(पूर्वसूत्रः "ड्राईव्ह टू सांता बार्बारा एअरपोर्ट. गो टू द युनायटेड एअरलाईन्स काउंटर्स! देअर विल बी अ पर्सन वेटींग फॉर यू", इतकीच माहिती! तिने दिलेला तो कागद हातात धरून मी सांता बार्बारा एअरपोर्टच्या दिशेने ड्राईव्ह करायला सुरवात केली.....)
सांता बार्बराचा एअरपोर्ट अगदीच लहान आहे. जवळपास प्रायव्हेट एअरपोर्ट म्हणावा असा!! तिथून युनायटेड एअरलाईन्ससारख्या मोठ्या एअरलाईनच्या फ्लाईटस आहेत हेच माझ्यासाठी नवीन होतं. पण असेल बाबा, आपल्याला सगळंच कुठं माहिती असतं? याच भावनेतून मी तिथे ड्राईव्ह करत होतो. अलीशियाने माझ्यासाठी युनायटेडवर फ्लाईट बुक केलेली दिसतेय! इतक्या थोड्या वेळात तसं करणं इंप्रेसिव्ह जरूर होतं पण अलीशियासाठी ते काहीच कठीण नव्हतं. आपल्या त्रिभुवनदास भीमजीला एखाद्या बागेजवळ मिळणारे चणेफुटाणे खरेदी करणं जितकं सोपं (किंवा कठीण!) असावं तितकंच!!!!
तासाभरात मी एअरपोर्टला पोहोचलो. सांगितल्याप्रमाणे सरळ युनायटेड एअरलाईन्सच्या चेक-इन काऊंटरपाशी गेलो. तर तिथे खरंच माझ्या आडनांवाची पाटी घेऊन एक महिला उभी होती.....
"हलो..." मी तिला विश केलं...
"डॉ. ***?" तिनं माझं आडनांव विचारून खात्री करून घेतली....
"येस! सो ऍम आय बुक्ड ऑन द युनायटेड?", मी.
"नो सर! ऑफकोर्स नॉट!! विल यु प्लिज फॉलो मी, सर?"
मी चुपचाप तिच्या पाठोपाठ निघालो. युनायटेडचे सगळे काऊंटर्स पार करुन ती एका दरवाजाशी आली. मी तिच्या पाठोपाठ येतो आहे याची खात्री करून घेउन तिने तो दरवाजा उघडला आणि मला पाठोपाठ येण्याची खूण केली. मी तिच्या पाठोपाठ त्या दरवाजातुन बाहेर गेलो....
आता आम्ही एअरपोर्ट् टर्मिनलच्या बाहेर विमानं जिथे उभी असतांत तिथे उभे होतो. ती सगळ्या विमानांतून, बॅगेज नेणार्या गाड्यांतुन, आणि विमानांना लावायच्या टग्जमधून सफाईने वाट काढत चालत होती....
थोडं अंतर चालुन गेल्यावर तिने समोर बोट दाखवलं....
तिथे एक छोटंसं जेट विमान उभं होतं. आत दोन पायलट बसलेले होते, विमानाचे पंखे सुरू होते.....
त्या बाईने खूण करताच विमानाचा दरवाजा उघडला आणि एक छोटीशी शिडी पुढे आली....
"हॅव अ हॅपी फ्लाईट सर!" मला त्या शिडीकडे निर्देशित करत ती महिला म्हणाली...
अरे बापरे! चार्टर्ड फ्लाईट? पण आता मला माघार घेणं शक्यच नव्हतं. 'आलिया भोगासी असावे सादर' असे मनात म्हणतच मी त्या शिडीवरून वर चढलो.....
"वेलकम अबोर्ड, सर!!", एका सोनेरी केसांच्या अतिशय आकर्षक मुलीने माझं स्वागत केलं. माझ्या हातातली बॅग घेतली आणि मला एका आरामखुर्चीवर (रिक्लायनर) बसवलं. मी बसताक्षणीच त्या खुर्चीत बुडालो.....
"व्हॉट वुड यू लाईक टू हॅव सर? पेरिये शॅम्पेन, कॉफी, पेलोग्रीनो?"
"सम शॅम्पेन प्लीज!"
'गुड चॉईस! इट इज सो हॉट टुडे!!" ती हसली अणि ड्रिंक आणायला निघून गेली.....
तेंव्हाच विमानाची इंजिने सुरू झाल्याचा आवाज मी ऐकला. खिडकीतून बाहेर पाहिलं तर विमान रनवेच्या दिशेने निघालंही होतं....
आपले सहप्रवासी कोण आहेत हे पहायला मी पॅसेंजर केबिनमध्ये नजर फिरवली. कोणीच नव्हतं, बाकीचे सर्व रिक्लायनर्स रिकामे होते.....
आता मात्र मला हे सर्व जरा विचित्र वाटू लागलं होतं. तेव्हढ्यात ती एअर होस्टेस चिल्ड शॅम्पेनने भरलेला ग्लास घेउन आली....
"व्हेअर आर द अदर पॅसेंजर्स?"
"अदर पॅसेंजर्स? नो, वुई डोन्ट हॅव एनीवन एल्स टुडे सर! यु आर द ओन्ली वन!!!"
"व्हेअर आर वुई गोईंग?" आता विमानाने आकाशात टेक-ऑफ घेतला होता....
"टू सान फ्रानसिस्को सर!! ऍक्चुअली टू ओकलंड सर!!! युवर होटेल इज क्लोजर फ्रॉम देअर!!"
"ओ गॉड! थँक्स!!!"
"येस सर! वुई वोन्ट बी किडनॅपिंग यू टु बैरूट ऑर एनिथिंग!!!" ती कन्यका खळखळून हसत म्हणाली....
तिच्या विनोदबुद्धीला दाद देत मी शॅम्पेन ओठांना लावली....
मस्तच होती!!!!
आणि... शॅम्पेनही छान होती!!
आजवर मी असंख्यवेळा विमानातून प्रवास केला होता. कंपनीच्या खर्चाने का होईना पण अनेक वेळा विमानाच्या फर्स्टक्लास मधूनही गेलो होतो, विशेषतः इंटरनॅशनल फ्लाईट्स! पण चार्टर फ्लाईटमधून प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यातही आख्ख्या विमानात मी एकच प्रवासी!!!! मुंबईच्या कनिष्ट मध्यमवर्गात वाढलेल्या आणि एष्टी-लोकलमधून प्रवास केलेल्या माझ्यासारख्या मुलासाठी हा अनुभव म्हणजे अगदी टू मच होता!! त्यात ती शॅम्पेन आणि त्या सुवर्णकेशी मुलीचं मधाळ हास्य.......
राहिलेला रिपोर्ट वाचून पूर्ण करावा म्हणून त्या होस्टेसकडे माझी बॅग मागण्याचा विचार केला. पण नंतर ठरवलं की जाऊदे! मरूदे तिच्यायला!!! रिपोर्ट काय घरी परत जातांनाही वाचता येईल की! इथे हा एक अनोखा अनुभव मिळतोय तर त्याचा पूर्ण आस्वाद घ्यावा!!! होस्टेसला ग्लास रीफिल करायला सांगून मी त्या कोचात हात पाय ताणले, डोळे मिटुन घेतले.......
डोळ्यासमोर भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा भराभर सरकू लागला.....
अलीशिया माझी कॉलेजमधली मैत्रिण!!! आमची ओळख आणि मैत्री होण्याची कारणंही विचित्रच होती.....
मी नुकताच मुंबईतून माझ्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झालेलो होतो. आमच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स हाऊसमध्ये उतरलो होतो. तिथे नवीन आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना एक महिनाभर रहायची मुभा होती. एक महिन्यानंतर मात्र एकतर हॉस्टेलवर रहायला जायला लागायचं किंवा गावात एखादं अपार्ट्मेंट भाड्याने घ्यायला लागायचं आणि नव्यानं येणार्या विदेशी मुलांसाठी जागा खाली करून द्यायची असा नियम होता...
मी इथे आल्यावर इथल्या मेसमध्ये अमेरिकन फूड चाखलं होतं त्यामुळे हॉस्टेलवर रहायचा प्रश्नच नव्हता. दोन महिन्यातच उपासमारीने मेलो असतो. चांगली धडधाकट माणसं न्याहारीला दूध-लाह्या आणि जेवणाला उकडलेला बटाटा खातात हे मला आजवर माहितच नव्हतं. आमच्या मुंबईत जर माणूस सतत आजारी असेल आणि दुसरं काही पचत नसेल तरच त्याला असं अन्न द्यायची पद्धत होती. आणि त्यातही पंचाईत म्हणजे हॉस्टेलवर स्वतःचं अन्न शिजवायला परवानगी नव्हती...
शेवटी मी मला परवडणारं एक स्टुडियो अपार्ट्मेंट भाड्याने घेतलं. स्टुडियो म्हणजे एकच खोली! हॉल, किचन, बेडरूम, संडास व बाथरूम सर्व त्या एकाच खोलीत बसवण्याची किमया त्या आर्किटेक्टने साधलेली होती!!! चावी घेऊन आत शिरलो. अपार्टमेंट अतिशय स्वच्छ होतं. पण लाईट लावला तर लाईट लागेना!!! मग असं कळलं की वीज कंपनीला आपण तिथे रहायला आल्याचं कळवून डिपॉझिट भरावं लागतं मग ते तिथे बसून इलेक्ट्रिसिटी चालू करतात. मी रीतसर फोन केला. पण मी भारतातून नवीन आलेला असल्याने फोनवरून डिपॉझिट भरायला माझ्याकडे क्रेडिट कार्ड नव्हतं, आयडी साठी अमेरिकन ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं! होतं ते युनिव्हर्सिटीचं आयडी कार्ड आणि कॅश!!! मला असं सांगण्यात आलं की अशा परिस्थीतीत मी त्या शहरातल्या वीजमंडळाच्या (एमेसीबीच्या म्हणणार होतो, पण यांची वीज साली चोवीस तास अखंडित चालू रहायची, तिच्यामारी!!!!) मुख्य ऑफिसात जाऊन पैसे भरावेत. मी ठीक आहे म्हटलं. आता क्लासची वेळ झाली होती म्हणून नंतर दुपारी तिथे जाण्याचा विचार केला आणि क्लासला गेलो....
त्या दिवशी क्लासमध्ये आम्हाला एक नवीन ग्रुप प्रोजेक्ट दिला गेला. माझ्या ग्रुपमध्ये तीन मुली आणि आम्ही दोघं मुलं होतो. क्लास संपल्यानंतर आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या आणि प्रोजेक्टवर काम कसं करायचं ते ठरवू लागलो. तेंव्हा कोणीतरी बूट काढला की आपण क्लासेस संपल्यानंतर दुपारी एकत्र बसून प्रोजेक्टची रूपरेखा ठरवावी. मी लगेच सांगितलं की मला आज दुपारी शक्य नाही कारण मला वीजमंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन डिपॉझिट भरायचं आहे....
"व्हाय डोन्च्यू जस्ट कॉल देम?", एकीने सुचवलं
"आय डिड! बट सिन्स आय डोन्ट हॅव्ह अ क्रेडिट कार्ड आय नीड टू गो देअर इन पर्सन!! तिथे कुठली बस जाते तुम्हाला कुणाला माहितीये का?"
"बस? व्हाय बस? टेक माय कार" त्या मुलाने कार ऑफर केली
"आय कान्ट! माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसनही नाहिये"
आता त्या ग्रुपमधल्या एका मुलीने माझ्याकडे जणू पहिल्यांदाच पाहिल्यासारखं निरखून पाहिलं....
पावसातल्या भिजक्या मा़ंजराच्या पिल्लाकडे पहावं तसं.....
"फरगेट द बस!", ती पूर्ण भूतदयेने म्हणाली, " मी तुला माझ्या गाडीतून घेऊन जाईन. तुला माहितीये का तिथे कसं जायचं ते?"
"मला वाटलं की ते सगळ्यांना माहिती असेल. ते वीज मंडळाचं हेड्-ऑफिस आहे असं मला फोनवर म्हणाले!" आयला, आपल्या गावातलं एमेसीबीचं गावातलं हेडऑफिस माहिती नाही या लोकांना? माझ्या मनातला विचार...
"हे बघ, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी इलेक्टॄसिटीच्या कोणत्याच ऑफिसात गेलेली नाही. त्यांचा फोन नंबर आहे तुझ्याकडे?"
मी नंबर दिला. तिने फोनपाशी जाऊन त्यांना कॉल केला आणि पत्ता विचारला (खरंतर तिने ड्रायव्हिंग डायरेक्शन्स विचारल्या होत्या हे मला नंतर उमजलं).
"काय नांव तुझं?" ती. मी परत एकदा माझं नांव सांगितलं. म्हणजे जेंव्हा पहिल्यांदा सांगितलं तेंव्हा तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं तर....
"आय ऍम अलीशिया, फॉलो मी" असं म्हणून ती माझ्याकडे पाठ फिरवून ताड्ताड् चालत सुटली. अणि मी आपला धडपडत तिच्यामागे....
जवळ जवळ पावणे सहा फूट उंची! कॉकेशियन तांबडा-गोरा वर्ण!! सुई टोचली तर भळभळ रक्त वाहू लागेल अशी नितळ त्वचा!! माधुरी दिक्षितसारखे खांद्यापर्यंत आलेले पण सोनेरी केस! गर्द हिरवे डोळे, श्रीदेवीला नगीनामध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस घालूनही ही शेड साधता आली नव्हती! अंगात काळी पँन्ट आणि एक अतितलम पांढरा शर्ट! कानात लखलखीत हिर्याची कर्णभूषणे, (हो हिरेच असावेत ते! पण खरे हिरे असतील तर ते इतके मोठे कसे असतील?)! आणि अतिशय बांधेसूद, टंच शरीरयष्टी!!! सर्व काही आखीव, रेखीव, आणि जिथल्या तिथं!!! जणू एखाद्या ग्रीक देवतेच्या पुतळ्यालाच आधुनिक पोषाख चढवला असावा ना, तसं....
तिच्यामागून तिला निरखत चालत रहाणंही अतिशय आनंददायक होतं!!!
तिच्या गाडीपाशी आल्यावर तिने डिकी उघडून तिची आणि माझी पुस्तकांची बॅग आत ठेवली आणि मला सीटवर बसायचा निर्देश करून ती स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली....
अर्ध्या तासात आम्ही वीजमंडळाच्या कार्यालयात पोचलो. मी तिथे गर्दी अपेक्षित केली होती. पण माझ्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध तिथे कुणीच ग्राहक नव्हते. क्रेडिट कार्ड नसल्याने तिथे प्रत्यक्ष येऊन पैशाचा भरणा करावा लागणारे माझ्याशिवाय आणखी दुर्दैवी जीव गावात अन्य नसावेत. माझं काम उरकून आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि वाटेतच पाऊस सुरू झाला...
"शिट! नाउ वुई आर गोईंग टू गेट वेट!!!", अलीशिया
"व्हाय? वुइ आर इन द कार"
"नॉट हियर डमी! हाऊ आर गोईंग टू वॉक फ्रॉम द पार्किंग लॉट टू द बिल्डिंग?"
"यू हॅव ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी"
"व्हॉऽऽऽऽट?", करकच्चून आवाज करत कार थांबली, "व्हॉट द हेल आर यु टॉकिंग अबाऊट?"
"आय सॉ ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी"
"फर्स्ट ऑफ ऑल, आय डोन्ट हॅव अ डिकी." अलीशिया रागाने लालबुंद होऊन ओरडली, "ऍन्ड सेकंडली, हाऊ कॅन वन हाईड ऍन अम्ब्रेला इन अ डिकी?"
ती का चिडली तेच मला समजेना...
"आय सॉ द अम्ब्रेला व्हेन यू पुट अवर बॅग्ज इन द डिकी अर्लियर", मी.
"अवर बॅग्ज इन द....! ओ, यु मीन द ट्रंक?"
"येस!"
"व्हाय डू यू कॉल इट अ डिकी? ऍन्ड देन व्हॉट डू यू कॉल दॅट?" तिने गाडीच्या पुढे बोट करून विचारलं...
"अ बॉनेट!"
"अ बॉनेट?"
"येस, एव्हरी कार हॅज अ बॉनेट ऍन्ड अ डिकी!!", मी.
अलीशिया एकदम खोखो हसत सुटली. तिच्या गडगडाटी हसण्याने कारची केबिन भरून गेली. बराच वेळ गेला तरी तिचं हसणं काही थांबेना. माझ्याकडे बघत हसू असह्य झाल्यामुळे ती खोकत खोकत हसत होती. काही वेळाने डोळ्यातून वहाणारं पाणी पुसत ती म्हणाली,
"हियर इन अमेरिका, द फ्रंट ऑफ द कार इज कॉल्ड द हूड ऍन्ड द स्टोरेज स्पेस इन द बॅक इज कॉल्ड द ट्रंक!!!"
"आय सी!!"
"हियर वुई कॉल दॅट अ डिकी", माझ्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये निर्भयपणे बोट दाखवून निर्देश करत ती म्हणाली, "ऍन्ड धिस वी कॉल अ व्हजायना", तसाच स्वतःकडे निर्देश करत ती म्हणाली....
"ओ माय गॉड!" धरती दुभंगून मला आपल्या पोटात घेईल तर बरं असं मला झालं....
"आय ऍम सॉरी अलीशिया, आय डिडंन्ट नो!!", मी माफी मागितली. ती परत हसत सुटली...
"सो रिमेंबर, इन धिस कंट्री इफ यू आस्क वुइमेन अबाऊट देअर डिकी यू आर इन्सल्टींग देम ऍन्ड इफ यू शो इन्टरेस्ट इन द डिकी विथ मेन देन यू आर गिव्हिंग देम अ व्हेरी डिफरंन्ट इंप्रेशन अबाऊट युवरसेल्फ!!"
"आय विल रिमेंबर धिस!!" माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
अमेरिकेमधल्या माझ्या शिक्षणाला आता खर्या अर्थाने सुरवात झाली होती....
आम्ही परत डिपार्ट्मेंटला आलो. बाकीचे तिघे अजून तिथेच बसून प्रोजेक्टची चर्चा करत होते.
"सो यू आर बॅक," त्या दोन मुलींमधली एक म्हणाली, " डिड यू गेट डीलेड बाय द रेन?"
"नो!", अलीशिया पुन्हा एकदा खळखळून हसत म्हणाली, "वुई गॉट डीलेड बिकॉज वुई वेअर बिझी इन्स्पेक्टिंग हिज डिकी!!!!!!"
त्या तिघे बिचारे काही न कळून एकदा माझ्या चेहर्याकडे आणि एकदा माझ्या "तिथे" बघत राहिले....
"आय लाईक यू", माझ्या पाठीवर जोरदार थाप मारत अलीशिया उद्गारली, "वुई आर गोईंग टू बी व्हेरी गुड फ्रेंन्डस!!!"
तिची बत्तिशी अगदी पुरेपूर खरी ठरली होती.....
.....
.....
"फासन् युवर सीट्बेल्ट सर, वुई आर लॅन्डिंग!!"
मी डोळे उघडले. मघाची ती सुवर्णकेशी कन्यका समोर उभी होती. थोड्याच वेळात विमान लॅन्ड झालं. त्या होस्टेसचा निरोप घेऊन मी ओकलंडच्या टर्मिनलमध्ये आलो. तिथे परत माझ्या नांवाची पाटी घेतलेला एक माणूस उभा! मला अलीशियाच्या होटेलवर न्यायला!! त्याच्याबरोबर त्याच्या कारमध्ये जाऊन बसलो....
"वुई हॅव क्वाईट अ ट्रॅफिक टुडे सर! इट मे टेक अ व्हाईल!!" तो अपराधी स्वरात म्हणाला.
"ओके, नो प्रॉब्लेम!" असं म्हणून मागच्या सीटवर रीलॅक्स होत मी पुन्हा डोळे मिटले....
भूतकाळाचा चित्रपट जणू इंटरव्हलनंतर पुन्हा सुरू झाला....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
30 Dec 2008 - 6:03 am | घाटावरचे भट
स्पेलबाईंडिंग. ऍज एव्हर.
30 Dec 2008 - 6:21 am | मदनबाण
जबराट्...सर्व वर्णन अगदी "रसदार" आहे...
चालुध्या... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
30 Dec 2008 - 6:21 am | अनामिक
लै भारी.... पुढचा भाग लवकर येऊ द्या.
अनामिक
30 Dec 2008 - 6:27 am | नंदन
नेहमीप्रमाणेच जिवंत, ओघवतं लेखन.
मस्तच होती!!!!
आणि... शॅम्पेनही छान होती!!
=))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Dec 2008 - 7:01 am | रेवती
काय आलीशीया म्हणायची की कोण?
भलतीच धीट.
हा भागही आवडला.
नेहमीचा प्रश्न.... पुढचा भाग कधी?
रेवती
30 Dec 2008 - 7:13 am | सहज
झकास! सर्व वर्णन एकदम चित्रदर्शी. :-)
पुढचा भाग लवकर येउ दे.
30 Dec 2008 - 7:34 am | रामदास
हेरॉल्ड रॉबीन्स .कथा कथनात वापरलेली वर्तमान-भूतकाळ-वर्तमान ही लकब खास त्याचीच.गोष्ट रंगते आहे.
नाताळाच्या सुटीत बर्याच जुन्या गोष्टी आठवतायंत.पण कथेच्या शेवटी तुम्ही पोटात जोरात बुक्का मारणार अशी भिती पण वाटते आहे.एक्सप्रेस एलेव्हेटर मध्ये पहील्यांदा गेलो तेव्हा जसा पोटात गोळा उठतो तसं वाटतं आहे.
30 Dec 2008 - 8:19 am | अनिल हटेला
सही !!
हा भागही आवडेच....
पू. भा. प्र..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Dec 2008 - 8:20 am | व्यंकु
अतिशय सुंदर, अक्षरशः खिळवून ठेवलं या कथेने
30 Dec 2008 - 8:37 am | यशोधरा
मस्त चाललय एकूण! लवकर लवकर लिहा बरं..
30 Dec 2008 - 9:25 am | अभिरत भिरभि-या
मस्त चाललय एकूण! लवकर लवकर लिहा बरं..
30 Dec 2008 - 9:50 am | प्राजु
भलतीच धीट आहे की ही बाई..
मस्त लिहिलं आहे. एकदम ओघवतं. येऊद्या लवकर पुढचा भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Dec 2008 - 10:00 am | आनंदयात्री
आधुनिक परिकथा लिहली आहे काका तुम्ही !!
चार्टर्ड फ्लाईट काय, सुवर्णकन्यका काय, अलिशिया नावाची राजकुमारी काय .. अन अजुन काय काय !! एका खेपेत दोनदा वाचला हा भाग .. खुप छान लिहलय !
30 Dec 2008 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका, मस्तच लिहिलं आहेत. पुढचा भागही पटकन टाका.
मी युकेत गेल्यावर मलाही असेच अनुभव आले होते ... भारतातली डिकी इंग्लंडात जाऊन बूट होते हे मला अशाच काहीशा पद्धतीत समजलं होतं. आणि कालांतराने इंग्रजांची स्लँग अशाच पद्धतीने समजली होती. इथून जाण्यापूर्वी एका मित्राने ते लोक फार ओपन माईंडेड असतात अशी 'चेतावणी' दिली होती त्याचा बराच फायदा झाला, आधी स्वतःवर हसायला आणि लगेचच मैत्री होण्यासाठी!
30 Dec 2008 - 11:10 am | विनायक प्रभू
हेरॉल्ड डांबिस
30 Dec 2008 - 11:33 am | अर्चिस
आम्ही शिकत असताना अशा कन्यका कुठे होत्या? डांबिस काकांचे अनुभव वाचून मन प्रसन्न झाले. पुढचा भाग लवकर टाका .
अर्चिस
30 Dec 2008 - 11:35 am | झेल्या
एकदम प्रवाही कथा..लिहिण्याची ष्टाईल लै भारी....
-झेल्या
30 Dec 2008 - 11:38 am | राघव
मस्तच होती!!!!
आणि... शॅम्पेनही छान होती!!
च्यामारी... =))
रंगारी जबरा आहे..मस्त रंगलीये कथा.. पुढच्या भागाची वाट बघतोय.
(रंगलेला)मुमुक्षु
30 Dec 2008 - 6:01 pm | लिखाळ
अगदी हेच. :)
दोन्ही भाग मस्त ! पुढचे पटकन लिहा.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
30 Dec 2008 - 12:12 pm | दिपक
झकास रंगत आहे कथा. पुढच्या भागाची (भुतकाळाच्या चित्रपटाची जास्तच) वाट पाहतोय.
:)
---दिपक
30 Dec 2008 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यायला काय जबरी आहे हो ही ऍलिशिया !!!
बिपिन कार्यकर्ते
30 Dec 2008 - 4:28 pm | बापु देवकर
वाचुन ऍलिशिया डोळ्यासमोर उभी राहिली.....
डांबिसराव ..पुढ्चा भाग लवकर टाका...
30 Dec 2008 - 5:42 pm | नि३
हा भाग पण उत्तम जमला आहे ....
पुढचा टाका लवकर....
---नि३.
30 Dec 2008 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
अप्रतीम कथा ...
पुढच्या भागाची (कथेच्या) आतुरतेनी वाट बघत आहे !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Dec 2008 - 6:54 pm | विजुभाऊ
"समान शीले व्यसनेशु सख्यम" म्हणतात ते खरे आहे.
काका तुला उगाच नाही सगलीकडे वल्ली भेटतात
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
30 Dec 2008 - 7:56 pm | रामदास
शैलेशु व्यसनेशु सखीयम असं तुम्हाला म्हणायचंय का?
ह .ह. घ्या
30 Dec 2008 - 10:10 pm | चतुरंग
चतुरंग
31 Dec 2008 - 12:36 pm | पिवळा डांबिस
काका तुला उगाच नाही सगलीकडे वल्ली भेटतात
अगदी बरोबर!
तू नाही का भेटलास, विजुभाऊ!!!:)
शैलेशु व्यसनेशु सखीयम
मारा, मारा खडे!!!!
पण खरं सांगू, आजवरच्या माझ्या आयुष्यात मला जिवलग मित्रांपेक्षा जवळच्या मैत्रिणीच जास्त भेटल्यात....
अगदी इथे मिपावर सुद्धा!!!!!!!
कदाचित मी त्यांच्याकडून मैत्रीपेक्षा अन्य कशाचीही अपेक्षा न करत असल्यामुळे असेल!!!!
:)
(तेचि पुरूष दैवाचे!!!)
31 Dec 2008 - 12:46 pm | घाटावरचे भट
>>तेचि पुरूष दैवाचे!!!
=))
'तेचि पुरुष दैवाचे' मधे पुढे अजूनही बरंच काही आहे काका. सगळं खरं समजायचं का तुमच्या बाबतीत? ;) (ह.घ्या)
31 Dec 2008 - 1:05 pm | पिवळा डांबिस
माझ्या मैत्रिणी माझ्याकडं!!
कसं?
30 Dec 2008 - 10:09 pm | चतुरंग
एखाद्या अस्सल बाँडपटाची कथा मराठीतून वाचावी असं वाटतंय पिडाकाका!
एकदम खिळवून ठेवणारे लिखाण.
मस्तच होती!!!!
आणि... शॅम्पेनही छान होती!!
हे एकदम खास! :P
अमेरिकन शब्दांचे अर्थ अशा धक्कादायक पद्धतीने शिकायला मिळणे म्हणजे कमालच आहे! ('रबर' आणि 'इरेजर' :O मधला फरक मला असाच धक्कादायक रीतीने समजला होता पण (कम)नशिबाने तिथे कोणी अलीशिया नव्हती! ;) )
चतुरंग
31 Dec 2008 - 2:24 am | शितल
पिडाकाका,
खुपच छान लिहिले आहे:)
हा भाग ही आवडला. :)
31 Dec 2008 - 12:27 pm | मॅन्ड्रेक
अप्रतीम कथा ...चाबुक ...
31 Dec 2008 - 1:04 pm | अवलिया
पिडा काका.....
....लय भारी
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी