशाने होत असल्यानं एप्रिलपासून पूर्वलक्षीप्रभावाने वाढीव बिल वसूल केले जाईल, असं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं.

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 5:11 pm | पुण्याचे वटवाघूळ

आणी हाच माणूस आपण किती साधे हे दाखवायला पी.डब्लू.डी ला घरातील एसी काढून टाका असे सांगत होता (http://indianexpress.com/article/cities/delhi/kejriwal-wants-acs-in-his-...)

हे असले ढोंगी लोक बघितले की यांना चार माराव्यात आणि एक मोजावा असे वाटते.

नांदेडीअन's picture

4 Jul 2015 - 11:26 am | नांदेडीअन

या बातमीबद्दल मटाला ईमेल केलाय.
त्यांचे उत्तर आले की इथे कमेंट करतो.

वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! म्हणुन त्यांच ऑडीट झालच पाहीजे अस म्हणणारे केजरीवाल,
स्वतःच्या घरचे दोन्ही वीज मिटर मात्र घरगुती वापरासाठी आहेत अस सांगुन दोन्ही मीटर घरगुती वापराच्या कॅटेगरीत टाकण्याच्या सूचना देतात !

काळा पहाड's picture

3 Jul 2015 - 4:18 pm | काळा पहाड

वीजचोरीची केस घालायला हरकत नाही कंपनीला. तसंही दुसरं कुठलं तरी नाटक येणारच असेल.

सुबोध खरे's picture

3 Jul 2015 - 8:30 pm | सुबोध खरे

The discom is now arguing that the meter installed for official work should be a commercial one. "The secondary power meter is clearly meant for office work, meeting party workers, janta durbars etc which related to the commercial category. The application for load enhancement clearly stated that both meters would be used for domestic power consumption. We will have to raise revised bills in retrospect from April onwards," said sources in the discom.

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/47920662.cms?utm_source=...

जर दुसर्या मीटरवर व्यापारी दराने बिल लावले तर ते बिल दोन लाखाच्या वर जाईल. उगाच मी प्रामाणिक म्हणून दांभिकपणा करणे केजरीवाल साहेबांनी बंद केले तर त्यांच्या बद्दलच्या आदराची पातळी थोडी तरी वर येईल( जी आता रसातळाला जात आहे).
नांदेडीयन साहेब हि बातमी पूर्ण वाचा आणी मग वाद घाला. पेट्रोल बाबत सुद्धा मी स्पष्टपणे लिहिले आहे तेही पूर्ण वाचा.प्रतिसाद देण्याची घाई करू नका. आपला नेता हा दोषरहित आहे हा दुराग्रह सोडा. त्याच्या गुण दोषांसहीत त्याचे मूल्य मापन करा.

नांदेडीअन's picture

4 Jul 2015 - 11:58 am | नांदेडीअन

जर मिटरच्या वापरामध्ये खरंच अशी झोलझाल केलेली असेल, तर त्याचा तपास व्हायलाच हवा.
वीज कंपनीने लवकरात लवकर जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवावी, म्हणजे विरोधाला विरोध करण्यापेक्षा एक तरी खरा मुद्दा असेल विरोधकांकडे.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असे पक्षाचे सचिव दिलिप पांडे मिडियापुढे येऊन सांगत आहेत.
इतका तरी बेनेफिट ऑफ डाउट देऊयात त्यांना.
तरीही झालीच दरवाढ, तर मग मिळून शिव्या घालूयात की.

अजून एक.
मी केजरीवाल यांचा समर्थक नाहीये, मी आदमी पार्टीच्या विचारधारेचा समर्थक आहे.
आणि मला कळालेली त्यांची विचारधारा म्हणजे कामं करा आणि निवडून या. (तिसर्‍यांदा लिहितोय बहुतेक हे.)

उगी टीका करायची म्हणून कशावरही टीका करण्यापेक्षा त्यांच्या कामावर टीका करा.
जवळपास दोन वर्षं झाली, एक तोमर प्रकरण सोडले तर एकही असा मुद्दा दिसत नाहीये ज्यावर खरंच आम आदमी पक्षाचा विरोध करता येईल.
मफलर, लाईट बिल, योगेंद्र यादव, निसर्गोपचार केंद्र असे तर यांचे विरोधाचे मुद्दे.
अहो एखादा असा मुद्दा शोधून आणा ज्याच्यामुळे दिल्लीतील जनतेला त्रास होतोय, त्यांची कामं होत नाहीयेत किंवा जिथे पक्षाचे आमदार भ्रष्टाचार करत आहेत...

जोपर्यंत हे लोक जनतेची कामं करत आहेत, तोपर्यंत माझे त्यांना समर्थन असेल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Jul 2015 - 1:43 pm | पुण्याचे वटवाघूळ

अहो एखादा असा मुद्दा शोधून आणा ज्याच्यामुळे दिल्लीतील जनतेला त्रास होतोय, त्यांची कामं होत नाहीयेत किंवा जिथे पक्षाचे आमदार भ्रष्टाचार करत आहेत...

नांदेडियन राव अ‍ॅबसर्डिटीच्या सगळ्या मर्यादा ओलांडून बरेच पुढे गेले आहेत. झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.

केजरीवाल सरकारने महापालिकांना पैसे न दिल्यामुळे दिल्लीत कचर्‍याचे साम्राज्य माजले होते त्यामुळे दिल्लीतल्या लोकांना काहीच त्रास झाला नाही? इतके लोक (आपटार्ड) दिल्ली सरकारच्या सेवेत घेऊन त्यांना वरीष्ठ आय.ए.एस दर्जाच्या अधिकार्‍यांप्रमाणे पगार आणि गाडी-घोडे-बंगले दिल्यामुळे दिल्ली सरकारच्या खजिन्यावर काहीच ताण पडणार नाही का? त्याचा लोकांना काहीच त्रास होणार नाही का? त्या सबसिड्या देऊन सगळ्या गोष्टी जगाला फुकट द्यायच्या नादात दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च केजरीवालांनी कमी केला आहे असे ( http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3010116/AAP-slash...) त्याचा लोकांना काहीच त्रास होणार नाही? दिल्लीच्या लोकांनी सगळे फुक्ट पाहिजे म्हणून त्यांना निवडून दिले पण आता तुम्ही आणि तुमचे कर्म आणि भोगा कर्माची फळे असे म्हणत सोडून देण्याशिवाय इतर लोक काहीच करू शकणार नाहीत. आता ५ मिनिटात आठवले हे २-३ मुद्दे इथे लिहिले. त्यापेक्षा बरेच जास्त मुद्दे श्रीगुरूजींसारखे लिहू शकतील.

इतके होऊनही आपचे सरकार लोकाभिमुख आहे असे आपटार्डच म्हणू शकतील. आपचे समर्थन करणार्‍यांचा आय.क्यूच तपासायला झाला आहे. इतके गुडघ्यातला मेंदू असलेले लोक जगात सापडणे कठिण आहे.

नांदेडीअन's picture

5 Jul 2015 - 2:32 pm | नांदेडीअन

झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.

अगदी बरोबर बोललात बघा.
तुमच्याशी, श्रीगुरूजींसोबत आणि इतर १-२ जणांशी चर्चा करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पण तरीही मूर्खासारखा परत परत इथे का येतो माहित नाही.

केजरीवाल सरकारने महापालिकांना पैसे न दिल्यामुळे दिल्लीत कचर्‍याचे साम्राज्य माजले होते त्यामुळे दिल्लीतल्या लोकांना काहीच त्रास झाला नाही?

Bad roads, rampant disease and no women's toilets: Delhi suffers as MCD sits on crores meant to help fix Capital
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2551809/Bad-roads...

Municipal Corporation of Delhi: Blank Balance
http://indianexpress.com/article/cities/delhi/municipal-corporation-of-d...

Delhi police & MCD found 'most-corrupt'
http://www.ndtv.com/cities/delhi-police-mcd-found-most-corrupt-424277

Indian capital Delhi pays 22,000 'ghost workers'
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/8380010.stm

MCD spends Rs 12 crore on website over 9 years...And it's still breaking down!
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2224500/MCD-spend...

Over 2,500 vacancies in the SDMC leave city in disarray
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2576442/Over-2-50...

हे सगळे लेख जरा काळजीपूर्वक वाचा.
लेख कधी लिहिलेला आहे ती तारीखसुद्धा काळजीपूर्वक तपासा.
आणि मग सांगा की या सगळ्या गोंधळासाठी आम आदमी पक्षाचे सरकार कसे जबाबदार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून तिन्ही पालिका भाजप चालवत आहे.
यांना महसूल भेटत नसेल का हो काही ?
खरंच इतक्या लॉसमध्ये आहेत का या पालिका ?
भ्रष्टाचारासाठी विश्वभरात फेमस झाल्या आहेत या पालिका. हेसुद्धा आम आदमी पक्षामुळेच का ?

वरचे लेख/बातम्या वाचल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतरच्या या काही बातम्या वाचा.

Will release funds for EDMC workers' salaries: Sisodia
http://zeenews.india.com/news/delhi/will-release-funds-for-edmc-workers-...

Delhi government to give Rs 500 crore to clear NDMC & EDMC workers' pay arrears
http://businesstoday.intoday.in/story/delhi-government-to-give-rs-500-cr...

Arvind Kejriwal-led Aam Aadmi Party MLAs clean garbage-littered streets of Delhi
http://www.financialexpress.com/article/miscellaneous/arvind-kejriwal-le...

"इतके लोक (आपटार्ड) दिल्ली सरकारच्या सेवेत घेऊन त्यांना वरीष्ठ आय.ए.एस दर्जाच्या अधिकार्‍यांप्रमाणे पगार आणि गाडी-घोडे-बंगले दिल्यामुळे दिल्ली सरकारच्या खजिन्यावर काहीच ताण पडणार नाही का?"

केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत.
किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की यात नियमबाह्य काहीही झालेले नाहीये.
जर काही नियमबाह्य असेल तर भाजपाने ते लोकांपुढे आणायला पाहिजे.
विरोध करायला एक तरी जेन्युईन मुद्दा मिळेल आपल्या सगळ्यांना

त्या सबसिड्या देऊन सगळ्या गोष्टी जगाला फुकट द्यायच्या नादात दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च केजरीवालांनी कमी केला आहे.

महिन्याला २०,००० लिटर पाण्याव्यतिरिक्त अजून काय फुकट भेटत आहे दिल्लीच्या जनतेला ?
४०,००० करोडच्या बजेटमधून वीज आणि पाण्यासाठी एकूण ३०० करोडची सब्सिडी दिली आहे.
त्याच्या मोबदल्यात १,००० करोडचा एक्स्ट्रा टॅक्स VAT च्या रूपात मिळवला होता.
यातून नेमका कुठे आणि कशा प्रकारचा त्रास झाला जनतेला ?
किंवा असं तर नाही की भाजपाने दिलेली सब्सिडी सामान्य जनतेसाठी फायद्याची आणि आपने दिलेली सब्सिडी जनतेला त्रस्त करणारी ?

या बजेटमध्ये मागच्या बजेटपेक्षा ३२% जास्त राखून ठेवले आहेत अर्बन डेव्हलपमेंटसाठी.
(माहितीचा स्त्रोत - http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-budget-housing-funds...)

शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद मागच्यापेक्षा १०६ टक्क्यांनी वाढवली आहे, याबद्दलसुद्धा काही बोला.
I was very happy that education got highest budget in Delhi Government.
So, I am sure that they will build a capacity with skills of education and good citizen
- APJ Abdul Kalam

इतके गुडघ्यातला मेंदू असलेले लोक जगात सापडणे कठिण आहे.

परत तेच !
अगदी मनातले बोललात.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2015 - 8:11 pm | श्रीगुरुजी

>>> आणि मग सांगा की या सगळ्या गोंधळासाठी आम आदमी पक्षाचे सरकार कसे जबाबदार आहे.

दिल्लीतील महापालिकांना कचरा सेवकांच्या पगारासाठी दिल्ली राज्य सरकारकडून निधी मिळतो. केजरीवालांनी तो निधी देण्यास नकार दिल्यामुळे ३ महिने कचरा विभाग सेवकांना पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संप केला व त्यामुळे दिल्लीत कचर्‍याचे ढीग साठले. शेवटी नायब राज्यपालांनी आपल्या अधिकारात ४८२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केल्यामुळे संप मिटला.

आता सांगा या गोंधळासाठी कोण जबाबदार आहे?

आणि तुम्ही वर ज्या भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या लिंक्स दिल्या आहेत त्याला काही अर्थ नाही. केजरीवाल आणि आआपवाल्यांना उठसूट कोणावरही निराधार भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे व्यसन आहे. शकुंतला गम्लीनची केस आठवत असेलच. दिल्लीचे मुख्य सचिव १० दिवसांच्या रजेवर जाणार होते, त्या फक्त १० दिवसांसाठी कोणाला हंगामी सचिवपदी नेमावे यासाठी सिसोदियांनी नायब राज्यपालांना जे पत्र दिले त्यात गम्लीन यांचे नाव होते. केजरीवालांना गम्लीनऐवजी पत्रातील दुसरीच व्यक्ती हंगामी सचिव म्हणून हवी होती. परंतु हंगामी सचिव म्हणून कोणाला निवडावे हा नायब राज्यपालांचा अधिकार असल्याने त्यांनी त्या फक्त १० दिवसांसाठी गम्लीन यांची नियुक्ती केल्यावर केजरीवालांचा संताप अनावर होऊन त्यांनी तमाशा केला. गम्लीन ह्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या असून वीज कंपन्याशी साटेलोटे करून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे असा त्यांनी जाहीर आरोप केला. हा आरोप अर्थातच पूर्ण खोटा होता. गम्लीन जर भ्रष्टाचारी होत्या तर हंगामी सचिवपदाच्या नावाच्या शॉर्टलिस्ट मध्ये त्यांचे नाव का पाठविले? नंतर ज्या दुसर्‍या सचिवांनी गम्लीन यांच्या नियुक्तीचे पत्र दिले त्यांच्या कार्यालयाला कुलुप लावून त्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्याचे विदूषकी कृत्यही केजरीवालांनी केले.

तात्पर्य, आआपवाले जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्याकडे सरळ दुर्लक्ष करावे.

>>> केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत.

३-४ वाहिन्यांवर या विषयावर चर्चा झाली आहे व भाजप प्रवक्त्याने याबाबतीत पूर्ण माहिती देऊन आक्षेप घेतलेला आहे.

>>> महिन्याला २०,००० लिटर पाण्याव्यतिरिक्त अजून काय फुकट भेटत आहे दिल्लीच्या जनतेला ?
४०,००० करोडच्या बजेटमधून वीज आणि पाण्यासाठी एकूण ३०० करोडची सब्सिडी दिली आहे.
त्याच्या मोबदल्यात १,००० करोडचा एक्स्ट्रा टॅक्स VAT च्या रूपात मिळवला होता.
यातून नेमका कुठे आणि कशा प्रकारचा त्रास झाला जनतेला ?

यालाच म्हणतात एका हाताने देऊन दुसर्‍या हाताने काढून घेणे. बादवे, व्हॅट वाढविणार असे त्या ७० कलमी जाहीरनाम्यात होते का? व्हॅट वाढीविषयी प्रत्येक गल्लीत, वॉर्डात जाऊन जनतेचे मत जाणून घेतले होते का?

मुख्य म्हणजे वीज आणि पाण्याची सबसिडी एकूण ३०० कोटींची आणि व्हॅटची वाढ एकूण १००० कोटींची. म्हणजे आवळा देऊन कोहळा काढला.

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Jul 2015 - 10:50 am | पुण्याचे वटवाघूळ

या बजेटमध्ये मागच्या बजेटपेक्षा ३२% जास्त राखून ठेवले आहेत अर्बन डेव्हलपमेंटसाठी.
(माहितीचा स्त्रोत - http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-budget-housing-funds...)

शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद मागच्यापेक्षा १०६ टक्क्यांनी वाढवली आहे, याबद्दलसुद्धा काही बोला.

एक गोष्ट समजत नाही. केजरीवालांकडे काय जादूची कांडी आहे का? शिक्षणावरचा खर्च १०६% नी वाढवला, अमुक दुसर्‍या गोष्टीवरचा खर्च आणखी काही टक्क्क्यांनी वाढवला, अ‍ॅडव्हर्टायझिंगवर तर ५२६ कोटींचे बजेट, वरीष्ठ आय.ए.एस द्रजाच्या पदांवर उपर्‍यांची नियुक्ती वगरे. या सगळ्याला पैसा कुठून आणणार केजरीवाल? दिल्ली सरकारचे उत्पन्न तितके वाधले का? की नंतर पैसा कमी पडला की परत 'बघा आम्हाला खर्च करायचा आहे पण केंद्र सरकार पैसा देत नाही' ही ओरड करायला हे परत तयार होणार?

केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत.
किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की यात नियमबाह्य काहीही झालेले नाहीये.

मग त्याच न्यायाने हगल्यापादल्या (टिपीकल सदाशिव पेठी शब्द आहे हा. उगीच वेगळे फाटे फोडू नका) ट्विट करणारे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर केवळ आपल्याकडेच उपाय आहे असा आविर्भाव आणणार्‍या केजरीवालांनी दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी का केली नाही? तो अधिकार दिल्ली सरकारला आहे की नाही माहित नाही. महाराष्ट्रात तरी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमता येतो राज्य सरकारला. दिल्ली सरकारला तो अधिकार नसेल तर मग आपल्या अधिकारात नसलेल्या अनेक गोष्टींची मागणी केजरीवाल करतात त्याप्रमाणे दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी त्यांनी केलेली नाही.

तुमच्याच भाशेत सांगायचे तर---किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की केजरीवालांनाही त्या कारभारात काही गैर वाटत नाही.

तुमच्याशी, श्रीगुरूजींसोबत आणि इतर १-२ जणांशी चर्चा करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पण तरीही मूर्खासारखा परत परत इथे का येतो माहित नाही.

कमालच झाली म्हणायची. कोणी तुम्हाला 'मुर्खासारखा' इथे येऊन मते मांडायची सक्ती केली आहे? तुम्ही तुमच्या इच्छेने येता आणि इतर लोक त्यावर प्रश्न विचारायला लागले तर वर म्हणायचे--'मी मूर्खासारखा का येतो हे समजत नाही' तर त्याला काही अर्थ नाही. इथल्या चर्चेत येऊन कोणी कोणावर मेहरबानी करत नाही तेव्हा असल्या वक्तव्यांना कोणीही फारशी धूप घालणार नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2015 - 1:33 pm | श्रीगुरुजी

+१

सहमत

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2015 - 2:10 pm | श्रीगुरुजी

>>> पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असे पक्षाचे सचिव दिलिप पांडे मिडियापुढे येऊन सांगत आहेत.
इतका तरी बेनेफिट ऑफ डाउट देऊयात त्यांना.
तरीही झालीच दरवाढ, तर मग मिळून शिव्या घालूयात की.

आआपवाल्यांनी एक नवीन युक्तिवाद सुरू केलाय. जरी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर वाढविण्याचे विधेयक दिल्ली विधानसभेने एकमताने मंजूर केले असले तरी पेट्रोल व डिझेल यांची दरवाढ होईलच असे नाही असा दिलीप पांडेंचा युक्तीवाद.

काल एनडीटीव्ही वाहिनीवर हेच पांडे ५२६ कोटी रूपयांच्या जाहिरातीच्या तरतुदीबद्दल बोलत होते. जरी अंदाजपत्रकात सरकारच्या (खरं तर केजरीवालांच्या) जाहिरातीसाठी ५२६ कोटी रूपयांची तरतूद केली असली तरी म्हणजे ही उच्चतम मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च केला जाणार नाही व एवढा खर्च केला जाईलच असे नाही.

हा युक्तिवाद म्हणजे, जरी मी घरी दारूच्या १० बाटल्या आणून ठेवल्या असल्या तरी त्या सगळ्या पिणार असे नाही, असे म्हणण्यासारखे आहे. उद्या केजरीवालांचा उदोउदो करणार्‍या जाहिरातींवर सर्व ५२६ कोटी उधळले तरी हे म्हणायला मोकळे हा कायदेशीर खर्च आहे कारण विधानसभेने याला मान्यता दिली आहे. आणि कमी खर्च केले तर डांगोरा पिटायला मोकळे की बघा, ५२६ कोटी रूपये खर्चाची कायदेशीर मान्यता असून आम्ही कमी खर्च केले आणि आमचा साधेपणा सिद्ध केला.

असला भंपक युक्तीवाद फक्त आपटर्र्ड्सच्याच गळी उतरू शकतो.

>>>> अजून एक.
मी केजरीवाल यांचा समर्थक नाहीये, मी आदमी पार्टीच्या विचारधारेचा समर्थक आहे.
आणि मला कळालेली त्यांची विचारधारा म्हणजे कामं करा आणि निवडून या. (तिसर्‍यांदा लिहितोय बहुतेक हे.)

इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिराच्या धर्तीवर, केजरीवाल इज आआप आणि आआप इस केजरीवाल अशी परिस्थिती आहे.

>>> उगी टीका करायची म्हणून कशावरही टीका करण्यापेक्षा त्यांच्या कामावर टीका करा.

काही काम करायचा प्रयत्न केला असला तर टीका होईल ना. हे मुख्यमंत्री झाल्यापासून कामाच्या नावाने शंख.

आपल्या पक्षातील विरोधकांना मारहाण करून पक्षातून हाकलणे, राजस्थानमधल्या शेतकर्‍याला उचकवून आत्महत्या करायला लावणे, त्याच्या आत्महत्येचे खापर इतरांवर फोडून स्वतः नामानिराळे राहून त्याच्या आत्महत्येचा राजकीय फायदा उठविणे, स्वतःला व स्वतःच्या सहकार्‍यांना मोठमोठी सरकारी निवासस्थाने व गाड्या बहाल करणे, स्वतःचा उदोउदो करणार्‍या जाहिराती करणे, स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रशासनात पदे निर्माण करून त्यांना सरकारी निवासस्थाने, गाड्या व प्रचंड पगारावर ठेवणे, केंद्र सरकार व नायब राज्यपालांबरोबर रोज एक नवीन वाद निर्माण करून तमाशा करणे, नावडत्या सचिवांच्या केबिनला कुलुप लावून त्यांना काम करण्यास प्रतिबंध करणे, नावडत्या सचिवांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे, केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात आव्हान देणे इ. महत्त्वाच्या कामातच हे गर्क आहेत.

>>> जवळपास दोन वर्षं झाली, एक तोमर प्रकरण सोडले तर एकही असा मुद्दा दिसत नाहीये ज्यावर खरंच आम आदमी पक्षाचा विरोध करता येईल.
मफलर, लाईट बिल, योगेंद्र यादव, निसर्गोपचार केंद्र असे तर यांचे विरोधाचे मुद्दे.

वरचा परिच्छेद वाचा.

>>> अहो एखादा असा मुद्दा शोधून आणा ज्याच्यामुळे दिल्लीतील जनतेला त्रास होतोय, त्यांची कामं होत नाहीयेत किंवा जिथे पक्षाचे आमदार भ्रष्टाचार करत आहेत...

कचरा सेवकांचे आंदोलन हे उदाहरण पुरेसे आहे. एसीबी च्या प्रमुख पदावरून वाद निर्माण करून व त्याविरूद्ध न्यायालयात जाऊन व प्रमुखांशी संपूर्ण असहकार करून एसीबीचे कामही केजरीवालांनी ठप्प केले आहे.

>>> जोपर्यंत हे लोक जनतेची कामं करत आहेत, तोपर्यंत माझे त्यांना समर्थन असेल.

अजून त्यांनी कामच सुरू केले नाही, तरीसुद्धा तुम्ही त्यांचे समर्थन करीत आहात.

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2015 - 2:18 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांचं ४ महिन्यातलं अजून एक महत्त्वाचं काम -

स्वतःला बहाल केलेल्या घरात दोन घरगुती वापराचे मीटर बसवून (त्यातला एक घरगुती कामासाठी नसून सुद्धा) दर महिन्याला लाखो रूपयांची वीज वापरणे (वीजेचं बिल अर्थातच करदात्यांच्या पैशातून जाणार).

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2015 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबद्दल तक्रार चाल्नार नाय... यथा प्रजा तथा राजा या न्यायाने ही कृती योग्य आहे, (असे लोक म्हणतात असे ऐकले आहे) =))

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2015 - 8:47 pm | श्रीगुरुजी

>>> वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! म्हणुन त्यांच ऑडीट झालच पाहीजे अस म्हणणारे केजरीवाल,

निवडून आल्यावर महिनाभरात ऑडीट करून नंतर अजून वीजदर कमी करणार होते हे. अजून ऑडीटचाच पत्ता नाही.

नांदेडीअन's picture

4 Jul 2015 - 11:32 am | नांदेडीअन

ऑडिटच्या सद्यस्थितीबद्दल मी मागे कोणत्या तरी धाग्यावर बोललो होतो.
अधिक माहितीसाठी हे वाचा.
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAGs-discom-audit-over-but...

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2015 - 1:50 pm | श्रीगुरुजी

जर रिपोर्ट तयार आहे तर मग वीजेचे दर अजून कमी कधी होणार?

नांदेडीअन's picture

5 Jul 2015 - 2:39 pm | नांदेडीअन

प्रत्येक वेळी स्पुन फिडिंगच करून पाहिजे का हो तुम्हाला ?
त्या बातमीतला हा उतारा वाचा.
"Though the auditor has finalized its report on the discoms, a source said, it would not be possible to submit the same to the state government as the matter is subjudice. "

जर या रिपोर्टमध्ये आढळून आले की वीज कंपन्यांना नुकसानाऎवजी प्रॉफिटच झाले आहे, तर मग आप सरकार दिलेल्या वचनाप्रमाणे वीजेचे दर अजून कमी करेल.
आणि जर या रिपोर्टमध्ये असे आढळून आले की वीज कंपन्यांनी काहीच झोल केलेला नाहीये आणि त्यांना खरंच नुकसान झाले आहे, तर मग आप सरकार आणि केजरीवाल चांगलेच तोंडावर आपटतील.
मग वीज कंपन्या केजरीवाल आणि सरकारला परत कोर्टात खेचतील.
इतकं सोप्पं आहे ते.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2015 - 8:14 pm | श्रीगुरुजी

ठीक आहे. 'हे प्रकरण न्यायालयात आहे' हा एक्सक्यूज केजरीवाल अजून किती महिने/वर्षे वापरतात ते?

बादवे, फेब्रुवारीत वीजदरात ५०% कपात केली, परंतु मागील महिन्यातच वीजेचे दर पुन्हा ६% ने वाढविलेले आहेत. भविष्यातही असेच दर वाढत राहून मुळच्या दरापेक्षा जास्त दर होणार याची खात्री आहे.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

5 Jul 2015 - 10:05 pm | अरवीन्द नरहर जोशि.

सत्य परिस्थिति आहे.

सव्यसाची's picture

6 Jul 2015 - 11:08 am | सव्यसाची

http://www.hindustantimes.com/newdelhi/cm-kejriwal-asks-for-referendum-on-statehood-for-delhi-now/article1-1366231.aspx
अरविंद केजरीवाल दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा मिळावा कि नाही यावर जनमत चाचणी घेण्याच्या विचारात आहेत.

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Jul 2015 - 11:36 am | पुण्याचे वटवाघूळ

अरविंद केजरीवाल दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा मिळावा कि नाही यावर जनमत चाचणी घेण्याच्या विचारात आहेत.

खरोखरच असे सार्वमत झाले तर तो एक अत्यंत घातक पायंडा असेल. पार्लामेंट वगरे सगळे बंद करून सगळ्या गोष्टींवर सार्वमतेच घ्या. या अण्णा-केजरीवाल जोडगोळीला कायदे करायला पार्लामेंट हेच योग्य स्थान आहे, कायदे रामलीला मैदानावर होऊ शकत नाहीत असल्या गोष्टी भेजात घुसतच नाहीत.

दिल्लीला पूर्ण राज्य बनविले नाही त्याचे काहीतरी कारण आहे. उगीच मनात आले म्हणून कोणी असे निर्णय बदलू शकत नाही. वॉशिंग्टनही स्वतंत्र राज्य नाही तर ते वॉशिंग्टन डी.सी हा अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रदेश आहे. अमेरिकेत राज्यांना इतके अधिकार असतानाही राजधानीचे ठिकाण केंद्राने स्वतःच्ज्या अखत्यारीत ठेवले आहे. मग भारतासारख्या राज्यांना कमी अधिकार असलेल्या राज्यात ही मागणी का? आणि जरी तो निर्णय घ्यायचा असला तर तो कुठे घ्यायचा? लोकसभेत की रस्त्यावर? मतदान करणार्‍या सगळ्यांना अशा डायरेक्ट निर्णय घ्यायची इंप्ल्किएशन्स समजली असतील का? मग त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास ती जबाबद्दारी कोण घेणार?

पण या सगळ्या गोष्टी त्या आपटार्डांच्या आणि मुख्य म्हणजे त्या केजरीवालच्या टाळक्यात कशा शिरायच्या?

घातक पायंडा आहे याच्याशी सहमत.
मुळात संविधानामध्ये असे काही कलम आहे का जे जनमत चाचणी घ्यायला परवानगी देईल. जनमत चाचणीच हवी असेल तर ती निवडणूक असते असा माझा समज आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जर दिल्ली ला पूर्ण राज्य द्यायचे कि नाही हा मुद्दा फक्त दिल्लीकर ठरवू शकतात का? दिल्ली हि देशाची राजधानी आहे. तिथे देशाच्या संदर्भातील सर्वात महत्वाच्या गोष्टी घडत असतात. जर दिल्लीच्या संदर्भात असा प्रस्ताव असेल तर इतर लोकांनी पण आपले मत का नोंदवू नये?
कुठल्याही राज्याचे विभाजन करण्यासाठी संविधान दुरुस्ती अपेक्षित असते. ज्यात २/३ बहुमत दोन्ही सभागृहात आणि १/२ राज्यांची परवानगी असे सूत्र असते. जर दिल्ली हे राज्य करायचे असल्यास ती पद्धत असेल असे वाटते. मग जनमत चाचणीसाठीही तसे काही सूत्र असावे का?

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Jul 2015 - 12:18 pm | पुण्याचे वटवाघूळ

मुळात संविधानामध्ये असे काही कलम आहे का जे जनमत चाचणी घ्यायला परवानगी देईल. जनमत चाचणीच हवी असेल तर ती निवडणूक असते असा माझा समज आहे.

संविधान? कसले संविधान? कोणते संविधान?

केजरीवाल म्हणतात तोच प्रामाणिकपणा, केजरीवाल म्हणतात तेच संविधान हे तुम्हाला माहित नाही का? सगळ्या गोष्टी केजरीवाल म्हणतील तशाच व्हायला हव्यात हे तुम्हाला माहित नाही का?

कारण राजधानीमध्ये संसद, राष्ट्रपती भवन आणि इतर महत्वाची आस्थापने असतात. देशाच्या दृष्टीने महत्वाच्या व्यक्ती भरपूर प्रमाणात असतात. तसेच वेगवेगळ्या देशांच्या consulates आणि त्या देशांचे प्रतिनिधी व अधिकारी कायम स्वरूपी असतात. विविध देशांच्या अतिमहत्वाच्या व महत्वाच्या व्यक्तींची सतत ये जा चालू असते.

या सर्वांची सुरक्षा एका राज्यावर टाकू शकत नाही. त्यामुळे केजरीवाल असताना किंवा नसताना दिल्ली संपुर्ण राज्य होणे धोकादायक आहे. त्यात केजरीसारखा माणूस असताना तर नकोच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2015 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

प्रशासनिक विचार केला असता राजधानीला (दिल्लीला) पूर्णच काय पण अर्ध राज्याचा दर्जा देणे ही सुद्धा घोडचूक आहे. भारतीय राजकारणाची सद्य पद्धती आणि त्यात असलेले हितसंबंध पाहता, ही चूक करणे सोपे होते पण ती निस्तरणे हे खूप गुंतागुंतीचे आणि डोकेदुखीचे आहे. करणारे करून बसले, देश मात्र पुढे बराच (? अनंत) काळ तिचे दुष्परिणाम भोगत राहील हेच दिसते आहे :(

काका अगदि समर्पक आणि योग्य प्रतिसाद. राज्याच्या ऐवजि जर NCR (National Capital Region) ह्या एवढया शब्दानुसार प्रशासनिक व्यवस्था बसवायला हवी होति, अ‍ॅटलीस्ट सुरक्षेच्या कारणास्तव तरी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Jul 2015 - 11:57 am | पुण्याचे वटवाघूळ

मुख्य म्हणजे तो जोकर मुख्यमम्त्री असेपर्यंत तरी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा अजिबात मिळाला नाही पाहिजे.

उद्या अमेरिकेचे अध्यक्ष भारत भेटीवर असताना या वायझेड माणूस कुठला तरी मुद्दा घेऊन धरण्यावर बसायचा. त्याने आणि आम आदमी पार्टीने पॅलेस्टाईनवरच्या इसराईलच्या हल्ल्याविरोधात मेणबत्ती मोर्चा काढलाच होता.अमेरिकेचा इसराइलला पाठिंबा आहे हे सगळ्यांना माहित्ये. मग म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भेटीविरोधात असले तमाशे करायलाही तो माणूस कमी करायचा नाही. त्यात भारताची नाचक्की झाली तरी याचे काय जाणार आहे? त्याला स्वतःचा उदोउओद करता आला की झाले.

दिल्लीला राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर जबाबदारीची जाणीव असलेला मुख्यमंत्री आहे याची खात्री करूनच द्यावा.

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 Jul 2015 - 10:40 am | पुण्याचे वटवाघूळ

ऐका हो ऐका....

जगातील सर्वात स्वच्छ आणि प्रामाणिक पक्ष---आम आदमी पक्ष बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करणार हो. ते स्वतः निवडणुक लढवणार असतील तर स्वतःचा प्रचार करायचा त्यांना अधिकार आहेच. पण ते स्वतः निवडणुक लढवणार नाहीत तर टॅक्टिकली भाजपविरोधात प्रचार करणार आहेत. आणि भाजपविरोधी आघाडीत लालूप्रसाद यादव यांचाही समावेश आहे. म्हणजेच भाजपविरोधी प्रचार याचाच अर्थ ते लालूंना मदत करणार हो.... आणि अर्थातच केजरीवाल आय.आय.टी मधले म्हणजेच हुषार असल्यामुळे बोलताना ते म्हणणार की ते भाजपविरोधी प्रचार करणार. पण भाजपविरोधी प्रचाराचा फायदा लालूंना होणार हे सूज्ञांना वेगळे सांगणे न लागे. वाचा--- http://www.firstpost.com/politics/bihar-polls-2015-aap-not-contesting-el...

जर का यांना भ्रष्टाचाराची इतकीच पडली असती तर लालू सारख्या न्यायालयाने शिक्षा दिलेल्या भ्रष्ट राजकारण्याविरूध्द का बोलत नाहीत? भाजप भ्रष्ट आहे हे मान्य.पण लालू त्याच्यापेक्षा नक्कीच भ्रष्ट आहेत. तरीही हे लालूंविरूध्द काही बोलत नाहीत पण भाजपविरूध्द बोलतात याचा अर्थ स्पष्ट आहे. या माणसाचा भ्रष्टाचाराविरोधातला लढा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे.

या गोष्टीविषयी नांदेडिअनसारखे आपटार्ड नेहमीप्रमाणेच काही बोलणार नाहीत.

डिजगस्टींग!!

श्रीगुरुजी's picture

7 Jul 2015 - 11:30 am | श्रीगुरुजी

केजरीवालांनी ज्या तर्‍हेने प्रचार केला व निवडून आल्यानंतर त्यांचे दिल्लीत जे काही चालू आहे, ते पाहून मला जॉर्ज ऑरवेलच्या अत्यंत गाजलेल्या "अ‍ॅनिमल फार्म" या पुस्तकाची आठवण होत आहे.

आम आदमी का फैला हुआ रायता सिमटता दिख नही रहा !! आजतक

पंजाबातील आआपचे तीन खासदार बंडखोरीच्या मुड मध्ये आले आहेत, संजय सींग विरुद्ध !
कुमार विश्वासच्या पी ए ने त्या मुलीला भर दिवशी धमकावले !
आआपचे पुर्वी चे कायदा मंत्री सोमनाथ भारतीनां अटकपुर्व जामिन कोर्टाकडुन फेटाळले !

डँबिस००७'s picture

8 Jul 2015 - 2:55 pm | डँबिस००७

<<<<<<<<खरोखरच असे सार्वमत झाले तर तो एक अत्यंत घातक पायंडा असेल. पार्लामेंट वगरे सगळे बंद करून सगळ्या गोष्टींवर सार्वमतेच घ्या. या अण्णा-केजरीवाल जोडगोळीला कायदे करायला पार्लामेंट हेच योग्य स्थान आहे, कायदे रामलीला मैदानावर होऊ शकत नाहीत असल्या गोष्टी भेजात घुसतच नाहीत. >>>>>>>>>>>>

असल्या गोष्टी भेज्यात घुसत नाहीत ? अरे तो माणुस आयआयटीचा ईंजीनीयर आहे आणी वर आयएस सुद्धा !! दिल्ली सारख्या राजधानीला पुर्ण राज्याचा दर्जा मिळावा वैगेरेच्या गोष्टी मुद्दाम करत आहे, कारण कोणी तरी देशाच्या वाईटावर असलेलाच त्याच्या मागे उभा आहे आणी त्यामुळेच तो अस करत आहे.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 4:18 pm | संदीप डांगे

अरेवा! बराच धुमाकूळ चाललाय की इथं! वा वा वा. चलु द्या!

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Jul 2015 - 4:44 pm | पुण्याचे वटवाघूळ

अरेवा! बराच धुमाकूळ चाललाय की इथं! वा वा वा. चलु द्या!

धुमाकूळ नाही हो. मिपावर असे होण्याला धाग्याचा काश्मीर होणे म्हणतात. ते का हे माहित नसल्यास काळे काकांचा इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? हा मिपाप्रसिध्द धागा बघावा.

विकास's picture

8 Jul 2015 - 8:14 pm | विकास

आता नवीन शब्दप्रयोग करूयातः "धाग्याचा केजरू होणे"! ;)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

9 Jul 2015 - 5:20 pm | ईश्वरसर्वसाक्षी

AAP Lawmaker Manoj Kumar Arrested by Delhi Police in Land Grab Case

पुण्याचे वटवाघूळ's picture

9 Jul 2015 - 5:45 pm | पुण्याचे वटवाघूळ

यापुढे कोणीही आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करू लागला तर त्यावर मतदार विश्वास ठेवणे कठिण आहे. मग ती पार्टी विथ डिफरन्स (बीजेपी) असो की स्वयंघोषित प्रामाणिक पक्ष (आप).आता मतदार एवढेच म्हणू शकतो की खायचे तर खा पण निदान कामे तरी करा.

बीजेपीने पार्टी विथ डिफरन्स हे स्लोगन तसेही खूप वर्षात वापरलेले नव्हते. आणि बंगारू लक्षण आणि येडियुरप्प प्रकरणानंतर बीजेपी भ्रष्ट नाही हे कोणीच म्हणू शकणार नाही. तसेही बीजेपीचे पार्टी विथ डिफरन्स हे स्लोगन १९९६-९८ नंतर वापरलेले बघितलेले नाही आणि त्यांनी वापरले असते तर ते तोंडावर आपटले असते हे नक्की. सध्याच्या कालात आप ही नवीन स्वयंघोषित 'पार्टी विथ डिफरन्स' झाली होती. तो पक्षपण तसाच म्हटल्यावर असल्या सवयंघोषित पार्टी दिथ डिफरन्सेसना लोक फाट्यावर मारतील यापुढे. हे असे सिनिसिझम सध्याच्या काळात मतदारांमध्ये आणण्यात केजरीवालांचा हात मोठा आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2015 - 8:33 pm | श्रीगुरुजी

नशीब यावेळी आशुतोष आणि कुमार विश्वास गप्प राहिले.

गजेंद्रसिंहला आत्महत्या करायला भाग पाडल्यावर हाच आशुतोष आजतक वाहिनीवर 'आशुतोषाश्रू' ढाळत भेसूर आवाजात ढसाढसा रडण्याचा बेमालूम अभिनय करीत होता.

नंतर ९ जूनला जितेंद्र तोमरला अटक झाल्यावर तर आआपवाल्यांचा तमाशा बघण्यासारखा होता. आशुतोष कॅमेर्‍यापुढे येऊन केंद्र सरकारच्या नावाने बेंबीच्या देठापासून किंचाळत होता आणि तोमरला पोलिसांनी मारहाण करून कबुलीजबाब घेतल्याचे सांगत होता. कुमार विश्वास सुद्धा केंद्र सरकार, मोदी, राजनाथ सिंह इ. ना शिव्या घालत होता. सिसोदियांनी तर पत्रकार परीषद घेऊन दिल्लीत आणिबाणी आणली जात आहे असे तारे तोडले होते. आम्ही न्यायालये, पोलिस इ. ओळखत नाही असे संजयसिंह जाहीरपणे सांगत होता. आणि अवतारी महापुरूष मिठाची गुळणी घेऊन बसले होते. सर्वजण तोमरचे समर्थन करीत होते.

आज ९ जुलैला तोमरला अटक होऊन १ महिना झाला. त्याच्यावरचे आरोप गंभीर असल्याने व त्याच्याविरूद्ध सबळ पुरावे सापडल्याने न्यायालय त्याला जामिनावर सोडण्यास तयार नाही. तो अजूनही तुरूंगात आहे.

या पार्श्वभूमीवर मनोजकुमारची अटक आआपने फारच सौम्यपणे घेतल्याचे दिसतेय.