यत्नशीलांची कधीही हार होत नाही

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
21 Dec 2015 - 10:10 am

लाटांना घाबरून नौका पार होत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

छोटीशी मुंगी दाणा घेऊन चालत असते
चढते भींतींवर, शत शतदा घसरत असते
मनातील विश्वास नसांत साहस भरतो
चढून पडणे, पडून चढणे, व्यर्थ होत नाही
अखेरीस तिची मेहनत वाया जात नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

पाणबुडे समुद्रात डुबकी घेत असतात
खोलवर बुडी घेऊनही रिकामे परततात
तिथे मोती सहज का सापडत नाहीत
ह्या आश्चर्यानेच उत्साह दुप्पट होतो
मूठ नेहमीच काही रिकामी राहत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

अपयश आव्हान आहे, स्वीकार करा
काय कमी राहिली शोधा, सुधार करा
यश मिळत नाही, तोवर झोप सोडा
संघर्षाचे क्षेत्र सोडून, तुम्ही पळू नका
काही केल्याविनाच जयकार होत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

लहरों से डरकर नौका पार नहीं होती
-सूर्यकान्त त्रिपाठी "निराला"
http://www.hindisahityadarpan.in/2012/07/motivational-poem.html

-मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१२१९
http://anuvad-ranjan.blogspot.in/2015/12/blog-post.html#links

अनुवादजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

निनाव's picture

21 Dec 2015 - 1:42 pm | निनाव

खूपच प्रेरणादायी कविता. धन्यवाद आणिक खूप शुभेछा! - आ. निनाव.

प्रसाद गोडबोले's picture

21 Dec 2015 - 3:37 pm | प्रसाद गोडबोले

यनावालांची कधीही हार होत नाही असे विडंबन सुचले आहे ... पण जाऊ दे , त्यांची ती समाजसुधारणा , अन आमचे ते वैयक्तिक आरोप हा समज आधीच लोकांनी दृढ करुन घेतला आहे , उगाच त्यात भर नको .

चांदणे संदीप's picture

21 Dec 2015 - 4:04 pm | चांदणे संदीप

-सूर्यकान्त त्रिपाठी "निराला"

हे तपासायला हवे!

निनाव's picture

21 Dec 2015 - 4:41 pm | निनाव

Chandansandeep Ji,

:) nirikshaN achuuk aahech!

Hee kavita Sw. Shri H. Bachchan Ji hyanchi aahe hey jagadvikhyaat aahech. Shri GoLe hyankadoon ti kadaachit kavita ithey post kartanna jhaaleli gaDbad asoo shakate.

चांदणे संदीप's picture

21 Dec 2015 - 5:45 pm | चांदणे संदीप

हे वाचा...

https://www.facebook.com/AmitabhBachchan/posts/1153934214640366

आणि अजून कन्फ्यूज व्हा! ;-)

चांदणे संदीप's picture

21 Dec 2015 - 5:52 pm | चांदणे संदीप

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6_%...
इथेही या "कविताकोष" वाल्यांच म्हणण आहे की ही कविता सोहनलाल द्विवेदी यांची आहे.
मला स्वत:ला ही कविता शाळेच्या अभ्यासक्रमात "हरिवंशराय बच्चन" यांच्या नावानेच होती.

आता दस्तुरखुद्द बिग-बी म्हणतात की त्यांच्या बाबूजींची नाहीये तर तसेच असू द्या!

Sandy

निनाव's picture

21 Dec 2015 - 8:07 pm | निनाव

:)

amhala suddha shaLet hee kavita Sw.Shri Hariwanshray Bachchan hyanchi aahe aseych hote.

aso. kavita kunachi hee aso. kavita nakkich chhaan aahe. tyaas ek jabardast artha ahe , ek vaachak mhanoon hey mahatwaache.

kavita kunachi , kuNi swikarli, kuNi nakaarli ha kadaachit sansadiya vaad asoo shakato :) :)

चांदणे संदीप's picture

21 Dec 2015 - 8:16 pm | चांदणे संदीप

अगदी!

खर या गोंधळात मीही इथे "नरेंद्र गोळे" यांना अनुवाद चांगला झाला आहे हे सांगण्यास विसरलो! :(

नरेंद्र गोळे सर: तुमचे याआधीचेही अनुवाद मी वाचले आहेत, सर्वच उत्तम जमले आहेत. हाही अनुवाद जबरदस्त!

तुमच एकला चलो रे आवडत. एकाच रस्त्यावरून अखंड चालण्याच्या तुमच्या प्रयत्नांना सलाम!

तुमच्या ब्लॉगवरही अधून-मधून चक्कर टाकत असतो. तुमचा तो "दिया और तुफान" या काव्याचा अनुवाद मला खूपच आव्हानात्मक वाटला आणि तुलनेत सुंदरही!

धन्यवाद,
Sandy

एकूण फेसबुक,वाटसप गडबड असते
आपलीच कृती आपल्यालाच घेता का विचारत येते.

संदीप डांगे's picture

21 Dec 2015 - 6:04 pm | संदीप डांगे

हि कविता बच्चनसाहेबांची नक्कीच नाही. पण इतक्या प्रसिद्ध कवितेच्या कवीबद्दल गोंधळ असणे हे लक्षणही बरोबर नाही.

नरेंद्र गोळे's picture

21 Dec 2015 - 8:07 pm | नरेंद्र गोळे

इतक्या प्रसिद्ध कवितेच्या कवीबद्दल गोंधळ असणे हे लक्षणही बरोबर नाही.>>>>> सत्यवचन!

नरेंद्र गोळे's picture

21 Dec 2015 - 8:07 pm | नरेंद्र गोळे

इतक्या प्रसिद्ध कवितेच्या कवीबद्दल गोंधळ असणे हे लक्षणही बरोबर नाही.>>>>> सत्यवचन!

नरेंद्र गोळे's picture

21 Dec 2015 - 8:07 pm | नरेंद्र गोळे

इतक्या प्रसिद्ध कवितेच्या कवीबद्दल गोंधळ असणे हे लक्षणही बरोबर नाही.>>>>> सत्यवचन!

विवेकपटाईत's picture

22 Dec 2015 - 5:56 pm | विवेकपटाईत

कविता कोश एक प्रामाणिक वेबसाईट आहे. हिंदी शिकणारे या वेबसाईटचा भरपूर वापर करतात. कविते आधी त्यांनी उल्लेख केलेला आहे, हि कविता बच्चन यांची नाही.

विवेकपटाईत's picture

22 Dec 2015 - 6:02 pm | विवेकपटाईत

bharatdiscovery.org या वेबसाइट वर हि कविता सोहन लाल द्विवेदी यांच्या नावाने दाखविली आहे. हि पण हिंदीची एक प्रतिष्ठीत वेबसाईट आहे.

http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0...

खालील ब्लॉगलेखकाने कविची ओळख पटवण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न केला असे दिसते,
http://www.srijangatha.com/Prasangwash9Nov2015

या वरून हरिवंशराय बच्चनांची निश्चितपणे नसावी. ह्या कवितेचे प्रथम प्रकाशन कोणत्या संग्रहात अथवा नियतकालीकात झाले आहे याचा अद्याप पत्ता नाही तो पर्यंत कविचे नाव निशितपणे सांगणे अवघड असावे.

माहितगार's picture

23 Dec 2015 - 8:51 am | माहितगार

@नरेंद्र गोळेजी, अनुवाद झकासच आहे, कॉपीराइट अस्पेक्टमुळे माझ्याकडून विलंब झाला या बद्दल क्षमस्व. 'कोशिश करने वालों की हार नहीं होती' याचे कवि नक्की कोण आणि नेमकी कुठे प्रकाशित झाली ह्याची कल्पना नसल्यामुळे कॉपीराइटचा अस्पेक्ट धुसर होत असावा लेखन अनॉनीमस किंवा टोपणनावाने पब्लिश झाले असेल आणि लेखक आणि/किंवा पब्लिशरने लेखन क्लेम केले नसेल तर कॉपीराइट पब्लिश झाल्या पासून केवळ ६० वर्षे चालतो. म्हणजे १९५४ पुर्वी अनामिक किंवा टोपणनावाने प्रकाशित पण लेखक/प्रकाशकाने त्यांच्या हयातीत क्लेम न केलेले साहित्य कॉपीराइटमुक्त होते पण अनामिक किंवा टोपणनावाने झालेले लेखन ६० वर्षांच्या आत लेखक अथवा त्याच्या वतीने प्रकाशकाने क्लेम केले तर लेखकाच्या हयातीपासून पुढे ६०वर्षे चालत राहू शकतो.

त्या कलाकृत्तीचे पहिले प्रकाशनच कुठे आणि केव्हा झाले माहित नसेल आणि लेखक प्रकाशकाचा काहिच पत्ता लागत नसेलतर तर माझ्या अंदाजानुसार स्पिरीट ऑफ कॉपीराइट लॉ आपण कॉपीराइट बोर्डाकडे कंपलसरी लायसन्स साठी विनंती करणे कदाचित अभिप्रेत असावे.

सध्या चर्चेत असलेल्या दोन-तीन पैकी एखाद्या कविची कृती असेल तर प्रश्नच मिटला हरिवंश राय श्रीवास्तव "बच्चन", सोहन लाल द्विवेदी, सूर्यकान्त त्रिपाठी 'निराला' या सर्वांचेच मृत्यू बहुधा १९५४ नंतरचे असावेत आणि - अनुवादावरील कॉपीराइटसुद्धा मूळकवि/कलाकृती निर्मात्याकडे असतो त्यामुळे आपला अनुवाद कॉपीराइट मध्ये दखलांदाजी असणारा असू शकेल का हे सवडीनुसार तपासून घ्यावे.

कवितेचे प्रथम प्रकाशन कोणते याची कल्पना नसल्यामुळे हे तुर्तासतरी धुसर असावे.

आपण अनुवादाच्या क्षेत्रात काम करता त्यामुळे कॉपीराइट कायद्याचे मूळापासून दोन-चारदातरी पारायण करून घ्यावे असे सुचवावेसे वाटते.

एखाद्या मुद्याकडे दुर्लक्ष होण्यापेक्षा चर्चा होण्याने सर्वांनाच उपयूक्त ठरु शकते म्हणून चर्चा केली, आपल्या इतक्या सुरेख मेहनतीवर कॉपीराइटचे मिठ शिंपडण्याबद्दल मलाच वाईट वाटते आहे म्हणून मनःपुर्वक क्षमस्व.

आपला अनुवाद वाचण्यास आवडला हेही तेवढेच खरे.

टिपः उत्तरदायकत्वास नकार लागू

माहितगार's picture

23 Dec 2015 - 9:13 am | माहितगार

खरेतर मूळ कवितेचे कडवेवार रसग्रहण आणि रसग्रहण करताना अनुवाद हा राजमार्ग अधिक सयुक्तीक ठरु शकतो का ? असाही एक विचार मनात येऊन गेला. असो.

उत्तरदायकत्वास नकार लागू

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Dec 2015 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

काही लिहिण्या आधी हे कबुल करतो की मी कॉपीराइट कायदा वाचलेला नाही.

पण समजा वरील कविता नरेंद्रसरांनी "एक स्वतंत्र लेखन" म्हणुन प्रसिध्द केली असती (हेच ओरीजनल आहे असा दावा करुन ) तरी सुध्दा त्यांच्यावर कॉपीराइट कायद्या नुसार बालंट येऊ शकते का?

वरील काव्य एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणूनही मुळ काव्या इतकेच सशक्त आहे म्हणुन विचारले.

पैजारबुवा,

माहितगार's picture

23 Dec 2015 - 1:25 pm | माहितगार

भारतीय कॉपीराइट कायद्याला सर्वात मागची अमेंडमेंट २०१२ची आहे त्या आधीची दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors मधली न्यायालयीन निरीक्षणे आणि दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. मधील न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" मला व्यक्तीश: अभ्यसनीय वाटतात. (केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष द्या)

वरील काव्य एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणूनही मुळ काव्या इतकेच सशक्त आहे म्हणुन विचारले.

१) वरील काव्य अभिव्यक्ती म्हणून कितपत स्वतंत्र आहे ? (मला वाटते बहुधा न्यायालये सर्व सामान्य वाचकाला टेक्स्ट देऊन त्याला (सर्वसामान्य वाचकाला त्याच्या भूमिकेतून) त्यात कितपत साम्य अथवा फरक आहे असे वाटते असा ठोकताळा लावत असावेत-vi)....the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person" . In the case of musical works the test would be that of a "lay hearer";न्या. राजीव शकधर यांच्या ब्रॉड प्रिंसीपल्सच्या आधारे.... (चुभूदेघे) - हा निकष सब्जेक्टीव्ह असेल हे खरेच पण ही 'सब्जेक्टीव्हिटी' नावाची गोष्टच अशी असते की जी तुमची (एखाद्या व्यक्तीची) जोखीम जेवढी कमी करु शकते, तेवढीच जोखीम अधिकतम सुद्धा असू शकते हे माझे व्यक्तीगत मत.

२) कॉपीराइट मुळ निर्मात्याच्या कृतीवर असतो तुमची उचल अथवा अ‍ॅडाप्टेशन हुबहू आहे असे वाटणे (असे वाटणे सब्जेक्टीव्ह आहे हे खरेच) जोखीमीचे असू शकते.

....(vii) While examining the defence of fair dealing, the length and the extent of the copyrighted work which is made use of, as indicated in clause 3 above, is important, however, it cannot be reduced just a quantitative test without having regard to the qualitative aspect. In other words, enquiry ought to be made as to whether the impugned extract forms an essential part of the work of the person in whom inheres the copyright. This may be particularly true in the case of musical works where a few notes may make all the difference;.... -न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" : चुकभूल देणे घेणे कृपया न्यायालयीन निकाल मूळातून वाचावेत

३)

....६) There has to be an intellectual input and an original mental exercise undertaken by the person bona fide lifting or copying the literary, dramatic, musical or artistic work, which should involve either the criticism or review of the lifted/copied work, or of any other work....

.....३) The purpose - ostensibly or obliquely, should not be to ride piggy back on the work of another.... -उपरोक्त नमुद संदर्भात नमुद निकालाचा परिच्छेद क्रमांक २७ मधील न्यायालयीन निरीक्षणातून

या वरून न्यायालयीन दृष्टिकोणाचा अंदाजा यावा असे वाटते.

न्यायालयीन निकाल आणि कायदे मुळातून वाचावेत कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापुर्वी अधिकृत तज्ञ व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा. येथील चर्चा सर्वसाधारण स्वरुपाची आहे हा तज्ञ अथवा व्यावसायिक सल्ला नव्हे उत्तरदायकत्वास नकार लागू