केजरूके गुलाम

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
31 Mar 2015 - 9:50 pm
गाभा: 

जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.

सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.

पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?

मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.

असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.

केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.

नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.

प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.

हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.

अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.

या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).

या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया

पॉइंट ब्लँक's picture

31 Mar 2015 - 10:00 pm | पॉइंट ब्लँक

लई भारी मुद्दे मांडले आहेत. आप ही जगातील आजवरची सगळ्यात जास्त भ्रष्ट मानसिकतेची पार्टी आहे.

फेसबूक वर एक मेमे आला होता. सनी लिओन आणि केजरीवाल ह्यांचात एक साम्य आहे - दोघेही म्हणतात, ये दुनिया पितलदी, बेबी डॉल मैं सोने दी!
सनी लिओनचा इतका वाईट अपमान ह्या आधी कुणी केला नसेल ;)

कहर's picture

1 Apr 2015 - 10:47 am | कहर

जबरी टोला

दिगोचि's picture

14 May 2016 - 9:44 am | दिगोचि

मला असे वाटते कि आप व इतर मोदीद्वेषीना एक चहा विकणार्याचा मुलगा बीए एमे या पदव्या मिळवू शकतो हे पटतच नाही त्यामुळे ते मोदीन्च्या प्रामाणिकपणा विषयी शन्का उपस्थित करत आहेत. यात गरिबावर अन्याय कसा होते हे कळते. या पदवीवादावरून केजरीवाल यान्ची लायकीकळुन येते. यावर आजच्या (१४ मे) मधे आलेला चेतन भगतचा ब्लॉग वाचा.

आजानुकर्ण's picture

31 Mar 2015 - 10:02 pm | आजानुकर्ण

चांगला लेख क्लिंटनशेठ. आपचे तोंड फुटणारच होते. दिल्लीत अजय माकन सारखा चांगला पर्याय सोडून केजरीवालला मतं दिली त्याचं आश्चर्यच वाटतं. मोदीभक्त आणि केजरीभक्त या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात.

अनुप ढेरे's picture

31 Mar 2015 - 10:28 pm | अनुप ढेरे

सहमत आहे. त्यापेक्षा राहूल-सोनिया भक्ति करावी. ;-)

आजानुकर्ण's picture

1 Apr 2015 - 6:33 pm | आजानुकर्ण

किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल या दोन तमाशासम्राटांपेक्षा अजय माकन हे चांगले नेतृत्त्व होते.

श्रीरंग_जोशी's picture

31 Mar 2015 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी

लेखनाच्या आशयाशी सहमत.

मूकवाचक's picture

1 Apr 2015 - 12:59 pm | मूकवाचक

+१

बन्डु's picture

11 Jun 2015 - 12:30 am | बन्डु

नौटंकी साला, घडी घडी ड्रामा करता है !

अर्धवटराव's picture

11 Jun 2015 - 2:20 am | अर्धवटराव

अर्थात, तुम्हाला नेमका विरु अपेक्षीत नसेल तर "नौटंकी साला" हरकत नाहि :)

अनुप ढेरे's picture

31 Mar 2015 - 10:25 pm | अनुप ढेरे

http://swarajyamag.com/politics/yadav-and-bhushan-deserve-no-sympathy/

हाही एक लेख वाचनात आला.

निमिष ध.'s picture

31 Mar 2015 - 11:42 pm | निमिष ध.

लेखाशी पूर्ण पणे सहमत आहे असे म्हणू शकत नाही कारण आपच्या या गोंधळामुळे मला दु:ख झालेले आहे, मी आनंदी नाही. ज्या राजकारणाला कंटाळून जनता आपला पर्याय म्हणत होती ते आता आप मध्ये पण सुरू झाल्याने परत सर्व सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडून निवडणूकांबाबत नैराश्य पसरू नये.

बाकी महापालीका निधी, केजरीवालांचा खर्च आणि उधळपटी याबाबत सहमत आहे.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 1:54 pm | क्लिंटन

सर्व प्रतिसाद देणार्‍या मिपाकरांना धन्यवाद. वेळ मिळेल त्याप्रमाणे संध्याकाळी आणि रात्री अधिक लिहितोच.

लेखाशी पूर्ण पणे सहमत आहे असे म्हणू शकत नाही कारण आपच्या या गोंधळामुळे मला दु:ख झालेले आहे, मी आनंदी नाही.

आआपमधील गोंधळामुळे आनंद वाटावा की दु:ख हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्यावेळी हा धागा मिपावर लिहिला होता.त्यावेळी समजलेच की भाजपचा धुव्वा उडाला याचा मोदीविरोधकांना आनंद झाला होता.तसे वाटणे हा लोकशाहीत प्रत्येकाला असलेल्या अनेक अधिकारांपैकी एक अधिकार आहे.पण तसे असेल तर आआपपुढे अडचणी उभ्या राहिल्या असताना आआपविरोधकांनी मात्र पक्षाविषयी सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा करता येणार नाही.

ज्या राजकारणाला कंटाळून जनता आपला पर्याय म्हणत होती ते आता आप मध्ये पण सुरू झाल्याने परत सर्व सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडून निवडणूकांबाबत नैराश्य पसरू नये.

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत.

दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगीचच ताकाला जाऊन भांडे लपवायचे ढोंग मला तरी जमत नाही) भविष्यात कोणीही भ्रष्टाचारविरोध, जनताभिमुख कारभार वगैरे मुद्दे घेऊन कोणी राजकारणी उभा राहिला तर त्याच्याकडेही जनता संशयानेच बघेल ही शक्यता जास्त.बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्‍हाड मारली आहे हे नक्की.

मराठी_माणूस's picture

1 Apr 2015 - 3:30 pm | मराठी_माणूस

दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहे

अशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 5:13 pm | क्लिंटन

अशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?

याचे कारण मला केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची मते आणि धोरणे मान्य नाहीत. जर कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांची धोरणे मला मान्य नसतील आणि म्हणून ते यशस्वी होऊ नयेत असे मला वाटत असेल तर केजरीवालांविषयी मात्र वेगळे मत मला ठेवता येणार नाही.

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत.

लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच.
कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल.

या प्रतिसादावर लिहिलेय तेच इथेही संदर्भासाठी परत लिहितोय.

आप अथवा मोदी यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती परंतु खूप सार्‍या मित्रांच्या यांच्याकडून असलेल्या आशा आणि विश्वास पाहून उत्सुकता होती.
सध्या जे काही चालले आहे ते पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की माझ्या पिढीच्या लोकांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात करायचे सुरु आहे (जे माझ्या वडिलांच्या पिढीत कदाचित व्हिपी सिंग, जद आणि तत्समांनी केले असावे).
आता पुढची पिढी आम्हाला विचारत येईल की तुम्ही एवढे उदासीन का तेव्हा कमीत कमी हे घटनाक्रम दाखवता तरी येतील..
असो.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 5:39 pm | क्लिंटन

लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच.
कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल.

याला अगदी +१००

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.

हे सर्व संस्कृतिंबाबत खरे आहे. आणि भारतीय राजकारणात तर खुप मोठे सत्य आहे. त्याचाच वापर मोदींनी अतिशय चातुर्याने करून घेतला. आता विचार करता, माझा कोणाच्या राजकारणाला व्यक्तीगत विरोध असा नाहीये. जो दिल्लीचा प्रयोग आहे (मोदी आणि केजरीवाल दोन्ही) जर सफल झाला असता तर तरूण पिढी हिरीरीने सक्रीय राजकारणात उतरली असती. आणि चांगले पुरोगामी (या शब्दाची वाट लावलेली आहे तरीही मुळ अर्थाला धरून) निर्णय घेण्यासाठी तरूणांचा राजकारणातील सहभाग खुप महत्त्वाचा असतो. परत गळ्यांत साखळ्या घातलेल्या दादा-भाईंचे राज्य येऊ नये यासाठीही ते उपयुक्त असते. तुम्हीच म्हटले आहे

बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्‍हाड मारली आहे हे नक्की.

त्याचाच मोठा शोक आहे!

जयन्त बा शिम्पि's picture

1 Apr 2015 - 12:41 am | जयन्त बा शिम्पि

लेखामधील विचारांबाबत सहमत, पण एकच प्रश्न उरतो. निवडणूकीत वारेमाप आश्वासने सर्वच पक्ष देतात.त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा मतदारांचा हक्क हेही मान्य. मग दिल्लीतील सर्व सामान्य जनतेने " आप " च्या उमेद्वारांमध्ये नेमके असे काय पाहिले कि भरभरून मते द्यावीत ? ह्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये " उडदामाजी काळे - गोरे काय निवडावे? " कोण कोण कसे रंग भविष्यात उधळणार हे पुढील काही महिन्यात दिसेलच, पण MCD भाजपाच्या ताब्यात , दिल्ली वर नायब राज्यपाल केन्द्राचा , लोकसभेमध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत , अशा परिस्थितीत आश्वासने कशी पुर्ण होणार ? दिल्लीकरांच्या नशिबी काय लिहिले आहे , हे त्यांनीच आता पाच वर्षे भोगावे . " यथा राजा , तथा प्रजा ' हे खरे कि ' यथा प्रजा , तथा राजा ' हे खरे ठरते ? पाहू या

केंद्रीय समितीची बैठक
अ. के. भाषण
https://www.youtube.com/watch?v=efn4QWGk7fA

कु. वि. भाषण
https://www.youtube.com/watch?v=zGXcCb7DPq0

दिल्ली मध्ये आता पर्यन्त केलेली कामे
ई-रेशन कार्ड - http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-to-la...

तक्रार पोर्टल - http://www.pgms.delhi.gov.in/home1.aspx

भ्रष्ट अधिकारी निलंबन - http://www.outlookindia.com/news/article/Five-Delhi-Govt-Officials-Suspe...

नाले सफाई - https://twitter.com/AapsaritaSingh/status/575944024881700864

ज्याचा त्याचा चष्मा.

काळा पहाड's picture

1 Apr 2015 - 2:40 pm | काळा पहाड

हे राज्य सरकारचं काम आहे?

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 2:46 pm | क्लिंटन

अहो यात ते वीजेचे बील ५०% ने कमी करणे आणि २० हजार लीटर पाणी अर्ध्यात देणे विसरलात का? :)

बाकी सुरवातीलाच केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्या भाषणांच्या लिंका बघून एका माजी मिपा आय.डी धारकाची आठवण झाली. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या वेळच्या रणधुमाळीत काहीही झाले तरी हे गृहस्थ केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत केलेले भाषण आणि केजरीवालांची राजदीप सरदेसाईंनी घेतलेली मुलाखत हेच पालुपद लावायचे. तुम्ही तेच तर नाही ना? :)

मिसळ's picture

1 Apr 2015 - 7:09 pm | मिसळ

http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-govt-in-delhi-keeps-po...

शोधले तर ह्या संदर्भात अनेक बातम्या सापडतील.

नाले सफाई चे काम करणे महत्वाचे कि ते कोणाच्या अख्यतारीत येते याची चर्चा करत बसायची. :)

दिगोचि's picture

14 May 2016 - 10:07 am | दिगोचि

तुम्ही वर लिहिलेल्या या सर्व गोष्टी त्यानीच काय पण इतर मुख्यमन्त्र्यानी करायलाच पाहिजेत. त्यासाठी केजरीवालान्ची स्तुती करायला नको. त्यानी दिलेली इतर वचने का पूर्ण केली नाहित हे त्यान्च्या भक्तानी त्याना विचारले पाहिजे.

विकास's picture

1 Apr 2015 - 2:54 am | विकास

मिसळ चटपटीत आणि पौष्टीक एकाच वेळी होऊ शकते हे समजले... अर्थात लेख चटपटीत आणि माहितीपूर्ण दोन्ही आहे!

बाकी, आपचे असे होणार होतेच... त्यामुळे दुर्दैवाने आश्चर्य वाटले नाही. दुर्दैवाने अशासाठी की लोकशाहीत सत्तेचा, विचारांचा बॅलन्स रहाण्यासाठी दोन बाजूंची गरज असते. अगदी एक बाजू कितीही कुठच्याही काळात योग्य आणि उत्तम असली तरी, असे माझे मत आहे.

आज काँग्रेस आणि काँग्रेसी विचारसरणीची बोंब आहे. प्रादेशिक पक्ष (सुदैवाने) थिजले आहेत आणि वर येण्याची शक्यता नाही. कम्युनिस्टांची पण तीच गत आहे. त्यामुळेच आपच्या निमित्ताने ज्यांना उजव्याशी वावडे आहे त्यांना आशादायक पर्यायी पक्ष निर्मण झाला होता. पण भंपक केजरीवाल आणि तितकेच भंपक आप श्रेष्ठी असल्यामुळे, "सपना मेरा तुट गया" अशी अवस्था झाली आहे.

ही विचार करण्याची वेळ या आप समर्थकांवर आली आहे, विशेष करून जे उच्चशिक्षित आहेत त्यांच्यावर. आधी जनता पार्टी, मग व्हि पि सिंग आणि आता म्हणजे अँटीक्लायमॅक्स केजरीवाल... तरी पण त्याच त्याच चकव्यात आपण का अडकतो या प्रश्नाचे उत्तर (या विचारवंत जनतेने) शोधणे महत्वाचे आहे.

शिवोऽहम्'s picture

1 Apr 2015 - 5:36 am | शिवोऽहम्

केजरीवाल अत्यंत आत्मकेंद्रीत आणि तुघलकी विचारांचा माणुस आहे. गप्पा जग बदलण्याच्या आणि वागणे मात्र 'मला पहा आणि फुलं वहा' असे.

आआपच्या जहाजाला भगदाड पडले आहेच, अनेक उंदीर आता धडपडत पोबारा करतील. दुर्दैवाने मेधा पाटकरांनीही नुकतीच सोडली पार्टी त्यामुळे जी थोडीफार पुण्याई पदरी होती तीसुद्धा जाते की रहाते असे झाले आहे.

नाखु's picture

1 Apr 2015 - 8:36 am | नाखु


मिसळ चटपटीत आणि पौष्टीक एकाच वेळी होऊ शकते हे समजले... अर्थात लेख चटपटीत आणि माहितीपूर्ण दोन्ही आहे!


याला प्रचंड अनुमोदन
टाळी खेच वाक्ये टंकायचा मोह टाळून तपशीलवार घटनाक्रम संगतीसह मापात टाकल्याने क्लिंटनभाऊंचे त्रिवार अभिनंदन..

एखाद्या विद्यार्थ्याला गरीब समजून मदत केली आणि तो व्यसना साठी गरीबीचे सोंग आणत होता असे झाले तर मदत्कर्त्याची जी भावना आहे तीच भावना दिल्लीकरांची असेल आणि यापुढे प्रत्येक प्रामाणिक नवविचारी/क्रांतीवादी नेत्यावरही संशयाने पाहिले जाईल हेच या सर्व प्रकरणाचे कटू पण वास्तव फलीत आहे.

खेडूत's picture

1 Apr 2015 - 8:54 am | खेडूत

दिल्लीतल्या घटनांचा मागोवा घेणारा चांगला लेख .

वेगळी मतं असणाऱ्यांच्या प्रतीक्षेत.

आणि क्लिंटनभौ सन्यासावरून परतले त्याबद्दल आभार ! :)

हुप्प्या's picture

1 Apr 2015 - 10:05 am | हुप्प्या

केजरीवालांनी पळपुटेपणा केला तरी दुसर्‍यांदा केलेल्या मेहनतीमुळे, प्रांजळपणे चूक कबूल केल्यामुळे दिल्लीकरांनी भरभरून दान दिले. आता तरी काहीतरी चांगले, अगदी आदर्शवत नाही तरी जरा बरे बघायला मिळेल असे वाटले होते. पण नाही.
मला हे अनाकलनीय वाटते. इतके भक्कम बहुमत असताना आपल्या खंद्या सदस्यांना काढून टाकण्याइतकी अवदसा का आठवावी? मतभेद सहन करुन एकत्र रहाणे इतके अवघड का व्हावे? तेही इतकी वर्षे एकत्र, खांद्याला खांदा लावून काम केल्यावर? हा निव्वळ हुकुमशाही, अहंकारी वृत्तीचा परिणाम का ह्या प्रकरणाला अजून काही कंगोरे आहेत?
अशाने लोकांचा विश्वास सर्व पक्ष गमावणार आहेत. लोकांनी, पक्षांनी कितीही आव आणला तरी शेवटी सगळे गटारगंगेतच न्हाणार असे एक निराशाजनक चित्र समोर येत आहे.

सुबोध खरे's picture

1 Apr 2015 - 10:06 am | सुबोध खरे

AAP म्हणजे अकेले अरविंद कि पार्टी

केजरीवाल हे एक अजब रसायन आहे. म्हणजे "धरलं त चावते अन सोडलं त पळते" अशी परिस्थिती आहे.
पण एक किस्सा आठवला यावरून. केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत, दिल्लीला स्वतंत्र राज्य बनवण्याची मागणी केजारीवालांनी केली होती. ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे.
त्यावर मोदींनी एक सूचक विधान केलं होतं," राजकारणात काहीही "कायमस्वरूपी" नसतं. परिस्थिती कधीही बदलू शकते".
केजारीवालांना या वाक्याचा अर्थ लवकरात लवकर कळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना !

आता या एकंदर पार्टी संबंधी बातम्यांचा आणि इतर गोष्टींचा पार कंटाळा आला आहे ! सगळा नुसता तमाशा !

जाता जाता :- चिखलात लोळणारी सर्व डुक्करे सारखीच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

तिमा's picture

1 Apr 2015 - 10:48 am | तिमा

लेख अगदी सत्यस्पर्शी आणि मुद्देसूद झाला आहे. राजकीय पक्ष काढणे व तो चालवणे हे इतकं सोपं नाही हे केजरीवालांना आता कळलंच असेल. जनता पक्षाच्या वेळची स्थिती आणि आपची स्थिती यांत साम्य वाटते. तेंव्हाही, एका 'अधु मेंदुच्या मधुने(आचार्य अत्र्यांच्या एका अग्रलेखाचे शीर्षक) एक ठिणगी टाकून मोठी आग पेटवली होती आणि स्वतःला शहाणे समजणारे असे सर्व नेते एकत्र राहू शकत नाहीत, हे भारतातल्या दुर्दैवी जनतेने पाहिले होते.
तत्वांचा अतिआग्रह धरला तर राजकीय पक्षच काय, एखाद्याचे वैयक्तिक जीवनही उध्वस्त होते.
अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 11:21 am | संदीप डांगे

अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.

+१०० खूप आवडलं हे वाक्य आपल्याला...

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:29 pm | क्लिंटन

तत्वांचा अतिआग्रह धरला तर राजकीय पक्षच काय, एखाद्याचे वैयक्तिक जीवनही उध्वस्त होते.

अगदी. त्यातून असा तत्वांचा वरकरणी आग्रह धरणारा माणूस प्रत्यक्षात त्याच्या विरूध्द वर्तन करताना पकडला गेला की त्याची पूर्ण नाचक्की होते.खरे तर कॉंग्रेस फोडायचा प्रयत्न केजरीवाल करत होते त्यातच नाचक्की झाली आहेच.तरीही गोष्टी फुकटात मिळतील म्हणून दिल्लीचे लोक अजूनही केजरीवालांना पाठिंबा देत असतीलही.शेवटी कुठलीच गोष्ट फुकट मिळत नसते आणि वरकरणी एखादी गोष्ट फुकट मिळत असली तरी त्याची किंमत भरावीच लागते हे लोकांना समजेल तो सुदिन.

अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.

+१. "मला अहंकार नाही" हे वाटणेच हा एक मोठा अहंकार असतो.त्याचप्रमाणे आपण किती साधे याचे ढोल जगभर बडवणे म्हणजे खरोखरच साधे नसल्याचेच लक्षण आहे. केजरीवालांचा नवीन नखरा म्हणजे मुख्यमंत्री बंगल्यातील ए.सी काढून टाका असे पी.डब्ल्यू.डी ला सांगितले.बरोबर आहे साध्या लोकांना करायचेत काय हे असले श्रीमंती थाट.ए.सी ला एक ऑन-ऑफ बटन असते ते वापरून ए.सी कधी चालू केलाच नाही तरी काम होणाऱ्यातले होते.पण त्यातून लोकांपुढे आपला साधेपणा कसा मिरवता आला असता? म्हणून हा नाटकीपणा.

चिगो's picture

1 Apr 2015 - 10:58 am | चिगो

उत्तम लेख.. फार काही बोलत नाही. उगाच 'भ्रष्टाचार समर्थक' ठरायचो..

कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये.

हे फार वाईट.. अश्याने दस्तुरखुद्द अरविंदबाबूंनी स्थापिलेली "स्टींग इकॉनॉमी" बंद पडेल की..

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2015 - 11:15 am | डॉ सुहास म्हात्रे

दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे सुंदर आणि समतोल विवरण.

सर्वात महत्वाचे म्हणजे केजरीवाल आणि आआपचा झेंडा हिरीरीने उचलून धरणार्‍यांची चिडिचूप ! आआपचे बहुतेक सर्व समर्थक स्वतःला शिक्षित आणि समजदार समजतात. पण, त्यांना अजूनही उघडपणे निरक्षिर विवेक करणे जमत नसेल तर, त्यांना "तथाकथित भारतिय अडाणी जनतेच्या गठ्ठा मतदारांपेक्षा" जास्त वेगळे असल्याची शेखी मिरवण्याची लाज वाटली पहिजे.

"स्खलनशीलता हा माणसाचा मूल स्वभाव आहे, तो टाळणे हे फार फार विरळ आहे. तेव्हा, कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची सतत अंध पाठराखण करणे किंवा सतत अंध विरोध करणे, हे दोन्ही शहाणपणाचे नाही." एवढी समजूत जरी त्यांना या सर्व प्रकरणातून आली तरी खूप मिळवले !

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 11:44 am | संदीप डांगे

जेंव्हा हे लोकपाल आंदोलन सर्वप्रथम सुरु झाले होते तेंव्हा अण्णा हजारे जिकडे तिकडे पेड जाहिरातींतून त्याबद्दल जनजागृती करत होते. बसेसमधे, टीवीवर सगळीकडे भरभरुन चिक्कार पैसे मोजून जाहिराती येत होत्या. एका टीवी कार्यक्रमात (कसलासा रीअ‍ॅलिटी शो होता बहुतेक) अण्णा हजारे केजरीवालचे 'इनके पास दो जोडी कपडा है,' इ. इ. वैगेरे वर्णन करून केजरीवाल कसे इमानदार आणि त्यामुळेच दोनच कपडे बाळगणारे सामान्य माणूस आहेत याची जाहिरात करत होते. त्याच वेळी मला हा सगळा प्रकार पार भंपक असल्याचा पूर्ण विश्वास होता. पुढे केजरीवालांची संपती दोन कोटींच्या वर आहे, त्यांची स्वतःची दोन-तीन घरे आहेत, चारचाकी गाडी आहे इत्यादी कळले तेव्हा खात्रीच झाली की हा सगळा बनाव पब्लिक ला *तिया बनवण्यासाठीच चालू होता. पण त्यावेळेस पब्लिक काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. यात सुशिक्षीत आणि जाणकार नागरीक यांचा प्रचंड भरणा होता.

प्रत्येकाचे खरे स्वरूप ओळखणे सोपे असते. आपणच आपले डोळे उघडून बघत नाही आणि फसवणार्‍यावर दोषारोप करतो. अजूनही आआपसमर्थक त्याच तंद्रीत आहेत.

बर्‍याच लोकांनी इथे व्यक्त केलेला धोका जो की भविष्यात कुणी अतिप्रमाणिक जरी उगवला तरी लोक विश्वास ठेवण्याची शक्यता नाही. नविन पिढितले नविन येडे परत हीच चूक करतीलच पण जुनी पीढी आपले व्रण आठवून दुरच राहील. ही फार मोठी शोकांतिका आहे या प्रकरणाची.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 6:10 pm | क्लिंटन

त्याचवेळी टिव्हीवर आणखी एक जाहिरात लागायची. अण्णा हजारे म्हणत होते-- "देशके लिए थोडा त्याग करना पडेगा. अण्णा इतना नही. थोडासा". अण्णांचे मार्ग मान्य नसूनही त्यांच्या कामाविषयीचा आदर कायम ठेवत म्हणतो की हा प्रकार त्यावेळी (आणि आताही) खटकला होता.आपल्याच तोंडाने आपण खूप त्याग केला आहे ही जाहिरात करायची? ही गोष्ट नक्कीच पटली नव्हती.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:31 pm | क्लिंटन

कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची सतत अंध पाठराखण करणे किंवा सतत अंध विरोध करणे, हे दोन्ही शहाणपणाचे नाही

+१

ग्रेटथिंकर's picture

1 Apr 2015 - 11:27 am | ग्रेटथिंकर

छान लेख आहे .आवडला .परंतु केजरिवाल काहि चुकिचे वागलेले नाहित .प्रशांत भुशन आनि योगेंद्र यादव पक्ष विरोधि काम करत होते .

...तत्सम इत्यादी इत्यादी आठ्वत आहेत आज ???

बाकी हे मात्र खरेच हो, 'केजरिवाल काहि चुकिचे वागलेले नाहित .प्रशांत भुशन आनि योगेंद्र यादव पक्ष विरोधि काम करत होते', हेच कुणाला कसे समजत नाही हाच एक मोठा गहन प्रश्ण आहे.

ग्रेटथिंकर's picture

1 Apr 2015 - 1:26 pm | ग्रेटथिंकर

मी नाना नाहि ,माईसाहेब हा वेगळा आय्डि आहे .फिलोसोफेर हे कोन नविन आहेत काय , या आधि त्यांचे नाव अएकलेले नाहि .

विशाखा पाटील's picture

1 Apr 2015 - 12:05 pm | विशाखा पाटील

विवेचन आवडले. खरे रूप लवकर उघड झाले, हे बरे झाले. पण लोकांचा आता अशा पर्यायांवर विश्वास बसणार नाही, हेही खरेच.
आजच्या लोकसत्तेतल्या लेखात योगेंद्र यादव यांनी तिसरा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या रस्त्याची मांडणी आता अवघड आहे.

मृत्युन्जय's picture

1 Apr 2015 - 12:11 pm | मृत्युन्जय

मला हा प्रश्न मेहमीच पडायचा की मोदी समर्थक नेहमीच विवेकाने लिहितात आणि बोलतात आणि आपटे नेहमीच एकतर्फी लिहितात, वाचतात, बोलतात, थिंकतात. तरीही मोदी समर्थकांना / प्रशंसकांना भक्त म्हटले जाते. महात्मा गांधी आणि नेहरुंनंतर मोदी हा एकमेव असा माणूस आहे की ज्याला इतका जनाधार लाभला. त्यामुळेच या प्रसिद्धीचे आकलन करण्याची विरोधकांची शक्ती कमी पडली आणि हे भक्तीचे टुमणे मागे लागले असे वाटते.

असो. एकुण सध्या आपट्ञांची चिडीचुप बघता त्यांना लाजिरवाणे गुलाम म्हणणेच बरे पडेल. अहो त्यांच्या पक्षात केवळ थोडासा विरोध केला म्हणुन योगेंद्र आणी भूषण सारख्या विजयामागच्या ब्रेन्सनाच जर केजरीवाल पक्षातुन काढणार असतील तर या लोकांकडे तर काही पोस्टही नाही. गुलामांना हे एव्हाना कळून चुकले असेल पण चूक मान्य करण्याची हिंमत फार लोकांमध्ये नसते. त्यामुळे जौद्यात मरे हुए को और क्या मारना. उदारपणे माफ करा बिचार्‍यांना.

हे आपटे कोण त्याचा विचार करत होतो. आत्ता ट्यूब पेटली. आप-टे अर्थात आपटार्ड.

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 1:16 pm | संदीप डांगे

आप-टलेले सुद्धा.

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 1:25 pm | बॅटमॅन

=))

आजानुकर्ण's picture

1 Apr 2015 - 6:35 pm | आजानुकर्ण

मोदी समर्थक नेहमीच विवेकाने लिहितात आणि बोलतात

अग्गदी खर्रंय.
मोदीभक्तांचे कैसे बोलणे । मोदीभक्तांचे कैसे चालणे । मोदीभक्तांचे सलगी देणे । कैसी असे ॥

असो. जागतिक मोदी दिनाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा.

मृत्युन्जय's picture

1 Apr 2015 - 7:06 pm | मृत्युन्जय

सकाळपासुन व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेला विनोदः

April Fools day shall extend to whole of India except the state of Delhi. They are being fooled since last 15 years first by Congress and then by AAP.

लेखनाच्या आशयामागील भावनेशी सहमत, कधी नव्हे ते एखाद्या पक्षात योगेंद्र यादवां सारखा सभ्य राजकारणी, पक्ष समितीवर असताना, निदान हा पक्ष तरी 'दहाव्या व्यक्तीची' भूमिकेत काम करेल असे वाटले होते, पण आता भ्रमनिरास झाल्यासारखं वाटत आहे.

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 12:15 pm | पिलीयन रायडर

लेख नेहमीप्रमाणेच खुप आवडला!

या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

निवडणुका संपल्या तरी अपप्रचार सुरूच आहे अजून !

"कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही."

केजरीवालला अन्ना आंदोलनाच्याही पूर्वीपासून डायबिटिज आहे हो.
कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.

"दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले.
आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच."

केजरीवाल बॅंगलोरमध्ये पोहोचण्याअगोदरच आप कर्नाटकाने केजरीवाल यांचा दौरा कसा असेल (itinerary) याची सगळी माहिती पोलिसांना दिली होती.
आणि केजरीवाल यांना कसल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा VIP ट्रिटमेंट देण्यात येऊ नये असे स्पष्ट सांगितले होते.
तरीही प्रोटोकॉल म्हणा किंवा ‘न्युज’ बनवण्यासाठी म्हणा, बॅंगलोर पोलिसांनी त्यांचा ताफा केजरीवाल यांच्या खाजगी गाडीसोबत ठेवलाच.

Refusing security protocol at the airport, Mr. Kejriwal got into Aam Aadmi Party (AAP) leader Prithvi Reddy’s car to go to Jindal.
However, the security vehicles followed Mr. Reddy’s car till the institute.
- The Hindu

बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ?
तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती.
हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card.
http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm
आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?

"भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो."

तुम्ही त्यांना धुतल्या तांदळाप्रमाणे समजता हे पाहून छान वाटले.
पण मी आणि माझ्यासारखे अनेक आप समर्थक त्यांना धुतल्या तांदळासारखे समजत नाही.
ते सुद्धा तुमच्या-आमच्यासारखे मनुष्य कुळातलेच आहेत, त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे आम्हाला माहित आहे.
पण आम्हाला हे सुद्धा माहित आहे की सध्या भारतीय राजकारणात सगळ्यात चांगला कोणता पक्ष असेल, तर तो म्हणजे आम आदमी पार्टी !
उद्या चालून भाजप किंवा कॉंग्रेसनेसुद्धा जनतेची कामं करायला सुरूवात केली, तर त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याची सद्बुद्धी दिलीये देवाने.
हां, ज्यांना असे वाटते की आपमध्ये सगळे देव-देवता आहेत आणि त्यांच्याकडून काहीच चुका होऊ शकत नाहीत, अशा लोकांना मात्र माझा साष्टांग दंडवत.

"केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले.
बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले."

केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम.
एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते.
आणि मुस्लिम आमदारांबद्दल केलेल्या स्टेटमेंटमध्ये काय चूक बोलला केजरीवाल ?
गल्लीतल्या शेंबड्या पोराला पकडून विचारले तर तोसुद्धा सांगेल की मुस्लिम लोकांचे आणि भाजपचे काय नाते आहे.
भाजप करत होता तो घोडेबाजारच होता !
व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याच्या युट्युबवर.
सापडला नाही तर सांगा, शोधून देतो.

" बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले"

परत तेच.
कॉंग्रेसने फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय मुस्लिम मतदारांचा आणि भाजपाचे मुस्लिम प्रेम जगजाहिर आहे.
अशा वेळी मुस्लिमांपुढे फक्त आप हा एकमेव पर्याय आहे हे सांगायला खरंच ज्योतिषाची गरज आहे का ?

"सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!!"

ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.
आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत.
जो गदारोळ त्या दिवशी सुरू होता, त्यात खालील काही बातम्यासुद्धा खपून गेल्या असत्या.
- योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला.
- गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला.
- प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले.

बाय द वे, रामदास यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आपने नवीन लोकपाल नियुक्त केले आहेत.
यावेळी फक्त एक लोकपाल न निवडता तीन लोकपाल निवडले आहेत.
१. एन. दिलीप कुमार (भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ ठरलेले माजी आयपीएस ऑफिसर)
२. राकेश सिन्हा (सीआयएसएफ चे माजी उपमहानिरीक्षक)
३. एस. पी. वर्मा (शिक्षणतज्ञ)

"केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? "

योगेंद्र यादव अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ धरण्यावर बसले होते.
असो.
ज्यांच्याकडे वैध ओळखपत्रं होती, निमंत्रणाचे SMS होते, त्यांनाच प्रवेश दिल्या जात होता.
आणि यावेळी दोन्हीकडच्या मंडळींकडून पक्षाशी किंवा कार्यकारणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्या जाऊ नये यासाठी प्रोसेस थोडी स्ट्रिक्ट केली होती आणि त्यामुळेच आत जायला जास्त वेळ लागत होता.
हे स्वतः आनंद कुमार यांनी आज तकसोबत बोलतांना सांगितले आहे.

योगेंद्र यादव स्वतः एका चॅनलला म्हणाले की बैठकीमध्ये कॅमेरे होते.
मिटिंगचे दोन व्हिडिओ युट्युबर टाकले आहेत पक्षाने.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी मागणी केली तर कदाचित पूर्ण व्हिडिओसुद्धा देण्यात येईल त्यांना.

कुमार विश्वास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ज्यांना योगेंद्र यादव बाऊन्सर्स म्हणत आहेत, ते चळवळीतूनच वर आलेले कार्यकर्ते आहेत.
हेच लोक नेहमी त्यांच्या पाया पडायचे म्हणे.
मिटिंगमध्ये त्यांनी योगेंद्र यादव यांना फक्त मंचावर येण्यापासून अडवले होते म्हणे.
कार्यकर्त्यांमध्ये मिसळता येत नसेल, त्यांना ओळखता येत नसेल तर ते चुकीचे आहे असे कुमार विश्वास म्हणत होते.

"पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. "

रमजान चौधरी असे त्यांचे नाव आहे. (माझ्या माहितीप्रमाणे यांना आत प्रवेश मिळावा म्हणूनच योगेंद्र यादव धरण्यावर बसले होते.)
हे रमजान चौधरी हरियाना विधानसभेत अपक्ष म्हणून उभे टाकल्यावर पक्षाने त्यांची सदस्यता रद्द केली होती.
यांना नॅशनल काऊंसिलमध्ये परत कुणी टाकले हे कोडेच आहे.
’मला मारहाण करण्यात आली, त्यात माझ्या पायाचे हाड मोडले.’ असा आरोप करत दोन दिवसांपासून मिडियापुढे फिरत आहेत हे महाशय.
कदाचित फेविकॉलने चिटकवले असेल हाड.

"हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!!"

या राजेश गर्ग यांनी बिन्नीचे सगळे रेकॉर्ड मोडायचे असे ठरवले आहे बहुतेक.
यांना म्हणावं पुरावे देऊन टाका आणि केजरीवालची विश्वासार्हता कमी करून टाका.

"कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही."

काडीमात्र इंटरेस्ट नसूनसुद्धा लिहिलेच की त्याबद्दल.
http://www.firstpost.com/politics/exposingkumarvishwas-yet-again-twitter...
हा एक चांगला लेख आहे.
जरूर वाचा.

मोदींच्या स्नुपगेट प्रकरणाबद्दल बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मोदींच्या पत्नींबद्दल काही बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

कुमार विश्वास यांच्या बाबतीत मात्र कसलाही पुरावा नसतांना नुसती चिखलफेक करा, त्यांच्या पत्नीलासुद्धा यात ओढून आणा.
काय आनंद मिळतो माहित नाही ब्वा !

"मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच."

दिल्लीच्या कारभाराचे काय तीनतेरा वाजले काही कळू शकेल का ?
दिल्लीच्या जनतेची कामं त्याच वेगाने होत आहेत.
आणि जोपर्यंत आम आदमी पार्टी जनतेची कामे करत राहिल, तोपर्यंत मी त्यांच्या कामाचे समर्थन करत राहिल.
मी या पक्षाचे समर्थन योगेंद्र यादव किंवा केजरीवालसाठी करत नाही तर हा पक्ष जनतेसाठी जो करतो, त्यासाठी मी त्याचे समर्थन करतो.

"म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.
मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला.
दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत."

नकार त्यासाठी दिलेला नाहीये.
भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायला नकार दिलाय आप सरकारने.
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर...
- जवळपास २५,००० कामगारांना (जे अस्तित्वातच नाहीयेत) दरवर्षी पगार देणे. यातून दरवर्षी १०० करोडचा चुना.
- दिल्ली महानगरपालिकेची वेबसाईट बनवण्यासाठी ७० करोडचे बजेट बनवून ठेवले आहे.
आत्तापर्यंत १२ करोड रूपये खर्च केले आहेत भाजपने त्याच वेबसाईटवर.
- डेंग्यु, मलेरियाच्या औषध फवारणीवर ३५ करोडचा खर्च.

ह्या अशा ‘प्रामाणिकपणासाठी’ पैसे मिळणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे.
तरी यातून काही मार्ग काढायचा असेल तर परत एकदा तीनही महापौरांसोबत चर्चेची तयारी असल्याचे आप सरकारने सांगितले आहे.

राहिला प्रश्न कचर्‍याचा, तर आपचे सगळे आमदार आपापल्या भागात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः कचरा साफ करत आहेत.
अशा बातम्या नाही दिसणार तुम्हाला कुठेही.

"या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?"

या इथले बोलायचे असेल, तर मिपावरच मी हे बोललो होतो की पक्षात सध्या जे चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे.
फेसबुकवर, व्हाट्सऍपवर, मित्रांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना सगळीकडे मी हेच बोललो आहे.
आपच्या ऑफिशिअल फेसबुक ग्रूपवर जाऊन बघा.
अक्षरशः दोन गट पडले आहेत.
एक केजरीवाल समर्थकांचा आणि एक YY, PB समर्थकांचा.
मी अजूनही दोघांपैकी एकाची बाजू घेऊ शकलो नाही, म्हणून कोण बरोबर आणि कोण खोटारडा हे सांगू शकत नाही.
योगेंद्र यादव मितभाषी असल्यामुळे साहजिकच लोकांना त्यांचे म्हणणे खरे वाटू शकते, पण जे पुरावे केजरीवालांचा ग्रूप देतोय, त्यावरून त्यांची बाजूसुद्धा पटत आहे. अन्यथा बहुमत केजरीवालांच्या बाजूने नसते.

बाय द वे, मिपावर भाजप समर्थकांनी NCP, PDP, मसरत आलम विषयांवर कुठे कुठे विरोध केला होता कळू शकेल काय ?
फेसबुकवरसुद्धा मी ज्या समूहांमध्ये आहे, तिथेसुद्धा भाजपचा या गोष्टींवर विरोध करणारे दिसले नाहीत.
तुम्ही ज्या ग्रूपमध्ये आहात त्यांची लिंक मिळेल का ?

फेसबुकवर मराठी माणसांचा हा एक ग्रूप आहे.
https://www.facebook.com/groups/kaustubhsgroup/
मिपावरचे अनेक सभासद तिकडे असतील.
कुणी हा प्रतिसाद वाचत असेल तर कृपया मला सांगा तुम्ही तरी कधी या ग्रूपमध्ये भक्तांना भाजपच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करतांना पाहिले आहे का ?

"या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. "

ओह !
तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ?
काय राव, तुमचाही वेळ घालवलात अन्‌ माझाही वेळ घालवलात. :(

केजरीवालांच्या कोणत्या रथाबद्दल बोलताय माहित नाही, पण जर दिल्लीच्या जनतेशी संबंधित असेल, तर परत सांगतो की त्यांची कामं त्याच वेगाने पार पडत आहेत.
परत परत स्पूनफिडिंग करायची माझी मुळीच इच्छा नाही.
ज्यांना आप करत असलेल्या कामाबद्दल माहिती हवी आहे, त्यांनी खालील लिंकवर जावे.

- https://www.facebook.com/AamAadmiParty
- https://www.facebook.com/AAPDelhiNCR
- आपच्या आमदारांचे ट्विटर हॅंडल्स.
ही त्यांच्या नावांची यादी.
http://www.elections.in/delhi/assembly-constituencies/2015-election-resu...

या तीन लिंक दिल्या कारण आप करत असलेल्या कामाबद्दल न्युज चॅनलवर तुम्हाला काही पाहायला मिळण्याची या जन्मात तरी शक्यता नाही.

ज्यांना काहीही जाणून घ्यायचे नसेल किंवा ऎकिव माहितीवर विश्वास ठेवायचा असेल त्यांनी त्यांची दिनचर्या सुरू ठेवावी.
मनःपूर्वक शुभेच्छा !

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 2:16 pm | क्लिंटन

या वाटच बघत होतो तुमची. इतर मुद्दांना नंतर उत्तरे देतो. सध्यापुरते---

कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.

:) जर ताणतणाव सहन होत नाहीत म्हणून शुगर वाढत असेल तर तो मनुष्य ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही हे नक्कीच.आणि नेतेपद किंवा मुख्यमंत्रीपद म्हटले की ताणतणाव आलेच.म्हणजे जो माणूस ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही तो नेता बनायला अयोग्य आहे एवढे साधे म्हणणे आहे.

बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ?
तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती.
हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card.
http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm
आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?

अहो तुम्ही नुसते रूमचे भाडे दिले आहेत वरच्या लिंकमध्ये.त्यापैकी नक्की कुठच्या रूममध्ये केजरीवाल होते? आणि खोलीभाड्याव्यतिरिक्त निसर्गोपचार केंद्रात विविध पॅक, डॉक्टरांचे कन्सल्टेशन या सगळ्यांचे मिळून दिवसाला २५ ते ३० हजार रूपये खर्च येणार असे इतरही अनेक लिंकांमध्ये म्हटलेले होते. आणि तरीही त्याला पंचतारांकित आश्रम म्हणायचे नाही? माझ्याच नात्यातले अनेक उरळीकांचनच्या आणि कर्नाटकातल्या घटप्रभा येथील निसर्गोपचार आश्रमांमध्ये अनेकदा गेले आहेत. तिथे दिवसाला ८००-१००० रूपयात होते हो सगळे. उगीच समर्थन करायचे म्हणून करू नका.केजरीवाल स्वतःला आम आदमी म्हणवत असतील तर त्या आम आदमीला दिवसाला २५-३० हजारांचा खर्च कसा काय परवडतो बुवा? की आम आदमी वगैरे नुसता मुखवटा?

टिपीकल समाजवादी लोक करतात तसे गरीबीचे उदात्तीकरण मला अजिबात आवडत नाही.पण जर तुमचा नेता एका बाजूने आम आदमी असायचा घोषा लावत असेल आणि तरीही दिवसाला २५-३० हजार खर्च असलेल्या ठिकाणी १०-१२ दिवस जाऊ शकत असेल तर तो (भारतीय स्टॅन्डर्डप्रमाणे) आम आदमी नक्कीच नाही आणि आम आदमी असल्याचा दावा म्हणजे ढोंग आहे.

यावर माहित आहे तुम्ही काय समर्थन करणार आहात ते-- बिइंग आम आदमी इज अ स्टेट ऑफ माईंड (राहुल गांधींच्या वक्तव्यावरून साभार). तसे असेल तर 'गिरा तो भी टांग उपर' सोडून दुसरे काय म्हणणार?

तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ?

:) बरोबर कोण आहे--केजरीवाल की यादव/भूषण याच्यात काडीमात्रही इंटरेस्ट नाही हो. माझ्यासाठी दोन्ही गट एकाच माळेचे मणी. पण आम आदमी पक्ष आणि केजरीवाल जे ढोंग करत आहेत ते उघडे करण्यात मात्र मला अतोनात इंटरेस्ट आहे.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 3:03 pm | क्लिंटन

केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम.
एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते.

सहा काँग्रेस आमदारांना फोडून त्यांचा वेगळा गट बनवून त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ असे केजरीवाल म्हणाले होते असे त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट आहे.आणि हेच केजरीवाल १६ जुलै २०१४ च्या ट्विटमध्ये म्हणत होते की भाजप काँग्रेस आमदारांना २० कोटी देत आहे.म्हणजे जे आमदार २० कोटीमध्ये विकले जात नाहीत त्यांना फोडायला आणखी जास्त रक्कम मागणार ही गोष्ट अगदी उघड आहे. तुम्हाला ती मान्य करायची नसल्यास गोष्ट वेगळी. आणि मोदींचा बागुलबुवा दाखवून आआप ती किंमत कमी करायचा प्रयत्न कशावरून करत नव्हता? आणि याउपरही या प्रकारामध्ये आणि त्याचवेळी नैतिकतेचे बुरखे परिधान करण्यात तुम्हाला काहीही गैर वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे: "भाजप करते तो घोडेबाजार आणि आआप करते ती political realignment" असे तुम्हाला वाटत असेल तर मग काय बोलणेच खुंटले.

वारंवार केजरीवाल आणि मोदी यांची तुलना का केली जाते हेच कळत नाही.
मी मोदी समर्थक आहे पण केजरीवाल विरोधक नाही ! पुराव्यादाखल खालील दुव्यावरील माझा प्रतिसाद वाचावा
http://www.misalpav.com/node/30156?page=
http://www.misalpav.com/node/30568
मोदी आणि केजरीवाल दोघांच्याही सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावरच करायचे असं ठरवले आहे.
पण सध्या घडत असलेल्या गोष्टी दुर्दैवी नक्कीच आहेत. आणि यामुळे आप वरचा जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो. या धाग्यावर पुढील लिंक दिली आहे.
http://swarajyamag.com/politics/yadav-and-bhushan-deserve-no-sympathy/

ही वाचल्यावर असे लक्षात येते की भूषण आणि यादव यांच्याविषयी केजरीवाल यांचे मत कधीच चांगले नव्हते. तरीसुद्धा भूषण आणि यादव यांची जनमानसातली इमेज लक्षात घेता केजरीवाल त्यांच्यासोबत वाटचाल करत राहिले. असं करण्यात काही गैर नाही. पण याचाच दुसरा अर्थ केजारीवालांनी त्या दोघांचा उपयोग करून घेतला व डोईजड झाल्यावर दूर केले असा होत नाही का ?
आप चे राजकारण इतर पक्षांपेक्षा काय वेगळे आहे

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 4:17 pm | क्लिंटन

ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.

खरं की काय? स्वतः रामदास वेगळेच काहीतरी बोलत आहेत .

आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत.

म्हणजे आपल्याला सोयीच्या वेळी पार्टीचे संविधान आठवते वाटते? योगेन्द्र यादव यांचे म्हणणे आहे की रामदास हे त्यापूर्वीच्या सगळ्या बैठकांमध्ये हजर असत . म्हणजे एखादा माणूस केजरीवालांच्या डोळ्यात खुपायला लागला की मग पक्षाचे संविधान आठवते आणि त्यावर बोट ठेऊन मग त्यांना अटकाव करायचा?

अशा गोष्टी सगळेच पक्ष कधीना कधी करत असतात.पण तसे असेल तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हा खोटा दावा करू नका.

आता "इंसान का इंसान से हो भाईचारा " असे जाहिरपणे म्हणायचे आणि फोन वर "इनके **पे लाथ मारके निकाल देता कोई इन्हे" हा कसला भाईचारा?ह्यावर आपले काय म्हणणे आहे?
परत नरेंद्र मोदींच्या नावाने खोटे फोन करुन पक्ष फोडायचा ह्याला काय म्हाणायचे?

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 5:55 pm | क्लिंटन

आता "इंसान का इंसान से हो भाईचारा " असे जाहिरपणे म्हणायचे आणि फोन वर "इनके **पे लाथ मारके निकाल देता कोई इन्हे" हा कसला भाईचारा?

केजरीवालांनी फोनवर शिवीगाळ केल्याचे समजले.पण नक्की हाच शब्दप्रयोग केला होता का याची कल्पना नाही.समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 5:58 pm | बॅटमॅन

समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.

आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 6:02 pm | क्लिंटन

आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.

म्हणजे गेल्या ४५ दिवसात मिपावर फ्याशन पण बदलली वाटते? :)

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:44 pm | क्लिंटन

मागे मिपावर वीज कंपन्यांच्या कॅग ऑडीटची चर्चा झाली होती तेव्हा या वीज कंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅग ऑडिटला का घाबरत आहेत अशा स्वरूपाचे विधान झाले होते.ठिक आहे.पण मग निवडणुक आयोगाने एकदा नाही दोनदा स्मरणपत्रे पाठवूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे हिशेब या क्रांतिकारी पक्षाने का दिलेले नाहीत?जर तुमचे पैसे सगळे वैध मार्गाने येत असतील तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणतेच पॅचवर्क करायची गरज नाही. मग खरे तर सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पक्षानेच निवडणुक आयोगाकडे हिशेब द्यायला हवे होते नाही का? पण काय असते भ्रष्टाचार, सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता यांची चाड केवळ आम आदमी पक्षाला आणि इतर अलम दुनिया भ्रष्ट त्यामुळे हिशेब इतरांकडे मागायचे यांच्याकडे नाही, बरोबर की नाही नांदेडीयन?

नांदेडीअन's picture

6 Apr 2015 - 11:36 am | नांदेडीअन

मागे मिपावर वीज कंपन्यांच्या कॅग ऑडीटची चर्चा झाली होती तेव्हा या वीज कंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅग ऑडिटला का घाबरत आहेत अशा स्वरूपाचे विधान झाले होते.ठिक आहे.पण मग निवडणुक आयोगाने एकदा नाही दोनदा स्मरणपत्रे पाठवूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे हिशेब या क्रांतिकारी पक्षाने का दिलेले नाहीत?जर तुमचे पैसे सगळे वैध मार्गाने येत असतील तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणतेच पॅचवर्क करायची गरज नाही. मग खरे तर सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पक्षानेच निवडणुक आयोगाकडे हिशेब द्यायला हवे होते नाही का? पण काय असते भ्रष्टाचार, सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता यांची चाड केवळ आम आदमी पक्षाला आणि इतर अलम दुनिया भ्रष्ट त्यामुळे हिशेब इतरांकडे मागायचे यांच्याकडे नाही, बरोबर की नाही नांदेडीयन?

हाहा
इथेसुद्धा माझ्या वतीने तुम्हीच उत्तर देऊन टाकले ?

लोकसभा निवडणुकांसाठी केलेला खर्च पक्षाने अजून का सादर केला नाही हे मला माहित नाही.
पण हे नक्कीच चुकीचे आहे.
लवकरात लवकर ही माहिती सादर करायला पाहिजे.

पण जेव्हा आपण आपच्या या (अजून न दाखवलेल्या) खर्चाबद्दल बोलतो, तेव्हा भाजपकडे ७ अब्ज १४ करोड (ऑफिशियल आकडा. बाकी आपण सुज्ञ आहात.) कुठून आले होते या प्रश्नावरसुद्धा चर्चा व्हायला हवी ना ?
की नको ?
काय करायचे आपल्याला भाजपाचे ?
केजरीवालने नवीन मफलर घेतले ना ? चला मग त्याला शिव्या घालूया.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाही, नाही !

केवळ या दोन्हीच नाही तर सगळ्याच चुकार पक्षांना सज्जड शिव्या घालूया...

"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...

मुख्य म्हणजे, तिथेच न थांबता दोन्ही पक्षांना त्यांचे हिशेब देण्याचे कायदेशीर आणि नैतीक कर्तव्य करायला पाहिजे याबद्दल ठाम राहूया आणि...

एकाच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसर्‍याच्या चुकीचे उदाहरण देणे साफ चूक व घातक आहे असे सुद्धा म्हणूया !

नांदेडीअन's picture

6 Apr 2015 - 12:33 pm | नांदेडीअन

फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...

हिशेब न देणार्‍यांना
^ या ऎवजी हिशेब द्यायला 'उशीर करणार्‍यांना' असे म्हणूया.

मला एक कळत नाही.
आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?

चिनार's picture

6 Apr 2015 - 12:41 pm | चिनार

मला एक कळत नाही.
आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?

कारण आप आणि आप समर्थक यांचे वागणे म्हणजे,
"आम्ही नाही जा ..आम्हाला काही म्हणू नका ..जा बा ..तुम्ही असेच करता "
इतके बालिश असते .

नांदेडीअन's picture

6 Apr 2015 - 12:55 pm | नांदेडीअन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बालिश या शब्दाची व्याख्या कळाली. :)

धन्यवाद ! तुम्ही अस्सल आप समर्थक आहात हे सिद्ध केल्याबद्दल !
तुमच्या मते ,आप ला समर्थन करतात ते "समर्थक ".. पंतप्रधान मोदींना समर्थन करतात ते "भक्त" !! आणि असं असून सुद्धा खालील विधान
मला एक कळत नाही.
आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?

आम्हाला असे काहीही वाटत नाही. आप हा अत्यंत सामान्य लोकांचा पक्ष आहे असं माझ मत आहे. काहीतरी चांगलं करून दाखवतील अशी आशा आहे . पण त्यांना देव्हाऱ्यात तुम्ही बसवले आहे. परत एकदा अधोरेखित करतो, मी मोदी समर्थक आहे पण केजरीवाल (किंवा आप ) विरोधक नाही. एखाद्याला समर्थन करताना दुसर्याला विरोध केलाच पाहिजे असं आवश्यक नाही. पण आप पक्ष आणि समर्थक यांचे गेल्या १.५ वर्षातील वर्तन फक्त बालीशच म्हणता येईल !

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 6:43 pm | क्लिंटन

एखाद्याला समर्थन करताना दुसर्याला विरोध केलाच पाहिजे असं आवश्यक नाही.

ही भूमिका नक्कीच पटण्यासारखी आहे. मी स्वतः जरी भाजप समर्थक असलो तरी अजूनही मी नरसिंह रावांना भारताचे आतापर्यंतचे सर्वात चांगले पंतप्रधान मानतो. म्हणजे भाजप समर्थक असल्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे असे अजिबात नाही.

पण आप पक्ष आणि समर्थक यांचे गेल्या १.५ वर्षातील वर्तन फक्त बालीशच म्हणता येईल !

+१. वैयक्तिक पातळीवर मी स्वतः अण्णांच्या उपोषणाच्या दिवसांपासून या प्रकारांचा विरोधक होतो.त्यामुळे त्या उपोषणांमधून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे मत अगदी पहिल्या दिवसापासून वाईटच होते आणि अजूनही आहे. तेव्हा माझ्या आआपविरोधाला ही पार्श्वभूमी आहे. तरीही मिपावरील (आणि इतरत्रही) अनेक सदस्य सुरवातीला आआपकडून बर्‍याच अपेक्षा ठेऊन होते पण नंतर केजरीवालांनी जे एकेक प्रकार केले त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. याविषयी प्रत्येकाची मते वेगळी असू शकतातच आणि तशी मते ठेवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त फरक इतकाच की आआपच्या नेत्यांनाच ही गोष्ट कळत नाही आणि प्रश्न विचारणार्‍या सगळ्यांची ते अंबानी-अडानीचे एजंट, भाजपच्या पेरोलवरचे वगैरे शब्दांनी भलामण करतात. नेतेच असे असतील तर मग समर्थक वेगळे असतील अशी अपेक्षाच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2015 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला एक कळत नाही.
आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?

खी...खी...खी...खी...खी...खी... असा विनोदी संशय आलाच कसा !!!???

"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी सर्वजण भ्रष्ट आहेत" असा ढींढोरा वाजवत आप सतत प्रसिद्धीत राहिला आहे. अश्या पक्षाला निवडणूकीनंतर ९० दिवसात निवडणूकीचे हिशेब देता येऊ नयेत आणि इलेक्शन कमिशनला त्यांना नोटीस पाठवावी लागते यात काही गैर दिसले नसले अथवा ते दुर्लक्ष करण्याजोगे वाटले असेल तर आपभक्त अंधश्रद्ध आहेत हे सिद्ध होते नाही का ? ("आपले बाबाजी करतात ती सगळी त्यांची लिला आहे" या धर्तीवर ! :) )

कोणत्याही विचारी माणसाने कोणत्याही माणसाला किंवा पक्षाला देवपदावर पोहोचवण्याचा अंधश्रद्ध व्यवहार करू नये... आणि त्यांच्या चुकीचे परिमार्जन दुसर्‍याच्या चुकीकडे बोट दाखवून करण्याचा भोळसट/कांगावेखोर व्यवहारही करू नये.

चूकीला चूक म्हणावे... मग ती आपण पाठिंबा/मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची का असेना. तरच ती चूक भविष्यात सुधारली जाण्याची शक्यता असते... जे भारताच्या, आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे आहे.

"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्‍यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...

इस्पिक एक्केराव तुम्ही पण अंबानी आणि अडानीचे एजंट झालात की. असो. आपले या एजन्सीमध्ये स्वागत असो.

मुख्य म्हणजे, तिथेच न थांबता दोन्ही पक्षांना त्यांचे हिशेब देण्याचे कायदेशीर आणि नैतीक कर्तव्य करायला पाहिजे याबद्दल ठाम राहूया आणि...

एकाच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसर्‍याच्या चुकीचे उदाहरण देणे साफ चूक व घातक आहे असे सुद्धा म्हणूया !

याविषयी दुमत असायचे काहीच कारण नाही.

(आआपचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 1:49 pm | क्लिंटन

ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.

यावरून एक गोष्ट आठवली.

२५ एप्रिल १९७३ रोजी भारताचे सरन्यायाधीश एस.एम.सिकरी निवृत्त झाले. निवृत्त व्हायच्या आदल्याच दिवशी ते प्रमुख असलेल्या एका घटनापीठाने केशवानंद भारती केसमध्ये इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता.त्यापूर्वीच्या काळात नवे सरन्यायाधीश नेमताना सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असे.पण इंदिरा गांधींच्या सरकारने तीन वरीष्ठ न्यायाधीश-- शेलाट, ग्रोव्हर आणि हेगडे यांना डावलून अनील नारायण रे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली.कारण?त्या तीन न्यायाधीशांनी इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता तर रे यांनी सरकारला अनुकूल निर्णय दिला होता.वरकरणी कारण दिले गेले की हे तीन न्यायाधीश लवकरच निवृत्त होणार होते.

आता येऊ या आपल्या लाडक्या आआपकडे. अ‍ॅडमिरल रामदासांची उचलबांगडी तर केली गेलीच.त्याचे नक्की कारण काय होते हे कुणीही सांगू शकेल. तरीही वरकरणी कारण दिले गेले की त्यांचा कार्यकाळ पूर्वीच संपला होता.झालं तीन नवीन लोकपालांचे पॅनेल नेमले गेले.त्यात राकेश सिन्हा, एन. दिलीप आणि एस.पी.वर्मा यांचा समावेश होता . पुढे रामदासांनी केजरीवालांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि त्या प्रकरणात रामदासांची बाजू घ्यायचे घोर पातक राकेश सिन्हांच्या हातून घडले. त्याची शिक्षा त्यांना भोगायला लागलीच.

म्हणजे काय की इंदिरा गांधींच्या सरकारला अनुकूल नसलेले न्यायाधीश नको होते त्याप्रमाणेच केजरीवालांना स्वतःला अनुकूल नसलेले लोकपाल नको होते.तरी एक फरक म्हणजे इंदिरा गांधी न्यायपालिकेचा किती सन्मान करतात याचे ढोल जगभर पिटत नव्हत्या.पण इथे आपले युगपुरूष मात्र लोकपाल-लोकपाल हा जप करत असतात.आणि सगळ्या दुनियेने यांच्याच लोकपालाच्या कल्पनेला सहमती दर्शविली पाहिजे अन्यथा इतरांना भ्रष्टाचाराची काही पडलेलीच नाही असा आविर्भाव. तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या लोकपालाला (एक नव्हे तर दोन) कस्पटासमान वागविणार असाल तर सगळ्या दुनियेने तुमच्या लोकपाल या कल्पनेला डोक्यावर घेतले पाहिजे ही अपेक्षाच कशी व्यक्त करतात हे युगपुरूष समजत नाही.

की राकेश सिन्हांचाही कार्यकाळ संपला? की नियुक्त करतानाच त्यांना ३ दिवसांसाठीच नियुक्त केले होते?

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 1:57 pm | क्लिंटन

नांदेडियनराव, आआप म्हणजे कसले बोगस आम आदमी आहेत हे तुम्ही बघितले असेल याची अपेक्षा नाहीच. तरी एकदा अजय माकन यांच्या ट्विटरवरील हे दोन फोटो बघा. कालच तालकटोरा स्टेडियममध्ये दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनचे उद्घाटन तिथे झाले.आणि स्टेडियमच्या बाहेरच चक्क व्ही.आय.पी पार्किंग आणि व्ही.व्ही.आय.पी पार्किंगचे बोर्ड दिसत आहेत. म्हणजे इतर कुठेही व्ही.आय.पी हा शब्द दिसला की हे हिरवेपिवळे होणार पण स्वतः मात्र बिनदिक्कतपणे व्ही.आय.पी कल्चरचेच समर्थन करणार.कारण आता हे सत्ताधीश ना.

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 2:03 pm | क्लिंटन

योगी अरविंदांनी ७०-८० वर्षांनी आपलेच नाव (अरविंद) घेऊन असा कोणी माणूस भूतलावर अवतीर्ण होणार हे जाणून आधीच हे लिहिले होते की काय असे वाटावे इतके हे विधान सध्याच्या परिस्थितीत चपखलपणे लागू पडते.

चिंतामणी's picture

23 Dec 2015 - 5:23 pm | चिंतामणी

- योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला.
- गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला.
- प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले.

बचाओ इस भारतवर्ष को केजरी के गुलामो से

मोहनराव's picture

1 Apr 2015 - 1:55 pm | मोहनराव

मुद्दे पटले.

या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे

............. अनुमोदन!

कपिलमुनी's picture

1 Apr 2015 - 2:27 pm | कपिलमुनी

आप मध्ये जे काही चालले आहे त्याला तमाशा , नौटंकी ई. म्हणावे लागेल.

यश मिळवण्यापेक्षा यश पचवणं अवघड असता हे दिसला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Apr 2015 - 2:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम प्रतिसाद रे नांदेडियना.कॉन्ग्रेस हरल्यावरही नरेंद्र भक्तांना होत नसेल असा असूरी आनंद सध्या भक्तांना होतोय.
मोदी बारामतीत आल्यावर 'राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार देशसेवेचे काम उत्तम पार पाडत आहेत' हे नरेंद्रने म्हंटल्यावर ह्यांनाही ताप भरला होता.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:52 pm | क्लिंटन

कॉन्ग्रेस हरल्यावरही नरेंद्र भक्तांना होत नसेल असा असूरी आनंद सध्या भक्तांना होतोय.

हो नक्कीच होत आहे माईसाहेब आणि याविषयी तुमचे आक्षेप असले तरी होतच राहिल. तुम्हाला जसा आनंद १० फेब्रुवारीला होत होता ना अगदी तसाच आनंद आम्हाला आता होत आहे.काय करणार?

मागे मिपावरच एक गोष्ट लिहिली होती.ती आता परत लिहितो. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी लोकसभेत बोलताना सोमनाथ चॅटर्जी म्हणाले होते---"What is our obligation to keep BJP in power?". त्याच धर्तीवर मी म्हणतो--"What is my obligation to support AAP?" जर का केजरीवाल समर्थक मोदी कधी चूक करतात म्हणून टपून बसले असतील तर केजरीवाल कधी चूक करतात यासाठी केजरीवाल विरोधक टपून बसणारच.त्याविषयी तक्रार करून उपयोग नाही.

(दिल्ली विधानसभेतील मिपावरचा विरोधी पक्षनेता) क्लिंटन

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2015 - 3:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे नौटंकीवाल साहेब एकदातरी तोंडावर "आप"टावेत ही इच्छा आहे, ती बहुदा लौकर पुर्ण होणार अशी चिन्हे आहेत.

मोडी भक्त आप ला श्या देणार
आप वाले मोडी भक्तांना

मधल्या मध्ये ना केजरू काम करतोय, ना मोदी.

असो,, सगळे एका माळेचे मणी

कुणाचेही अंतर्गत वाद-विवाद अशाप्रकारे चव्हाट्यावर येणे हे दुर्दैवीच म्हणायला पाहिजे.
आप मधे जे चालले आहे त्यात कुणाचा जय- पराजय झाला यावर कितीही बोलले तरी माझ्यामते हा शेवटी सर्व सामान्य लोकांचा पराभव आहे.
निवडणुकी पूर्वी देखील आप बद्दल अनेक वावड्या उठत होत्या. पण तरीही लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.. त्या लोकांचे हे दुर्दैव आहे असेच म्हणावेसे वाटते.
दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकुन पितात
तसेच , यापुढे कुणी उच्च नीती मुल्यांची टिमकी वाजवू लागला, तर लोक त्याच्याकडे संशयाने पहातील हे निश्चित ...

नया है वह's picture

1 Apr 2015 - 3:24 pm | नया है वह

+१००

मनीषा's picture

1 Apr 2015 - 3:29 pm | मनीषा

प्र. का.टा.आ.

प्रसाद१९७१'s picture

1 Apr 2015 - 4:30 pm | प्रसाद१९७१

खरे तर दिल्लीच्या लोकांना आप मधल्या ह्या वादावादीत काहीच घेणे देणे नाहीये. केजरीवाल जर काम करत असेल तर पुढच्यावेळेला पण केजरीवाल निवडुन येइल.

@ क्लिंटन आणि आसुरी आनंद झालेले इतर - त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.
चांगले काम करत असतील तर एकमेकांच्या उरावर जरी आप चे लोक बसले तर मला तरी काही फरक पडत नाही. जनतेच्या उरावर बसण्यापेक्षा ते चांगले.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:11 pm | क्लिंटन

@ क्लिंटन आणि आसुरी आनंद झालेले इतर - त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.

अपेक्षा रास्त आहे.पण अशा रचनात्मक स्वरूपाच्या चर्चांना आम आदमी पक्षाने कधी स्थान दिले होते? हे सोडून सगळे जग अंबानी आणि अडानींचे एजंट आणि भाजपच्या पे-रोलवरचे अशा स्वरूपाची बकवास मात्र वारंवार होत असे.तेव्हा आआपवाले स्वत: भांडून भूस पाडत असतील तरी इतरांनी मात्र रचनात्मक चर्चा करावी अशी अपेक्षा करता येणार नाही.शेवटी करावे तसे भरावे.

नांदेडीअन's picture

6 Apr 2015 - 11:41 am | नांदेडीअन

त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.

मिळाले ना तुम्हाला उत्तर ?
त्यात त्यांना ‘काडीमात्र इंटरेस्ट’ नाहीये असं दिसतंय.

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 4:59 pm | क्लिंटन

आआप सरकारने नेहमीप्रमाणे दरमहा प्रत्येक घरी २० हजार लीटर पाणी फुकटात देऊ ही घोषणा केलीच.यातला एक कळीचा मुद्दा हा की २० हजारच्या वर एक लीटर जरी पाणी जास्त वापरले गेले तर सगळ्या २०,००१ लीटरचे पैसे भरावे लागणार.दिल्लीची जुगाडू संस्कृती कशी आहे हे सगळ्यांना माहितच आहे. त्या जुगाडू संस्कृतीत पाण्याच्या मीटरमध्ये फेरफार करून पाणी जास्त वापरले गेले तरी ते २०,००० पेक्षा कमीच दाखवायचा लोकांचा कसा खटाटोप आहे हे विवेकपटाईत यांनी लिहिलेल्या या प्रतिसादात स्पष्ट आहेच. आणि आता २०,००० लीटरवरच्या वापराचे दर आणखी १०% ने वाढवले. म्हणजे असा जुगाडूपणा करायला आणखी एक कारण आणि प्रोत्साहनही मिळाले.

दिल्ली आणि हरियाणामधील मुनक कालव्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. एकतर मोठ्या शहरातील लोकांच्या सोयीसाठी गावातल्या लोकांनी पाणी द्यायची ही अपेक्षा करणारे लोकच जमिन अधिग्रहण कायद्यालाही विरोध करतात हा थोडासा विरोधाभासच वाटतो.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा,वैतरणा तलावांच्या क्षेत्रातील गावांमध्ये मात्र तेच पाणी मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे.म्हणजे मुंबईतल्या लोकांची तहान भागावी म्हणून या गावकर्‍यांना मात्र त्रास सहन करावा लागतो.त्यातून मुंबई शहर आणि हे तलाव एकाच राज्यात येत असल्यामुळे हा मुद्दा जास्त पेटू शकला नाही.पण दिल्ली-हरियाणामध्ये मात्र मुनक कालवा हा नक्कीच कळीचा मुद्दा आहे. त्यातून कायमच पंजाबच्या तुलनेत सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार हरियाणामध्ये मुळातच आहे. सतलज-यमुना कालव्यामधील पाहिजे तितके पाणी हरियाणाला मिळत नाही ही तक्रार गेली अनेक वर्षे आहे.या मुद्द्यावरून हरियाणा सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार अशी बातमी मध्यंतरी आली होती. अशा परिस्थितीत हरियाणा मुनक कालव्यातले पाणी दिल्लीला सोडेल हे वाटते तितके सोपे नाही.अनेक वर्षे दिल्ली आणि हरियाणामध्येही काँग्रेसचेच सरकार असूनही हा प्रश्न सुटलेला नव्हता.

केजरीवाल मोठ्या तोंडाने जाहिरनाम्यात म्हणून बसले आहेत की आम्ही ते पाणी आणून दिल्लीचा पाण्याचा प्रश्न सोडवू. पण जुगाडूपणाला प्रोत्साहन मिळत असेल आणि दिल्लीमध्ये अशी पाण्याची चोरी होत असेल तर हरियाणाने स्वतःचे हक्काचे पाणी दिल्लीसाठी का सोडावे? आणि परत ते पाणी हरियाणाकडून मिळाले नाही की हे केंद्रात आणि हरियाणातही भाजपचे सरकार असूनही दिल्लीला पाणी मिळत नाही म्हणून आकांडतांडव (कदाचित धरणेही) करायला मोकळे!!

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2015 - 6:30 pm | श्रीरंग_जोशी

या अवांतराबद्दल क्षमस्व.

'जनतेची कामे' हे शब्द कदाचित मी १७-१८ वर्षांपूर्वी प्रथम ऐकले तेव्हापासून मला त्यातली नकारात्मक अर्थछटा सर्वप्रथम दिसते. केवळ राजकारणी ते अप्रामाणिक अन सर्वसामान्य लोक प्रामाणिक असे कधीच नसते. अनेकदा गप्पागोष्टींमध्ये लोक असे बोलत असतात की स्थानिक आमदार, खासदार पालकमंत्री यांच्याकडे ओळखीच्या किंवा मध्यस्थांच्या मार्फत पोचणे व त्यामार्गे सरकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकून आपली नियमबाह्य कामे करवून घेता येतील. म्हणजे हा अनेक सर्वसामान्य लोकांचा आवडता मार्ग असतो. अशी कामे करून देणारे लोकप्रतिनिधी पुढच्या निवडणुकीसाठी आपोआप लोकप्रिय उमेदवार बनतात.

आपापल्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा गटांची नियमबाह्य कामे मंजूर करण्यात मदत करण्यापेक्षा तेथील स्थानिक प्रश्न जसे पायाभूत सुविधांबाबत, महत्वाची प्रशासकीय पदे दीर्घकाळ रिकामी किंवा त्यावर पूर्णवेळ अधिकारी नसणे याबाबत आवाज उठवणे अधिक महत्वाचे वाटत नाही का? तसेच स्थानिक प्रश्नांखेरीज सरकारी ध्येयधोरणांना अधिक सर्वसमावेशक बनवणे, काळानुरुप बनवणे यास राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे. सर्वसामान्य जनतेची सोय होईल अशा प्रशासकीय सुधारणा (जसे सरकारी कार्यालयातल्या एक खिडकी योजना) यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्वाचे वाटत नाही का?

कुठलाच लोकप्रतिनिधी अशी कामे करत नाही असे माझे म्हणणे नाही पण अशा कामांना आपण किती प्रोत्साहन देतो याबाबत विचार करणे गरजेचे आहे. (काही पटकन आठवणारी उदाहरणे म्हणजे ८०च्या दशकात शुन्याधारीत अर्थसंकल्पावर लोकजागॄती करणारे महाराष्ट्रातले तत्कालिन राज्यमंत्री, काही वर्षांपूर्वी कोळसा घोटाळा उघडकीस आणणारे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे खासदार).

दुर्दैवाने राज्याच्या किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे दीर्घकालिन नुकसान करणार्‍या लोकानुनयी योजना राबवणारे सत्ताधारी पक्ष आपल्याला अधिक जवळचे वाटतात.

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 7:39 pm | संदीप डांगे

उत्तम प्रतिसाद. जशी प्रजा तसा राजा हा लोकशाहीचा मंत्र असतो. लोकांना सर्वकाही हवे तर असते पण ते आपोआप व्हावे, इतरांनी प्रामाणिकपणे करावे अशी अपेक्षा असते. पण नैसर्गिक सत्य असे नसते. प्रतिनिधींच्या मागे लागून कामे करून घ्यावी लागतात. अशावेळेस बहुसंख्य लोकांचा सुधारणावादी कल नैसर्गिकरित्या निर्माण झाला नाही तर जात, धर्म इत्यादींवर आधारित फालतू व कृत्रिम कल निर्माण केले जाऊन निवडणुका जिंकल्या जातात. मुळात जनता ह्या नागरी विषयांवर एक होऊ नये असेच वातावरण बनवले जाते. निवडणुकांचे विषय आणि नागरी सुविधेचे विषय कधीही एक नसतात. सामान्य मतदार निवडणुकांकडे 'आपला माणूस निवडून देणे' किंवा "प्रत्येक मताला किती देणार?" याच भावनेतून बघतो. तसेच त्याला प्रशिक्षीत केले गेले आहे.

राजकिय प्रतिनिधी, नेता, पुढारी, समाजसेवक, समाजसुधारक, राजकिय कार्यकर्ता, आंदोलनकर्ता, विचारवंत या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या क्लिष्ट असल्याने सामान्यांचा फार गोंधळ होतो. त्यामुळे केजरीवालछाप लोक अधूनमधून उगवत राहणार. जनतेला मसिहा पाहिजे पण मसिहाला तुल्यबळ अनुयायीही पाहिजेत हे ती विसरून जाते. क्रांती घडायला बहुसंख्य जनतेच्या समस्या एकसारख्या असणे आवश्यक आहे. पण धुर्त राजकारणी जनतेतल्या वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांची एकता भंग करण्यात पटाईत असतात.

भ्रष्टाचार सामान्य जनतेच्या रक्तातच आहे. त्यामुळे तो थांबावा अशी जनतेची अपेक्षा म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. दुसर्‍याने माझ्याकडून लाच घेऊ नये पण मला लाच मिळालीच पाहिजे असाच विचार सर्वत्र बघितला आहे. हेच लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात हिरहिरीने भाग घेतात.

हजारो तरूणांनी या आंदोलनात भाग घेतला फेसबुकवर आपले फोटो डकवून आपण कसे देशभक्त आहोत दाखवायला, एकानेही आपल्या आई-वडीलांच्या पापाच्या कमाईला 'नाही' म्हणून त्या पैश्यातून आणलेल्या आपल्या वस्तूंचा त्याग नाही केला. किती तरी मित्रांना मी असे आवाहन केले होते. पण.... असो.

भगतसिंग जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात. त्याने फाशी जाऊन माझ्या लेकराची अ‍ॅडमिशन विना-डोनेशन होईल अशी व्यवस्था करावी.

सतीश कुडतरकर's picture

7 Apr 2015 - 5:25 pm | सतीश कुडतरकर

वा डांगेजी. उत्तम प्रतिसाद!

क्लिंटन's picture

1 Apr 2015 - 9:57 pm | क्लिंटन

प्रतिसाद आवडला. एकूणच आपण स्वत: जरी प्रामाणिक नसलो तरी आपल्या लोकप्रतिनिधींनी मात्र प्रामाणिकच असले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते.

आजानुकर्ण's picture

1 Apr 2015 - 10:07 pm | आजानुकर्ण

किंबहुना बहुतेक जुने लोकप्रतिनिधी हे त्यांच्या प्रतिमेबाबत फारच कॉन्शस असतात. खुला भ्रष्टाचार करणे वगैरे त्यांना परवडणारे नसते. त्यामानाने 'जणतेतील' मंडळी करचुकवेगिरी, लाचखोरी, रांगा व इतर नियम (उदा. ट्रॅफिक रुल, नो पार्किंग वगैरे)मोडणे यात चांगलीच पटाईत असतात. मात्र आपण करतोय तोही भ्रष्टाचारच आहे हे त्यांना मान्य नसते.

अनुप ढेरे's picture

6 Apr 2015 - 10:58 am | अनुप ढेरे

अगदी अगदी. पूर्ण सहमत. हपिसात खोट्या पावत्या तयार करणारे लोक भ्रष्टाचारावर तावातावाने बोलताना ऐकले की डोक्यात जातात. 'आप'चे समर्थकदेखील असली कृत्ये करताना दिसतात.

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 12:41 pm | प्रतापराव

बहुसंख्य जनता अप्रामाणिकपणा करते हे मान्य पण ह्याला कारणीभूत आहेत ते लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार करणे थांबवले नि भ्रष्टाचारावर कडक कायदे केले कि फरक पडेल पण इथे कुंपणच शेत खाताना दिसतेय मग जनता तरी कशाला मागे राहील

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 12:44 pm | प्रतापराव

जणतेतील' मंडळी करचुकवेगिरी, लाचखोरी, रांगा व इतर नियम (उदा. ट्रॅफिक रुल, नो पार्किंग वगैरे)मोडणे यात चांगलीच पटाईत असतात. मात्र आपण करतोय तोही भ्रष्टाचारच आहे हे त्यांना मान्य नसते.>>>>>कुठला नेता ह्या गोष्टी करत नाही मागे संघ भेटीला गडकरी हल्मेट न घालताच गाडी पिटाळत होते नि त्यांच्यावर जबाबदारी आहे वाहतूक विषयी नियम बनवण्याची..

प्रतापराव's picture

1 Apr 2015 - 10:11 pm | प्रतापराव

लेख एकसुरी वाटला जे काही होत आहे त्यावरचे विवेचन नसून फक्त आप पक्ष फुटतोय असा आसुरी आनंद दिसतोय. प्रसाद ह्यांचे म्हणणे पटतेय आपवाले एकमेकांच्या उरावर बसो त्याने काय फरक पडतोय मोदी सरकारसारखे शेतकऱ्यांच्या नि सर्व सामन्यांच्या उरावर बसले तर मात्र त्यांच्यावर टीका करता येईल. भाजपचा विजयाचा अश्वमेध केज्रीवालांनी दिल्लीत अडवला नि मोदी, शहा जोडगळीला टांग मारून तोंडघशी पडले ह्याचा आसुरी राग ह्या लेखात दिसतोय.

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 1:10 pm | क्लिंटन

लेख एकसुरी वाटला जे काही होत आहे त्यावरचे विवेचन नसून फक्त आप पक्ष फुटतोय असा आसुरी आनंद दिसतोय.

ज्याची त्याची दृष्टी. जे काही होत आहे त्यावरचे विवेचन तुम्हाला कुठेच दिसले नाही? असुरी आनंद तर नक्कीच आहे आणि ते मी स्वतः मान्यही केले आहे. असो.

आणि हो १० फेब्रुवारीला मोदीविरोधकांना कसा असुरी आनंद होत होता ते तुम्हाला दिसले नव्हते का प्रतापराव? जर का तुम्ही (व्यक्तिशः तुम्ही नाही तर मोदीविरोधक---काँग्रेससमर्थक, आआपसमर्थक इत्यादी) मोदी कधी चूक करतात यावर टपून बसलेले असाल आणि जरा काही खुट्ट वाजले तर त्याचा सोशल मिडियावर गदारोळ करत असाल तर केजरीवालांच्या विरोधकांनी सोज्वळ वागणूक द्यायचे काही कारण नाही. काही महिन्यांपूर्वी मिडियामध्ये काही बातम्या मोदी सरकारविरूध्द मुद्दामून प्लॅन्ट केल्या होत्या असा माझा दावा आहे. त्यातील एक बातमी म्हणजे यापुढे कुमारी मातांना त्यांच्या मुला/मुलीचा पासपोर्ट बनविण्याच्या फॉर्ममध्ये त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही ही माहिती द्यावी लागणार. कुणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना सुचली कोणाला माहित. पण लगोलग त्यावर "हेच का अच्छे दिन" म्हणून लागोपाठ ८-१० पोस्ट मी फेसबुकवर पाहिले होते.पण नंतर परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीचे खंडन केले त्यानंतर मात्र त्या ८-१० पैकी एकानेही त्यावर अवाक्षर उच्चारले नाही.असो.

तेव्हा जर का तुम्ही मोदी कधी चूक करतात त्यावर टपून बसलेले असाल तर केजरीवालांचे विरोधकही ते कधी आणि कोणती चूक करतात यावर टपून बसणारच आणि त्याविषयी तक्रार केल्यास फारसा उपयोग होणार नाही.

व्यक्तिशः मी अण्णा-केजरीवाल-आम आदमी पक्ष यांचा अगदी पहिल्या दिवसापासून विरोधक राहिलो आहे.अनेकांनी पहिल्यांदा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण नंतर आआप भाजपची मते खाणार हे लक्षात आल्यावर ते विरोधक झाले.तसेच पहिल्यांदा विरोध करणारे अनेक जण नंतर अण्णा मोदी सरकारविरूध्द उभे राहत आहेत म्हणून ते आता अण्णांना समर्थन देत आहेत त्यापैकी कुठलीच गोष्ट मी केलेली नाही.अशा स्वरूपाच्या moronism ला माझा विरोधच होता आणि राहिल. आणि आम आदमी पक्षाला समर्थन सोडाच त्या पक्षाविषयी कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीने विचार केला पाहिजे असे कुठलेही बंधन माझ्यावर नाही आणि तशी गरजही मला वाटत नाही.

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 2:41 pm | प्रतापराव

ही सरकार नवीन आहेत त्यांना वेळ मिळायला हवा. मोदींविरोधात काहीही खुट्ट झाले तर लिहितात म्हणून केज्रीवालान्विरुद्ध्ही तसेच लिहिणे. तुमच्यात नि फेसबुक वरच्या पोस्टी लिहिणार्यांमध्ये फरक काय? ह्या आधीही तुमचे लेख वाचलेत चांगले वाटले परंतु हा मात्र अगदी टाकावू लेख वाटला. दिल्लीतले काही मित्र भेटलेत केजरीवाल सरकारवर तेथील जनता खुश आहे असे त्यांचे म्हणणे ह्याउलट मी लोकसभेत मोदींना मत दिले होते पण त्यांचा एकूण कारभार हा अगदी निष्प्रभ वाटत आहे ..

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 2:58 pm | क्लिंटन

ह्या आधीही तुमचे लेख वाचलेत चांगले वाटले परंतु हा मात्र अगदी टाकावू लेख वाटला.

काहींना लेख आवडणार काहींना टाकावू वाटणार. चालायचेच. लोकशाही आहे.

दिल्लीतले काही मित्र भेटलेत केजरीवाल सरकारवर तेथील जनता खुश आहे असे त्यांचे म्हणणे ह्याउलट मी लोकसभेत मोदींना मत दिले होते पण त्यांचा एकूण कारभार हा अगदी निष्प्रभ वाटत आहे ..

चालायचंच. लोकशाही आहे.

तुमच्यात नि फेसबुक वरच्या पोस्टी लिहिणार्यांमध्ये फरक काय?

अहो मी स्वतः फेसबुकवरही लिहितो-- मिपावर लिहितो त्यापेक्षा बरेच जास्त :) काहींना माझी मते आवडतात तर काहींना आवडत नाहीत. चालायचेच. लोकशाही आहे. पण एक फरक नक्की सांगतो की आआप समर्थक जसे करतात तसे--- प्रश्न विचारल्यास लगेच अंबानी-अडानी समर्थक, भाजपच्या पेरोलवरचा अशा बकवास गोष्टींना मी तरी नक्कीच थारा देत नाही. असो.

हो का? मग मोदींचे समर्थक जेव्हा असंच म्हणतात तेव्हा आपटार्डस् त्याला विरोध का करतात? जर दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशाच्या बाबतीत हे विधान केलेलं आहे तर मोदींकडे तर देशाची जबाबदारी आहे. त्यांना ' अच्छे दिन कहां है ' असा प्रश्न विचारण्यात आपटार्डस् पुढे होते. म्हणजे विरोधक म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारता ते तुम्हाला सत्ताधारी म्हणून विचारलेले चालत नाहीत? याला दुटप्पीपणा अाणि ढोंगीपणा हेच नाव आहे, बाकी काही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2015 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही सरकार नवीन आहेत त्यांना वेळ मिळायला हवा.

उत्तम ! १००% सहमत.

पण याचा अर्थ असा नाही की नविन आहेत म्हणून लोकशाही संकेत आणि निवडणूकीत दिलेली वचने धाब्यावर बसवायची परवानगी आहे... किंबहुना पहिल्या पासूनच सर्व सरकारांना चांगल्या सवयी लागणे जरूर असते. त्यासाठी सरकारलाला मत दिलेल्या आणि न दिलेल्या अश्या सर्वच जनतेने सजग राहून (केवळ आपला राजकिय मुद्दा जिंकण्यासाठी केलेल्या कांगावाखोरपणे नव्हे, तर) सत्य आणि प्रामाणिकपणाने सरकारवर आणि विरोधी पक्षावर सकारात्मक टीका करून त्याला योग्य दिशेवर ठेवणे जरूरीचे असते...

याला सहभागी लोकशाही (पार्टीसिपेटरी डेमॉक्रसी) म्हणतात. हा लोकशाहीचा सर्वात चांगला पर्याय आहे.

लोकांनी ४-५ वर्षांतून एकदा मतदान करणे आणि नंतर आपण मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची बाजू आंधळेपणे उचलत राहणे अशी राजकीय अंधश्रद्धा आपल्याकडे बोकाळली आहे आणि तो अत्यंत घातक प्रकार आहे. चूक मग ती मतदाराची स्वत:ची असो (उदा, चूकीच्या नेत्याला/पक्षाला मत दिले, इ) अथवा नेत्याची/पक्षाची असो (उदा, लोकांची केलेली दिशाभूल, चुकीचे निर्णय, इ); तिला चूकच म्हणण्याचे आणि त्यानंतर आपल्यात आणि नेत्यात/पक्षात योग्य तो बदल करवून घेण्याचे धैर्य जनतेने दाखविल्याशिवाय उत्तम लोकशाही हे केवळ एक दिवास्वप्नच राहील.

मोदींविरोधात काहीही खुट्ट झाले तर लिहितात म्हणून केज्रीवालान्विरुद्ध्ही तसेच लिहिणे.

हे म्हणणे आपसमर्थनाची सीमा ओलांडून आपभक्तांच्या टोळीत सामील झाल्याचे स्पष्ट लक्षण आहे असे वाटत नाही का ?! :)

याचा अर्थ, "आमच्या विरोधकावर जरूर टीका करा पण आमच्या नेत्याच्या दिशेकडे बोटही उचलू नका." असा होत नाही काय ?!

असे करण्याऐवजी, वर म्हटल्याप्रमाणे, मोदी व केजरीवाल या दोघांवरही (आणि इतर सर्वच नेत्या/पक्षांवर) प्रामाणिक आणि सकारात्मक टीका करून त्यांना योग्य मार्ग सोडणे कठीण करणे, हेच लोकशाहीतील डोळस आणि सजग नागरिकाचे लक्षण आहे.

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 2:51 pm | प्रतापराव

केजरीवाल ह्यांच्या बद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे ते जो काही भला बुरा कारभार करत असतील तो स्वताच्या डोक्याने करतात त्यांना नागपूरहून मदत घ्यावी लागत नाही

संदीप डांगे's picture

6 Apr 2015 - 4:16 pm | संदीप डांगे

अरे वा. कुणाला कुठून कशासाठी काय मदत घ्यावी लागते याबद्दल तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे असे दिसते. अभिनंदन!

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 May 2016 - 12:18 pm | हतोळकरांचा प्रसाद

तद्दन टाकाऊ प्रतिक्रिया!!

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2015 - 3:59 pm | बोका-ए-आझम

क्लिंटन, दिल्लीत हे असेच होणार असं माझंही मत होतं. ज्या पक्षाला राज्यकारभार करायचा सुतराम अनुभव नाही त्यांच्या हातात राज्य दिलं म्हणजे असाच पोरखेळ चालू होणार ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या-आमच्या पिढीला १९७७ च्या जनता सरकारचा अनुभव नव्हता. पण तो थोडाफार असाच असणार याची कल्पना आली.

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 4:17 pm | क्लिंटन

मला वाटते की अनुभव नसण्यापेक्षा परिपक्वता नाही हे या सावळ्यागोंधळामागचे कारण आहे. कुठल्याही नव्या पक्षाला राज्यकारभाराचा अनुभव नसणार हे अपेक्षितच आहे.पण अनुभव नसला तरी परिपक्वता असेल तर 'नया है वह' म्हणून चालून जाऊ शकते.पण ती परिपक्वताच नसेल तर मात्र नक्कीच गोंधळ होईल.

तुमच्या-आमच्या पिढीला १९७७ च्या जनता सरकारचा अनुभव नव्हता. पण तो थोडाफार असाच असणार याची कल्पना आली.

मी जे काही वाचले आहे त्यावरून जनता पक्षात भांडणे नक्कीच होती.पण इतका सावळागोंधळ नव्हता.कदाचित त्याकाळी स्टिंग ऑपरेशन आणि फोनवरील बोलणे टेप करणे हे प्रकार नव्हते म्हणूनही असेल :) पण जनता पक्षाच्या बैठकांना बाऊन्सरना पाचारण केले गेले होते असे वाटत नाही :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Apr 2015 - 6:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. १९७९ साली सरकार पाडणार्यात आमचे अनुभवी मराठी नेते आघाडीवर होते रे क्लिंटना:
मधु लिमये. त्यांना साथ दिली ती राज नारायण व ईतर नेत्यांनी.

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2015 - 6:36 pm | बोका-ए-आझम

हे कुणा बाऊन्सरपेक्षा कमी होते असं वाटत नाही. विशेषतः राजनारायण! पु.लं.नी ' खिल्ली ' मधल्या ' भाईसाहेबांची बखर ' या अफलातून विडंबन लेखात म्हटल्याप्रमाणे - चरणसिंग जाट आणि त्याचा राजनारायण नामे भाट यांनी फोडाफोडीचा खेळ आरंभला!

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 6:51 pm | क्लिंटन

राजनारायण आणि चरणसिंग हे कुणा बाऊन्सरपेक्षा कमी होते असं वाटत नाही.

हहपुवा.

तरीही जनता पक्षाच्या बैठकीत त्यांनी प्रत्यक्ष मारामारी केली असेल असे वाटत नाही. पडद्याआड काही झाले असले तर कल्पना नाही :)

विकास's picture

6 Apr 2015 - 8:10 pm | विकास

राजनारायण यांना राजकीय विदुषक असे संबोधिले जायचे... :)

विकास's picture

6 Apr 2015 - 6:44 pm | विकास

मी जे काही वाचले आहे त्यावरून जनता पक्षात भांडणे नक्कीच होती.पण इतका सावळागोंधळ नव्हता.कदाचित त्याकाळी स्टिंग ऑपरेशन आणि फोनवरील बोलणे टेप करणे हे प्रकार नव्हते म्हणूनही असेल :) पण जनता पक्षाच्या बैठकांना बाऊन्सरना पाचारण केले गेले होते असे वाटत नाही :)

त्या त्या काळाला अनुरूप असे "अ‍ॅडव्हान्स" वागणे हे ७७ साली झाले आणि व्हि पि सिंग जेंव्हा "surprise!" असे म्हणत पंतप्रधान झाले तेंव्हा देखील झाले.

७७ च्या जनता पार्टीचा १९७९ पूर्ण विचका होण्यास अनेक कारणे होती - त्यातील प्रमुख होते ते समाजवादी विरुद्ध जनसंघवादी (तेंव्हा हिंदूत्ववादी म्हणण्याची पद्धत नव्हती! ;) ). पण त्याच बरोबर अजूनही अनेक कारणे होती. एक म्हणजे राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलिटीकल विच हंटींग. त्याला संघाचा (आणि म्हणून जनसंघाचा) "forget and forgive" तत्वानुसार विरोध होता. कारण इतकेच की जनतेने निवडून दिले आहे ते राज्यशकट चालवायला त्याकडे लक्ष देणे महत्वाचे हा मुद्दा.

जनता पार्टीच्या काळात स्वस्ताई पण वाढली.(जे आआपच्या दिल्लीत होण्याची शक्यता आहे). "काँग्रेसच्या राज्यातले दिवाळे, आणि जनता पार्टीच्या राज्यातली दिवाळी" म्हणून तुलना वाचल्याचे पुसटसे पण नक्की आठवते. पण ते जमवून आणले गेले ते समाजवादी पद्धतीने (सर्वच जबाबदार असतील त्याला). परीणामी नंतर आर्थिक संतुलन बिघडू लागले.

त्याहून अजून एक समान धागा म्हणजे (एका वाक्यात): जनता पार्टीतल्या बहुतेकांना विरोधक म्हणूनच जगायची सवय होती. परीणामी राज्य कसे चालवायचे हे समजले नाही.

असो.

क्लिंटन's picture

6 Apr 2015 - 6:56 pm | क्लिंटन

त्या त्या काळाला अनुरूप असे "अ‍ॅडव्हान्स" वागणे हे ७७ साली झाले आणि व्हि पि सिंग जेंव्हा "surprise!" असे म्हणत पंतप्रधान झाले तेंव्हा देखील झाले.

हो त्या काळाच्या मानाने बरेच अ‍ॅडव्हान्सड वागणे जनता पार्टीचे होते.१९७७-१९८९- केजरीवाल अशी प्रगती होत असेल तर भविष्यात पक्षांतर्गत भांडणांतर्गत नक्की काय बघायला लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही :) .

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 6:58 pm | प्रतापराव

एखाद्या पक्षात भांडणे चालू असतील तर जनतेचे नुकसान कसे काय होते? तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो . जर तो पक्ष सत्ताधारी असेल नि आमदार मंत्री ह्यांच्यात वाद होवून सरकारला धोका निर्माण झाला तर तेथे जनतेचा संबंध येतो .
मी मागेच एका प्रतिसादात लिहिलेय आप वाले जर एकमेकांच्या उरावर बसले तरी जनतेला त्याचे घेणे देणे नसावे हा मात्र जर मोदी सरकारसारखे शेतकरी नि सर्वसामान्यांच्या उरावर ते बसू लागले तर मात्र जनतेचा संबंध पोहोचतो.

जर पक्षात भांडणे असतील तर जनतेचे नुकसान होत असेल तर अडवाणी सारख्या नेत्याला मिटींगला बोलावून बोलू दिले जात नाही तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जातो हा त्या पक्षाचा अंतर्गत वाद आहे कि ह्यानेही देशातील जनतेचे नुकसान होते.

पक्षांतर्गत वाद असायचेच त्यात नवल काय अडवाणी ज्यांनी रथयात्रा काढून देशातील वातावरण तापवून २ चे १९० खासदार केले. अख्खी हयात पक्षासाठी वेचली त्यांच्याही घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केलीच ना... राजकारण म्हंटले कि महत्वाकांक्षा येतेच एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतोच.
आता आप बाबत म्हणायचे तर केजरीवाल हेच त्याचे सर्वेसर्वा राहणार ह्यात तथ्य्य आहे लोकांनी केजरीवाल कडे बघून मत दिलीत योया नि भूषण कडे पाहून नाही . आणि केजरीवाल ज्याने दिल्लीमध्ये मोदी सारख्या राजकारण्याला उचलून आदळले तो य़ोय़ा नि भूषणला ऐकणार आहे. केजरीवाल प्रामाणिक , स्वच्छ चारित्र्याचा नि भ्रष्टाचारमुक्त आहे कि नाही ते ठावूक नाही पण एक भारतीय राजकारणातील एक धुरंदर राजकारणी आहे हे मात्र खरे..

विकास's picture

6 Apr 2015 - 7:25 pm | विकास

केजरीवाल प्रामाणिक , स्वच्छ चारित्र्याचा नि भ्रष्टाचारमुक्त आहे कि नाही ते ठावूक नाही...

आय (अँड मेनी आप अपोनंट्स विल) रेस्ट माय केस. ;)

पण एक भारतीय राजकारणातील एक धुरंदर राजकारणी आहे हे मात्र खरे..

धुरंदर असले तर हरकत नाही. महत्वाकांक्षा असण्यात पण काहीच गैर नाही. इतर अनेक सोशॅलीस्ट भुक्कड राजकारण्यांपेक्षा त्यांनी किमान प्रयत्न केले आहेत. पण ते कावेबाज आहेत असे मत आहे. स्वत: निर्मल आहोत वगैरे जे काही इमेज तयार केली, ज्या कर्कश्श आवाजात (त्या बाबतीत त्यांना किरण बेदींनी हरवले असेल कदाचीत पण...) जनतेला अवाच्या सवा सांगितले ते सगळे ढोंग आहे असेच वाटते.

अजूनही निवडणूक खर्च दिलेला नाही. आता शीला दिक्षितांच्या संदर्भात बोलत देखील नाहीत. स्टींग अ‍ॅप तयार करून सरकारी सर्वर वर जनतेने काढलेल्या चित्रफिती ठेवणार सगळाच भंपक कारभार आहे.

तरीदेखील त्यांना दोन वर्षे कामाच्या बाबतीत द्यावीत असे माझे मत आहे. याचा अर्थ बाकीच्या नौ़टंकीबद्दल बोलायचे नाही असा नाही! विशेष करून जेंव्हा आपणच तेव्हढे आदर्श असा आविर्भाव असतो तेंव्हा तर ते आदर्शाचे कातडे बाजूला करणे महत्वाचेच असते. असो.

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2015 - 8:09 pm | बोका-ए-आझम

बरोबर. याचाच अर्थ आम आदमी हा एक मुखवटा आहे आणि मेट्रोने शपथविधीला जाणं हा स्टंट आहे. चांगलं झालं की केजरीवालांचे समर्थकच हे मान्य करत आहेत की त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे Politics with Difference हा आम आदमी पक्षाचा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि समर्थकांनीच ते मान्य केलेलं आहे. फक्त आता ते कितीि आण कुठपर्यंत स्वत:ला फसवणार आहेत तो प्रश्न आहे.

चिंतामणी's picture

23 Dec 2015 - 5:35 pm | चिंतामणी

याचाच अर्थ आम आदमी हा एक मुखवटा आहे आणि मेट्रोने शपथविधीला जाणं हा स्टंट आहे. चांगलं झालं

आता पुढची पायरी गाठली आहे.

एकतरी केजरीगुलाम आमदारांच्या पगार/ भत्तावाढीबद्दल बोलला का? असो.

केजरीवाल हा अत्यंत पाताळयंत्री आणि आत्मकेंद्रीत व्यक्ती आहे.

पगारवाढ ही फक्त आमदारांसाठी नसुन सर्व राजकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरविण्यासाठी होती. केजरीवालच्या दुर्दैवाने यात यश अजुनतरी आलेले नाही.

ओह, बर्याच दिवसानी आलो.. आज धागा पाहिला.
नेहमी प्रमाणे मुद्देसुद लिहिले आहे.
आपच्या पुन्हा बर्याच गोष्टी चुकल्यासारख्या वाटत आहे.
तरीही पुन्हा स्वच्छ काम करुन भरारी घ्यावी ही इच्छा.

(बाकी इअतर रिप्लाय वाचले नाही, वेळ नसल्याने)

प्रतापराव's picture

6 Apr 2015 - 10:04 pm | प्रतापराव

चला केजरीवाल ह्यांच्या बाजूने बोलल्याने आम्हीही झालो त्यांचे समर्थक. अहो केजरीवाल दिल्लीत आम्ही महाराष्ट्रात काय संबंध आमी तर मोदीचे मतदार तेही पास्तावलेले. केजरीवाल नि आप जरी मुखवटा आहेत स्टंट करतात असे मानले तरी मोदीही कुठे धड आहेत भ्रष्टाचार होवून देणार नाही म्हणतात नि पक्षाचा उपाध्यक्ष येडीयुरप्पा. मोदीही एक मुखवटाच आहे नि स्टंट करण्यात केजरीवाल ह्यांनाही भारी आहेत तरीही त्यांना लोक मानतातच न पण एक आहे केजरीवाल ह्यांनी निदान दिल्लीच्या जनतेचा भ्रमनिरास तरी केलेले नाही जसा मोदिनी देशाचा केलाय

मोदीन्नी भ्रमनिरास केला म्हणजे नक्की काय केलं हे सांगू शकाल का ? मुद्देसूद चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे !
माझ्या मते मोदी सरकार ने बऱ्याच क्षेत्रांमध्ये सकारात्मक पावले उचलली आहे. उदा. विदेश नीती , अर्थव्यवस्था, सरंक्षण, पर्यटन आणि पर्यावरण. पण सुधारणा घडण्यास वेळ नक्कीच लागेल.
पण मोदी सरकारच्या काही बेताल खासदारांच्या आणि मंत्र्यांच्या वक्तव्यांचा, वर्तणुकीचा मी सुद्धा जाहीर निषेध करतो

प्रदीप's picture

7 Apr 2015 - 4:41 pm | प्रदीप

त्या हरामखोर क्लिंटनने हा धागा सुरू केल्यापासून वाटच बघत होतो, ह्या आपबीतीतून सुटका कशी करून घ्यायची त्याची! काहीच सुचत नव्हते. आता तुम्ही आयतीच संधी दिली आहेत, ती आम्ही अगदी आनंदाने घेऊच... "दोन चर्चेसवर तीन दगड" वगैरे.

धन्यवाद, चिनार!

(आपटर्ड) प्रदीप

क्लिंटन's picture

7 Apr 2015 - 6:32 pm | क्लिंटन

हहपुवा :)

बाकी मला एका प्रश्नाचे उत्तर द्या - मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून/ आधी पण सामान्यपणे मागच्या ५-७ वर्षात कोणते विवादास्पद वक्तव्य/ काम केले आहे का? राजकीय अपरिहार्यता सगळ्यांना असतात. येडियुराप्पांच्या नेमणूकीचे समर्थन नाहीच. पण जर त्यांना पद दिल्यामुळे जर १०टक्के मते मिळत असतील तर त्यांना बाहुले बनवून पदावर ठेवणे योग्य नाही पण समर्थनीय नक्कीच आहे. नाही का?

केजरीवलांवर देखील माझा मुख्य आक्षेप हुकूमशाही आणि त्याहीपेक्षा अतिमहत्वाकांक्षा हा आहे. गेल्यावर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवालांनी जिंकली तेव्हा मला आनंदच झाला. आज नाही पण १० वर्षांनी तरी भारतात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा निर्माण झाली. पण पाठोपाठ जग जिंकल्याच्या आविर्भावात केजरीवल लोकसभेला उभे राहिले आणि भ्रमनिरास झाला. त्या क्षणापासून मी केजरीवालांचा विरोधक झालो. मला अश्या चुटकीसारश्या गोष्टी झालेल्या आवडत नाहीत. पी हळद आणि हो गोरी म्हणे.
आणि मी मोदींना मत ते अश्या चुटकीसरशी सुधारणा करतील म्हणून दिलेच नव्हते. मला ज्या अपेक्षा आहेत त्यांवर मोदी सरकार धीम्या गतीने का होईना पावले टाकत आहे. मला फालतू साधेपणा, अतिप्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक पारदर्शकता यांचा मुळीच सोस नाही. मला अपेक्षित आहे ती इच्छा आणि मार्गक्रमणा. सध्यातरी या पातळ्यांवर मोदी काम करत आहेत. केजरीवालांकडूनही अश्याच परिपक्वपणाची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही म्हणून हे सगळे.

चिनार's picture

7 Apr 2015 - 5:06 pm | चिनार

१००% सह्मत !

नाखु's picture

8 Apr 2015 - 10:31 am | नाखु

लाख मोलाचं बोल !
पी हळद आणि हो गोरी म्हणे.
हे सगळं जाहीरातीतल्या परिणामांसारखं झट्पट झालं पाहिजे यावर सगळ्या सु"शिक्षीतांचा आग्रही+आंधळा विश्वास आहे हे कंपनीत वारंवार चर्चेत अनुभवले आहे!!!

आनन्दा's picture

8 Apr 2015 - 1:02 pm | आनन्दा

हे सगळं जाहीरातीतल्या परिणामांसारखं झट्पट झालं पाहिजे यावर सगळ्या सु"शिक्षीतांचा आग्रही+आंधळा विश्वास आहे हे कंपनीत वारंवार चर्चेत अनुभवले आहे!!!

हे असे व्हायला आपले नेते आणि त्यांचे तथाकथित अनुयायीच कारणीभूत आहेत. अर्थात मिडियाचा रोल देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळेस व्हाट्स अ‍ॅप वरून फिरणारे मेसेजेस पाहिले असते तर ते सर्वसाधारण सुशिक्षिताला कळेल. बरे या आंधळ्या भक्तांना हे देखील कळत नाही की असे मेसेजेस फिरवून आपण आपल्या नेत्यालाच आणखीन अडचणीत आणत आहोत.
असो, परत परत तेच काय बोलणार. लोकसभेच्या वेळेस मी सांगून सांगून दमलो की बाबांनो मला देखील भाजपाच यावे असे वाटते, पण माझ्या तुमच्यासारख्या अतिमहत्वाकांक्षी अपेक्षा नाहीत. मर्यादित अपेक्षा ठेवा, त्याचे योग्य मूल्यमापन करा आणि ठरवा कोण काम करतेय ते. अवाजवी अपेक्षा ठेवायच्या, त्या वर्षभरात पूर्ण होणार असे पण आपणच ठोकून द्यायचे आणि मग अडचणीत आले की "मोदी असे कुठे बोलले होते"?

विकास's picture

8 Apr 2015 - 7:03 pm | विकास

सहमत...

विवेक्पूजा's picture

8 Apr 2015 - 10:23 am | विवेक्पूजा

+११११११११११११११ आनन्दा

भ्रष्टाचार सामान्य जनतेच्या रक्तातच आहे. त्यामुळे तो थांबावा अशी जनतेची अपेक्षा म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे.
डांगे साहेब
एकदम चपखल बोललात
क्लिंटन साहेब
आपण स्वत: जरी प्रामाणिक नसलो तरी आपल्या लोकप्रतिनिधींनी मात्र प्रामाणिकच असले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते. अगदी बरोबर
लोकप्रतिनिधीनी लोकांची कामे करायला पाहिजेत हे जितके सत्य आहे तितकेच त्यांनी लोकांची (LEGITIMATE) रास्त किंवा योग्य कामे करावी हे सत्य आहे . दुर्दैवाने लोकांची अपेक्षा त्यांनी बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कामे करावी अशीच आहे. (नाहीतर अशा माणसांच्या ओळखीचा उपयोग काय? हा जनतेचा विचार आहे)

क्लिंटन's picture

8 Apr 2015 - 10:40 am | क्लिंटन

नाहीतर अशा माणसांच्या ओळखीचा उपयोग काय? हा जनतेचा विचार आहे

निदान नगरसेवकाच्या पातळीवर तर नक्कीच हे बघायला मिळते. आमदार-खासदार पातळीवर याचा परिणाम किती हे बघायला हवे. तरीही सगळे नियमांनुसार जायला लागले तर भारत देश स्टॅन्डस्टीलला येईल असे वाटायला लागले आहे. कारण सगळ्यांचेच हितसंबंध नियम मोडण्यामध्ये गुंतलेले आहेत.

जेपी's picture

8 Apr 2015 - 10:37 am | जेपी

1

काही मर्यादीत अपेक्षांनी मी आप चे समर्थन केले असले तरीही मी त्या पक्षाचा सदस्य कधीच नव्हतो. आजही अगदीच सगळे काही संपले असे वाटत नाही.
केजरीवालांनी जे केले त्यात काहीही तथ्य नव्हते. त्यांचे आरोपही अगदीच निराधार वाटले. आपल्याला कुठलाही अडथळा नको म्हणुन त्यांनी सर्व काही घडवुन आणले असेच दिसते.
आत एक अन बाहेर एक ह्या आरोपला तर काहीच आधार नव्हता.
अॅडमिरल रामदास ह्यांना दूर करण्या करता सोयीचे समर्थन दिले गेले.
प्रशांत भूषण ह्यांचे मुद्दे अन नाराजी योग्य वाटली. यादव ह्यांनी पक्षविरोधी काम केले ह्यातही काहीच तथ्य नव्हते.
केजरीवालांनी ब-याच लोकांचा अपेक्षाभंग केला. आता त्यांनी कितीही चांगले शासन केले तरीही काही तो वेगळ्या मूळ आपला अपेक्षित राजकारणाचा पर्याय ठरणार नाही.
असो. त्यामुळे कुणाला आसुरी आनंद झाल्यास हरकत नाही. त्यात  जगावेगळे काहीही नाही. ते होतेच.
पण मला तरी सर्व काही संपले असे वाटत नाही.
केजरीवालांनी ज्यांना पक्षातुन काढुन टाकण्या साठी सर्व काही केले ते घरी बसणार नाहीत की एकटे ही नाहीत. कितपत प्रभावी ठरतील तो पुढचा विषय. पण असा एक खुप मोठा वर्ग आहे हे दिसुन आले. हे कमी नाही. उदा. द्यायचे झाल्यास आप ने एवढा मोठा विजय मिळवल्यावरही त्यांचे वर्तन पटले नाही म्हणुन त्यांना काढले नसतांनाही उघड पणे विरोध करत आहेत किंवा पक्ष सोडत आहेत.
राहीला प्रश्न केजरीवाल ह्यांच्या गटाचा कारण आज ना उद्या आप फुटणारच.
आपला इतके प्रचंड बहुमत मिळाले ते एक केजरीवाल ह्यांच्या मुळे त्यांच्या मागे 30/35 टक्के दिल्लीतील मतदार राहतीलच अन दुसरे म्हणजे यादव, प्रशांत भूषण, प्रो.आनंद कुमार ह्यांच्या प्रतीमे मुळे. तो वर्ग ही कमी नाही. अर्थात ही आकडेवारी कमीजास्त असु शकेल अचुकतेचा दावा नाही पण सदासर्वकाळ अशीच राहील असे नाही.
असो. दोन गट वेगळे झालेत ( फुट पडण्याचे नुकसान ही कळुन येईल. उद्या आपआपल्या मर्यादाही कळुन येतिल. ते ही न झाल्यास जग मात्र थांबबणार नाही हे निश्चित ) पण एकाच दिशेने चालले तर बरेच काही घडुन येईल, अन असे घडण्याची काही कमी उदाहरणे नाहीत.

रमेश आठवले's picture

9 Apr 2015 - 12:40 pm | रमेश आठवले

गेले ७००-८०० वर्षे दिल्लीत अशी परंपरा राहिली आहे की एखादा बादशाहां तख्तनशीन झाला की त्याच्या सरदारांनी अथवा मंत्र्यांनी अथवा जवळच्या नातेवाईकांनी कट करून अथवा बंड करून अथवा त्याचा खून करून सत्ता काबीज करायची आणि इतर संभाव्य प्रतिस्पर्धी यांचा काटा काढायचा .
स्वातंत्र्या नंतर हीच परंपरा चालू राहिली आहे. मोरारजी देसाई यांच्या विरुद्ध बंड करून चरणसिंग काही महिन्यासाठी पंत प्रधान झाले. नन्तरच्या काळात व्ही पी सिंग यांच्या नेता निवडीस विरोध होईल असे समजल्यावर देवीलाल यांचे बुजगावणे पुढे करून त्यांना बिनविरोध नेता निवडले गेले . त्यानंतर देवीलाल यांनी मी पुरेसा शिक्षित नाही , मला इंग्लिश येत नाही असे बहाणे करून, आधी ठरल्याप्रमाणे, नेतेपदाचा फेटा व्ही पी सिंग याना बांधला . चंद्रशेखर सारखे इतर नेते पहातच राहिले पण काही करू शकले नाहि। नंतर विरोधी पक्षाची मदत घेऊन सिंग यांचे सरकार पाडून चंद्रशेखर औट घटके साठी पंत प्रधान झाले.
आता काहीसे तसेच खेळ सुरु आहेत. केजरीवाल यांनी निवडणुकीच्या वेळच्या बरोबरच्या दर्ज्याच्या नेत्यांना दूर केले आहे आणि ते एकछत्री राज्य करण्यास मोकळे झाले आहेत. ह्याच्या पुढची एक संभाव्य खेळी म्हणजे केजरीवाल हे आपणहून किंवा दबावा खाली येउन, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत पाय उतारा होतील आणि दिल्लीत त्यांचे शिसोदिया वंशाचे उपमुख्यमंत्री मनीष हे तख्तनशीन होतील

क्लिंटन's picture

10 Apr 2015 - 2:01 pm | क्लिंटन

आपल्या युगपुरूषांनी कालच म्हटले की त्यांचे मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे पंतप्रधान मोदींच्या मॉडेल ऑफ गव्हर्नन्सपेक्षा अधिक चांगले आहे . एक समजत नाही की हे युगपुरूष दोन महिन्यांपेक्षा कमी काळ सत्तेत आहेत (दुसर्‍या इनिंगमध्ये). त्यापैकी १०-१२ दिवस बंगलोरला निसर्गोपचार आश्रमात गेले.किमान दोन दिवस योया आणि प्रभू यांना हाकलण्याच्या लठ्ठालठ्ठीत गेले. तरीही जे काही निर्णय घेतले आहेत त्यांची अंमलबजावणी करून त्यांचे परिणाम दिसले तरच "मॉडेल ऑफ गव्हर्नन्स" हे इतर कोणापेक्षा चांगले आहे हा दावा करता येईल. त्यासाठी पाहिजे तितका वेळ उलटला आहे का?

हे वक्तव्य मिपा आणि फेसबुकवरच्या 'केजरूच्या गुलामांनी' केले असते तर ते समजू शकतो. पण प्रत्यक्ष अश्वमुखातूनच हे विधान आले याचे आश्चर्य वाटत आहे.हा सत्तेचा अहंकार नाही तर काय आहे? इतरांना 'अहंकार करू नका' अशी लेक्चरबाजी करून दोन महिनेही उलटले नाहीत हो साहेब. कधी नव्हे ते राहुल गांधींबरोबर सहमत व्हावे लागत आहे-- सत्ता ही खरोखरच वाईट आणि विषसमान असते.

हाडक्या's picture

10 Apr 2015 - 2:43 pm | हाडक्या

क्लिंटन भौ.. with all due respect, एका बाजूला तुम्ही फ्री मार्केटची भलामण करताय त्या प्राईम टाईम च्या धाग्यावर आणि मग इथे या आप अन केजरुचा वाजवीपेक्षा जास्तच तिरस्कार करताय असे नाही का वाटत ? नै म्हंजे मार्केट करेल की करेक्ट. नै तर भोगेल फळं. :)
जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसर्‍या कोणाबद्दल एकाच चष्म्याने बघत आणि बोलत असते तेव्हा त्याच व्यक्तीच्या मतांबाबतच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो हो. तुमची मते बहुतेक वेळा आवडतात म्हणून सांगतोय. तुमचे विश्वासार्हतेचे क्रेडिट या आपवाल्यांवर इतके पण खर्च नका करु, they don't worth it that much. :)

तुमचे विश्वासार्हतेचे क्रेडिट या आपवाल्यांवर इतके पण खर्च नका करु, they don't worth it that much.

लोल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

बाकी मी फ्री मार्केटची भलामण करतो म्हणूनच आआपचा तिरस्कार करतो :)

नाखु's picture

10 Apr 2015 - 3:27 pm | नाखु

पण कदाचीत "आप्"ल्याच माणसांना दिवास्वप्न्+अफुधुंदीतून नुसते जागे नाही तर खडबडून उभे करण्यासाठी हा प्रमाद (?) करीत असावेत!

दोघांनीही आ.ह.घेणे

आपल्या युगपुरूषांनी कालच दिल्ली पोलिसांना पत्र लिहुन कुठे कुठे कॅमेरे लावावेत अस विचारलय ?
निवडणुकी अगोदर मोजुन १५ लाख कॅमेरे लावणाच्या गमजा करणार्या युगपुरुषाला आता पोलिसाकडुंन सल्ला हवाय.
जर कॅमेरे कुठे लावायचे हेच माहिती नव्हते मग १५ लाख कँमेरे कसे मोजले होते ? का तो एक चुनावी जुमला होता ?

नांदेडीअन's picture

11 Apr 2015 - 2:18 pm | नांदेडीअन

थोडी माहिती घेत चला हो टिका करण्याअगोदर.

The Aam Aadmi Party-led government has written a letter to Commissioner of Police, BS Bassi, requesting him to provide a list of dark spots around the city which could be potential places of crime against women.
The Delhi Police is requested to provide a list of dark spots considered vulnerable for women so that CCTV cameras installation can be started there.

बाय द वे, दिल्लीमध्ये बर्‍याच ठिकाणी CCTV कॅमेरे लावून झाले आहेत.

डँबिस००७'s picture

11 Apr 2015 - 3:11 pm | डँबिस००७

प्रश्न परत एकदा वाचा !!

जर कॅमेरे कुठे लावायचे हेच माहिती नव्हते मग १५ लाख कँमेरे कसे मोजले होते ?

जर कॅमेर्यांची संख्या १५ लाख जेंव्हा मोजली होती तेंव्हा कुठे कुठे लावायचे हे पण नक्की असायला पाहीजे. जर माहीत होत मग पोलिसांना का विचारायच ?

डँबिस००७'s picture

11 Apr 2015 - 3:25 pm | डँबिस००७

नं २. दिल्ली शहरातील काळोख्या जागा पोलिसाना विचारण्या ऐवजी मोहल्ला कमिटी कडे कस नाही विचारत ?
नं ४. पोलिसांना त्वरीत संपर्क करण्यासाठीच पोलिस कंट्रोल रुम असते, त्या कंट्रोल रुमला संपर्कासाठी सा धासा लक्षात
रहील असा टेलिफोन नं. असतो. उदा १००. जेंव्हा कोणीही १०० ला संपर्क करतो तेंव्हा कंट्रोल रुम वायरलेस द्वारे
त्या बिट जवळ असलेल्या पोलिस व्हॅनला त्वरित कारवाई करण्याचे आदेश देत असतात.
अशी व्यवस्था अगोदरच असताना परत बीट वर गस्ती करणार्या पोलिसांचे संपर्क लोकांना कश्यासाठी ? हे गस्तीवरचे
पोलिस सुट्टी वर गेलेले असले तर कोणाला संपर्क करणार ?
नं ५. हा प्रश्न दिल्लीतील पोलिसांना विचारण्याऐवजी केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना का नाही विचारत ?

डँबिस००७'s picture

11 Apr 2015 - 4:09 pm | डँबिस००७

The Delhi government has no intention to support the 181 helpline meant for women in distress.

The Delhi government under the Aam Aadmi Party has decided against launching the mobile phone application for 181 which would have helped women to easily seek assistance in times of distress. The application would not require any Internet connection. It was first conceptualised by the previous government of Sheila Dikshit.

The proposal for the application was sent to Delhi government six months back after receiving a green signal for the trial run. But, the government did not show much interest in it and refused to launch the application. Officials said the application is quite similar to the application Himmat which was launched by Delhi Police.

"A high-level meeting was held last week where it was decided that the application will not be launched. The government is taking no initiative regarding this helpline. This mobile application was designed with an aim to improve the accessibility to 181 helpline," an official said.

Read more at: http://indiatoday.intoday.in/story/kejriwal-women-helpline-aap-governmen...

दिल्लीचे कायदामंत्री जीतेन्द्रसिंग तोमर यांची पदवी बनावट आहे असे भागलपूरमधील विद्यापीठाने म्हटले आहे. याच विद्यापीठातून आपण पदवी घेतली असा त्यांचा दावा होता.

उत्तम. चालू द्या.

विकास's picture

28 Apr 2015 - 7:00 pm | विकास

त्यांची आम आदमी साठी काम करण्याची तळमळ पहा ना! लोकशिक्षण हे विद्यापिठातल्या ३-४ वर्षाच्या शिक्षणापेक्षा कधिही महान असते... आणि आता तरी देखील केजरीवालांनी तोमर ना खुलासा करण्यास सांगितला आहे. (चला, आधी नेपाळ मग तोमर... त्यात कोण गजेंद्र? कोण त्याला फोन करणारा सिसोदीया आणि कोण तो नक्राश्रू वाला आशुतोष? सगळेच विसरायला झाले आहे. :( )

होबासराव's picture

28 Apr 2015 - 1:57 pm | होबासराव

आआप वाले निलाजरे, नौटंकी आणि अतिकांगावखोर खोटारडे आहेत हे तर त्यानि सिध्द केलच आहे. ४२० सुध्दा आहेत हे आता समोर येत आहे.
पिच्चर अभी बाकि है मेरे दोस्त.
#पाच साल केजरीवाल

होबासराव's picture

29 Apr 2015 - 1:20 am | होबासराव

निवडणुक आयोगाला दिलेल्या affidavits नुसार ह्या भामटयाचे शिक्षण...
Educational Details
Graduate Professional
L.L.B. From Tilkamanjhi Bhagalpur University In 1999

बार कौन्सिल ला सुध्दा हे खोटे दस्तएवज वापरुन रजिस्ट्रेशन केलय...
हा तर सराईत भामटा / ठग दिसतोय.

जय हो.

#पाच साल केजरीवाल